जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
जगामधल्या जर पाच सर्वश्रेष्ठ लघुकथा लेखकांची यादी केली तर ओ’हेनरी याच नाव त्यात आवर्जून घ्यावं लागतं.अवघे सत्तेचाळीस वर्षाचं आयुष्य लाभलेला हा लेखक आपल्या कथा लिखाणामुळे इतका अजरामर झालेला आहे की उत्कृष्ट लघु कथा कशी असावी असं जर कोणी विचारलं तर टीकाकार आणि जाणकार समीक्षक एकच उत्तर देतात, लघुकथा फक्त ओ’हेनरी याच्या कथे सारखी असावी. अशी अदभूत मोहिनी त्याने साहित्य विश्वाला घातली होती.
July 8, 2024
आपले मुल साडे तीन वर्षाचे झाले की आता माँटेसरीत घालणार असे म्हणतो, माँटेसरी हे नाव एका महान व्यक्तीचे आहे हे खूप कमी जणाना माहित असेल.
शाळा प्रवेशाच्या आधीच्या या शिक्षणाची पद्धती शोधून तिची मांडणी करणाऱ्या व त्याचेही 'विज्ञान बनवणाऱ्या बालमानस-तज्ज्ञ मारीया माँटेसरी. त्यांचा जन्म ३१ ऑगस्ट १८७० रोजी झाला.
माँटेसरी यांचे कार्य इतके महान आहे की लहान मुलांच्या शाळेला आता जगभर सर्वत्र 'माँटेसरी' असेच म्हटले जाते.
माँटेसरी यांचा इटलीत शेअरवेल या गावात झाला. वडिलांच्या वारंवार वेगवेगळ्या शहरांमध्ये बदल्या होत राहिल्याने मारीयाचे शिक्षणसुद्धा वेगवेगळया शहरांत होत राहिले. कधी फ्लॉरेन्स तर कधी रोम अशी त्यांची भटकंती चालू होती. त्यांना गणिताची विशेष गोडी व गतीही होती. त्यामुळे सुरुवातीला मा.मारीयानी इंजिनियर होण्याचे ठरवले. पण पुढे त्यांना वनस्पतीशास्त्रात गोडी वाटू लागली. नंतर त्यांना वैद्यकशास्त्राचे आकर्षण वाटले व त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला.
मतिमंद मुलांच्या मानसशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी संशोधन करतानाच त्यांचे तिथल्याच एका वैज्ञानिकाबरोबर प्रेमसंबंध जुळले व विवाहबाह्य संबंधांतूनच त्यांना मुलगा झाला. पण त्याला सोबत ठेवणे अशक्य होते. त्यातच त्यांच्या प्रियकरानेही दगा दिला. या साऱ्याचा बालमनावर कसा व किती परिणाम होतो, हे मारीयांनी स्वत:च्या घरातच पाहिले व त्यातूनच बालकांसाठी शिक्षणपद्धती कशी असावी, याचे संशोधन त्यांनी सुरू केले. बालमानसशास्त्र व त्यांचे शिक्षण, विशेषत: बौद्धिकदृष्ट्या भिन्न असलेल्या मुलांसाठी विशेष शिक्षण पद्धती याविषयात माँटेसरी विविध विद्यापीठे व संस्था यामध्ये भाषणे देऊ लागल्या. विसावे शतक सुरू होत असताना त्यांच्या नावाचा दबदबा निर्माण झाला होता.
शिशुशिक्षणाची त्या पुरस्कर्ती होत्या. त्यासाठी त्यांनी नवीन तंत्र व उद्योग शोधून काढली. मुलांचे खेळ व छंद यांवर त्यांचे मानसशास्त्र अवलंबून होते. अभ्यासाने मुलांना शीण न येता त्यांचा मानसिक विकास साधला जातो. असे त्यांचे म्हणणे होते. बालमनावर चांगले संस्कार करण्यासाठी त्यांना शिकवताना काय पद्धती अवलंबावी व कोणती पथ्ये पाळावीत, याबद्दल माँटेसरींनी काही सूत्रे तयार केली. आजही ती वापरली जात आहेत. माँटेसरी शिक्षण पद्धतीच्या शिक्षण-प्रशिक्षणाचा पहिला वर्ग माँटेसरींनी १९०९ साली उघडला. माँटेसरीची शिक्षणविषयक कल्पना वस्तुनिष्ठतेवर उभारली होती. तीमध्ये जीवनशक्तीचा आविष्कार हे प्रमुख तत्त्व होते. पहिल्या जागतिक महायुद्धांनंतर माँटेसरीं यांनी स्थापन केलेली इटलीतील संस्था बंद पडली. नंतर माँटेसरी अमेरिकेत गेल्या. त्यांनी न्यूयॉर्क येथे माँटेसरी शिक्षक–प्रशिक्षण महाविद्यालय स्थापन केले व ते एलिनार पार्कहर्स्ट यांच्यावर सोपविले.
शाळेत जाण्याचे वय होण्यापूर्वी बालकांना केवळ आपल्या वयोगटातील मुलांमध्ये मिसळता यावे व त्यांना सामुहिक सहजीवनाचा सराव व्हावा, म्हणून माँटेसरींनी अनेक खेळ, गीते, नृत्य प्रकार तयार केले. तीच बालगीते आजही वापरली जात आहेत. मा.माँटेसरी १९४० मध्ये भारतातही आल्या होत्या. त्यांनी मद्रासमध्ये चर्चासत्रे घेतली होती.
उतरत्या वयातही झपाटल्यासारख्या त्या जगभर फिरत राहिल्या. नोबेल शांतता पुरस्कारासाठी तीन वेळा त्यांचे नामांकन झाले. मात्र अखेरपर्यंत त्यांना ते मिळाले नाहीच. मा.माँटेसरी यांची काही उल्लेखनीय पुस्तके पुढीलप्रमाणे (१) द माइंड, (२) द डिस्कव्हरी ऑफ द चाइल्ड, (३) माँटेसरी मेथड (१९१२) (४) डॉ. माँटेसरीज ओन हँडबुक (१९१४) (५) द अँडव्हान्स्ड माँटेसरी मेथड (१९१७). मा.माँटेसरी यांचे ६ मे १९५२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
May 8, 2017
सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘स्कॅम १९९२ : द हर्षद मेहता स्टोरी’ ही वेबसीरिज काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाली होती. देशाच्या अर्थव्यवस्थेला हादरवून टाकणाऱ्या आणि सर्वात मोठा शेअर बाजार घोटाळा करणाऱ्या हर्षद मेहताच्या आयुष्यावर आधारित ‘स्कॅम 1992’ या वेबसीरिजमध्ये प्रतीक गांधी यांनी हर्षद मेहताची मुख्य भूमिका साकारली आहे.
April 30, 2022
मराठी साहित्यविश्वामधील सर्वात प्रसिध्द व प्रथितयश असलेल्या मनोरमा प्रकाशन या संस्थेचे अनिल फडके हे संस्थापक आहेत.
पुस्तकातील आकर्षक व रेखीव मांडणी, लक्षवेधक मुख व मलपृष्ठे, व सुबक अंतरंग या ठळक वैशिष्ठयांनी नटलेली त्यांची पुस्तके ही नेत्रसुखदपणाबातीत निश्चितच वेगळ्या स्वरुपाची सगतात. उत्तम उठाव होणारी पुस्तके प्रसिध्द करणे हा अनिल फडके यांचा केवळ व्यवसाय नसून, त्यांचे निश्चल साहित्यप्रेम तसंच निष्ठा या गोष्टी आहेत. जहिराती व मोठ-मोठे प्रकाशन समारंभ या नव्या विक्रीकौशल्यांवर त्यांचा विश्वास नसल्याने अत्यंत साधेपणाने त्यांची पुस्तके प्रकाशित होतात.
लेखकांना पृष्ठसंख्येच्या हिशोबाने तात्काळ मानधन देणे, आणि स्वतःच्या टेम्पोमधून खेड्यापर्यंत मोठया प्रमाणावर पुस्तकांचे वितरण करणे ही त्यांच्या कार्यपध्दतीमधील विलोभनीय पैलू आहेत.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
January 3, 2015
१९२६ साला पासून या जोडीनी खरी धमाल सुरू केली. त्यांचा जन्म १६ जुन १८९० रोजी झाला. लॉरेल हा सडपातळ, काहीसा कुरकु-या आणि हार्डी लठ्ठ नि मस्तमौला. दोघांची एकमेकांवर चाललेली कुरघोडी, त्यांचा एकत्र गोंधळ आणि मस्ती यावर प्रेक्षक तुडूंब प्रसन्न होते. सा-या जगभर या जाड्या-रड्याचा धुमाकूळ चालू होता. जगातल्या सुमारे वीस भाषांमध्ये हे लघु-चित्रपट अनुवादित झाले आणि पुन:पुन्हा पाहिले गेले. स्टॅन लॉरेल आणि ऑलिव्हर हार्डी या जोडीनं हॉलिवूडमध्ये तब्बल १०७ चित्रपट केले. ही संख्या त्यांच्या एकत्र असलेल्या चित्रपटांची आहे. यात एकूण ३२ मूक-लघुपट, ४० लघुपट आणि २३ पूर्ण लांबीचे चित्रपट आहेत. शिवाय १२ चित्रपटांमध्ये त्यांनी पाहुण्या कलाकारांची भूमिका केली होती. त्यापूर्वी म्हणजे त्यांची जोडी होण्यापूर्वीच लॉरेलनं ५० आणि हार्डीनं तर चक्क २५० चित्रपटांमधून भूमिका केल्या होत्या. १९२१ मध्ये ‘द लकी डॉग’ हा त्यांचा एकत्र असा चित्रपट आला होता, पण तो ‘लॉरेल-हार्डी’ जोडीचा चित्रपट म्हणून ओळखला जात नाही. तेव्हाच त्यांची जोडी करायला हवी होती, पण त्यांना नंतर एकत्र आणलं हाल रोच या निर्मात्यानं. हे साल होतं १९२६. ‘लॉरेल-हार्डी’ आणि ‘अवर गँग’ या हाल रोच यानं जगाला बहाल केलेल्या दोन लघुपट मालिका आहेत. पैकी लॉरेल हार्डीचं यश प्रचंड मोठं होतं. पुटींग पँट्स ऑन फिलिप’ हा लॉरेल-हार्डीचा एकत्र असा पहिला लघुपट आला १९२७ मध्ये. हा मूकपट होता. १९४० पर्यंत ते ‘हाल रोच स्टुडिओज्’ बरोबर होते. त्यानंतर पाच वर्षं त्यांनी ‘ट्वेंटीएथ सेंच्युरी फॉक्स’ आणि ‘एमजीएम’ बरोबर एकूण आठ चित्रपट केलेत. आपला शेवटचा चित्रपट ‘अॅ्टॉल के’ केल्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीतून रीतसर निवृत्ती घेतली. ‘द म्युझिक बॉक्स’ हा त्यांचा सगळ्यात गाजलेला चित्रपट, ‘द म्युझिक बॉक्स’ या चित्रपटाला पहिलं ऑस्कर मिळालं होतं आणि १९६० मध्ये स्टॅन लॉरेल यांना अॅझकेडेमीचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता. स्टॅन लॉरेल यांचे २३ फेब्रुवारी १९६५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ प्रसाद नामजोशी
लॉरेल हार्डी चे चित्रपट
'द म्युझिक बॉक्स'
https://www.youtube.com/watch?v=JCc_8xpBzwY
https://www.youtube.com/watch?v=SLOq2zWUZsQ
https://www.youtube.com/watch?v=YLXjxu1VWZ4
https://www.youtube.com/watch?v=ftYjyEi7dpQ
https://www.youtube.com/watch?v=YzqPoeuGwsE
https://www.youtube.com/watch?v=zTAPZTfIXVE
June 16, 2019
भाऊंनी भारतभर दौरा करून हस्तलिखिते, शिलालेखांचे ठसे, दुर्मीळ चित्रं, नाणी, ताम्रपट, शस्त्रे इ. वस्तूंचा संग्रह केला. मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीचे ते सदस्य होते व पुढे उपाध्यक्ष झाले. वेगवेगळ्या परिषदांत त्यांनी प्राच्यविद्येच्या संदर्भात अनेक शोधनिबंध सादर केले. मुकुंदराज, हेमाद्री, हेमचंद्र इ. व्यक्तींचे तसेच कालिदासांचा कालनिर्णय आणि शिलालेख व ताम्रपट यावरील त्यांचे शोधनिबंध अभ्यासपूर्ण होते. माक्स म्युलर व रा. गो. भांडारकर यांनी या शोधनिबंधांविषयी गौरवोउद्गार काढले आहेत. कालिदासाचे कुमारसंभव व मेरुतुंगाचार्याचा प्रबंध, चिंतामणी हे ग्रंथ त्यांनी संपादित केले. तथापि त्यांनी लिहिलेला एकही स्वतंत्र ग्रंथ नाही. त्यांच्या मरणोत्तर रामचंद्र घोष यांनी द लिटररी रिमेन्स ऑफ भाऊ दाजी या शीर्षकाने त्यांचे संशोधनात्मक शोधनिबंध प्रसिद्ध केले.
May 31, 2022
अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या घराण्यात चारशे वर्षेपासुन समाजप्रबोधनाच्या कार्याची वंशपरंपरा आहे. त्यांच्या घराण्याचे मूळचे आडनांव 'शेंडे'असे होते. त्यांच्या भूतकाळातल्या आठव्या पिढीतील पूर्वज गोविंद चिंतामण शांडिल्य ऊर्फ शेंडे हे धर्मजागृतीचे काम स्वेच्छेने करायचे. त्याकाळचे दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांनी त्यांना सन्मानाने 'धर्माधिकारी'अशी पदवी दिली. तेंव्हापासून आजतागायत त्यांचे घराणे धर्माधिकारी हे आडनांव लावत आले आहेत आणि त्याला समर्पक असे धर्मजागृतीचे काम करीत आले आहेत. अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आपल्या पित्याकडून प्रेरणा घेऊन सेवाव्रत घेतले आणि ते अव्याहतपणे चालवले आहे. त्यांचा जन्म १४ मे १९४६ रोजी झाला. त्यांचे पिता नारायण विष्णु धर्माधिकारी हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ व प्रसिद्ध समर्थ दासबोधाचे निरूपणकार, अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, समाजप्रबोधन, व्यसनमुक्ती क्षेत्रात निरलसपणे कार्य करणारे नानासाहेब यांचे जगभरात लाखो अनुयायी आहेत.
धर्माचरणाविषयी बोलतांना त्या अनुषंगाने अज्ञान, अंधश्रध्दा, भेदाभेद, व्यसनासक्ती, स्त्रियांवरील अत्याचार आदि दुष्ट प्रवृत्तींचे उच्चाटन करून समाजाला सन्मार्गाला लावण्याची शिकवण ते देत आले. आधुनिक संदर्भात दासबोधाच्या कमालीच्या सोप्या निरूपणातून विकारी मनांची मशागत करताना निर्व्यसनी समर्थ समाजाचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. या कामासाठी त्यांनी १९४५ साली रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती स्थापन केली. या संस्थेद्वारे त्यांनी जगभरात अध्यात्माचा प्रसार केला. त्याच्या शाखा आज भारताबाहेरील अनेक देशांपर्यंत पसरल्या आहे.
आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीही अथक परिश्रम घेऊन, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या सर्वांगीण पुरु षार्थाची ओळख त्यांनी, स्वत:ची ओळख विसरलेल्या समाजाला करून दिली. बैठकांच्या मौखिक निरूपणाच्या माध्यमातून त्यांनी आरोग्यसंपन्न समाजनिर्मितीची प्रक्रिया सुरू केली आहे. मा.अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाने त्यांना डी लिट पदवी बहाल दिली आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
May 15, 2017
अँडी रॉबर्ट्स यांचे बाउन्सर सर्वाधिक धोकादायक समजले जात असत. बाउन्सरच्या आधीचा चेंडूही काहीसा उसळे, पण तो मऊ भागावर आपटवला जाई.
January 29, 2022
सिनेसृष्टीतील ‘हॅप्पी गो लकी’ अभिनेता म्हणजे पुष्कर श्रोत्री. सिनेमा असो, नाटक, मालिका किंवा सूत्रसंचालन ह्या सर्व आघाड्या तो लिलया पार पाडतो. विनोदी अभिनेता म्हणून तो प्रसिध्द आहे. पुष्कर श्रोत्रीने आजवर पंचवीस हून अधिक मराठी व हिंदी चित्रपटात काम केले आहे. मुख्यत्वे विनोदी भूमिकांसाठी तो ओळखला जातो. हापूस, एक डाव धोबीपछाड, झेंडा, मोरया, अ पेइंग घोस्ट, कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील त्याचा अभिनय रसिकांना वाखाणला आहे. रेगे या चित्रपटातून त्याने रंगवलेला इन्स्पेक्टर त्याच्या अभिनयाची दुसरी गंभीर बाजूही दाखवून जातो. ह्या भूमिकेसाठी त्याला महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? चा सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कारही प्राप्त झाला आहे. हिंदीमधील मुन्नाभाई एम.बी.बी.एस. आणि लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटातील त्याचे प्राध्यापक डॉक्टरचे पात्रही रसिकांच्या आजही लक्षात आहे.
पुष्कर श्रोत्री याने दिलीप प्रभावळकर यांनी गाजवलेले ‘हसवाफसवी’ या नाटकाचे प्रयोग पण गाजवले आहेत. त्यातील त्याच्या सहा वेगवेगळ्या भूमिका एकदम अप्रतिंम आहेत. मराठी चित्रपटसृष्टीचा कोणताही पारितोषिक वितरण सोहळा असो किंवा कॉमेडी शो, सध्या एक मराठी कलावंताने सर्वदूर हे क्षेत्र व्यापले आहे. तो म्हणजे पुष्कर श्रोत्री. पुष्कर श्रोत्री याने आजपर्यंत अनेक महत्वाच्या मनोरंजनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे. टी,व्ही वरील फू बाई फू , स्मार्ट सूनबाई हे त्याचे कार्यक्रम विशेष लोकप्रिय झाले होते. ‘दामिनी’, ‘बंदिनी’, ‘सावज’, ‘भूल’, ‘सांजसावल्या’, ‘अवंतिका’, ‘वादळवाट’, ‘अभिलाषा’, ‘दौलत’, ‘अर्धांगिनी’, ‘व्हील स्मार्ट सुनबाई’, ‘टिकल ते पोलीटिकल’, आदि मालिका पण त्याच्या अभिनयाचं विशेष कौतुक झाले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
May 2, 2017
बीटल्स या प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या बँडच्या चार आधारस्तंभांपैकी एक म्हणून सुप्रसिद्ध ब्रिटीश संगीतकार, गिटारवादक, गायक, गीतकार, अभिनेते आणि फिल्म निर्माते जॉर्ज हॅरिसन यांनी आंतरराष्ट्रीय कीर्ति मिळवली.
December 3, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti