जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
परशुराम वैद्य यांनी हवाई दलातून निवृत्त झाल्यानंतर पुण्यात येऊन ‘हरी परशुराम औषधालय’ सुरू केले. याचबरोबर त्यांनी आयुर्वेदाशी संबंधित अनेक पुस्तकेही लिहिली.
July 5, 2022
किशोर सरपोतदार यांनी ‘पूना गेस्ट हाऊस स्नेहमंच’ हे स्टेज कलाकारांना कायमच उपलब्ध करून दिले असून या मंचावरून अनेक सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले आहेत. सध्या कोरोना मुळे सर्व ऍक्टिव्हिटीज बंद आहेत. नाहीतर दर सोमवारी एक सांस्कृतिक कार्यक्रम असतोच.
April 4, 2022
आज हिंदी चित्रपटसृष्टीतील २०१६ पर्यंत ६१७ चित्रपटांसाठी सर्वाधिक ३,४०० गाणी लिहिल्याबद्दल ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नाव नोंदले गेलेले ख्यातनाम गीतकार #समीर_अंजान_पांडे ऊर्फ शीतल पांडे ऊर्फ #समीर यांचा वाढदिवस.
March 1, 2024
रिदमिक जिमनॅस्टिक या खेळात सहसा कुणी रस घेत नाहीत. परंतु ठाण्यातील मुग्धा केतकर हिने मात्र शालेय जीवनातच आपला मार्ग निश्चित केला आणि वयाच्या ९ व्या वर्षापासून राज्यस्तरीय जिमनॅस्टिक स्पर्धेत पदक मिळवायला सुरुवात केली.
May 16, 2014
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात असे सर्वांच्या ओठी असलेले गीत लिहिणारे कविवर्य वामन रामराव कांत म्हणजेच वा. रा. कांत यांची पुण्यतिथी ८ सप्टेंबर रोजी झाली.
आशयगर्भ आणि भावतरल कविता लिहिणाऱ्या कविवर्य कांतांनी दोन पारतंत्र्यं पाहिली ती म्हणजे एक इंग्रजांचं व दुसरं कांत कुटुंब जिथं रहात होतं, त्या मराठवाडा भूमीवरचं निजामांचं जुलमी पारतंत्र्य. जिथं मराठी भाषा बोलण्यासही बंदी होती. अशा परिस्थितीतही कांतांचं काव्यलेखन स्वतःच्याच स्फूर्तिदायक व स्वातंत्र्यांचं स्फुल्लिंग उजळीत समृद्ध होत होतं. पारतंत्र्यातच प्रसिद्ध झालेला कविवर्य कांतांचा 'रुद्रवीणा' हा काव्यसंग्रह त्यावेळेस मराठवाड्यातच नाही तर उभ्या महाराष्ट्रात लक्षवेधक ठरला. 'रुद्रवीणा' या कवितासंग्रहात कांतांच्या कवितेतील राष्ट्रीय ओजस्वीपणा व प्रणयगीतातील सोज्वळ हळुवारपणा अन् भावमधुर शब्दशैली वाचकांचं लक्ष वेधून गेली. त्यानंतर आयुष्याच्या अखेरीपर्यंत कवी कविवर्य कांतांनी मराठी सारस्वताची सेवा केली. मात्र मराठी सारस्वताने त्यांची काहीशी उपेक्षाच केली.
वा. रा. कांत हे मात्र महाराष्ट्राच्या साहित्यपटावर प्रसिद्धीपरांगमुखच राहिले. साठ संवत्सरांच्या आपल्या काव्यप्रवासात कांतांनी एकूण 14 काव्यसंग्रह लिहिले. त्याशिवाय 10 अनुवादि्त ग्रंथ, 11 नाट्यकाव्यं, 2 नाटकं. कांतांनी साहित्याचे अनेक प्रकार हाताळले. त्यांनी आपल्याच कवितेवर प्रयोग करून 'दोनुली' हा कवितासंग्रह एका वेगळ्याच काव्यबंधात रसिकांसमोर ठेवला. पण या काव्यप्रकाराची काव्यसमीक्षकांनी हवी तशी दखल घेतली नाही. कदाचित या काव्यप्रकारामुळे मराठी साहित्यात काही मूल्यात्मक भर पडली नसेल, पण या कवितासंग्रहाने मराठी काव्यप्रांतात मौलिक अधिष्ठान दिलं आहे हे विसरता कामा नये. मराठी काव्यसमीक्षकांनी माझ्या कवितेची योग्य दखल घेतली नाही, अशी खंत कांतांनी अखेरच्या दिवसात बोलून दाखवली होती. वार्धक्याने हताश झालेल्या कांतांची या आजारपणातही काव्यलेखनाची उमेद शाबूत होती. तिथेच आपल्या शब्दांना त्यांनी बजावून सांगितलं होतं - 'मी पंगू झालो म्हणून तुम्ही अपंग होवू नका माझ्या शब्दांनो!' ज्या राजकीय, सामाजिक वातावरणात कांत आपला जीवनप्रवास करीत होते त्याचे प्रतिबिंब त्यांच्या कवितेत सतत प्रकर्षानं परावर्तीत होत होते. फक्त राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय घटनांचे भान हा कांतांच्या कवितेचा, प्रतिभेचा खास पैलू होता. स्व. जयप्रकाश नारायण यांनी तेव्हा चालविलेल्या चळवळीवर लिहलेली कविता- पांढरे शुभ्र वादळ, महात्मा गांधींवरील 'राजघाट' ही कविता वा चीनमध्ये झालेल्या सामाजिक लढ्याच्या संदर्भात चीनच्या भिंतीवर तैयानमेन चौकात झालेल्या रक्तरंजनावर लिहिलेली 'भिंतीला फुटले पंख' ही कविता - एकंदरीत या सगळ्याच कविता तत्कालीन सामाजिक व्यथांचा उद्घोष करणाऱ्या आहेत. व्हिएतनाम व बांगलादेश येथील सामाजिक दुरावस्था व शोषणावरही कांतांनी प्रहार केला आहे. क्रांतिदर्शी, प्रकाशपूजन, देहभान जागवून बेभान करणारी कांतांची कविता ही अगदी भावतरल, संवेदनशील व हळुवारही होती. जीवनातील सौंदर्य, सुखदुःख, प्रीतिचवियोग, मृत्यू आदी जीवनानुभवांना सजीवपणे प्रकट करीत कांतांची कविता वाचकांना खचीतपणे अंतःर्मुख करणारी आहे. अन् ही कविताच कांतांच्या पारदर्शक व्यक्तिमत्त्वाची प्रमाण होतं. शब्द माझा धर्म / शब्द माझे कर्म / शब्द हेच वर्म / ईश्वराचे असं म्हणणारे कांत आपल्या अखेरच्या कवितासंग्रहात 'मावळते शब्द'मध्ये लिहतात -
'जे शोधित होतो जीवनात दिन-रात
ते नाही सापडले कधीही शब्दात
शब्दातूनी शब्दच फिरूनी हाती आला
दोन्हीतूनी अंती अर्थ गळूनिया गेला
कविताही काय अंती एक निसटणे
लाटांची लीला गळ टाकोनी बसणे -'
आपल्या साठ वर्षांच्या काव्यलेखनानंतरही कांतांची ही गळ टाकून बसण्याची अन्कबवितेची मासोळी गळातून निसटून जाण्याची व्यथा म्हणजेच अजूनही सर्वपूर्ण कविता हाती लागायची आहे ही अतृप्ती दाखवनते. विचारांची परिपक्वता, प्रतिभेची प्रगल्भता व व्यापक मानवतावादी दृष्टि्कोन या कलागुणांवर आरुढ असलेली कांतांची कविता पुढे जीवनानुभूतीचं गहिरेपण घेऊन विशाल पण तितकीच व्यापक अन् गहनखोल जलाशयासारखी आहे. काठावर बसून या जलाशयावरचे तरंगच तितके आपल्याला पहायला मिळतील.
मराठी वाङ्मयाच्या उत्तुंग क्षितिजावर कांतांनी शब्दांचं नवीन आकाश उभं करण्याबरोबरच मराठी कवितेस समृद्ध केलं. निदान कांतांच्या जन्मशताब्दीच्या वर्षात तरी या वास्तवाचा मराठी समीक्षकांनी व साहित्य रसिकांनी मोकळ्या व उदात्त मनाने स्वीकार करायला हवा आहे. प्रा. डॉ. उषा जोशींनी 'पंचधारा'च्या कांत विशेषांकात कांतांच्या कवितेबद्दल आदरभाव व्यक्त करीत असताना लिहिलं आहे- 'कांतांच्या काव्यरचनेत अनेक विभ्रम तसेच रचनेचे अनेकविध बंध आहेत. त्यांच्या विशिष्ट भाववृत्तीतून निर्माण झालेली कविता सदैव सतेज, टवटवीत, रसरशीत आहे. त्यांच्या कवितेची तुलना कुणा इतर कवीबरोबर करावी हा एकदम धोकादायक व निसरडा प्रांत आहे. कांतांची कविता ही अलौकिक सौंदर्याचे वरदान घेवून आलेली आहे. ती चिरतरुण, सुंदर व गुणसंपन्न आहे.' डॉ. उषा जोशींचं कांतांबद्दलचं, त्यांच्या कवितेबद्दलचं मत सर्वथा बरोबर आहे. कारण स्वतः कविवर्य कांतांना शंभर वर्षांनंतर आपल्या कवितेचं भाकीत माहित होतं. म्हणूनच आपल्या आयुष्याच्या अखेरच्या पर्वात कांत म्हणतात -
दिव्याचे तेज डोळ्यांचे वेज कोण तिथे जाळीत आहे
शंभर वर्षांनंतर कोण माझी कविता वाचीत आहे?
-माझी उन्हे मावळली आहेत
माझी फुले कोमेजली आहेत
कालचा प्रकाश कालचा सुवास मात्रा वेलांटीत शोधीत आहे
शंभर वर्षांनंतर कोण माझी कविता वाचीत आहे?
आजची फुले आजच्या उन्हात
पाखरांचा शब्द पिकला रानात
माझी कविता तिथे वाचा जिथे ती दिनरात घडत आहे
शंभर वर्षांनंतर कोण माझी कविता वाचीत आहे?
वा.रा कांत* यांचे ८ सप्टेंबर १९९१ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.मु.वा कांत / म.टा
September 8, 2016
युद्धनौकांवर दिवसा आणि रात्री हेलिकॉप्टरचे लॅंडिंग आणि टेक ऑफ पाहतानाच त्यांच्या मनाने नक्की केले की, हे हेलिकॉप्टरच आपल्या करिअरच्या पंखात हवा भरेल. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीद्वारे नौदलात दाखल झालेले कॅप्टन संजय कर्वे यांच्या गाठीशी ३३ वर्षे आणि साडेपाच हजार तास इतका उड्डाणाचा अनुभव आहे. गेल्या सात वर्षांपासून ते राज्याचे नागरी हवाई उड्डाण संचालक आहेत...
महाराष्ट्राची हवाई धुरा
July 24, 2015
नासीर हुसेन यांच्या चित्रपटाचे प्रत्येकच गीत अप्रतिम असायचे. त्यांचा जन्म ३ फेब्रुवारी १९३१ रोजी झाला. नासीर हुसेन हे भोपाळवरून मुंबईला आले व शशाधर मुखर्जी यांच्या फिल्मीस्तान स्टुडीओत पटकथा आणि संवाद लेखक म्हणून नोकरीला लागले. तेव्हा ते कारदार साहेबांच्या सहाय्यकाची पण भूमिका निभावत होते. कारदार साहेब म्हणजे त्या काळातले नामवंत दिग्दर्शक. त्याकाळात मा.नासीर हुसेन यांनी ‘अनारकली’, मुनीमजी आणि ‘पेइंग गेस्ट’ या चित्रपटांचे पटकथा लेखन केले होते. १९५८ मध्ये अचानक शशाधर मुखर्जी यांना एक वेगळी आणि स्वतंत्ररीत्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिली चित्रपट होता.. ‘तुमसा नही देखा’. या चित्रपटापासूनच शम्मी कपूर सिनेसृष्टीत प्रस्थापित झाले, सिनेमा खूप गाजला. त्यांचे यश बघून लगेच शशाधर मुखर्जी यांनी त्यांना दुसरा चित्रपट दिग्दर्शित करायला दिला. चित्रपट होता ‘दिल देके देखो’. या चित्रपटाचे विशेष असे कि यात दोन महिलांनी पदार्पण केले होते. या चित्रपटाची नायिका ‘आशा पारेख’ आणि दुसऱ्या संगीतकार ‘उषा खन्ना’. चित्रपट संगीतामुळे खूप गाजला होता. चित्रपट संगीतामुळे खूप गाजला होता. या चित्रपटानंतर ‘आशा पारेख’ नासीर हुसेन यांच्या प्रत्येक चित्रपटात होती अगदी १९७१ च्या ‘कारवा’ पर्यंत. ‘दिल देके देखो’ च्या यशानन्तर ‘नासीर हुसेन’ यांनी आपली स्वताची निर्मिती कंपनी ‘नासीर हुसेन फिल्म’ ची स्थापन केली आणि स्वतःच निर्माता दिग्दर्शक ची भूमिका निभावीत पहिला चित्रपट काढला देव साहेबांचा ‘जब प्यार किसी से होता है’, हा सुद्धा चित्रपट खूप गाजला होता. चित्रपटातील सर्व गाणी सुपरहिट होती. त्यांचा दुसरा चित्रपट होता ‘फिर वही दिल लाया हु’. या सर्व नावांवरून एक कल्पना येते कि नासीर हुसेन यांच्या चित्रपटात गाण्यांना किती महत्व होते आणि संगीत हा त्यांच्या चित्रपटाचा कळीचा मुद्दा होता तो अगदी ‘क़यामत से क़यामत तक’ पर्यंत. ‘फिर वही दिल लाया हु’ मध्ये त्यांनी आपल्या गुरुचा म्हणजे शशाधर मुखर्जी यांचा मुलगा ‘जॉय मुखर्जी’ यालाच आपला नायक म्हणून निवडले होते तर नायिका मा.आशा पारेखच होत्या. बंदा परवर थाम लो जिगर बन के प्यार फिर आया हु ....खिद मत मे आप की हुज़ूर फिर वोही दिल लाया हु ....'रफी ने हे गायलेले गाणे ...ओ. पी. नय्यर यांच खास रीदम....'मेलोडीयस गाणे'.....अशा अनेक ' सुमधुर ' 'क्लास्सिक' गाण्यांचा खजिना असलेला 'फिर वोही दिल लया हू...'हा खूप गाजला. मा.नासिर हुसेन हे निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून चित्रपट बनवत. चमकदार, प्रणयप्रसंग, गीत, संगीत, रहस्य अशा वैशिष्ट्यांचे जब प्यार किसीसे होता है, तुमसा नही देखा, दिल देके देखो, यादों की बारात हे मा.नासिर हुसेन चित्रपट असत. पण त्यातही ‘तिसरी मंजिल’ वेगळाच मानला जातो. मा.‘मजरूह सुलतानपुरी’ हे मा.नासीर हुसेन यांचे आवडते गीतकार होते म्हणूनच सर्व तरुण वर्ग घेऊन काढलेला ‘क़यामत से क़यामत तक’ चे सुद्धा गाणी त्यांनी ७० वर्षांच्या मजरूह सुलतानपुरी यांच्या कडूनच लिहून घेतली होती. मा. नासिर हुसेन आपल्या काळातील एक यशस्वी निर्माते राहिले. त्यांचे पुत्र मंसूर खानदेखील यशाच्या शिखरावर पोहचले. आमीर खानसोबत मंसूर यांनी कयामत से कयामत तकच्या यशाचा इतिहास लिहिला. जो जीता वही सिकंदर, अकेले हम अकेले तुम आणि जोश चित्रपटांच्या यशानंतर मात्र ते दिग्दर्शनापासून दूर होत गेले. ताहिर हुसेन नासीर हुसेन यांचे भाऊ, त्यांच्या बरोबर ताहिर हुसेन यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. प्रारंभीच्या काळात त्यांनी नासीर हुसेन यांना निर्मिती आणि दिग्दर्शनात "तुमसा नही देखा', "दिल दे के देखो' अशा काही चित्रपटांसाठी मदत केली. आमिर खान चे मामा म्हणजे नासिर हुसेन.
आशा पारेख यांचे नासिर हुसेन यांच्या बरोबर सोबत नाते होते. अनेक अभिनेत्यांबरोबर पडद्यावर रोमान्स करणा-या आशा पारेख यांना त्यांच्या खासगी आयुष्यात मात्र प्रेम प्राप्त होऊ शकले नाही. त्यांनी लग्न केले नाही. १९५९ मध्ये 'दिल दे के देखो' सिनेमात दिग्दर्शक नासिर हुसेन यांनी आशा पारेख यांना शम्मी कपूर यांच्यासोबत कास्ट केले होते. या सिनेमानंतर त्यांची जवळीक वाढली होती. मा.नासिर हुसेन यांच्याबरोबर आशा पारेख यांच्या प्रेमाची चर्चा इंडस्ट्रीत खूप रंगली. नासिर हुसेन यांचे निधन १३ मार्च २००२ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
नासिर हुसेन यांच्या चित्रपटातील गाणी
https://www.youtube.com/watch?v=OeEYMFvcKok
https://www.youtube.com/watch?v=iPpwwAGjySA
https://www.youtube.com/watch?v=CC_Xndynj7E
March 14, 2017
जगदीप यांना भेटलो तेव्हा आम्ही तिघे होतो , त्यांच्याबरोबर जावेद जाफरी होता , स्वाक्षरी घेतल्यावर आमचा फोटो जावेद जाफरी ने काढला. परंतु जावेदच्या स्वाक्षरी घेतली नाही कारण , जगदीप समोर असताना माझ्या डोळ्यासमोर ‘ सुरमा भोपाली ‘ होता.
April 1, 2021
प्राथमिक शिक्षण मॉडर्न हायस्कूल येथे तर महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालय येथे झाले. श्रीधर माडगूळकर यांनी १९७० साली ‘जिप्सी’ या खास तरुणांसाठी असलेल्या मासिकाचे संपादन करुन अनेक नवीन लेखकांना पुढे येण्यास संधी दिली. त्याचप्रमाणे ‘धरती’ व साप्ताहिक ‘मायभूमी’ या नियतकालिकांचा उपसंपादक म्हणून काम केले.
February 29, 2024
क्षिती जोगचा जन्म १ जानेवारी १९८३ रोजी झाला. क्षितीची ‘दामिनी’ आणि ‘वादळवाट’ या मालिकेतील भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तसेच तिने ‘ये रिश्ता क्या कहलता है’, ‘साराभाई वर्सेस साराभाई’ अशा हिंदी मालिकेतूनदेखील आपल्या अभिनयाची छबी उमटविली आहे. त्याचबरोबर क्षितीने ‘संशय कल्लोळ’, ‘माई’ असे चित्रपटदेखील केले आहेत. तर ‘सूर्याची पिल्ले’ या नाटकातल्या तिच्या अभिनयाचेही अनेकांनी कौतूक केले. नाटक, मालिका, चित्रपट यांमुळे क्षितीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. जेष्ठ अभिनेते अनंत जोग हे क्षिती जोगचे वडिल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 1, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti