जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
अद्वितीय प्रतिभा व शब्दप्रभुत्वाच्या साहाय्याने ‘गीतरामायणा’सारखा दर्जेदार नजराणा महाराष्ट्राला पेश करणारे व आजही मराठी रसिकांच्या मनांत अढळ स्थान असलेले श्रेष्ठ कवी!
August 25, 2009
इटावामध्ये करीमुद्दीन आसिफ उर्फ के. आसिफ यांचे वडील फाजल करीम हे डॉक्टर होते. त्यांचा जन्म १४ जून १९२२ रोजी झाला.चित्रपट क्षेत्रात करिअर करण्यासाठी के. असीफ नंतर मुंबईला गेले. तेथे त्यांनी फेमस फिल्म लॅब येथे नोकरी केली. त्यांच्या मनात चित्रपट काढण्याचे खूळ होते. या संस्थेचे मालक सिराज अली हकीम यांनी त्यांच्या गोष्टी ऐकून त्यास भांडवल द्यायचे कबूल केले. त्या वर त्यांनी फूल नावाचा एक चित्रपट काढला व त्या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला. त्यानंतर त्याने आपले नाव के. आसिफ असे केले. त्याच्या वाचण्यात मुगल-ए-आझम नावाचे नाटक आले.
मुघल-ए-आझम’ या चित्रपटाचा इतिहास.
‘‘१९२२ साली इम्तियाझ अली ताज या लेखकाने लिहिलेलं ‘अनारकली’ हे नाटक लाहोरमध्ये सादर झालं. के. आसिफ यांनी ते पाहिलं आणि त्यानं ते एवढे भारावले, की यावर आपण सिनेमा बनवायचाच, या ध्यासानं त्यांना पछाडलं. पण मनात आलं म्हणून सिनेमा बनवता येत नाही. त्यासाठी अनेक गोष्टी जुळून याव्या लागतात. १९४० मध्ये के. आसिफ यांचं हे स्वप्न सत्यात येईल अशी आशा निर्माण झाली. निर्माते शिराझ अली यांच्या साथीने त्यांनी या चित्रपटाचं काम सुरू केलं. मात्र, बॉम्बे टॉकिजमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू व्हायला प्रत्यक्षात १९४६ साल उजाडलं. चंद्रमोहन (अकबर), डी. के. सप्रू (सलीम) आणि नर्गिस (अनारकली) हे त्यात प्रमुख भूमिकेत होते. चित्रपट काहीसा मार्गी लागत असतानाच १९४७ साली भारत-पाकिस्तान फाळणी झाली आणि चित्रपटाचं काम थंडावलं. शिराझ अली पाकिस्तानला निघून गेले. त्यांनी के. आसिफ यांना सुचवलं, की तुम्ही उद्योगपती शापूरजी पालनजी यांना भेटा, ते या सिनेमाला फायनान्स करतील. खरं तर शापूरजी पालनजींचा सिनेसृष्टीशी काहीच संबंध नव्हता. परंतु तरीही त्यांनी चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी स्वीकारली याचं कारण- त्यांचं इराणी कनेक्शन आणि अकबरबद्दल त्यांना वाटणारी आपुलकी. म्हणून त्यांनी अट घातली की, चित्रपटाचं नाव ‘मुघल-ए-आझम’ ठेवायचं. खरं तर ही सलीम-अनारकली यांची प्रेमकहाणी; परंतु निर्मात्यांच्या आग्रहाखातर सिनेमाचं नाव ठेवलं गेलं- ‘मुघल-ए-आझम’!’’ ‘‘पण अडचणी इथंच संपल्या नाहीत. सिनेमातील कलाकार चंद्रमोहन यांचं दरम्यान निधन झालं. त्यामुळे हा चित्रपट डबाबंद करावा लागला. आणि पुन्हा नव्यानं दिलीपकुमार, मधुबाला, पृथ्वीराज कपूर, दुर्गा खोटे आदी कलाकार घेऊन चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं. या सिनेमाच्या निर्मितीवर तेव्हा सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च झाले. प्यार किया तो डरना क्या या एकाच गाण्यासाठी त्यांनी ३५ लाख रूपयांचा सेट उभारला. या एका गाण्यावरच झालेल्या खर्चात तेव्हा एक सिनेमा निघाला असता असं म्हटलं जातं. वेगवेगळ्या कारणास्तव हाही सिनेमा बरीच वर्षे रखडला. चित्रपटाच्या निर्मितीखर्चानं निर्माते मेटाकुटीस आले. पण के. आसिफना आपल्या भव्य-दिव्य स्वप्नापुढे कशाची तमा नव्हती. शेवटी एकदाचा चित्रपट तयार झाला. प्रदर्शितही झाला. पुढचा इतिहास सर्वानाच ज्ञात आहे. मुंबईत ५ ऑगस्ट १९६० रोजी मराठा मंदिर चित्रपटगृहात तो झळकताना अॅ डव्हान्स बुकिंगसाठीच्या प्रचंड धक्काबुक्कीत एकावर चाकूने हल्ला झाल्याचा किस्सा आजही रंगवून सांगितला जातो. फर्स्ट डे फर्स्ट शोसाठी तर हत्तीवरून वाजत-गाजत प्रिंट आणत. मुळचा हा कृष्णधवल चित्रपट (अपवाद फक्त प्यार किया तो डरना क्याफ गाण्याचा) २००३ च्या दिवाळीत रंगीत स्वरूपात दिवाळीच्या दिवशी प्रदर्शित करतानाही इरॉस चित्रपटगृहात त्याची प्रिंट अशीच हत्तीवरून आणली होती. मराठा मंदिरला सलग तीन वर्षे तो हाऊसफुल्ल गर्दी खेचत होता. ‘शोले’ येई तो ‘मुघल-ए-आझम’चा हा विक्रम अबाधित राहिला. त्याकाळी एकाच वेळी देशातल्या १५० चित्रपटगृहांत हा सिनेमा प्रदर्शित केला गेला. हाही तेव्हाचा विक्रम होता. उत्पन्नाचे नवे मापदंड ‘मुघल-ए-आझम’ ने निर्माण केले. हा चित्रपट पूर्ण झाला व एक अजरामर कलाकृती निर्माण झाली. मा.के. आसिफ यांच्या मा.सितारादेवी या पत्नी. मा.के.आसिफ यांचे ९ मार्च १९७१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
के.आसिफ यांचा मुघल-ए- आझम चित्रपट.
https://www.youtube.com/watch?v=WLKUdiTCrkg.
March 9, 2017
आज २९ सप्टेंबर. बॉलीवुडचा विनोदाचा बादशहा मेहमूद यांची जयंती. मेहमूद यांचा जन्म २९ सप्टेंबर १९३२ रोजी झाला.
मुमताज अली हे मेहमूद यांचे वडील मुंबई टॉकीज स्टुडिओमध्ये काम करत असत. मेहमूद अभिनेता बनण्याच्या आधी ड्रायव्हरचेही कामही करत असत मीना कुमारी यांनी त्यांना टेबल टेनिस शिकवण्यासाठी नोकरीला ठेवले होते. तेव्हा त्यांनी मीना कुमारीची बहीण मधू हिच्याशी विवाह केला. विवाह केल्यावर अभिनय करण्यास सुरवात केली. सुरुवातीला "दो बिघा ज़मीन" व "प्यासा" " या चित्रपटात छोटी मोठी कामे केली. पहिला ब्रेक परवरिश या चित्रपटात मिळाला. ज्यात राज कपूर यांचा भाऊ म्हणून रोल केला. मग ते प्यार किए जा, प्यार ही प्यार, ससुराल, लव इन टोक्यो व जिद्दी सारखे हिट चित्रपटात दिसले. यातील काही चित्रपटात हिरो म्हणून रोल केले, परंतु प्रेक्षकांना त्यांना कॉमेडियन म्हणून खूप आवडले. नंतर मेहमूद यांनी त्याच्या स्वत:चे प्रॉडक्शन हाउस चालू केले. प्रॉडक्शन हाउसचा पहिला चित्रपट छोटे नवाब नंतर सस्पेंस-कॉमेडी फिल्म भूत बंगला व साठ च्या दशकातील हिट चित्रपट पड़ोसन. पड़ोसनला अजून ही श्रेष्ठ विनोदी चित्रपट मानले जाते.
मेहमूद यांनी यानंतर अनेक चित्रपटात कामे केली. गुमनाम, प्यार किए जा, बॉम्बे टू गोवा, सबसे बड़ा रूपैया, पत्थर के सनम, अनोखी अदा, नीला आकाश, नील कमल, कुँवारा बाप इ. सिनेमांत हीरो आणि हिरोइनची कमाई खलनायकापेक्षा जास्त असते, परंतु त्याकाळी महमूद हीरोपेक्षा काही पटीने ज्यास्त पैसे घेत होते. 'सु्ंदर' सिनेमात महमूद यांच्यासोबत विश्वजीत यांनी काम केले होते. या सिनेमात हीरो म्हणून काम करण्यासाठी विश्वजीत यांना दोन लाख रुपये तर महमूद यांना आठ लाख रुपये मानधन मिळाले होते. असेच 'हमजोली' सिनेमासाठीसुध्दा घडले होते. या सिनेमातील नायक जितेंद्र होते, परंतु महमूद यांना त्यांच्यापेक्षा जास्त पैसे मिळाले होते.
हास्य अभिनेता, विनोदवीर, विनोदाचा बादशहा अशी अनेक विशेषणे असलेला मेहमूद हे अभिनेता म्हणूनही प्रसिद्ध होते. मात्र त्यांच्या अनेक सिनेमांमध्ये त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना रडण्यासुध्दा भाग पाडले. 'कुंवारा बाप', 'लाखो में एक जैसा'सारख्या सिनेमे याचे मोठे उदाहरण आहेत. या दोन्ही सिनेमामध्ये महमूद यांनी मुख्य अभिनेता म्हणून काम केले. 'कुंवारा बाप' ही महमूद यांच्या ख-या आयुष्यावर आधारित सिनेमा होता. त्यांचा मुलगा मकदूम अलीला पोलियो झाला होता. महमूद यांनी त्याला ठिक करण्यासाठी लाख प्रयत्न केले मात्र होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांनी आपले दु:ख सिनेमाव्दारे मांडण्याचा प्रयत्न केला होता.
आई एस जौहर व मेहमूद यांची जोडी खास मानली जाते. या दोघांनी जौहर महमूद इन गोवा व जौहर महमूद इन हाँगकाँग या चित्रपटात जान आणली. मेहमूद यांनी त्याच्या कारकिर्दीत ३०० पेक्षा हिंदी चित्रपटांमधून काम केले.
मेहमूद यांचे २३ जुलै २००४ रोजी निधन झाले. मेहमूद यांना आदरांजली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
September 29, 2016
बाबामहाराज सातारकर यांनी वारकरी कीर्तनाला सैद्धांतिक बैठक प्राप्त करुन दिली. सामाजिक सलोखा, व्यसनमुक्ती, सहकाराची भावना त्यांच्या कीर्तनातून वृद्धिंगत झाली व महाराष्ट्राची सांस्कृतिक एकात्मता टिकविली गेली. याबरोबरच महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे ईतरही अनेक अनोखे पैलू आहेत.
July 11, 2022
संतूर या तंतुवाद्याची ओळख-
शिवकुमार शर्मा यांनी संतूर हे वाद्य जगासमोर आणले. सिनेमा संगीतमध्ये एक काळ असा होता की, या वाद्याशिवाय पार्श्व संगीताला पूर्णत: येऊच शकत नसे. रम्य हिमपर्वत दाखवायचा, तर तिथे संतुर हवेच! लोकसंगीतात वापरल्या जाणार्याा संतुरमध्ये पं. शिवकुमार शर्मांनी आपल्या संगीताच्या गरजेनुसार काही सुधारणा केल्या आणि फार मोठ्या अपेक्षेने हे वाद्य शास्त्रीय संगीताच्या दरबारात आणले. श्रोत्यांनी त्यांना अपेक्षेबाहेर प्रोत्साहन दिले. त्यानंतर शिवकुमारांनी याच वाद्याच्या जोरावर अनेक चित्रपटांनाही संगीत दिले. त्यात ‘सिलसिला’ हा अप्रतिमच! संतुरला एका उंचीवर नेऊन ठेवणार्यार शिवकुमारांनंतर अनेक कलाकारांनी या वाद्याची कास धरून नंतर नाव कमावले आहे. त्यातल्या पं. उल्हास बापट यांचा उल्लेख खास म्हणून करावा लागेल. त्यांनी तर प्रत्येक रागानंतर स्वर जोडणी करायला लागू नये म्हणून हार्मोनियमप्रमाणे क्रोमॅटिक स्केलचे खास संतुर बनविले आहे. म्हणजे काय सांगायचे झाले, तर सा नंतर ओळीने कोमल तीव्र सर्व स्वर जोडून तीन सप्तकांची योजना केली आहे. ही तरी खूप छान सोय झाली.
संतूर हे जम्मू काश्मिरमधले तिथल्या 'सुफीयाना मौसिकी' या लोकसंगीतात वापरले जाणारे एक साधेसुधे वाद्य. स्वरमंडलसारखी रचना असलेले आणि जेमतेम दीड सप्तकांचा आवाका असलेले हे तंतुवाद्य काश्मिरी लोकगीते गाताना साथीला घ्यायची खरे तर तिथली परंपरा होती, स्वर तारांच्या खेचीतून निर्माण होतो हा तंतुवाद्यातला सर्वसामान्य नियम आहे. या नियमाला धरून शेकडो वाद्ये जगभरात उत्पन्न झाली. खरेतर या वाद्यांची गणती करावी लागेल. जितक्या संस्कृती तितकी वाद्ये, असा हा भाग आहे. धनुर्वीणेचे असेच अनंत प्रकार आहेत. हार्प हे आजही वापरले जाणारे याच वर्गातले वाद्य आहे. याचप्रकारच्या वाद्यामध्ये वेगळेपणा दाखविणारे स्वरमंडल हे अत्यंत लोकप्रिय वाद्य आपल्याला नेहमी पहायला मिळते. हे वाद्य विशेष करून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गाणारे गायक/गायिका आपल्या हातात धरून गाताना वाजवीत असतात. शिवाय सिनेमाच्या, मालिकांच्या अथवा नाटकांच्या पार्श्वासंगीतासाठीही याचा उपयोग हमखास केला जातो. या वाद्यात वेगळेपणा आहे, असे म्हटले. याचे कारण हे वाद्य धनुराकृती नसून एका बंद पेटीप्रमाणे याचा आकार असतो.
वरची बाजू मोकळी असते आणि दोनही बाजूंनी तारा खेचणारे खिळे ठोकलेले असतात. ही पेटी मंद्र स्वरांकडे रुंद असते, तर तार स्वरांकडील बाजू निमुळती असते. जास्त रुंदीचा भाग साधारण दीड फूट, तर कमी रुंदीचा भाग नऊ ते दहा इंच असतो. अशाचप्रकारचे कानून नावाचे एक वाद्य इराणी संगीतात वापरले जाते. काही अभ्यासकांच्या मते हे वाद्यच स्वरमंडलाचे प्रेरक वाद्य आहे. तान के कप्तान असा ज्यांचा हिंदुस्थानी संगीतात लौकिक आहे, असे तानरसखाँ यांनी याचा वापर प्रथम आपल्या गायनात केला, असे म्हटले जाते. पतियाळा घराण्याच्या सर्वच कलाकारांनी स्वरमंडल आपल्या गायनासोबतीला खास करून वापरले आहे. बडे गुलाम अलीखाँसाहेब, सलामत नझाकत, मुनव्वर अली यांनी हे वाद्य अधिक लोकप्रिय केले. कालांतराने स्वरमंडल घेऊन गायची एक स्टाईलच निर्माण झाली. अजय पोहनकर, पं. जसराज, निर्मला देवी, परवीन सुलताना आणि अलीकडे उस्ताद राशीद खाँ या सर्वांनी स्वरमंडलाचा जाणीवपूर्वक वापर केला आणि आपल्या स्वरांना एक साज चढविला. या वाद्यामध्ये रागाप्रमाणे स्वर नियुक्त करावे लागतात. शुद्ध स्वर अधिक असणार्या.
रागानंतर कोमल स्वर अधिक असणारा राग गायचा असल्यास स्वरजोडणी करायला थोडा वेळही लागत असतो. तेव्हा श्रोत्यांना थोडी कळ काढावी लागत असते.
संतुर दिसायला असेच पण तंत्रामध्ये सर्वस्वी भिन्न असे संतुर हे वाद्य खूपच लोकप्रिय असे आहे. पं. शिवकुमार शर्मा यांनी या वाद्याला काश्मीरच्या खोर्याेतून हिंदुस्थानी संगीताच्या व्यासपीठावर आणले. तसे पाहता हे वाद्य प्राचीन आहे. अनेक पिढ्यांपासून हे वाद्य काश्मीरमध्ये वाजविले जाते. वैदिक ग्रंथात वनवीणा नावाच्या एका वाद्याचा उल्लेख आहे. त्यात शंभर तारा असत. छोट्या काठ्यांनी तारांवर आघात करून ते वाजविले जात असे. संतुर या वाद्यालाही शततंत्री वीणा असे नाव आहे. एक प्रकारच्या खास काठ्यांनी तारांवर आघात करून यावर स्वरनिर्मिती केली जाते. काठ्यांच्या टोकावर एक बाक असतो, ज्यामुळे स्वराघात नाजूक होतात.
चतुर्भुज आकाराची एक पेटी असणारा या वाद्याचा आकार असतो. वरील भागात दोन दोन मेरूंच्या पंधरा ओळी असतात. एका मेरूवर एकाच स्वरांच्या चार तारा जोडलेल्या असतात. याशिवाय काही संतुरांमध्ये सिंपथेटिक (सहायक ध्वनी) तारांचीही सोय केलेली असते. डलसिमर या इलेक्ट्रॉनिक वाद्याशी याचे साधर्म्य असते.
नंदन हेर्लेकर /पुढारी
संकलन.संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
January 15, 2018
भास्कर काशीनाथ चांदूरकर हे “काव्यशेखर” या टोपण नावाने कविता लिहित असत.
January 4, 2021
एखादा विषय हातात घेऊन, त्यासाठी वर्षानुवर्ष लोकजागृतीचं काम करत राहण्याचा एक काळ केव्हाच भूतकाळात जमा झाला. त्यातही पुन्हा ते काम खिशाला चाट लावून करायचं असेल, तर प्रश्नच मिटला. एकोणीसशे सत्तरच्या दशकात खरं तर असं काम करणारे अनेक गट आणि पुढे ज्यांचा उल्लेख स्वयंसेवी संघटना म्हणून केला जाऊ लागला, असे कार्यकर्त्यांचे समूह पुढे आले होते.
January 4, 2011
सुलोचना चव्हाण या माहेरच्या कदम. हे कुटुंब मूळ कोल्हापूरचे, पण सुलोचना चव्हाण यांचे बालपण ठाकूरद्वारच्या फणसवाडी परिसरात चाळसंस्कृतीत गेले. त्यांचा जन्म १३ मार्च १९३३ झाला.त्यांच्या आईचा व्यवसाय फुलविक्रीचा होता. सुलोचना चव्हाेण या बालपणापासून नियमित असे गाणे शिकल्या नाहीत. त्याघरचा रेडिओ आणि ग्रामोफोन यांवरून जे काही कानावर पडेल ते तन्मयतेने ऐकून गात असत. त्या मुळे त्यांचे कोणी गुरू नाहीत; तसेच कोणी शिष्यही नाहीत. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच त्या गायला लागल्या. त्यावेळेस मुंबईत अनेक मेळे होते. सुलोचना चव्हाण यांच्या घरचाच एक मेळा होता "श्रीकृष्ण बाळमेळा". याच मेळ्यात त्यांच्यासोबत अभिनेत्री संध्या यांनीसुद्धा काम केले होते. या श्रीकृष्ण बाळमेळ्याच्या माध्यमातून सुलोचना चव्हाण यांचे कलाक्षेत्रात पहिले पाऊल पडले. मेळ्यांच्या सोबतीतच त्यांनी हिंदी, गुजराती आणि उर्दू नाटकात बालभूमिका केलेल्या आहेत. त्यांची मोठी बहीण स्वतः कलाक्षेत्रात नव्हती, पण सुलोचना चव्हाणांना नेहमी प्रोत्साहन देत असे. सुलोचनाने उत्तम गावे असे त्यांना वाटत असे. सुलोचना चव्हा्ण या १९४६-४७ पासून हिंदी चित्रपटात पार्श्वगायन करू लागल्या. ‘श्रीकृष्ण बालमेळ्या’मधील रंगभूषाकार दांडेकर हे चित्रपटसृष्टीशी संबंधित होते. सुलोचना चव्हा ण त्यांच्यामुळे संगीत दिग्दर्शक श्यामबाबू भट्टाचार्य पाठक यांच्याकडे पहिले गाणे गायल्या. त्याचवेळी तो चित्रपट हिंदी भाषेतील होता. त्याचे नाव होते ‘कृष्ण सुदामा’. ‘त्या. गाण्याणच्या रेकॉर्डिंगसाठी आपण फ्रॉकमध्ये गेलो होतो’ अशी आठवण मा.सुलोचना चव्हाेण सांगतात. त्याेनंतर त्यांनी मास्टर भगवान यांच्या काही चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. त्यांच्या नैसर्गिक आवाजाने अण्णासाहेब (सी. रामचंद्र), मुश्ताक हुसेन, ज्ञानदत्त, एस. के. पाल, पी. रमाकांत, निसार बझ्मी, प्रेमनाथ, पंडित शामसुंदर यांच्यासारखे संगीतकार प्रभावित झाले. त्यांनी त्यावेळेस ‘सी. रामचंद्र’ यांसोबत ‘जो बिगड गयी वो किस्मत हूँ, नजर से नजर लड गयी, जिगर में छूरी गड गयी, हाय राम’ अशी द्वंद्वगीते गायली. मा.सुलोचना चव्हाण यांना मोहम्मद रफी, मन्ना डे, शमशाद बेगम, गीता दत्त यांच्यासारख्या आघाडीच्या गायकांबरोबर पार्श्वगायनाची संधी मिळाली. त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी गायक मन्ना डे यांच्यासोबत ‘भोजपुरी रामायण’मध्ये गीत गायले. सुलोचना चव्हायण या हिंदीतून मराठी चित्रपटात आल्या त्या ‘ही माझी लक्ष्मी’ या चित्रपटाद्वारे. त्याचचे संगीतकार होते वसंत देसाई. मा.सुलोचना चव्हाणण यांनी त्याा चित्रपटासाठी गायलेली लावणी हंसा वाडकर यांच्यावर चित्रित झाली. माईने १९५३-५४ च्या सुमारास ‘कलगीतुरा’ या चित्रपटासाठी राजा बढे यांनी रचलेल्या काही लावण्या गायल्या. मा.शामराव चव्हाण यांनी त्या चित्रपटाचे दिग्दरर्शन केले होते. पुढे शामराव चव्हाण यांच्यासोबत माईचे लग्न झाले आणि त्याी सुलोचना कदम यांच्या सुलोचना चव्हाण झाल्या. मा.शामराव चव्हाण यांनी सुलोचनाबाईंना शब्दोनच्चाारांचे तसेच कुठल्या शब्दावर जोर द्यायचे त्याचे शिक्षण दिले. दिनकरराव अमेंबल यांनी मा.सुलोचना चव्हाण यांना रेडिओवर गाण्याची संधी दिली. यंग इंडिया, कोलंबिया, ट्वीन, एच.एम.व्ही. या रेकॉर्ड कंपन्यांनी त्यांच्या आवाजात खाजगी ध्वनिमुद्रिका काढल्या. त्या बेगम अख्तरच्या गझला, सुंदराबाईच्या बैठकीच्या लावण्याही त्याच ढंगाने गात असत.
मा.सुलोचना चव्हाचण यांनी मराठी व्यतिरीक्त हिंदी, गुजराती, भोजपुरी, तामिळ, पंजाबी या भाषांमध्ये भजन, गझल असे विविध प्रकार गायले आहेत. मा.सुलोचना चव्हाण यांची गझल गायन ऐकून मा.बेगम अख्तर यांनी त्यांना जवळ घेऊन दिलखुलास दाद दिली होती. ही मा.सुलोचना चव्हााण यांच्या आयुष्यातील ती महत्त्वाची आठवण. मा.सुलोचना चव्हातण यांचे शास्त्रीय गायकीचे शिक्षण झाले नाही हे ऐकून तर बेगम अख्तर यांना मोठे आश्चर्य वाटले होते. मा.सुलोचना चव्हाण यांच्या आवाजाची योग्य दखल फक्त रेडिओ सिलोनने घेतली होती. त्यांची जवळपास पाऊणशे हिंदी गाणी आहेत हे रेडिओ सिलोनमुळे संगीत श्रोत्यांना कळले. पाकिस्तान, बलुचिस्तान, ब्रह्यदेश इतक्या दूरदेशांतून श्रोते तिच्या गाण्यांची फर्माईश देत असतात. मा.सुलोचना चव्हासण यांच्या गायन कारकिर्दीला १९५५ मध्ये अनपेक्षित वळण मिळाले. निर्माता व दिग्दर्शक शामराव चव्हाण यांनी ‘कलगीतुरा’ या तमाशापटाची निर्मिती केली. कथा-पटकथा, संवाद प्रबोधनकार ठाकरे यांचे होते तर संगीत दत्ता कोरगावकर यांचे. मा.सुलोचना चव्हािण यांनी पार्श्वगायन केलेला तो दुसरा मराठी चित्रपट! यातील मा.सुलोचना चव्हाण यांचा ग्रामीण ढंगातील गावरान बाज जनतेला भावला आणि सुलोचना चव्हाण यांची लावणी गायिका म्हणून ओळख निर्माण झाली. रणजीत देसाई यांच्या, तबलजींच्या जीवनावरील कथेवर हरिभाऊ रहातेकरांनी सहकारी तत्त्वावर ‘रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटाची निर्मिती १९६२ मध्ये केली. मा.अरुण सरनाईक त्या चित्रपटाचा नायक होता. सर्वांच्या आवडीचा मालमसाला म्हणून त्या चित्रपटात लावण्या, गझला व नाट्यगीते असे संगीताचे वेगवेगळे प्रकार होते. लावणीत वसंत पवार यांचा हात कुणी धरू शकत नसे. ‘रंगल्या रात्री अशा’मध्ये त्यांनी गीतकार मा.जगदीश खेबुडकर यांना प्रथम संधी देऊन त्यांच्याकडून लावण्या लिहून घेतल्या आणि त्या लावण्यांचे चित्रिकरण राधाबाई बुधगावकर यांच्या तमाशा बारीवर केले. खेबुडकरांनी लिहिलेल्या पहिल्याच लावणीचा मुखडा होता ‘नाव गाव कशाला पुसता? अहो, मी आहे कोल्हापूरची मला हो म्हणतात लवंगी मिरची.’ कोल्हापूरच्या गीतकार व नायकाप्रमाणेच लावणी गायिकाही कोल्हापूरची असावी असा विचार करून वसंतरावांनी ती लावणी मा.सुलोचना चव्हाण यांच्याकडून गाऊन घ्यायची असे ठरवले. वसंतराव सुलोचनाबाईंना त्यांच्या घरी मुंबईला जाऊन भेटले. त्या भेटीचे वर्णन करताना मा.सुलोचना चव्हा ण म्हणतात.
‘‘...मी घरात होते. अचानक दार वाजले, मी दार उघडले, बघते तर बाहेर गबाळ्या कपड्यातील, केस विस्कटलेले एक गृहस्थ उभे! मी म्हणाले, ‘आपण कोण?’ ते म्हणाले, ‘मी वसंत पवार. सुलोचनाबाई तुम्हीच ना? तुमच्याकडून लावणी गाऊन घ्यायची आहे.’ मी थक्कच झाले. साक्षात वसंत पवार, मराठीतील एवढे मोठे नामवंत संगीतकार, माझ्या दारात उभे! त्यांनी खिशातून कागद काढला. त्यांनी घडी घातल्यामुळे पार चुरगाळल्या गेलेल्या त्या कागदावरची लावणी वाचून दाखवली. दुपारच्या भोजनाची वेळ झालेली होती. मी त्यांना ‘जेवणार का?’ म्हणून विचारले. वसंतरावांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. ते सद्गदित आवाजात म्हणाले, ‘लोकांनी आजपर्यंत मला फक्त पिणार का? म्हणून विचारले. तुम्ही प्रेमाने दोन घास खाणार का? असे कुणीच विचारले नाही.’’
‘रंगल्या रात्री अशा’ चित्रपट मुंबईला मॅजेस्टिकमध्ये लागला होता. तबलावादक अल्लारखॉ, नर्तिका मिनू मुमताज, गायक छोटा गंधर्व, पार्श्वगायिका आशा भोसले व सुलोचना चव्हाण यांनी त्यांच्या कलाकौशल्याने बोलपटात अक्षरश: नवरंग उधळले होते. पडद्यावर राधाबाई बुधकरांच्या संगीत बारीचे चित्रण बघताना प्रेक्षक अस्सल तमाशाचा अनुभव घेऊन धुंद होत. गायन-वादन, ताल-सुर, गळा-हात यांचा इतका सुरेख मिलाफ ‘रंगल्या रात्री अशा’पूर्वी क्वचित झाला असेल. कथा-पटकथा लेखक रणजीत देसाई, गीतकार जगदीश खेबुडकर, संगीतकार वसंत पवार व मा.सुलोचना चव्हाण हा यशस्वी फॉर्म्युला अनंत माने यांच्या ‘सवाल माझा ऐका’ या चित्रपटातही होता. त्या चित्रपटाद्वारे माया जाधव यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यातील सुलोचना चव्हाण यांनी गायलेल्या, ‘कसं काय पाटील बरं हाय कां?’ व ‘सोळावं वरीस धोक्याचं गं’ या दोन लावण्यांनी कहर केला. महाराष्ट्रभर त्या लावण्या गाजल्या.
‘सवाल माझा ऐका’चा रौप्य महोत्सव मा.आचार्य अत्रे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या आर्यन टॉकिजमध्ये १० एप्रिल १९६५ रोजी थाटामाटात साजरा झाला. त्याच कार्यक्रमात अत्रे यांनी मा. सुलोचना चव्हाण यांना लावणीसम्राज्ञी हा किताब बहाल केला. मा.राम कर्वे व मा.राम देवताळे यांच्या ‘मल्हारी मार्तंड’ या चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद व दिग्दर्शन दिनकर द. पाटील यांचे होते तर गाणी ग. दि. माडगुळकरांनी लिहिलेली होती. वसंतरावांनी दोन तासांत त्यातील सर्व गाण्यांना चाली लावल्या. ढोलकीची साथ बबन काळे यांनी केली होती. त्यातील सुलोचनाबाईंनी गायलेल्या,
‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा,
आई मला नेसव शालू नवा’
आणि
‘फड सांभाळ तुर्यानला गं आला,
तुझ्या ऊसाला लागंल कोल्हाsss’
या दोन लावण्यांचे ध्वनिमुद्रण राजकमल स्टुडिओत चालू होते. लावण्या इतक्या सुरेख रंगल्या होत्या, की त्या ऐकायला ध्वनिमुद्रक मंगेश देसाई स्वत: जाऊन शांतारामबापूंना घेऊन आले.
सुलोचना चव्हाण यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा २००९ सालचा राम कदम कलागौरव पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा ’मल्हारी मार्तंड’ या चित्रपटाच्या पार्श्वगायनाकरिता १९६५ सालचा पुरस्कार, संगीत क्षेत्रातील विशेष कामगिरीसाठी दिला जाणारा महाराष्ट्र शासनाचा वर्ष २०१०चा "लता मंगेशकर" पुरस्कार.
आपले पती वसंतराव गेल्याचा फार मोठा धक्का मा.सुलोचना चव्हाण यांना बसला होता. त्या काही काळ मुकी झाल्या होती. त्यांनी गाणी गायली नाहीत, पण नंतर मा.सुलोचना चव्हाण यांच्या ‘पाडाला पिकलाय आंबा’, ‘कळीदार कपुरी पानं’ यांसारख्या काही लावण्या गाजल्या. आपल्या समुहातर्फे मा.सुलोचना चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ अरुण पुराणिक
सुलोचना चव्हाण यांचे 'माझं गाणं माझं जगणं' हे आत्मचरित्र आहे. मा.सविता दामले यांनी या आत्मचरित्राचे शब्दांकन केले आहे. सुलोचनाबाईंच्या बालपणापासूनच्या आठवणींनी त्यांच्या कहाणीची सुरुवात होते.
शालेय जीवन, स्टुडीओच्या चकरा, अभिनय, गाण्याचे वेड, जीवनसाथी, विवाहानंतरचे आयुष्य, लावणी, हिंदी गाणी, लोकप्रियता, वाहवा अशा टप्प्यांमधिल प्रवास पुस्तकामधून समोर येतो. त्याचबरोबर तो काळही समोर उलगडतो. त्यांनी गायलेल्या हिंदी आणि मराठी गाण्यांची यादी, चित्रपटाचे नाव, संगीतकारासह अखेरीस दिली आहे.
'माझं गाणं माझं जगणं' पुस्तकाची लिंक.
http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4844125134255777208
सुलोचना चव्हाण यांच्या काही लावण्या
https://www.youtube.com/shared?ci=berGfhq8vN4
https://www.youtube.com/shared?ci=GiwmYJLKDh4
https://www.youtube.com/shared?ci=7ZlN67pYm14
March 15, 2017
मराठी साहित्यातील अनेक साहित्यकृतींना आपल्या चित्रांनी अधिक देखणेपण देणाऱ्या वसंत सरवटे यांचा जन्म ३ फेब्रुवारी १९२७ रोजी झाला. वसंत सरवटे यांचा जन्म कोल्हापूरचा. त्यांचे शालेय आणि सुरुवातीचे महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूरलाच झाले. त्यांना शाळेमध्ये असल्यापासून चित्र काढण्याची आवड होती. हस्तलिखितांमध्ये कविता, कथांसाठी चित्रे काढायला त्यांनी सुरुवात केली आणि त्यातूनच पुढे त्यांची कारकीर्द घडली. पु.ल. देशपांडे, जयवंत दळवी, रमेश मंत्री या लेखकांनी रेखाटलेल्या पात्रांना त्यांनी जिवंत रूप दिले. त्यांचे ‘ठणठणपाळ’ या पात्राचे अर्कचित्र विशेष लोकप्रिय ठरले.
चिं.त्र्यं. खानोलकरांचे अजगर, पुल एक साठवण, बटाट्याची चाळ, सूर्य, शांतता कोर्ट चालू आहे, अशा अनेक पुस्तकांची मुखपृष्ठे सरवटे यांनी रेखाटली आहेत. राणीची बाग हे विंदा करंदीकरांचे बालकवितांचे पुस्तकही त्यांच्या चित्रांनी सजले आहे. वसंत सरवटे यांनी अनेक दिवाळी अंकांची मुखपृष्ठे स्वतःच्या वेगळ्या शैलीतून रेखाटली. या मुखपृष्ठांवर त्यांनी रेखाटलेली चित्रे वाचकांनी समजून घ्यावी, त्या विषयाचा आशय समजून घ्यावा अशी त्यांची अपेक्षा असे. त्यांनी चित्रकलेचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले नव्हते. मात्र छंद म्हणून त्यांनी रेखाटलेली रेखाचित्र आणि व्यंगचित्रांच्या प्रेमात वाचकांपासून लेखकांपर्यंत सर्वच जण पडत. त्यांची चित्र रेखाटण्याची शैली प्रयोगशील होती.
वसंत सरवटे इंजनिअर होते. त्यांनी ए.सी.सी या कंपनीत तीस वर्षांपेक्षा अधिक काळ नोकरी केली. तल्लख आणि मार्मिक कल्पनाशक्ती, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनातील विसंगतीवर भाष्य करणारी विश्लेषक बुद्धिमत्ता आणि रेषेची खास लय यामुळे त्यांची रेखाचित्रे वैशिष्ट्यपूर्ण ठरली. चार दशकांहून अधिक काळ त्यांनी व्यंगचित्रकार म्हणून कारकीर्द गाजवली.
सुरुवातीला त्यांनी काढलेली चित्रे राजारामियन या कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयाच्या वार्षिक अंकात छापली गेली. त्यानंतर महाद्वार या मासिकातही त्यांची चित्रे छापून आली. ‘हंस’ आणि ‘वाङ्मयशोभा’मधून त्यांच्या चित्रांना प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर १९५२पासून मौजमध्ये द्वा. भ. कर्णिक आणि ज्ञानेश्वर नाडकर्णी यांच्या लेखनाला सजावट म्हणून त्यांची रेखाचित्रे वापरण्यात आली. ‘ललित’च्या मुखपृष्ठावरही सरवटे यांची चित्रे छापली होती. सातत्याने पन्नास वर्षे त्यांनी ललितसाठी मुखपृष्ठे रेखाटली. सामान्यांना व्यंगचित्रे, अर्कचित्रे समजावी यासाठी परकी चलन, खडा मारायचा झाला तर, खेळ रेषावतारी, रेषा लेखक, सावधान पुढे वळण आहे, संवाद रेषालेखकाशी, व्यंगकला-चित्रकला, व्यंगचित्र एक संवाद अशी विविध नऊ पुस्तके सरवटे यांनी लिहिली. त्यांनी आपल्या मित्रांविषयीही सहप्रवासी म्हणून एक पुस्तक लिहिले. त्यांनी लेखकांची, प्रकाशकांची अर्कचित्रे काढली. त्यांच्या चित्रांवर अमेरिकन शैलीचा प्रभाव होता. त्यांच्या चित्रांमधून मुंबई, कोल्हापूर ही शहरे मोठ्या प्रमाणात आली आहेत. राजकीय मोर्चे, ध्वनिप्रदूषण, काँक्रिट जंगल, मुंबईची गर्दी असे अनेक विषय त्यांनी या चित्रमालेत रेखाटले. त्यांना बेंगलोरच्या कार्टूनिस्ट कंबाइन संस्थेने जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविले होते. वसंत सरवटे यांचे निधन २६ डिंसेबर २०१६ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 3, 2019
आई - वडील यांच्याकडून आलेला अभिनयाचा वारसा, उपजत अभिनयकौशल्य या बळावर यशवंत दत्त यांनी मराठी नाटक आणि चित्रपट यांत आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला. मराठीनंतर त्याला हिंदीतही चांगली संधी चालून आली होती. नकला हा यशवंत दत्त यांचा स्थायीभाव होता. शाळेत असल्यापासून ते शिक्षकांच्या इतक्यात हुबेहूब नकला करत असत, अर्थात, पुढे नकला करण्याची सवय त्यांच्या कामी आली. "थंडर्स' नावाच्या ऑर्केस्ट्रात ते काम करत असत. निवेदन आणि नकला करून ते प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाले होते. यशवंत दत्त या हरहुन्नरी अभिनेत्याची ती सुरवात होती.
यशवंत दत्त यांच्या आई - वडिलांनी चित्रपटात व नाटकांत कामे केली होती. वडिलांनी तर "गरिबांचे राज्य' या नावाचा चित्रपट काढला होता; पण दुर्दैवाने या चित्रपटात त्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसला. यशवंत दत्त यांना गरिबीचे चटके सोसावे लागले. आपल्याला आलेल्या आर्थिक अपयशामुळे वडिलांचा यशवंत दत्त यांनी नाटक व चित्रपटसृष्टीत जाण्यास विरोध होता; पण अखेर त्यांनी यशवंत दत्त यांना परवानगी दिली आणि मार्गदर्शनही केले. घरच्या गरिबीवर मात करताना यशवंत दत्त यांनी उडप्याच्या हॉटेलात नोकरी केली, पानाच्या गादीवर काम केले, अखेर "फिलिप्स' मध्ये ते कामगार म्हणून रुजू झाले. यशवंत दत्त यांनी आपल्या अभिनयक्षमतेच्या जोरावर या कंपनीला विविध एकांकिका आणि नाट्यस्पर्धांतून विविध प्रकारची बक्षिसे मिळवली. यशवंत दत्त यांच्यामुळे फिलिप्स कंपनीचे नाव कलाक्षेत्रात गाजत होते. राज्य नाट्यस्पर्धेत "अडीच घरं वजिराला' हे नाटक पुणे केंद्रातून निवडले गेले, मग मुंबईच्या नाट्यसंस्थांकडून त्यांना बोलवणी येऊ लागली.
दत्ता भट यांच्यासारख्या नामवंत अभिनेत्याने त्यांना आपल्याबरोबर काम करण्यासाठी बोलावले. "गरिबी हटाव' या नाटकात यशवंत दत्त यांनी चुणूक दाखवून दिली. नंतर यशवंत दत्त यांची तीन नाटकं आली. यशवंत दत्त यांना नाव मिळवून दिले ते "नाथ हा माझा' या नाटकाने. या नाटकातील सुभानराव यशवंत दत्त यांनी इतका मस्त उभा केला, की लोकांची त्यांना प्रचंड दाद मिळत असे. हे नाटक अचानक बंद पडले, पुन्हा काही काळाने ते परतले ते "वेडा वृंदावन' या नाकातून. त्यानंतर सुरू झाला यशवंत दत्त यांचा चित्रपटक्षेत्रातील प्रवास. "सुगंधी कट्टा', "दगा'मध्ये त्यांनी खलनायक, नायक रंगवला. मराठी चित्रपटसृष्टीला तेव्हा एका चांगल्या नायकाची गरज होती, ती पोकळी यशवंत दत्त यांनी भरून काढली. "भैरू पैलवान की जय', "दौलत', "फटाकडी', "आपली माणसं', "आयत्या बिळात नागोबा', "पैजेचा विडा' आदी चित्रपटांतून त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका केल्या. "शापित'मध्ये केलेल्या भूमिकेची दखल देशपातळीवर घेतली गेली.
चित्रपटात काम करून प्रसिद्धी मिळत असताना त्यांनी नाटक करणे सोडले नाही. प्रत्येक नटाला मोह पडावा अशी भूमिका म्हणजे "नटसम्राट'मधील गणपतराव बेलवलकरांची..“ती वयाच्या चाळीसाव्या वर्षी इतकी सहजगत्या साकारली की प्रेक्षकांनी या व्यक्तीरेखेला अक्षरश: डोक्यावर घेतले. त्यानंतर यशवंत दत्त यांनी “गगनभेदी” नाटक केले. त्यानंतर त्यांच्या कारकीर्दीतील सर्वात महत्त्वाचे नाटक म्हणजे “वादळ माणसाळतंय”. वसंत कानेटकर यांनी बाबा आमटे यांच्या आयुष्यावर लिहिलेले हे नाटक यशवंत दत्त यांनी अत्यंत प्रभावीरित्या केले. त्यानंतर सुध्दा वसंत कानेटकर यांच्याच “सोनचाफा” आणि जयवंत दळवींच्या “कालचक्र” या दोन्ही नाटकांमध्ये यशवंत दत्त यांनी अभिनय केला.त्याचप्रमाणे “सरकारनामा” चित्रपटातून त्यांनी रंगवलेला खलनायक अगदी हुबेहूब रंगवून प्रेक्षकांकडून दाद मिळवली; ती आजही अनेकांच्या स्मरणात आहे.
यशवंत दत्त यांनी "शापित" तसंच "संसार" या चित्रपटातून साकारलेल्या भुमिकांना "राज्य शासनाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेता" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. नाटक, चित्रपट यामध्ये मग्न असलेल्या यशवंत दत्त यांच्यामध्ये एक हळुवार कवी लपलेला होता. यशवंत दत्त यांनी मराठी चित्रपट आणि रंगभूमीला दिलेलं योगदान अतुलनीय आहे. यशवंत दत्त यांचे ११ नोव्हेंबर १९९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 18, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti