जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
प्रेमनाथ यांचे वडील रायसाहेब कर्तारनाथ यांची अशी इच्छा होती की, आपल्या मुलाने लष्करात सामील व्हावं. त्यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९२६ रोजी जबलपुर येथे झाला. ते स्वत: ऐकेकाळी रेवा स्टेटचे आय.जी.पी. होते. आपल्या मुलानेही प्रामाणिक आणि शिस्तप्रिय जीवन जगावं अशी त्याची भारी इच्छा होती. त्याप्रमाणे त्यांनी प्रेमनाथला लष्करात पाठवलं सुध्दा, पण प्रेमनाथची स्वत:ची आवड वेगळीच होती. त्याला मुंबईच्या हिंदी चित्रपटसृष्टीत उडी घ्यायची होती.
एवढयासाठी त्याने सैन्यातून पळ काढला आणि मुंबई गाठली. इथे आल्यावर इंदौरचे एक नातेवाईक पृथ्वीराज कपूर यांच्या नाटक कंपनीतच होते. त्यांचा त्यांनी आश्रय घेतला. पण पृथ्वीराज कपूराना सगळी हकीकत कळल्यानंतर त्यांनी आपला मुलगा राज कपूर यांना सोबत घेऊन प्रेमनाथ यांना घरी जाण्यास सांगितलं. नाराज मनानं प्रेमनाथ घरी परतला. पण इथे एक भलतंच नाटक घडलं. प्रेमनाथबरोबर आलेल्या राज कपूरने प्रेमनाथची बहीण कृष्णा हिला बघितलं आणि पहिल्या नजरेतच तो तिच्या प्रेमात पडला. नंतर हे नातं अगदी घटट् झालं.
प्रेमनाथने याच नात्याला यशाची पायरी बनविण्याचं ठरवलं. पृथ्वी थिएटर्सच्या 'दीवार' नाटकात प्रेमनाथने ब्रिटीश माणसाची रंगविलेली भूमिका सगळयांना आवडली. ही भूमिका त्याला कपूर घराण्याशी जवळचं नातं जोडलं गेल्यामुळेच मिळाली होती. नंतर राज कपूरच्या 'आग' चित्रपटात 'चित्रकार राजाबाब' ची महत्त्वपुर्ण भूमिका प्रेमनाथला मिळाली. या चित्रपटातली प्रेमनाथची भूमिका खूप गाजली. प्रेमनाथला नायक म्हणून पहिला चित्रपट 'अजित' या नावाने मिळाला होता. यात त्याची नायिका होती मोनिका देसाई.
१९५१ साली प्रेमनाथची सात चित्रपट पडद्यावर आले. नंतर त्यांनी अनेक टॉपच्या हिरोईन्सबरोबर काम केले. हिंदी चित्रपटात प्रेमनाथला एक अशा अभिनेत्याच्या नात्याने ओळखले, जाते ज्याने फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक नायक म्हणून राज्य करणारा म्हणून नाही तर खलनायक म्हणून लोकांच्या हृदयात आपली छाप उमटविली. शोर , अमीर गरीब, रोटी कपडा और मकान या सारख्या चित्रपटात त्यांना अभिनयासाठी फिल्म फेयर अवॉर्डने नावजले गेले.
ऐंशीच्या दशकात प्रकृती स्वास्थ्य खालावल्याने प्रेमनाथ यांनी चित्रपटात काम करणे काही अंशी कमी केले. या काळात त्यांच्या कर्ज, क्रोधी, देशप्रेमी यांसारखे चित्रपट प्रदर्शित झाले. १९८५ मध्ये आलेला हम दोनो हा प्रेमनाथ यांच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट ठरला. निर्माता निर्देशक सुभाष घई यांसोबत प्रेमनाथ यांची जोडी. बरीच नावाजली गेली.
सुभाष घई यांसोबत प्रेमनाथ यांनी कालीचरण, विश्वनाथ, गौतम गोविंदा, कर्ज, आणि क्रोधी यांसारख्या अनेक प्रसिद्ध चित्रपटात त्यांनी काम केले. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या हृदयात एक वेगळीच जागा निर्माण केली होती. प्रेमनाथ यांचे ३ नोव्हेंबर १९९२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
November 8, 2017
साधू वासवानी मिशनचे संस्थापक, सिंधी समाजाचे आध्यात्मिक गुरू हा लौकिक परिचय असलेले दादा जे. पी. वासवानी यांनी शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात अनमोल योगदान दिले. त्यांचा जन्म २ ऑगस्ट १९१८ रोजी पाकिस्तानमधील सिंध प्रातांतील हैदराबाद येथे झाला. जे. पी. ऊर्फ जशन पहलाजराय वासवानी असे त्यांचे मूळ नाव. आध्यात्मिक गुरू साधू वासवानी यांचे ते पुतणे होते.
साधू वासवानी यांच्यासमवेत १२ नोव्हेंबर १९४८ रोजी दादा भारतामध्ये आले. ‘इंडियन डायजेस्ट’ आणि ‘ईस्ट अँड वेस्ट सिरीज’ या मासिकांचे संपादन करणाऱ्या दादांनी १९६२ ते १९७६ या कालावधीत सेंट मीरा कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम पाहिले. २५ नोव्हेंबर १९८६ या साधू वासवानी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ‘शाकाहार दिन’ ही चळवळ दादांनी सुरू केली. दादा जे. पी. वासवानी यांनी शाकाहारासाठी देश-विदेशात प्रचार केला. जे. पी. वासवानी हे अविवाहित होते. त्यांचे भौतिकशास्त्रात त्यांनी एमएस्सीपर्यंतचे शिक्षण झाले होते. त्यानंतर एल.एल.बी.चीही पदवी संपादन केली होती.
दादा जे. पी. वासवानी यांच्या आयुष्याचा सारांश 'प्रेम' या शब्दात होते. लहानपणाासून त्यांच्यात सेवा आणि दयेचा अंकुर विकसित झाला होता. अत्यंत बुद्धिमान अशी त्यांची ख्याती होती. केवळ सतराव्या वर्षी त्यांनी एमएस्सीची पदवी प्रथम क्रमांकाने संपादित केली होती. भौतिकशास्त्रातील प्रबंधांची त्यावेळचे नोबेल विजेते सर व्ही. व्ही. रामन यांनी प्रशंसा केली होती. वासवानी यांचे इंग्रजी; तसेच सिंधी या भाषांवर प्रभुत्व होते. ते सतत वाचन व मननात मग्न असत. जगातील प्रख्यात लेखकांच्या पुस्तकांतील परिच्छेद ते आपल्या भाषणांतून नेहमी सांगत असत. दादांची राहणी साधी होती.
अंगात पांढरा शर्ट, पायजमा, पांढरी शाल आणि पायात साधी चप्पल. हसरा चेहरा आणि चमकदार डोळे, मोठे कान ही दादांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती. दिलखुलास हास्य आणि अंगभूत समयसूचकतेने ते इतरांची मने जिंकून घेत. हसताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जणू ओसंडून वाहात असे.
दादा जे. पी. वासवानी यांनी साधू वासवानी मिशनतर्फे अनेक सामाजिक कार्यांना प्रारंभ केला. त्यांनी स्त्री शिक्षणाला प्राधान्य दिले होते. सेंट मीरा स्कूल व कॉलेज सुरू केले. त्यांनी इंग्रजी, सिंधी भाषेत सुमारे १९० पुस्तके लिहिली. देशभरात १८ शाळा काढल्या, तर पुण्यात इनलॅक्स बुधरानी हे हॉस्पिटल; तसेच शांती क्लिनिकदेखील सुरू केले.
विदेशी भाषेत त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद झाले आहेत. जगातील अनेक नामांकित नेत्यांसह धर्मगुरू त्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधत असत. त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. दादा जे. पी. वासवानी यांचे १२ जुलै २०१८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
August 2, 2021
मारुतीराव कीर यांनी आपले करियर तबला वादक म्हणून सुरू केले. त्यांचे गुरु होते भानुदास मानकामे, भैरव प्रसाद, सुंदर प्रसाद आणि उस्ताद गेमखान साहब होते. मारुती राव कीर यांनी शंकर जयकिशन यांच्या व्यतिरिक्त जवळजवळ सर्व संगीत दिग्दर्शकांच्या बरोबर काम केले. जवळजवळ सर्व जुन्या मराठी चित्रपटांमधून आणि नॉन-फिल्मच्या गाण्यांमध्ये मारुती राव कीर यांनी तबला वाजवला आहे. मारुती राव कीर यांनी आधी एस.डी बर्मन यांच्या साठी आणि नंतर आर.डी बर्मन यांच्या साठी शेवटपर्यत रिदम असिस्टट म्हणून काम केले.
तबलावरील त्यांची निपुणता "पिया तोसे नैना लेगे रे" या गाण्यात दिसते. या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या काळात मारुतीराव आणि पंचम यांची मैत्री झाली व ती शेवट पर्यत टिकली. पंचमच्या यांच्या पहिल्या चित्रपट "छोटे नवाब" पासून मारुतीराव कीर रिदम ऍरेंजर व जवळचा मित्र म्हणूनच राहिले. पंचम यांचे इतर सर्व संगीत दिग्दर्शकांमध्ये सर्वात जास्त फॅन आहेत. यासाठी मारुतीराव कीर यांना हे क्रेडीट द्यावे लागेल. पंचम आणि मारुतीराव कीर हे नेहमी रीद्मच्या काहीतरी नवीन शोधात असत, नवीन इन्स्ट्रुमेंटची ओळख करून घेत असत, मारुतीराव कीर यांनी पंचम यांना एकदा टुम्बा या वादयाची कथा सांगितली, जेव्हा पंचम आणि मारुतीराव कीर त्यांच्या ग्रुपसह आफ्रिकेत शो साठी गेले होते. तेथे त्यांनी टुम्बा नावाचे हे आफ्रिकन वाद्य पाहिले.
पंचम यांनी मारुतीराव कीर यांना ते वाद्य कसे वाजते हे दाखवण्यास सांगितले मारुतीराव कीर उभे राहिले व सराईत वादकासारखे टुम्बा वाजवून दाखविले, ही खरोखरीच कमाल होती. पंचम यांनीच टुम्बा याला भारतात आणले, व भारतात वाजवण्याचा पहिला मान मारुतीराव कीर यांना जातो. मारुतीराव कीर यांनी टुम्बाचा पहिल्यादा मनोरंजन चित्रपटात "आया हु मै तुझे ले जानुगा" या गाण्याच्या साठी वापर केला. या चित्रपटाचे दिग्दर्शक शम्मी कपूर होते. अनेक दशके त्यांनी रिदम ऍरेंजर म्हणून हिंदी चित्रपटसृष्टी गाजविली. लतादिदी, आशा भोसले यांच्या अनेक गीतांचा रिदम मारूती कीरांनी ऍरेंज केला.
मारुतीराव कीर हे एवढे मोठी व्यक्ती असून शेवट पर्यत साधे राहिले. दादरमधील आपल्या १० × १२ च्या रूम मध्ये ते राहत. त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले. त्यांचा पहिला विद्यार्थी अमृतराव काटकर होते. मारुतीराव कीर यांच्या मुळे पंचम यांचे बहुसंख्य तालवादक अण्णा जोशी, अमृतराव, मान्या बर्वे, नाईक,असे मराठी माणसेच होती.
मारुतीराव कीर व पंचम यांची एवढी मैत्री होती की पंचम यांच्या निधना नंतर त्यांनी रेकॉर्डिंग बंद केले होते. मारुतीराव कीर यांचे निधन ११ जानेवारी २००५ रोजी झाले.
मारुतीराव कीर यांच्या स्मरणार्थ दर वर्षी हिंदी गीते, ढोलकी जुगलबंदी, सोलो वादनाची संगीत मैफील 'स्मृतिगंध' म्हणून रत्नागिरीत आयोजित केली जाते.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
https://youtu.be/DtwRUINTDaY
January 11, 2018
मराठी कवी, लेखक, पत्रकार अनंत आत्माराम काणेकर यांचा जन्म २ डिसेंबर १९०५ रोजी झाला. अनंत काणेकर यांचे शालेय शिक्षण मुंबई-गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोडकर हायस्कूलमध्ये झाले. मुंबई विद्यापीठातून १९२७ मध्ये बी.ए.झाल्यावर त्यांनी १९२९ साली एल्एल.बी.ची पदवी संपादन केली. त्यानंतर १९३५ सालापर्यंत त्यांनी वकिलीचा व्यवसाय केला. १९४१ मध्ये अनंत काणेकर हे मुंबईच्या खालसा कॉलेजात प्राध्यापक झाले. तेथे पाच वर्षे नोकरी झाल्यावर सिद्धार्थ कॉलेजात आले. तेथूनच ते निवृत्त झाले. ’आशा’ आणि ’चित्रा’ या साप्ताहिकांचे ते काही काळ संपादक होते.
अनंत काणेकर हे मुंबईतील वांद्रे येथील साहित्य सहवास वसाहतीत ’झपूर्झा’ या इमारतीत रहात. अनंत काणेकर यांच्या स्मरणार्थ मुंबई विद्यापीठ एक व्याख्यानमाला चालवते.
गीतकार म्हणून मा. अनंत काणेकर यांनी लिहिलेली गाणी
आता कशाला उद्याची बात
आला खुशीत् समिंदर
एकलेपणाची आग लागली
तू माझी अन् तुझा मीच
दर्यावर डोले माझं
अनंत काणेकर यांचे २२ जानेवारी १९८० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
December 2, 2016
मैक मोहन यांचे खरे नाव मोहन माखीजानी होते. त्यांचा जन्म २४ एप्रिल १९३८ रोजी कराची येथे झाला. ‘शोले’ सिनेमात सांभा भूमिका साकारून लोकप्रियता मिळवणा-या अमजद खान यांनी विचारलेला ‘अरे ओ सांभा, कितना इनाम रखा है सरकार हम पर? व मॅक मोहन यांनी दिलेले उत्तर ‘पूरे पचास… हा डायलॉग अजूनही फेमस आहे.
May 10, 2019
विजया म्हणजेच संध्या आणि त्यांची मोठी बहीण वत्सला या दोघी लहानपणापासून त्या कंपनीच्या गुजराती नाटकातून भूमिका करत. नाटकातून अभिनय करता करता संध्या यांनी गुजराती चित्रपटातून काम करण्यास सुरुवात केली.
September 22, 2021
डॉ.दत्ता सामंत यांचे नेतृत्व बघता, इतर कामगार संघटनाही त्यांच्याकडे येऊ लागल्या. त्यांना नेतृत्व स्वीकारण्याचा मागण्या करू लागल्या आणि दत्ता सामंत यांनी त्या कामगार संघटनांचे नेतृत्व स्वीकारले.
June 29, 2022
सुलभा देशपांडे व अरविंद देशपांडे या खरं तर दोघांचं नाटय़वेड कमालीचं, टोकाचं होतं. त्यामुळे तर ओळख झाली. त्या काळात म्हणजे १९६०च्या दशकात. त्यांचा जन्म ३१ मे १९३२ रोजी झाला. मुख्य मुंबई शहरातल्या प्रेमिकांना मलबार हिलची बाग एकांतात गप्पात रंगून जाण्यासाठी आवडत असे. हे प्रेमीयुगुल मलबार हिल चढून गेलं, पण ओढ वाटत असली तरी अजून ते कळीचं वाक्य दोघांमध्ये उच्चारलं गेलं नव्हतं. त्यामुळे मौनात दोघं ती टेकडी चढले आणि उतरले. खिशात पैसे बेताचे असले तरी मग आइस्क्रीम खायचं ठरलं. नंतर टॅक्सीने तिला घरी सोडायचं, असाही बेत ठरला. दोघांनाही उगाच हसू येत होतं आतल्या आत, एकमेकांकडे पाहताना मात्र चेहरा गंभीर, पण डोळे ‘देई वचन तुला’ असं सांगत होते. शेवटी त्याने तिला लग्नाचं विचारलं.. तेव्हा काही सेकंदांसाठी तिच्या घशात आइस्क्रीम अडकलं तरी ‘मला आवडेल’ एवढंच वाक्य बाहेर पडलं; पण पुढचं वाक्य कसं उच्चारायचं हे त्या २०/२१ वर्षांच्या मुलीला कळत नव्हतं. त्यानेच त्या पणला पुस्ती जोडली.. ‘लग्न केल्यावर नाटक सोडायचं नाहीस तू.’ बस्स, हेच तर हवं होतं. आता सुटकेच्या भावनेने तिला हसू फुटलं. कसाटा आइस्क्रीम महाग असल्याने पैसे संपले. मग टॅक्सी कुठली, बसच्या रांगेत उभं राहावं लागलं.. पुढची दोन वर्ष ते असे छान प्रियकर-प्रेयसीची भूमिका जगत होते. १९६० मध्ये सुलभा कामेरकर या सुलभा देशपांडे झाल्या आणि पुढे हे दाम्पत्य विलक्षण पद्धतीने शेवट पर्यत नाटक जगले..
अरविंद देशपांडे यांच्या बरोबरचा सुलभा देशपांडे याचा संसार हा दोघंही नाटकात असल्याने कधी गंभीर, तर कधी गमतीदार असायचा. कारण अरविंद कधी दिलेली वचनं पाळत नसत. मग दर वाढदिवसाला एक चिठ्ठी सुलभाताईंना मिळे. ‘मी तुझं देणं लागतो. एक सिल्कची साडी.’ शेवटी अशा चार-पाच चिठ्ठय़ा जमा झाल्यावर सुलभाताईं त्यांना म्हणाल्या, ‘‘या चिठ्ठय़ा घ्या आणि गोदरेजचं कपाट आणा.’’ त्या वेळी पहिलं कपाट घरी आलं..
त्यांचा मुलगा निनाद ३/४ वर्षांचा होईपर्यंत सुलभाताई नाटक सोडून घरीच रमल्या. भुलाभाई देसाई इन्स्टिटय़ूटमध्ये, ‘रंगायन’मध्ये मात्र जात राहिल्या, कारण नाटकाचं वातावरण. त्याच इमारतीत अल्काझींची थिएटर युनिट ही हिंदी नाटकवाल्याची संस्था. सत्यदेव दुबे ती सांभाळत. ते अरविंदचे मित्र. एकदा ते अडचणीत होते. त्यांनी अरविंदला गळ घातली आणि अरविंदनी सुलभाताईंना. ‘कलकत्ता फेस्टिव्हल’मध्ये थिएटर युनिटचं नाटक सादर होणार होतं- ‘अंधायुग’. त्यातली मूळ गांधारी आजारी पडली होती. फेस्टिव्हल चार दिवसांवर आला होता. ती गांधारी (हिंदीत) सुलभाताईंनी उभी करावी म्हणून अरविंद सुलभाताईंना सांगत बसले, ‘‘रंगभूमीची तुझ्याकडून कलावंत म्हणून अपेक्षा आहे, तू हे चॅलेंज स्वीकार. आपला विश्वास आपल्यावर बसणं आवश्यक आहे. आर्टिस्ट जितका टेन्शनमध्ये तितकंच त्याचं काम चांगलं होतं. वगैरे वगैरे.’’ सुलभाताई सांगतात, ‘‘असं जगावेगळं अभिनयाचं तंत्र अरविंद मला सांगत होता आणि शेवटी मी गांधारीची भूमिका करायला तयार झाले. चार दिवस हिंदी उच्चारांसह कसून तालीम केली.’’
आणि नेमका निनाद आजारी पडला; पण अरविंदनी ताईंना गळ घातलीच, ‘‘कलकत्त्याची तयारी कर. प्रेस्टिज शो आहे. रंगभूमीची प्रतिष्ठा राखली पाहिजे.’’ सत्यदेव दुबे न्यायलाही आले, त्यांनी सुलभाताईंची बॅग घेतली. डोळ्यांत अश्रू घेऊन त्या घराबाहेर पडल्या. डोळ्यांत अश्रू घेऊन त्या घराबाहेर पडल्या. सुलभाताई एका मुलाखतीत म्हणतात, ‘‘तापानं फणफणलेल्या निनादने हे पाहिलं. नंतर दोन वर्ष तो दुबेंशी बोलत नव्हता.’’ ‘अंधायुग’मध्ये तेव्हा अमरीश पुरी, राजेश खन्ना हे हिंदी थिएटरचे कलावंत होते. कोलकात्याला पोचताच सुलभाताईंना तार मिळाली- ‘निनादचा ताप उतरला.’ त्या म्हणतात, ‘‘त्या दिवशी माझी गांधारीची भूमिका इतकी छान झाली की शेवटचा, कृष्णाला गांधारी शाप देते तो सीन आठवला की, अजूनही अंगावर शहारे उभे राहतात.’’
विजय तेंडुलकरांची नाटकं अरविंद देशपांडे त्या काळात दिग्दर्शित करीत होते. तेव्हा सुलभाताई दिग्दर्शनाच्या प्रक्रियेतही सहभागी झाल्या. ‘‘आपल्याला काय हवं आहे हे फक्त आपल्याला कळून चालत नाही तर करणाऱ्या कलाकाराला ते सांगता आलं पाहिजे. या दिग्दर्शनाच्या मुख्य सूत्राचे धडे गिरवायला मी सुरुवात केली. अजूनही माझा तो धडा पूर्ण झालेला नाही,’’ असं सुलभाताई नमूद केलं आहे. ‘शांतता कोर्ट चालू आहे’ हे सुलभाताईंच्या आयुष्यातलं महत्त्वाचं नाटक. त्या आधी सुलभाताई बऱ्याच नाटकांत कामं करीत होत्याच; पण अरविंद यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘शांतता..’मधल्या बेणारेला सुलभाताईंनी अजरामर केलं. एक दिवस रंगायन’ ही संस्था फुटली आणि अरविंद-सुलभा देशपांडे, अरुण काकडे इत्यादींनी ‘आविष्कार’ संस्था जन्माला घातली. ‘शांतता..’चे प्रयोग या संस्थेतर्फे चालू राहिले. ज्या छबिलदास शाळेत सुलभाताई शिकल्या त्याच शाळेत त्या शिक्षिका होत्या. तिथेच ‘आविष्कार’च्या प्रायोगिक नाटकांना हक्काचा रंगमंच मिळाला. तीच छबिलदास चळवळ. रंगायननंतर ‘शांतता..’चे प्रयोग ‘आविष्कार’च्या वतीने चालू ठेवायचं ठरलं. सुलभाताई म्हणतात, ‘‘गृहिणी सचिव’ अशीही भूमिका (प्रयोग चालू ठेवायचा) माझ्यावर येऊन पडली.’’
अरविंद यांनी या नाटकाबद्दल एका ठिकाणी लिहिलं आहे, ‘‘शांतता कोर्ट चालू आहे’ ही लीला बेणारेची शोकांतिका नाटकभर विनोदी स्वरूपात मांडलेली असली तरी या शोकांतिकेचा अंत:प्रवाह वेगळा आहे, अतिशय तरल व गंभीर आहे. वरवर खेळकर दिसणारी बेणारे कुठे तरी खोल दुखावली गेली आहे. सहकाऱ्यांनी सुरू केलेला अभिरूप न्यायालयाचा खेळ. बेणारेवर भ्रूणहत्येचा ठेवलेला आरोप. (ती अविवाहित आहे) ती त्यात अडकत जाते. तो खेळ राहत नाही. ती शिकार होते. निर्घृण हिडिस किळसवाणी शिकार. प्रत्येक जण तिच्यावर तुटून पडतो. शेवटचं तिचं स्वगत, तिला शिक्षा फर्मावली जाते. मग टाइम अप म्हणून नाटक पुन्हा रिअॅलिस्टिक पातळीवर येतं. बेणारे आरोपीच्या पिंजऱ्यात सुन्न आहे. नाटकातला एक कलावंत सामंत पुतण्यासाठी आणलेला खेळातला पोपट तिच्याजवळ ठेवतो. ‘चिमणीला मग पोपट बोले, का ग तुझे डोळे ओले’ बालकवींच्या या कवितेवर पडदा पडतो. पहिल्या भागात हीच कविता बेणारे गुणगुणत असते.’’
अरविंद देशपांडे यांच्या जीवनावर व कारकिर्दीवर ‘रंगनायक : अरविंद देशपांडे स्मृतिग्रंथ’ नावाचा ‘आविष्कार पब्लिकेशन’ने संपादित करून प्रसिद्ध केलेला ग्रंथ आहे.
अरविंद देशपांडे यांचे ३ जानेवारी १९८५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/मधुवंती सप्रे
January 3, 2018
बीकानेर राजस्थान येथे जन्मलेल्या मा.गुलाम मोहम्मद यांचे वडील जनाब नबी बक्श हे तबलावादक होते. त्यामुळे गुलाम मोहम्मद यांना संगीताचे जनुक रक्तातूनच आलेले होते. राजस्थानी लोकसंगीताचा त्यांनी आपल्या चित्रपट संगीतात पुरेपूर वापर करून घेतला. ढोलक, मटका, डफ, खंजिरी, चिमटा अशा तालवाद्यांना त्यांनी लोकप्रिय बनवले. अर्थात कोणत्या प्रकारच्या गाण्यात आवाजाला जास्त उठाव द्यायचा आणि कोणत्या प्रकारच्या गाण्यात वाद्यांचा वापर करून गाणे उठावदार करायचे याचे अचूक कसब त्यांना साधत असे. जसा अगदी आगगाडीच्या शिट्टीचा वापर त्यांनी पाकीजा मध्ये कल्पकतेने वापर करून घेतला होता. “चलते चलते” या गाण्याच्या शेवटी, किंवा “मौसम है आशिकाना” गाण्याच्या आधीचा पक्षांचा तो किलबिलाट रेकॉर्ड करण्यासाठी तब्बल एकवीस दिवस त्यांना रोज सकाळी त्या ठिकाणी सगळा लवाजमा घेऊन आवाज रेकॉर्ड करण्यासाठी जावे लागले. तेव्हा कुठे त्यांना मनासारखा तो किलबिलाट रेकॉर्ड करता आला.
ते नौशाद यांच्याकडे अनेक वर्षे सहाय्यक म्हणून काम करत होते. नौशाद साहेबांच्या सुरवातीच्या काळातील म्हणजे रतन, मेला, दर्द, दास्तान, दिल्लगी, बाबुल, दीदार, या चित्रपटांच्या संगीतावर मा.गुलाम मोहम्मद यांची छाप स्पष्ट दिसून येते. अर्थात नौशाद साहेबांनी त्यांना स्वतंत्र काम करायची परवानगी दिली होती इतकीच काय ती जमेची बाजू. गुलाम मोहम्मद यांनी स्वतंत्रपणे जवळपास पस्तीस हिंदी आणि प्रादेशिक चित्रपटांना संगीत दिले. त्यापैकी त्या पैकी मिर्जा गालिब आणि पाकीझा हे चित्रपट खूप गाजले. पाकीझा चित्रपट हा हिंदी चित्रपटसृष्टीसाठी एक मैलाचा दगड ठरला. एक अजरामर संगीत कलाकृती ठरली. अर्थात ती तयार होण्यासाठी ही तब्बल चौदा वर्षे लागली. त्याची अनेक वेगवेगळी कारणे होती पण या चित्रपटासाठी संगीत दिलेले मा.गुलाम मोहम्मद यांना आपल्या हयातीत हा चित्रपट पूर्ण झालेला पाहण्याचे भाग्य लाभले नाही. त्यांच्या निधनानंतर नौशादसाहेबांनी या चित्रपटाची उर्वरित गाणी आणि पार्श्वसंगीत तयार केले. या चित्रपटाने आणखी एक विक्रम असा केला की मूळ चित्रपट साडेतीन तासांपेक्षा अधिक लांब आणि तेवीस गाणी त्यात होती. पुढे चित्रपटाची लांबी कमी करण्यासाठी बारा गाणी कट करावी लागली तरी या कापलेल्या गाण्यांची HMV कंपनीने एक वेगळी रेकॉर्ड बनविली. या चित्रपटासाठी गुलाम मोहम्मद यांना फिल्मफेअरचे नामांकन मिळाले पण पारितोषिक नाही मिळाले. पण मिर्जा गालिब च्या संगीतासाठी त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. प्रचंड गुणवत्ता आणि जीव ओतून घेतलेल्या मेहनतीला यशाने दरवेळी दिलेल्या हुलकावणीचे दुसरे उदाहरण क्वचितच सापडेल. पाकिजाचे चित्रपटाचे वास्तविक संगीत मा.गुलाम मोहम्मद यांचे. पण चित्रपट पूर्ण व्हायच्या आधीच त्यांचे निधन झाले. त्यामुळे चित्रपटाचे पार्श्व संगीत नौशाद यांनी दिले आणि तीन गाणीही केली. पण ‘चलते चलते’सह बहुतेक प्रसिद्ध गाणी मा.गुलाम मोहम्मद यांची. असे म्हणतात की, गुलाम मोहम्मद यांना त्यासाठी फिल्मफेअर पुरस्कार न दिल्याच्या निषेधार्थ प्राण यांनी त्यांना त्यावर्षी मिळालेला खलनायकाचा पुरस्कार स्वीकारायला नकार दिला होता.
गुलाम मोहम्मद यांचे निधन १७ मार्च १९६८ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
गुलाम मोहम्मद यांनी संगीत दिलेली काही गाणी.
ये दुनिया है यहां प्यार करना किसको आता है.
किस्मत बनानेवाले जरा सामने तो आ.
अखियां मिलाके जरा बात करो जी
जिंदगी देनेवाले सून
मोहब्बत की धून
चल दिया कारवां
शिकायत क्या करू दोनो तरफ गमका फसाना है.
आपसे प्यार हुआ जाता है.
दिल गमसे जल रहा है जले पर धुआँ न हो.
चलते चलते
मौसम है आशिकाना
गुलाम मोहम्मद व लता मंगेशकर भाग १ ते ३
https://youtu.be/4ECx3z4I4JI
https://youtu.be/QRtbmXkIr-I
https://youtu.be/maQGsGB_3v4
मिर्झा गालीब मधील गाणी.
https://youtu.be/_BJcfx8EiDY
March 21, 2017
कल्याण वासुदेव काळे हे संत साहित्य आणि भाषा विज्ञानाचे अभ्यासक होते.
त्यांचा जन्म १६ डिसेंबर १९३७ रोजी झाला.
mss
## Kalyan Vasudeo Kale
July 28, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti