जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
वसंत निनावे यांनी आकाशवाणी साठी अनेक श्रुतिका लिहिल्या. त्या श्रुतिका नीलम प्रभू, बाळ कुरतडकर यांच्या सारख्या दिग्गज रेडिओ कलाकारांनी सादर केल्या होत्या. पुढे याच श्रुतिका ‘आकाशप्रिया’ या नावाने त्या पुस्तक रूपात प्रसिद्ध झाल्या, आणि या पुस्तकाला राज्य शासनाचा विशेष पुरस्कार प्राप्त झाला होता.
June 10, 2022
विजयाराजे शिंदे आधी कॉंग्रेसमध्ये होत्या, पण इंदिरा गांधी यांनी राजघराणे नष्ट करण्यासाठी पाऊले उचलल्याने त्या नाराज झाल्या. १९६७ मध्ये कॉंग्रेसचा त्याग करून त्यांनी त्या वेळच्या जनसंघात प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाच्या संस्थापकांपैकी त्या एक होत्या. मध्य प्रदेशच्या राजकारणात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
July 25, 2022
१९८३ साली अच्युत पालव यांनी उल्का शिष्यवृत्तीसाठी मोडी लिपीचा पंधराव्या ते सतराव्या शतकांतील इतिहास, तसेच मोडी लिपीची विविध वळणे व अक्षररुपे यांवर कलात्मक दृष्ट्या संशोधन करुन प्रबंध लिहिला. मोडी व आजची देवनागरी यांच्या दृश्य समन्वयातून ‘धृतनागरी’ तयार केली. तिला ‘मुक्त लिपी’ असे नाव दिले. या लिपीचा त्यांनी सुलेखनातून कलात्मक आविष्कार घडवून ह्या प्रयोगाची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख करुन दिली.
June 17, 2022
दोन-तीन चित्रपटात राजा ठाकूरांनी जुन्नरकरांबरोबर संकलनात सहाय्यक म्हणून काम केले. त्यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९२३ रोजी झाला.१९४७ साली संगीतकार शंकरराव पवार यांना जी. एम. शहा नावाचा निर्माता भेटला. त्याला चित्रपट काढायचा होता. शंकररावांनी त्याला राजाभाऊ परांजपे यांचं नाव दिग्दर्शक म्हणून सुचवलं.
राजाभाऊंनी राजा ठाकूरचं संकलनाचं काम पाहिलं होतं. व राजा ठाकूर यांच्यावर संकलनाची जबाबदारी सोपवली. चित्रपटाचं नाव होतं ‘बलिदान. १९४७ च्या ‘बलिदान’ पासून ते १९५३ पर्यंत सुमारे १५ चित्रपटांचं संकलन राजानं केलं आणि मराठी चित्रपटसृष्टीत एक उत्तम संकलक म्हणून नाव मिळवलं.
संकलक राजा ठाकूर हे दिग्दर्शक राजाभाऊ परांजपे यांचे घनिष्ठ सहकारी होते. छायाचित्रकार बाळ बापट आणि संकलक राजा टाकूर हे राजाभाऊ परांजप्यांचे डावे-उजवे हात होते. राजा ठाकुरांनी संकलक म्हणून नाव कमावलं. परंतु त्यांच्या मनात एक ‘प्रतिभावंत’ कल्पक दिग्दर्शक दडला होता. १९५३ सालच्या ‘बोलविता धनी’ या चित्रपटापासून राजा ठाकूर यांची दिग्दर्शक म्हणून कारकीर्द सुरु झाली. १९५३ ते १९७५ या २३ वर्षांत त्यांनी २० मराठी, २ हिंदी व ‘बिरबल ब्रदर’ या इंग्रजी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं.
दिग्दर्शक म्हणून राजा ठाकूरांची अनेक वैशिष्ठ्ये होती. उत्तम साहित्यिकांकडून त्यांनी पटकथा-संवाद लिहून घेतले. त्यात ग. दि. माडगूळकर, ग. रा. कामत, मधुसूदन कालेलकर, शं. ना. नवरे, राम केळकर, पु. भा. भावे, सुरेश खरे, रणजित देसाई अशी मंडळी होती. यातील शं. ना. नवरे, पु. भा. भावे, सुरेश खरे, राम केळकर व रणजित देसाई यांना त्यांनीच आग्रह करून पटकथा-संवाद लेखक बनवले.
ठाकुरांच्या चित्रपटांचे मूळ कथा लेखक दत्त रघुनाथ कवठेकर, अरविंद गोखले, चिं. वि. जोशी, पं. महादेव शास्त्री जोशी, द. ग. गोडसे, बाबुराव अर्नाळकर, वसुंधरा पटवर्धन, व. पु. काळे, ग. वा. बेहेरे असे ख्यातकीर्त साहित्यिक होते. मराठी चित्रपटसृष्टीत त्याकाळी तमाशा, लावणी, पाटील व कुर्हाटड यांचा वापर करणार्या ग्रामीण चित्रपटांची चलती होती. पण राजा ठाकूर त्या वाटेला गेले नाहीत. त्यांच्या चित्रपटांपैकी ‘मी तुळस तुझ्या अंगणी’ आणि ‘रंगल्या रात्री अशा’ या दोन्ही चित्रपटांचं कथानक जरी तमाशाप्रधान असलं तरी तिथे चाळांचा किंवा लावण्यांचा उपयोग गल्ल्यासाठी केला नव्हता.
राजा ठाकुरांनी सामाजिक चित्रपट दिले. पण त्याबरोबर ‘गजगौरी’सारखा पौराणिक, ‘राजगडचा राजबंदी’सारखा ऐतिहासिक, ‘गोरा कुंभार’सारखा संतपट आणि ‘मी तुळस तुझ्या अंगणी’ व ‘रंगल्या रात्री अशा’सारखे थोडा तमाशा दाखवणारे चित्रपट दिले. ‘बिरबल माय ब्रदर’ सारखा इंग्रजी चित्रपट दिग्दर्शित करणारे ते पहिले मराठी दिग्दर्शक होते. याच चित्रपटानं त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीचं दार खुलं केलं.
‘जखमी’ने अनेक ठिकाणी रौप्यमहोत्सव साजरा केला. ‘जखमी’नंतर ‘रईसजादा’ हा हिंदी चित्रपट राजा ठाकुरांनी करायला घेतला. हा चित्रपट त्यांच्या हयातीत पुरा होऊ शकला नाही. राजा ठाकूर यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात सहा वेळा उत्कृष्ट चित्रपटाचा व सहा वेळा उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. त्यांच्या तंत्रज्ञालाही अनेक पुरस्कार मिळाले. ‘मी तुळस तुझ्या अंगणी’, ‘रंगल्या रात्री अशा’, ‘एकटी’ व ‘मुंबईचा जावई’ या चार चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले.
शांत स्वभावाचे राजा ठाकूर साहित्यिक, कलावंत नट, यांच्यात रमत. त्यांचा सुसंस्कृतपणा बोलण्यात व आचरणातून दिसत असे. राजा ठाकूर यांचे २८ जुलै १९७५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. मधू पोतदार
July 29, 2017
पु. भा. यांचे नाव मराठी नवकथेचे जनक म्हणून घेतले जाते. कथालेखक म्हणून ते युगप्रवर्तक ठरले. त्यांचा जन्म १२ एप्रिल १९१० रोजी झाला.त्यांच्या सतरा कादंबर्यानी मराठी भाषेत नवतारुण्य आणले. नाटककार म्हणून ते मखमली पडद्यावर आले. नंतर रजपटावर झळकले. आपल्या सर्व साहित्यात त्यानी जीवन व मृत्यु या सनातन प्रश्नांचा पाठपुरावा केला. प्रतिभा, पांडित्य आणि पौरुष यांचा सुरेख संगम भाव्यांच्या लेखनात आढळतो. मानवाच्या बर्याकवाईट सर्व प्रकृतीचा आलेख त्यांनी आपल्या साहित्यातून मांडला. वाचकांचा जीवनानुभव त्यांनी समृद्ध केला. लेखन हे भाव्यांचे आयुअष्यभराचे व्रत होते. केवळ लेखनावर जगायच ही त्यांची जिद्द होती. मा.पु.भा.भावे यांची सहित्य संपदा विशाल व सर्वस्पर्शी अशी होती. ६ नाटके, २ प्रवासवर्णन, २ व्यक्तिचित्रे, २८ कथासंग्रह, १८ लेखसंग्रह, निवडक कथा संग्रहाचे दोन भाग इतके त्यांचे साहित्य प्रसिद्ध झाले. त्यांचे "प्रथम पुरुष एकवचनी" नावाच्या आत्मचरित्राचे तीन खंडही प्रसिद्ध आहेत. याशिवाय 'सावधान' व 'आदेश' या वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपल्या अमौलिक झुंजार पत्रकारितेचे दर्शन भाव्यांनी समाजाला घडवले. ते उत्कृष्ट तत्त्वचिंतक होते.
मे १९५४ मध्ये अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष झाले होते. १९६७ मध्ये विदर्भ साहित्य संमेलन, तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलानाचे ते अध्यक्ष होते. १९७७ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यानीच भूषविले होते.
पु.भा.भावे यांचे वक्तृत्त्वही अमोघ होते. पु.भा.भावे यांचे १३ ऑगस्ट १९८० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
April 12, 2017
आज पर्यंत हौशी रंगभूमीवर २३ नाटके, वेगवेगळ्या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये २१ एकांकिका आणि व्यवसायिक नाटक केले आहे. यामध्ये महाराष्ट्र सांस्कृतिक कृती कार्य संचालनालय आयोजित मराठी आणि हिंदी राज्य नाट्य स्पर्धेत सहा रौप्य पदक आणि वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धेत सात वेळा वाचिक अभिनयातील पारितोषिक प्राप्त करणारा खान्देशातील एकमेव कलाकार म्हणजे हेमंत पाटील होय. महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या महाराष्ट्राच्या हास्य जत्रा या सोनी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमात आपल्या खान्देशातील लेवा पाटील बोली भाषेचा वापर करून स्क्रिट सध्या हेमंत करीत आहे. या आधी हेमंत पाटील यांनी झी टीव्हीवरील चला हवा येऊ द्या.. होऊ दे .. व्हायरल यामध्ये महाराष्ट्रातून निवड होऊन लेवा बोली भाषेतून विडंबन साजरीकरण केले आहे.
March 1, 2024
गुलाम अली यांचे नाव त्यांच्या वडलांनी बडे गुलाम अली खाँ यांच्यापासून प्रेरित होऊन ठेवले. ख्यातनाम गझल गायक गुलाम अली यांचा जन्म ५ डिसेंबर १९४० रोजी झाला. गुलाम अली थोडे मोठे झाल्यावर बडे गुलाम अली खाँ यांच्याकडे त्यांना शिष्य बनवण्यासाठी वडलांनी चकरा मारायला सुरुवात केली. बडे गुलाम हे त्या काळचे सर्वात मोठे आणि अत्यंत व्यग्र असे व्यक्तिमत्त्व होते.
गुलाम अली यांनी आपल्या एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं, की त्यांचे वडील त्यांना पहाटे पाच वाजता उठवायचे. नाही उठले तर काठीने मारून उठवायचे. का, तर बडे गुलाम अली खाँचे नाव खराब होऊ नये. तेव्हा ते पाच वर्षांचे होते. बरेच दिवस गेल्यावर एके दिवशी बडे गुलाम अली खाँ त्यांच्या घरी आले आणि त्यांच्या वडलांच्या असंख्य बिनत्यांची आबरू ठेवण्यासाठी गुलाम अली यांना ‘काहीतरी गा’ असे म्हणाले. त्यांनी धीर करून ‘सैयाँ बोलो तनिक मोसे रहियो न जाए’ ही ठुमरी गायली. गाणं संपताच बडे गुलाम यांनी पंधरा वर्षांच्या छोट्या गुलामला मिठी मारली आणि त्यांना आपला गंडा बांधला.
तथापि, बडे गुलाम खरोखरीच अतिशय व्यग्र असल्याने त्यांचे तीन बंधू बरकत अली खाँ, मुबारक अली खाँ आणि अमानत अली खाँ यांनी त्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले. १९६० साली गुलाम अली यांनी लाहोर आकाशवाणीवर गायक म्हणून कारकिर्दीची सुरवात केली. त्यानंतर त्यांना गझल गायक म्हणून भारत, पाकिस्तान व जगात अमाप लोकप्रियता मिळाली. गुलाम अलीजी एक मेहबूब गजल गायक आहेत. पाकिस्तानातील गजलचे बादशहा मेहदी हसन यांच्या नंतरच्या पुढच्या पिढीचे आणि समर्थ गजल गायक आहेत. त्यांच्या ‘चुपके चुपके’ने तीन दशकांपूर्वी लावलेले वेड अद्याप ओसरायला तयार नाही.
हिंदुस्थानी ठुमरी गायकीची शैली गजलच्या फॉर्मसाठी यशस्वीपणे वापरणाऱ्या गुलाम अली यांनी शेकडो गजला गायल्या आहेत. त्यातील एक निवडणे हे इतर गजलांवर अन्याय केल्याशिवाय शक्य नाही. गुलाम अली व आशा भोसले यांचा मिराज ए गझल हा अल्बम फारच सुंदर आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 9, 2019
लक्ष्मीकांत यांचे पूर्ण नाव लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर. संगीत देणे हे त्यांनी व्यवसाय म्हणून स्विकारले होते आणि शेवटपर्यंत या व्यवसायाशी ते ईमानदार राहीले.
May 7, 2022
शिक्षणक्षेत्रात मुलगामी विचार मांडणारे दाभोलकर हे स्वातंत्र्योत्तर सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील बिनीचे शिलेदार म्हणून ओळखले जात असत.
December 17, 2021
मराठेशाहीतील उत्तरार्धात पेशवाई बुडाल्यानंतर हिंदुस्थानावर इंग्रजांचा अंमल सुरु झाला तेव्हा श्रीखंडोबा भक्त उमाजी नाईकने इंग्रजी सत्तेविरुद्ध पहिले बंड पुकारले म्हणून त्यांला आद्य क्रांतिवीर असे म्हणतात. छत्रपती शिवाजी राजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी गनिमी काव्याने लढत इंग्रजांशी झुंज दिली.
February 3, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti