जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
वेदांग ज्योतिष ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणजे गुढीपाडवा. हिंदू संस्कृतीचं प्रतीक. मोठय़ा उत्साहानं आणि जोशानं साजरा केला जाणारा सण. सणाचं हेच औचित्य साधून मला फोटोशूट करण्यासाठी विचारण्यात आलं होतं. शूटसाठीच्या मॉडेलचा माझा शोध सुरू झाला. त्यात मराठी संस्कृतीचं प्रतिनिधित्व करू शकेल, अशा कलावतीच्या मी शोधात होतो. ही शोधमोहीम संपली आणि मी थेट फिल्मसिटीत पोहचलो ते पाडव्याच्या फोटोशूटसाठी. मराठी संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणाऱया संस्कृती बालगुडे हिचं फोटोशूट यानिमित्तानं मी केलं. हिरव्या बॅकग्राऊंडवर बेतलेलं, संस्कृती बालगुडेचा मराठमोळा सात्त्विक चेहरा आणि उभारलेल्या गुढीचं पूजन हे सारं एकीकडे कॅमेराबद्ध करत असतानाच दुसरीकडे शूटच्या वेळच्या अनेक आठवणी तेव्हा माझ्या शिदोरीत जमा होत होत्या.
संस्कृती बालगुडेची नि माझी ही पहिलीच भेट होती. चंद्रकांत गायकवाड या नामांकित तरुण दिग्दर्शकानं ही भेट खरंतर घडवून आणली होती. अवघ्या एक दिवस आधी हे शूट आम्ही ठरवलं होत. वेळेअभावी फारसं शूटचं नियोजन आम्हाला करता आलं नव्हतं. एरव्ही एखाद्या सणासाठीच शूट करायचं झालं तर त्याची फार जय्यत तयारी करावी लागते. कलावतीचा शृंगार, पेहराव, दागिने, शूटसाठीचा लूक आणि मग हे शूट तडीस नेण्यासाठी रंगभूषा, वेशभूषा साकारण्यासाठी लागणारे आर्टिस्ट, प्रॉपर्टी अशा नानाविध बाबींच पूर्वनियोजन करून मगच शूट आयोजित केलं जातं. मात्र वेळेअभावी भेटून, ठरवून हे शूट काही आम्हाला करता आलं नाही. सारं काही ठरलं ते फोनवर. नेमकं शूट कसं असेल, त्यासाठी काय अपेक्षित आहे, लूक कसा असेल, काय प्रॉपर्टी असेल हे सारं मी आणि संस्कृतीनं फोनवरच ठरवलं होतं. तेव्हा ‘पिंजरा’ या मालिकेत संस्कृतीची मध्यवर्ती भूमिका होती. याच मालिकेच्या सेटवर मी आणि संस्कृती भेटलो. संस्कृतीसोबत तिची आईदेखील होती.
सेटवर शूट असल्याने मेकअप, हेअर आणि कॉश्च्युम यासाठीची तयारीत आम्हाला फारसं लक्ष घालावं लागलं नाही. या मालिकेत संस्कृतीचा जो पेहराव होता त्याच पेहरावात आम्ही फोटोशूट केलं. सेटच्या आवारात असलेल्या झाडांच्या हिरव्या बॅकग्राऊंडवर आम्ही हे शूट केलं. एकीकडे मालिकेचं शूट सुरू असल्याने आम्हाला या वेळी फार कमी वेळ मिळाला होता. आतून संस्कृतीला सारखा आवाज दिला जात होता. मात्र संस्कृतीचं सगळं लक्ष फोटोशूटकडे होतं. तिचा चेहरा फार बोलका होता. संस्कृती गुढीची पूजा करत असतानाचे हावभाव, तिचा हसरा-मोहक चेहरा मी कॅमेराबद्ध करत होतो. मोजक्या वीस-पंचवीस मिनिटांत हे शूट आम्ही केलं. या वेळी संस्कृतीच्या भावमुद्रा फार महत्त्वाच्या होत्या. अन्यथा हे शूट पूर्ण करणं शक्य झालं नसतं. इतक्या कमी वेळात, एका मालिकेतल्या आपल्या मध्यवर्ती भूमिकेतून बाहेर पडून मराठी संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणाऱया मराठमोळ्या स्त्रीच्या भूमिकेत जाऊन त्या भूमिकेला न्याय देणं हे संस्कृतीला या वेळी उत्तम जमलं होतं. इथेच एका कसदार कलाकाराचं लक्षण या वेळी संस्कृतीत मला पाहायला मिळालं.
या शूटनंतर आमची दुसरी भेट झाली ती स्टुडिओ शूटच्या निमित्ताने. मराठमोळा चेहरा अशीच या शूटचीदेखील थीम होती. मात्र या वेळी शूटचं नियोजन उत्तम करता आलं होतं. मला हवा तेवढा वेळ या शूटसाठी मिळणार होता. कोणतेही निर्बंध नव्हते. कसलीही घाई नव्हती. संस्कृतीनेही शूटसाठीचा वेळ राखून ठेवल्याने त्याचा शूटसाठी फायदाच झाला होता. स्टुडिओतलं शूट असल्याने लायटिंगवर ताबा मिळावणं शक्य होत. शूटसाठीची थीम संस्कृतीशी बोलून मग त्यानंतर कॉश्यूम, मेकअप, हेअर आणि दागिने हे सर काही संस्कृतीला शूटच्या आधी माझ्या टीमनं सांगितलं होतं. संस्कृतीलाही ही थीम आवडली होती. त्यामुळे शूट चांगलं होईल अशी आकांक्षा मला होती.
शूटसंबंधित संस्कृतीशी बोलून आम्ही ठरल्याप्रमाणे शूटला सुरुवात केली. संस्कृतीचा लोभस चेहरा, तिने केलेली पारंपरिक वेशभूषा, त्यावर मराठमोळा साजशृंगार, कलाकुसरीने सजलेले दागिने हे सारं काही कॅमेराबद्ध करण्याचा प्रयत्न मी करत होतो. हे शूट चांगलं तीन-साडे तीन तास चाललं. या वेळी ब्लॅक ऍण्ड व्हाइट फोटो टिपण्याचा मोह मला आवरता आला नाही. या ब्लॅक ऍण्ड व्हाइट पोर्ट्रेट्समध्ये संस्कृती अधिक खुललेली दिसत होती.
तीन-साडे तीन तासांअंती हे शूट धम्माल मस्तीत संपलं खरं. मात्र या वेळच्या अनेक आठवणी आजही कायम आहेत. वेळेच्या गणितात बांधली गेलेली आणि वेळेच्या साच्यात न अडकलेली अशा दोन्ही भिन्न वेळेची संस्कृती मी कॅमेराबद्ध केली आहे. दोन्ही वेळी मला शूटला न्याय देणारी कलावती हवी होती. आणि ती कलावती साकारण्यात संस्कृती यशस्वी ठरली.
धनेश पाटील
February 18, 2019
नाडकर्णी यांनी महानगरी नाटक, राजा छत्रपती (बालनाट्य), नाटकी नाटक (आगामी) ही पुस्तके लिहिली आहेत.
January 10, 2022
रघुनाथ रामचंद्र किणीकर उर्फ रॉय किणीकर हे सुप्रसिद्ध कवी व कलंदर कलावंत होते.
November 7, 2017
मनमोहन यांचे मूळ नाव गोपाळ नरहर नातू. पण लोककवी मनमोहन या नावानेच ते महाराष्ट्रला माहीत आहेत. त्यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९११ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव या गावी झाला.
शब्दांच्या गोडव्याने गीताला मधाळ करणारा हा कवी. सहज साधे शब्द, मनाला आनंद देणारी आणि जीभेवर रेंगाळत ठेवणारी त्यांची गाणी आजही ऐकायला ताजीतवानी वाटतात. मैत्रिणींनो सांगू नका नाव घ्यायला हे त्यांचं अतिशय गाजलेलं गाणं आजही नववधूला लाजवते. मा.मनमोहन नातू यांनी लिहिलेले हे गीत, मा.वाटवे यांची चाल आणि शब्द.
‘मैत्रिणींनो सांगू नका नांव घ्यायला..’
नववधूला स्त्रीसुलभ भावनेमुळे मैत्रिणींच्या गराडय़ात पतीचे नाव घेताना वाटणारा लज्जायुक्त संकोच या गीतात आढळतो. ही संकोचाची भावना कवी मनमोहनांच्या शब्दांत पुरेपूर दिसून येते. या गीतातल्या नानाविध प्रश्नांतून ती अभिव्यक्त झाली आहे. ही नववधू शालीन आहे. सुसंस्कृत घरातली आहे. हे गाणे म्हणजे तिने मैत्रिणींशी केलेले हितगूजच आहे..
‘मैत्रिणींनो सांगू नका नांव घ्यायला नका विचारू स्वारी कशी?
दिसे कशी अन् हासे कशी?
कसं पाडलं मला फशी?
कशी जाहले राजीखुशी?
नजीक येता मुहूर्तवेळा, काय बोललो पहिल्या भेटी
कसे रंगले स्वप्न पहाटी? कशी रंगली लाली ओठी?
कसा जाहला जीव खुळा? मैत्रिणींनो..
अर्थ उलगडे समरसतेचा, सुटे उखाणा संसाराचा
छंद लागला मजला त्यांचा,
धुंद बने बुलबुल जिवाचा
घरी यायची झाली वेळां, मैत्रिणींनो..’
राधे तुझा सैल आंबाडा, बापूजींची प्राणज्योती... ह्या त्यांच्या गाजलेल्या रचना. अतिशय साधं रहाणीमान असलेला हा कवी आपल्या कवितेत मनातील प्रतिबिब उभं करत असे. ते लिहितात, राजकीय पुरुषांची कीर्ती, मुळीच मजला मत्सर नाही । आज हुमायुन बाबरापेक्षा, गलिब हृदये वेधित राही । युगायुगांचे सहप्रवासी, अफुच्या गोळ्या, उद्धार, शिवशिल्पांजली हे त्यांच्या नावावर असलेले काव्यसंग्रह. मा.मनमोहन यांचे पुस्तक वा पुस्तिकारूपाने प्रसिद्ध झालेले अनेक काव्यसंग्रह आहेत. त्यातले ‘ताई तेलीण’, ‘सुनीतगंगा’, ‘कॉलेजियन’, ‘शंखध्वनी’, ‘अफूच्या गोळ्या’, ‘दर्यातील खसखस’, ‘कुहू-कुहू’, ‘शिव शिल्पांजली’ हे संग्रह प्रसिद्ध आहेत. ‘दर्यातील खसखस’ या पुस्तकाचे प्रकाशक आर. बी. समुद्र लिहितात- ‘उदयोन्मुख कविपंचकात मनमोहन या तरुण व प्रतिभासंपन्न कवीचे स्थान फार वरचे आहे. आपल्या प्रखर बुद्धीने आणि विशिष्ट मनोवृत्तीने काव्यरचना करून त्यांनी प्रचलित काव्यपद्धतीला विजेचे धक्के दिले आहेत. त्यांच्याइतकी सुंदर प्रेमगीते मराठीत दुसऱ्या कोणत्याही कवीला लिहिता आली नाहीत.’ कवी ज. के. उपाध्ये यांना गुरुस्थानी मानणाऱ्या कवी मनमोहनांची कविता स्वतंत्र होती. त्यांच्या कविता तर उत्तम होत्याच; परंतु ध्वनिमुद्रिकांमधील भावगीतांतून त्यांना जास्त नाव मिळालं. वाटवे यांनी त्यांच्या काही कविता स्वरबद्ध केल्या आणि ती गाणी लोकप्रिय झाली. सर्व विषयांना आपल्या कवितेत स्पर्श करणारे लोककवी पत्नीच्या निधनानंतर आपल्या भावना शब्दबद्ध करताना म्हणतात. वृंदावनातील तुळस जळाली, मागे उरल्या दगडविटा, त्यांनी एके ठिकाणी म्हटले आहे,‘कलेवर कवीचे जाळू नका हो,जन्मभर तो जळतच होता. फुले तयावर माळू नका हो,जन्मभर होत फुलतच होता’ यात ते स्वतःबद्दलच्या भावना हृदयस्पर्शी शब्दात व्यक्त करताना ते दिसतात. मनमोहन नातू यांचे ७ मे १९९१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
May 8, 2017
डॉ. गंगाधर पानतावणे हे मराठीतील लेखक, समीक्षक व विचारवंत आहेत
December 15, 2010
लुईस आणि डकवर्थ यांनी १९९७ मध्ये एक फॉर्म्युला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला सादर केला.१९९७ साली झिमाब्वे आणि इंग्लंडदरम्यानच्या सामन्यात हा नियम पहिल्यांदा वापरण्यात आला. १९९९ मध्ये याचा वापर इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये करण्यात आला.
February 25, 2022
मधुबाला म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेले स्वप्न. त्यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९३३ रोजी झाला. भारतीय सौंदर्याचा प्रवास मधुबाला यांच्याजवळ येऊन थांबतो. अत्यंत सुंदर रूप घेऊन जन्माला आलेल्या मधुबाला यांची कारकीर्द मात्र शापित ठरली. आपल्या मोहक हास्याने आणि अभिनयाने अनेकांना घायाळ करणारी हिदी चित्रपट अभिनेत्री मधुबाला यांचे खरे नाव मुमताज जहान बेगम दहलवी. लहानपणी बेबी मुमताज म्हणूनही त्या ओळखल्या जायच्या. बाबुराव पटेल आणि डॉ. सुशीलाराणी पटेल या दांपत्याचा मधुबालावर विशेष लोभ होता. डॉ. सुशीलाराणी पटेल यांनीच बेबी मुमताजचे 'मधुबाला' असे नामकरण केले होते. मधुबाला लौकिक अर्थाने शिकलेली नव्हती. मधुबाला यांनी इंग्रजी संभाषणाचे धडे सुशीलाराणी पटेल यांच्याकडून घेतले होते. त्यांना एकुण दहा बहीणभावंडे होती. मधुबाला आपल्या आईवडिलांची पाचवी मुलगी होती. बालवयातच काम करायला सुरुवात केल्यामुळे मधुबाला कधी शाळेत जाऊ शकली नव्हती. तिला उर्दू भाषा येत होती, परंतु इंग्रजीचा एकही शब्द तिला बोलता येत नव्हता. .मधुबालावर तिच्या वडिलांचा पगडा खूप जास्त होता. मा.मधुबाला खूप भावूक होत्या. वडिलांच्या कडक शिस्तीमुळे मधुबाला कधीही पार्टी, प्रीमिअरमध्ये दिसली नाही. 'अमर' सिनेमातील एका सीनमध्ये निम्मी यांनी दिलीप कुमार आणि मधुबाला यांना डान्स स्टेप्स शिकवले होते, परंतु मधुबाला यांची एक स्टेप चुकीची केली, त्यामुळे सर्वांनी त्यांची खिल्ली उडवली होती. खिल्ली जेव्हा गंभीर होत गेली तेव्हा मात्र निम्मी यांना मधुबाला यांची माफी मागावी लागली होती. मधुबाला यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, 'निम्मीने मेकअप रुममध्ये येऊन माझी माफी मागितली होती. १९४२ साली आलेल्या 'बसंत' या सिनेमाद्वारे त्यांनी बालकलाकाराच्या रुपात पहिल्यांदा पडद्यावर एन्ट्री घेतली. त्यावेळी त्यांचे वय होते अवघे नऊ वर्षे. तर अभिनेत्री म्हणून १९४७ मध्ये 'नीलकमल' या सिनेमात त्या पहिल्यांदा झळकली होत्या. याचवर्षी त्यांचा आणखी एक चित्रपट रिलीज झाला होता. 'दिल की रानी' हे दुस-या सिनेमाचे नाव. १९४८ मध्ये मधुबाला यांचा 'अमर प्रेम' हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सर्व सिनेमात मा.मधुबाला राज कपूर यांच्यासोबत झळकली होती. या सिनेमानंतर मधुबाला यांनी बॉम्बे टॉकीजच्या 'महल' सिनेमात काम केले होते. 'महल'ला मिळालेल्या यशानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्याकाळातील आघाडीच्या अभिनेत्यांसह मधुबालाने काम केले होते. अशोक कुमार, दिलीप कुमार, देवानंद या आघाडीच्या अभिनेत्यांसह मधुबालाने स्क्रिन स्पेस शेअर केली होती. आपल्या करिअरमध्ये त्यांनी एकुण ६६ सिनेमांमध्ये प्रमुख अभिनेत्री म्हणून काम केले होते. १९४४ मध्ये 'ज्वार भाटा' सिनेमाच्या सेटवर मधुबालाची भेट दिलीप कुमार यांच्यासोबत झाली. या काळात मधुबाला दिलीप कुमार यांच्यावर एकतर्फी प्रेम करु लागली होती. त्यावेळी तिचे वय १८ वर्षे तर दिलीप कुमार यांचे वय २९ वर्षे होते. 'मुगल-ए-आझम' हा सिनेमा तयार होण्याच्या नऊ वर्षांच्या काळात या दोघांचे प्रेम अधिक फुलले. दिलीप कुमार यांच्यासह लग्न करण्याची तिची इच्छा होती. मात्र दिलीप कुमार यांनी लग्नाला नकार दिला. त्यानंतर किशोर कुमार यांच्यासह मधुबालाचे लग्न झाले. मधुबाला किशोर कुमार यांची चौथी पत्नी होती. किशोरकुमार यांच्या बरोबरचे लग्न ही बाब दोघासाठी कसेतरी जगण्यासाठी केलेली तडजोड होती जिचे अंतिम रूप त्यांना माहित होते. मधुबालाला हृदयरोग होता आणि १९५० पासून तिच्या आजारावर उपचार चालू होता. परंतु तिने ही गोष्ट सर्वांपासून लपून ठेवली. ह्रदयविकारामुळे ती कधीही आई होऊ शकत नव्हती हे डॉक्टर्सनी सांगितल्यामुळे तो हर्ष देखील तिला कधीच मिळणार नव्हता. निम्मी, नादिरा आणि संगीतकार नौशाद अशी तीन चार मंडळीच तिला मित्र म्हणून लाभले होते. लग्नानंतर अंधेरी मध्ये केव्हातरी नौशाद यांच्या घरी ती ये-जा करायची. अशाच एके दिवशी नौशाद पतीपत्नींनी तिला नैराश्याने रडताना पाहिल्यावर किशोर बरोबर फारकत घेण्याचा सल्ला दिला व पुनश्च नव्या जोमाने चित्रपटात येण्याचा आग्रह केला, पण फुलात तो जोम आता राहिला नव्हता. नौशादना उत्तर म्हणून तिने फक्त एक "शेर" ऐकीवला :
"जब कश्ती साबित-ओ-सालीम थी
साहिल कि तमन्ना किसको थी ?
अब ऐसी शिकस्त कश्ती में
साहिल कि तमन्ना कौन करे ?..."
हिंदी समीक्षक मधुबाला यांच्या अभिनय काळाला 'स्वर्णयुग' म्हणतात. नर्गिस यांच्या नंतर भारतीय टपाल खात्याने मधुबाला यांचे तिकीटा काढून मान दिला होता. मधुबाला यांचे निधन २३ फेब्रुवारी १९६९ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०७१३३
संदर्भ.इंटरनेट
February 14, 2017
भारत सरकारने १९८५ मध्ये १२ जानेवारी या दिवसाला ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा करायचे ठरवले. या दिवसाला असं काय महत्व आहे? तर हा दिवस म्हणजे स्वामी विवेकानंद यांची जयंती.
” उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्हाला तुमचे ध्येय मिळत नाही” हा संदेश मा.स्वामी विवेकानंद यांनी तरुणांना दिला.
स्वामी विवेकानंद म्हणजे योद्धा, संन्यासी, आणि तरुण पिढीचे अखंड प्रेरणास्रोत, ज्यांनी फक्त भारतातल्या युवा पिढि समोरच आदर्श नाही तर संपूर्ण जगातल्या युवा पिढीसमोर आदर्श ठेवला. सगळे देश भारताकडे मोठ्या आशेने बघतो आहे. का तर ? कारण भारत एक संधीचा देश आहे, या देशात अनेक संधी आज वाट बघत आहेत. जग भारताकडे आशेने बघते आहे कारण आज आपला देश सर्वात तरुण देश आहे. ज्या देशाची ६५ टक्के लोकसंख्या तरुण असेल, ३५ वर्षांच्या आतली असेल, तो देश किती भाग्यवान आहे, आमच्याकडे आज कोटी कोटी युवा जनता आहे. आणि जिथे ही तरुणाई असते न, तिथे संकल्पाना काही सीमा नसतात, बंधने नसतात. कधी कधी आपल्या देशात युवकांच्या वेगवेगळ्या व्याख्या ऐकायला मिळतात.
शास्त्रापासून आजपर्यंत तरुणाईच्या अनेक व्याख्या झाल्या आहेत. प्रत्येकाचा आपापला दृष्टीकोन असतो, अनेकांना वय हेच तारुण्याची ओळख आहे असे वाटते. युवापिढी म्हणजे नव्या विचारांची आणि आधुनिकतेची सांगड घालून आपले म्हणणे समाजापुढे मांडणारी नव्या जोशाची पिढी. खरं पाहता आपल्याला विविध प्रकारच्या क्षेत्रात चांगले यश पादाक्रांत करण्याची सुवर्ण संधी आणि पुरेसा वेळ आहे. भारताच्या एकुण लोकसंख्येपैकी तरुणांची संख्या अधिक आहे.तरूण म्हणजे प्रचंड उत्साह, काहीतरी करून दाखवण्याची धडपड, तरुण म्हणजे प्रचंड जोश,तरुण म्हणजे अफाट इच्छाशक्ती….अशी कितीतरी विशेषण तरुणांना लागू पडतात. जगात तरुणांची संख्या अधिक आहे, त्यामुळे विविध तंत्रज्ञानात तरुणांची भरारी विलक्षणीय आहे.
कधी तरुणाईचे पाऊल भलत्याच दिशेने पडताना दिसत आहे. त्याच कारण म्हणजे व्यसनाधीनता, चंगळवाद ,सोशल मिडीयाचा अतिरेक. ही तरुणपिढीला लागलेली वाळवी आहे. कुठल्याही देशाची प्रगती ही तिथल्या तरुणांवर अवलंबून असते त्यामुळे आपल्या देशाला भक्कम आधार आपण तरुणच देऊ शकतो हे प्रत्येकाने ध्यानात घेणे गरजेचे आहे.
विशेषतः भारताचं सरासरी वय हे २५ आहे. त्यामुळे भारत जगातील सर्वात तरुण देश ठरतो. युवा वर्गाने स्व:ताला टेक्नॉसलॉजीशी इतके सुसंगत ठेवले आहे, की ते जगाशी ओळख ठेवून आहेत. कुठे काय घडतंय हे त्यांना माहीत असते. पण याच टेक्नॉठलॉजीशी ते इतके भावनिक गुंतले गेले आहेत, की त्यामुळे तिथूनच त्यांना नैराश्य ही येते. तर खरच आपणच आपण भविष्य घडवायला हवे, कोणावरही अवलंबून राहणे हे योग्य नाही.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 12, 2019
जुन्या काळातील चित्रपट छायालेखक पांडुरंग सातू नाईक यांना आल्हाददायकता, कल्पकता व वास्तवता ही वैशिष्ट्ये असलेले चित्रपट छायालेखक म्हणून ओळखले जायचे.
October 1, 2019
प्रेमानंद गज्वी हे सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून समाजातील विदारक सत्य प्रभावीपणे मांडणे यासाठी प्रसिद्ध आहेत. प्रेमानंद गज्वी यांचे ‘घोटभर पाणी’ अनेक भारतीय भाषांत अनुवादित झालं. ‘श्रेष्ठ भारतीय एकांकी’ या द्विखंडीय ग्रंथात प्रसिद्धही झालं.
July 9, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti