(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशी

    प्रकाश बाळ जोशी हे एक बहुआयामी असं व्यक्तिमत्त्व आहे. गेल्या एक्केचाळीस वर्षापासून ते पत्रकारितेत आहेत. एका बाजूला सर्जनशील लेखन तर दुस-या बाजूला एक चित्रकार म्हणून मिळालेली आंतरराष्ट्रीय स्तरावरची ओळख याची त्यांनी स्वत:ची अशी एक खास शैली निर्माण केलेली आहे.

      August 16, 2021


  • एच. के. जावळे

    एच. के. जावळे हे जेव्हापासून ठाणे जिल्हा परिषदेच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी रूजू झाले त्यावेळेपासून जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय यंत्रणां व अधिकार्‍यांच्या कार्यपद्धतीमध्ये अमुलाग्र बदल घडून आला.

    अफाट कार्यक्षमता व परिषदेच्या कार्याची व्याप्ती वाढविणारे, तसेच सामाजिक व राजकीय विकासकार्यांमध्ये हिरीरीने सहभागी होणारे राजकीय नेतृत्व अशी ओळख एच. के. जावळे यांनी निर्माण केली आहे. राज्य शासनाच्या डोंगराळ भागांमध्ये राहणार्‍या आदिवासींसाठीच्या योजनांचे जास्तीतजास्त फायदे त्यांना मिळवून देण्याचा सतुत्य प्रयत्न केला आहे. इंग्रजीचे महत्व जाणून त्यांनी सर्वप्रथम ठाणे आदिवासी पाडयांमध्ये, २६ ठिकाणी “इंग्रजी नर्सरी” सुरू केल्या तर, शहरी भागातील लोकांना आपल्या या विकासयात्रेमध्ये खेचून घेण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. लोकसहभागातूनच या बालवाड्यांसाठी उत्तम प्रतीच्या व आधुनिक पायाभूत सुविधा बांधण्यात आल्या. “इस्कॉन फुड रिलीफ फाउंडेशन” व “नाईक फाउंडेशन” तर्फे काही शाळांना सात्विक व पोषक मध्यान्न आहार पुरविला जातो. या महत्वाकांक्षी प्रकल्पाला तडीस नेणारे शिल्पकार म्हणून जावळे यांच्याकडे पाहिलं जातं. इस्कॉन फुड रिलीफ फाउंडेशन तसेच भिवंडी, पालघर व वाडा या तालुक्यांमध्ये मध्यवर्ती भोजनालय सुरू करण्याची मुळ संकल्पना सुध्दा एच. के. जावळेंच होती. ठाणे जिल्ह्यामध्ये व्हर्चुअल क्लासरूम ची संकल्पना अधिक प्रभावशालीपणे व विस्तारीत स्वरूपावर खेड्यात देखील कशी राबवता येईल, यादृष्टीने या विषयावरती सखोल आभ्यास सुरू आहे व त्यामुळे या संकल्पनेने आपली मुळे रोवण्यास सुरूवात केलं असल्याचे प्रकर्षाने जाणवते. आदिवासी समाजाच्या आर्थिक, सामाजिक, व राजकीय विकासाचा दर वाढविण्यासाठी आदिवासी व ग्रामीण जनतेला अद्ययावत आरोग्य सल्ला व सुविधांचा लाभ देणे, आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षित करुन, जिल्हा परिषद शिक्षक व विद्यार्थ्यांना आवश्यक कौशल्यवृध्दी, व्यवसयाभिमुख विषय व तज्ञांचे मार्गदर्शन करण्याचे कार्य पार पाडले आहे.

      January 3, 2015


  • बॉलिवूडचे ज्येष्ठ चित्रपट निर्माते जी. पी. सिप्पी

    सतरंजी विक्रेत्यांपासून सुरूवात करणा-या सिप्पी यांनी १९५५ मध्ये चित्रपट कारर्कीदीला सुरूवात केली. शोले, सीता और गीता, सागर, शान या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती सिप्पी यांनी केली. शोले या अजरामर चित्रपटाच्या माध्यमातून ज्यांचे नाव चिरंतन रसिकांच्या लक्षात राहिल.

      September 14, 2017


  • टीम इंडियाचा माजी खेळाडू व्ही.व्ही.एस लक्ष्मण

    क्रिकेट जगतात एक वेळ अशी होती की या व्हेरी व्हेरी स्पेशल फलंदाजाला ऑस्ट्रेलिया संघ घाबरत होता. लक्ष्मणने आपल्या करिअरमध्ये सर्वात अधिक धावा ऑस्ट्रेलियाविरूद्ध २,४३४ इतक्या धावा काढल्या आहेत. त्याने कसोटीत कंगारू विरूद्ध ६ शतके तर १२ अर्धशतके ठोकले आहेत.

      November 1, 2019


  • डॉ. अविनाश फडके

    रोग निदानाच्या क्षेत्रात गेली ३० वर्षे व्यावसायिक यश मिळवून स्वत:च्या नावानेच ब्रॅन्डनेम तयार करणार्‍या डॉ. अविनाश फडके यांच्या पॅथॉलॉजी लॅबोरेटरीजची उलाढाल आज शंभर कोटींच्या घरात पोहोचली आहे. १९ प्रयोगशाळा आणि साडेनऊशे कर्मचारी यांचे बळ आज त्यांच्या पाठीशी आहे आणि रोगनिदानातील अचूकतेबाबत ते काटेकोर आहेत.

    डॉ. अविनाश फडके यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला यशाचे अचूक निदान हा लेख पुढील पानावर वाचा.

    डॉ. अविनाश फडके यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला यशाचे अचूक निदान हा लेख वाचा.

    phadke-dr-avinash-modified

      September 8, 2015


  • यशवंत त्र्यंबक वैद्य

    भारतीय शास्त्रीय संगीत गायन परंपरेतील एक अग्रगण्य नाव. श्रीयुत यशवंत वैद्य यांचा जन्म १५ जून १९३२ रोजी झाला. १९५३ ते १९६० दरम्यान त्यांचे गुरु कै. भास्करबुवा फाटक यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतले. १९७२ साली गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद ही पदवी प्राप्त केली.

      March 28, 2013


  • महाराष्ट्राचे शेक्सपियर – राम गणेश गडकरी

    २६ मे १८८५ रोजी नवसारी (गुजराथ ) येथे जन्मलेले व २३ जानेवारी १९१९ रोजी सावनेर येथे निधन झालेले अवघे ३३ वर्ष ७ महिने २८ दिवस इतके अल्पायुष्य लाभलेले राम गणेश गडकरी म्हणजेच मराठी भाषेचे शेक्सपिअर , प्रेमाचे शाहीर , विनोदी साहित्यातील बिरबल सरस्वतीच्या दरबारातील एक प्रतिभा सम्राट यांचा उल्लेख नाटककार म्हणून होत असला तरी ते खऱ्या अर्थाने ते कवीच होते.

      March 21, 2026


  • राष्ट्रीय कीर्तन केसरी गोविंदस्वामी आफळे

    सिनेमा, रेडीओ, टी.व्ही. अश्या विविध माध्यमांमुळे कीर्तन हा प्रकार थोडा मागे पडू लागला होता. त्यात आफळे बुवांनी नवचैतन्य निर्माण केले. क्षणात हास्याचा खळखळाट तर क्षणात वीरश्री, गहिवर दाटेल असा करूण रस तर मिश्कील कोट्या अशाप्रकारे नवरसांचा उत्कट अविष्कार त्यांच्या कीर्तनातून होत असे.

      June 6, 2022


  • ज्येष्ठ मिमिक्री आर्टिस्ट, गायक सुदेश भोसले

    सुदेश भोसले आणि बॉलीवूडचे ‘बीग बी’ अर्थात अमिताभ बच्चन यांचे अतूट असे नाते आहे. अमिताभ बच्चन यांची ‘मिमिक्री’करता करता सुदेश भोसले यांचा आवाज अमिताभ बच्चन यांचा आवाज झाला. सुदेश भोसले यांनी अमिताभ बच्चन यांच्यासाठी “चुम्मा चुम्मा‘, “शावा शावा‘, “सोना सोना‘, “मेरी मखना‘ ही गाणी गायली आहेत.

      July 4, 2022


  • माजी केंद्रीय मंत्री मोहन धारिया

    स्व. राजीव गांधी व चंद्रशेखर यांच्या आग्रहामुळे त्यांनी नियोजन आयोगाच्या उपाध्यक्षपदाचा स्वीकार केला. अत्यंत कमी कालावधी मिळाला असतानाही त्यांनी नियोजन प्रक्रियेला नवे वळण लावले.

      October 14, 2021