जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू भक्कम करणारं हे नाव. देशातल्या सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्वांमध्ये 43वं नाव. साळवे यांचे आजोबा पी. के. साळवे हे प्रख्यात क्रीमिनिल लॉयर होते. तर त्यांचे पणजोबा हे न्यायाधीश होते. साळवे यांचे वडील एन. के. पी. साळवे हे काँग्रेसचे दिग्गज नेते होते.
July 1, 2017
सिमी गरेवाल म्हटलं की आपल्याला ‘रांदेवू’ वुईथ सिमी गरेवाल’ हा त्यांचा शो आठवतोच. सिमी गरेवाल यांचे वडील जे. एस. ग्रेवाल आर्मीत ब्रिगेडियर होते. त्यांचे बालपण इंग्लंडमध्ये गेले आणि शिक्षण न्यूलँड हाऊस स्कूलमध्ये झाले होते. इंग्लंडमध्ये बालपण घालवल्यानंतर किशोरावस्थेत सिमी भारतात परतल्या. त्यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९४७ रोजी दिल्ली येथे झाला. वयाच्या पंधराव्या वर्षी तिला 'टार्जन गोज टू इंडिया' या सिनेमाची ऑफर मिळाली होती. हा सिनेमा सिमीने स्वीकारला होता. आपल्या पहिल्या सिनेमात तिला फिरोज खानबरोबर काम करण्याची संधी मिळाली होती. त्यांनी मेहबूब खान, राज कपूर, मृणाल सेन, राज खोसला अशा मात्तबर दिगदर्शकांबरोबर काम केले.
सिमी गरेवाल या बोल्ड सीन साठी त्या काळी फेमस होत्या. सिमी गरेवाल या 'दो बंधन', 'साथी', 'मेरा नाम जोकर' आणि 'सिद्धार्थ' या वादग्रस्त सिनेमासाठी ओळखले जातात. १९७२ मध्ये रिलीज झालेल्या 'सिद्धार्थ' या सिनेमात सिमी गरेवालने बॉलिवूडमधला पहिला न्यूड सीन देऊन खळबळ उडवली होती. हा सिनेमा सर्वाधिक वादग्रस्त सिनेमा ठरला होता. कोनरॉट रुक्सच्या 'सिद्धार्थ' या सिनेमात अनेक हॉट आणि वादग्रस्त सीन्स होते. एका सीनमध्ये तर शशी कपूर न्यूड सिमी ग्रेवालच्या समोर उभे दिसतात. हे छायाचित्र दोन इंग्रजी मासिकांनी आपल्या कव्हरपेजवर प्रकाशित केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. प्रकरण थेट न्यायालयात पोहोचले होते. शशी कपूर आणि सिमीच्या न्यूड सीनमुळे 'सिद्धार्थ' हा सिनेमा भारतात प्रदर्शित झाला नव्हता.
सिमी गरेवाल यांनी ६० पेक्षा जास्त चित्रपटात कामे केली आहेत. सिमी गरेवालने "रुखसत " या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. मिथुन चक्रवर्ती व अनुराधा पटेल यांच्या भूमिका होत्या. अभिनय सोबत सिमी गरेवाल एक अँकर म्हणूनपण आपल्या लक्षात आहे. ‘इंडियाज मोस्ट डिझायरेबल’ हा शो पण सिमी गरेवाल यांचा होता. दूरदर्शनवर Woman's World या नावाने त्यांनी डॉक्यूमेट्री केली होती. राजीव गांधी यांच्या जीवनावर राजीव या नावाने डॉक्यूमेट्री केली आहे. सिमी गरेवाल यांची खासियत म्हणजे त्या नेहमी पांढ-या रंगाचे कपडेच परिधान करतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
November 3, 2017
कल्पना चावला या भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर होत्या. पूर्ण नाव कल्पना बनारसीलाल चावला. त्यांचा जन्म १७ मार्च १९६२ रोजी कर्नाल, हरयाणा येथे झाला. त्यांचे कुटुंब हे एक मध्यमवर्गीय भारतीय कुटुंब होते. मुलींच्या तुलनेत मुलांना अधिक महत्त्व अशलेल्या समाजात लहानाची मोठी झाली तरही कल्पना यांनी आईच्या मदतीने नेहमी तिच्या स्वप्नांच्या दिशेने मार्गक्रमण केले .कल्पना यांनी शालेय शिक्षण कर्नाल येथे, तर चंदिगड येथून एअरॉनॉटिकल इंजिनिअरींग पूर्ण केले. कल्पना कधीही वर्गात पहिली आली नाही, तरीही कायम पहिल्या पाचमध्ये ती असायची. नासामध्ये काम करण्याचे ध्येय ठेवूनच कल्पना १९२ मध्ये त्या अमेरिकेत गेल्या. त्याठिकाणी त्यांनी एअरोस्पेस इंजिनिअरींगमध्ये एमएससीची पदवी मिळवली. १९८४ मध्ये टेक्सास विद्यापीठातून त्यांनी ही पदवी मिळवली. अॅस्ट्रॉनॉट बनण्यासाठी कल्पना यांना आणखी उच्चशिक्षण घेणे गरजेचे होते. त्यामुळे १९८६ मध्ये त्यांनी आणखी एक मास्टर डीग्री मिळवली. तर १९८८ मध्ये एअरोस्पेस इंजिनिअरींग विषयात पीएचडी पूर्ण केली. नासामध्ये काम करताना कल्पना यांनी येथील रिसर्च सेंटरमध्ये ओव्हरसेट मेथड्स या क्षेत्रात उपाध्यक्षपद मिळवले होते.
नासामध्ये उपाध्यक्षपद मिळवल्यानंतर कल्पना यांना Computational fluid dynamics (CFD) श्रेत्रात संशोधन करण्याची जबाबदारी देण्यात आली. शॉर्ट टेकऑफ आणि लँडींग कन्सेप्टबाबतचे हे संशोधन होते. कल्पना चावला या सर्टिफाइड कमर्शिअल पायलट होत्या. त्यांना सीप्लेन, मल्टी इंजिन एअर प्लेस आणि ग्लायडर चालवण्याचा परवाना होता. ग्लायडर आणि एअरोप्लेनसाठी त्या सर्टिफाइड फ्लाइट इन्स्ट्रक्टरही होत्या. १९९१ मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व मिळाल्यानंतर कल्पना चावला यांनी नासामध्ये अॅस्ट्रोनॉट कॉर्प्सचे सदस्यत्व मिळवण्यासाठी अर्ज केला होता. अंतराळक्षेत्रातील योगदानासाठी कल्पना यांनाअनेक पुरस्कार मिळाले होते. स्पेस मेडल ऑफ ऑनर, नासा स्पेस फ्लाइट मेडल आणि नासा डिस्टींग्वीश्ड सर्व्हीस मेडल यांचा त्यात प्रामुख्याने समावेश होता. डिसेंबर १९९४ साली चावला यांची अमेरिकेतील नासामध्ये १५व्या अंतराळवीर समूहात निवड झाली. मिशन विशेषज्ञ म्हणून त्यांनी एसटीएस-८७ वर काम केले. अवकाशात त्यांनी ३७६ तास व ३४ मिनिटे प्रवास केला. प्रथम अंतराळात पाऊल ठेवल्यानंतर कल्पना चावला म्हणाल्या होत्या की, जेव्हा तुम्ही ताऱ्यांकडे किंवा आकाशगंगेकडे पाहता तेव्हा तुम्ही जमिनीच्या एखाद्या तुकड्यावरून नव्हे तर सौरगंगेतून पाहत असता.
१ फेब्रुवारी २००३ या दिवशी अवकाशातून पृथ्वीवर परत येणार्यास कोलंबिया अवकाशयानाचा स्फोट झाला. या स्फोटामुळे कोलंबियाचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले. या यानामध्ये असलेल्या कल्पना चावला यांचा आणि अन्य अंतराळवीरांचे निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 1, 2019
छत्रपती शिवाजीमहाराज आणि मराठेशाहीच्या इतिहासावर अधिकारवाणीने बोलू शकणारे निनाद बेडेकर यांची शिवचरित्राचे अभ्यासक अशी ख्याती होती. त्यांचा जन्म १७ ऑगस्ट १९४९ रोजी पुणे येथे झाला.
May 10, 2019
चि. वि. जोशी यांच्या गुंड्याभाऊची भूमिका गाजविणारे जुन्या जमान्यातील प्रसिध्द नट विष्णूपंत जोग चिं. विं.च्या विनोद बागेतले दोन अफलातून नमुने म्हणजे ‘चिमणराव-गुंडय़ाभाऊ’. या दुकलीची लोकप्रियता आता आतापर्यंत टिकून होती.
दामुअण्णा आणि विष्णुपंत जोग यांचा ‘सरकारी पाहुणे’ हा चित्रपट १९४२ मधला. पहिली मंगळागौर (लता मंगेशकर यांनी अभिनय केलेला पहिला चित्रपट), सरकारी पाहुणे, जय मल्हार, नवरा बायको, देव पावला, बायको पाहिजे, वरदक्षिणा, हे चित्रपट व नाटक झाले जन्माचे हे नाटक ह्या मा.विष्णूपंत जोग यांच्या गाजलेल्या कलाकृती होत.
'मी गुंड्याभाऊ हे विष्णूपंत जोग यांचे आत्मचरित्र डॉ. मंदा खांडगे यांनी शब्दांकित केले आहे.
विष्णूपंत जोग यांचे २२ जून १९९३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
June 27, 2017
ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांचा जन्म १५ डिसेंबर १९३५ रोजी झाला. ‘छबीदार छबी मी तोऱ्यात उभी’, ‘एक लाजरा न् साजरा’, ‘काय बाई सांगू’, ‘गोड गोजिरी लाज लाजरी’, ‘खेळ कुणाला दैवाचा कळला’, ‘शालू हिरवा’, ‘मुंगळा’, ‘मै तो आरती उतारू रे’ यासारखी असंख्य गीते आपल्या मधुर आवाजाने अजरामर करणाऱ्या उषाताई मंगेशकर यांचा संगीत प्रवास अलौकिक असाच आहे. लता मंगेशकर, आशा भोसले, ह्यांच्या बरोबरीने "उषा मंगेशकर" अशी स्वतंत्र मोहोर उमटविणाऱ्या उषाताईंनी अनेक एकलगीते, द्वंद्वगीत बालगीतं, भक्तीगीतं गायली आहेत आणि ठसकेबाज लावण्याही म्हणल्या आहेत. आरंभीच्या काळात त्यांचा गायनाकडे कल नव्हता.
मंगेशकर कुटुंबीय मुंबईत आल्यावर उषाताईंनी मणिपुरी नृत्याचे धडे घेतले. पुढील काळात ‘सुरेल कला केंद्र’च्या कार्यक्रमात गाणे म्हणण्याची संधी मिळाली. त्या कार्यक्रमात ‘बैजू बावरा’ चित्रपटातील शमशाद बेगम आणि लता मंगेशकर यांनी गाजवलेले द्वंद्वगीत त्यांनी गायले. त्यातील शमशाद बेगम यांचा गाण्यातील भाग हा मीनाताई मंगेशकर गायच्या व लतादीदींनी गायलेले शब्द हे उषाताई गायच्या.
उस्ताद बडे गुलाम अली खाँसाहेबांचे पट्टशिष्य पं. तुलसीदास शर्मा यांच्याकडे उषाताईंनी शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतले. उषाताई मंगेशकर आणि मीना खर्डीकर या दोघींनी संगीत दिलेला, १९९४ मध्ये प्रसिद्ध झालेला "पुन्हा एकदा" अल्बम, खूप गाजला होता, झिम्मड घाई, रात बहरली, सोन कंगनी, भिर भिर उडते, मायेच्या माहेरा ही गाणी खूप लोकप्रिय झाली. मीना खर्डीकर आणि उषाताई ह्यांचा अजून एक संयुक्त संगीताचा उपक्रम म्हणजे "लोक गणपती" ध्वनिफीत होय. विशेष म्हणजे "बाला मै बैरागन" ही आशाताई भोसले ह्यांच्या स्वरातील गाजलेल्या गाण्यांची ध्वनिफीत, ज्याच संगीत ह्या दोघींनी दिलं होतं.
मराठी, हिंदीसह गुजराती व नेपाळी भाषेतही गायन केलेल्या उषाताईंनी भक्तीगीत, भावगीत, लोकसंगीतापासून ते चित्रपट संगीतापर्यंतच्या सर्व प्रकारांत आपली सुरेल मोहोर उमटवली. लतादीदी आणि आशा भोसले यांची असंख्य गाणी रसिकांच्या ओठांवर रुळली आहेत. महाराष्ट्रामध्ये त्यांना "उषाताई" म्हणतात तर आसाममध्ये "उखादिदी" संबोधतात, गुजराथमध्ये "उषाबेन" ह्या सुप्रसिद्ध नावाने त्या लोकप्रिय आहेत.
उषाताई मंगेशकर यांची मोजकीच गाणी रसिकांना माहीत आहेत. उषाताई मंगेशकर यांना खरी प्रसिद्धी मिळाली ते जय संतोषी माँ या चित्रपटातील काही गाण्यांनंतर मे तो आरती उतारु रे या गाण्यांसाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट स्त्री गायिका पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले. नंतर त्यांचे मुंगळा हे गाणे व पिंजरा या चित्रपटातील गाणी तर लोकांच्या मनात अजून ही घर करून आहेत. त्यांनी दुरदर्शनसाठी फुलवंती या संगीत नाट्याची निर्मितीसुद्धा केली होती. "पवनाकाठचा धोंडी" "जैत रे जैत ह्या चित्रपटांची निर्मिती उषाताईंनी केलीय.
उषा मंगेशकर यांना मेहंदी अॅवॉर्ड, वेस्ट बंगाल क्रिटिक अॅवॉर्ड, सूरसिंगार अॅवॉर्ड, रोटरी अॅवॉर्ड, असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. उषाताई उत्तम चित्रकारसुद्धा आहेत. अगदी लहानपणापासून त्यांना चित्रकलेत रुची होती. कोल्हापूरला चित्रकार बाबूराव पेंटर शेजारी राहायचे. स्वत: माई मंगेशकर यांची चित्रकला उत्तम होती, त्या उत्तम रांगोळ्या काढायच्या. मुंबईत आल्यावर उषाताईंची चित्रकला अभिनेता-निर्माता राज कपूर यांनी पाहिली. त्यांनी उषाताईंची चित्रे कलादिग्दर्शक एम. आर. आचरेकर यांना दाखविली.
आचरेकर व उषाताईंची भेट घडविली. आचरेकरांनी त्या चित्रांना दिलखुलास दाद दिली. उषाताईंनी सुर्यकांत मांढरे ह्यांचेकडून पावडर पेंटिंग शिकून घेतले. जलरंग आणि तैलरंग ह्या दोहोंमध्येही उषाताईंनी त्यांची करामत सिद्ध केलीय. पोर्ट्रेट हा तर उषाताईंचा हातचा विषय. त्यांनी चितारलेल्या डोळ्यातील भाव रसिकांना खिळवून ठेवतो. डोळ्यापासून रेखाटनाला प्रारंभ करून अवघं चित्रं भावपूर्ण करण्याचं कसब उषाताईंच्या हातात सामावलं आहे. अनेक पोर्ट्रेट त्यांनी साकारली आहेत. अनेक ध्वनिमुद्रिकांची वेष्टणं उषाताईंच्या कुंचल्यातून साकारलेली आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
उषा मंगेशकर यांची हिंदी मराठी गाणी.
https://www.youtube.com/watch?v=gaihS2h3p88
https://www.youtube.com/watch?v=pMg_ig8RDnA
https://www.youtube.com/watch?v=o9YgSspKNoA
November 2, 2019
ईस्ट विंड, वेस्ट विंड ही पर्ल बक यांची पहिली कादंबरी १९३० मध्ये प्रसिध्द झाली. त्यानंतर प्रकाशित झालेल्या द गुड अर्थ (१९३१) ह्या कादंबरीने पर्ल बक यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त करून दिली. भूमीवर प्रेम करणारा वांग लुंग हा कष्टाळू चिनी शेतकरी आणि त्याची बायको ह्यांची ही वास्तववादी कहाणी बायबलसारख्या साध्या, सोप्या शब्दात बक यांनी मांडली होती. १९३२ मध्ये या कादंबरीला ‘पुलिट्झर पारितोषिक’ मिळाले.
March 14, 2022
दीपिका पदुकोणचा जन्म ५ जानेवारी १९८६ रोजी डेन्मार्कच्या कोपेनहेगन येथे झाला. तिचे लूक्स हे आजच्या पिढीतील मुलींना भावणारे आहेत. लाखो मुलींसाठी ती स्टाईल दीवा तर आहेच पण अनेकजणी तिची ही स्टाईल फॉलोदेखील करतात. दीपिकाने बॉलिवूडमध्ये 'ओम शांती ओम' सिनेमामधून पदार्पण केले. हा सिनेमा २००७ मध्ये रिलीज झाला होता. तिला पहिल्याच सिनेमात बॉलिवूड किंग खानसोबत काम करायची संधी मिळाली. हा सिनेमा हिट झाला आणि त्यानंतर दीपिकाच्या अनेक सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धूम घातली. दीपिकाने अनुपम खेर यांच्या अॅयक्टिंग इंस्टिट्यूटमध्ये अभिनयाचे धडे गिरवले आणि शामक डावर यांच्याकडून डान्स शिकली. दीपिकाचा 'ऐश्वर्या' हा कन्नड भाषेतील पहिला सिनेमा होता. आज ती आज बॉलिवूडमधील एक प्रसिध्द अभिनेत्री असून २००६ मध्ये 'फिमेल मॉडल ऑफ द इयर' आणि 'फ्रेश फेस ऑफ द इयर'चा मान पटकावला. 'ये जवानी है दिवानी', 'चेन्नई एक्सप्रेस', आणि 'गोलियों की रासलीला-रामलीला', हॅपी न्यू 'इयर', ये जवानी है दिवानी, पिकू, रामलीला, बाजीराव मस्तानी हे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारी दीपिका. हे तिचे हिट ठरलेले सिनेमे. दीपिका प्रसिध्द बॅटमिंटन खेळाडू प्रकाश पदुकोण यांची मुलगी आहे आणि तिची आई उज्वला एक ट्रॅवल एजंट आहेत. दीपिकासुध्दा एक बॅटमिंटन खेळाडू आहे. ती राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर बॅटमिंटन आणि बेसबॉस खेळली आहे. बंगळूरु येथून शालेय शिक्षण आणि माउंट कॅरमल महाविद्यालयातून पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. जेव्हा ती पदवीचे शिक्षण घेत होती तेव्हा तिला मॉडलिंगची ऑफर आली होती. तिने मॉडलिंग एक छंद म्हणून केली, परंतु नंतर तिने या छंदाला गांभीर्याने घेतले आणि अनेक जाहीरातीत ती झळकली. म्हटले जाते, की दीपिकाला अभिनेत्री होण्याची इच्छा नव्हती. तिच्या म्हणण्यानुसार फिल्म इंटस्ट्रीमध्ये येण्याचा तिने कधीच विचार केला नव्हता. परंतु आज ती यशस्वी अभिनेत्रींमध्ये सामील आहे. सांगायचे झाले तर, तिचे नाव अनेक लोकांसोबत जोडण्यात आले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 5, 2018
२० जानेवारी २०१७ मध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. डोनाल्ड ट्रम्प हे लोकप्रिय पण तितकंच वादग्रस्त व्यक्तिमत्व. एक उद्योगपती ते राजकारणी असा ट्रम्प यांचा प्रवास आहे. एका जमान्यात डोनाल्ड ट्रम्प एक उद्योगपती म्हणून प्रसिद्ध होते.
May 14, 2022
“मुसलमानी आमदानीत भारतीय संगीत” हे त्यांनी अभ्यासान्ती लिहिलेले पुस्तक, तर “भारतीय सैन्याची परंपरा” (मूळ लेखक धर्मपाल), “स्वातंत्र्याचा लढा” (बिपिनचंद्र त्रिपाठी), “भारतीय वाद्ये” (चैतन्यदेव) आदी पुस्तके त्यांनी अनुवादित केली.
November 7, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti