(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • चित्रपट कथा – पटकथाकार आणि संवाद लेखक यशवंत रांजणकर

    चित्रपट विषयक साप्ताहिक चित्ररंग चे रांजणकर हे काही काळ कार्यकारी संपादक होते. त्यांची पन्नास हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. बैरागपाडा हे पुस्तक तसेच लॉरेन्स ऑफ अरेबिया, आल्फ्रेड हिचकॉक, वॉल्ट डिस्नी – द अल्टिमेट फँटसी यांची त्यांनी लिहिलेली चरित्र वाचकप्रिय ठरली. रांजणकरांची शैली वाचक-स्नेही होती. लॉरेन्स ऑफ अरेबिया या पुस्तकाने मराठी वाचकविश्वाला सर्वस्वी अपरिचित असलेल्या टी. ई. लॉरेन्सचं हे चरित्र त्यामुळे अथपासून इतिपर्यंत वाचनीय झाली.

      June 15, 2022


  • निर्मलाताई पुरंदरे

    पुरंदरे, निर्मलाताई

    डोळ्यातले सात्त्विक भाव आणि चेहऱ्यावरील स्निग्धता यामुळे क्षणात कुणालाही मनाच्या आतले काही सांगावेसे वाटावे, असे व्यक्तिमत्त्व निर्मलाताई पुरंदरे यांच्या ठायी आहे. ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात अव्याहतपणे त्या करीत असलेल्या कार्याला, पुणेकरांनी ‘पुण्यभूषण’ पुरस्काराच्या माध्यमातून दिलेली दाद म्हणूनच महत्त्वाची आहे.

    अच्युतराव पटवर्धन यांनी स्थापलेल्या विद्यार्थी सहायक समितीच्या माध्यमातून ५० वर्षांपूर्वी सुरू केलेल्या कार्याला त्यांनी संस्थात्मक स्वरूप दिले आणि ‘वनस्थळी’ ही संस्था स्थापन केली. ग्रामीण विकासात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना तेथील मुलामुलींनाच बालवाडय़ा चालवण्यासाठीचे प्रशिक्षण देण्यासाठी ही संस्था काम करते. सुटीच्या काळात व्यक्तिमत्त्व विकास शिबिरांचे आयोजन, फुलगाव येथे निराश्रित बालकांसाठी बालसदनची स्थापना, ग्रामीण भागातील बालवाडय़ांमधील शिक्षकांसाठीचे प्रशिक्षण वर्ग, शालाबाह्य युवकांसाठी सुतारकाम व प्लंबिंगच्या प्रशिक्षणाचे वर्ग, अशा अनेक प्रकारे निर्मलाताई महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गेली पाच दशके कार्यरत आहेत. ‘इन्व्हेस्टमेंट इन मॅन ट्रस्ट’ या संस्थेतर्फे माणूस घडवण्यासाठीचे विविध उपक्रम आखणे हा त्यांच्या कार्यातील अविभाज्य भाग. हे करत असताना आपण काही वेगळे, मोठे करत आहोत, याचा मागमूसही त्यांच्या चेहऱ्यावर असत नाही. प्रसिद्धीच्या वलयाची पुरेपूर जाणीव असूनही त्या त्यापासून दूर राहण्यात यशस्वी ठरल्या. वृत्तपत्रात छायाचित्रे छापून येण्यासाठी आपण काम करता कामा नये, यावर त्यांचा सतत भर असतो. ‘माणूस’ या मराठीतील एकेकाळच्या महत्त्वाच्या साप्ताहिकात दोन दशके संपादकीयकाम केल्यामुळे नजर विस्तारणे स्वाभाविक होते. निर्मलाताईंनी त्या वैचारिक अधिष्ठानाला प्रत्यक्ष कामाचीही जोड दिली. भारत आणि फ्रान्स या देशांदरम्यान सांस्कृतिक देवाण-घेवाण करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘असोसिएशन ऑफ फ्रेंडस् ऑफ फ्रान्स’ या संस्थेच्या त्या अध्यक्षही होत्या. अनेक पुरस्कार मिळूनही त्याकडे निर्लेपपणे पाहण्याची त्यांची वृत्ती त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक खुलवते. अभिजात कलांबद्दल ममत्व असणाऱ्या निर्मलाताईंना ‘पुण्यभूषण’ पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्या मोठय़ा परिवारालाही आनंद होणे स्वाभाविक आहे.

    ---------------------------------------------------------------------------------------------------------

    पुरंदरे, निर्मला

    गेली तीसहून अधिक वर्षे अव्याहतपणे ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि महिलांसाठी सर्वस्व देऊन झटणार्‍या निर्मला पुरंदरे यांनी 'वनस्थळी ग्रामीण विकास केंद्रा'च्या माध्यमातून खेड्या-पाड्यांतील अनेक हातांना एकत्र बांधले आहे. त्यांच्या या कार्याची महती ग्रामीण भागांत काम करणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्याला चांगलीच परिचित आहे.

    डॉ. अच्युत आपटे यांनी स्थापन केलेल्या 'विद्यार्थी सहाय्यक समिती'मध्ये निर्मलाताई सुरुवातीपासून सक्रिय होत्या. ग्रामीण भागातून मोठ्या शहरांमध्ये शिकायला येणार्‍या विद्यार्थ्यांच्या समस्यांची जाणीव त्यांना यामुळे झाली. संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त म्हणून काम करत असतानाच, विविध उपक्रमांमध्ये मार्गदर्शन करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला होता. निराश्रित बालकांसाठी 'आयआयएम' या ट्रस्टच्या माध्यमातून 'बालसदना'ची निर्मिती त्यांनी केली. मात्र, केवळ बालसदन किंवा बालवाडी निर्माण करून थांबायचे नाही तर तिथे शिकविणार्‍या शिक्षिकासुद्धा तयार केल्या पाहिजेत, हे ओळखून त्यांनी सहा महिन्यांचा बालवाडी शिक्षिका प्रशिक्षण वर्ग सुरू केला. त्यातूनच 'वनस्थळी'ची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर, राज्याच्या ठराविक भागांत हे प्रशिक्षण वर्गाचे जाळे विस्तारत गेले.

    सुमारे अडीचशे बालवाड्या आणि ११ हजारांहून अधिक प्रशिक्षित बालवाडी शिक्षिका ही निर्मलाताई आणि त्यांनी 'वनस्थळी'द्वारे केलेल्या कार्यातून निर्माण झालेली 'संपत्ती' आहे. भांडवल आणि खर्चाचे आकडे याचा आधार न घेता मनुष्यबळावरचा विश्वास आणि त्यांच्या हातांची साथ, यावर ही संपत्ती उभी राहिली आहे. यामध्ये अर्थातच निर्मलाताईंच्या निर्मळ आणि पारदर्शी स्वभावाचे संचितही आहे, हे विसरून चालणार नाही! केवळ बालवाडी प्रशिक्षणापुरते वनस्थळी आणि निर्मलाताईंचे काम मर्यादित नाही; तर किशोर छंदवर्ग, फिरते वाचनालय, महिलांसाठी व्यक्तिमत्त्व विकास शिबीर, व्यवसाय प्रशिक्षण आणि सध्या आरोग्य सेविका प्रशिक्षण, अशा उपक्रमांचा पसारा वाढतोच आहे.

    'असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ फ्रान्स' आणि यासारख्या इतर संस्थांमधूनही त्यांचे समाजाशी नाळ जोडण्याचे प्रयत्न सुरूच आहेत... आणि निर्मलाताईंच्या कोशात 'स्वस्थता' किंवा 'विश्रांती' याला अजिबातच स्थान नसल्यामुळे त्यांच्या कार्याचा गाडा अव्याहत सुरूच आहे... कोणत्याही प्रसिद्धीशिवाय!

    त्यांना पुण्यभूषण पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)

      August 5, 2017


  • डॉ. स्मिता शहापूरकर

    महिला बचतगटाच्या माध्यमातून स्त्रीहक्क मिळवून देणारा उपक्रम डॉ. स्मिता शहापूरकर यांनी “लोकप्रतिष्ठान” च्या माध्यमातून राबविला आणि त्याचे व्यापक रुप काही वर्षांत उभे राहिले...

    लोकशक्ती

      July 24, 2015


  • वसंतराव नाचणे

    समाजवादी पक्षाचे कट्टर कार्यकर्ते श्री. वसंतराव नाचणे यांनी कै. दत्ताजी ताम्हणे यांच्या बरोबर खेडोपाडी खूप काम केले.

      June 1, 2010


  • सुप्रसिद्ध अभिनेत्री स्नेहप्रभा प्रधान

    स्नेहप्रभा प्रधान यांनी ‘ सर्वस्वी तुलाच ‘ हे आत्मचरित्र असलेले नाटक लिहिले आणि त्यात त्यांनी भूमिकाही केली. इ.स. १९५०च्या नंतर त्यांनी पुढची काही वर्षे मराठी नाट्यसेवेसाठी आणि इतर सामाजिक कार्यासाठी खर्च केली.

      December 19, 2021


  • अभिनेता शंतनू मोघे

    अभिनेता शंतनू मोघे यांचा जन्म २८ जुलैला झाला.

    तरुण आणि दमदार कलाकारांच्या यादीत अभिनेता शंतनू मोघे यांचं नाव आग्रहाने घेता येईल.

    शंतनू मोघे हे ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे चिरंजीव होत. शंतनु महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबईतून पुण्यात आले. त्यांनी अभियांत्रिकीला प्रवेश घेतला होता. सिंहगड कॉलेजमध्ये शिकत असताना तिथल्या कला गृप मध्ये सामील झाले. मग पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक, कॉलेज फेस्टिवल आदी मध्ये सहभागी झाले. अभिनयाची आवड लहानपणापासून होती. श्रीकांत मोघे हे मोठे अभिनेते म्हणून घराघरांत पोहोचलेलं एक व्यक्तिमत्व होते कायम त्यांना काम करताना बघत मोठे झाले. तर काका सुधीर मोघे हे मनामनांत पोहोचलेले मोठे कवी. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर मुंबईत आले. पण काही दिवस चांगलं काम काही मिळत नव्हतं. नंतर मग दोन वर्ष नोकरी करत ऑडिशन देत गेले. मग हळूहळू चांगल्या संधी मिळू लागल्या आणि ह्या क्षेत्रात पूर्ण वेळ काम सुरू केले. या सुखांनो या ही त्यांची पहिली व्यावसायिक सीरियल होती. पुढे शंतनू यांनी अनेक मराठी नाटकात आणि चित्रपटात अभिनय केले आहेत.

    ‘स्वराज्यरक्षक संभाजी’या मालिकेत त्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका खूपच गाजली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेनंतर अभिनेता शंतनू मोघे प्रेक्षकांना पुन्हा एकदा चरित्र भूमिका साकारताना दिसले होते. विप्र एंटरटेनमेंट आणि दिशादिपा फिल्म्स निर्मित 'श्री राम समर्थ' सिनेमात शंतनू मोघे यांनी समर्थ रामदास स्वामींच्या भूमिकेत दिसले. आता शंतनू मोघे पुन्हा एकदा मालिकाविश्वात दिसत आहेत. स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' या मालिकेत अविनाश देशमुख म्हणून त्यांचा प्रवेश झाला आहे.

    शंतनू यांना चरीत्रपटापेक्षा वेब सिरीजमध्ये काम करण्यास आवडते. शंतनु यांनी 'झी ५' वरील 'पॉयझन' या वेब सिरीजमध्ये काम केले आहे. शंतनू मोघे आणि प्रिया मराठे मराठीतील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. २०१२ मध्ये शंतनू मोघे यांनी अभिनेत्री प्रिया मराठे सोबत लग्न केले आहे.दोघेही मनोरंजन क्षेत्राशी संबंधित असून आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत त्यांनी आपली एक ओळख निर्माण केली आहे. प्रियाने नाटक, मालिक आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांद्वारे प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचे मन जिंकून घेत तिने स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. प्रियाने सोनी मराठी वाहिनीवरील स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत सावित्रीबाई देशमुख उर्फ रायबागण ही ऐतिहासिक भूमिका साकारली होती.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

      July 28, 2021


  • जेष्ठ मराठी, हिंदी अभिनेत्री सुहासिनी मुळे

    डॉक्यूमेंट्री फ़िल्मसाठी प्रसिद्ध असलेल्या विजया मुळे यांच्या कन्या. त्यांचा जन्म २० नोव्हेंबर १९५१ रोजी पटणा येथे झाला. वयाच्या सोळाव्या वर्षी 'भुवन शोमा' या सिनेमात त्यांनी पहिल्यांदा अभिनय केला. सत्यजीत राय यांनी 'भूवन शामा' या सिनेमातील नायिका सुहासिनी मुळे यांच्याविषयी म्हटले होते, की एक चांगली अभिनेत्री सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये नसली तरीदेखील प्रत्येक ठिकाणी तिची उपस्थिती जाणवते. त्यानंतर अभिनय करण्याऐवजी कॅनडात गेल्या आणि कृषी अध्ययन करण्याचा निर्णय घेतला. अॅग्रीकल्चरमध्ये पदवीप्राप्त केल्यानंतर भारतात परतून शेतक-यांची मदत करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतात परतल्यानंतर हे काम जुळून आले नाही.

    मग मास कम्युनिकेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करुन दुरदर्शनवर काही दिवस काम केले. मात्र येथेही मन न रमल्यामुळे लवकरच राजीनामा दिला. त्यांनी अनेक डॉक्युमेंट्रीसुद्धा बनवल्या आहेत. सुहासिनी मुळे यांनी गुलजार यांच्या 'हुतुतु' या सिनेमात अभिनय केला होता. या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आशुतोष गोवारिकर यांच्या 'लगान'मध्ये आमिर खानच्या आईची भूमिका केली होती. त्यांनी 'दिल चाहता है' या चित्रपटात काम केले होते.

    सुहासिनी मुळे यांनी 'जोधा अकबर','बिग ब्रदर', 'पेज 3', 'ये तेरा घर ये मेरा घर', 'लव' ,'भुवन शोम' या या सिनेमांमध्ये काम केले. टीव्हीवर 'देवों के देव...महादेव', 'विरासत', 'देश की बेटी नंदिनी' आणि 'एवरेस्ट' या मालिकांमध्ये त्या झळकल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. त्यांनी ४ वेळा डॉक्यूमेंट्री फ़िल्मसाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आहे. सुहासिनी मुळे यांनी अनेक वर्षे एकटी घालवल्यानंतर वयाच्या साठाव्या वर्षी भौतिकशास्त्रज्ञ अतुल गुर्टु यांच्यासोबत लग्न केले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      November 20, 2018


  • ‘चित्रपटसृष्टीचा विश्वकोश’ श्रीराम ताम्रकर

    श्रीराम ताम्रकर हे त्यांच्या चाहत्यांमध्ये ‘चित्रपटसृष्टीचा विश्वकोश’ म्हणून लोकप्रिय होते. मध्य प्रदेश सरकारच्या सांस्कृतिक विभागाने २०१० मध्ये दादासाहेब फाळके अकादमीचा ‘ज्येष्ठ चित्रपट पत्रकार पुरस्कार’ आणि ‘बेस्ट फिल्म क्रिटिक’ पुरस्कार यांच्यासह त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

      December 14, 2021


  • जुन्या हिंदी चित्रपट सृष्टीतील नायक व चरित्र अभिनेता मोतीलाल

    जुन्या हिंदी चित्रपट सृष्टीतील नायक व चरित्र अभिनेता मोतीलाल यांचा जन्म ४ डिसेंबर १९१० रोजी सिमला येथे झाला.

    मोतीलाल राजवंश उर्फ मोतीलाल हे आपल्या ऐटबाज व्यक्तिमत्त्वाने व सहजसुंदर अभिनयाने रसिकांवर मोहिनी घालणारे अभिनेते अशी त्यांची ओळख होती. मोतीलाल यांचे शिक्षण सिमला येथे झाले. कॉलेज संपल्यावर मोतीलाल मुंबईला नौसेनेत जाण्यासाठी आले होते. पण काही कारणाने ते झाले नाही व हिंदी चित्रपट सृष्टीला एक भारदस्त नट मिळाला. १९३४ मध्ये सागर फिल्म कंपनीच्या शहर का जादू या चित्रपटात नायक म्हणून पहिले काम केले.

    मोतीलाल यांचे गाजलेले चित्रपट 'शादी', आई-'परदेसी', ,'अरमान', 'ससुराल', 'मूर्ति', 'देवदास', जागते रहो व अछूत कन्या. मोतीलाल यांचे जागते रहो मधील गाणे 'ज़िंदगी ख्वाब है' हे गाणे त्या काळी खूपच गाजले होते. मोतीलाल यांचे १७ जून १९६५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    'ज़िंदगी ख्वाब है' हे गाणे
    https://www.youtube.com/watch?v=GQZaG5SZRYk
    https://www.youtube.com/watch?v=y5JcBpFMkKw

      November 5, 2019


  • शाहरुख खान

    चाहत्यांतर्फे किंग खान ही उपाधी मिळालेला शाहरूख खान दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीचा विशिष्ट काळ गाजवणारा अभिनेता म्हणूनही ओळखला जातो. त्याचा जन्म २ नोव्हेंबर १९६५ रोजी झाला. वीसेक वर्षांपूर्वी "फौजी' नावाची मालिका दूरदर्शनवरून प्रसारित व्हायची. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या मालिकेतील नायकाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळविले. रुपेरी पडद्याच्या दिशेने टाकलेले शाहरुख खानचे ते पहिले पाऊल होते. त्यानंतर "दिल दरिया', "दूसरा केवल', "सर्कस' अशा काही मालिकांमध्ये त्याने काम केले. "दीवाना' या चित्रपटानंतर त्याने टीव्हीसाठी काम थांबवले. चित्रपटांतच त्याला भरभरून यश मिळाले.

    आमीर खानने सोडलेला रोल शाहरुख खानने पटकावला आणि इथूनच यश चोप्रा-शाहरुख खान हे नवे कॉम्बिनेशन जन्मले. आमीर खानची चूक त्याच्यासाठी एक नवा प्रतिस्पर्धी निर्माण करून गेली. प्रत्येक सीनचा किस पाडणारा आमीर खान आणि कथा काय आहे, हेही न विचारणा शाहरुख खान या दोघांच्यात यश चोप्राने शाहरुख खानची निवड केली. शाहरुख खान सुपरस्टार झाला १९९२ मध्ये प्रदर्शित दीवाना या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. बाजीगर, डर या चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका त्याने साकारल्या.

    १९९५ सालच्या आदित्य चोप्रा दिग्दर्शित दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ह्या चित्रपटामध्ये प्रणय नायकाची भूमिका करून आपली पडद्यावरील प्रतिमा बदलली. त्यानंतर करण जोहर याच्या दिग्दर्शनाखाली कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम या चित्रपटांत त्याने भूमिका केल्या. पडद्यावरची त्याची व काजोलची गाजलेली लोकप्रिय जोडी आहे. शाहरूख खानने ५० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. त्याला १४ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले असून फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार आठ वेळा मिळवणारा तो दिलीप कुमारसह दुसराच अभिनेता आहे.

    २००५ साली त्याला भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. रेड चिलीज एंटरटेन्मेन्ट ह्या कंपनीचा तो सह-मालक आहे. भारतीय प्रिमीयर लीगमधील कोलकाता नाईट रायडर्स ह्या संघाचा देखील तो सह-मालक आहे. मात्र, सुपरस्टार झाला तरीही शाहरुखने टीव्हीबरोबर आपले नाते तोडले नाही. "कौन बनेगा करोडपती?', "क्या, आप पॉंचवी पास से तेज है?', "जोर का झटका- टोटल वाइप आउट' यासारखे "रिऍलिटी शो' तो आतापर्यंत करत आला. २००८ मध्ये न्यूजवीक साप्ताहिकाने शाहरूखला जगातील ५० सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये स्थान दिले तर २०११ मध्ये लॉस एंजेल्स टाइम्स वृत्तपत्राने त्याचा जगातील सर्वात यशस्वी चित्रपट अभिनेता ह्या शब्दांत गौरव केला. आज त्याची जी ‘रोमँटिक हिरो’ म्हणून ओळख आहे, त्यामागे त्याची अफाट मेहनत आहे ‘बादशहा‘ चित्रपटानंतर बॉलिवडूचा बादशहा म्हणून, तर कधी किंग खानला संबोधले जाते. भारताबरोबरच विदेशातही शाहरुखच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 11, 2017