जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
राजा बारगीर हे मराठी व हिन्दी चित्रपट दिग्दर्शक होते.
September 25, 2019
केतकीच्या बनी.. नाचला ग मोर’ या नाचऱ्या आणि चित्रमयी शब्दकळेचे गीतकार अशोकजी परांजपे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील हरिपूर येथे झाला.
नाटककार गो. ब. देवल हरिपूरचेच. त्यांचा सार्थ अभिमान अशोकजींना होता. ग्राम संस्कृती आणि नागर संस्कृती, लोकरंगभूमी आणि नागर रंगभूमी अशा दोन स्वतंत्र विचारधारांमधील महत्त्वाचा दुवा म्हणजे अशोकजी परांजपे, त्यांचा प्रकृती पिंड गीतकाराचा. ललित लेखनात त्यांना विशेष रुची होती. दीनानाथ दलाल यांची चित्रे आणि अशोकजी परांजपे यांच्या काव्यपंक्ती असा सिलसिला अनेक दिवाळी अंकात सुरू असायचा. मुंबईत गिरगावातील झावबावाडीतील नॅशनल होस्टेलमध्ये अशोकजी परांजपे राहात. संध्याकाळी त्यांच्या गप्पा रंगत साहित्य संघाच्या कट्टय़ावर. अशोकजींना अभिजात वाङ्मयासारखंच लोकवाङ्मय प्रिय असे. शंकराचार्याचे श्लोक आणि पठ्ठेबापूरावांच्या लावण्या त्यांच्या ओठी असत. गीतकार, चित्रकार, नाटककार, लोककलेचे अभ्यासक अशा विविध भूमिकांमधून अशोकजी परांजपे यांनी मराठी लोकसंस्कृतीवर आपला आगळावेगळा ठसा उमटविला होता. अतिशय संवेदनशील, गप्पांमध्ये रंगणारे आणि गप्पा रंगविणारे अशी अशोकजींची प्रतिमा होती. त्यांना सतत लोकांतवास आवडत असे.
लोक कलावंतांमध्ये रमणारे अशोकजी सतत लोककलांमधील बलस्थाने शोधत राहायचे आणि लोक कलांमधील, अस्सल मराठी मातीतील उर्जा त्यांना गीतांसाठी नवी नवी शब्दकळा देऊन जायची. लोककला आणि लोककलाकारांवरचं प्रेम अशोकजींच्या नसानसातच होतं... कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, अवघे गरजे पंढरपूर, समाधी घेऊन जाई ज्ञानदेव यासारख्या गीतांमधून रसिकांना भक्तिरसात चिंब भिजवणारे ते नाविका रे वारा वाहे रे, केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर, दारी पाऊस पडतो रानी पारवा भिजतो, वाट इथे स्वप्नातील संपली जणू, पाखरा जा दूर देशी... यासारख्या भावगीतांमधून रसिकांना एका वेगळ्याच तरल भावविश्वात घेऊन जातात. निसर्गावरचं त्यांचं अपार प्रेम त्यांनी चितारलेल्या उत्तमोत्तम चित्रांमधून दिसायचं.
पं. जितेंद्र अभिषेकी, सुमन कल्याणपूर, सुधीर फडके, रामदास कामत, सुलोचना चव्हाण, अजित कडकडे, अरुण दाते आदींनी त्यांची गीते गायली. तमाशा, गोंधळ, वाघ्या-मुरळी या ज्या काही प्रमुख लोककला होत्या, त्यांचा त्यांनी आशय शोधून काढला आणि वर्तमानातील आधुनिक कलांवर असणारे त्यांचे ठसेही शोधून काढले. लोकपरंपरांमधील आख्याने त्यांनी नाट्यरूपात आणली.
"जांभूळ आख्यान', "खंडोबाचे लगीन', "दशावतारी राजा', "वासुदेव सांगती' अशा अनेक कलाकृती त्यांची आठवण करून देत राहतात. मुंबईच्या इंडियन नॅशनल थिएटर्सचे संचालक म्हणून काम पाहतानाही आणि त्यानंतरही कलाक्षेत्राशी जुळलेले त्यांचे नाते अखेरपर्यंत कायम होते. अशोकजी परांजपे यांचे ९ एप्रिल २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
अशोकजी परांजपे यांची गाणी.
https://youtu.be/Qdjg__Kzmkw
https://youtu.be/UQFod3eyaYk
https://youtu.be/WFg7EKrLDQI
https://youtu.be/mB9uW1I28EM
https://youtu.be/uNz8x7vFNg4
April 11, 2017
अभिनयाबरोबच गाणं गाण्याची आवड असणारी अभिनेत्री म्हणजेच पद्मिनी कोल्हापुरे, असं म्हणता येईल.
November 1, 2016
त्यांच्या वडीलींचे मनोर, वाडा येथे त्यांच्या भजनी मंडळाचे कार्यक्रम होत असत. त्यावेळी पाच-सात वर्षांच्या असलेल्या पागधरे वडिलांबरोबर भाग घ्यायच्या.
July 6, 2022
ठाणे शहर हे ज्याप्रमाणे संस्कृती कला, परंपरा यांचा आदर करतं त्याचप्रमाणे विज्ञान, तंत्रज्ञान यांचीही कास ठाण्यानी धरली आहे. याचीच साक्ष देतात ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ म्हणून बिरुद मिळालेले श्री. दा.कृ. सोमण.
May 23, 2014
आज दिग्गज दिग्दर्शक व निर्माते यश चोप्रा यांची पुण्यतिथी
जन्म:-२७ सप्टेंबर १९३२
यशजींनी अभियंता बनावे अशी त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा होती, लंडनला जाण्यासाठी त्यांचा पासपोर्टही बनला होता. मात्र नियतीला काही औरच मंजूर होते आणि ते चित्रपटसृष्टीत आले.
यश चोप्रा यांच्या चित्रपटाचे वैशिष्टय म्हणजे गीत आणि संगीत. यश चोप्रा हे कवी असल्याने त्यांनी स्वत: कधीही उथळ दर्जाची गीते निवडली नाहीत. त्यामुळे सगळी इंडस्ट्री आनंद बक्षीची धूळ झाडत असतानाही चोप्रा यांनी साहिर लुधियानवीची साथसंगत कधी सोडली नाही.
बी. आर. चोप्रा आणि यश चोप्रा हे सख्खे भाऊ. सहायक दिग्दर्शक म्हणून यश चोप्रा यांनी आपल्या करिअरला सुरवात केली. १९५९ मध्ये "धूल का फूल‘ या चित्रपटाद्वारे त्यांनी स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. राजेंद्र कुमार व माला सिन्हा या कलाकारांना घेऊन त्यांनी हा चित्रपट बनविला. त्यानंतर "आदमी और इन्सान‘, "धरतीपुत्र‘, "वक्त‘ असे काही चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. १९६५ मध्ये त्यांचा 'वक्त' चित्रपट आला. बॉलीवूडमधील हा पहिला मल्टी स्टार चित्रपट होय. राजेश खन्ना व शर्मिला टागोर यांना घेऊन बनविलेल्या "दाग‘ या चित्रपटाद्वारे त्यांनी निर्मितीत पाऊल टाकले. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. १९७३ मध्ये त्यांनी यशराज चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना केली. "काला पत्थर‘, "चांदनी‘, "लम्हे‘, "दिल तो पागल है‘, "वीर झारा‘, "सिलसिला‘, "डर‘, "रब ने बना दी जोडी‘ अशा अनेक चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली. तसेच "दीवार‘, "त्रिशूल‘ अशा काही अन्य निर्मात्यांच्या चित्रपटांच्या दिग्दर्शनाची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. त्यांच्याबरोबर अनेक कलाकारांनी काम केले असले अमिताभ बच्चन हे त्यांचे आवडते कलाकार होते. "सिलसिला‘साठी त्यांनी अमिताभ बच्चन, जया भादुरी व रेखा यांना एकत्र आणले. त्या वेळी हिंदी चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली होती. विविध आणि आकर्षक लोकेशन्स व सुमधुर गाणी ही त्यांच्या चित्रपटांची खासियत होती. दादासाहेब फाळके पुरस्कारासह पद्मभूषण, तसेच अन्य काही पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. यशजींनी पाच दशक चित्रपटसृष्टीवर राज्य केले. यादम्यान त्यांना ६ राष्ट्रीय व ११ फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. चित्रपटसृष्टीतील अतुल्य योगदानासाठी त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
मा.यश चोप्रा यांचे २१ ऑक्टोबर २०१२ रोजी निधन झाले. यश चोप्रा यांना आदरांजली.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.विकी पिडीया
October 21, 2016
यशसस्वी उद्योजक बनण्याचे स्वप्न लातूरमध्ये जन्मलेल्या अविनाश राचमाले यांनी औरंगाबादमध्ये कॉलेज शिक्षण घेताना पाहिले होते. आज अमेरिकेत त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
अमेरिका देशे रचिला 'पाया'
July 14, 2017
चित्रपटाच्या आर्थिक गणितांपासून अलिप्त राहून अभिव्यक्तीला प्राधान्य देणार्या गौरी पटवर्धन यांनी सातत्याने वेगळे काम केले आहे. 'मोदीखानाच्या दोन गोष्टी' या राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या माहितीपटातून त्यांनी वेगळा विचार मांडला आहे.
गौरी पटवर्धन यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला गोष्ट वेगळ्या दिग्दर्शिकेची हा लेख पुढील पानावर वाचा.
गौरी पटवर्धन यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला गोष्ट वेगळ्या दिग्दर्शिकेची हा लेख वाचा.
September 7, 2015
प्रकाश घांग्रेकर मुळचे पुण्याचे.संगीत नाटकाची कारकीर्द घडवण्यासाठी १९६० साली मुंबईला आले. देवियाच्या द्वारी या नाटकातून त्यांची कारकीर्दची सुरवात झाली.
July 6, 2022
आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा यांनी महिंद्रा कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली होती.
April 30, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti