जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
गोविंदराव आदिक हे महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेसचे अध्यक्ष होते
April 14, 2010
२००१ मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला तर त्यांना ‘ सर ‘ हा किताब देखील मिळाला आहे. नायपॉल यांचे लिखाण नेहमीच वादग्रस्त ठरले त्यांनी अनेक पुस्तके लिहिली परंतु त्यांचे खाजगी आयुष्य देखील वादग्रस्तच राहिले.
August 29, 2021
साठ च्या दशकात गंगा जमुना या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणा-या अरुणा इराणी यांनी तीनशेहून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. त्यांचा जन्म ३ मे १९५२ रोजी झाला. १९६१ मध्ये गंगा जमुना या सिनेमात काम करणा-या अरुणा यांचे त्यावेळी वय केवळ नऊ वर्षे होते. 'जहां आरा', 'फर्ज', 'उपकार', 'आया सावन झूम के', 'कारवां' यांसारख्या हिट सिनेमांमध्ये मा.अरुणा इराणी यांनी काम केले. कारवां या सिनेमातील मा.अरुणा इराणी यांच्या कामाचे विशेष कौतुक झाले. या सिनेमातील 'चढ़ती जवानी मेरी चाल मस्तानी', आणि 'दिलबर दिल से प्यारे' ही गाणी अरुणाच्या डान्समुळे लोकप्रिय झाली. १९७२ मध्ये मा.अरुणा यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह 'बॉम्बे टू गोवा' या सिनेमात स्क्रिन शेअर केली. या सिनेमात महमूदसुद्धा होते.
अरुणा यांचे नाव त्याकाळी महमूद यांच्यासोबत जुळले होते. त्यांनी महमूद यांच्यासह 'औलाद', 'हमजोली', 'नया जमाना', 'गरम मसाला' आणि 'दो फूल' या सिनेमांमध्ये काम केले.
'थोड़ा रेशम लगता है', 'चढ़ती जवानी मेरी चाल मस्तानी', 'दिलबर दिल से प्यारे', 'मैं शायर तो नहीं' हे ही जी सुपरहिट गाणी आहेत, ती मा.अरुणा इराणी यांच्या डान्समुळे आणखीनच प्रसिद्ध झाली. मा.अरुणा यांनी इंडस्ट्रीत येणा-या नवोदित अभिनेता-अभिनेत्रींना खूप मदत केली. हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या काही कलाकारांच्या बाबतीत अरुणा इराणी खूप ‘लकी’ ठरल्या आहेत. ज्यांनी आपल्या पदार्पणातील चित्रपटात अरुणा इराणी यांच्यासोबत काम केले ते पुढे ‘स्टार’ झाले आहेत. जीतेंद्र (फर्ज), ऋषी कपूर व डिम्पल कपाडिया (बॉबी), शबाना आझमी (फकिरा), जयाप्रदा (सरगम), कुमार गौरव (लव्हस्टोरी), संजय दत्त (रॉकी). या सर्व चित्रपटात अरुणा इराणी यांनी काम केले होते. त्यांनी 'फर्ज'मध्ये जितेंद्र, 'बॉबी'मध्ये ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया, 'सरगम'मध्ये जयाप्रदा, 'लवस्टोरी'मध्ये कुमार गौरव आणि 'रॉकी'मध्ये संजय दत्तची बरीच मदत केली. मात्र हे सर्व सुपरस्टार बनले आणि दुर्दैवाने अरुणा इराणी या सहायक अभिनेत्रीच राहिल्या. 'पेट प्यार और पाप' आणि 'बेटा' या सिनेमातील उत्कृष्ट अभिनयासाठी अरुणा यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहायक अभिनत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. आपल्या करिअरमध्ये अरुणा यांनी मराठी सिनेमांमध्येही अभिनय केला. शिवाय छोट्या पडद्यावरही त्यांचे दर्शन घडले. १९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चंगूमंगू’मध्ये अरुणा इराणी यांनी काम केले होते. २००० साली 'जमाना बदल गया' या मालिकेद्वारे त्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२०१७३३
संदर्भ.इंटरनेट
May 3, 2017
अलीशा चिनॉय चे नाव घेतले की मेड इन इंडिया एक प्याेरा सोनिया एक दिल चाहिए बस मेड इन इंडिया हे गाणे डोळ्या समोर येते. त्यांचा जन्म १८ मार्च १९६५ अहमदाबाद येथे झाला. अलीशा चिनॉय यांना बॉलीवूड मध्ये बाप्पी लहरी यांनी आणले. अलीशा चिनॉय यांनी बाप्पीदा यांच्या बरोबर १९८० च्या काळात टारझन, डान्स डान्स कामांडो, गुरु, लव्ह लव्ह असे अनेक चित्रपट केले. १९९५ साली आलेले मेड इन इंडिया हे गाणे अलीशा चिनॉय यांना एका रात्रीत हिट करून गेले. ह्या गाण्याच्या आधीही अलीशा चिनॉय यांनी गाणी गायली होती, पण मेड इन इंडिया हे गाणे त्यांना लकी ठरले. या गाण्याबरोबरच काटे नही कटते हे मिस्टर इंडिया मधील गाणे पण गाजले. अलीशा चिनॉय यांनी मा.बाप्पी लहरी यांच्या बरोबरच आनंद मिलिंद,कल्याणजी आनंदजी,नदीम श्रवण,अन्नू मलिक राजेश रोशन अश्या संगीतकाराबरोबर काम केले आहे. अलीशा चिनॉय यांचे इतर अल्बम जादू, बेबी डॉल, आहह, अलीशा आहेत. अलीशा चिनॉय यांची गाजलेली काही गाणी तेरे इश्क में नाचेंगे (राजा हिंदुस्तानी), छा राहा हैं प्यार का नशा (चंद्रमुखी) रौंधे (प्यार तुने क्या किया), सोना सोना रूप है (बॉलीवुड / हॉलीवुड), मौजे में (कारोबार), दे दिया (कीमत), रुक रुक रुक (विजयपथ) और विवादास्पद सेक्सी सेक्सी सेक्सी मुझे लोग बोले (खुद-दार).
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
अलीशा चिनॉय यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=6NkGASg4LoA
मेड इन इंडिया गाणे
https://www.youtube.com/watch?v=IvloHsmi_vg
March 21, 2017
मुकेश यांचे संपूर्ण नाव मुकेश चंद माथुर. त्यांचा जन्म २२ जुलै १९२३ रोजी झाला. १९४१ साली ‘निर्दोष’ या चित्रपटाद्वारे अभिनेता-गायक म्हणून या क्षेत्रात पदार्पण केलेल्या मा. मुकेश यांनी खऱ्या अर्थाने पार्श्वगायनाला सुरुवात केली ती १९४५ पासून ‘पहली नजर’ या चित्रपटातील ‘दिल जलता है..’ ह्या गाण्यापासून. हे लोकांना खुप आवडले आणी मुकेश रातोरात स्टार झाले त्यानंतर त्यांनी कधी मागे वळुन पाहिले नाही. त्यांच्या आयुष्यातील एक टर्नींग पॉइंट म्हणजे त्यांची राज कपूर यांच्याशी झालेली भेट. आजपर्यंतच्या सर्वोत्कृष्ट अशा बोटावर मोजता येणार्याद गायकांमध्ये मुकेश यांचा क्रम वरचा आहे. त्यांची गाणी आजही आवडीने ऐकली जातात, गुणगुणली जातात.
आवारा, श्री ४२० चित्रपटातील गाण्यांचा जगभर बोलबाला झाला. आजही परदेशी लोक ‘आवारा हूँ’ असे म्हणून अभिवादन करतात. मुकेश यांच्या आवाजात दु:ख व्यक्त करण्याचा नैसर्गिक असा, त्यावर फुंकर घालण्याचा, गाण्यातून दु:ख विसरण्याचा भाव आहे. त्याला तोड नाही. जवळपास सर्व संगीतकारांनी, अभिनेत्यांनी त्यांचा आवाज वापरला होता. दिलीपकुमार, देवआनंद यांनीही सुरुवातीला त्यांचा आवाज घेतला आहे. ‘आग’मध्ये राज कपूर यांच्यासाठी मुकेश यांनी प्रथम पार्श्वगायन केले. येथूनच मग राज कपूर-मुकेश हे समीकरण जुळले आणि उदयास आली अवीट गोडीची श्रवणीय गाणी ! आग, आवारा, श्री 420, बरसात, परवरिश, अनाडी, संगम ते मेरा नाम जोकर असे मुकेश यांच्या सदाबहार गाण्यांनील नटलेले ‘आरके’ कॅम्पमधले चित्रपट म्हणजे कानसेनांना मेजवानीच होती. प्रख्यात गीतकार मजरूह सुलतानपुरी यांनी सांगितले आहे की, उर्दूचे निर्दोष उच्चारण मुकेश यांच्याएवढे दुसरे कोणाचेही नाही.
‘संगीतसम्राट तानसेन’ शास्त्रीय संगीतावर आधारित चित्रपट असूनदेखील ‘झुमती चली हवा’ हे गाणे मुकेश यांना दिल्याबद्दल संगीतकार एस. एन. त्रिपाठी यांना विचारले असता त्यांनी सांगितले होते की, या गाण्यातील भावना समर्थपणे व्यक्त करणारा दुसरा कोणीही गायक नाही. हिंडोल रागातील हे नितांतसुंदर गीत आहे. मन्ना डे एकदा बोलताना म्हणाले होते की, मुकेश यांच्या गाण्यातील सहजता आम्हा कोणातही नाही. त्यांना सूर व भाव अतिशय लवकर पकडता येतात. निर्माता म्हणून त्यांनी मल्हार, आक्रमण या सिनेमांची निर्मिती केली. त्यांनी दुख-सुख, आदाब अर्ज, माशूका, आह, आक्रमण, दुल्हन यांसारख्या सिनेमातून अभिनेता म्हणून कामही केले.पण ते या अभिनेता म्हणून काही विशेष चमक दाखवू शकले नाही. त्यानी अभिनायासाठी काही काळ गायन ही बाजूला ठेवले होते पण योग्य वेळीच ते सावरले आणि पुन्हा गायनावर लक्ष केन्द्रित केले. त्यांनी आपल्या तीन दशकाच्या कारकिर्दीत २०० पेक्षा जास्त चित्रपटात पार्श्वगायन केले. त्यांना चार वेळा फिल्मफेअरचा सर्वश्रेष्ठ पार्श्वगायक हा पुरस्कार मिळाला. १९७४ मध्ये प्रदर्शित झालेल्या रजनीगंधा मधील गाणे ‘कई बार यू हीं देखा…’ साठी मुकेश यांना राष्ट्रिय पुरस्कार मिळाला.
मुकेश यांचे २७ ऑगस्ट १९७६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
मुकेश यांची काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=Ks0k3YQRu90
August 27, 2017
मराठी चित्रपट सृष्टीतील चॉकलेटी नायक म्हणून उमेश कामत यांनी ओळख मिळवली आहे. "कायद्याच बोला" या चित्रपटातून त्यांनी २००६ साली आपली चित्रपट सृष्टीतील कारकीर्द सुरु केली. ते प्रिया बापट यांच्याशी विवाहबद्ध झाले आहेत. कायद्याच बोला,समर - एक संघर्ष, पटल तर घ्या, अजब लग्नाची गजब गोष्ट ,मणि मंगळसूत्र ,थोडी खट्टी थोडी हट्टी, धागे दोरे,,परीस, टाइम प्लीज, माय डिअर यश ,लग्न पाहावे करून, पुणे वीअ बिहार ,बाळकडू, अ पेइंग घोस्ट, मुंबई टाइम, अश्या अनेक मराठी चित्रपटातून अभिनय केला आहे. त्यांच्याविषयी अधिक माहिती करीता तुम्ही त्यांच्या www.umeshkamat.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 3, 2017
अमेरिका, ब्रिटन आणि जगभरातील एकूण १३० देशांमध्ये स्टीव्हला ‘क्रोकोडाइल हंटर’ म्हणून याच कार्यक्रमाच्या माध्यमातून ओळख मिळाली. ‘द क्रोकोडाइल हंटर’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या काळात ५० कोटी लोकांपर्यंत स्टीव्ह आणि त्याच्या कुटुंबाचे कार्य पोहचले.
February 21, 2022
संजीवनी मराठे कवयित्री तर होत्याच, शिवाय कविसंमेलनात स्वत:च्या कविता सुरेल आवाजात त्या गातही असत. शाळकरी वयातच त्या कविता लिहू लागल्या. तरुण वयात घरचा विरोध असताना त्यांनी रामभाऊ मराठे यांच्याशी विवाह केला होता. १९३२ साली कोल्हापूरला भरलेल्या साहित्यसंमेलनात त्यांचा काव्यक्षेत्रात प्रवेश झाला. त्यांचा पहिला कवितासंग्रह ‘काव्यसंजीवनी’ त्याच वर्षी प्रकाशित झाला. पुढे ‘राका,’ ‘संसार’, ‘छाया’, ‘चित्रा’, ‘चंद्रफूल’, ‘मी दिवाणी’ ‘आत्मीय’ अशा अनेक कवितासंग्रहातून आणि ‘भावपुष्प’ व ‘परिमला’गीतसंग्रहांतून त्यांची काव्यजीवनातील वाटचाल रसिकांना अनुभवता आली. संजीवनी मराठे यांच्या कविता तरल आणि संजीवक स्वप्नांची निर्मिती करणारी आहे. संजीवनी मराठे यांच्या कविता आणि गीते यांनी मराठी मनाला एकेकाळी मोहिनी घातली होती.
संजीवनी मराठे यांच्या बालकविताही लक्षवेधी आहेत. बालमनाची संवेदनशीलता लक्षात घेऊन त्यांनी शिशुगीते, कुमारगीते लिहिली आहेत. त्यात वात्सल्यभावनेचा परिपोष आढळतो. त्याचबरोबर मुलांचे खेळकर, चंचल, निरागस भावजीवन त्यात प्रतिबिंबित झालेले दिसते. मुलांशी संवाद साधत लिहिलेल्या या गीतांमध्ये गोडवा आहे. ‘बरं का ग आई’ आणि ‘नको बाई रुसू’ हे त्यांचे बालगीत संग्रह प्रसिद्ध आहेत. त्याशिवाय त्यांच्या काही कवितासंग्रहांमध्येही बालगीतांचा समावेश आहे. त्यांची ‘या गडे हासू या, या गडे नाचू या, गाऊ या मंगलगान,’ तसेच ‘सोनियाचा पाळणा, रेशमाचा दोर ग मधोमध विसावला, माझा चित्तचोर ग’ ही गाणी आजही लोकांच्या आठवणीत राहिलेली आहेत.
संजीवनीबाईंवर भा. रा. तांबे यांच्या भावगीतांचाही प्रभाव होता. आणखीही एका कवीचा त्यांच्यावर प्रभाव होता, तो कवी म्हणजे रवींद्रनाथ टागोर. टागोरांच्या ‘गीतांजली’ आणि ‘गार्डनर’मधील निसर्गरूपात परमतत्त्व पाहण्याच्या दृष्टीचा ठसा संजीवनीबाईंच्या कवितांमध्येही जाणवतो. संजीवनीबाईंच्या कविता वाचताना काळाच्या अंतरावरून तिच्या काही मर्यादा जाणवतात आणि ते साहजिकही आहे. आज मराठीतील स्त्रीकाव्य वेगळय़ा टप्प्यावर आहे. पण म्हणून त्यांच्या कवितेच्या परंपरेतील संदर्भखुणा विसरता येणे शक्य नाही. किंबहुना संजीवनीबाई, पद्मा गोळे, सरिता पदकी आणि शांता किलरेस्कर यांनी पुण्यात ‘साहित्यप्रेमी भगिनी मंडळ’ ही संस्था स्थापन करून आपली दूरदृष्टी व्यक्त केलेली आहे. संजीवनी मराठे यांचे १ एप्रिल २००० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
April 1, 2019
गेली काही दिवस बाळासाहेब ठाकरे मृत्यूशी झुंज देत होते. अनेक दिग्गज राजकिय विरोधकांना शमवणारे बाळासाहेब यांच्यापुढे मृत्यूचेही काही चालेना. मृत्यू गयावया करू लागला तेव्हा बाळासाहेबांना मृत्यूची दया आली आणि दिनांक १७ नोव्हेंबर २०१२ रोजी दुपारी ३ वाजून ३३ मिनीटांनी बाळासाहेब ठाकरे यांनी मृत्यूस स्वतःला अर्पण केले आणि अवघा महाराष्ट्र पोरका झाला.
November 20, 2012
“शास्त्रीय मराठी व्याकरण‘ हा सुमारे एक हजार पृष्ठांचा ग्रंथ मोरो केशव दामले यांनी लिहिला. त्यांचे व्याकरण पुढील मराठी व्याकरणकारांस आधारभूत ठरले. त्यांच्या ग्रंथात असंख्य उदाहरणे, असंख्य शब्द गटवारीने उपलब्ध करून दिले आहेत. हे व्याकरणाच्या क्षेत्रातील मोठे काम म्हटले गेले.
March 18, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti