(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • रत्नागिरीतील प्रसिद्ध तबला वादक हेरंब जोगळेकर

    त्यांनी अभिनयातही आपला ठसा उमटविला आहे. हेरंब जोगळेकर यांनी सुंदर मी होणार या नाटकाद्वारे अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. यात गायक कलाकाराची भूमिका साकारली होती.

      June 13, 2022


  • भाजपच्या ज्येष्ठ नेत्या वसुंधराराजे शिंदे

    राजस्थान भाजपमध्ये एक नाव असं आहे, ज्याचा निर्णय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनाही मानावाच लागतो. हे नाव आहे महाराणी वसुंधरा राजे. मराठ्यांच्या ग्वालियर घराण्याची कन्या असलेल्या वसुंधरा यांचा विवाह राजस्थानमधील ढोलपूरचे महाराजा राणा हेमंत सिंग यांच्यासोबत झाला. पण लग्नानंतर काही दिवसातच ते वेगळे राहू लागले. वसुंधरा राजेंचा मुलगा दुष्यत सिंग खासदार आहे. तर त्यांची बहिण यशोमती राजे शिंदे मध्य प्रदेशमध्ये मंत्री होत्या. काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या त्या आत्या आहेत.

      March 9, 2022


  • गोपी कुकडे

    श्री गोपी कुकडे हे जाहिरात जगतातील एक नावाजलेलं व्यक्तीमत्त्व. जे जे स्कूल ऑफ आर्टसमधून त्यांनी कमर्शिअल आर्टस या विषयात शिक्षण घेतलं. खरंतर ते तिथे आर्किटेक्ट बनण्यासाठी गेले होते. पण त्यांच्यातल्या कलाकारानं त्यांना या विषयाकडे ओढून आणलं. कॉलेजमध्ये असताना त्यांनी बर्‍याच सिनेमांची होर्डिंग्स बनवली.

      August 16, 2011


  • मॅनेजमेन्ट कन्सल्टन्सीतील आगळ्यावेगळ्या सौ.धनश्री जोग

    उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रांत मराठी माणुस एकुणच मागे आहे हे आता सगळेजण जाणतातच आहेत. पण आता या क्षेत्रांत मराठी महिला धडाडिने पुढे येत आहेत असे सुखद चित्र निर्माण होऊ लागले आहे. उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रांत आज मराठी नव्हे तर इतर महिला मोठ्या प्रमाणावर आघाडी घेत आहेत. अनेक मोठ्या उद्योग व्यवसायाच्या प्रमुखपदी महिला आहेत आणि त्या सक्षमतेने कारभार चालवीत आहेत.

    इंजिनिअरींगच्या क्षेत्रातील मेकॅनिकल इंजिनिअरींग ही शाखा आपल्यासाठी नाही असे अनेक महिलांना वाटत असते. ते एका दृष्टिने बरोबर पण आहे. कारण या क्षेत्रासाठी मानसीक बळाबरोबरच शारिरीक बळ पण लागते. तासंतास वर्कशॉपमधे उभे राहुन मशीनवर काम करावे लागते. हात आणि कपडे काळे करावे लागतात. कधी कधी तप्त भट्टी असलेल्या फाउंड्रीमधे काम करावे लागते. नोकर्याउ पण लांबच्या कुठल्यातरी कारखान्यांत मीळतात. कामगारांबरोबर काम करावे लागते. तसेच शिफ्टस पण असतात. त्यासाठी बायकांसाठी हे क्षेत्र योग्य नाही हे म्हणणे कांही फारसे चुकिचे नाही. असे असुनही काही महिला मेकॅनीकल इंजिनीयरींगच्या क्षेत्रांत येण्याचे धाडस पुर्वीपासुनच करत आल्या आहेत. आधी त्यांची संख्या तशी नगण्यच होती. पण आता ती संख्या हळु हळु वाढायची चिन्हे दिसु लागली आहेत.

    जाणुन बुजुन मेकॅनीकल इंजिनीयरींगची साईड निवडणे, मग उद्योग व्यवसायच्या क्षेत्रांत प्रवेश करणे, आंतर राष्ट्रीय पातळीवरील एक अत्यंत प्रतिष्ठीत व मानाची परिक्षा पास होऊन हा मान मिळविणारी भारतातील पहिली महिला इंजीनीयर होणे हा प्रवास आहे पुण्यातील एका महिलेचा, सौ.धनश्री जोग यांचा. त्यांच्याशी मारलेल्या गप्पांतुन उलगडत गेला त्यांचा जीवनपट.

    सौ.धनश्री यांच्या कुटुंबाला इंजिनिअरींगची कोणत्याही तर्हेयची पार्श्वभुमी नाही. त्यांचे माहेरचे आडनांव देशपांडे. जन्म 1974 सालचा व पुण्याचा. आई वडील दोघेही सरकारी नोकरीत होते. शालेय शिक्षण अहिल्यादेवी हायस्कुलमधे झाले. पहिल्यापासुनच त्यांचा ओढा इंजिअरींगकडे होता. त्यामुळे त्या पुण्याच्या गव्हर्नमेन्ट कॉलेजमधुन मेकिनिकल इंजिनीयर झाल्या. वर्गात फक्त पांचच मुली होत्या. पण एक मुलगी म्हणुन त्यांना मेकॅनिकल इंजिनिअरींग करण्यासाठी कुठली अडचण अशी आली नाही.
    त्यांना पुण्याच्या किर्लोस्कर ऑईल इंजिन्सच्या बेअरींग डिव्हीजन मधे ट्रेनी इंजिनीयर म्हणुन नोकरी मिळाली. त्यावेळी असा अनुभव आला की पुण्यातील बहुतेक कंपन्या व नांवाजलेले कारखाने लेडी मेकिकल इंजिनिअर्सना नोकरी द्यायला फारसे उत्सुक नसायचे. पण त्यांना किर्लोस्करसारख्या नामांकीत कंपनीत काम करण्याची संधी मिळाली.

    या नोकरीचा अनुभव फारच चांगला होता. या काळात त्यांनी ट्रेनी इंजिनीयर ते सिनीयर इंजिनीयर होण्यापर्यंत प्रगती केली. त्या मशीन शॉप इंनचार्ज होत्या. त्यांना प्रॉडक्शनचा व त्या संबंधीत इतर क्षेत्रांचा-जसे प्रॉडक्शन प्लॅनींग कंट्रोल(PPC), क्वालिटी कन्ट्रोल, इंनव्हेंटरी कंट्रोल, मॅनपॉवर प्लॅनींग याचा उत्तम अनुभव आला. हाच अनुभव माझ्या भावी करीअरचा पाया ठरला.

    त्यानंतर त्यांनी मेटॅग्राफ ग्रुपमधे काम केले.

    विवाह झाल्यावर त्यांना फुल टाईम जॉब करण्यापेक्षा स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय कराव असे वाटु लागले. त्यांना मॅनेजमेन्ट कंन्सल्टन्सी क्षेत्राची माहिती मिळाली. हे क्षेत्र त्यांना योग्य आहे असे वाटले. त्यामुळे या क्षेत्रांत येऊन बिझनेस करायचे ठरवले.
    त्यांच्या माहेरी आणि सासरी दोन्हीकडे बिझनेसची पार्श्वभुमी नाही. फक्त त्यांचे चुलत दीर आहेत त्यांनी बिझनेसमधे प्रवेश करण्याचे धाडस दाखवले. त्यांनी अक्षरशः शुन्यातुन सुरवात केली. त्यांची दरोडे जोग ही कंपनी आता पुण्यातील एक प्रतिष्ठीत बिल्डर आहे.

    मॅनेजमेंट कन्सल्टन्सी खरे म्हणजे हे एक विस्तृत, वेगाने वीकसीत होणारे व महत्वाचे क्षेत्र आहे. हल्ली कंपन्यांना निरनिराळ्या सर्टिफिकेशनची गरज भासत असते. त्यांत आय.एस.ओ.(ISO) व यासारखी अनेक महत्वाची सर्टिफिकेशन आहेत. ज्या कंपन्यांकडे हे सर्टिफिकेशन आहे त्या कंपन्यांची गुणवत्ता उच्च दर्जाची समजली जाते. ज्या प्रमाणे गुंतवणुकिच्या क्षेत्रांत ट्रीपल ए ( AAA) किंवा क्रिसील (Cricil) रेटिंगला जे महत्व आहे तेच महत्व औद्योगीक क्षेत्रांत आय.एस.ओ. व यासारख्या इतर सर्टिफिकेशनला आहे. भारतामधे जवळ जवळ सगळ्या मेठ्या कंपन्यांकडे ही सर्टिफिकेशन आहेत. आता लघु उद्योग(Small Scale Industry) व मध्यम उद्योग (Medium Scale Industry) क्षेत्रातील कंपन्या या सर्टिफिकेशनसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. परंतु ही सर्टिफिकेशन मिळविणे वाटते तेवढे सोपे काम नसते. कारण यामधे कंपनिची टोटल मॅनेजमेंट इनव्हॉल्व असते. त्यामुळे या कंपन्यांना मॅनेजमेन्ट तज्ञांची किंवा कन्सल्टंटची जरुरी भासते. हे एक हायली स्पेशलाइज्ड फील्ड आहे. तसेच बर्यालच कंपन्यांचे निरनिराळे प्रॉजेक्टस असतात. उत्पादनांचा व सेवांचा दर्जा सुधारण्यापासुन ते टेक्नीकल स्पेसीफिकेशन्स ठरवण्यापर्यंत अनेक प्रॉजेक्टस असतात. त्यासाठी त्यांना तज्ञ सल्लागारांची मदत लागत असते.

    त्यांनी काम करायला सुरवात केल्यावर त्यांच्या लक्षांत आले की हे पुरुषांचे डॉमीनेशन असलेले क्षेत्र आहे. या क्षेत्रांत महिला जवळ जवळ नाहीतच. यावेळी त्यांना याच क्षेत्रातील श्री. रामदास जैद व श्री. कुलदीप जोशी या दोन दिग्गज व्यक्तींची फार मदत झाली. तसेच त्यांचे पती निनाद यांचे बहुमुल्य मार्गदर्शन मिळत गेले.
    त्यांच्या कंपनिने बरीच प्रगती केली आहे. 200 च्या वर प्रॉजेक्टस पुर्ण केले आहेत. भारतामध्ये तसेच परदेशात पण प्रॉजेक्टस पुर्ण केले आहेत. आता त्यांच्याकडे सक्षम टीम आहे. स्वतंत्र ऑफीस आहे.

    ‘या क्षेत्रांत येण्यासाठी कांही विषेश क्वालिफिकेशन्सची आवश्यकता असते कां? कारण तुमच्याकडे अशी बरीच क्वलिफिकेशन्स आहेत.’ असा प्रश्न मी विचारला तेव्हा त्या म्हणाल्या ‘तसे पाहिले तर नाही. कारण या क्षेत्रामधे बरेच रिसर्च करावे लागते. पण जर तुमच्याकडे काही विषेश क्वालिफिकेशन्स असतील तर त्याचा नक्कीच उपयोग होतो. मला ऍटोमोबाईल क्षेत्राचा पंधरा वर्षांचा अनुभव आहे. ‘टुल्स ऍन्ड टेक्निस ऑफ बिझिनेस परफॉर्मन्स इंप्रुव्हमेन्ट’ या विषयांतील मी तज्ञ असुन व्यवस्थापन यंत्रणेसीठीचा सल्लागार म्हणुन मला अनुभव आहे.’

    त्यांना विचारलेले अजून काही प्रश्न व त्यांनी दिलेली उत्तरे

    प्रश्नः- तुमची कंपनी कोणत्या प्राकारच्या कन्सल्टन्सी सेवा पुरवते?

    धनश्रीः- आम्ही वेगवेगळ्या स्टॅन्डर्ससाठी कन्सल्टन्ट व ऑडीटर म्हणुन काम करतो. प्रोसेसमधे किंवा मॅनेजमेण्टमध्ये सुधारणा करणे, त्यासाठी लागणारे प्रशिक्षण देणे ही पण कामे करतो. आम्ही मराठा चेम्बर ऑफ कॉमर्स बरोबर पॅनल कन्सल्टन्ट म्हणुन काम केले आहे.

    प्रश्नः- रिसर्च करण्याची क्षमता आणि विषेश क्वालिफिकेशन्स या शिवाय अजुन कशाची आवश्यकता असते?

    धनश्रीः- यासाठी उत्तम मार्केटींग व उत्तम नेटवर्क असायला हवे. कारण बहुतेक प्रॉजेक्टस हे वर्ड ऑफ माऊथ पब्लिसिटीवरच मीळतात. तसेच कंपनीमधे टॉप ते बॉटम लेव्हलच्या माणसांबरोबर डील करता येण्याची हातोटी लागते. बराच प्रवास पण करावा लागतो.

    प्रश्नः- हल्लिच्या मराठी तरुण व विशेषतः तरुणिंसाठी तुम्ही काय ऍडव्हाईस द्याल?

    धनश्रीः- मी कोणाला ऍडव्हाईस देण्याएवढी कांही ग्रेट नाही. पण माझ्या अनुभवावरुन सांगावेसे वाटते की जर पती व पत्नी दोघेही क्वालिफाईड असतील तर पत्निने जरुर बिझीनेस करावा. बिझिनेसमधे पतिचा व कुटुंबातील इतर सदस्यांचा पाठिंबा मिळणे आवश्यक असते. माझ्या केसमधे मला माझे पती निनाद यांचा भरघोस पाठिंबा मिळाला. म्हणुनच मी एवढी प्रगती करु शकले.

    आयएसओ-टीएस 16949 ही आय.ए.टी.एफ. ( इंटरनॅशनल ऑटोमोटीव्ह टास्क फोर्स) या संस्थेतर्फे घेण्यात येणारी लेखा परीक्षकांची परीक्षा उत्तीर्ण होणारी धनश्री या भारतातील पहिल्या महिला इंजिनीयर आहेत. या परिक्षेसाठी ‘सरमेट’ या इटालीयन संस्थेने त्यांना प्रायोजकत्व दिले होते. या साठी श्री. रामदास जैद यांनी मार्गदर्शन केले. पुण्याच्या सकाळ या दैनिकाने त्यांच्या सोमवार दि. 5 मार्च 2012 च्या अंकांत हे वृत्त प्रसिद्ध करुन त्यांचा खास गौरव केला आहे. तसेच दै. लोकमत तर्फे पारितोषीक देऊन सत्कार करण्यांत आला असुन हे वृत्त लेकमतच्या सोमवार दि. 26 मार्च 2012 च्या अंकांत प्रसिद्ध करण्यांत आले आहे. नुकतेच त्यांना सांगली येथील बिझनेस एक्सप्रेस श्री फाऊंडेशन तर्फे ‘उद्योग सल्लागार’ पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
    धनश्रीची व त्यांच्या कंपनिची अशीच उत्तरोत्तर भरघोस प्रगती होत राहो अशा शुभेच्छा!

    --उल्हास हरी जोशी, मोः-9226846631

      January 25, 2016


  • मराठी चॉकलेट हिरो स्वप्नील जोशी

    मराठी मनोरंजन विश्वातला चॉकलेट हिरो म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्वप्नील जोशीचा जन्म १८ ऑक्टोबर १९७७ रोजी मुंबईत झाला.

    स्वप्नील जोशीने वयाच्या नवव्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अनेक हिंदी – मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमधून त्याने अभिनय केला. विनोदी अभिनेता आणि स्टँडअप कॉमेडियन म्हणून त्याची ओळख आहे.

    स्वप्नील जोशीने श्रीकृष्णाच्या रुपात पहिली मोठी भूमिका केली; नंतर तो विविध भूमिकांत दिसला, ‘कॉमेडी सर्कस’मधून त्याने सगळ्यांना हसवले. मात्र कधी अभिनय, कधी निवेदन; तर कधी परीक्षक या सगळ्या रूपात कायम राहिली ती त्याची “चॉकलेट बॉय’ची प्रतिमा.

    ‘चेकमेट’ या २००८ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटामध्ये त्याने पहिल्यांदा प्रमुख भूमिका बजावली होती. ‘मुंबई – पुणे – मुंबई’ या चित्रपटातली त्याची भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडली. त्यानंतर ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ ही मालिका आणि ‘मंगलाष्टक वन्स मोअर’ या चित्रपटामध्ये तो मुक्ता बर्वे बरोबर प्रेक्षकांसमोर आला. ‘दुनियादारी’ मितवा ने तर त्याच्या यशात विशेष भर घातली. हारे काच की चुडियाँ, कॉमेडी सर्कस – १ आणि २ यासारख्या हिंदी मालिकांमधूनही तो प्रेक्षकांच्या भेटीला आला.

    व्यवसायाने दंतवैद्य असलेल्या लीनाशी त्याने २०११ मध्ये विवाह केला.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      November 1, 2017


  • सयाजी शिंदे

    दाक्षिणात्य चित्रपटात त्याने अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करून अभिनयाची हुकूमत गाजवली.त्यांनी जोडी नंबर १ आणि सरकार राज सारख्या अनेक बॉलिवूड सिनेमांत काम केले आहे. त्यांनी बिग ब्रदर, जॅकपॉट,देवधर गांधी, दिशा, वास्तुशास्त्र, परवाना,दानव, लाल सलाम अशे अनेक हिट सिनेमे आपल्या अभिनयाने गाजवले.

      April 14, 2010


  • पी. सावळाराम

    कुसुमाग्रजांनी त्यांना ‘जनकवी’ ही उपाधी दिली होती. ‘गंगा-यमुना’ हा त्यांच्या गीतांचा संग्रह पुस्तकरुपाने प्रसिध्द झाला आहे.

      July 24, 2017


  • चांदणे तुझ्या स्मरणाचे

    कवी ग्रेस तथा माणिक गोडघाटे सरांच्या सहवासातील काही संस्मरणीय क्षण

    मा. कवी ग्रेस, ह्यांची नि माझी पहिली समक्ष भेट झाली, तो दिवस होता १२ ऑगस्ट २००३ ! पुण्यातील प्रभात रोडवरील स्वरूप हॉटेलमध्ये !

    "दुपारी साडेतीन वाजता ग्रेस सरांना भेटा", असा मला मुंबईहून मा. मंगेशकर ह्यांच्या घरून फोन आला ! त्या भेटीचे निमित्त म्हणजे, मा. पंडित हृदयनाथजी मंगेशकर ह्यांना कोल्हापूर येथे करवीरपीठाच्या शंकराचार्यांच्या शुभहस्ते "भावगंधर्व" ही पदवी बहाल करावयाचा समारंभ होणार होता. त्या सोहळ्यानिमित्त प्रकाशित होणा-या गौरवग्रंथाकरिता कवी ग्रेस सर लेख देणार होते !

    आमच्या प्रथम समक्ष भेटीमध्येच मनमोकळ्या सुसंवादाचे रुपांतर, आपुलकीच्या स्नेहात झाले. अन् ते अगदी अखेरच्या क्षणापर्यंत तसेच अबाधित राहिले !
    ते मला म्हणाले, "दरवर्षी आपण, दहा मे ह्या दिवशी माझ्या वाढदिवसाला, न चुकता शुभेच्छापत्र पाठविता, त्याचे मला अप्रूप वाटते. आज आपली या निमित्ताने समक्ष पहिली भेट होत आहे"!

    "भयाण गारव्यातही, तुझ्या घरात ये सती | चंद्रीकाच मागते, शिवालयात सद्गती", हे शीर्षक असलेला ग्रेस सरांचा अभ्यासपूर्ण लेख त्यांनी माझ्याकडे सुपूर्त केला ! "हृदयांतरी " हे शीर्षक असलेल्या गौरवग्रंथामध्ये सदर लेख प्रसिद्ध झाला होता.

    पुढे, पंडित हृदयनाथजी मंगेशकर ह्यांच्या विविध ठिकाणांच्या कार्यक्रमांच्यावेळी ग्रेस सरांची आणि माझी वरचेवर भेट होऊ लागली. ग्रेस सरांचा चाहता वर्गही आवर्जून अश्या कार्यक्रमांना उपस्थित राहायचा !

    "ती गेली तेव्हां पाउस निनादात होता, भय इथले संपत नाही" ही लोकप्रिय गाणी सादर झाल्याशिवाय कार्यक्रमाची पूर्तता व्हायची नाही आणि एके दिवशी, ग्रेस सरांना दुर्धर व्याधीने ग्रासल्याची अशुभ वार्ता कानावर आली. विश्वास बसत नव्हता, पण सत्य समोरच उभे ठाकले होते.

    पंडित हृदयनाथजी आणि ग्रेस सरांचा लोभ सर्वश्रुत आहेच ! पुण्याच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात" ग्रेस सर दाखल झाले. त्या व्याधीग्रस्त अवस्थेमध्येही ग्रेस सर, त्यांच्या दूरदूरहून आलेल्या चाहत्यांना आवर्जून भेटायचे. विविध कार्यक्रमांमध्ये रमायचे, सहभागी व्हायचे. त्या सात महिन्याच्या काळात मी हे जवळून बघत होतो. त्यांना भेटण्यासाठी जवळ जवळ रोज, मी दवाखान्यात जात होतो. माझा त्यांच्याशी नित्याचा वार्तालाप होत असे.
    भारतीय वायुसेनेच्या इतिहासातील पहिले काव्य मी लिहिले होते. ते ध्वनिमुद्रित गाणे, भारत देशाला अर्पण करण्याचा सोहळा पुण्याच्या लोहोगाव विमान तळावरील वायुसेनेच्या कार्यालयात संपन्न झाला होता. एअर चिफ मार्शल प्रदीप व्ही. नाईक सरांनी त्याचा गौरव केला, त्याची बातमी दुसरे दिवशी सर्व वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाली होती ! मी रोजच्या सारखा संध्याकाळी दवाखान्यात गेलो, तर, उमद्या मनाच्या ग्रेससरांनी, माझ्याशी हस्तांदोलन करून, माझं मोठ्या जिव्हाळ्याने अभिनंदन केलं होतं !

    अश्याच एका संध्याकाळी, पुण्यामध्ये मुसळधार पाउस, सुरु झाला. तो दिवस होता, १५ ऑक्टोबर २०११ ! ग्रेस सर मला म्हणाले, "चिंचोरे सर, माझे काम करणार कां ?" मी म्हणालो, "सर असे काय विचारता, सांगाना, काय हवय"? ग्रेस सर म्हणाले, "बाहेर विजांचा गडगडाट सुरु आहे, धुव्वाधार पडणारा तो पाउस मला पहायचा आहे. लिफ्ट जवळील कॉरीडॉरमध्ये मला घेऊन चलता कां ?" मी तेथील रुग्ण्सेविकांची अनुमती घेतली. झालं, ग्रेस सरांनी आधी माझा हात धरला, आणि नंतर त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला, ते व्ह-यांड्यामध्ये हळू हळू चालत आले.

    कोसळणारा पाउस पाहून, ग्रेस सर भान हरखून गेले. पावसावर बोलले. बराच वेळ गेला, अन् मग म्हणाले, "चला आता रुममध्ये परत जाऊ", ग्रेस सरांच्या स्नेहाने मी तर चिंब भिजलो होतो . ग्रेस सरांबरोबरचे असे अनेक सुखद क्षण मला अनुभवायाला मिळाले.

    एके दिवशी संध्याकाळी मी त्यांना भेटायला जाताच, ग्रेस सर म्हणाले, "अहो, पंडितजींच्यावर मी लिहिलेला तो लेख मला द्याल कां, उद्या दुपारी एक प्रकाशक येणार आहेत. त्यांना तो लेख द्यायचा आहे." मी म्हणालो, "सर आत्ता अर्ध्यातासात घरी जाऊन तो लेख घेऊन येतो", तसे सर म्हणाले, "अहो, आत्ता पुन्हा हेलपाटा नका घेऊ, उद्या आणा".

    दुस-या दिवशी, मी दवाखान्यात जाताच, सरांच्या हाती, त्या लेखाची झेरॉक्स प्रत दिली. त्यांना केवढा आनंद झाला. समोरच बसलेल्या प्रकाशकांना त्यांनी तो लेख सुपूर्द केला अन् माझ्याविषयी, त्यांना काही सांगितलं !

    असाच एक प्रसंग, रविवार दिनांक ३० ऑक्टोबर २०११ चा ! निमित्त होतं, पंडित हृदयनाथजींच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याच्या एका घरगुती कार्यक्रमाला, मी मुंबई येथे गेलो होतो. दुस-या दिवशी मी जेव्हां दवाखान्यात गेलो, तेव्हां, ग्रेस सर अधिरतेने मला म्हणाले, "मला आधी कालच्या कार्यक्रमाचे साध्यंत वर्णन सांगा." ते सर्व ऐकतांना, त्यांच्या चेह-यावर, आनंदाचे भाव तरळले होते !

    मास्टर दीनानाथांच्या जयंतीनिमित्त, मास्टर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या "दीनायन कलापर्व"ने संगीतकार मा. मीनाताई मंगेशकर-खडीकर, ह्यांचा ७ जानेवारी २०१२ रोजी "दशांगुळे उरला" हा कार्यक्रम आयोजित केला होता ! दुपारपासूनच ग्रेस सरांनी मला सांगून ठेवलं होतं, "मला तुम्ही प्रेक्षागृहात घेऊन चला ! मला हा कार्यक्रम समोरून अनुभवायचा आहे." वास्तविक, सरांच्या रुममध्ये असलेल्या टी.व्ही.वरून त्यांना कार्यक्रम बघता आला असता. पण त्यांनी हट्टच धरला. अखेरीस, माझ्या खांद्यावर हात ठेवून ग्रेस सर प्रेक्षागृहामध्ये आले. आम्ही अगदी पुढच्या रांगेमध्ये शेजारी-शेजारी बसलो होतो. मीनाताई ह्यांच्या वक्तव्याला दाद देत त्यांनी कार्यक्रम पाहिला.

    "ओल्या वेळूची बासरी" ह्या ग्रेस सरांच्या ललितबंध संग्रहाचे प्रकाशन, मंगळवार, दिनांक १० जानेवारी २०१२ रोजी झाले. हा प्रकाशन सोहळा, "दीनायन कलामंच" आणि पॉपुलर प्रकाशन ने, आयोजित केला होता. ग्रेस सरांच्याच पुस्तकाचे प्रकाशन होत असतांना, सरांनी मंचावर बसण्यास नकार दिला . "प्रेक्षकांमध्येच बसून मी तो कार्यक्रम बघणार", असं त्यांनी आवर्जून सांगितलं. पंडित हृदयनाथ ह्यांच्या हस्ते प्रकाशन झालं . डॉक्टर धनंजय केळकर, ह्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले . पॉप्यूलरचे प्रकाशक रामदास भटकळ, ह्यांची चित्र फीत दाखविण्यात आली. ग्रेस सरांना नामांकित असे कितीतरी विविध पुरस्कार लाभले, पण सर होते, तसेच राहिले. निगर्वी, निर्मळ !

    रविवार दिनांक २५ मार्च २०१२ रोजी संध्याकाळी, ग्रेस सरांना भेटायला, मी दवाखान्यात गेलो तेव्हां माझा जीव उडून गेला, सा-या रात्रभर डोळ्याला डोळा नव्हता. सोमवारी २६ मार्चला ग्रेस सरांना देवाज्ञा झाली. आजही त्या प्रदीर्घ आठवणीचा पट डोळ्यासमोर फेर धरू लागतो अन् मन सुन्न होतं .
    आज दहा मे, ग्रेस सरांची जयंती ! त्यांच्याच लेखणीतून प्रकटलेले वास्तव मनाला सांगत आहे, "भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते" !

    -- उपेंद्र चिंचोरे

      May 10, 2016


  • स्वातंत्र्यसेनानी कृषिसंशोधक पांडुरंग खानखोजे

    स्वातंत्र्यसेनानी कृषिसंशोधक – इंग्रजांची जगातून सत्ता उलथवून टाकण्याचे स्वप्न अगदी बालपणापासून पाहणारा एक मुलगा संशोधन करून मेक्सिकोला अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण बनवतो. असा हा स्वातंत्र्यसेनानी कृषिसंशोधक म्हणजे पांडुरंग सदाशिव खानखोजे.

      November 7, 2020


  • भारताचे माजी राष्ट्रपती वराहगिरी वेंकटगिरी

    जगात सर्वात आधी एटीएम मशीनचा वापर २७ जून १९६७ ला बार्कलेज बँकेने केला होता. ही पहिली एटीएम मशीन लंडनच्या बार्कलेज बँकेच्या शाखेत लावण्यात आली. भारतात सर्वात पहिली एटीएम मशीन १९८७ मध्ये लावली गेली. हे पहिले एटीएम हाँगकाँग ॲ‍ण्ड शांघाई बँकिंग कॉर्पोरेशन (HSBC) ने मुंबईत लावले होते.

      June 28, 2022