(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ज्येष्ठ गायक, अभिनेते रामदास कामत

    ‘मत्स्यगंधा’ नाटकातील ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’ हे कामत यांचे ध्वनिमुद्रित झालेले पहिले गाणे. त्यांनी गायलेली ‘आकाशी फुलला चांदण्यांचा मळा’, ‘देवा तुझा मी सोनार’, ‘निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे’, ‘पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव’, ‘वाटे भल्या पहाटे यावे’, ‘हे आदिमा हे अंतिमा’, ‘विनायका हो सिद्ध गणेशा’, ‘हे गणनायक सिद्धिविनायक’, ‘हे शिवशंकर गिरिजा तनया’ आदी भावगीते, चित्रपट गीतेही लोकप्रिय आहेत. तसेच रावणकृत शिवतांडव स्तोत्र हे रामदास कामत यांनी खड्या आवाजात गायलेले आहे.

      January 10, 2022


  • डॉ.केशव बळिराम हेडगेवार (राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक)

    डॉ. हेडगेवार यांनी तरुणपणात सशस्त्र क्रांतीत सहभाग घेतलेला. शाळेत असताना त्यांनी – व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाला ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वाटण्यात आलेली मिठाई रागाने फेकून दिली होती. तसेच पुढे ‘वंदे मातरम्‌’ चा घोष केल्याबद्दल त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते.

      June 9, 2022


  • नामदेव लक्ष्मण ढसाळ

      December 15, 2010


  • बाळशास्त्री जांभेकर

    बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतले आद्य पत्रकार होते. त्यांनी दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र जानेवारी ६, १८३२ रोजी सुरू केले. त्यांचा जन्म राजापूर तालुक्यातील पोंभुर्ले गांवी झाला होता. इंग्रजी राजवटीविरुद्ध जनजागृती करण्यासाठी वृत्तपत्रासारखे दुसरे महत्त्वाचे साधन नाही हे त्यांच्या लक्षात आले होते.

      December 15, 2010


  • दक्षिणेचे सुपरस्टार कमल हासन

    दक्षिणेचे सुपरस्टार म्हणून प्रसिद्ध असलेले कमल हासन यांनी वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी `कलतूर कन्नम्मा’ या तमिळ भाषेतील चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली होती. बॉलिवूडमध्ये त्यांनी ‘एक दुजे के लिए’ या सिनेमाद्वारे पदार्पण केले होते. कमल हासन यांनी १९० चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.

      March 19, 2019


  • डॉ. सुहासिनी कोरटकर

    भेंडीबाजार घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गानगुरू, बंदिशकार आणि विचारवंत डॉ. सुहासिनी कोरटकर यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९४४ रोजी झाला.

    डॉ. सुहासिनी कोरटकर यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण खरे म्हणजे अर्थशास्त्र हा स्वतंत्र विषय घेऊन झाले. मात्र पुढे त्यांनी पीएच.डी. केली ती मात्र संगीत विषयात. लहानपणापासूनच त्यांना असेही संगीताचे धडे मिळाले होतेच. त्यांच्या आई सरलाताई यादेखील शास्त्रीय गायिका होत्या आणि सुहासिनीताईंच्या संगीत शिक्षणाबाबत अत्यंत काटेकोर आणि शिस्तप्रिय असत. पं. त्र्यंबकराव जानोरीकर, श्रीमती नैना देवी हे त्यांचे गुरू होत. भेंडीबाजार घराण्याच्या गायकीबाबतचे पहिले श्रेय त्या आपल्या वडिलांना देत असत. वडिलांनी जर योग्यवेळी आपला संगीत शिक्षक बदलला नसता तर कदाचित या घराण्याच्या सुंदर गायकीला आपण कायमचे मुकलो असतो, असे त्या म्हणत.

    बंदिशींचे सुरेख सादरीकरण, लयीत गुंफलेली सरगम आणि ताना हे सुहासिनीताईंच्या गायकीचे वैशिष्टय़ होते. शास्त्रीय संगीताशिवाय ठुमरी, दादरा, नाट्यसंगीत, अभंग आदी प्रकारदेखील त्यांनी हाताळले. दिल्ली आकाशवाणी केंद्राच्या ‘केंद्र संचालिका’ तसेच ‘कार्यक्रम संचालिका’ (संगीत) या पदांवरही त्यांनी काम केले. आकाशवाणीच्या अ. भा. गंधर्व महाविद्यालयाची ‘संगीताचार्य’ या सर्वोच्च पदवीने त्यांना गौरविण्यात आले होते. त्याशिवाय सूर-सिंगार संसद या संस्थेचा सुरमणी पुरस्कार, गानवर्धन, पुणेतर्फे स्वर-लय भूषण पुरस्कार, संगीत शिरोमणी पुरस्कार, संगीत मर्मज्ञ पुरस्कार अशा अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरविले गेले होते. आपले गुरू पं. जानोरीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांनी युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार सुरू केला होता. ‘निगुनी’ या टोपणनावाने त्यांनी केलेली उत्तमोत्तम बंदिशींची रचना हे तर त्यांचे कार्य खरोखर अलौकिक होते आणि संगीत इतिहासात त्याची कायमची नोंद राहील. रसाळ निवेदनासह विषयाची प्रात्यक्षिकासह साकल्याने मांडणी हे त्यांच्या कार्यक्रमांचे वैशिष्टय़ होते.

    कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या हिंदूी-मराठी गीतांवर आधारित ‘दिल चाहे सो गाओ’, उपशास्त्रीय संगीताची ओळख करून देणारा ‘ठुमरी ते कजरी’, स्वरचित बंदिशींवर आधारित ‘शब्द-स्वरांचे लेणे’, विविध ऋतूंमधील रागांवर आणि गीतांवर आधारित ‘ऋतुरंग’, शास्त्रीय संगीताचे सौंदर्य उलगडणारा ‘ख्याल गायनाचा रसास्वाद’ ही काही उदाहरणे. मराठी, हिंदूी आणि इंग्रजी अशा तीनही भाषांतून त्यांचे अनेक अभ्यासपूर्ण लेख प्रकाशित झाले आहेत. डॉ. सुहासिनी कोरटकर यांचे ७ नोव्हेंबर २०१७ रोजी निधन झाले.

    डॉ. सुहासिनी कोरटकर यांची वेबसाईट
    http://www.suhasinikoratkar.com/#!/page_Home

    डॉ. सुहासिनी कोरटकर यांचे गायन
    https://www.youtube.com/watch?v=AcgChcpfeEk
    https://www.youtube.com/watch?v=PGvytWN-eMs

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 11, 2019


  • किरण नगरकर

    किरण नगरकर

    भारतातील हाताच्या बोटांवर मोजता येणार्‍या द्विभाषिक लेखकांमध्ये व नामांकित कादंबरीकारांमध्ये किरण नगरकर ह्यांचे नाव प्राधान्याने घेण्यात येते. मुंबई या महानगरीतील कनिष्ठ वर्गीयांचे खुमासदार आणि अंतर्मुख करणारे वर्णन वाचकांसमोर उलगडणारी, नगरकरांची १९९४ साली प्रकाशित झालेली ‘रावण अँड एडी’ ही कादंबरी बहुचर्चित ठरली.

      July 26, 2017


  • शाहीर कृष्णा गणपत साबळे

    "जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा" अशी गर्जना करून शाहीरी परंपरा अगदी अलिकडच्या काळापर्यंत जपून ठेवणारे शाहीर म्हणजे शाहीर कृष्णा गणपत साबळे यांचा जन्म ३ सप्टेंबर १९२३ रोजी झाला. तिसऱ्या इयत्तेत असताना शाहीर अमळनेरला गेले. तेथे गेल्यावर आपल्याला चांगला आवाज आहे, हे त्यांच्या ध्यानात आले आणि त्यांची आवड आजीच्या कानावर गेल्यानंतर पुढे आणखी काही व्याप होऊ नये, म्हणून आजीने त्यांना पुन्हा पसरणीला आणून सोडले. त्यामुळे त्यांना सातवीची परीक्षाही देता आली नाही. अमळनेरला असताना हिराबाई बडोदेकर यांनी त्यांचे गाणे योगायोगाने ऐकले होते व त्यांच्या आवाजाचे कौतुक केले होते. अमळनेरला असताना साने गुरुजींचा सहवास शाहिरांना लाभला. पुढे मोठेपणीही चळवळीत गुरुजींचा आशीर्वाद मिळाला. त्यांच्या अनेक सामाजिक कार्यात शाहिरांना सक्रिय सहभाग घेतला. लहान वयात लोककलांचा आणि लोकगीतांचा संस्कार त्यांच्यावर झाला होता आणि मुंबईला आल्यावर या लोककलेचे नेटके रूप विशिष्ट संहितेसह समाजासमोर आणायचे, असा विचार शाहिरांनी केला आणि महाराष्ट्राची लोकधारा या लोककलेच्या देखण्या रूपाचा जन्म झाला.

    महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अनेक ठिकाणी चक्कक मॉरिशसलादेखील मराठी माणसासमोर आपल्या महाराष्ट्राची परंपरा दाखविता आली. समाजाची दुखणी, व्यथा व सत्यस्थिती याचा अभ्यास करून शाहिरांनी अनेक प्रहसने लिहिली. नाटक व लोकनाट्य याचा योग्य समन्वय साधून त्यांनी अनेक मुक्तननाट्य लिहिली. आबुरावाचं लगीन, बापाचा बाप, ग्यानबाची मेख, आंधळं दळतंय अशी अनेक मुक्तुनाट्ये त्यांनी लिहिली आणि समर्थपणे सादरही केली. शाहिरांनी जशी मुक्त नाट्य लिहिली, तसेच अनेक पोवाडेही लिहिले. शाहिरी कलावंतांच्या व्यथा पाहून त्यांना शासनाच्या वतीने सहकार्य मिळवून देण्याचा त्यांनी निश्चीय केला व शासनाच्या वतीने सर्वच ज्येष्ठ लोककलावंतांना अनेक सवलती मिळवून दिल्या.

    लोककलावंतांना मानधन मिळवून देण्यात त्यांचा सहभाग हा निश्चिनतच महत्त्वाचा आहे. शाहीर साबळे म्हटले, की सर्वांत प्रथम लक्षात येते ते त्यांचे महाराष्ट्र गीत व नंतर त्यांनी लोकप्रिय केलेली लोकगीते, भारुडे. शाहिरांना त्यांच्या कार्याबद्दल अनेक मानसन्मान व पुरस्कार मिळाले. पहिला शाहीर अमर शेख पुरस्कार त्यांना देण्यात आला. याशिवाय संत नामदेव पुरस्कार, पुणे मनपाचा शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांचा गौरव केला. पद्मश्री मिळवणारे पहिले शाहीर, अ. भा. मराठी शाहिरी परिषदेच्या अध्यक्षपदाबरोबरच अ. भा. मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणारे एकमेव शाहीर असे अनेक बहुमान साबळे यांच्या नावावर आहेत. सरकारचा पहिला शाहीर अमर शेख पुरस्कार व संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

    "जय जय महाराष्ट्र माझा‘प्रमाणेच "हरे कृष्णा हरे कान्हा‘, "दादला नको ग बाई‘, "आठशे खिडक्याज नऊशे दारं‘, "विंचू चावला‘, "या विठूचा‘, "आज पेटली उत्तर सीमा‘, "पयलं नमन‘, "बिकट वाट वहिवाट नसावी‘ आणि "मल्हार वारी मोतीयाने द्यावी भरून‘ आदी त्यांच्या आवाजातील विविध प्रकारची गाणी तुफान लोकप्रिय झाली. "माझा पवाडा‘ हे त्यांचे आत्मचरित्र २००७ मध्ये प्रसिद्ध झाले. शाहीर साबळे यांचे २० मार्च २०१५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      September 3, 2017


  • द्वारकानाथ माधव पितळे (नाथमाधव)

    जन्म-एप्रिल ३, १८८२
    मृत्यू- जून २१, १९२८

    नाथमाधव हे मराठी लेखक होते. केवळ ४६ वर्षाच्या आयुष्यातील मोठा काळ त्यांनी शिवरायांवरील संशोधनात घालवला. ऐतिहासीक साहित्या बरोबरच आपल्या लिखाणातून त्यांनी नेहेमीच बालविवाहातून निर्माण होणार्‍या समस्या वाचकांपुढे मांडल्या. ते स्त्री शिक्षणाचे व पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते होते.

      December 15, 2010


  • कादंबरीकार सुरेश जनार्दन द्वादशीवार

    सुरेश जनार्दन द्वादशीवार यांनी १७ वर्षं विदर्भ साहित्य संघाचं अध्यक्षपद भूषवलं होतं. तसंच त्यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य मंडळांचं आणि साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं होतं.

      March 3, 2025