जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
सांगली हायस्कूलमध्ये कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे शिक्षण झाल्यानंतर तेथेच कांही काळ ते शिक्षकही होते. मराठी गद्य रंगभूमीचे जनक, लोकमान्य टिळकांचे सहकारी आणि नवाकाळ दैनिकाचे संस्थापक संपादक असलेल्या कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचा जन्म २३ नोव्हेंबर १८७२ रोजी झाला. कॉलेजमध्ये शिकत असतांना नाट्यवाङ्मयाचा सूक्ष्म अभ्यास केला. तत्वज्ञान हा त्यांचा खास विषय होता. `सवाई माधवरांचा मृत्यू `हे नाटक लिहून त्यांनी आपल्या नाट्यलेखनास प्रारंभ केला. काकासाहेब वकील व्हावे या उद्देशाने मुंबईस अभ्यासासाठी गेले होते. पण राजकीय जागृतीच्या शिक्षणाचा जनतेत प्रसार करण्याची कामगिरी सुशिक्षित तरुणांनी अवश्य केली पाहिजे असे काकांना वाटत होते. त्यामुळेच ते टिळकभक्त झाले. गौतमबुद्ध हा तत्वज्ञानावरील चरित्रपट प्रबंध विविध ज्ञानविस्तार मासिकांत प्रसिद्ध झाला. पुढे काका लो.टिळकांना भेटले.
पहिल्या भेटीत काकांना केसरीसाठी लेख लिहण्यास त्यांनी सांगितले. १ सप्टेंबर १८९६ रोजी काकासाहेबांचा हा पहिला लेख अग्रलेख म्हणून टिळकांनी प्रसिद्ध केला. पहिल्याच लेखाला अग्रलेखाचा मान मिळाला. लेखाचा विषय होता. `राष्ट्रीय महोत्सवाची आवश्यकता `.त्यानंतर केसरीच्या संपादकीय खुर्चीवर काका विराजमान झाले. त्यातूनच काकांचे जळजळीत देशप्रेम व सडेतोड विचार प्रगट होऊ लागले. सोलापुरात दुष्काळ निवरणाचे काही काळ गेले. तेथे त्यांनी लोकजागृतीचे काम केले. यामुळेच पुढे `कांचनगडची मोहना ` नाट्यकृती जन्माला आली. `कीचकवध ` हे अप्रतिम नाटक त्यांनी लॉर्ड कर्झनने केलेल्या फाळणीवर लिहिले. ते २३-२-१९०७ रोजी पुण्यात विजयानंद थिएटरमध्ये रंगमंचावर सादर झाले. ते ऑक्टोबर १९०८ मध्ये `मराठा ` चे संपादक झाले. १९१० साली कीचकवध नाटकावर बंदी आली. प्रेमध्वज, मानापमान, विद्याहरण, सत्वपरीक्षा इ. नाटके त्यांनी लिहिली.
त्यांची नाटके समाज प्रबोधनाबरोबर जनजागृतीसाठीही होती. ते दोन वेळेला नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष झाले. मे १९०७ व जून १९१७. १९३३ साली एका साहित्यसंमेलनाचे ते अध्यक्षही झाले. १९२० साली त्यांनी केसरीचे संबंध तोडले. मुंबईस दैनिक `लोकमान्य ` च्या संपादकपदाची धुरा सांभाळू लागले. एप्रिल १९२३ साली स्वत:च्या संपादकत्वाखाली स्वत:चा `नवाकाळ ` दैनिकाची सुरुवात केली. १९३५ मध्ये मुंबईच्या रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये सुलोचना संगीत मंडळाकडून `बायकांचे बंड ` नाटकाचा प्रयोग झाला. १९३८ मध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यांच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी महात्मा गांधींनी त्यांची भेट घेतली. १५ ऑगस्ट १९४७ चा स्वातंत्र सूर्योदय त्यांनी पाहिला आणि आपल्या गुरुबद्दलचे विचार त्यांनी आकाशवाणीवरुन मांडूनच आपला देह कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे २६ ऑगस्ट १९४८ रोजी निधन झाले.
श्री.संजीव, वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- विजय बक्षी
August 26, 2017
१९५२ मध्ये ऑस्ट्रेलियातील सी.एस.आय.आर.ओ. येथे खगोलशास्त्र विषयक कार्य सुरू केले. सिडनी जवळील पोट्स हिल येथे सहा फूट व्यासाच्या ३२ अन्वस्त (पॅराबोलीक) ॲंटेना उभारण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. १९६१ मध्ये अमेरिकेतील स्टँनफर्ड विद्यापीठातून त्यांनी पीएचडी मिळवली.
March 23, 2022
आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून पाटील यांनी गावरान विषय, सामाजिक प्रश्न तसंच वास्तवता मांडली. ‘सावरखेड-एक गाव’ , ‘जोगवा’, ‘७२ मैल एक प्रवास’, ‘पांगिरा’, ‘सनई चौघडे’, ‘ऑक्सिजन’, ‘ब्लाईंड गेम’; असे वैविध्यपूर्ण विषय दिग्दर्शित करुन प्रेषकाचं पुरेपूर मनोरंजन होईल याची खात्री घेतली.
March 13, 2014
संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात त्यांनी लिहिलेला ‘संयुक्त महाराष्ट्र — महागुजरात’ हा ग्रंथ त्या दोन राज्यांच्या जडण-घडणीचा अद्ययावत ज्ञानकोश समजावयास हरकत नाही. ‘अहल्या आणि इतर कथा’ हा त्यांचा लघुकथा संग्रह आहे.
January 29, 2022
लेखक पुरुषोत्तम नागेश ओक उर्फ पु. ना. ओक यांचा जन्म २ मार्च १९१७ रोजी इंदोर येथे झाला.
पु.ना.ओक यांनी मुंबई विद्यापीठातून एम.ए आणि कायद्याची पदवी घेतली. काही काळ फर्ग्युसन महाविद्यालयात इंग्रजी शिकवले आणि त्यानंतर ब्रिटीश आर्मी जॉईन केली. दुसऱ्या महायुद्धात सिंगापूर मध्ये त्यांची पोस्टिंग होती. जेव्हा जपानने ब्रिटीश आर्मीला हरवले तेव्हा पु. ना. ओक सुद्धा युद्ध कैदी म्हणून जपान्यांच्या हाती सापडले. पुढे त्यांची भरती आझाद हिंद सेनेत केली गेली.
त्यांनी सांगितल्या आठवणीनुसार ते आझाद हिंद सेनेतला बहुतांश वेळ नेताजी सुभाषचन्द्र बोस यांचे असिस्टंट होते. तिथून त्यांची रवानगी जनरल जगन्नाथ भोसले यांचा ऑन फिल्ड असिस्टंट म्हणून करण्यात आली. त्यांनी आझाद हिंद रेडियोचे देखील काम सांभाळलं. दुसऱ्या महायुद्धात आझाद हिंद सेना ब्रिटिशांच्या विरुद्ध विजयी होऊ शकली नाही. नेताजींचे विमान कोसळले, आझाद हिंद सेनेची वाताहत झाली. युद्ध संपल्यावर पु.ना. ओक पायी चालत सिंगापूरहून अनेक देश, जंगले ओलांडून कोलकात्याला आले. १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळालं. पु.ना ओक नी वार्ताहार म्हणून हिंदुस्तान टाईम्स, द स्टेटसमन अशा वृत्तपत्रांमधून काम केलं. पुढे माहिती आणि नभोवाणी मंत्रालयात अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली.
एवढेच नाही तर अमेरिकी दुतावासात देखील संपादनाचे काम केले. या दरम्यानच्या काळात भारतात इतिहास हा स्थानिकांच्यावर अन्याय करणारा लिहिण्यात आला आहे असे त्यांच्या निरीक्षणात आले. मग त्यांनी भारतीय इतिहासाचे पुनर्लेखन करायची जबाबदारी उचलली. आणि त्यांनी नवा इतिहास घडवलां… भारतीय इतिहास पुनर्लेखन संस्थेची स्थापना १९६४ साली केली. पुढे त्याचेच रुपांतर विश्व इतिहास पुनर्लेखन संस्थेत केले.
फक्त भारताचाच नव्हे तर जगाचा इतिहास पाश्चात्य लेखक आणी त्यांना धार्जिण्या भारतीय इतिहासकारांनी हिंदूच्या विरोधात लिहिला असे त्यांनी ठासून सांगितले. त्यांनी हिंदी आणि मराठी भाषेत अनेक पुस्तके लिहिली. यातले सर्वात प्रसिद्ध पुस्तक म्हणजे “ताजमहल नव्हे तेजोमहालय”
ताजमहल हा शहाजहानने बांधला नसून तो अग्रनगरच्या अग्रसेन महाराजांनी अग्रेश्वर महादेवासाठी बांधलेला तेजोमहालय आहे असे या पुस्तकाचे म्हणणे आहे.या पुस्तकातील बरीचशी पाने ताजमहाल शहजाहान ने कसा बांधला नाही यात खर्ची केली आहेत पण ज्या अग्रसेन महाराजांनी तेजोमहालय बांधल्याचा दावा ओक करतात त्याच्या बद्दल विस्तृत माहिती द्यायला ते कमी पडतात. फक्त शहाजहान पूर्वी ५०० वर्षापासून हे मंदिर अस्तित्वात होते असे त्यांनी सांगितले आहे आणि बाकी सर्व पुरावे मुघलानी, इंग्रजानी आणि त्यानंतर आलेल्या सेक्युलर सरकारांनी दडवले असा आरोप ते करत राहतात. या पुस्तकाबद्दल अनेक वाद झाले.
त्यात अनेक तज्ञ इतिहासकारांनी ऐतिहासिक पुराव्यांचा आधार देऊन ओक यांचा समज खोटा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना आणि त्यांचा इतिहास पटणाऱ्या लोकांनी त्याकडे लक्ष दिले नाही. अखेर हे प्रकरण सर्वोच्च न्यायलयात गेले.
तिथे झालेल्या सविस्तर चर्चेनंतर १३ जुलै २००० साली न्यायमूर्ती एस.पी.भरूचा यांच्या नेतृत्वाखालील बेंचने निर्णय दिला कि हि वास्तू तेजोमहल नसून ताजमहलच आहे. फक्त एवढे करून न्यायालय थांबले नाही तर विनापुरावा सर्वोच्च न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याबद्दल पु. ना. ओक यांची कानउघडणी केली.
पु. ना. ओक यांचे ४ डिसेंबर २००७ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
March 2, 2022
गोखले अर्थशास्त्र संस्थेने गाडगीळांचे मराठीतील समग्र लिखाण ध. रा. गाडगीळ लेखसंग्रहनामक दोन खंडांत (१९७३ -१९७४) प्रकाशित केले आहे. निव्वळ आर्थिक सिद्धांतांचे विश्लेषण करण्यावर भर न देता त्यांचा व्यावहारिक उपयोग करण्यावर गाडगीळांचा कटाक्ष असे. आर्थिक विकास लोकाभिमुख असावा, असे मत ते आग्रहाने मांडीत. लोकमान्यांचे शिष्यत्व पत्करणाऱ्या प्रा. धनंजयराव गाडगीळ यांची भूमिका उदारमतवादी आणि व्यापक स्वरूपाची होती.
April 11, 2022
मुंबईतली कामगार चळवळ जवळपास नामशेष होण्याची चिन्हे दिसत असताना या चळवळीत अतिशय मोलाची कामगिरी बजावणा-या कामगार कार्यकर्त्यांच्या पिढीचे एक प्रतिनिधीत्व करणारे वसंत गुप्ते हे होते. कॉ. श्रीपाद अमृत डांगे, साथी जॉर्ज फर्नान्डिस यांसारख्या दिग्गज कामगार पुढा-यांच्या पाठीशी वसंत गुप्तेंसारखे दुस-या फळीतले तितकेच समर्थ नेतृत्व असल्यानेच नव्वदीच्या दशकापर्यंत कामगार चळवळीचा दबदबा महाराष्ट्रात होता. आंदोलनाची रणनीती आणि एकंदर पुढारपण जितके महत्त्वाचे असते तितकीच, किंबहुना त्यापेक्षा कणभर जास्तच विविध पातळ्यांवर समन्वय साधणारी, बारीकसारीक बाबींची खडा न् खडा माहिती असणारी निष्ठावंतांची दुसरी फळीही महत्त्वाची असते.
July 25, 2011
मृच्छकटिकातील चारुदत्त आणि संशयकल्लोळ मधील आश्विनशेट या त्यांच्या लोकप्रिय भूमिका होत्या; तर स्वयंवरातील ‘जा भय न मम मना’, मृच्छकटिकातील ‘रजनीनाथ हा नभी उगवला’, सौभद्रातील ‘बहुत दिन नच भेटलो सुंदरीला’, एकच प्याल्यातील ‘वसुधातल रमणीय सुधाकर व्यसनघनतिमिरी’, शारदेतील ‘बिंबाधरा मधुरा’ आणि संशयकल्लोळ मधील ‘कर हा करी धरिला शुभांगी’ ही त्यांनी गायलेली पदे श्रोत्यांच्या मनाची पकड घेणारी होती.
July 3, 2017
बाबु गणपत घोलप यांच्या शैक्षणीक कारकिर्दीवर नुसती धावती नजर जरी टाकली, तरी त्यांच्या प्रखर बुध्दीमत्तेची व सर्वांगिण क्षमतांची पोच, तसेच आभ्यासाप्रती त्यांनी दाखविलेल्या निष्ठेची खोली त्वरीत ध्यानात येते. बीड जिल्ह्यातील लिंबागणेश या लहानश्या तालुक्यात, 1 मे, 1978 रोजी जन्मलेल्या घोलपांनी विद्येसाठी भरपुर कष्ट उपसले.
August 22, 2011
गडचिरोली जिल्ह्यातील सर्च या सामाजिक संस्थेच्या संस्थापक व सहसंचालिका डॉ.राणी बंग यांची भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे २००८ मध्ये दिल्या जाणार्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली.
November 9, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti