जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
दत्ता केशव यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट ‘अति शहाणा त्याचा.’ (१९६७) त्या वेळेस हा चित्रपट मराठी आणि भोजपुरी भाषेत करण्यात आला होता. पुढे ‘बायांनो नवरे सांभाळा’ हा चित्रपट १९७४-७५ साली प्रदर्शित झाला. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन दत्ता केशव यांचे होते. ‘पिंजरा’नंतरचा हा मराठी रंगीत चित्रपट होता.
June 30, 2022
श्रीपाद नारायण पेंडसे यांनी मराठी भाषेतील एक कथालेखक व कादंबरीकार मराठी कादंबरीक्षेत्रात आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले होते. त्यांचा जन्म ५ जानेवारी १९१९ रोजी झाला.शिक्षणानंतर बी. ई. एस. टी. मध्ये ते रूजू झाले. त्यांच्या लेखनाला कथा लेखनापासून सुरुवात झाली. १९३८ मध्ये सह्याद्री मासिकात त्यांची ‘जीवनकला’ ही पहिली कथा प्रसिद्ध झाली. नंतर काही व्यक्तिचित्रे त्यांनी लिहिली. १९४१ साली त्यांचे पहिले पुस्तक ‘खडकावरील हिरवळ’ प्रसिद्ध झाले. त्यानंतर हिंदू-मुसलमानांच्या दंग्यावर आधारलेली ‘एल्गार’ ही कादंबरी प्रकाशित झाली. ‘हद्दपार’ ही कादंबरी खूपच लोकप्रिय झाली. पुढे ‘गारंबीचा बापू’, ‘हत्या’, ‘यशोदा’, ‘कलंदर’ इ. कादंबर्यांिनी यशाचे शिखर गाठले. १९६२ साली लिहिलेल्या ‘रथचक्र’ या कादंबरीला १९६४ साली साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. पेंडसेंच्या सुरुवातीच्या कादंबर्यांतमधे कोकणचा प्रदेश आणि त्यातली माणसे हे वर्णन प्रकर्षाने येत असे. पण ‘लव्हाळी’ आणि ‘ऑक्टोपस’ ला मुंबईची पार्श्वभूमी आहे. ‘ऑक्टोपस’चे वैशिष्ट्य म्हणजे ही कादंबरी केवळ पात्रांच्या संवादातूनच पुढे जाते.
त्यानंतरची श्री.ना.पेंडसे यांची चैतन्यपूर्ण कादंबरी म्हणजे ‘तुंबाडचे खोत’. चार पिढ्यांच्या कहाणीची ही चौदाशे पानांची कादंबरी दोन खंडात विभागली आहे. मानवी वृत्तीचे गूढ, कोकणातील निसर्ग, जिवंत व्यक्तिचित्रण, नाट्यपूर्ण संवाद आणि ओघवते निवेदन यामुळे ही कादंबरी वाचकाच्या मनाची पकड घेते.
‘गारंबीचा बापू’, ‘राजे मास्तर’, ‘यशोदा’, ‘संभुसांच्या चाळीत’, ‘असं झालं उजाडलं’, ‘चक्रव्यूह’, ‘रथचक्र’ ह्या त्यांच्या नाटकांनी रंगभूमीवरही यश प्राप्त केलं. ‘जुम्मन’ नावाचा त्यांचा कथासंग्रहही प्रसिद्ध आहे. ‘श्री. ना. पेंडसे. लेखक आणि माणूस’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे. श्री.ना. पेंडसे यांना नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा मानाचा ‘जनस्थान’ पुरस्कार प्राप्त झाला होता. श्री.ना.पेंडसे यांचे २२ मार्च २००७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 5, 2017
व्ही पी बेडेकर अँन्ड सन्सचे डायरेक्टर अतुल बेडेकर यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९६७ रोजी झाला. अतुल बेडेकर रा. स्व. संघाच्या गिरगाव नगराचे संघचालक होते. तसेच जनता सहकारी बँक पुणेचे संचालकही होते. इतरही अनेक सामाजिक संस्थांमधे मोठ्या प्रमाणात ते सक्रीय सहभागी होते.
November 4, 2023
दिग्दर्शक-निर्माते रमेश सिप्पी यांनी आत्तापर्यंत बॉलिवूडला अनेक सिनेमे दिले, मात्र शोले सिनेमाने त्यांनी जी प्रसिद्ध मिळवून दिली,ती इतर सिनेमांमुळे त्यांना मिळाली नाही. एकच सिनेमा त्यांच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरला.या सिनेमाने अनेक रेकॉर्ड प्रस्थापित करत त्यांचे नाव इतिहासातील महान दिग्दर्शकांमध्ये नोंदवले गेले. त्यांचा जन्म २३ जानेवारी १९४७ पाकिस्तानमधल्या कराचीमध्ये झाला.
रमेश सिप्पी यांचे वडील जी.पी.सिप्पी प्रख्यात निर्माते होते. वयाच्या नवव्या वर्षी रमेश सिप्पी यांनी पहिल्यांदा कॅमे-यासमोर काम केले होते. १९५३ मध्ये वडिलांच्या 'शहंशाह' या सिनेमात रमेश यांनी बालकलाकाराच्या रुपात काम केले होते.रमेश यांनी दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.या दोन्ही क्षेत्रात त्यांना यश प्राप्त झाले. १९७१ मध्ये 'अंदाज' या सिनेमाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी सात वर्षे सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. "अंदाज', "सीता और गीता', "ब्रह्मचारी' वगैरे चित्रपटांनी सुरवात करणाऱ्या रमेश सिप्पी यांनी अल्पावधीतच चित्रसृष्टीत भक्कम स्थान निर्माण केले. "शोले'ने त्यांचे नाव इतिहासात लिहिले गेले. त्यानंतर आलेला "शान' जरी कोसळला असला, तरी डिंपल कापडियाचे पुनरागमन असलेला "सागर' चांगला चालला.
"शक्ती'मध्ये त्यांनी दिलीपकुमार, अमिताभ बच्चनला प्रथमच एकत्र आणले. चित्रसृष्टीत असे वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या या दिग्दर्शकाने "बुनियाद' या मालिकेद्वारे टीव्हीवरही प्रयोग केला आणि तो तुफान यशस्वी ठरला. "शोले'प्रमाणेच या मालिकेतील मास्टरजी, लाजोजी वगैरे पात्रे घराघरांत पोचली. रमेश सिप्पी दिग्दर्शक म्हणून दिलेले अंदाज, सीता और गीता, शोले, शान, शक्ति,सागर, जमीन, भ्रष्टाचार, जमाना दीवाना, असे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले. रमेश सिप्पी यांनी दूरचित्रवाणी मालिका'बुनियाद'चेही दिग्दर्शन केले होते. ती टीव्ही मालिका पण खूप गाजली होती.
रमेश सिप्पी यांनी निर्माता म्हणून ब्रह्मचारी, कुछ ना कहो, ब्लफमास्टर, टॅक्सी नंबर 9211, चांदनी चौक टू चाइना, नौटंकी साला, सोनाली केबल या चित्रपटासाठी काम केले. त्यांनी अभिनेत्री किरण जुनेजा यांच्याशी विवाह केला. अभिनेत्री किरण जुनेजा रमेश सिप्पी यांच्या दुस-या पत्नी आहेत. रमेश सिप्पी यांना दोन मुले असून रोहन सिप्पी हे मुलाचे तर शीना सिप्पी हे मुलीचे नाव आहे. शीनाचे लग्न शशी कपूर यांचा मुलगा कुणाल कपूरसोबत झाले आहे. रोहन प्रसिद्ध दिग्दर्शक असून आपल्या वडिलांचा वारसा सांभाळत आहे. रमेश सिप्पी हे राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (एनएफडीसी) अध्यक्षपदी राहिले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 24, 2018
प्राध्यापक भालचंद्र वामन केळकर ऊर्फ मा.भालबा केळकर हे मराठी लेखक, नाट्यअभिनेते व रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन ही नाट्यसंस्था स्थापली. ते पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात रसायनशास्त्राचे अध्यापन केले
May 25, 2019
लोकेश गुप्ते हे नाव छोट्या पडद्यावर तसेच चित्रपट नाटकांतून अभिनेता व दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या परिचयाचे आहे. लोकेश गुप्ते ह्यांच्या अभिनयाची सुरूवात विनय आपटे ह्यांच्या अभिनेत्री नाटकांना झाली.
April 12, 2024
निरंजन उजगरे यांनी एक मुख्य काम केले ते म्हणजे कवी-संपादन-अनुवादाच्या कार्यासाठी भारतभर भ्रमण केले , आणि त्यांच्या महत्वाकांक्षी ‘ काव्यपर्व ‘ या पुस्तकांची निर्मिती झाली. . स्वातंत्र्योत्तर भारतीय कविता -२१ भाषा आणि १७० कवींच्या कविता त्यात आहेत.
July 1, 2022
घारे, (डॉ.) मुकुंद
सध्याच्या ओव्हर स्पेशलायझेशनच्या काळात आपापल्या क्षेत्रापुरता संकुचित विचार न करता त्या पलीकडे पाहणारे लोक सापडणे दुर्मिळच! निसर्ग, पर्यावरण, पाणी हे विषयही त्याला अपवाद नाहीत. अशी व्यापक दृष्टी असलेले पर्यावरण व जलअभ्यासक डॉ. मुकुंद घारे यांचे नुकतेच पुण्यात निधन झाले. भूशास्त्र, पाणी, नैसर्गिक साधनसंपत्ती, ग्रामीण समस्या आणि सध्याच्या सामाजिक स्थितीचे भान, अशा विविध गोष्टींचे नेमके आकलन हे घारे सरांचे वैशिष्टय़ होते.
त्यासाठी ते अनेक दिग्गजांसाठीसुद्धा गुरुतुल्य होते. कोकणातील खाणींविषयी भूशास्त्रीय सल्लागार, भूजलतज्ज्ञ तसेच ‘अफार्म’च्या माध्यमातून पाणलोट व ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात त्यांनी केलेले काम अनेकांना ज्ञात आहे; पण त्याच्या पलीकडेही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. बोलणे, जगणे आणि विचारातील साधेपणा त्यांच्याकडे होता. त्यामुळे विविध विषयांतील तज्ज्ञांपासून ते सामान्य माणसापर्यंत त्यांचा उत्तम संवाद असायचा. त्यांची विविध समस्या आणि प्रश्नांची उकल करणारी मांडणीसुद्धा अशीच साधी, सरळ असायची. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एका तज्ज्ञाबरोबरचकार्यकर्तासुद्धा दडलेला होता आणि समाजातील सर्व घटकांशी त्यांचा थेट संवादही होता. त्यामुळे अनेक तज्ज्ञांमध्ये पाहायला मिळणारा समाजापासूनचा तुटलेपणा त्यांच्यामध्ये कधीच जाणवला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विविध घटकांशी ते इतक्या सहजतेने व मिसळून वावरू शकायचे. म्हणूनच ते ज्ञान, अनुभव व वयाने मोठे असले तरी त्यांचे कधी दडपण येत नसे. त्यांचे आणखी एक वेगळेपण म्हणजे विदारक वास्तवाची माहिती व नेमकी जाणीव झाल्यामुळे येणारी निराशा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कधी दिसली नाही. समस्या परखडपणे मांडतानाही ते आशावादी होते. विविध प्रश्न, मुद्दे जाणून घेण्यासाठी त्या त्या भागात जाणे वयाच्या पंचाहत्तरीपर्यंत त्यांनी सुरूच ठेवले. अनेक तरुण विद्यार्थी घडविले. विषयाच्या माहितीबरोबरच त्यांना शहाणपणही दिले. त्यामुळेच त्यांचा सहवास म्हणजे शिकणे व शहाणेही होणे होते. सध्या पाणी, पर्यावरण, नैसर्गिक आपत्ती आणि शाश्वत विकास याबाबत अनेक समस्यांनी गंभीर रूप धारण केलेले असताना घारे सरांचे जाणे हे मोठे नुकसान आहे. त्यांनी दिलेले शहाणपण वापरणे आणि या प्रश्नांमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणे हीच घारे सरांना खरी आदरांजली ठरेल!
--------------------------------------------------------------------------------------------
घारे, (डॉ.) मुकुंद
पाण्यासाठी पावसावरच अवलंबून राहणार्या शेतकर्यांना 'पाणी अडवा पाणी जिरवा'चा मंत्र देऊन याबाबतच्या समस्येवर ठोस उपाय देणारे डॉ. मुकुंद घारे.
फर्ग्युसन कॉलेजमधून १९६६ मध्ये डॉ. मुकुंद घारे यांनी भूशास्त्राची पदवी मिळवून पुराजीवशास्त्रात पीएच.डी. मिळवली. परंतु आपल्या शिक्षणाचा समाजाला फायदा व्हावा या हेतूने त्यांनी राज्यभर फिरून विविध विभागांच्या भूरचना, पर्यावरण, जलसाठे आदींचा अभ्यास केला. सुरुवातीच्या काळात भूशास्त्रज्ञ म्हणून खाणींसाठी सल्लागार म्हणून काम केल्यावर त्यांनी पाणी या मुख्य समस्येवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. राज्यात पडणारा पाऊस, त्यातून निर्माण होणारे भूजलसाठे आणि त्याचा शेतकर्यांना होऊ शकणारा फायदा याचा सखोल अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी इस्त्रायलमध्ये भूजलावर संशोधन केले. अखंड भटकंती आणि अभ्यासातून सापडलेला 'पाणी अडवा-पाणी जिरवा'चा मंत्र त्यांनी प्रभावीपणे विविध माध्यमांच्या साह्याने शेतकरी बांधवांपर्यंत नेला.
राज्यात पाणलोटाची चळवळ सुरू झाली. पाऊस कोठे अधिक प्रमाणात पडतो, तर कुठे कमी. काही भाग अतिवृष्टीचे, तर काही अवर्षणग्रस्त. अशा विषम स्थितीत पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे व्यवस्थापन करून शेतीसाठी वापरण्याचे तंत्र घारे यांनी शेतकर्यांना दाखवून दिले. त्यांच्या पुढाकारामुळे दुष्काळग्रस्त मराठवाड्यात अनेक कोरड्या पडलेल्या विहिरी पुन्हा भरू लागल्या. राज्यात गावोगावी शेकडो शिबिरे घेऊन त्यांनी या विषयातील कार्यकर्तेही घडवले. आज राज्यात पाणी, पर्यावरण आणि कृषीक्षेत्रात कार्य करणारे अनेक नामवंत कार्यकर्ते डॉ. घारे यांचेच शिष्य आहेत. डॉ. घारे यांनी हे काम सुरू केले, तेव्हा सरकारी पातळीवर पाणलोट क्षेत्रात विशेष पुढाकार घेण्यात आला नव्हता. मात्र, त्यांच्या कामाचे महत्त्व ओळखत राज्य सरकारनेही पाण्याबाबतच्या योजनांसाठी त्यांना मार्गदर्शक म्हणून नेमले. 'अॅक्शन फॉर अॅग्रीकल्चर रिन्यूएशन इन महाराष्ट्र' (अफार्म) या संस्थेच्या माध्यमातून डॉ. घारे यांनी राज्यात जलव्यवस्थापनाचा जागर केला.
पाणी या विषयावर त्यांनी लिहिलेली पुस्तके सर्वसामान्यांपासून प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांसाठी जणू गाइड आहेत. हे सारे करताना सर्वसामान्यांशी असणारी बांधिलकी डॉ. घारे यांनी कायम ठेवली. अत्यंत साधे राहत आणि सर्वसामान्यांना समजेल असे बोलत त्यांनी पाणी आणि जमिनीचे विज्ञान तळागाळात रुजवले. म्हणूनच त्यांना या क्षेत्रात गुरूचे स्थान मिळाले.
वयाच्या ऐंशीव्या वर्षी ते कालवश झाले.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
August 5, 2017
एक सुप्रसिद्ध मराठी गायिका. मात्र सूर्यापुढे तारका फिक्या पडतात तसेच काहीसे ललिता फडके यांचं झालं. सुप्रसिद्ध गायक व संगीतकार सुधीर फडके यांच्या त्या पत्नी. आजच्या पिढीतील संगीतकार श्रीधर फडके यांची आई. मात्र ही त्यांची ओळख सांगणं त्यांच्यावर अन्याय करणारं ठरेल.
April 20, 2011
अदूर गोपालकृष्णन यांचे जास्त चित्रपट केरळमध्ये प्रदर्शित झालेले आहेत. त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांना केरळ साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे , भारत सरकारने त्यांना पदमश्री आणि पदमविभूण देऊन त्यांचा सन्मान केला आहे. चित्रपट क्षेत्रामधील मोठा सन्मान समजला जाणारा दादासाहेब फाळके सन्मान त्यांना मिळालेला आहे
July 27, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti