जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
किशोर कुमार यांच्या गायनाचे विश्लेषण करण्याअगोदर या गाण्याच्या निमित्ताने त्यांच्यावरील “यॉडलिंग” करणारा गायक असा लागलेला शिक्का किती चुकीचा आहे, हेच दर्शवायचे आहे. आपण किती सहजपणे कुठल्याही कलाकाराला झापडबंद अशा लेबलात अडकवतो यायचे उत्तम उदाहरण म्हणजे किशोर कुमार.
August 23, 2018
दुर्गम आदिवासी भागात आरोग्याचा कानमंत्र देणार्या कार्यकर्त्यांची फौज डॉ. सतीश गोगुलवार यांनी उभी केली. या कामातून विश्वासाचा पूल बांधला गेला.
डॉ. सतीश गोगुलवार यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला मिशन आरोग्याचे हा लेख पुढील पानावर वाचा.
डॉ. सतीश गोगुलवार यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला मिशन आरोग्याचे हा लेख वाचा.
July 24, 2015
‘मल्लिका ए तरन्नुम’ नूरजहाँ यांचे खरे नाव 'अल्लाह वसई होते. त्यांचा जन्म २१ सप्टेंबर १९२६ रोजी झाला. नूरजहाँ यांचा जन्म पेशावर येथील संगीतकार मदद अली यांच्या परिवारात झाला. संगीतकार परिवारात जन्म झाल्याने नूरजहाँ यांना लहानपणा पासून संगीताची आवड निर्माण झाली. नूरजहाँ यांनी वयाच्या पाचव्या वर्षी गाणे शिकायला सुरवात केली होती. नूरजहाँ यांचा परिवार १९३० मध्ये कलकत्ता येथे आला. तेथे नूरजहाँ यांना नृत्य व गाणे शिकायला मिळाले. नूरजहाँ यांच्या गाण्यावर प्रभावित होऊन संगीतकार गुलाम हैदर यांनी पंजाबी चित्रपट ‘शीला’ उर्फ ‘पिंड दी कुड़ी’ मध्ये बाल कलाकाराची भूमिका दिली. हा चित्रपट पंजाब मध्ये गाजला. त्या काळी पंजाब म्हणजे लाहोर पण होते.
१९३० च्या दशकात लाहोर मध्ये अनेक स्टूडियो स्थापन झाले. गायकाची वाढती मागणी लक्षात घेऊन नूरजहाँ यांचा परिवार १९३७ मध्ये परत लाहोरला आला. तेथे डलसुख एल पंचोली यांनी बेबी नूरजहाँ यांचे गाणे बघून ‘गुल-ए-बकवाली’ या चित्रपटात भूमिका दिली. या नंतर त्यांचा यमला जट, ‘चौधरी’ चित्रपट प्रदर्शित झाला. यातील गाणी ‘कचियां वे कलियाँ ना तोड़’ व ‘बस बस वे ढोलना की तेरे नाल बोलना’ ही खूप लोकप्रिय झाली. १९४२ मध्ये नूरजहाँ यांनी आपल्या पुढील बेबी हा शब्द काढला. त्याच वर्षी ‘खानदान’ चित्रपटातून त्यांनी लोकांचे ध्यान वेधून घेतले. याच चित्रपटाचे निर्देशक शौकत हुसैन रिजवी यांच्या बरोबर लग्न केला. १९४३ मध्ये नूरजहाँ मुंबईला आल्या. आजही जुन्या पिढीतील लोक त्यांच्या ‘लाल हवेली’, ‘जीनत’, ‘बड़ी माँ’, गाँव की गोरी और मिर्जा साहिबाँ, अनमोल घडी या चित्रपटासाठी नूरजहाँ यांची आठवण काढतात. अनमोल घड़ी चे संगीत नौशाद यांनी दिले होते त्यातील ‘आवाज दे कहाँ है’, ‘जवाँ है मोहब्बत’ और ‘मेरे बचपन के साथी’ ही गाणी आजही लोक आवडीने एैकतात. नूरजहाँ फाळणी नंतर मुंबई लाहोरला आल्या. त्यांचे पती रिजवी यांनी शाहनूर स्टूडियो चालू केला.
शाहनूर प्रोडक्शन नी ‘चन्न वे’ (1950) ची निर्मिती केली ज्याचे निर्देशन नूरजहाँ यांनी केले होते. त्यातील ‘तेरे मुखड़े पे काला तिल वे’ हे गाणे लोकप्रिय झाले. नूरजहाँ यांची शेवटचा चित्रपट ‘बाजी’ होता त्यांनी पाकिस्तातात १४ चित्रपट बनवले त्यातील १० उर्दू होते. काही कारणाने त्यांना अभिनय सोडवा लागला पण त्यांनी गाणे चालू ठेवले. पाकिस्तानात पार्श्व गायिका म्हणून त्यांचा पहिला चित्रपट ‘जान-ए-बहार’ होता. यातील ‘कैसा नसीब लाई’ हे गाणे लोकप्रिय झाले होते. त्यांनी आपल्या फिल्मी करियर में उर्दू, पंजाबी व सिंधी भाषात अनेक गाणी गायली. त्यांना पाकिस्तान मधील सर्वोच्च सम्मान ‘तमगा-ए-इम्तियाज’ मिळाला होता. नूरजहाँ यांचे २३ डिसेंबर २००० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
December 23, 2018
महाराष्ट्राची तरुण पिढी १९२० ते १९५०-५५ पर्यंत ज्यांनी वैचारिकदृष्ट्या घडविली, बुद्धिवादाचे आणि त्याचबरोबर नैतिकतेचे संस्कार ज्यांनी तिच्यावर केले, आणि तिला ध्येयप्रवण बनविले अशा विचारवंतांमध्ये आचार्य शं.द. जावडेकर यांचा प्रामुख्याने समावेश होतो. महाराष्ट्रातील बहुतेक सर्वसमाजवादी नेते, कार्यकर्ते त्याचप्रमाणे राष्ट्रसेवा दलाचे हजारो सैनिक जावडेकर यांच्या वैचारिक शिदोरीवर पोसले गेले.
August 22, 2017
त्यांनी “रामशास्त्री’, “धन्यवाद’, “पुढचं पाऊल’, “मी तुळस तुझ्या अंगणी’, “नायकिणीचा सज्जा’, “सांगत्ये ऐका’ यांसारखे मोजकेच चित्रपट केले.
July 23, 2017
महाराष्ट्र कविचरित्रमाला” ही ३००० पृष्ठांची, ११ पुस्तकांची माला सिद्ध करणारे जगन्नाथ आजगावकर यांचा जन्म १६ ऑगस्ट १८७९ रोजी झाला.
'कवन-कुतूहल' (पद्यरचना), “प्रणय विकसन”, “प्रणयानंद” ही नाटके आणि “मुकुंदराजाचा सार्थ-परमाकृत” हा संपादित ग्रंथ, तसेच काही बाल-पुस्तके त्यांनी लिहिली.
Jagannath Raghunath Ajgaonkar
November 7, 2017
१९८३ मध्ये त्यांनी मॉर्गन स्टॅन्ले या कंपनीत नोकरी स्वीकारली. या कंपनी रूजू होणारे ते पहिले भारतीय होते. १९९० मध्ये कंपनीच्या यूस इक्विटी सिंडिकेट विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्त झाली.
January 14, 2022
‘धिंड,‘नाटक’,‘मिटिंग’ यासारख्या ग्रामीण कथांच्या रसिकांपर्यंत पोहोचलेल्या शंकर पाटील यांचा जन्म ८ ऑगस्ट १९२६ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथे झाला.
शंकर बाबाजी पाटील यां चे शिक्षण तारदाळ (ता. हातकणंगले) व गडहिंग्लज येथे व कोल्हापूर येथे बी. ए. बी. टी. पर्यंत रयत शिक्षण संस्थेच्या शाळांतून अध्यापन केले. त्यानंतर आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर त्यांची नियुक्ती झाली. सुरुवातीस आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर कार्यक्रम सहाय्यक अधिकारी काम केत असताना शंकर पाटील यांनी १९५९ मध्ये एशिया फौंडेशनच्या शिष्यवृत्तीतून ग्रामीण जीवनाचा अभ्यास केला व टारफुला ही कादंबरी लिहिली.
“टारफुला’ या कादंबरीत कोल्हापूरच्या ग्रामीण भागाचे चित्र उभे करणारी तीन पिढ्यांची कहाणी लिहिली. “कथा अकलेच्या कांद्याची’ हे वगनाट्य इतके लोकप्रिय झाले की त्याचे दोन हजार प्रयोग झाले. त्याशिवाय गल्ली ते दिल्ली, लवंगी मिरची कोल्हापूरची इ. त्यांची वगनाट्ये लोकप्रिय ठरली. ग्रामीण तमाशा त्यांनी शहरी लोकांपुढे वगनाट्यातून आणला व त्याला प्रतिष्ठाही मिळाली. प्रामुख्याने ग्रामीण कथाकार व चित्रपट कथाकार म्हणून लौकिक मिळवलेल्या शंकर पाटील यांचा १९६० ते ७० हा कथालेखनाचा बहाराचा काळ होता.
ग. प्र. प्रधानांसह आठवी ते दहावीसाठी साहित्य सरिता या वाचनमालेचे संपादन करणारे शंकर पाटील महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती मंडळावर मराठी विषयाचे विशेष अधिकारी होते. ‘वळीव’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह. ‘भेटीगाठी’,‘धिंड’,‘बावरी शेंग’,‘खुळय़ाची चावडी’,‘फक्कड गोष्टी’,‘खेळखंडोबा’,‘आभाळ’ असे सरस कथासंग्रह देणा-या पाटील यांना अनेक कथासंग्रहांना व चित्रपट कथांना राज्य शासनाचे पुरस्कार लाभले. “वावटळ’ ही पटकथा लिहून त्यांनी चित्रपटक्षेत्रात पाऊल ठेवले. युगे युगे मी वाट पाहिली, गणगौळण, भोळीभाबडी, चोरीचा मामला इ चित्रपटांच्या उत्कृष्ट पटकथा-संवादलेखनाबद्दल त्यांना शासकीय पुरस्कार लाभले.
याशिवाय पिंजरा, केला इशारा जाता जाता, एक गाव बारा भानगडी, डोंगरची मैना, छंद प्रीतीचा, पाहुणी, लक्ष्मी इ. चित्रपटांच्या कथा, पटकथा आणि संवाद त्यांनी लिहिले.शंकर पाटील यांनी ५९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेले होते. शंकर पाटील यांचे ३० जुलै १९९४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
शंकर पाटील यांचे कथा कथन
https://www.youtube.com/watch?v=Gk6EzPcknko
https://www.youtube.com/watch?v=588U6yjkPhw
https://www.youtube.com/watch?v=RY9GzHOR_SE
August 8, 2021
दिना पाठक पूर्वाश्रमीच्या नी गांधी. त्यांचा जन्म ४ मार्च १९२२ रोजी झाला.त्या महिला अॅक्टीवेटीस्ट देखील होत्या आणि 'भारतीय महिला नॅशनल फेडरेशन' अध्यक्ष राहिल्या होत्या. हिंदी आणि गुजराती चित्रपटात दिना पाठक यांनी सहा दशकांत १२० चित्रपटांत अभिनय केला. त्यांचे मीरा गुजराथी हे नाट्य भवाई लोकनाट्य शैली मध्ये अनेक वर्षे यशस्वीपणे चालू होते. रुपेरी पडद्यावरील मायाळू आई व खत्याळ सासूच्या भूमिका प्रसिद्ध होत्या. त्यांच्या गोल माल आणि खूबसुरत मधील संस्मरणीय भूमिका प्रसिध्द आहे. त्यांनी कोशिश, उमराव जान, मिर्च मसाला आणि मोहन जोशी हाजीर हो चित्रपटात महत्वाच्या भूमिका केल्या. रत्ना व सुप्रिया पाठक या त्यांच्या कन्या व नसुद्दिन शहा व पंकज कपूर हे जावई. मा.दिना पाठक यांचे ११ ऑक्टोबर २००२ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
March 4, 2017
"महान" या एकाच शब्दात ज्यांचे वर्णन करता येईल असे संगीतकार सचिन देव बर्मन उर्फ एस.डी. त्यांचा जन्म १ ऑक्टोबर १९०६ रोजी झाला. एस.डी. बर्मन सर्वार्थाने दादाच होते. खरं म्हणजे त्रिपुराच्या राजघराण्यात वाढलेल्या सचिनदाना संगीताची गोडी लागावी आणि त्या अंकुराचा .वटवृक्ष व्हावा हा एक अद्भुत चमत्कार होता पण तो घडला! आकाशात बसलेल्या गंधर्वमंडळींना कदाचित त्या राजपुत्राच्या प्रतिभेची कल्पना असावी, म्हणूनच राजघराण्याच्या विरोधात जाऊन गाणे शिकण्याचे धाडस त्यांनी दाखवले. १९३० च्या दशकात त्यांनी रेडिओ आणि बंगाली संगीतात भरपूर मुसाफ़िरी केली आणि १९४४ मध्ये अशोक कुमारांच्या काही चित्रपटांसाठी संगीत देण्यासाठी मुंबई गाठली. पुढील काही वर्षात त्यांना यश मिळालेही पण हळव्या मनाच्या बर्मन दादांना मुंबईची स्पर्धा रुचली नाही आणि ते .कलकत्त्याला परत जाण्यासाठी अगदी रेल्वेमध्ये बसलेही होते पण तसे होणे नव्हते, त्याना मनधरणी करून परत नेण्यात आले आणि पुढचा इतिहास आहे!
देव आनंदच्या नवकेतन बॅनर साठी सचिनदांनी पहिल्यांदा 'अफसर' ला संगीत दिले आणि पुढची चोवीस वर्षे नवकेतनचा चित्रपट आणि बर्मनदांचे संगीत हे समीकरण बनले. बाजी, जाल, टॅक्सी ड्रायवर, मुनिमजी, पेयिंग गेस्ट, सोलवा साल, काला बाजार, बात एक रात की, तेरे घर के सामने, गाईड, ज्वेल थीफ, प्रेम पुजारी.. पन्नास आणि साठच्या दशकामधले हे सुमधुर संगीत असलेले चित्रपट, एका पेक्षा एक सुंदर सांगीतिक अनुभव आहेत! सचिनदांचे संगीत काळाच्या चौकटीत कधीच बसणारे नव्हते. जितका त्यांची शास्त्रीय संगीतावर आणि बंगाली लोकसंगीतावर पकड होती, तितकेच त्यांचे वेस्टर्न वरती प्रेम होते, त्यांचे संगीत प्रवाही होते म्हणून आजही ते आउटडेटेड वाटत नाही. त्यांच्या संगीतामध्ये मूड्स दडलेले असतात, एकाच चित्रपटात ते विविध .जॉनर वेगवेगळ्या मूड्स मध्ये वेगवेगळ्या गायकांकडून गाउन घेत, त्यामुळे त्यांचे संगीत कधीच एकसुरी झाले नाही.
हरहुन्नरी किशोर कुमारला त्यानी देवचा आवाज बनवला. किशोर कुमारला आराधना मधून त्यांनीच शिखरावर नेऊन बसवले पण ब्लॅक अँड व्हाईट स्क्रीनवरचा देव आणि त्याला किशोरचा आवाज - अतुलनीय! पेईंग गेस्ट मधले खट्याळ 'छोड दो आंचल' असो किंवा तीन देवीया मधले चार्मिंग 'ख्वाब हो या कोई हकिकत', देवचा नायिकेभोवती पिंगा घालणारा नायक किशोरने अचूक टीपला!
मोहम्मद रफी हा देवाने केवळ स्वतः गाता येत नसावे म्हणून आपल्यासाठी पाठवलेला देवदूत होता. सचिनदानी जर देवच्या हॅपी गो लकी इमेज साठी किशोरला वापरले असेल तर 'अपसेट' देव साठी रफी साहेबांइतका तरल आवाज स्वाभाविक होता. गाईड मधले अजरामर गायकीचा नमुना असलेले 'दिन ढल जाए' असो की आशा भोसले सोबतचे 'अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना' असो, रफी साहेबानी त्यांच्या गळ्यातली नशीली तार देव साठीच राखून ठेवली होती! हिंदी सिनेसंगीतामधली काही अजरामर डुयेट्स 'दिल पुकारे आरे आरे', 'तेरे मेरे सपने' असो किंवा बेधुन्द 'खोया खोया चांद' असो पडद्यावरचा देव आणि दैवी आवाजात गाणारे रफी - आजही 'सिनॉनिमस' आहेत. हेमंतकुमारांना हिंदीत आणण्याचे श्रेयही सचिनदांना जाते - देव साठी!
सोलवा साल मधले 'हैं अपना दिल तो आवारा' आणि ती हारमॉनिका किंवा 'बात एक रात की' मधले हॉँटिंग 'ना तुम हमे जानो', हेमंतदाच्या खर्जातल्या आवाजाला बर्मदानी देवआनंद साठी अचूक वापरले. जरी रफी आणि किशोर देव आनंदसाठी ठरलेले आवाज होते तरी सचिनदानी गाण्याला भाव देणारे गायकच नेहमी वापरले. 'टॅक्सी ड्रायवर' मधले तलत मेहमूदच्या तरल गळ्यातले 'जाए तो जाए कहाँ' दुसर्या कुणी इतक्या उत्कटतेने कदाचितच गायले असते. सचिनदा आणि देव आनंद यांची गाणी म्हणजे वेगवेगळ्या इमोशन्सचा रंगीबेरंगी कॅनव्हास आहे. बाजी साठी साहिर लुधियानवि ने एक सुंदर गजल लीहली होती - सचिनदानी तिला क्लब सॉँग बनवले, पण काय बनवले .. 'तद्बीर से बिगडी हुई तक्दीर बना ले, अपने पे भरोसा है तो यह दाव लगा ले' . पदार्पणापासून अखेरपर्यंत आघाडीवर राहिलेले एस.डी.बर्मन एकमेव संगीतकार असावेत. किशोरकुमार यांना सर्वप्रथम पार्श्वीगायनाची संधी दादा बर्मन यांनीच दिली. ते किशोरदांना आपला दुसरा पुत्र मानत. किशोरदा व महमद रफी या अत्युच्च शिखरावरील पार्श्वंगायकांना जवळजवळ समान संख्येत गीते देणारेही ते एकमेव संगीतकार होत. देव आनंद हे त्याचे ठळक उदाहरण होय. ‘मिली’ चित्रपटातील ‘बडी सुनी सुनी है’ हे सचिनदा रुग्णालयात असताना ध्वनिमुद्रित झालेले गीत किशोरदांच्या काही सर्वोत्कृष्ट गीतांपैकी एक आहे. सचिनदांनी १४ हिंदी आणि १३ बंगाली चित्रपटांसाठी पार्श्वागायन केले. एस.डी. बर्मन यांचे ३१ ऑक्टोबर १९७५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / Ganesh Shelke
एस.डी.यांची काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=q21zbX-NHy0
November 13, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti