जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
December 15, 2010
सुलोचनाबाईंनी २५० पेक्षाही अधिक मराठी चित्रपटांतून विविध व्यक्तिरेखा सादर केल्या तसंच सुमारे १५० हिंदी चित्रपटांमधुन चरित्र-अभिनेत्री सोबतच आईच्या भूमिका साकारुन त्या लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवल्या आहेत.
May 24, 2014
निलेश चव्हाण हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष आहेत. १८ डिसेंबर २०१२ रोजी त्यांनी या पदाची सूत्रे स्विकारली. ते “महाराष्ट्र नवनिर्माण सेने”कडून ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार म्हणून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीला उभे आहेत. माणसं जोडण्याची आवड आणि पारदर्शक व प्रामाणिक कामाची सवय या जोरावर त्यांनी लोकांमध्ये व पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणले आणि “मनसेच्या ठाणे कार्यालयात गेल्यावर आपले काम होणारच” अशी भावना त्यांनी जनमानसात निर्माण केली. एका सामान्य, मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले निलेश चव्हाण हे व्यवसायाने स्थापत्य अभियंता (सिव्हील इंजिनिअर) आहेत त्यामुळे नागरी सुविधांच्या बाबतीत असलेला नियोजनाचा (प्लानिंग) अभाव त्यांना प्रकर्षाने जाणवतो.
October 10, 2014
आज ३० सप्टेंबर. भारतीय चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक हृषिकेश मुकर्जी यांची जयंती
हृषिकेश मुखर्जी... भारतीय चित्रपटसृष्टीतील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व. त्यांचा जन्म ३० सप्टेंबर १९२२ रोजी झाला.
दिग्गज दिग्दर्शक बिमल रॉय यांचे शिष्य आणि 'आनंद', 'अभिमान', 'गोलमाल', 'बावर्ची', 'खुबसुरत' अशा उत्तमोत्तम चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणून आणि चंदेरी दुनियेतल्या झगमगाटात प्रदीर्घ काळ राहूनही साधेपणा जपणारे प्रतिभावंत दिग्दर्शक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. हिंसाचार किंवा लैंगिकतेला त्यांनी आपल्या चित्रपटांत कधीही स्थान दिले नाही. किंबहुना या गोष्टींना पूर्ण फाटा देऊन साध्या बाबींतूनही जीवनसूत्र सांगता येते, हेच त्यांनी त्यांच्या कलाकृतींतून दाखवून दिले आहे.
हृषिकेश मुखर्जी यानी १९५९ मध्ये राज कपूरला घेऊन तयार केलेला 'अनाडी' आणि त्यातील गाणी खूप गाजल्याचे आपल्याला माहीत आहेच. अनाडीच्या यशाने प्रेरित होऊन हृषिदांनी राज कपूर यालाच केन्द्रस्थानी ठेवून 'आनंद' ची जुळवाजुळव सुरू केली होती. इतकेच नव्हे तर अनाडीच्या वेळेसच आनंदसमवेत गाजलेले 'बाबू मोशाय' हे सहाय्यक पात्राचे नावही नक्की झाले होते...त्याला कारण म्हणजे राजकपूर हृषिकेश मुखर्जी याना सेटवर नेहमी 'बाबू मोशाय' याच नावाने हाक मारीत असे. पण पुढे 'आराधना' नंतर राजेश खन्ना युग आल्यावर आणि त्याच्या अभिनयाची धाटणी त्यावेळी सर्वानाच 'आल्वेज हॅपी काईंड फेलो' अशी वाटू लागल्यावर हृषिदांनी राजेश खन्ना यांना घेऊन 'आनंद' केला.
दिग्दर्शक ही हृषदांची अर्धीच ओळख ठरेल. संकलक, लेखक, पटकथा लेखक, संगीतातले जाणकार आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे करडया शिस्तीचा परंतु, अतिशय सहृदय माणूस, हे हृषदांच्या व्यक्तिमत्त्वातले कंगोरे होते. भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगाचे हृषदा भागीदार आणि साक्षीदारही आहेत. बिमल रॉय यांच्यासारखे दिग्गज दिग्दर्शक, गुलजार यांच्यासारखा मनस्वी कवी- लेखक, सलील चौधरी, सचिन देव बर्मन व पंचमदा ऊर्फ राहुल देव बर्मन, हेमंत कुमार, असे गायक संगीतकार, अशोककुमार, दिलीपकुमार, राज कपूर, अमिताभ बच्चन, उत्पल दत्त, राजेश खन्ना, धर्मेंद्र, अमोल पालेकर, शत्रुघ्न सिन्हा, रेखा, जया बच्चन अशा नव्या-जुन्या अनेक श्रेष्ठ कलावंतांबरोबर त्यांनी काम केले आहे. जया-अमिताभ ही जोडी काय किंवा रेखा, धर्मेंद्र, अमोल पालेकर, असरानी असे कलाकार काय, या कलाकारांच्या यशात हृषदांचा निश्चितच मोलाचा वाटा आहे.
हृषिकेश मुकर्जी यांचे २७ ऑगस्ट २००६ रोजी निधन झाले. हृषिकेश मुकर्जी यांना आदरांजली.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
September 30, 2016
१९३० मध्ये वयाच्या विसाव्या वर्षीच बा भ बोरकर यांचा प्रतिमा हा काव्यसंगह प्रकाशित झाला. त्यांच्या या काव्यसंगहावर केशवसुत, बालकवी, गोविंदाग्रज यांचा प्रभाव होता. .बोरकरांच्या मनावर घरातील धार्मिक वातावरण, प्रेमळ आप्त परिवार, शालेय जीवनातील संस्कार आणि गोव्याचा व कोकणचा रमणीय निसर्ग यांचा खोल परिणाम झालेला त्यांच्या कवितेतूनही दिसून येतो.
July 8, 2017
हेमलता हे नाव ऐकले की ७० व ८० च्या दशकातील गाणी आठवतात. त्यांचा जन्म १६ ऑगस्ट १९५२ रोजी झाला. ७० च्या दशकात रवींद्र जैन सारखे स्वतंत्र वृत्तीचे संगीतकार आणि राजश्री पिक्चर्स सारखे नवीन कलाकारांना घेऊन काम करणारी संस्था यामुळे अनेक लोकांना कामाची संधी मिळाली आणि नवीन चेहरे आणि आवाज ऐकू आले. त्यातल्याच एक हेमलता. त्याचे लग्नाआधीचे नाव विवाह लता भट होते. त्यांनी अभिनेता योगेश बाली यांच्याशी विवाह केला होता. त्यांनी संगीताचे आणि गझल चे शिक्षण उस्ताद रईस खान यांच्याकडे घेतले होते. वय १४ व्या वर्षी हेमलता यांना खय्याम याच्या कडून गाण्याची संधी मिळाली.
चित्रपट, मैफिल, टेलिव्हिजन आणि संगीत त्याच्या गायन भिन्न प्रकारांमध्ये अल्बम गीते त्यांनी गायली. ३८ प्रादेशिक भाषांमध्ये सुमारे ५००० गाणी त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत गायली आहेत. मा.हेमलता यांना १९७७ ते १९८१ च्या दरम्यान पाच सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. उषा खन्नाचा एक आप तो ऐसे ना थे (तू इस तरह से मेरी जिंदगी मे )चा अपवाद वगळता त्यांनी जवळपास सगळी गाणी फक्त रवींद्र जैन कडेच गायली असावीत. त्यांची गाणी रवींद्र जैन च्या संगीतामुळे खूपच गाजली उदा.जब दीप जले आना, अखियोंके झरोको से, कई दिन से मुझे इत्यादी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
August 16, 2017
December 15, 2010
पनवेल मधील स्वातंत्र्यलढ्यामध्ये भाग घेतलेले श्री. गजानन नीळकंठ गुप्ते हे त्या वेळच्या प्रसिद्ध व नावाजलेल्या कै. नीळकंठ गुप्ते यांचे चिरंजीव.
June 1, 2010
सहकार क्षेत्रात गेल्या पंचवीस वर्षांत अनेक उच्च पदांवरील कामाचा अनुभव
December 7, 2011
लावणीपासून बालगीत आणि गण-गवळणींपासून देशभक्ती, भक्तिगीतांपर्यंत गीतलेखनाचे सर्वांत जास्त प्रकार वापरून गेली पाच दशके मराठी गीतरसिकांना मोहित करणारे असामान्य प्रतिभावंत कवी जगदीश खेबूडकर तथा मराठी चित्रसृष्टीचे ‘नाना’ यांचा जन्म हळदी, ता. करवीर येथे सामान्य कुटुंबात झाला. त्यांचा जन्म १० मे १९३२ रोजी झाला. त्यांचे वडील इंग्रजी राजवटीत १५ रुपये वेतनावर प्राथमिक शिक्षक होते, त्यामुळे मराठीचे बाळकडू घरीच मिळाले. बालपण छोट्याशा ग्रामीण भागात गेल्याने बारा बलुतेदारांची लोकप्रिय गीते ऐकल्याने ते काव्यबीज पुढे खेबुडकर यांनी आपल्या एकापेक्षा एक गीतांतून अजरामर केले. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी १९४८ साली मध्ये गांधी हत्याकांडात त्यांचे घर जळाले अन् त्या ज्वाळा पाहून घरासमोरील झाडाखाली बसून त्यांना आयुष्यातली पहिली कविता ‘मानवते तु विधवा झालीस’ सुचली. ‘काशीला श्रावण बाळ निघाला…’, ‘आज मरूनीया जीव झाला मोकळा…’, ‘जग ही पैशाची किमया…’, ‘नको नको बनू आंधळा…’, ‘आमुचा जीवन प्याला….’, ‘जागा हो माणसा…’, ‘दिला मृगानं हुंदका…’ अशा असंख्य कविता त्यांनी रचल्या. त्यांच्या कवितांना इतका बहर होता की, ते दिवसाला १० ते ११ कविता लिहू लागले होते. १९५६ मध्ये आकाशवाणीवर खेबुडकर यांचे पहिलेच गीत ऐकून नामवंत संगीतकार वसंत पवार यांनी चित्रपटातील पहिले गीत लिहिण्याची संधी दिली. सांगली येथे सन १९६० साली ‘रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटासाठी लावणी लिहिण्याची संधी दिली. आयुष्यातील पहिली लावणी लिहिण्याचे आव्हान स्वीकारून अस्सल कोल्हापुरी नजराणाच खेबुडकर यांच्या लेखणीतून प्रकट झाला. ‘मला हो म्हणत्यात लवंगी मिरची’ या पहिल्याच लावणीच्या ठसक्याने मराठी गीतरसिकांना वेड लावले.
‘सामना’, ‘पिंजरा’, ‘साधी माणसं’ अशा सुमारे साडेतीनशे चित्रपटांसाठी जगदीश खेबुडकर यांनी तब्बल अडीच हजारांवर गाणी लिहिली. यांत ‘तुम्हावर केली मर्जी मी बहाल’, ‘कुठं कुठं जायाचं हनीमूनला’ अशा एकाहून एक सरस लावण्यांबरोबर ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’, ‘मला हे दत्तगुरू दिसले’ यांसारखी भक्तिगीते, तर ‘राजा ललकारी अशी दे’, ‘ही कशानं धुंदी आली’, ‘धुंदी कळ्यांना’, ‘ऐरणीच्या देवा तुला’, ‘बाई बाई… मनमोराचा’, ‘आकाशी झेप घेरे पाखरा’ अशा सर्वांगसुंदर गाण्यांचा समावेश आहे. अष्टविनायक चित्रपटातील ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’ ह्या त्यांच्या गाण्यामुळे सगळ्यांना ५ ते ७ मिनिटात त्यांनी अष्टविनायकाचे दर्शन घडवले. आजवर कोणत्याही मराठी गीतकाराने खेबुडकर यांच्याइतके काव्यप्रकार वापरले नाहीत. गण-गवळण, लावणी, भारुड, गोंधळ, सवाल-जवाब, बालगीत, प्रेमगीत, स्फूर्तिगीत, नांदी, पोवाडा, भक्तिगीत, मुक्तछंद, अभंग अशा मराठीत यच्चयावत काव्यप्रकारांत खेबुडकरांनी आपल्या शब्दसामर्थ्याने असामान्य गीते लिहिली. व्ही. शांताराम, पेंढारकर, दादा कोंडके, शब्दप्रभू ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके अशा दिग्गजांबरोबर जगदीश खेबुडकर यांनी जसे काम केले तसेच डॉ. अशोक पत्की, ‘पानिपत’कार विश्वाास पाटील, गायक रवींद्र साठे, संगीतकार अजय-अतुल यांनाही अनमोल सहकार्य आणि मार्गदर्शन केले.
कमल हसन यांच्या ‘हे राम’ चित्रपटासाठी खेबुडकर यांनी गीतेही लिहिली होती. "शब्दरुप आले मुक्याला भावनांना, तुम्हावर केली मी मर्जी बहाल, मला हे दत्तगुरू दिसले, कुण्या गावाचं आलं पाखरू, बुगडी माझी सांडली गं, विठ्ठल नामाची शाळा भरली, मोरया मोरया' अशा ३५० मराठी चित्रपटांसाठी तब्बल २७५० लोकप्रिय गीते लिहिणाऱ्या मा.जगदीश खेबूडकर यांनी अगदी बालगीत ते प्रेमगीत, नांदी, पोवाडा, भक्तिगीते, अंगाई गीते, कीर्तन, देशभक्तिपर गीते, गणगौळण, गौरीगीते, वासुदेव गीत, माकडवाला, कोळीगीते, सवाल-जवाब, एकतारी भजन, डोंबाऱ्याचे गीत, कुडबुडा जोशी गीत, वारकरी भजनापर्यंत असा एकही गीताचा प्रकार शिल्लक न ठेवता विपुल अशी रसिकमान्य गाणी त्यांनी लिहिली होती. पंचवीस वर्षापूर्वी स्वत:ची नाट्यसंस्था निर्माण करुन "गावरान मेवा, जिवाची मुंबई, रंगा डायव्हर, राम दर्शन' या कलाकृतींचे लेखन व दिग्दर्शन त्यांनी केली होती. मा.जगदीश खेबूडकर यांना राज्य शासनाचे अकरा, ‘रसरंग फाळके’, चित्रपट महामंडळाचे दोन, ‘गदिमा जीवनगौरव’, ‘व्ही. शांताराम जीवनगौरव’, ‘कोल्हापूरभूषण’, ‘मृत्युंजय’, ‘सुरसिंगार संसद’, पुणे फेस्टिव्हल, ‘छत्रपती शाहू पुरस्कार’, ‘करवीरभूषण’, ‘साहित्य पुरस्कार’, ‘मार्मिक गौरवचिन्ह’, ‘लावणीरत्न’, ‘नटराज’, केंद्र शासन, ‘कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार’, ‘यशवंतराव चव्हाण साहित्यगौरव’ असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले होते. मा.जगदीश खेबूडकर यांचे ३ मे २०११रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
जगदीश खेबूडकरांची गाजलेली गाणी
https://www.youtube.com/watch?v=sX9AfQIpVNg
https://www.youtube.com/watch?v=29utf9DFxos
https://www.youtube.com/watch?v=VaxNJBINpwY
https://www.youtube.com/watch?v=zyNZ3JEve3I
https://www.youtube.com/watch?v=mYvSHjO9LXA
https://www.youtube.com/watch?v=STqNETx8Yr4
https://www.youtube.com/watch?v=KCvcsblHncI
May 3, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti