(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ख्यातनाम मराठी लेखक बाबा कदम

    आज २० ऑक्टोबर. ख्यातनाम मराठी लेखक बाबा कदम यांची पुण्यतिथी.

    बाबा कदम यांचा जन्म ४ मे १९२९ रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव वीरसेन आनंदराव कदम असे असले तरी ते आपल्या वाचक परिवारात `बाबा कदम' म्हणूनच परिचित होते.

    त्यांच्या कथा, कादंबर्या त मात्र ऐतिहासिक पार्श्वभूमी, संस्थानिक गढ्या, वाडे, सरंजामी सदर बोली भाषा, पोलीस, कायदा, कोर्ट, रेसकोर्स इ. हमखास येणारच याचं आश्चर्य वाटत नाही. त्यांचे वडिल अक्कासाहेब महाराजांचे स्वीय सचिव होते. त्यामुळेच एक खानदानी आदब त्यांच्यामध्ये जाणवते अन् नकळत कुर्निसात करण्यासाठी हात पुढे होतो, मान अदबीनं झुकते. संस्थांनी वातावरणातच बाबांचे बालपण गेले. त्यांचे वडिल रेसकोर्सवर अधिकारी म्हणूनही कार्यरत असत. त्याचाच परिणाम बाबांच्या कथालेखनात झाला. त्यांची `अजिंक्यतारा' कथा रेसकोर्सच्या जीवनावर आधारित आहे. त्यांच्या बालपणातच वडिलांचा मृत्यू झाला. प्राथमिक शिक्षण वसतिगृहात राहून झाले. स्वावलंबी जीवनाचे धडे त्यांनी आश्रमातच घेतले. इथेच त्यांची चित्रकलेशी ओळख झाली. पुढे ते राजाराम कॉलेजमधून पदवीधर झाले. याच काळात बाळ गजबरांचाही परिचय झाल्याने चित्रकलेचे संस्कार त्यांच्यावर झाले. घरच्या परिस्थितीमुळे पुढे त्यांनी एस. टी. महामंडळात काही काळ सेवाही करतानाच शिक्षणाची ओढ त्यांना गप्प बसू देत नव्हती.

    ते १९५४ मध्ये एल.एल.बी.झाले. फौजदारी वकील डी.एस.खांडेकर यांच्याकडे ते काम करु लागले १९५९ साली ते सरकारी वकील म्हणून नियुक्त झाले. १९५९ ते १९८७ पर्यंत सरकारी वकील म्हणून २८ वर्षे काम करुन ते १९८७ साली सेवानिवृत्त झाले. याच त्यांच्या न्यायालयीन कामकाजाचाही त्यांच्या लेखनावर प्रभाव पडलेला दिसतो.

    १९६५ साली त्यांची पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली. `प्रलय' याच कादंबरीवर पुढे `देवा शपथ खरं सांगेन' हा चित्रपटही निघाला. १९६६ ला इन्साफ या कादंबरीवर ही `अधिकार' हा चित्रपट निघाला. भालु, सन्ना, ज्योतिबाचा नवस, पाच नाजूक बोटे, बिनधास्त, गर्लफ्रेंड, डेझर्ट क्वीन, डार्लिंन, निष्पाप बळी, गजरा, बॉंबे पोलीस, रमी, ज्वालामुखी, दगा, न्याय, रिवॉर्ड अशा सुमारे ८० च्या आसपास कादंबर्याप त्यांनी लिहिल्या. सेवानिवृत्तीनंतरही त्यांचा हात लिहिता राहिला. व्यक्तिचित्रण करणार्या् लेखमाला ही त्यांनी वृत्तपत्रातून चालविल्या. कोणत्याही वेळी, कुठेही असतांना माझ्याजवळ लिखाणाची वही जवळ असते. एकटाकी लिखाण करतो अगदी न्यायालयात एखादा तास मिळाला की, मी लिहित बसायचो, शेवट जास्तीत जास्त प्रभावी कसा होईल याबाबत मनात संघर्ष सुरु होतो. हातात एखादा घेतलेली कादंबरी संपल्याशिवाय खाली ठेवायला मला नको वाटते, असे ते सांगत. त्यामुळेच त्यांच्या कादंबर्यां च्या तीन-तीन प्रती सार्वजनिक ग्रंथालयात घेऊन देखील वाचकांची मागणी पुरविणे ग्रंथपालांना अशक्य होते.

    विषयातही विविधता असल्याने कादंबर्या वाचकप्रिय झाल्या. सन्ना ही सिखसेकापू तरुणीवरील, अजिंक्य ही रेसवरील, राजधानी ही संस्थानिकांवरील `शोभा' ही वेश्येवरील, वसंतदादा व शालिनीताईंच्या जीवनावरील `निर्मला' पद्मा चव्हाण यांच्यावरील `अभिनेत्री' बापू बिरु वाटेगांवकरांच्या जीवनावर `दगा' स्वत:च्या बालपणाच्या आठवणीवर `शाळा सुटली पाटी फुटली' अशा कितीतरी वेगवेगळ्या विषयावर त्यांनी लिहिले. लिहितांनाही त्यांनी आपल्या मनातला कलाकार जपला. निसर्ग जसा आहे तसाच चित्रित करण्याचा माझा प्रयत्न असतो असे ते म्हणत. नवरा-बायको ह्या पु.ल.देशपांडे यांच्या कथेवरील चित्रपटातही त्यांनी काम केलं.

    बाबा कदम यांचे २० ऑक्टोबर २००९ रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. विजय बक्षी/.mymarathi.

    (या लेखासाठी बाबा कदम यांचे छायाचित्र शोधण्यासाठी गुगलवर प्रयत्न केले. एकही छायाचित्र मिळाले नाही. सर्च रिझल्टमध्ये बाबा रामदेव यांची शेकड्यांनी छायाचित्रे दिसली. विकिपिडियावर बाबा कदम यांच्याविषयीच्या पानावर केवळ एकच ओळ.. मराठी साहित्यिकांचे आणि मराठीचे दुर्दैव.. आणखी काय?)

      October 20, 2016


  • डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे

    डॉ. श्रीकांत शिंदे हे ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. ते लोकसभेत शिवसेनेचे प्रतिनिधित्व करतात.

    डॉ. श्रीकांत शिंदे हे ठाण्याचे आमदार आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या धडाडीच्या कार्यपद्धतीमुळे ते मतदारसंघात लोकप्रिय आहेत.

    त्यंचा जन्म ४ फेब्रुवारी १९८७ रोजी झाला. ते MS Orthopaedic आहेत. च्या केवळ २८ व्या वर्षी त्यांनी १६व्या लोकसभेचे खासदार म्हणून जबाबदारी स्विकारली.

    वेबसाईट : http://drshrikanteknathshinde.in/

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

      January 14, 2016


  • आर्या आंबेकर

    आर्या आंबेकर

    आर्या ही मराठी गायिका आहे. झी मराठी वाहिनीच्या सारेगमप लिटिल चँप्स या संगीत विषयक कार्यक्रमात ती एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

      November 9, 2010


  • आधुनिक युगातील शिक्षणाचे महामेरू व कॉग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम

    गावात शाळा नसल्या कारणाने पतंगरावांना चार ते पाच किमी चालत जाऊन प्राथमिक शिक्षण घ्यावं लागत असे. पुढे पलूस तालुक्यातील कुंडल गावातून ते दहावी उत्तीर्ण झाले. त्यांचा जन्म ८ जानेवारी १९४५ रोजी सांगली जिल्ह्यातील सोंसल या गावी झाला. दहावीनंतर त्यांनी साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजी कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. शिक्षण क्षेत्रातील सेवेची बिजं याच संस्थेत त्यांच्यामध्ये रुजली. १९६१ साली ते पुण्यात आले आणि एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स करुन, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून रूजू झाले. त्यावेळी पुणे विद्यापीठातून त्यांनी कायद्यात बॅचलर डिग्री मिळवली आणि पुढे पुणे विद्यापीठातून मास्टरचेही शिक्षण पूर्ण केले. १९६४ मध्ये अवघ्या २० वर्षाच्या वयात त्यांनी ‘भारती विद्यापीठ’ ही शैक्षणिक संस्था स्थापन केली.

    सुरूवातीच्या जडणघडणीच्या काळात भारती विद्यापीठाच्या कार्याचे क्षेत्र, केवळ शालेय विद्यार्थ्यांसाठी गणित आणि इंग्लिश विषयांच्या प्रमाणपत्र परीक्षा घेण्यापुरतेच मर्यादित होते. मुख्यतः, या विषयांबाबत विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी, हा दृष्टिकोन ठेवूनच हा कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्यांच्या समर्थ, चैतन्यशील आणि अतिशय कल्पक अशा नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली, भारती विद्यापीठाने आपल्या उपक्रमांचा विविध दिशांनी विस्तार करायला सुरूवात केली आणि आज ते, बालकमंदिर ते विद्यापीठ शिक्षण असे संपूर्ण शैक्षणिक क्षेत्र व्यापणार्‍या, १८० शैक्षणिक संस्थांचा समावेश असलेल्या विशाल संस्थात्मक जाळ्यामध्ये विकसित झाले आहे.

    भारती विद्यापीठाला एक परिपूर्ण विश्वविद्यालय म्हणून विकसित करणे’, हे विद्यापीठाच्या मेमोरन्डम ऑफ असोसिएशन मधील ध्येयांपैकी एक होते. त्यावेळच्या २० वर्षे वयाच्या या तरुणाने आपले स्वप्न त्यानंतर ३२ वर्षांनी, १९९६ मध्ये, जेव्हा भारत सरकारने भारती विद्यापीठाच्या संस्थांच्या समूहाला विश्वविद्यालयाचा दर्जा प्रदान केला त्यावेळी, सत्यात उतरलेले पाहिले. डॉ. कदम यांची विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नेमणूक होणे, हे या महत्त्वाच्या टप्प्याचे वैशिष्ट्य होते – अक्षरशः राखेतून उभारी घेऊन सर्वोच्च स्थानी पोहोचणाऱ्या एका शेतकर्‍याच्या मुलाचे हे यश थक्क करणारे होते.

    सुरूवातीच्या काळात, भारती विद्यापीठाचे कार्यक्षेत्र हे शालेय विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश आणि गणित विषयांच्या परीक्षांचे आयोजन करण्यापुरतेच मर्यादित होते. डॉ. कदम यांच्या चैतन्यशील आणि द्रष्ट्या नेतृत्वाखाली, ४३ वर्षांच्या कालावधीत, आपल्या छत्राखाली १८० शैक्षणिक संस्था असलेले भारती विद्यापीठ, भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वदूर मान्यता पावलेल्या शैक्षणिक संस्थांपैकी एक, म्हणून बहरास आले. वैद्यकशास्त्र, दंतवैद्यक, आयुर्वेद, होमिओपॅथी, नर्सिंग, व्यवस्थापन, औषधीनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी, कृषी, आर्किटेक्चर, विधी, जैवतंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान इ. चा समावेश असलेल्या जवळपास सर्व मुख्य परंपरागत आणि उदयोन्मुख विद्याशाखांचे शिक्षण देणारी ६५ महाविद्यालये आणि संस्था, या विश्वविद्यालयाद्वारे चालविल्या जातात.

    भारताच्या राजधानीचे शहर, नवी दिल्ली, येथे शैक्षणिक संस्थान सुरू करणाऱ्या महाराष्ट्रातील अत्यंत मोजक्याच राजकारण्यांपैकी, डॉ. कदम हे एक आहेत. डॉ. कदम यांनी अनेक सहकारी संस्थांची स्थापना केली आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कायापालट करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. या सहकारी संस्थांमध्ये साखर कारखाना, सहकारी ग्राहक भांडार, बहुराज्यीय शेडयुल्ड बँक इ. चा समावेश होतो. या सर्व संस्था यशस्वीपणे कार्यरत असून ग्रामीण शेतकर्‍यांच्या कल्याणात साहाय्यभूत झाल्या आहेत. त्यांनी नोकरी करणाऱ्या महिलांकरिता वसतीगृहे देखील स्थापन केली आहेत.

    त्यांनी ग्रामीण लोकांच्या गरजांच्या पूर्तीसाठी, प्रामुख्याने ग्रामीण भागांमध्ये शाळा, महाविद्यालये आणि सहकारी केंद्रांची स्थापना केली आहे. भारती विद्यापीठाने समाजातील वंचित घटकांमधील अनेक मुलींना दत्तक घेऊन त्यांना जवळ जवळ मोफत शिक्षण देण्याची जबाबदारी घेतली आहे. शिक्षण मंत्री असताना, त्यांनी प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात स्तुत्य कार्य केले आहे.

    भारती विद्यापीठाने समाजातील वंचित घटकांमधील अनेक मुलींना दत्तक घेऊन त्यांना जवळ जवळ मोफत शिक्षण देण्याची जबाबदारी घेतली आहे. भारती विद्यापीठ हे केवळ पश्‍चिम महाराष्ट्रातीलच नव्हे तर पूर्ण देशभरातील आघाडीच्या शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे. शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे, असे डॉ. पतंगराव कदमांना वाटते आणि म्हणूनच ‘चैतन्यशील शिक्षणाद्वारे सामाजिक परिवर्तन’ हे ध्येयवाक्य भारती विद्यापीठाने आपल्या प्रारंभापासूनच अंगिकारले आहे.

    डॉ. पतंगराव कदम यांनी प्रथम, महाराष्ट्र मंत्रीमंडळात राज्य मंत्री म्हणून जून १९९१ ते फेब्रुवारी १९९३ पर्यंत काम केले. त्यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी शिक्षण, तंत्रशिक्षण, जलसिंचन, जलप्रदाय क्षेत्र (कमांड एरिआ) विकास, माजी सैनिक कल्याण यांसहित विविध खाती वाखणण्याजोग्या रितीने हाताळली. त्यांनी शालेय शिक्षण विभागाचा स्वतंत्र प्रभारही सांभाळला.

    त्यानंतर, त्यांची कॅबिनेट मंत्री म्हणून पदोन्नती होऊन त्यांना उच्च आणि तंत्रशिक्षण आणि रोजगार ही खाती देण्यात आली. त्यांचा उच्च आणि तंत्रशिक्षण आणि रोजगार मंत्री म्हणून कार्यकाळ, त्या काळात पारित झालेल्या धोरणात्मक निर्णयांमुळे विशेष लक्षणीय ठरला व त्या निर्णयांचा दूरगामी विधायक प्रभाव या क्षेत्रात पडला आणि त्यांच्यातून, त्यांनी हाताळलेल्या विषयांबाबतची त्यांची दूरदृष्टी आणि सखोल ज्ञान प्रतिबिंबित झाले.
    डॉ. कदम महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेवर चार वेळा निवडून आले आहेत (१९८५-९०, १९९०-९५, १९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१० आणि २०१० पासून पुढे). ऑक्टोबर २००४ मध्ये ते महाराष्ट्रातील भिलवडी-वांगी मतदारसंघातून १,०१,९०० च्या फरकाने पुन्हा निवडून आले. निवडणुकीत देण्यात आलेल्या मतांच्या टक्केवारीचा विचार करता, त्या निवडणुकीमधील सर्व यशस्वी उमेदवारांच्या यादीत ते अग्रस्थानी होते.

    प्रचंड मतसंख्येच्या बाबतीत, महाराष्ट्र विधानसभेचा सदस्य म्हणून त्यांनी अतिशय हेवा करण्याजोगा विक्रम नोंदविला आहे. एक कार्यक्षम, अभ्यासू आणि स्पष्टवक्ते व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी विधानसभेमध्ये आपली छाप बसवली आहे. कृषी विकास, उच्च शिक्षण, ग्रामीण आणि शहरी समस्या, सहकारी उपक्रम, जलसिंचन, वित्तव्यवस्था आणि तत्सम इतर क्षेत्रांतील आपल्या सखोल ज्ञानाने त्यांनी विविध राज्यस्तरीय समित्यांवरील आपल्या सहकार्‍यांनाही प्रभावित केले होते. पतंगराव कदम यांचे ९ मार्च २०१८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 8, 2019


  • मन्ना डे

    मन्ना डे यांचे खर नाव प्रबोधचंद्र डे असे होते. मन्ना डे, यांना खरे तर पैलवानकी करायची होती. त्यासाठी ते कोलकात्यात तालमीत पैलवानांकडे सरावही करायचे. त्यांचा जन्म १ मे १९१९ रोजी झाला. पण चष्म्यामुळे त्यांना त्यांचं हे स्वप्न पूर्ण करता आलं नाही. कुस्ती खेळताना चष्मा आडवा येऊ लागला. अखेर पैलवानकीचा नाद सोडून महाविद्यालयीन जीवनात ते संगीताकडे वळले. कोलकाता येथील विद्यासागर कॉलेजमध्ये त्यांनी संगीतसाधना सुरू केली. त्या वेळीही त्यांच्या मनात शास्त्रीय संगीत की फिल्म संगीत असा संभ्रम होता. मन्ना डे यांचे वडील पुमाचंद्र डे हे चार्टर्ड अकाउंटंट होते, मुलाने बॅरिस्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. परंतु मन्ना डे यांना तोपर्यंत आपल्या काकांसारखे म्हणजेच के. सी. डे यांच्यासारखे अभिनेते, गायक होण्याच्या ध्यासाने पछाडले होते. के. सी. डे हे न्यू थिएटर्समध्ये काम करीत असत. त्यांनी मन्ना डे यांना आपला शिष्य केले आणि तिथूनच मन्ना डे यांच्या संगीत प्रवासाला सुरुवात झाली.

    मन्ना डे यांचे काका के.सी.डे हे संगीतातील तज्ञ. मन्ना डे हे नावही के. सी. डे यांनीच ठेवले होते. त्यांनी एस.डी.बर्मन यांना संगीताचे धडे दिले होते व अनेक हिंदी व बंगाली चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले होते. पार्श्वगायनाची सुरवात मा. मन्ना डे यांनी १९४२ मधील ’तमन्ना’या चित्रपटापासून केला.’तमन्ना’चे संगीत दिग्दर्शक के.सी.डे हेच होते मन्ना डे यांनी सुरैय्याबरोबर "जागो आयी उषा "हे युगलगीत गायिले होते. मन्ना डे ची खरी ओळख त्यांच्या "बसंत बहार " मधील "सुर ना सजे" मुळे तसेच "श्री चारसौबीस" मधील "प्यार हुआ "सीमा मधील"तू प्यारका सागर है""दो आंखे बारह हाथ"मधील "ऐ मालिक तेरे बंदे हम" किंवा "लागा चुनरीमे दाग" अश्या निवडक गीतातूनच झाली. राजकपूरसाठी त्यांचा आवाज काही चित्रपटातून वापरला गेला व तो योग्यही वाटला. शास्त्रीय संगीतावर आधारित गीते म्हणण्याविषयी कुशल अशी प्रसिद्धी असूनही मन्ना डे यांची अवखळ गीतेही तितकीच प्रसिद्ध झाली. विशेषत: रफी यांच्याबरोबर गायलेले परवरिश चित्रपटातील "मामा ओ मामा"किंवा चलतीका नाम गाडी"मधील "बाबू समझो इशारे" किंवा "पडोसन" मधील किशोरकुमारबरोबर गायलेले "एक चतुर नार" ही गीते त्याची साक्ष देतात.

    मन्ना डे यांनी हिंदी व्यतिरिक्त बंगाली भाषेत गाणी गायली आहेत. मराठी भाषेत गायलेल्या त्यांच्य गीतांची संख्या इतर कोणाही मराठी गायकाच्या (एक बाबूजी सोडले तर) तोडीस तोड आहे.त्यांनी ५५ मराठी गाणी गायली आहेत " अ आ आई म म मका "(चित्रपट एक धागा सुखाचा) :धुंद आज डोळे" (चित्रपट दाम करी काम). त्याचबरोबर "घन घन माला नभी "(चित्रपट वरदक्षिणा) ही त्यांची गाजलेली चित्रपटगीते."घरकुल" चित्रपटातील "हाउस ऑफ बॅम्बू "हे वेगळ्या शैलीचे गीतही लोकांनी खूपच डोक्यावर घेतले होते. मन्ना डे यांचे २४ ऑक्टोबर २०१३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      May 2, 2017


  • पार्श्वगायक किशोरकुमार

    किशोरदाने आपल्या मिश्किल स्वभावाने चित्रपट सृष्टीत विनोदी भूमिकांचा नवा ट्रेंड आणला. अभिनय करताना गायन व संगीताच्या तालावर थिरकणे या त्रिवेणी कलांचा संगम असलेल्या किशोर नी दर्शकांसह श्रोत्यांवर भुरळ घातली.

      October 13, 2021


  • विनायक पांडुरंग करमरकर

    (१८९१ - १९६६)

    भारतातील वास्तववादी शिल्पकारांमधील अग्रगण्य शिल्पकार म्हणून महाराष्ट्रातील नानासाहेब ऊर्फ विनायक पांडुरंग करमरकर ख्यातनाम आहेत. अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्राँझमधील साडेतेरा फुट उंचीचा भव्य पुतळा घडवून असा एकसंघ पुतळा घडवणारे ते भारतातील पहिले शिल्पकार ठरले. सजीवता आणि सादृश्यता ही त्यांच्या शिल्पातील विशेष वैशिष्टयं मानली जातात.

    करमरकरांचा जन्म इ.स. १८९१ साली महाराष्ट्रातील रायगड जिल्हयातील सासवणे इथे झाला. समुद्रकिनारी वसलेल्या या गावातच त्यांच्या वडिलांचा गणपतीच्या मूर्ती बनवण्याचा उद्योग होता. त्यामुळे चित्र काढण्याचा नाद असलेल्या करमरकरांना मूर्ती घडवण्याचेही शिक्षण घरीच मिळालं. गावातील देवळाच्या भिंतींवर त्यांनी काढलेलं शिवाजी महाराजांचं चित्र पाहून ऑटो रॉथफिल्ड या तत्कालीन जिल्हाधिकार्याने पुढाकार घेऊन त्यांना मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये दाखल केलं. तिथे चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्यांनी कोलकता इथे स्टुडिओ थाटून व्यावसायिक कारकीर्दीला सुरुवात केली. त्या काळात त्यांनी रवींद्रनाथ टागोर, चित्तरंजनदास, महात्मा गांधी, पी.सी. रे प्रभृतींची व्यक्तिशिल्पं घडवली. त्यानंतर ‘लंडन रॉयल अॅकेडमी‘ मध्ये पुढील शिक्षणासाठी गेल्यावर त्यांना इटली, फ्रान्स, स्वित्झरलँड मधील कलाकृतींचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. तसेच ब्राँझ कटिंग, ‘स्टोन क्रशिंग‘ ही तंत्रंही आत्मसात करुन १९२३ साली ते कोलकत्यात परतले.

    इ.स. १९२४ साली कोलकतातील इडन गार्डन मध्ये ‘सोसायटी ऑफ आर्टिस्ट‘च्या वतीने आयोजित केलेल्या प्रदर्शनात त्यांची ‘शंखध्वनी‘ ही कलाकृती प्रदर्शित झाली आणि त्यांच्या यशस्वी कारकीर्दीला सुरुवात झाली. याच काळात पुण्यातील ‘मिलिटरी स्कूल‘ मधील छत्रपती महाराजांचा अश्वारुढ एकसंध ‘पुतळा‘ ब्राँझमध्ये निर्माण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली आणि त्यासाठी १९२५ साली ते मुंबईत आले. त्यानंतर मुंबईतच त्यांचं वास्तव्य कायम राहिलं. ‘एका पुतळयाची आत्मकथा‘ या आपल्या लेखात या अवाढव्य पुतळयाच्या निर्मितीची पूर्ण कहाणी करमरकरांनी वर्णन केली आहे. या आठ टन वजनाच्या आणि साडेतेरा फूट उंच पुतळयाच्या ओतकामाचं कार्य मुंबईतील माझगाव डॉकमध्ये झालं. आपलं सगळं तांत्रिक कौशल्य. अध्ययन शीलता, आत्मविश्वास पणास लावून आणि सहकार्यांसमवेत अथक परिश्रम करुन त्यांनी ही शिल्फती साकार केली आणि इतका प्रचंड एकसंध पुतळा ब्राँझमध्ये घडवणारे भारतातील समकालीन शिल्पकारांमधील ते पहिलेच शिल्पकार ठरले. हा पुतळा रेल्वे वॅगनमधून पुण्यात नेला गेला व १९२८ साली त्यांची स्थापना झाली. या स्मारकशिल्पामुळे करमरकरांची अग्रगण्य शिल्पकारांमध्ये गणना होऊ लागली.

    या संस्मरणीय कामगिरीनंतर अनेक उत्तमोत्तम कलाकृती घडवल्या. ‘मत्सगंधा‘, विठ्ठलभाई पटेलांचा पूर्णाकृती पुतळा‘ आचार्य कृपलानी‘, ऑटो रॉथफिल्ड‘ यांच्या पुतळयांचा त्यांची ‘मोरु‘ ,‘प्रवासी‘, नमस्ते‘ आदी शिल्पही लक्षणीय ठरली. या व्यतिरिक्त करमरकरांनी भारतातील अनेक संस्थानिक व त्यांच्या घराण्यातील व्यक्तींचीही शिल्पं घडवली.

    ‘नानासाहेब‘ या आदरार्थी संबोधनाने परिचित असलेल्या करमरकरांचं कौशल्य लक्षात घेऊन १९४९ साली त्यांना अमेरिकेच्या विस्कान्सिन विश्वविद्यालयात प्रात्यक्षिकाकरिता निमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांच्या शिल्पकलेतील योगदानाचा गौरव म्हणून भारत सरकारने १९६२ साली त्यांना ‘पद्मश्री‘ किताबाने सन्मानित केलं. तसेच १९६४ साली ‘ललित कला‘ अकादमी ने त्यांना फेलोशिप देऊन त्यांचा यथोचित गौरव केला. या थोर शिल्पकाराचं १९६६ साली म्हणजे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झालं.

      March 11, 2015


  • भारतातील ज्येष्ठ पर्कशनिस्ट (तालवादक) तौफिक कुरेशी

    जिम्बे या वाद्याला भारतामध्ये नावारूपाला आणणारे तसेच आंतराष्ट्रीय पातळीवर संगीतामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेले व उस्ताद अल्लाराखा यांचे सुपुत्र आणि उस्ताद झाकीर हुसेन यांचे लहान भाऊ असलेले सुप्रसिद्ध संगीतकार तौफिक कुरेशी यांनी संगीत क्षेत्रात स्वतःच्या प्रतिभेचा ठसा उमटवला. त्यांचा जन्म ९ ऑगस्ट १९६२ रोजी झाला. उस्ताद अल्लाराखा आणि उस्ताद झाकीर हुसेन हे त्यांचे गुरु होत. त्यांच्या घरी मोठमोठे कलाकार यायचे.

    पं. रविशंकरजी, पं. हरिप्रसादजी, पं. शिवकुमारजी, उस्ताद अमजद अलीजी, उस्ताद अली अकबर खांसाहेब असे. त्यांना नुसते पाहणे, त्यांच्या चर्चा ऐकणे, हाही त्यांचा मोठा रियाझ होता. पर्क्युशनिस्ट म्हणून जगभरात नाव कमावलेल्या तौफिक कुरेशी यांना या वाद्याचे अनभिषिक्त सम्राट मानले जाते. एक उत्कृष्ट तबला व ताल वादक असलेल्या कुरेशी यांनी संगीतकार म्हणूनही नाव कमावले आहे.

    अभिजात भारतीय संगीतातील पारंपारिकता आणि त्यातील आधुनिकता यांची सांगड कुरेशी यांनी घातलेली आहे. त्यांनी सिनेसृष्टीत अनेक वर्षे विविध तालवाद्य्ो वाजवली आहेत. २००० मध्ये त्यांचा ‘ऱ्हिधून’हा नवा अल्बम आला. त्यात त्यांनी ‘ऱ्हिदमचे, तालाचे वेगळे प्रयोग केले आहेत. उस्ताद अल्लाराखा यांनी त्यात अनेक वर्षांनी गायन केले होते.‘ऱ्हिधून’अल्बमने तौफिक कुरेशी यांची नवी ओळख निर्माण झाली. ग्रॅमी अॅवॉर्डप्राप्त ‘ग्लोबल ड्रम प्रोजेक्ट’या अल्बममधील त्यांच्या सहभागाची आणि त्यांनी सादर केलेल्या वादनाची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली आहे. पर्क्युशन वाद्याच्या क्षेत्रात स्वतःचा दबदबा निर्माण केलेले तौफिक या वाद्यावरील त्यांच्या पकडीमुळे आणि सादरीकरणाच्या आपल्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीमुळे नेहमीच प्रेक्षकांच्या मनात जागा पटकावून बसले आहेत.

    जयपूर-अतरौली घराण्याच्या गायिका गीतिका वर्दे-कुरेशी या तौफिक कुरेशी यांच्या पत्नी होत. १९९३ साली उभयतांनी परस्परांचे आयुष्यभराचे जोडीदार म्हणून नव्या प्रवासाला सुरुवात केली. नझरिया, हम अपने, मीरा, तुम बिन, ले आयिले हे त्यांचे अल्बम गाजलेले आहेत. तौफिक कुरेशी व गीतिका वर्दे यांचा मुलगा शिखरनाद हा तबला वादक आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      August 9, 2021


  • बालकवी ठोंबरे

    बालकवी ठोंबरे यांचे संपूर्ण नाव त्र्यंबक बापूजी ठोंबरे असे होते. त्यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९० रोजी झाला. बालकवींच्या फ़ुलराणी, संध्यारजनी, तारकांचे गाणे, अरुण, आनंदी-आनंद, निर्झरास, श्रावणमास यांसारख्या कवितांनी मराठी काव्यरसिकांस संमोहित केले आहे. बालकवींच्या एकूण कवितेमध्ये उदासीनता व्यक्त करणाऱ्या बारा-तेरा तरी कविता आहेत. कविबाळे, पाखरास, दुबळे तारू, यमाचे दूत, निराशा, पारवा, शून्य मनाचा घुमट, काळाचे लेख, खेड्यातील रात्र, संशय, हृदयाची गुंतागुंत, जिज्ञासू, बालविहग ह्या कविता त्यांपैकीच होत.

    बालकवींच्या निसर्ग कविता पाठ नाहीत, असे पन्नास वर्षापूर्वी महाराष्ट्रात क्वचितच घर होते. त्या काळात ‘सेव्ह’ नव्हतं. जे काही होतं ते पाठांतर. त्यामुळेच श्रावण संपत आला की, बालकवी आठवतात. त्यांचा इंद्रधनू आठवतो. त्यांची आनंदी आनंद गडे घडाघडा पाठ म्हटली जाते. जीवनाचा आनंद बालकवींना सर्वत्र दिसला. वाहणा-या वा-यावर, दशदिशांत आणि जगात सुद्धा आणि एवढा सगळा आनंद जीवनात अनुभवल्यानंतर तो शिल्लकही राहिला. द्वेष संपला, मत्सर गेला आणि जिकडे तिकडे आनंद उरला. बालकवींचे जीवन किती सुंदर होते, याची ही कविता म्हणजे साक्ष आहे.

    बालकवींच्या कवितेमध्ये निसर्गवर्णनावर विशेष भर आहे. निसर्गामध्ये त्यांना मानवी चैत्यनाचा प्रत्यय येतो .नादमाधुर्य हे त्यांच्या कवितेचे आणखी एक वैशिष्टय सांगितले जाते. बालकवींना निसर्गाविषयी वाटणारे प्रेम आणि त्या प्रेमाचा त्यांनी आपल्या काव्यातून घडवलेला आविष्कार यामुळेच त्यांना ‘निसर्गकवी ’म्हटले जाते. फ़ुलराणीचे वर्णन करताना ते म्हणतात.

    "हिरवे हिरवे गार गालिचे
    हरित तृणांच्या मखमालीचे
    त्या सुंदर मखमालीवरती
    फ़ुलराणी ही खेळ्त होती"
    बालकवी ठोंबरे यांचे निधन ५ मे १९१८रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      May 8, 2017


  • डॉ. ना. भि. परुळेकर (नानासाहेब परुळेकर)

      December 15, 2010