जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
फडके १९४० सालातल्या रत्नागिरीस भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
December 15, 2010
आज १२ सप्टेंबर....शंकर जयकिशन या संगीतकार जोडीतील जयकिशन यांची पुण्यतिथी
जयकिशन यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९२९ रोजी झाला. जयकिशन यांचे पूर्ण नाव जयकिशन दयाभाई पांचाल होते.
जयकिशन यांचे हार्मोनियम वरती उत्तम प्रभुत्व होते. त्यांच्या या छंदाला नवीन आकार देण्याच्या वेडापोटी ते मुंबई सारख्या मायानगरी मध्ये आले. शंकर (पूर्ण नाव शंकरसिंह रघुवंशी) यांनी जयकिशन यांनाही पृथ्वी थिएटरमध्ये बोलावून हार्मोनिअम वाजवायचे काम मिळवून दिले. त्यांच्या सोबतच पृथ्वी थिएटरमध्ये एक गोरा देखणा तरूण आपल्या निळ्या डोळ्यांत नव्या चित्रपटाची स्वप्ने घेवून फिरत होता. त्याने आग नावाने पहिला चित्रपट काढला. त्या चित्रपटाला संगीत देणार्याखला राम गांगुली यांना सहाय्यक म्हणून शंकर काम करत होते.
दुसर्या चित्रपटाच्यावेळी त्या तरूणाच्या लक्षात आल्या की जुन्या लोकांशी आपले जमणार नाही. समवयस्क शंकरसोबत त्याच्या काळजाच्या तारा जुळल्या.शंकरने जयकिशनला सोबत घेण्याचा आग्रह धरला. त्याचे नाव राज कपुर. पृथ्वी थिएटर ची निर्मिती "बरसात" या चित्रपटासाठी राज कपूर हे संगीतकार म्हणून नवीन जोडीच्या शोधात होते त्यांनी शंकर आणि जयकिशन यांच्यावर ती जबाबदारी सोपवली. आणि १९४८ साली प्रदर्शित झालेल्या "बरसात" ची गाणी सुपरहिट झाली आणि इथून पुढे शैलेंद्र, हसरत जयपुरी, लता मंगेशकर, मुकेश आणि शंकर - जयकिशन यांनी भारतीय संगीत क्षेत्रात एक इतिहास घडवला. हे दोघेही काही काळ त्याकाळचे प्रसिद्ध संगीतकार हुस्नलाल- भगतराम यांच्या हाताखाली सहायक म्हणून काम करत होते.
शंकर - जयकिशन या जोडीने जवळजवळ १७० हून जास्त चित्रपटांना संगीतसाज चढवला. ज्यामध्ये विशेष संगीतामुळे गाजलेले बादल, सीमा, बसंत बहार, चोरी - चोरी, कठपुतली, यहुदी, अनाडी, छोटी बहन, दिल अपना और प्रीत पराई, जिस देश मे गंगा बहती है, जंगली, प्रोफेसर, दिल अपना और प्रीत पराई, हमराही, राजकुमार, आम्रपाली, सुरज, तिसरी कसम, मेरा नाम जोकर, असली नकली इत्यादी चित्रपटाचा समावेश होतो. त्यांना चोरी - चोरी , अनाडी, दिल अपना और प्रीत पराई, प्रोफेसर, सुरज, ब्रम्हचारी, मेरा नाम जोकर, पहचान, आणि बेईमान या चित्रपटासाठी एकूण नऊ वेळा सर्वश्रेष्ठ संगीतकार म्हणून फिल्मफ़ेअर पुरस्कार मिळाला आहे. शंकर जयकिशनचे नाव काढले की पहिल्यांदा राज कपुरच डोळ्यांसमोर येतो व मुकेशचा आवाज आपल्या कानात घुमायला लागतो.
'शंकर-जयकिशन' यांनी गोपनीयता म्हणून कुठल्याही गीताची चाल वैयक्तिक कुणी बांधली ते कुणालाही सांगायचे नाही असा एक अलिखित नियम पाळला होता. मात्र संगम चित्रपटातील एक गीत "ये मेरा प्रेमपत्र पढकर तुम नाराज न होना!" हे बिनाका गीतमाला या नभोवाणीवरील एका कार्यक्रमामध्ये खूप दिवस प्रथम क्रमांकावर वाजू लागले आणि जयकिशन यांनी हे गीत मी रचले असे सांगून तो नियम मोडला. मो. रफी आणि राज कपूर यांनी त्यांच्यातील मतभेद मिटवून त्यांच्यामध्ये समन्वय निर्माण केला.
'शंकर-जयकिशन' या संगीतकार जोडीतील संगीतकार ... संगीत दोघांच्याही रक्तात वहात होते. पुढे ही मैत्री इतकी घट्ट झाली की जयकिशन यांच्या अकाली जाण्यानंतरही १६ वर्षे एकट्या शंकर यांनी चित्रपटांना संगीत दिले पण नाव मात्र ‘शंकर जयकिशन’ असेच ठेवले होते. तसा त्या दोघांत करारच झाला होता असं म्हणतात. गुजरात मध्ये त्यांच्या जन्मगावी त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.
कल खेल मे हम हो ना हो
गर्दीश मे तारे रहेंगे सदा
भूलोंगे तूम भूलेंगे वो
पर हम तूम्हारे रहेंगे सदा
रहेंगे यहा अपने निशा
इसके सिवा जाना कहा
जयकिशन यांच्याही ओठांवर मृत्यूसमयी हीच ओळ असेल.
जयकिशन १२ सप्टेंबर १९७१ रोजी निधन झाले.
शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली काही गीते.
बहारो फुल बरसाओ मेरा मेहबूब आया है (सूरज)
आजा सनम मधुर चांदनी ( चोरी चोरी)
जाऊ कहा बताए दिल ( छोटी बहन)
तेरी प्यारी प्यारी सुरत को किसी कि नजर न लगे ( ससुराल)
दिलके झरोखे मे तुझको बिठाकर (ब्रह्मचारी)
जिंदगी एक सफर है सुहाना ( अंदाज)
जाने कहा गये वो दिन (मेरा नाम जोकर)
तेरा जाना दिल के अरमानोंका लुट जाना (अनाडी)
किसी कि मुस्कुराहटो पे हो निसार (अनाडी)
हम तेरे प्यार मे सारा आलम (दिल एक मंदिर)
जिना यहां मरना यहां इसके सिवा जाना कहां (मेरा नाम जोकर)
संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
September 12, 2016
सिनेसृष्टीतील ‘हॅप्पी गो लकी’ अभिनेता म्हणजे पुष्कर श्रोत्री. सिनेमा असो, नाटक, मालिका किंवा सूत्रसंचालन ह्या सर्व आघाड्या तो लिलया पार पाडतो. विनोदी अभिनेता म्हणून तो प्रसिध्द आहे. पुष्कर श्रोत्रीने आजवर पंचवीस हून अधिक मराठी व हिंदी चित्रपटात काम केले आहे. मुख्यत्वे विनोदी भूमिकांसाठी तो ओळखला जातो. हापूस, एक डाव धोबीपछाड, झेंडा, मोरया, अ पेइंग घोस्ट, कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील त्याचा अभिनय रसिकांना वाखाणला आहे. रेगे या चित्रपटातून त्याने रंगवलेला इन्स्पेक्टर त्याच्या अभिनयाची दुसरी गंभीर बाजूही दाखवून जातो. ह्या भूमिकेसाठी त्याला महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? चा सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कारही प्राप्त झाला आहे. हिंदीमधील मुन्नाभाई एम.बी.बी.एस. आणि लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटातील त्याचे प्राध्यापक डॉक्टरचे पात्रही रसिकांच्या आजही लक्षात आहे.
पुष्कर श्रोत्री याने दिलीप प्रभावळकर यांनी गाजवलेले ‘हसवाफसवी’ या नाटकाचे प्रयोग पण गाजवले आहेत. त्यातील त्याच्या सहा वेगवेगळ्या भूमिका एकदम अप्रतिंम आहेत. मराठी चित्रपटसृष्टीचा कोणताही पारितोषिक वितरण सोहळा असो किंवा कॉमेडी शो, सध्या एक मराठी कलावंताने सर्वदूर हे क्षेत्र व्यापले आहे. तो म्हणजे पुष्कर श्रोत्री. पुष्कर श्रोत्री याने आजपर्यंत अनेक महत्वाच्या मनोरंजनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे. टी,व्ही वरील फू बाई फू , स्मार्ट सूनबाई हे त्याचे कार्यक्रम विशेष लोकप्रिय झाले होते. ‘दामिनी’, ‘बंदिनी’, ‘सावज’, ‘भूल’, ‘सांजसावल्या’, ‘अवंतिका’, ‘वादळवाट’, ‘अभिलाषा’, ‘दौलत’, ‘अर्धांगिनी’, ‘व्हील स्मार्ट सुनबाई’, ‘टिकल ते पोलीटिकल’, आदि मालिका पण त्याच्या अभिनयाचं विशेष कौतुक झाले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
May 2, 2017
जन्म - १२ ऑगस्ट १८८०
१८८०> “दादासाहेब खापर्डे यांचे चरित्र” लिहिणारे दादासाहेबांचे पुत्र, बाळकृष्ण गणेश खापर्डे यांचा जन्म, “साहित्याची प्रेरणा, पद्धती आणि ध्येय” हे पुस्तकही त्यांनी लिहिले होते.
mss
August 2, 2017
बाबूरावांचे मुंबईतील गिरगावात चष्म्याचे दुकान होते. सुरुवातीला तेथे बसून बाबूराव रहस्यकथा लिहीत. दुकानात चष्मा खरेदी करण्याऐवजी लोक रहस्यकथा लेखक बाबूरावांना पहायला येत. बाबूराव जेपी (जस्टिस ऑफ पीस) होते; ते स्वातंत्र्य सैनिकांच्या संघटनेचेही काम करीत. त्यामुळे त्यांना खूप फोन येत, याचा आणि बाहेरील वर्दळीचा त्रास होऊ लागल्याने ते अनेकदा एखाद्या गुप्त ठिकाणी जाऊन लेखन करीत.
June 9, 2021
December 15, 2010
पं. डी. के. दातार यांच्या आधी १०० वर्षांची व्हयोलिनवादनाची परंपरा असलेल्या कर्नाटक संगीतात गायकी अंगाने व्हायोलिन वाजवण्याची पद्धत होती. परंतु हिंदुस्थानी संगीतात ती रुजली नव्हती. ती रुजवण्याचे मोठे काम पं. दातार यांनी केले.
October 14, 2021
भावपूर्ण आणि लाघवी चेहरा, बोलके डोळे, उंच तसंच शिडशिडीत बांधा असंच काहीसं वर्णन इंदूमती पैंगिणकर यांच्या व्यक्तिमत्वाचं करता येईल. अभिनयासोबतच लेखिका म्हणून त्यांनी मिळवलेली ओळख ही सुद्धा त्यांचा महत्वाचा पैलू असल्याचं सांगते.
March 28, 2013
१९८३ साली अच्युत पालव यांनी उल्का शिष्यवृत्तीसाठी मोडी लिपीचा पंधराव्या ते सतराव्या शतकांतील इतिहास, तसेच मोडी लिपीची विविध वळणे व अक्षररुपे यांवर कलात्मक दृष्ट्या संशोधन करुन प्रबंध लिहिला. मोडी व आजची देवनागरी यांच्या दृश्य समन्वयातून ‘धृतनागरी’ तयार केली. तिला ‘मुक्त लिपी’ असे नाव दिले. या लिपीचा त्यांनी सुलेखनातून कलात्मक आविष्कार घडवून ह्या प्रयोगाची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख करुन दिली.
June 17, 2022
चारुदत्त सरपोतदार हे पुण्याच्या सांस्कृतिक जीवनातलं एक बहुआयामी आणि उत्साही व्यक्तिमत्त्व होते. गेली सुमारे सत्तरहून अधीक वर्षे ‘पूना गेस्ट हाउस’च्या माध्यमातून कलावंतांपासून सर्वसामान्य पुणेकर खवय्यांचे चोचले पुरविणारे चारुदत्त सरपोतदार हे शेवटपर्यत पुण्याच्या सार्वजनिक जीवनात कार्यरत होते.
January 22, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti