(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ज्येष्ठ मराठी, हिंदी चित्रपट अभिनेत्री कामिनी कदम

    व्ही. शांताराम यांचे बंधू व छायालेखक व्ही. अवधूत यांच्या त्या मेहुणी. असे म्हणतात अभिनेत्री स्मिता तळवलकर यांचे नाव तिच्या नावावरुन ठेवले होते. १९५८ साली आपले नाव कामिनी कदम करून हिंदी चित्रपट सृष्टीत तलाक या चित्रपटाद्वारे प्रवेश केला.

      June 20, 2022


  • स्मिता पाटील

    स्मिता पाटील यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९५५ रोजी पुणे इथे झाला. रुपेरी पडद्यावर भारतीय स्त्रीची पर्यायी प्रतिमा साकारणारी सक्षम अभिनेत्री म्हणून स्मिता पाटील हिचं चित्रपटसृष्टीच्या इतिहासात वेगळं स्थान आहे. अल्पायुषी ठरलेल्या स्मिता पाटीलने विविध व्यक्तिरेखांच्या संवेदना व त्यांचं व्यक्तिमत्व इतक्या प्रभावीपणे आणि सूक्ष्म बारकाव्यांसह अभिव्यक्त केलं की त्यामुळे पडद्यावरील सौंदर्याच्या रुढ संकल्पना दुय्यम ठरल्या.

    स्मिता पाटील ह्यांचा झाला. राष्ट्रसेवादलाच्या सांस्कृतिक कार्यात सक्रिय असलेल्या स्मिताने दृकश्राव्य माध्यमाची सुरुवात दूरदर्शनवरील 'बातमीदार' या नात्याने केली. छोटया पडद्यावरुन या भूमिकेवरुन तिचे सुप्त गुण हेरुन श्याम बेनेगल या समर्थ दिग्दर्शकाने तिला 'निशांत' आणि 'चरणदास चोर' या चित्रपटात अभिनयाची संधी दिली. हिंदी चित्रपटसृष्टीतील पदार्पणानंतर बेनेगल यांनीच दिग्दर्शित केलेल्या मंथन' आणि 'भूमिका' या चित्रपटातील तिच्या भूमिका गाजल्या. यातील कसदार अभिनयामुळे स्मिताला कलात्मक चित्रपट सृष्टीत मान्यता मिळालीच आणि राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला.

    'मंथन मधून स्मिताने सहकारी चळवळीत सक्रिय झालेल्या हरिजन स्त्रीच्या व्यक्तिरेखेमधील सळसळते चैतन्य, आक्रमकता आणि सचोटी याचा सशक्त आविष्कार केला. त्याचप्रमाणे हंसा वाडकर या अभिनेत्रीच्या आत्मकथेवर आधारित 'भूमिका ' मधून तिने पुरुषप्रधान संस्कृतीत शोषित ठरणार्यात स्त्रीच्या संवेदना प्रभावीपणे अभिव्यक्त केल्या. वास्तविक हिंदी चित्रपटांमधुन प्रामुख्याने पारंपारिक स्त्री प्रतिमाच चितारल्या गेल्या. तरीही स्मिता पाटीलच्या उदयापूर्वी वहिदा रेहमान, नुतन , सुचित्रा सेन यांनी या चाकोरी पलीकडल्या काही प्रतिमा उभ्या केल्या.

    स्मिता पाटीलने ही धारा आपल्या अभिनय सामर्थ्याने दृढ केली आणि पुढेही नेली. दलित, शोषित स्त्रियांच्या, बंडखोर स्त्रियांच्या, आंतरिक बळ असलेल्या स्त्रियांच्या प्रतिमा परिणामकारकतेने साकार केल्या. याबाबतीत शबाना आझमी या तिच्या समकालीन अभिनेत्रीनेही योगदान केलं आहे. या अभिनेत्रींनी प्रेयसीच्या रुढ झालेल्या प्रतिमांना पर्यायी अशा प्रतिमा सक्षमतेने आविष्कृत केल्या. वेगळया मूल्यचौकटी व निष्ठा घेऊन जगणार्याय अशा व्यक्तिरेखांना या अभिनेत्रींनी एका अर्थाने मान्यताच मिळवून दिली. पण मृत्यूनंतरही मास्को, न्यूर्यॉक, फ्रान्समधील विविध महोत्सवांमध्ये तिच्या चित्रपटांचं 'सिंहावलोकन ' झालं.

    आंतरराष्ट्रीय स्तरावर रसिक व समीक्षकांकडून इतकी मान्यता मिळणारी ती पहिलीच भारतीय व मराठी अभिनेत्री ठरली. फ्रान्स मध्ये ला रॉशेला शहरातील हाऊस ऑफ कल्चरमध्ये त्यांच्या चक्र, बाजार, मंथन, भूमिका ह्या चित्रपटांचा महोत्सव (रिट्रॉस्पेक्टिव्ह) भरविण्यात आला होता. सत्यजित रायनंतर हा बहुमान स्मिता यांना मिळाला होता. मराठी रंगभूमीवर काम करणारे मा.नाना पाटेकर बॉलीवूडमध्ये आपल्या येण्याचे श्रेय दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील हिला देतात. मा.नाना पाटेकर म्हणतात हिंदी चित्रपटातील प्रवेश स्मिता पाटील हिच्यामुळेच झाला.

    मी मराठी रंगभूमीवर काम करत होतो. तेथे मी खूश होतो. पण स्मिताने मी हिंदीत प्रवेश करावा म्हणून प्रयत्न केले. मला हिंदीत काम करण्यासाठी प्रवृत्त केले. तिनेच माझे नाव रवी चोप्रा यांना सुचविले आणि मला ‘आज की आवाज’ हा चित्रपट मिळाल्याचे नाना पाटेकर यांनी नुकतेच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. स्मिताने केलेल्या ‘फोर्स’मुळे मी इंडस्ट्रीत आलो. ती माझी खूप चांगली मैत्रीण होती. तिच्याबरोबर मी ‘अवाम’ आणि ‘गीद्ध’ या चित्रपटात काम केले होते. स्मिता पाटील यांचे १३ डिसेंबर १९८६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    स्मिता पाटील यांचे काही चित्रपट
    https://www.youtube.com/watch?v=7_IAjinodPo
    https://www.youtube.com/watch?v=TxRk-jbUrrk
    https://www.youtube.com/watch?v=GC6XmwlNwhE
    https://www.youtube.com/watch?v=tuo6F5qUu00
    https://www.youtube.com/watch?v=8L4oq6VKA2U
    https://www.youtube.com/watch?v=gskP5p2Oknc

      October 31, 2019


  • मोहिनीअट्टमच्या महान कलाकार डॉ. कनक रेळे

    भारतीय शास्त्रीय नृत्य हा एक वेगळा उपक्रम अभ्यासक्रमात यावा व विद्यार्थ्यांना त्यामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेता यावे. शास्त्रीय नृत्याकडे जनसामान्यांनी सन्मानाने पाहावे. या विषयातसुद्धा आपण पदवी प्रदान करू शकतो याकरिता केरळमधील मोहिनी अट्टम या अभिजात नृत्याचा प्रसार करणाऱ्या डॉ. कनक रेळे यांनी मुंबई विद्यापीठाच्या सहाय्याने १९६६ मध्ये नालंदा नृत्य कला महाविद्यालय सुरू केले.

      June 15, 2022


  • वंशभेदाचा सामना करणारी रोझा पार्क्‍स

    रोझा पार्कने उठविलेल्‍या आवाजामुळे वांशिक भेदाभेदाविरूध्‍द लढाई पेटली या संपुर्ण कालावधीत ती कृष्‍णवर्णीयांच्‍या न्‍यायाकरीता लढत होती. 1992 साली रोझा पार्कने रोझा पार्क्‍स – माय स्‍टोरी हे आपले आत्‍मचरित्र प्रसिध्‍द केले. रोझा पार्क्‍सला स्प्रिगर्न मेडल, मार्टिन ल्‍युथर किंग, ज्‍यु अवार्ड टु पुरस्‍काराची सन्‍मानित करण्‍यात आले.

      May 6, 2018


  • चंदू बोर्डे

    १९६४ मध्ये मुंबईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना संघाचे आठ गडी बाद झालेले असताना बोर्डेंनी हिंमतीने किल्ला लढवला व अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला. त्यावेळी प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घेतले. त्यावेळी त्यांची बॅट गेली ती त्यांना परत मिळालीच नाही.

      July 21, 2021


  • पार्श्वगायक आणि अभिनेता किशोर कुमार

    किशोर कुमार यांचे खरे नाव आभासकुमार गांगुली. त्यांचा जन्म ४ ऑगस्ट १९२९ रोजी झाला. भारतीय चित्रपटसृष्टी्चा इतिहास लिहायचा झाल्यास किशोरकुमार या नावाशिवाय तो पूर्णच होऊच शकणार नाही. १९६० च्याल दशकातील देवआनंद पासून ते १९८० च्याव दशकातील अनिल कपूर पर्यंतच्या् अनेक नायकांना यशाची चव चाखविण्यात किशोरदांचा वाटा मोठा आहे.

    बॉलीवूडला पहिला सूपरस्टार राजेश खन्ना यांच्या रुपाने मिळाला मात्र त्यामागेही किशोरदांचा खास योडली आवाजच होता हे नाकारून चालणार नाही. या हरहुन्नमरी नायक व गायकाच्या गायनात तल्लीन होऊन गाणारा गायक म्हणून किशोर कुमार यांची आबालवृद्धांमध्ये ओळख आहे. किशोरदांनी गाण्यात जीव ओतून त्यांना विविध रंग चढवून मैफिली सजविल्या आहेत. चित्रपटातही ते चमकले. त्यांनी सुमारे ४०० हून अधिक चित्रपटांत गाणी गायिली. ‘चलती का नाम गाडी‘ सारख्या निखळ विनोदी चित्रपटाबरोबरच ’दूर गगन की छाँव में’ सारखे गंभीर चित्रपटही काढले.

    किशोरदाचे वडीलबंधू दादा मुनी उर्फ अशोक कुमार व अनुप कुमार यांचे बोट धरून स्वत:चे नशीब अजमावण्यासाठी त्यांनी चित्रपटातील अभिनयातून करियरचा श्रीगणेशा केला. त्यावेळी चित्रपट सृष्टीत अभिनेत्यामध्ये सर्व गुण पाहिले जात होते. त्यात अभिनेत्याला गायनाच्या कसोटीमधून ही जावे लागत होते. काढण्याची. १९५० मध्ये आभास कुमार व कुंजालाल गांगुली यांनी किशोर कुमारला 'मुकद्दर' मध्ये काम दिले. त्यात किशोरदाचा रोल ही तसा चांगलाच होता. मात्र त्यात त्यांना गायनाची संधी मिळाली नाही. त्यानंतर १९५१ मध्ये किशोरदा मन्नाडे यांच्यासह गायलेच. मात्र त्यांना त्यावेळी त्यांनी जागा मिळाली ती पार्श्वगायकांच्यामध्ये, तीही 'आंदोलन' चित्रपटात.
    प्रत्येक व्यक्तीच्या मागे मोठा संघर्ष असतो व त्या संघर्षाला किशोरदाही कसे अपवाद राहणार.

    १९५२ ते १९६० दरम्यान किशोरदाने बऱ्याच चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. अधिकार, धोबी डॉक्टर, इल्जाम, मिस माला, नोकरी, पहिली झलक हे चित्रपट तर त्यांनी अवघ्या एका वर्षात म्हणजेच १९५४ मध्ये आटोपल्या. त्यानंतर त्यांनी अभिनयासह आवाजाला दिशा मिळाली. अभिनय व गायन यांचा किशोरदांचा समांतर प्रवास सुरू झाला. १९५६ मध्ये नऊ चित्रपट करणारा अभिनेता म्हणून त्यांनी त्यांची नवीन ओळख जगाला करून दिली. किशोरदाने आपल्या मिश्किल स्वभावाने चित्रपट सृष्टीत विनोदी भूमिकांचा नवा ट्रेंड आणला. अभिनय करताना गायन व संगीताच्या तालावर थिरकणे या त्रिवेणी कलांचा संगम असलेल्या किशोर नी दर्शकांसह श्रोत्यांवर भुरळ घातली. नायकासह गायक यांच्या भूमिकेने तर दर्शकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर त्यांनी मीना कुमारी, वैजयंती माला, निम्मी, कामिनी कौशल, मधुबाला, नूतन, माला सिन्हा व बीना रॉय यांच्यासारख्या नायिकांसोबत चित्रपट केले. अभिनयासह त्यांनी या चित्रपटामध्ये गायनाची दुहेरी भूमिका केल्याने तर त्यांनी त्यांचे नाव यशाच्या शिखरावर पोहचविले.

    'मेरा नाम अब्दुल रहमान', 'नखरे वाली', 'कुंएँ मे कुद जाना यार पर शादी मत करना', 'इना मीना डिका', 'हम तो मोहब्बत करेगा', 'पाच रुपया बारा आणा' अशा एक ना अनेक गीतांमधून किशोरदा आपल्यात आहेत. एके दिवशी अशोक कुमार यांच्या घरी अचानक संगीतकार सचिन देव बर्मन आले. तेव्हा बाथरुममध्ये असलेल्या किशोरदांचे स्वर त्यांच्या कानी पडले. ‘कौन गा राहा है?’ असे त्यांनी दादामुनींना विचारले. त्यावर अशोक कुमार यांनी मोठ्या गायकाची ओळख सचिन देव बर्मनला करून दिली. तेव्हा सुप्रसिद्ध संगीतकार सचिनदेव बर्मनने 'बाथरूम सिंगर' किशोरदाला ओळखले. तेव्हापासून सुमधुर गीतांचा झरा किशोरदांच्या कंठातून वाहायला प्रारंभ झाला.

    यादगार गीतांना स्वर देणारे किशोर कुमार त्यानंतर चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक तर गीतकार यांच्या भूमिकेत पडद्यावर दिसू लागले. त्यांनी त्याच्या चित्रपटासाठी गीते लिहिली नाही तर त्यांनी संगीतही दिले. 'चलती का नाम गाडी', 'बढती का नाम दाढी', 'जमीन', 'दूर का राही', 'झुमरू' आदी चित्रपट किशोरदांनी दर्शकांना नव्या रूपात दिले.

    एक चतुर नार, गोरे रंग पे ना इतना गुमान कर, ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा, दिल क्या करे जब किसी को, किसी से प्यार हो जाए, अशा अनेक सदाबहार गितांनी मंत्रमुग्ध करणारे पार्श्वगायकमा.किशोर कुमार यांचे निधन १३ आक्टोबर १९८७ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      August 4, 2017


  • कवयित्री बहिणाबाई चौधरी

    बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. त्या निरक्षर होत्या; तथापि त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्म २४ ऑगस्ट १८८० रोजी झाला. ज्यात त्यांचे सारे आयुष्य गेले, ते शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे त्या ओव्या रचून गात असत. सोपानदेव चौधरी आणि त्यांचे एक आप्त ह्यांनी जमेल तेव्हा त्या वेळोवेळी तेथल्या तेथे उतरून घेतल्या आणि जपल्या. लिहिता न येणाऱ्या बहिणाबाई अहिराणीत आपल्या कविता रचत व त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी त्या कागदावर लिहून ठेवत.

    महाराष्ट्रातील कवी सोपानदेव चौधरी हे बहिणाबाईंचे पुत्र. बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर बहिणाबाईंचे सुपुत्र कविवर्य सोपानदेव व त्यांचे मावसबंधू श्री. पितांबर चौधरी यांनी लिहून घेतलेली बहिणाबाईंची गाणी हस्तलिखित स्वरूपात होती. आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या चीजवस्तू पाहताना हे हस्तलिखित सोपानदेवांच्या हाती लागले. ह्या कविता सोपानदेवांनी आचार्य अत्रे ह्यांना दाखविल्या. अत्रे उद्‌गारले, "अहो हे तर बावनकशी सोनं आहे! हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे!’,आणि अत्र्यांनी त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला.

    अत्रे ह्यांच्या विस्तृत प्रस्तावनेसह बहिणाबाईंची गाणी १९५२ मध्ये प्रकाशित झाली आणि ‘धरत्रीच्या आरशामधी सरग’ (स्वर्ग) पाहणाऱ्या ह्या कवयित्रीचा महाराष्ट्रास परिचय झाला. ह्या काव्यसंग्रहात बहिणाबाईंच्या फक्त ३५ कविता आहेत; परंतु कवित्वाची कोणतीच जाणीव मनात न ठेवता, केवळ सहजधर्म म्हणून रचिलेली त्यांची बरीचशी कविता वेळीच लेखनिविष्ट न झाल्याने त्यांच्याबरोबरच नाहीशी झालेली आहे. बहिणाबाईंच्या कविता वऱ्हाडी-खानदेशीत, त्यांच्या मातृबोलीत, रचिलेल्या आहेत.त्यांच्या कवितांचे विषय माहेर, संसार; शेतीची साधने, कापणी, मळणी इ. कृषिजीवनातील विविध प्रसंग; अक्षय्य तृतीया, पोळा, पाडवा इ. सणसोहळे; काही परिचित व्यक्ती, असे आहेत. या साऱ्यांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती असे त्यांच्या काव्यातून दिसून येते.

    ‘असा राजा शेतकरी, चालला रे आलवानी (अनवाणी) देखा त्याच्या पायाखाले, काटे गेले वाकीसनी.
    तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण, उपजत विनोदबुद्धी, जीवनातील सुखदुःखांकडे समभावाने पाहू शकणारे शहाणपण आणि जगण्यातून कळलेले तत्त्वज्ञान ही त्यांच्या कवित्वाची वैशिष्ट्ये होत. ‘आला सास, गेला सास, जीवा तुझं रे तंतर, अरे जगनं-मरनं एका सासाचं अंतर!’ किंवा ‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’ अशा किमान शब्दात अर्थाची कमाल गाठणारे शब्द, ‘अरे संसार संसार - जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके - तव्हा मीयते (मिळते) भाकर’ किंवा ‘देव कुठे देव कुठे - आभायाच्या आरपार देव कुठे देव कुठे - तुझ्या बुबुयामझार’.

    एखाद्या मोठ्या ग्रंथाचा विषय असणारे जीवनाचे तत्त्वज्ञान त्या साध्या, सोप्या, आणि कमी शब्दांत सहजपणे सांगून गेल्या आहेत. बहिणाबाई चौधरी यांचे ३ डिसेंबर १९५१ रोजी निधन झाले.
    श्री.संजीव, वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- विकीपीडीया

      November 4, 2019


  • सीतारादेवी

    सितारादेवी यांनी कथक नृत्यशिवाय भरतनाट्यम , मणिपुरी या भारतीय शास्त्रीय नृत्य शैलीचा अभ्यास केला . लोकनृत्य , परदेशी नृत्याची देखील त्यांना आवड होती. त्याचप्रमाणे त्यांना मैदानी खेळ , पोहणे यांचीही आवड होती. त्यांचे व्यक्तीमत्व खूप वेगळे होते त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीतही स्वतःची छाप पडली होती.

      July 24, 2021


  • क्रिकेटपटू वसंत रायजी

    भारतातील सर्वात वयस्कर क्रिकेटपटू वसंत रायजी यांचा जन्म २६ जानेवारी १९२० रोजी झाला.

    रायजी यांनी १९४० च्या दशतकात ९ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २७७ धावा केल्या होत्या. त्यात ६८ ही त्यांची सर्वोत्तम खेळी होती. त्यांनी मुंबई आणि बडोदा संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

    आयुष्याच्या खेळपट्टीवर नाबाद शतक नावावर लावणारे ते केवळ दुसरेच भारतीय क्रिकेटपटू आहेत. त्यांच्याआधी डी.बी. देवधर यांनी वयाची शंभरी पूर्ण केलेली होती.

    वसंत रायजी हे क्रिकेटपटू बनले याचे श्रेय त्यांचे वडील नायसदराय रायजी यांचे. एम.एम. रायजी अँड सन्स ही त्यांची चार्टर्ड अकाऊन्टसीची फर्म होती तरी त्यांनी वसंत व त्यांचे बंधू मदन यांना क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहित केले मात्र केवळ हौस म्हणूनच त्यांनी क्रिकेट खेळावे, त्याला आपला व्यवसाय बनवू नये, आपल्या फर्ममध्ये त्यांनी मदत करावी अशी त्यांची इच्छा होती.

    त्यांच्या आई जयश्री या गांधीवादी विचाराच्या. मिठाच्या सत्याग्रहासह स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला. दोन वेळा तुरुंगवासही सोसला. मात्र मुलांना त्यांनी याची माहिती होऊ न देता त्यांचे लक्ष त्यांनी शिक्षण आणि खेळावरच राहू दिले.
    रायजी यांनी १९३३ मध्ये मुंबई जिमखाना मैदानावर पहिला कसोटी सामना पाहिला तेंव्हा ते फक्त १३ वर्षांचे होते. त्या सामन्यात लाला अमरनाथ यांनी ११८ धावांची शतकी खेळी केली होती या खेळीने त्यांचे क्रिकेटकडे आकर्षण वाढवले. विशीत असतांना रायजी यांना दोन रणजी सामन्यांसाठी मुंबईच्या संघात संधी मिळाली पण चांगली कामगिरी न झाल्याने त्यांनी संघातील स्थान गमावले. त्यावेळी मुंबईच्या क्रिकेटमध्ये खूप स्पर्धा होती. त्यामुळे संघातील स्थान गमावल्याचे आपल्याला फारसे वैषम्य नाही असे ते सांगतात. विजय मर्चंट व एल.पी. जय यांच्यासोबत मैत्रीच्या आठवणीही ते सांगतात.

    पुढे त्यांना बडौदा संघाकडूनही खेळायचे निमंत्रण आले. त्यांचे आजोबा बडोदा संस्थानचे दिवाण होते आणि वसंत यांचा जन्म बडोद्याचा असल्याचे समजले तेंव्हा बडोदा क्रिकेटच्या आयोजकांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि वसंत रायजी यांनी बडोद्यासाठी पहिल्याच डावात ६८ आणि ५३ धावांच्या खेळी केल्या.

    दरम्यान त्यांचे चार्टर्ड आकाउन्टन्सीच्या शिक्षणासाठी इंग्लंडलाही जाणे झाले. तिथे इंडियन जिमखानासाठी सलामी फलंदाज म्हणून ते बरेच सामने खेळले. पण मुंबईच्या तुलनेत तेथील क्रिकेट फारसे दर्जेदार नव्हते.

    वसंत यांच्या क्रिकेट वेडाबद्दल पन्ना सांगतात की, क्रिकेट हेच त्यांचे आयुष्य होते. त्यांच्या श्वासाश्वासात क्रिकेट होते. प्रत्येक विकेंडला ते क्रिकेट क्लब आॕफ इंडियामध्ये जायचे आणि मित्रांसोबत क्रिकेटवर भरपूर गप्पा व्हायच्या. थिओ ब्रागान्झा यांच्या खेळांशी संबंधीत पुस्तकांच्या दुकानालाही ते नियमीत भेट द्यायचे. एकावेळी वसंत यांच्या संग्रहात तिनशेपेक्षा अधिक क्रिकेटशी संबंधीत पुस्तके होती. मात्र कामाकडे त्यांनी कधी दुर्लक्ष केले नाही. कामाच्या वेळी काम आणि खेळाच्या वेळी खेळ हे त्यांचे तत्व होते असे पन्ना सांगतात.

    वसंत यांचे बंधू मदन हेसुध्दा उपयुक्त अष्टपैलू क्रिकेटपटू होते. मदनसह आनंदजी डोसा व उदय मर्चंट या मित्रांसोबत त्यांनी १९३६ मध्ये जॉली क्रिकेटर्स क्लबची स्थापना केली. १९५१ मध्ये या क्लबने कांगा लीग जिंकली. १९५६ मध्ये एका सामन्यात क्रिकेट क्लब आॕफ इंडियासाठी फलंदाजी करतांना त्यांनी ड्राईव्हचा एक फटका एवढ्या ताकदीने मारला की, समोरच्या यष्टींचे तुकडेच पडले होते. या आठवणीत रमताना हसत हसत वसंत सांगतात की यष्टी कशी तुटली ते मला कळलीच नाही पण आठवणीसाठी ती माझ्याकडे देण्याची विनंती आयोजकांना केली होती. अजुनही त्यांच्या घरातील शोकेसमध्ये ती यष्टी ठेवण्यात आली आहे.

    सी. के. नायडू व सर डॉन ब्रॕडमन हे त्यांचे आवडते क्रिकेटपटू. सर डॉन यांच्याशी त्यांचा पत्रव्यवहारसुध्दा होता आणि ती पत्रे त्यांनी आॕस्ट्रेलिया स्थित आपल्या मुलीकडे दिली आहेत. ब्रॕडमन यांना त्यांनी आॕटोग्राफ मागितला होता आणि त्याला त्यांनी प्रतिसादही दिला. त्यातून त्यांची मैत्री झाली. आपल्या प्रत्येक पुस्तकाची एक प्रत ते सर डॉन यांना पाठवत असतात.

    क्रिकेट खेळणे थांबविल्यावर वसंत रायजी यांनी या खेळाचे इतिहासतज्ज्ञ म्हणूनही भूमिका बजावली. रायजी यांची क्रिकेटची कारकीर्द फार मोठी नव्हती पण त्यांना लेखनाची प्रचंड आवड होती. ती आवड सचोटीने जोपासत त्यांनी अनेक पुस्तके लिहिली होती. त्यात सी. के. नायडू यांच्या चरित्राचाही समावेश आहे. २०१० मध्ये आलेले ‘क्रिकेट मेमाॕयर्स’ हे त्यांचे शेवटचे पुस्तक होते.

    वसंत रायजी यांचे १३ जून २०२० रोजी निधन झाले.

    संकलन: संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

      January 26, 2022


  • रेखा कामत

    गेली ६० वर्षे सिनेमा, नाटक, मालिका, जाहिरातींमधून अथकपणे अभिनयाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या रेखा कामत. वय वर्षे ८० चा टप्पा गाठूनही कार्यमग्न असलेल्या रेखा कामतांसाठी अभिनय म्हणजे लाखामोलाची गोष्ट म्हणता येईल.

      August 19, 2013