दत्त मनी दत्त ध्यानी
अवधूत चिंतन श्री गुरुदेव
कर्म माझे जाणिले तूम्ही
चित्त तुम्हा ठायी सदैव
दत्त नामस्मरण नित्य
पुण्य काळ सुखाचा..
मोक्षार्थी करीतसे गमन
भक्त गुरू दत्तांचा..
दत्त वसले औंदुबरी
भोवताली श्वान गाई
कृपेचा भवसागर
ध्यानस्थ कृष्णा माई..
चराचरात पाहतो
गुरु विना कोण तारक
ब्रम्हा विष्णू महेश
एका स्थळी चित्तवेधक
प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.
किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-
https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/

Post Views: 67