(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ज्येष्ठ गझल गायिका मलिका पुखराज

    मलिका पुखराज यांची ‘जाहिद न कह बुरी के ये मस्ताने आदमी है, तुमने हमारा दिल में घर कर लिया तो क्या है, आबाद करके आखिर वीराने आदमी है’, जुबाँ न हो जाए, राज-ए-उल्फत अयाँ न हो जाए’ गाणी गाजली. ‘अभी तो मै जवान हूँ’ हे गीत तर अजरामर झाले.

      February 4, 2022


  • व्यंकटेश माडगूळकर

    व्यंकटेश दिगंबर माडगूळकर (६ जुलै, १९२७ – २८ ऑगस्ट, २००१) हे मराठी लेखक आणि चित्रकार होते. त्यांनी कथा, कादंबर्‍यांसोबत चित्रपटांसाठी पटकथाही लिहिल्या.

      March 26, 2013


  • क्रिकेटपटु खंडेराव रांगणेकर

    प्रत्येक सामन्यामध्ये आपल्या झंझावाती व नैसर्गिक खेळाने विरूध्द गोलंदाजाला चकित करणार्‍या, रांगणेकरांना त्यांच्या तमाम भारतीय चाहत्यांकडून, व मुंबई आकाशवाणीचे कॉमेंटेटर होमी तल्यार खान यांजकडून क्रिकेटचा बाजीराव ही मानाची उपाधी मिळाली होती.

      October 11, 2021


  • दिनकर केशव बेडेकर

    दिनकर केशव बेडेकर हे एक महान साहित्यिक, विचारवंत, तत्वचिंतक व समिक्षक होते. महाराष्ट्रामध्ये वाहणार्‍या हजारो सामाजिक, राजकीय, साहित्यीक, तार्किक, धार्मिक, व तात्वज्ञानिक विचारप्रवाहांना व मतधारांना जोडणारा पुल त्यांनी आपल्या सिध्दहस्त लेखणीच्या माध्यमातून साकारण्याची अनोखी कसरत केल्यामुळे त्यांच्या नावाभोवती प्रसिध्दीचे एक वेगळे वलय निर्माण झाले. “किर्लोस्कर”, “स्त्री”, “नवभारत” अश्या विविध नियतकालिकांमधून त्यांनी अनेक वर्षे विपूल लेखन करत, विविध संवेदनशील विचारांना स्पर्श केला. निर्भीड व पारदर्शी लेखांप्रमाणेच त्यांनी केलेली साहित्य समिक्षा देखील आज त्या विषयांसाठी मार्गदर्शक मानली जाते.

    "नवकाव्य","नवकथा","सौंदर्यमीमांसा","अस्तित्ववाद","चित्रकलेतील नवप्रवाह" अशा वेगवेगळ्या विचारप्रणालींचे उत्खनन करून त्यात आपल्या बुध्दीचा व तात्विक निकषांचा अर्क टाकून त्याचा अर्थ सुध्दा रसिकां पर्यंत पोहोचविला. दिनकर बेडेकरांच्या लेखणीने त्यांच्या नियमित वाचकांच्या मनातील प्रगल्भ विचारांची दालने उघडण्याचा सदैव प्रयत्न केला, असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही.

    भारताच्या राजकीय, सामाजिक व तार्किक सक्षमीकरणाचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून, बेडेकरांनी तब्बल ६०० च्या वर लेख लिहिले. “आधुनिक मराठी काव्यः उदय, विकास, आणि भवितव्य” तसेच “अस्तित्ववादाची ओळख” ही स्वतंत्र पुस्तकेदेखील दिनकर बेडेकरांनी लिहिली आहेत.

    दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित

      January 3, 2015


  • योगेश फुलफगर

    योगेश फुलफगर यांचा जन्म जानेवारी 18, 1985 मध्ये पुणे येथे झाला. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, येथे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात अनेक नवे प्रयोग करण्यास सुरूवात केली. त्यांच्यामधील सतत नव्या व तजेलदार विषयांवर चित्रपट बनविण्यास आसुसलेल्या, व चित्रपट क्षेत्रातुन नवीन संवेदनशील चित्रपटांची नांदी आणण्यास तयार असलेल्या या प्रतिभावान दिग्दर्शकाची दखल हिंदी चित्रपटसृष्टीने घेतली.

      August 16, 2011


  • ज्येष्ठ भारतीय साम्यवादी नेते व कामगार पुढारी श्रीपाद अमृत डांगे

    श्रीपाद अमृत डांगे यांच्या बद्दल अशी गोष्ट सांगितली जाते की डांगे यांच्या नेतृत्त्वातून आणखी दोन गोष्टी जन्माला आल्या. महाराष्ट्र राज्याची निमिर्ती झाली आणि फ्लोरा फाउंटनला हुतात्मा स्मारक निर्माण झाले. त्यात शेतकरी आणि कामगारांच्या एकजुटीची प्रतिमा आली. महाराष्ट्र राज्यनिमिर्तीसाठी दिल्लीतील विद्वानांनी १ एप्रिल ही तारीख ठरवली होती. यशवंतराव चव्हाणांनी हा बेत कॉ.डांगे यांना सांगितला तेव्हा ते म्हणाले, ‘अहो, शहाण्यांना मूर्ख बनवण्याचा जागतिक दिन तो, आणि त्या दिवशी तुम्ही नव्या राज्याची गुढी उभारणार? ते जमायचं नाही. हा लढा मुख्यत्वे मुंबईच्या कामगार वर्गात लढलेला आहे. तेव्हा मे दिन हाच महाराष्ट्र दिन होईल. नेहरूंना समजावण्याची जबाबदारी माझी.’ कॉ.डांगे नेहरूंना दिल्लीत जाऊन भेटले. ‘आम्हाला एप्रिल फूल करताय का?’ असा प्रश्न त्यांनी केला. नेहरूही हसले आणि त्यांनी १ मे ही तारीख मान्य केली. आणि १ मे महाराष्ट्र दिन झाला.

      May 27, 2022


  • प्रा.विश्वनाथ कराड

    स्वामी विवेकानंद आणि संत परंपरेतून पुढे आलेले विचार विद्यार्थ्यांमध्ये पोहोचविण्यासाठी त्यांनी एमआयटी ही संस्था सुरू केली. ही त्यांची संस्था पुण्यात खासगी शिक्षण उपलब्ध करुन देत असून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे काम त्यांनी केले आहे.

      July 9, 2022


  • लेखक, दिग्दर्शक अशोक हांडे

    लता मंगेशकर हा त्यांचा विक पॉइंट. हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील सर्व गायक-गायिकांच्या गाण्यांचे पारायण तर ते त्या वेळी करतच होते, पण लता मंगेशकरांच्या गाण्यांसाठी मनाचा एक कोपरा कायम राखून ठेवलेला होता.

      July 5, 2022


  • ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा

    ध्येयाने झपाटलेल्या रतन टाटा यांनी अमेरिकेतील आपल्या दहा वर्षांच्या मुक्कामामध्ये हॉटेलमध्ये भांडी घासण्यापासून ते कारकुनाच्या नोकरीपर्यंत सर्व काही केले.

      December 28, 2021


  • जेष्ठ गीतकार,पटकथाकार राजेंद्रकृष्ण

    राजेंद्रकृष्ण यांचे खरे नाव राजिंदर दुग्गल. शालेय वयात आठवीपासून राजेंद्रकृष्ण कविता करत असत.त्यांचा जन्म ६ जुन १९१९ रोजी जलालपूर पाकिस्तान येथे झाला.कवितेच्या वेडाने ते पुढे मुंबईत आला आणि सिनेमासाठी लेखन करू लागले. मुंबईतील त्यांचा प्रारंभीचा संघर्ष कंगवे, रूमाल विक्री करण्याइतपत कष्टाचा होता. त्या काळात अनेक गरीब मित्रांनी त्यांना आसरा दिला; १९४७ साली राजेंद्रकृष्ण पटकथाकार झाले आणि त्याचा पहिला चित्रपट पडद्यावर आला ‘जनता.’ गीतकार म्हणून त्याचा पहिला चित्रपट होता १९४७ सालचा ‘जंजिर.’

    गीतकार आणि लेखक अशा दुहेरी भूमिकेमुळे त्याचा मान अधिक वाढला. मोतीलाल आणि सुरैया यांची भूमिका असलेल्या १९४८ सालच्या ‘आज की रात’ या चित्रपटामुळे ‘राजेंद्रकृष्ण’ नाव फिल्म इंडस्ट्रीत ओळखले जाऊ लागले. ‘सुनो सुनो ये दुनियावालो बापुजी की अमर कहानी.’ हे महात्मा गांधींच्यावर राजेंद्रकृष्ण यांनी गाणे लिहिले होतं, त्याला हुस्नलाल भगतराम यांनी या गीताला संगीत दिलं होतं आणि रफी यांनी गायिलेल्या हे गाणे रेडियो सिलोन खूप गाजले. या गाण्याने राजेंद्रकृष्ण गीतकार म्हणून घरोघरी पोहोचले. कथा-पटकथाकार म्हणून राजेंद्रकृष्ण यांचे नाव हिंदी, मद्रासी सिनेमाच्या पडद्यावर झळकत होतं. तमिळ भाषेचं उत्तम ज्ञान अवगत असल्याने त्यांना सर्वत्र दक्षिणेत व दक्षिणेतील निर्मार्त्यांकडून कामं मिळत गेली. तिथे सी. रामचंद्र ऊर्फ राम चितळकर यांचा दबदबा होता. त्यांच्याशी राजेंद्रकृष्ण यांची गट्टी जमली आणि या जोडीने नंतर पुढे उत्तमोत्तम गाणी हिंदी सिनेसंगीताच्या कोषात अजरामर केली. ‘अनारकली’, ‘आझाद’, ‘आशा’ आणि सर्व जगाला वेड लावणार्याा अलबेलाची गाणी होती. सी. रामचंद्र, राजेंद्रकृष्ण या जोडीने ‘यह जिंदगी उसी की है’ (अनारकली), ‘ए दिल मुझे बता दे, तू आ गया है’ (भाई भाई), ‘मन डोले मेरा तन डोले’ (नागीन), ‘कौन आया मेरे मनके द्वारे’ (देख कबिरा रोया), ‘छूप गया कोई रे दूर से पुकार के’ (चंपाकली), ‘चल उड जा रे पंछी’(भाभी), इतना ना मुझसे तू प्यार बढा (छाया) अशी सुरस गाणी दिली. ३०० हून अधिक चित्रपटांचं गीतलेखन करणाऱ्या राजेंद्रकृष्ण यांनी अनेक चित्रपटांचं कथा, पटकथा लेखनही केलं होते.

    नया दिन नयी रात, गीता मेरा नाम, बनारसी बाबू , ब्लॅकमेल, बॉम्बे टू गोवा, रखवाला, गोपी, एक श्रीमान एक श्रीमती, सच्चाई, वारीस, पडोसन, साधू और शैतान, नई रोशनी, प्यार किये जा, खानदान, ब्लफ मास्टर, छाया, नजराना, भाई भाई, नागीन, ‘पडोसन’ची पटकथा मा. राजेंद्रकृष्ण यांनीच लिहिली होती. मा.राजेंद्रकृष्ण रेस खेळण्याचा छंद होता, यात त्यांना १९६० च्या दरम्यान त्यांच्या रेस खेळण्याच्या छंदाला यश लाभलं होतं, ४९ लाखांचा ‘जॅकपॉट’ घोड्यांच्या शर्यतीत लागला होता.

    काय योगायोग राजेंद्रकृष्ण यांचा जन्म ६ जून व निधन सुद्धा ६ जून. राजेंद्रकृष्ण यांचे ६ जून १९८८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    राजेंद्रकृष्ण यांची गाणी.
    https://www.youtube.com/watch?v=tPvqD3K8jXQ
    https://www.youtube.com/watch?v=BylUftxAmvo

      June 6, 2017