(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • संत नामदेव

    सामाजिक समतेचा व ऐक्याचा विचार प्रत्यक्षात आणणारे, त्या काळचे तीव्र जातिभेद न मानता भक्तिमार्ग सर्वाना खुला असतो हे जाणणारे व स्वत: या मार्गाचा प्रसार करण्या साठी दक्षिणेत रामेश्वरपर्यत तर उत्तरेकडे हिमाचल प्रदेशापर्यत पदयात्रा करणारे संतशिरोमणी नामदेव यांचा जन्म २६ ऑक्टोबर १२७० रोजी झाला. (तिथीने कार्तिक शुध्द एकादशी, शके ११९२)

    पंजाब व उत्तर प्रदेशात नामदेवाची मंदिरे आहेत.शिखांच्या गुरु ग्रंथसाहेब मध्ये नामदेवाच्या ६१ पदांना स्थान मिळाले आहे.

    वारकरी संप्रदायाच्या ज्ञानदेवादी श्रेष्ठ संतकवीपैकी ते एक. पित्याचे नाव दामाशेट, आईचे गोणाई. नसरी बामणी हे त्यांच्या घराण्याचे मूळ गाव म्हणून सांगितले जाते. तथापी हे गाव नेमके कोठले हयाबद्दल अभ्यासकांत ऐकमत नाही. कराडजवळील नरसिंगपूर हेच ते गाव असावे, असे एक मत आहे. नरसी-ब्राम्हणी‘ असा उल्लेख करुन महाराष्ट्र-सारस्वतकार वि. ल. भावे हयांनी ते सोलापूरकडचे गाव असल्याचे म्हटले आहे, तथापि असे गाव सोलापूर जिल्हयात नाही. मराठवाडयात नरसी आणि बामणी अशी दोन गावे आहेत. त्यांतील अंतरही फारसे नाही. नरसी हया गावाजवळच नामदेवांची समाधी व देऊळ आहे. हया गावी त्यांच्या घराची जागा दाखविली जाते. त्यांचे आजोळ कल्याणी किंवा काणणी हेही हयाच परिसरातले. नरसी आणि बामणी ही दोन स्वतंत्र गावे असली, तरी त्यांचा उल्लेख एकत्रच केला जातो. हे लक्षात घेऊन नामदेवांची नरसी बामणी ही हया दोन गावांत सामावलेली असावी, असे सामान्यतः मानले जाते. नामदेव कृत म्हणून समजले जाणारे एक ‘आत्मचरित्र‘ नामदेवांच्या संकलित गाथ्यात अंंतर्भूत आहे. त्यात ‘गोणाई दामाशेटी झाले पाणिग्रहण संसारी असोन नरसी गावी असा निर्देश सापडतो.

    नामदेवांचा जन्म नरसी बामणीचा, की पंढरपूरचा हयासंबंधीही वाद आहे. वि.ल.भावे व महाराष्ट्र कविचरित्रकार ज. र. आजगावकर हयांच्या मते नामदेव नरसी-बामणी येथेच जन्मले, तथापि नामदवे पंढरपूरी जन्मल्याचा निर्वाळा बहूतेक प्राचीन संतचरित्रकारांनी दिलेला आहे. एकनाथांनी लिहिलेल्या नामदेव-चरित्रावरुन नामदेवांच्या आईने पुत्रप्रांप्तीसाठी पंढरीच्या विठोबास नवस केला होता आणि त्यापूर्वीच नामदेवांचे आईवडील पंढरपुरात येऊन राहू लागल्याचे दिसते. नामदेवांचे बालपण पंढरपुरात गेल्याचेही हया चरित्रात नमूद आहे.

    परभणी जिल्हात नरसी येथे जन्म. ते पांडुरंगाचे मोठे भक्त होते. त्यांनी खुप अभंग लिहिले, ज्ञानेश्वरांचे समकालीन, ज्ञानेश्वर, चोखामेळा, सावता माळी यांच्याबरोबर तीर्थयात्रा, उत्तर भारतात बरीच वर्षे वास्तव्य, भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला.

    श्रीविठुरायाने आपल्या भक्ताचे गार्हाणे ऐकले विठुमाऊली प्रसन्न झाली. कार्तिका एकादशीला गोणईने एका सुदर बाळाला जन्म दिला. दामाजीशेठना खूप आनंद झाला. मोठया थाटाने त्यांनी बाळाचे बारसे केले. त्यांनी मुलाचे नाव ‘नामदेव‘ ठेवले.

    पाळण्यात खेळतांना नामदेव आता सहा-सात वर्षाचा झाला. कधी कधी तो वडीलांबरोबर देवळात जाऊ लागला. देवापुढे हात जोडून डोळे मिटून उभा राहू लागला. एक दिवस दामाजीराव बाहेरगावी गेले हेते. गोणाईने नैवेद्याचे ताट तयार केले. नामदेवाला आईने हाक मारली. ‘नामदेव, जा राजा! आज देवाला नैवेद्य घेऊन जा!‘ ‘हो!‘ नामदेवाने मान डोलावली. आईने त्याला पितांबर नेसवला. कुणाची दृष्ट लागेल म्हणून गालबोट लावले अन् नैवेद्याचे ताट त्याच्या हाती दिले. नामदेव देवळाकडे निघाला. नामदेवाला आनंद झाला. ‘रोज बाबा नैवेद्य दाखवतात. आज आपण नैवेद्य दाखवू देवाला वा!‘

    नामदेव देवळात आला. देवापूढे नैवेद्य ठेवला. डोळे मिटले. देवाची प्रार्थना केली आन हात जोडून तो उभ राहिला. काही वेळाने नामदेवाने डोळे उघडले. अन् बघतो तर काय? नैवेद्य आपला जशाच तसाच! नामदेवाला वाटले देव आपल्यावर रागवला. त्याने पुन्हा देवाला हात जोडले अन् म्हणाला, ‘बाबा आले नाहीत. मी नैवेद्य आणलास म्हणून तू रागवलास काय ? देवा, रोज बाबा नैवेद्य आणतात तेव्हा तू नैवेद्य खातोस अन् आज असं रे काय करतोस? देवा, तू नैवेद्य खाल्ला नाहीस तर मी मुळीच येथून हलणार नाही.‘
    निश्चयपूर्वक नामदेवाने देवाला हाक मारली. ती लहानगी मूर्ती ही हात जोडून बसूनच राहिली. केविलवाण्या नजरेने मान कलती करून ती बाल नामदेवाची मूर्ती देवाकडे पाहू लागली. हळूहळू पाय दुखू लागले. कंटाळा आला, पण नामदेवाने मान हलविली नाही. देवाने नैवेद्य खाल्ला नाही तर येथून हालायचे नाही असा दृढ निश्चय केला. दीनांचा दयाळू कळवळला. तो देव श्यामसुंदर प्रकट झाला. नैवेद्याच्या ताटातील अन्नपदार्थ त्याने खावयास सूरूवात केली. देवदर्शनाने नामदेव आनदंला! मोठया भक्तीभावाने त्याने देवाला नमस्कार केला. देव भावाचा भूकेला! नामदेवाची भक्ती पाहून प्रत्यक्ष विटेवरील परब्रह्य विरघळले. नामदेवाने देवाजवळ हट्ट धरला. देवाने नैवेद्य खाल्ला!

    नामदेवाचे संसारात लक्ष लागेना. सदोदित ‘विल विल‘ चालू असायचे त्यांचे गोणाई-राजाई रागावल्या. एक दिवस त्यांनी खूप बोलून घेतले त्यांना. म्हणल्या, देव करतो. देव करतो! म्हणून देवाला कष्ट पाडा. स्वतः तुम्ही काही करू नका अन देवाला झोजी वाहायला सांगा.‘

    नामदेवाला फार लागले ते बोलणे. त्यांनी ठरविले काही तरी उद्योधंदा करायचा. त्यांनी तसे आईला सांगितले. दामाजी-गोमाईला आनंद झाला. दामाजीशेठची बाजारात पत चांगली होती. ते बाजारात गेले. त्यांनी निरनिराळया लोकांच्या गाठी घेतल्या. खुपसे कापड घरी घेऊन आले अन् नामदेवाला म्हणाले,
    ‘नामदेवा, चांगलं कापड मिळाल आहे. खूप फायदा होईल या व्यापारात. पण हे बघ, शक्य तो रोखीचाच व्यावहार कर. अन तारण घेतल्याशिवाय कुणलाही उधार माल देऊ नको.‘

    ‘बरं आहे!‘ नामदेव म्हणाले. त्यानी गाडी जोडली. गाडीत कापड भरले. विलाचे नाव घेतले अन निघाले बाजाराला. बाजाराच्या वाटेवर एक माळ होता. गाडी माळावरून जाऊ लागली. त्या माळावर उघडीनागडी माणसे वावरत होती. नागडी मुले-मुली हिंडत होती.

    नामदेवाच्या ती नागडी मुलेबाळी दृष्टीस पडली. त्यांना गहिवरून आले. त्यांना वाटले ‘ही माण्से इथेच राहतात. रात्री खूप थंडी पडते. तेव्हा ती काय अंथरणार अन काय पांघरणार.‘

    आपल्याजवळ आता कापड आहे. ते सर्व आपण यांना वाटून टाकू. त्यायोगे ते सुखावतील. नाहीतरी आपण सारी त्या एकाच देवाचीच लेकरं. त्यांचं सुख तेच आपलं सुख नामदेवाच्या मनातं! नामदेवाने गाडी थांबवली. ते खाली उतरले, त्यांनी त्या मुलांना जवळ बोलावले. त्यांच्याजवळ चौकशी केली. मुले कुणाशी बोलतात म्हणून त्यांचे आईवडील आले आणि थोडयाच वेळात नामदेवाभोवती कडेच केले तिथल्या माणसांनी! नामदेव त्यांच्या पुढार्‍याला म्हणला ‘गणोबा मी तुम्हाला सर्व कापड देणार आहे.‘‘देवा, आम्हाला काय करायचं कापड-चोपड? आम्ही आहोत तशी बरी आहोत.‘

    ‘का? तुम्हीला थंडी लागत नाही रात्रीची?‘
    ‘देवा, थंडी लागते, पण कपडा घायचा म्हणजे काय पैसे पडतात ना?‘
    ‘पण तुम्ही आता पैसे देऊ नका. मग तर झालं ना! हो, पण तारण द्यावं लागेल तुम्हाला‘
    ‘तारण? कसलं तारण देणार आम्ही? माळावरचे दगड देऊ फार झालं तर.‘
    ‘चालेल, दगडदेखील चालेल मला.‘

    झालं! नामदेवांनी सर्वाना कापड वाटलं. त्यांचे सर्वांचे चेहरे आनंदाने फुलले. त्यांनी नामदेवांना दुवा दिला. एक भलामोठा दगड नामदेवाच्या गाडीत ठेवून दिला. तो दगड घेऊन नामदेव घरी आले. मुखाने नास्मरण चालूच होते. घरी आल्यावर त्यांनी तो दगड नेऊन तिजोरीत ठेवला.

    माजीशेठ(नामदेवाचे वडील) बाहेर गेले होते. घरी येताच त्यांनी विचारले,
    ‘काय, नामदेवा! कसा काय झाला व्यापार?‘ ‘फार, छान! सर्व कापड संपलं.
    ‘उत्तम, मग पैसे आणले असतील तेवढे ते दे! म्हणजे व्यापारांची देणी देऊ टाकतो.‘ दामाशेठ म्हणाले. ‘पैसे नाही आणले. सर्व माल तारण घेऊन दिले. गणोबा नाईकांना! त्यांना तारण धोंडोबांना दिलं आहे.‘ ‘अन् त्यांनी तारण काय दिलं? धोंडा ना? वा छान, फारच चांगलं तारण आहे ना काय? व्यापारांना काय मी दगड देऊ?‘ नामदेव कहीच बोलले नाहीत. ते मुकाटयाने खोलीत गेले. कुलूप उघडून त्यांनी तो धोंडा बाहेर काढला.

    दामाजींच्या आपल्या डोळयावर विश्वास बसेना. तो सोन्याचा दगड पाहून त्यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. एवढे सोने कधी पाहिलेदेखील नव्हते त्यांनी. राजाई-गोणाई आ वासून पाहत राहिल्या. थोडा वेळ गेला आणि मग त्याचे भांडण सूरू झाले. नामदेव म्हणत, आपण फक्त आपल्या मालाचे पैसे घ्यायचे बाकींचं सोनं गणोबा नाईकांना परत द्यायचं.‘ छे, तसं कसं करायचं? त्याने आपल्या मालाबद्दल तर हे दिलं. आता सगळं आपलं!‘ त्यांच भांडण चालू असतांना लोक गोळा झाले. त्यांनी हे पाहिले. त्यांना आश्चर्य वाटले. काही लबाड आणि लोभी लोक गणोबा नाईकांकडे गेले. त्याला त्यांनी सर्व हकीकत सांगितली. अन् म्हाणाले, ‘गणोबा तू आता नामदेवाकडे जा. त्याला सांग की, तुझा मालाचे तेवढे पैसे काढून घे आणि उरलेल सोने दे ‘गणेबाला पुढे करूण लबाड लोक नामदेवाकडे गेले अन् नामदेवाला म्हणाले, ‘नामदेवा, हे गणोबा नाईक. त्याचं उरलेल सोनं ते परत मागत होते.

    ‘नामदेवांनी आपल्या मालाच्या किंमतीचे सोने काढून घेतले, ‘हे गणोबा, जा घेऊन तुमचं सोनं.‘ गणोबांनी सोने उचलले. माळावर येताच त्यांनी डोक्यावरचे सोने खाली उतरविले.पण...सोने कुठे ते? काळकुळकुळीत दगड होऊन पडला होता त्यांच्यासमोरं. देवाने न्याय दिला होता. संत नामदेवांच्या घराशेजारी एक ब्रा्रण राहत होता. तो पूर्वी दारिद्री होता. पण नतंर त्याने देवी लक्ष्मीची उपासना केली. देवी प्रसन्न झाली. तिने त्याला एक परिस दिला. अन् म्हणाली, ‘हा परिस तू लोखंडाला लावलास की त्याचे सोने होईल. तुझी इच्छा पूर्ण होईल!‘ ब्राणाचे दारिद्र पळाले. लोक त्यांच्या श्रीमंतीचा हेवा करू लागले. पण परिसाची प्राप्ती झाल्याने त्याने काही कुणाला कळू दिले नाही. एक दिवस राजाई (नामदेवाची आई) त्या ब्राणाच्या घरी गेली.

    त्यावेळी ब्राणाची बायको कमळजा ही घरी होती. तिला फार लोभ वाटे या कुटूंबाविषयी. तिने राजाईची हकीकत विचारली. आपली दारिद्रयाची कहाणी राजाईने तिला सांगितली. कमळजाला राजाईची दया आली. आपल्या खोलीत जाऊन तिने परिस आणला अन् तो परिस राजाईला देऊन म्हणाली. ‘बाई, हा परिस मी तुम्हाला देते आहे. लोखंडाचे या परिसाने खूप सोने करून घ्या अन् माझा परिस लवकर परत आणून द्या.‘

    राजाई घरी गेली. तिने घरातील भांडयांना, लोखंडाला परिस स्पर्श करून सोने केले. ते सगळे सोने घरात लपवून ठेवले. मग थोडे सोने घेऊन ती बाजारात गेली. धान्य, किराणा वगैरे घेऊन परत आली. नंतर ती परिस परत करण्यासाठी निघली. तेवढयात नामदेव आले. नामदेवांना पाहून राजाई कमळजाडके न जाता माघारी वळली. राजाईची घागरलेली मुद्रा व अन् घरातला थाटमाट पाहून नामदेवाला संशय आला, ‘काय गडबड आहे आज घरात?‘ राजाई दादपत्ता लागू देईना. नामदेवांनी तिचा पिच्छा सोडला नाही. त्यांनी तिला खोदूनखोदून विचारल. शेवटी नाईलाजाने राजाईने नामदेवांना सर्व काही सांगितले.

    नामदेवांनी राजाईजवळून तो परिस मागून घेतला. अन् श्रीविलाचे नास्मरण करीत ते चंद्रभागा नदीवर आंघोळीसाठी गेले.

    नामदेवाला जाऊन थोडा वेळ झाला. तोच ब्राण स्वतःच्या घरी आला. त्याने आंघोळ केली अन् तो पूजेसाठी बसला. परिसाचादेखील तो देवाबरोबर पूजा करीत असे. त्याने आपल्या पत्नीस पूजेसाठी परिस आणण्यास सांगितले. तिला ब्रम्हांड आठवले. आता परिस कोठून आणून देणार? ती अळमटळम करू लागली. ब्राणाने तर निकड लावली. शेवटी तिला सर्व सांगणे भाग पडले. ब्राण खूपच रागावला.

    कमळजा राजाईकडे आली. तिने राजाईकडे परिस मागितला. तीही मोठया संकटात सापडली. मोठया विश्वासाने ब्राण पत्नी कमळाजाबाईनी आपल्याला परिस दिला. होता. आपले दारिद्र दूर व्हावे असे तिला वाटत होते. पण आपण योग्य वेळी परिस परत केली नाही. आता तर आपल्याजवळ परिस नाही. नामदेव परिस घेऊन, नदीवर गेल्याचे राजाईने कमळजाबाईला सांगितले. बिचारी ब्राणपत्नी! तिने तो निरोप नवर्‍याला सांगितला. ब्राण खूपच रागावला. त्याने बायकोला खूप बोलून घेतले अन् तो नदीकडे धावत सुटला. तो काय धावतो? म्हणून आणखी काही लोक त्याच्या मागून धावू लागले. नदीत नामदेव आंघोळ करीत होते. मुखाने विठ्ठलाचे नामस्मरण करीत होते. ब्राण तेथे पोहोचला आणि म्हणाला, ‘नामदेवा माझा परिस मला परत द्या पूजेला खोळंबा होतो आहे.

    ‘नामदेव म्हणले, ‘कसला परिस? मी तर तो दगड नदीत टाकून दिला.‘ आजूबाजूचे लोक गंमत पाहत होते. कुणी म्हणाले ‘हा नाम्या लबाड बरं का!‘ त्याने परिस लपवून ठेवला असेल! परिस काय कोणी नदीत टाकून देते काय?‘ ‘हे पहा नामदेवा! उगीच ढोंग करू नकोस. खोटे बोलू नकोस. परिस कोणता शहाणा माणूस नदीत टाकीलं बरं!‘ ‘तुम्हाला वाटत असेल खोटे आहे तर नदीत उतरून पाहा!‘ नामदेंवाचे वरील बोलणे एकूण सगळे लोक हसू लागले. बुडी मारून नदीच्या तळाशी जाणार कोण? अन् तळ गाठला तरी पाण्याच्या तळाशी किती दगडं. त्यातून परिस कसा शोधून काढणार? तोच नामदेवांनी पाण्यात बुडी मारली. ओंजळभर दगडं घेऊंन ते वर आले आणि ब्राणाला म्हणाले, ‘हे घ्या तुमचे परिस!

    ‘लोकांना हे ऐकून चेष्टा वाटली. इतक्यात एकाने आपल्या जवळच्या लोखंडी टाचण्या काढल्या. त्या त्याने सर्व दगडांना लावून पाहिले. सर्व टाचण्या सोन्याच्या झाल्या. सारेच दगड परिस होते. ब्राण ओशाळला. त्याने संत नामदेवांचे पाय धरले. सगळया लोकांनी एकच गजर केला.‘संत नामदेव महाराज की जय! पुंडलिक वरदा हरी विठ्ठल महाराज की जय.

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

    ## Sant Namdeo ; Sant Namdev

      March 12, 2015


  • लक्ष्मीकांत बेर्डे

    लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म २६ ऑक्टोबर १९५४ रोजी झाला. लक्ष्मीकांत बेर्डे या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत दीड ते दोन दशकं अक्षरश: धूमाकुळ घातला. विनोदाचे अत्यंत अचुक टायमिंग असणारा हा अभिनेता. पण केवळ विनोदी अभिनेता असे त्यांचे वर्णन करणे त्यांच्यावरचा अन्याय ठरेल. कसदार अभिनय करणाऱ्या या अभिनेत्याकडे त्यांच्या अभिनयक्षमतेला वाव मिळू शकतील असे चित्रपट अपवादानेच मिळाले.

    वास्तविक अनेक गंभीर भूमिकांमधूनही त्यांनी आपली सशक्त अभिनयक्षमता दाखवून दिली. मात्र, एकूणच त्यांच्या विनोदी भूमिकांमुळे त्यांच्यावरचा विनोदी अभिनेत्याचाच शिक्का कायम राहिला. लक्ष्मीकांत बेर्डे यांना खरा 'ब्रेक थ्रू' मिळाला तो 'टुरटुर' या नाटकाने. हे पहिलेच नाटक जबरदस्त हीट ठरले. त्यानंतर शांतेचे कार्ट चालू आहे, बिघडले स्वर्गाचे द्वार, कार्टी चालू आहे ही नाटकेही यशस्वी ठरली.

    मग लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मागे वळून पाहिलेच नाही. नाटके करता करता त्यांनी चित्रपटात प्रवेश केला. तेथेही ते प्रचंड यशस्वी ठरले. 'लक्ष्या' या नावाने अबालवृद्धांमध्ये त्याची लोकप्रिय पसरली. त्यांची जोडी जमली ती महेश कोठारे यांच्यासमवेत. कोठारेंचा चित्रपट अन लक्ष्मीकांत बेर्डे नाही असे सहसा घडलेच नाही.कारण कोठारे व बेर्डे म्हणजे व्यावसायिक यशाची हमखास खात्री अशी ओळख निर्माण झाली होती. त्याचबरोबर या दोघांचा चित्रपट म्हणजे मनोरंजनाची शंभर टक्के हमी हे समीकरणही रूढ झाले होते. धुमधडाका, धडाकेबाज, थरथराट ते आताच्या 'झपाटलेला'पर्यंत ते कायम होते. सचिन बरोबरही 'बनवाबनवी'सह अनेक चित्रपट केले.

    त्यांना अभिनयाची नैसर्गिक देणगी मिळाली होती. विनोदाचे त्यांचे टायमिंग अचुक होते. प्रेक्षकांच्या समोर आल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन टाकण्याची त्यांची शैली अनोखी होती. त्यांच्या लोकप्रियतेला 'कॅश' करण्यासाठी 'चल रे लक्ष्या' मुंबईला सारखा चित्रपटही निघाला. शिवाय अनेक चित्रपट त्यांना समोर ठेवून काढण्यात आले.त्यात अनेक पडेल चित्रपटही होते. अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीने याच काळात धुमाकूळ घातला. वास्तविक या दोन्ही कलाकारांचे ट्युनिंग अतिशय चांगले जमले होते.

    मात्र, त्याचा चांगला उपयोग फार कमी दिग्दर्शकांना करता आला. त्यांच्या चित्रपटांनी मराठी मनांचे मनोरंजन करीत अनेकांना आयूष्यातील तणाव, दुःख विसरायला लावून आनंदाचे कारंजे फूलविले. मराठीत प्रसिध्दीच्या लाटेवर स्वार असतांनाच त्यांना हिंदी‍त चांगल्या निर्मिती संस्थांच्या ऑफर्स आल्या. राजश्री प्रॉडक्शनचा मैने प्यार किया हा त्यातीलच एक. यात लक्ष्मीकांतने सलमान खानच्या मित्राची भूमिका अगदी छान निभावली. याशिवाय अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. पण अभिनयाचा कस लागेल अशी भूमिका त्यांनी हिंदीत क्वचितच मिळाली, मराठीत अशा भूमिका त्यांना मिळाल्या, पण त्याही अगदी थोड्याच. अनेक दूरचित्रवाणी मालिकांमधूनही त्यांनी एक काळ गाजवला.

    पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या 'एक होता विदुषक' या चित्रपटातील भूमिकेने लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयक्षमतेवर शिक्कामोर्तब झाले. पण तशा भूमिका त्यांना फार काही मिळाल्या नाहीत. शेवटच्या काळात त्यांनी पुन्हा रंगभूमीवर लेले विरूद्ध लेले आणि सर आले धावून या नाटकाद्वारे बऱ्याच वर्षांनी पाऊल ठेवले. पण ही नाटके फार चालली नाहीत. असा हा हरहुन्नरी कलाकार चाहत्यांना शेवटपर्यंत हसवत राहिला. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे १६ डिसेंबर २००४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      October 26, 2018


  • हिंद केसरी मारुती माने

    कोणत्याही क्षणैक वलयाच्या मागे न लागता माने यांनी आयुष्यभर कुस्ती हेच आपले ध्येय ठेवले आणि त्याप्रमाणेच ते वागत आले. लाल मातीमध्ये रंगून जाणाऱ्या या बलदंड माणसाच्या मनाचा एक कोपरा हळुवार होता आणि तो हळवेपणा त्यांच्या बासरीवादनातून व्यक्त होत राहिला.

      February 28, 2022


  • रँग्लर परांजपे

    हिंदुस्थान सरकारची शिष्यवृत्ती घेऊन रॅंग्लर परांजपे इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठ क्षेत्रातील सेंट जॉन्स महाविद्यालयात दाखल झाले. तेथे त्यांनी गणित विषयातील सगळ्यात कठीण ‘ ट्रायपॉस ‘ परीक्षा दिली आणि ते त्या परीक्षेत प्रथम आले. यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्याला सीनियर रँग्लर असे म्हणतात. केंब्रिज विद्यापीठाचा वरिष्ठ रँग्लर हा किताब पटकावणारे ते पहिले भारतीय होते .

      July 14, 2021


  • उद्योगमहर्षी शंतनुराव किर्लोस्कर

    फ्रेड शुले ह्या जर्मन उद्योजकाने काढलेले उद्गार अतिशय समर्पक आहेत. तो म्हणाला होता, ‘माझ्यासाठी शंतनुराव हे भारतातील क्रमांक दोनचे व्यक्तिमत्त्व आहे. पहिला क्रमांक महात्मा गांधींचा आहे.’

      May 28, 2022


  • बाईकेंचर्स अपर्णा

    लहान पणासूनच अपर्णाला पर्यटनाची आवड, त्यातही ट्रेकिंग सारख्या अॅडव्हेंचर प्रकाराची अधिकच ! म्हणजेच सतत चित्तवेधक गोष्टींकडे ओढा थोडा अधिक असायचा ,आणि म्हणून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न डॉ. अपर्णा यांचा असायचा, वाहनांची सुध्दा प्रचंड आवड असल्यामुळे एक निश्चय केला होता की स्वावलंबी बनल्यावर स्वत: ची गाडी किंवा बाईक खरेदी करुन आपल्या “अॅडव्हेचर ”ची आवड ही पूर्ण करायची, त्यासाठी सर्वप्रथम बाईक  चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं

      March 7, 2014


  • प्रभाकर जोग

    एस.पी. कोलेजच्या मैदानात भरलेल्या स्नेहसंमेलनात व्हायोलिन वाजवत असताना मदानापलीकडे राहणाऱ्या सुधीर फडके यांनी ते ऐकले आणि प्रभाकर जोगांना भेटायला बोलावले. पुढे ते संगीत दिग्दर्शक सुधीर फडके यांचे सहाय्यक झाले.

      July 7, 2022


  • नेताजी सुभाषचंद्र बोस

    नेताजी सुभाषचंद्र बोस हे इतके महान व्यक्तिमत्व आहे की 'भारताला स्वातंत्र्य कशामुळे/कुणामुळे मिळाले ? या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेतल्यास सर्वात पहिले नाव जर कुणाचे येईल तर ते नेताजींचेच. त्यांचा जन्म २३ जानेवारी १९१५ रोजी झाला.

    "हम सब मिलकर आगे बढेंगे, तो सिध्दी प्राप्त होगी ही | हम अपनी दृष्टी को जितनी अधिक ऊपर की तरफ उठायेंगे ,उतना ही हम भुतकाल के कटु अनुभवोंको भुलते जायेंगे और तब भविष्यकाल पूर्ण प्रकाशयुक्त रुप में हमारे सामने प्रकट होगा."

    नेताजी सुभाषचंद्र बोस हे स्वामी विवेकानंदांच्या विचारसरणिने खुप प्रभावित झाले होते.त्यांच्यावर क्रांतिकारकांचाही खुप प्रभाव होता.आपल्या सुरुवातीच्या राजकीय जीवनात ते गांधीजींबरोबर होते.पण गांधीजींच्या कायदेभंगाला त्यांचा जरी पाठींबा होता तरीही अहिंसात्मक मार्गाने स्वातंत्र्य मिळेल यावर त्यांचा विश्वास नव्हता. त्यांच्या मते 'इतिहासात चर्चेतुन कुठलाही फारसा मोठा फरक झालेला नाही.स्वातंत्र्य दिले जात नाही तर ते घेतले जाते. त्याच्यासाठी किंमत द्यावी लागते. आणि ती किंमत म्हणजे रक्त!' पण गांधीजींबद्दल सुभाषबाबुंच्या मनात प्रचंड आदरही होता. गांधीजींशी मतभेद झाल्यानंतरही बर्लिनमधुन त्यांनी दिलेल्या भाषणात त्यांनी गांधीजींना 'राष्ट्रपिता' ही उपाधी दिली. गांधीजींना काँग्रेसमधे असताना एकदा सुभाषबाबुंनी ब्रिटीशांविरुध्द राष्ट्रव्यापी चळवळ उभी करण्याची विनंती केली. हिंसाचार होईल असे गांधीजींना वाटल्याने त्यांनी त्यास नकार दिला. काही लोकांनी सुभाषबाबुंना म्हटले की 'तुम्हीच अशी चळवळ उभी का करत नाही?'तर सुभाषबाबु म्हणाले की 'मी जर बोलावल तर २० लाख लोक सहभागी होतील आणि गांधीजींनी बोलावल तर २० कोटी लोक सहभागी होतील्.' गांधीजींची असलेली लोकप्रियता सुभाषबाबुंना माहित होती ते एकदा म्हणाले होते की गांधीजींची सामान्य जनतेत जितकी लोकप्रियता आहे तितकी जगातल्या इतर कुणाला मिळाली असेल असे मला वाटत नाही. गांधीजींच्या उदाहरणावरुन आणि इतर अभ्यासातुन नेत्याची जनतेत असलेली प्रतिमा जनतेला कार्य करण्यास उद्युक्त करण्यास सर्वात महत्वाची असते असे सुभाषबाबुंचे मत झाले असावे असे वाटते. फॉरवर्ड ब्लॉकला भरपुर प्रसिध्दी देण्यासाठी १० महीन्यात सुभाषबाबुंनी १००० सभा पुर्ण देशभरात घेतल्या होत्या.त्यानंतरच्या जर्मनी आणि जपान मधील त्यांच्या वास्तव्यातही त्यांनी यावर भर दिला. त्यांचे वाढदिवस एखाद्या सणासारखे साजरे केले जात असत.

    आपल्या सैन्याला आपल्यावर पुर्ण विश्वास असावा यासाठी ते काळजी घेत.सिंगापुरमध्ये जुलै १९४३ साली दिलेल्या एका भाषणात त्यांनी म्हटले होते की "मी हिंदुस्तानाशीच एकनिष्ठ राहिल. मी माझ्या मातृभुमिशी कधीच गद्दारी करणार नाही. मी मातृभुमिसाठीच जगेल तिच्यासाठीच मरेल.मला शिक्षा आणि शारीरीक त्रास देउनही ब्रिटीश मला थांबवु शकले नाहीत.ब्रिटीश मला फितवुही शकत नाहीत आणि मला फसवुही शकत नाहीत.

    नेताजींना त्यांच्या आयुष्यात ११ वेळा अटक झाली होती. त्यांचा भारतीय तत्वज्ञानाचा गाढा अभ्यास होता.त्याचबरोबर त्यांनी पाश्चिमात्य विचारांचाही अभ्यास केला होता.त्यांची राजकीय विचारसरणी ही फॅसिझम आणि कम्युनिझम यांचे मिश्रणाची होती.ज्यास त्यांनी 'साम्यवाद' हे नाव दिले होते.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर काही वर्षे तरी authoritarian rule असला पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते.व्यक्तिपेक्षा राष्ट्र महत्वाचे आहे,निस्सीम राष्ट्रवाद अत्यावश्यक आहे असे त्यांचे स्पष्ट मत होते.जरीही फॅसिझमला काही अंशी त्यांचा पाठींबा होता तरीही नाझी आक्रमकता आणि वंशवादास त्यांचा विरोध होता. नेताजीं व सावरकर यांची भेट झाल्यावर सावरकरांनी त्यांना 'ब्रिटीश अधिकार्यां चे पुतळे उखडुन वगैरे क्षुल्लक चळवळी करुन ब्रिटीशांना तुम्ही अटक करण्याची आयतीच संधी देत आहात. त्यापेक्षा दुसर्याे महायुध्दातील भारतीय युध्दकैद्यांची व ब्रिटीशांच्या शत्रूंची मदत घेउन तुम्ही ब्रिटीशांना देशातुन हाकलुन द्यावे.माझ्या नजरेसमोर असे करु शकणारे जे २-३ भारतीय नेते आहेत त्यापैकी एक तुम्ही आहात.' असे सांगितले. यावर सुभाषबाबुंनी नक्कीच विचार करुन ब्रिटीशांच्या तावडीतुन आपली सुटका करुन नंतर जर्मनी व जपानकडुन मदत मिळवली. सावरकर हे भारतातील 'द्रष्टे नेते' आहेत हे नंतर त्यांनी म्हटले. त्याचबरोबर अंदमानात ब्रिटीशांचा पराभव केल्यावर त्यांनी सेल्युलर जेलला भेट दिली व सावरकरांच्या '१८५७ चे स्वातंत्र्यसमर्'या पुस्तकाच्या हजारो प्रती छापुन त्या भारतीयांमध्ये वाटल्या. आपल्या देशासाठी रक्त द्या असे सांगताना नेताजी म्हणतात "इस रास्तेपर हमें अपना खुन बहाना है|हमै कुर्बानी खाना है| सब मुश्किलोंका सामना करना है.आखिरमें कामयाबी मिलेगी | इस रास्तेमें हम क्या देंगे?हमारे हातमें है क्या?हमारे रास्तेमें आयेगी भुक,प्यास,तक्लिफें,मुसिबतें..मौत!!कोई नहीं कह सकता है जिन लोग इस जंग मै शरीक होंगे ,उनमेंसे कितने लोग निकलेंगे..जिंदा रहकर|कोई बात नहीं है...हम जिंदा रहेंगे या फिर मरेंगे...कोई बात नही है| सही बात यह है,आम बात यह है के आखिरमें हमारी कामयाबी होगी...हिंदुस्तान आझाद होगा!!! नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निधन १ मे १९७२ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 23, 2017


  • ज्येष्ठ गायक पंडित प्रभूदेव सरदार

    शुद्धता, शुचिर्भूतता आणि सात्विक वृत्ती ही पं. प्रभूदेव सरदार यांची स्वभाव वैशिष्ट्ये. त्यांचा जन्म ४ सप्टेंबर १९२५ रोजी झाला.त्यांच्या दैनंदिन जीवनात जसा या वैशिष्ट्यांचा प्रभाव दिसे, तसाच संगीतशास्त्र, स्वरविद्या, रागविद्या, बंदिशीमध्येही दिसत असे. स्वरांच्या शुद्धतेवर त्यांचा विशेष कटाक्ष असे. आपल्या बजुर्गांनी केलेल्या राग, बंदिशी यांच्या शुद्धतेला त्यांनी विशेष महत्त्व दिले, त्यांचे पावित्र्य जपले. त्याच बरोबर नवनिर्मिती करतानाही मूलतत्वाचा पाया भक्कम ठेवण्याचा गुरुजींचा ध्यास असे. नव्या, जुन्या सर्व शिष्यांना स्वरज्ञानाचे महत्त्व ते वारंवार सांगत. स्वरांचे खास स्थान असते, त्यांना प्रकृती असते, त्यातून तो भाव जिवंत होणे महत्त्वाचे असते. गुरुजी कायम सांगत की, रागांत जिवंतपणा आला पाहिजे. गुरुजींच गाणं हे उत्कट भावनांनी चिंब भिजलेलं असे. पं. प्रभूदेव सरदार हे बेळगांवच्या राणी कित्तूर चन्नमा यांचे सरदार गुरुसिद्धय्या सरदार यांचे थेट वंशज. सरदारांचे मूळ अडनाव चरंतीमठ. पण राणी कित्तूर चन्नमांचे सरदार असल्याने त्यांना ही पदवी मिळाली होती. पं. प्रभूदेव सरदारांचे वडील मडीवाळेश्वतर सरदार हे सोलापूरचा आले व सोलापूरातच ते स्थाईक झाले. सोलापूरकर होऊन गेले. मडीवाळेश्वार सरदार हे बॅरिस्टर होते. सोलापूरचे ख्यातनाम वकिल होते. अनेक वर्षे सरकारी वकील म्हणून काम करूनही त्यांनी गाणे आत्मसात केले. त्यांचा आवाज अत्यंत गोड होता, तो त्यांनी शेवट पर्यंत टिकवून ठेवला होता. वकिलीबरोबरच संगीताची मोठी सेवा त्यांनी केली. "विलोपले मधूमिलनात या'या नाट्य गीतामुळे ते अधिक प्रसिद्धीस आले. पं. प्रभूदेव सरदार यांना आग्रा घराण्याचे पं. जगन्नाथबुवा पुरोहित व जयपूर घराण्याचे पं. निवृत्तीबुवा सरनाईक यासारख्या दिग्गजांकडून तालिम मिळाली. या दोन्ही गुरुंचे पं. प्रभूदेव सरदार हे गंडाबंध शिष्य होते. त्यांच्याकडून त्यांना असंख्य राग शिकायला मिळाले. जगन्नाथबुवांनी प्रचलित रागांबरोबरच राग स्वानंदी, जौन भैरव आदींसारखे अनेक अप्रचलित राग शिकवले. शिवाय ललत रागातील ‘जा जा रे जा रे बलमवा’, नट भैरव रागातील ‘गुंज रही किरत तुम्हरी’, जौन भैरव मधील ‘लाडली री मोरी’ आदी बंदीशी गुरुजींना विशेष प्रिय होत्या. जगन्नाथबुवांनंतर निवृत्तीबुवांकडून भरभरून रागविद्या मिळाली. त्यात प्रचलित रागांप्रमाणेच अप्रचलित, अनवट रागांचा जास्त अंतर्भाव होता. निवृत्तीबुवांनी अनेक सुंदर सुंदर चिजा, प्राचिन व पारंपरिक व जयपूर घराण्याच्या बंदिशी गुरुजींना शिकवल्या. गुरुवर्य पं. प्रभूदेव सरदार म्हणजे रागांचा आणि बंदिशींचा चालता बोलता कोशच होते. अनेक रागांचा व बंदिशींचा प्रचंड खजीना पं.प्रभूदेव सरदारांकडे होता. पं.प्रभूदेव सरदार म्हणजे मैफिलीचे बादशाहच होते. त्यांची मैफल हमखास रंगत असे. मैफिलीत जान आणणे त्यांना सहज साध्य झालेले होते. त्यांची तब्येत लागली नाही असे कधी झाले नाही. मैफिलीत राग शंकरा, बिहाग, दरबारी, मेघ, श्री, मुलतानी, बसंत, तिलककामेद, सरस्वती, पुरियाधनश्री, गौड सारंग, गौड मल्हार, बहार, गुजरी तोडी, बिलासखानी तोडी, भैरव, देसी, जौनपुरी, कौंसी, जैताश्री, सावनी, सुहा, खट तोडी असे राग गाऊन मैफल जिंकण्याची हतोटी त्यांना प्राप्त होती.

    पं.प्रभूदेव सरदार यांचा पल्लेदार आवाज तीन सप्तकात लिलया फिरत होता. ते स्वर लावताना स्वच्छ व नैसर्गिकरित्या लावत, मोकळेपणाने लावत. ते कधी आवाजाच्या गोडी करता गळा आवळून लावत नसत किंवा जवारीकरिता आवाज रेकत नसत. त्यांचा स्वर कधी वर वर लागत नसे. आवाज सरळ नाभीतून निघे. मंद्र सप्तकात गंधार, रिषभ, मंद्र षड्‌ज स्पष्ट व सहज लागत. तार सप्तकात पंचम धैवत पर्यंत स्वर सहज जात असे. त्यांचे झुलते-डुलते बोल रसिकांच्या हृदयाचा ठाव घेत असत. त्यांच्या आलापीत, बोलात, बोल तानात आणि तानपलट्‌यातही गमकेचा बाज कायमच असे. त्यामुळे स्वरात कधी तुटकपणा एकेरीपणा येत नव्हता. संथ लयीत चिजेला सुरुवात करुन चिजेचा मुखडा सुंदररित्या बांधून समेवर सहजपणे येत. आक्रमक लयकारी, तालाच्या लग्गीबरोबर स्वरांच्या गमकेची क्रीडा आणि प्रवाही लयीचे मूळ सूत्रं ही जयपूर गायकीची आणि विशेषत: पं. प्रभूदेव सरदारांच्या गायकीची बलस्थाने होती. बंदिशीचा अर्थ, त्यातील भाव, रागांची प्रकृती यांचा लालित्यपुर्ण मिलाप हेच त्यांच्या मैफली रंगण्याचे मर्म होते. गाताना गुरुजी कधीही वेडावाकडा चेहरा, अंगविक्षेप, मुद्राभंग आदी भाव करुन गात नव्हते. त्यांची मुद्रा प्रसन्न व शांत असे. गाताना रसिकांशी ते थेट संवाद साधत.

    गुरुजींना उस्ताद आमीर खॉं, पं. मल्लिकार्जुन मन्सूर व पं. कुमार गंधर्व यांच्या बद्दल प्रचंड श्रद्धा व आदर होता. पण त्यांची ही श्रद्धा डोळस होती. उस्ताद अमीर खॉं साहेबांची गायकी त्यांना खूप आवडायची. त्यांच्या गायकीचा प्रभाव त्यांच्या गाण्यावर होता. खॉंसाहेबांची संथ आणि अती विलंबीत लयीतील आलापी अतिशय प्रभावी होती. मेरूखंड प्रकारातील सरगम, गमक युक्त ताना ही सर्व वैशिष्ट्ये पं. प्रभूदेव सरदार यांच्या गायकीत होती. अमीर खॉं सोलापूरला आले की, त्यांचा मुक्काम सरदार वाड्‌यावर असे. खॉंसाहेबांनी बांधलेल्या दरबारी कानडा रागातील ‘किन बैरन कान भरे’, मालकंस मधील ‘जीन के मन राम बिराजे’, ‘आज मोरे घर’, कोमल रिषभ आसावरी रागातील ‘जगत सपना’, ललत रागातील ‘कहा जागे रात’, बैरागी भैरव रागातील ‘मन सुमिरत निस दिन’ अशा अनेक बंदिशी कोणीही अट न घालता उस्ताद अमीर खॉं यांनी पं. प्रभूदेव सरदार यांना दिल्या. पं. प्रभूदेव सरदार ही बहुदा या रागात याच बंदिशी गात असत. जयपूर घराण्याचे पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांची गायकीही पं. प्रभूदेव सरदार यांनी विशेष प्रिय होती. मल्लिकार्जुन मन्सूर यांची अफाट दमसास, आकारात्मक आलापी, दमदार गमकयुक्त धृपद अंगाच्या पल्लेदार ताना, आक्रमक व बलपेचांची लयकारी ही जयपूर घराण्याची वैशिष्ट्ये मल्लिकार्जून मन्सूर यांच्या गायकीत ठासून भरलेली असायची. मन्सूरांप्रमाणेच गुरुजींच्या गाण्यातही ही वैशिष्ट्ये पूरेपूर भरलेली होती. अल्लदिया खॉंसाहेबाचे अवघड राग, अनवट राग, जोड रागांचा खजीना पं. मल्लिकार्जुन मन्सूरांप्रमाणेच सरदारांकडेही होता.ते म्हणत, ‘अण्णांच्या (मल्लिकार्जुन मन्सूर) गाण्यात सळसळते चैतन्य भरलेले असे. गाताना रागात अण्णा अक्षरश: बुडून जात होते. दमदार धृपद अंगांच्या ताना, बोलताना, खास जयपूर अंगाची लयकारी ऐकताना मंत्रमुग्ध होतो, वेडावून जातो.’

    पं.प्रभूदेव सरदार यांना उस्ताद अमीर खॉ, पं. मल्लिकार्जुन मन्सूर , पं. कुमार गंधर्व, डागर बंधू, उस्ताद सईदुद्दीन डागर, ह्या गायकांनी प्रभावित केले होते. हे गायक प्रभावित करण्याचे मुख्य कारण म्हणजे ख्याल गायनातील शुद्धता. खयाल गायकी बरोबरच शुद्ध शास्त्रिय संगीत प्रकारातील धृपद-धमार गायकी त्यांना आकर्षित करायची. उस्ताद हुसेनोद्दिन डागर, सईदउद्दीन डागर, जहिरउद्दीन डागर, वसिफउद्दीन डागर आदी डागर बंधू, गुंडेचा बंधू यांच्या मैफिली आणि ध्वनीमुद्रीका आवर्जून ते ऐकत. शिवाय निर्मळमनाने इतर गायकांच्या कार्यक्रमांचाही ते आनंद घेत. गजल गायक मेहदी हसन यांच्या गजला त्यांना प्रिय होत्या. त्यात भूपेश्वचरी रागातील ‘अब के हम बिछडे है’ यमन कल्याणमधील ‘रंजीशी सही’, जिंदगी मे तो सभी’, भंखार रागातील ‘खूली जो आँख’, मल्हार रागातील ‘एक बस तु ही’, किरवानी रागातील ‘शोला था जल बुझा हूं’, नटभैरव मधील ‘गो जरा सी बात पर’ या गजला तसेच ‘उमड घुमड घीर आयी रे’ ही ठूमरी, ‘तीर नैनो का’ हा दादरा, मांड रागातील ‘केसरीया बालम’ हे राजस्थानी मंाड ते आवडीने ऐकत. गजल गायिका बेगम अख्तर, मेहदी हसन, बरोबरच परविन सुल्तान, उस्ताद बडे गुलाम अली खॉं यांच्या ही गायन शैलीची ते तारिफ करत. जुन्या गायकांबरोबरच नव्या गायकांनाही तेही ते तिक्याच मनमोकळेपणाने प्रोत्साहन देत. त्यात उस्ताद रशिद खॉं, पं. अजय चक्रवर्ती, पं. मुकुल शिवपुत्र, पं. राजन साजन मिश्र, जगदीश प्रसाद, अश्वितनी भिडे-देशपांडे, आरती अंकलीकर, श्रुती सडोलीकर, व्यंकटेशकुमार यांचा समावेश आहे. पं. प्रभूदेव सरदारांच्या शिष्या मध्ये सुजन साळकर, शाम गुंडावार, दीपक कलढोणे, रमेश कणबसकर, त्यांच्या कन्या मा.पार्वती माळेकोपमठ यांचा समावेश आहे. कर्नाटकमध्ये त्या खूप लोकप्रिय आहेत. त्या आपल्या वडिलांची गायकी त्या तोलामोलाने गातात. मा.प्रभूदेव सरदार यांचे १३ मार्च २००८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट
    प्रभूदेव सरदार

    उगीच का कांता
    https://www.youtube.com/shared?ci=Nokb0KSOAqY

    विलोपले मधुमिलनात या
    https://www.youtube.com/shared?ci=Ex1EUXJU1Dk

      March 15, 2017


  • नाना पाटेकर

    नाना पाटेकर लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत

      December 15, 2010