जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
तीन दुकानांची आठवण देणारी तीन टिंबे, तीन डॉट्स डॉमिनोजच्या लाल, निळ्या लोगोवर अवतरली. मुळात सुरुवातीला गडद लाल, निळा व शुभ्र पांढरा रंग वापरण्यामागे लोकांचं लक्ष वेधणं हा हेतू होता. हे तीन रंग खूप प्रामुख्याने दिसतात हे लक्षात घेऊन ते निवडताना तीन दुकानांची आठवण तीन टिंबांसह लोगोवर उमटली.
March 25, 2022
पठ्ठे बापूरावांचे खरे नांव श्रीधर कृष्ण कुलकर्णी. त्यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८८६ रोजी रेठरे हरणाक्ष ता. वाळवा, जि. सांगली येथे झाला. ग्रामीण भागात गायल्या जाणार्याी जात्यावरच्या ओव्यां ऐकूनऐकून पठ्ठे बापूराव यांनी त्यात ही नवे बदल केले. त्यांनाही `श्रीधरची गाणी ` लोकप्रियता मिळाली. त्याचा परिणाम औंधच्या राजांनी दखल घेऊन पठ्ठे बापूराव यांना आपल्याकडे बोलवून घेतले. पठ्ठे बापूराव यांचे पुढील शिक्षण औंध येथे झाले. गावी घरासमोर असलेल्या वाड्यातच तमाशाचा फड चालायचा.
ब्राह्मण आणि कुलकर्णीपद त्यामुळे रात्री पटकन उठून तमाशाला जाऊन बसायचे धाडस त्यांना होईना. मनातली तळमळही त्यांना गप्प बसू देईना. बापू चोरुन तमाशाला जाऊ लागले. तमासगीरांना त्यांनी अनेक लावण्या लिहून दिल्या. तमाशात बापूरावाच्या लावण्या आणि कवने गायली जाऊ लागली. `श्रेष्ठवर्ण मी ब्राह्मण असूनी ! सोवळे ठेवले घालूनी घडी !! मशाल धरली हाती तमाशाची लाज लावली देशोधडी !! ` ह्या जिद्दीने `कुबेराला लाजवील असे वैभव तमाशाच्या जोरावर पायाशी लोळवीन `हा संकल्प करुनच बापूराव घराबाहेर पडले. गावोगावी तमाशाचा फड उभे राहू लागे. त्यातून श्रीधरची वाहवा मिळता मिळता `पठ्ठेबापूराव ` म्हणून ते प्रसिद्धीला आले.
नंतर हे शाहीर, मुंबईत आले, बटाट्याच्या चाळीत राहू लागले. तिथेही तमाशाच्या फडात जाऊन त्यांना लावण्या रचून देण्याचे काम त्यांनी काही दिवस केले. याच काळात त्यांना नामा धुळवडकरांच्या फडातील पवळा, नामचंद पवळा भेटली. तिला काहीजण `मस्तानी ` ची उपमा द्यायचे. बापूरावांची काव्य प्रतिभा पवळाच्या सान्निध्यात बहरली. बापूरावांचे काव्य अन पवळा बाईच्या गोड गळ्याने व ठसकेबाज नृत्याने ती रसिकांच्यासमोर सादर केली बापूराव आणि पवळा यांची कीर्ती महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातत पसरली. १९०८-०९ साली छ. शाहू महाराजांसमोर त्यांनी `मिठाराणी' चा वग पठ्ठे बापूरावनी सादर केला. पुढे त्या दोघांवर सर्वांनी बहिष्कार टाकला. तमाशाचा फड बंद पडला. आर्थिक कोंडी झाली. त्यामुळे बापूराव व पवळा या जोडीने स्वत:ला ९०० रुपयांचा करार करून स्वत:चा लिलाव केला.
मुंबईच्या अबू शेठनी लिलाव घेतला. मुंबईच्या एल्फिस्टन थिएटरवर पवळा पठ्ठे बापूराव यांना पाहण्यासाठी तिकीट लावले. पण पुढे पवळा बेबनावामुळे पठ्ठे बापूरावांचा फड सोडून निघून गेली. पठ्ठे बापूरावांनी दुसर्याप स्त्रीला घेऊन त्यांनी तमाशाचा फड चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आले नाही. पठ्ठे बापूराव यांचे २२ डिसेंबर १९४५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 16, 2017
पं. डी. के. दातार यांच्या आधी १०० वर्षांची व्हायोलिन वादनाची परंपरा असलेल्या कर्नाटक संगीतात गायकी अंगाने व्हायोलिन वाजवण्याची पद्धत होती. परंतु हिंदुस्थानी संगीतात ती रुजली नव्हती. ती रुजवण्याचे मोठे काम पं. दातार यांनी केले.
June 7, 2022
वृत्तवाहिन्यांवर राजकीय विश्लेषक म्हणून त्यांनी ठसा उमटविला होता. पुरोगामी विचारधारा मानणाऱ्या दीक्षित यांची सडेतोड राजकीय विश्लेषक म्हणून ख्याती होती. अचूक आणि निष्पक्ष मांडणी हे त्यांचं वैशिष्ट्ये होतं. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्यासह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलं होतं.
June 18, 2022
आबासाहेब जर्हाड हे आय ए एस अधिकारी असून महाराष्ट्र शासनाच्या सेवेत आहेत. ते अत्यंत विज्ञानवादी विचारांचे आहेत.
November 14, 2011
ग.रा.कामत यांनी मराठीत राजा परांजपे, राजा ठाकूर यांच्या चित्रपटासाठी काम केले. त्यांनी लिहिलेले ‘पेडगावचे शहाणे’, ‘शापित’ हे मराठी चित्रपट खूप गाजले.कन्यादान हा त्यांचा आणखी एक गाजलेला मराठी चित्रपट. ‘सावरकर’ चित्रपटाचेही सुरवातीचे लेखन त्यांनी केले होते, द.ग.गोडसे आणि म.वि.राजाध्यक्ष यांच्या लेखांचं संकलन व संपादन केलेले ‘शमानिषाद’ हे कामत यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
March 13, 2022
"हृदयी वसंत फुलताना' यांसारखी सतत ओठावर खिळणारी गाणी देऊन रसिकांना उत्साहात ठेवणारे गीतकार म्हणून कवी मा.शांताराम नांदगावकर यांची ओळख होती.
सहज आणि सुंदर शब्दांची गुंफण असणाऱ्या आणि मनाचा ठाव घेणारी गीते देणारे ज्येष्ठ गीतकार शांताराम नांदगावकर हे मूळचे कोकणातील नांदगावचे. त्यांचा जन्म १९ आक्टोबर १९३६ रोजी झाला. शांताराम नांदगावकर यांचे शालेय शिक्षण दादरच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये झाले.
'पाहिले न मी तुला', 'प्रथम तुला वंदितो', 'ही नव्हे चांदणी', 'दाटून कंठ येतो', आदी त्यांची गीते विशेष गाजली. अष्टविनायक,'नवरी मिळे नवर्याीला', 'बनवा बनवी', पैजेचा विडा आदी मराठी तसेच हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले होते. श्रोत्यांच्या ओठावर खेळतील अशा सहजसुंदर काव्यरचना हे त्यांचे वैशिष्ट्य होते.
चित्रपटगीतांबरोबरच बालगीते, भावगीते व लोकगीतेही आणि भक्तीगीतेही लिहिली. 'ससा तो ससा' हे बालगीत आजही मुलांना वेड लावते.
क्रिकेटपटू मा.सुनील गावसकर यांनी म्हटलेले, 'या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला...?' हे गीतही त्यांचेच. चित्रपटसृष्टीत 'डॅडी' या नावाने परिचित असलेले शांताराम नांदगावकर १९८५ मध्ये शिवसेनेतर्फे विधान परिषदेवर निवडून गेले होते.
शांताराम नांदगावकर यांचे ११ जुलै, २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
July 14, 2017
दिनकर देशपांडे यांच्या निधनामुळे विदर्भाच्या साहित्य आणि पत्रकारितेतील एक कलंदर व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. आपल्या दिनकर या नावापुढे ‘राव’ हे विशेषण स्वत:च लावणारे अस्सल आणि स्वत:च ते उच्चारत मिरवणारे वैदर्भीय मोकळेढाकळे, वेगळेपण स्वभावात असणारे दिनकरराव आयुष्यभर कलंदरीवृत्तीने जगले. शासकीय सेवेत चांगली ग्रामसेवकाची नोकरी सुमारे ५० वर्षांपूर्वी त्यांना चालून आली आणि त्यांनी ती स्वीकारलीही. मात्र, त्या नोकरीत मन रमले नाही आणि बालनाटय़ाच्या क्षेत्रात लक्षवेधी धडपड करण्याच्या उर्मीने दिनकरराव नागपुरात परतले.
महाराष्ट्र, लोकमत, नागपूर पत्रिका अशा विविध दैनिकात पत्रकारिता करत विशेषत: बालनाटय़ लेखनाच्या क्षेत्रात दिनकररावांनी अजोड कामगिरी बजावली. सुधा करमरकर यांच्या लिटल थिएटर्सनी दिग्दर्शित केलेले दिनकररावांचे ‘हं हं आणि हं हं हं’, हे बालनाटय़ सत्तरीच्या दशकात खूपच गाजले. ‘बहरले झाड सोन्याचे’, ‘देव भावाचा भुकेला’, ‘जंगलातील वेताळ’ आणि ‘बं बाबू हो बं बाबू’ या त्यांच्या बालनाटय़ांनी त्या काळात बालरंगभूमी अक्षरश: उजळून टाकली होती. बालनाटय़ हा दिनकररावांचा खऱ्या अर्थाने श्वास होता.
बालनाटय़ाच्या रंगमंचावर लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, अभिनय आणि लहान मुलांची मानसिकता अशा विविध पैलूंचा दिनकरराव साकल्याने विचार करत असत. आणि त्याप्रमाणे सादरीकरण करवून घेत. म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रात बालनाटय़कार म्हणून त्यांची कामगिरी अतुलनीय समजली जाते. त्यांच्या या कामगिरीचा सन्मान म्हणूनच ठाण्यात भरलेल्या अखिल भारतीय बालकुमार मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची एकमताने निवड करण्यात आली होती. बालनाटय़ लेखनासाठीचा राज्य शासनाचा राम गणेश गडकरी हा वाङ्मय पुरस्कार दोन वेळा मिळवणारे दिनकरराव हे एकमेव बालसाहित्यिक होते.
सुमारे १०० बालनाटय़ांसह मोठय़ांसाठीही त्यांनी कथा, कादंबऱ्या अशी विपुल साहित्य निर्मिती केली. नागपूर पत्रिका या दैनिकात वऱ्हाडी शैलीत त्यांनी रंगवलेली ‘इब्लिस माणसं’ आजही वाचकांच्या स्मरणात आहेत. पत्रकार म्हणून दिनकर देशपांडे यांनी लौकिक प्राप्त केला तो त्यांच्या निष्कपट स्वभावामुळे. त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येक माणसाची खास वऱ्हाडी इब्लिश शैलीत दिनकररावांनी सातत्याने भोचक फिरकी घेतली मात्र, पत्रकारिता करताना त्यांनी कधीही कुणाला दुखावले नाही. तो त्यांचा स्वभावच नव्हता आणि त्यामुळेच समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांचा अफाट असा लोकसंग्रह होता.
समाजाच्या कोणत्याही क्षेत्रातील नेत्याने मन मोकळे करताना एका अर्थाने दिलेल्या कबुलीजबाबाचा साधा उच्चारही कधी दिनकरराव देशपांडे यांनी केला नाही. पत्रकारितेत अतिशय परोपकारी सहकारी म्हणून ते ओळखले जात. सहकारी पत्रकारांच्या अडीअडचणीच्या, दु:खाच्या क्षणी धावून जाणे हे दिनकररावांचे जणू व्रतच होते. त्यामुळे अनेक पत्रकारांच्या कौटुंबिक आयुष्यातही दिनकररावांना मानाचे स्थान होते.
अत्यंत लोकप्रिय बालनाटककार, यशस्वी साहित्यिक आणि हेवा करावा असा अफाट लोकसंग्रह असणारा पत्रकार अशी श्रीमंती असणारे दिनकरराव अतिशय साधेपणाचे जीवन जगले. लौकिकाधारित श्रीमंतीच्या भरवशावर त्यांनी ना कधी कोणाकडून कशाची अपेक्षा ठेवली किंवा कोणाकडून काही तरी मागणी कोणा नेत्या वा श्रीमंत परिचिताकडे केली. नाटय़लेखनावर आटोकाट निष्ठा ठेवत आणि कलंदरी वृत्तीने पत्रकारिता करत जगण्याचा हा साधेपणा दिनकररावांनी व्रतस्थपणे शेवटपर्यंत जपला.
August 5, 2017
राजा बढे हे संपादक, चित्रपट अभिनेते, गद्य लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार आणि गायक असले तरी त्यांची खरी ओळख मराठी कवी आणि गीतकार अशीच होती. शाहीर साबळे यांनी तर त्यांचे ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे अजरामर ‘ महाराष्ट्र गीत ‘ गायले.
April 7, 2021
लहान पणासूनच अपर्णाला पर्यटनाची आवड, त्यातही ट्रेकिंग सारख्या अॅडव्हेंचर प्रकाराची अधिकच ! म्हणजेच सतत चित्तवेधक गोष्टींकडे ओढा थोडा अधिक असायचा ,आणि म्हणून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न डॉ. अपर्णा यांचा असायचा, वाहनांची सुध्दा प्रचंड आवड असल्यामुळे एक निश्चय केला होता की स्वावलंबी बनल्यावर स्वत: ची गाडी किंवा बाईक खरेदी करुन आपल्या “अॅडव्हेचर ”ची आवड ही पूर्ण करायची, त्यासाठी सर्वप्रथम बाईक चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं
March 7, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti