(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • नाट्य निर्माते गोविंद चव्हाण

    २००१ साली ‘पांडुरंग फुलवाले’हे पहिलं व्यावसायिक नाटक रंगभूमीवर आणलं. त्यानंतर ’वन रूम किचन’ आणलं. दुधावरची साय, चॉईस इज युवर्स, जाऊ दे ना भाई, कथा, मदर्स डे, टाईम प्लीज या नाटकांची निर्मिती केली.

      July 4, 2022


  • बॉलीवूड अभिनेत्री मंदिरा बेदी

    २००३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत तिने पहिली महिला समालोचक होण्याचा मान मिळवला. त्यांच्या समालोचना ऐवजी क्रिकेटच्या अज्ञानावरुन व समालोचना दरम्यानच्या तिच्या वेषभूशेमुळे त्या जास्त चर्चिली गेली. मंदिरा काही क्रिकेट एक्सपर्ट नाही. तिला क्रिकेटमधलं काहीही न कळणं हाच तर यूएसपी होता! चारू शर्मासह मंदिरा बेदी सूत्रसंचालक म्हणून दाखल झाल्यावर सुरुवातीला जुन्या जाणत्यांनी नाकं मुरडली होती. पण नंतर प्रत्यक्ष मॅचपेक्षा एक्स्ट्रॉ इनिंगचा टीआरपी वाढू लागला.

      April 15, 2022


  • यशोदा पाडगावकर

    काव्यसुर्य मंगेश पाडगावकर यांच्या सौभाग्यवती यशोदा पाडगावकर यांनी “कुणास्तव कुणीतरी“ हे २००० रोजी प्रकाशित झालेल्या दर्जेदार आत्मचरित्राद्वारे साहित्यचिश्वात ओळख व किर्ती प्राप्त केली. त्यांच्या विलोभनीय लेखनकौशल्यांद्वारे त्यांनी त्यांच्या जीवनात त्यांना आलेले अनुभव, व त्यांचे पती मंगेश पाडगांवकर गुणदोषांवर अचूक टिपणी यांची सुरेख गुंफण साधीत, या आत्मवृत्ताला एका वेगळ्याच उंचीवर नेवून ठेवले आहे.

      January 14, 2015


  • सोन्या काशिनाथ पाटील

    सोन्या पाटील यांचे नाव आज तळागाळातील लोकांच्या तोंडावर चांगलेच रुळलेले दिसते, कारण आदिवासी वस्त्यांमध्ये काम करून तिथल्या जनतेची होईल ती सेवा करण्याचा व या जनतेचे राहणीमान उंचावण्याचा शिरस्ता गेली कित्येक वर्षे जोपासला आहे.

    सोन्या पाटील यांचा जन्म वेहेळे गावातील एका गरीब शेतकरी कुटुंबामध्ये झाला. आज राजकारणामध्ये ते सक्रिय असले तरी पहिल्यापासून त्यांचा खरा ओढा हा समाजकारणाकडे होता. “समाज कल्याण न्यास” या भारत सरकारच्या उपक्रमामुळे एकत्रित आलेल्या संघटनेने त्यांच्या आयुष्याला खर्‍या अर्थाने वळण दिले. या संघटनेच्या कार्यासाठी त्यांनी स्वतःला पुर्णपणे समाजसेवेमध्ये झोकून दिले. बालकामगारांसाठी त्यांनी अनेक शाळा सुरू केल्या असून हजारो विद्यार्थी या शाळांमधून शिक्षण घेत आहेत. कापड उद्योगात सर्वाधिक बाल कामगार असतात हे ताडून, त्यांना शिक्षण उपलब्ध करुन पुढे स्वावलंबी बनविण्याचा प्रभावी प्रयत्न सोन्या पाटीलांनी केला.

    “समाज कल्याण न्यास संस्थे”च्या विद्यमाने त्यांनी तत्काळकालीन व मोफत रूग्णवाहिका सेवादेखील सुरू केली. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, वाडा, जव्हार, मोखाडा इत्यादी आदिवासी पाडयांना भेटी देवून त्यांना कपडे, धान्य, मिष्टान्न, औषधे, शालेय गणवेश, शैक्षणिक साहित्य अशा जीवनावश्यक गोष्टींचे ते वाटप करतात. विविध सणांच्या प्रसंगी ते या आदिवासी वस्त्यांमधील मुलांसोबत राहून आनंद द्विगुणित करतात. सरकारच्या कल्याणकारी योजना आदिवासी जनतेपर्यंत पोहोचवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सोन्या पाटील यांच्याकडून झालेला दिसून येतो.

    विद्यार्थ्यांमध्ये खिळाडू वृत्तीचा व विविध कलांचा विकास व्हावा यासाठी मॅरेथॉन स्पर्धा, चित्रकला, निबंध, नृत्य, वक्तृत्व स्पर्धा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे . एक कुशल व्यावसायिक आणि उद्योगाचे मालक असण्यासोबतच, अनेक सामाजिक, शैक्षणिक तसंच सांस्कृतिक व उद्योग संस्थांचे अध्यक्ष व महत्त्वाची पदं सोन्या पाटील यांनी भुषवली आहे.

      January 22, 2015


  • अनंत आत्माराम काणेकर

    अनंत आत्माराम काणेकर

    मराठी विषयाचे प्राध्यापक असणार्‍या काणेकरांनी, लघुनिबंधकार, कथाकार, नाटककार, पत्रकार अशा वाड्मयाच्या विविध अंगांतून रसिकां पर्यंत आपलं लेखन पोहोचवलं. “चित्रा” या साप्ताहिकाचे संपादक म्हणून ही अनंत काणेकरांनी काम पाहिलं.

      April 4, 2019


  • कवि मंगेश पाडगावकर

    शाळेत असल्यापासूनच मराठीवर त्यांचं प्रेम जडलं आणि वयाच्या १४ व्या वर्षापासूनच ते कविता करू लागले. त्यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे झाला. कविवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज आणि बा. भ. बोरकर यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. परंतु, पाडगावकर एका साच्यात कधीच अडकले नाहीत. त्यांनी स्वतःची शैली निर्माण करून मराठी साहित्यात आणि रसिकांच्या मनात वेगळं स्थान मिळवलं. स्वतः प्रेमळ व्यक्ती, प्रेमळ प्राध्यापक असल्यानं प्रेमकवितेवर त्यांचं विशेष प्रेम होतं. पण, भावगीतं, बालकविता, निसर्गकविता, चिंतनशील कविताही त्यांनी तितक्याच प्रभावीपणे केल्या होत्या. त्या सादर करण्याची त्यांची पद्धत तर अफलातून होती. पाडगावकर, विंदा करंदीकर आणि वसंत बापट या त्रयीनं ठिकठिकाणी काव्यवाचनाचे कार्यक्रम करून राज्याच्या कानाकोपऱ्यातील वाचकांना कवितेची गोडी लावली. सहजसोप्या शब्दांतून व्यक्त होणारे बोल आणि ओठांवर सहज रुळणाऱ्या कविता पाडगावकरांनी दिल्या. मंगेश पाडगांवकरांची कविता-गीतं म्हणजे मोगऱ्याची टपोरी फुलं. नियतीने पाडगांवकरांच्या प्रतिभेला कधीही धोका दिला नाही. त्यांचा हात सतत लिहिता ठेवला. आपल्या कवितेतली, गीतांतली आशयघनता सातत्याने टिकवलेला हा श्रेष्ठ कवी! त्यातल्या अनेक कवितांची गाणी झाल्यानं साहित्यासोबतच संगीत क्षेत्रातील

    पाडगावकरांचं योगदानही मोठं आहे. पाडगावकरांनी या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे' असं म्हणत मराठी रसिकांना प्रेम करायला शिकवले, जगण्याचं बळ देणारे... 'अशी पाखरे येती, आणिक स्मृति ठेवुनी जाती', अशा सहजसोप्या शब्दांत जीवनाचं सार सांगीतले. ते आपल्या कवीतांनी तरुणाईला प्रेमात पाडत असत. 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं', असं म्हणणारे 'पाडगावकर आजोबा' कॉलेजमधल्या मुला-मुलींचे मित्रच होऊन जायचे. भावकविता, भावगीते, बालगीते, संगीतीका, नाटय़काव्य, गझल, वात्रटिका, सामाजिक उपरोधपर कविता, बोलगाणी आणि विडंबन अशा विविध साहित्य प्रकारातून मा.पाडगावकरांनी वाचकांना समृध्द केले.

    पाडगांवकर यांनी ‘कधी बहर, कधी शिशिर, परंतु दोन्ही एक बहाणे. या त्यांच्या गीताच्या ध्वनिमुद्रणाची सांगीतलेली आठवण. ‘सुधीर फडक्यांनी केलेले शब्दांचे उच्चार ही एक थरारून टाकणारी गोष्ट होती. शब्द माझेच होते. त्यामुळे मला तरी त्या शब्दांचं नावीन्य नव्हतं. पण सुधीर फडक्यांच्या आवाजात ते ऐकताना माझेच शब्द आता मला नव्याने भेटत होते. ‘बहर धुंद वेलीवत यावा’ या ओळीतील ‘बहर’ आणि ‘धुंद’ या शब्दांतून व्यक्त होणारी तारुण्यातल्या फुलण्याची धुंदी.. ‘हळूच लाजरा पक्षी गावा’ या ओळीतील पक्ष्याच्या गाण्यातून व्यक्त होणारं कोणाचंतरी ते कोवळं लाजरेपण.. ‘आणि अचानक गळून पडावी विखरून सगळी पानं’ या ओळीतील निराशा आणि आधीच्या दोन ओळींतील विरोधाचं नातं- हे सारं सुधीर फडके इतक्या विलक्षण उत्कटतेनं प्रकट करत होते, की त्यांच्या गायनातून माझी कविता नव्याने जन्म घेत आहे असं मला वाटलं.

    मंगेश पाडगावकरांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. 'सलाम' या काव्यसंग्रहासाठी त्यांना १९८० मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. महाराष्ट्रातील दर्दी रसिकांच्या मनात स्थान मिळवलेल्या पाडगावकरांना २००८ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर, २०१३ मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं त्यांचा गौरव करण्यात आला होता. २०१० मध्ये दुबईत झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्र टाइम्सनंही पाडगावकरांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारानं गौरवलं होतं. मा. मंगेश पाडगावकर यांचे ३० डिसेंबर २०१५ रोजी निधन झालं.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    मंगेश पाडगावकर यांचे कविता वाचन.
    https://www.youtube.com/shared?ci=GhwamUyYrhQ

      December 30, 2017


  • वसंत वासुदेव परांजपे

    वसंत वासुदेव परांजपे हे भारताचे चीनमधील माजी राजदूत होते. भारत आणि चीन यांच्यात अगदी जवळीकीचे संबंध असायला हवेत, असे परांजपे यांना वाटत असे, त्यासाठी ते त्यांच्या मार्गाने प्रयत्नही करत असत. चीनमध्ये त्यांचा मित्रवर्ग आणि चाहतावर्ग मोठा होता.

    चीनमध्ये ते चिनी भाषा शिकायच्या उद्देशाने गेले आणि ती शिकून होताच त्यांना परराष्ट्र सेवेत घेण्यात आले. परराष्ट्र सेवेत त्यांना आधी चीनचाच विभाग सांभाळण्यास सांगण्यात आले. त्यानंतर लगेचच त्यांना चीनमध्ये काम करायची संधी मिळाली. त्यांची निवड पंडित नेहरूंनी केली होती. ते १९७४ ते १९७८ या काळात ते इथियोपियामध्ये राजदूत होते. १९७८ ते १९८२ या काळात दक्षिण कोरियामध्ये त्यांची राजदूतपदी नियुक्ती झाली. भारतीय परराष्ट्रसेवेतून ते १९८२ मध्ये सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतरही ते कधीच स्वस्थ बसले नाहीत. त्यांचा चीनविषयीचा अभ्यास चालूच राहिला.

    भारतात परतल्यावर ते गुरूवर्य रवीन्द्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनमध्ये प्राध्यापक म्हणून काम पाहू लागले. परांजपे हे फर्ग्यूसन महाविद्यालयाचे विद्यार्थी. त्यांनी मॅट्रिकमध्ये जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळवली होती. बी.ए.ला त्यांनी भाऊ दाजी लाड शिष्यवृत्ती मिळवली. १९४७ ते १९५० या काळात चीनमधले शिक्षणही त्यांनी चिनी शिष्यवृत्तीवर केले.

    परांजपे यांचे चिनी भाषेवर प्रभुत्व होते. त्यांचा चीनविषयक गाढा अभ्यास पाहून भलेभले राजकारणी आणि परराष्ट्र सेवेतील अधिकारी थक्क होऊन जात. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे त्यांच्या विद्वत्तेचे चाहते होते. पंडित नेहरू यांच्या चीन भेटीच्या वेळी परांजपे हे त्यांचे दुभाषा प्रतिनिधी होते. चीनचे तेव्हाचे पंतप्रधान झाऊ एन लाय यांच्याशी नेहरू यांनी केलेल्या सर्व राजकीय चर्चेचे ते नुसते साक्षीदारच नव्हते तर त्या चर्चेतले उत्कृष्ट संवादकही होते.

    १९५४ मध्ये माओ झेडाँग यांच्यातल्या चर्चेचेही ते संवादक होते. १९६० मध्ये नेहरू आणि झाऊ यांच्यात यांगून, नवी दिल्ली आणि बीजिंगमध्ये झालेल्या चर्चेत त्यांचा दुभाषा या नात्याने सहभाग होता. बांडुंगमध्ये पार पडलेल्या शिखर परिषदेला नेहरूंनी आपल्याबरोबर परांजपे यांना घेतले होते.

    परांजपे यांना चिनी भाषेतही वेगळ्या नावाने ओळखले जात होते. ‘बै चुनहुई’ या नावाने ते परिचितांमध्ये ओळखले जात. पन्नासच्या दशकात जेव्हा ‘हिंदी-चिनी भाई भाई’ या घोषणेचे दिवस होते तेव्हा चीनमध्ये काम करायला मिळणे हाही त्यांच्या दृष्टीने मोठा योग होता.

    त्यांच्याविषयी ‘हिंदू’ दैनिकात लिहिताना सुजन चिनॉय यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. चिनॉय हे तेव्हा भारताच्या परराष्ट्र खात्यात चिनी विभागाचे सहसचिव म्हणून काम पाहात होते.

    त्यांचा वेषही अगदी साधा असे. साधा खादीचा अध्र्या बाह्यांचा शर्ट, विजार आणि पायात स्पोर्ट्स् शूज!. ते पुणे शहरात वयोवृद्धांसाठी उभारण्यात आलेल्या ‘अथश्री’ प्रकल्पातले पहिले रहिवासी. तिथेही ते साधेपणानेच राहायचे, असे डॉ. विश्वास मेहेंदळे सांगतात.

    नेहरू काळापासून परांजपे यांचे चालू असलेले चीनविषयक प्रेम अगदी अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री होईपर्यंत चालूच होते. राजीव गांधी पंतप्रधानपदी आले तेव्हा त्यांचाही बीजिंगचा दौरा निश्चित झाला. डिसेंबर १९८८ मध्ये त्यांच्याबरोबर दुभाषा म्हणून कोण जाऊ शकेल याविषयी चर्चा सुरू झाली तेव्हा परराष्ट्र कचेरीत पुन्हा एकदा परांजपे यांचेच नाव घेतले गेले. राजीव गांधींच्या दौऱ्यातही त्यांचा समावेश झाला.

    गेल्या वीस वर्षांमध्ये चीन बराच बदलला असल्याचे मत परांजपे यांनी आपल्या नोंदींमध्ये केले आहे. चीन बदलला म्हणजे त्याचे आणि भारताचे संबंधही सुधारतील, असे भाकीत त्यांनी केले होते. १९८७ ते १९९१ या काळात चीनमध्ये राजदूतपदी सी.व्ही. रंगनाथन होते. ते लिहितात की, चीनमध्ये आपले आगमन होण्यापूर्वी तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी पी. एन. हक्सर आणि परांजपे यांना चीनमध्ये पाठवले होते. हक्सर हे राजीव गांधी यांचे खास दूत होते. रंगनाथन पोहोचले त्याच दिवशी त्यांना प्रा. वू शियाओफिंग यांनी मेजवानीसाठी पाचारण केले. शियाओफिंग हे बीजिंग विद्यापीठात संस्कृत शिकवायचे. ते परांजपे यांचे खास मित्र. त्या प्रसंगी त्यांनी कालिदासाचे मेघदूत आपल्याला मुखोद्गत असल्याचे दाखवून सर्वाना चकित केले होते. परांजपे यांना मात्र ते नवीन नव्हते. त्यांच्या मित्रपरिवारात ‘रामचरितमानस’चे चिनी भाषेत रूपांतर करणारे प्रा. जी. शियालिन, इंदिरा गांधी यांचे शांतिनिकेतनमधले सहाध्यायी प्रा. जिंग दिंगहान यांचाही समावेश होता. त्यांच्या चीनविषयीच्या ज्ञानाने प्रत्येकजणच भारावून गेल्याचे पाहायला मिळायचे.

    ८ एप्रिल २०१० रोजी त्यांचे निधन झाले.

    (संदर्भ : भारतीय प्रशासन सेवेतील अधिकार्‍यांची माहिती, लोकसत्ता मधील व्यक्तिवेध सदर.)

      January 22, 2016


  • शरद पाटील (कॉम्रेड)

    प्राच्यविद्यापंडित, आंतरराष्ट्रीय विचारवंत आणि कृतीशील सामाजिक कार्यकर्ते म्हणुन ख्याती असलेल्या शरद पाटील हे सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक होते.१९४५ मध्ये जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथील शिक्षण अर्धवट सोडून कम्युनिस्ट चळवळीत त्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला.

      April 18, 2014


  • निशिगंधा वाड

    निशिगंधा वाड ही मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री आहे. लहानपणी दुर्गा झाली गौरी या मराठी नाटकातील तिचे काम लोकांच्या विशेष लक्षात राहिले. निशिगंधाने १०० हून जास्त मराठी व हिंदी चित्रपटांतून काम केले आहे.

      November 18, 2015


  • फुटबॉल मधील ‘बादशहा’ ख्रिस्तियानो रोनाल्डो

    फुटबॉल मधील ‘बादशहा’ ख्रिस्तियानो रोनाल्डो जगातील सर्वांत प्रतिभाशाली फुटबॉलपटू आहे. त्यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९८५ रोजी मॅडीइरा, पोर्तुगाल येथे झाला. महान फुटबॉलपटू पेल यांनी रोनाल्डोहला सर्वश्रेष्ठय फुटबॉलपटू संबोधलेले आहे. रोनाल्डोचे वडील जोस डिनिस ऐवियरो अमेरिकेचे राष्ट्राध्याक्ष रोनाल्ड रीगनमुळे चांगलेच प्रभावीत झाले होते. त्यांच्यापासून प्रेरीत होऊन त्यांरनी मुलाचे नाव‘ख्रिस्तियानो रोनाल्डो डॉस सांतोस ऐवियरो’असे ठेवले होते.पुढे त्याूचे नाव‘ख्रिस्तियानो रोनाल्डो’असे पडले. वयाच्याा १४ व्याड वर्षी रोनाल्डोटने शाळेतील शिक्षकाला बुट आणि खुर्ची फेकून मारली होती. त्यासमुळे त्याळला शाळा सोडावी लागली होती. लहानपणी रोनाल्डो ची आई त्याला ‘रडके बाळ’ असे म्हणत असे. कारण रोनल्डोअ लहानपणी खुप रागीट होता आणि राग आल्या नंतर जोरजोरात रडत होता.

    रोनाल्डोने २००२-०३ मध्ये मॅनचेस्टर युनाइटेडला जोडला गेल्यां नतर त्याजने 28 नंबरची जर्सी मागितली हेाती. परंतु नाइलाजास्तेव त्याेला सात नंबरची जर्सी देण्याात आली. आणि पुढे हीच त्यांची ओळख बनली. जॉनी बेरी, जॉर्ज बेस्ट, स्टीव कूपेल, ब्रायन रॉब्सन, एरिक कैंटोना आणि डेविड बेकहम हे सुध्दाे ७ नंबरची जर्सी परिधान करत. जवळपास पाच वर्षांपासून मॉडेल इरिना शायक सोबत क्लोज रिलेशनशिपमध्येु आहे. इरिना सपुर मॉडेल असून तिने २०१४ मध्येय हॉलीवुड फिल्म 'हरक्यूलिस'मध्येे कामसुध्दा केले आहे. रियल माद्रिद व पोर्तुगालचा स्टार ख्रिस्टियानो रोनाल्डोने देशातर्फे आणि क्लबतर्फे खेळताना २०१६ मध्ये सर्वोत्तम कामगिरी करीत फिफाचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. रोनाल्डोने कारकिर्दीत चॅम्पियन्स लीगचे तिसरे जेतेपद आणि पोर्तुगालसह युरो २०१६ मध्ये जेतेपद पटकावल्यानंतर ‘बेलोन डिओर’ पुरस्काराचा मान मिळवला. त्याने चॅम्पियन्स लीगमध्ये १२ सामन्यांत १६ गोल नोंदवले. आपल्या समुहाकडून रोनाल्डोला वाढदिवसाच्या शुभेच्छा. रोनाल्डोचे संकेतस्थळ www.cristianoronaldo.com

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      February 5, 2019