(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ज्येष्ठ गायक पंडित प्रभाकर कारेकर

    ‘प्रिये पाहा’ ही कारेकर यांची प्रकाशित झालेली पहिली ध्वनिमुद्रिका. ‘एचएमव्ही’ कंपनीने ती काढली होती. पुढे प्रभाकर कारेकर यांनी गायलेली नाटय़पदे, भजने, शास्त्रीय गायन आदींच्या अनेक ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या. महाराष्ट्रासह देशात आणि परदेशातही पं. कारेकर यांच्या दहा हजारांहून अधिक मैफली व कार्यक्रम आजवर झाले आहेत.

      July 4, 2022


  • विष्णु भिकाजी कोलते

    महानुभावीय साहित्याची गूढ लिपी उकलून, महानुभावीय साहित्याचं संशोधन वि. भि. कोलते यांनी केलं.

      December 15, 2010


  • चित्रकार, नेपथ्यकार दत्तात्रय गणेश गोडसे

    मुद्रणसाक्षेप’ किंवा ‘पदवी आणि प्रबंध’ असे लेख याची उत्तम उदाहरणे आहेत. भारत सरकारने त्यांना ’भारताचा सर्वश्रेष्ठ नेपथ्यकार’ या पुरस्काराने सन्मानित केले होते.

      July 4, 2022


  • चित्रपट अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर

    माझा पती करोडपती’, ‘कुंकू’, ‘अशी ही बनवाबनवी’ अश्या ब-याच चित्रपटात तसेच अत्यंत गाजलेल्या ‘तू तू मै मै’ टि.व्ही. मालिकेत सुप्रिया होती. ‘नवरा माझा नवसाचा’ ह्या चित्रपटानेही प्रेक्षकांची वहावा मिळवली.

      August 17, 2017


  • हिंदी मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू

    एक उत्तम अभिनेत्री म्हणून भारतातल्या नाट्य-चित्रपट प्रेक्षकांना रिमा यांचं नाव सुपरिचित आहे. त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९५८ रोजी झाला.त्यांचं नाव घेताच डोळ्यांपुढे त्यांचा हसरा, गोल चेहरा, घारे डोळे आणि त्यांची अभिनयाची मोठी कारकीर्द तरळून जाते. हुजूरपागा शाळेत शिकत असताना विद्यार्थी दशेतच त्यांच्या अभिनयाची नोंद घेतली गेली. मराठी रंगभूमीचा वारसा त्यांना त्यांच्या आईंकडून आला. 'हिरवा चुडा', 'हा माझा मार्ग एकला' अशा चित्रपटांतून 'बेबी नयन' नावाने बालकलाकार म्हणून मा.रीमा लागू यांनी चित्रपट सृष्टीत सुरवात केली व लवकरच त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात झाली. ७०-८० च्या दशकात मराठी रंगभूमीवर व नंतर मराठी, हिंदी चित्रपटांत त्यांनी विविध भूमिका केल्या. १९८० सालच्या ’आक्रोश, 'कलयुग' या दर्जेदार चित्रपटांपासून त्यांच्या चित्रपटप्रवासाला सुरुवात झाली. 'रिहाई'सारखी धीट, वेगळ्या वाटेवरची भूमिका असो, किंवा 'कयामत से कयामत तक', 'मैंने प्यार किया', 'हम आप के हैं कौन', 'वास्तव', 'कल हो ना हो' मधल्या आईच्या भूमिका, आपल्या सहजसुंदर अभिनयानं त्यांनी मोठा पडदा कायमच व्यापला आहे. त्यांनी केलेल्या नाटकातील पुरूष,सविता,घर तिघांचं हवं आत्ताचं छापाकाटा अशी बरीच नाटकं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली, काही नाटकं तितकी चालू नाही शकली. पण हे करत असताना त्या ब-याच व्यक्तिरेखा नाटकाच्या माध्यमातून जगत होत्या. मा.रीमा लागू यांचे लग्ना आधीचे नाव नयन भडभडे. नाट्य अभिनेते विवेक लागू यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्या रीमा लागू झाल्या. मा.रीमा लागू यांनी 'श्रावणसरी' या मालिकेच्या दोन कथांचे दिग्दर्शन केले होते. मा.रीमा लागू यांनी ’अनुमती’ या पुरस्कारप्राप्त चित्रपटात अतिशय महत्त्वाची भूमिका केली होती. गजेंद्र अहिरे यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटातली त्यांची भूमिका अनेक चित्रपटमहोत्सवांत नावाजली गेली आहे. तसेच ’तू तू मैं मैं’ ही मा.रीमा लागू यांची अतिशय गाजलेली आणि स्वच्छ, साधी सरळ टीव्ही मालिका सर्वांच्याच पसंतीस उतरली होती. त्या मालिकेनंतर त्यांनी ’तुझं माझं जमेना’ या मालिकेमधून काम केले होते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      February 25, 2017


  • प्रसिद्ध लेखक अनिल धारकर

    निल धारकर यांनी देबोनायर, मिड-डे, संडे मिड-डे, द इंडीपेंडेंट व द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया मध्ये काम केले होते. अनिल धारकर हे दरवर्षी नोव्हेंबर मध्ये मुंबईत होणाऱ्या लोकप्रिय मुंबई इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलचे संस्थापक होते. दक्षिण मुंबईत आर्ट मुव्ही थिएटर (आकाशवाणी सभागृहात) सुरू करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.

      March 26, 2022


  • भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील

    भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती मा.प्रतिभा पाटील यांचा जन्म १९ डिसेंबर १९३४ रोजी जळगाव येथे झाला. प्रतिभा पाटील यांचे वडिल सरकारी वकिल होते. एम.ए करत असतानाच त्यांची पावले राजकारणाकडे पडली. त्याला कारण ठरले माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. त्यांच्या एका कार्यक्रमाला प्रतिभाताई उपस्थित होत्या. महिलांनी राजकारणात यायला हवे. राजकारण स्वच्छ रहाण्यासाठी महिलांची उपस्थिती गरजेची आहे, अशा आशयाचे भाषण तेव्हा चव्हाणांनी केले होते. ते ऐकून प्रभावित झालेल्या प्रतिभाताई राजकारणात उतरल्या.

    पण राजकारणा उतरायचे तर काही लक्ष्य समोर हवे, असे नव्हते. योगायोगाने त्यांच्या तोपर्यंतच्या कामाची पावती आणि धडाडी पाहून त्यांन जळगाव मतदारसंघातून आमदारकीचे तिकिट मिळाले. आश्चर्य म्हणजे पहिल्याच प्रयत्नात त्या आमदार झाल्या. त्यावेळी त्यांचे वय होते अवघे पंचवीस. त्यानंतर सलग सहावेळा त्यांनी आमदारकी भूषवली. आमदार असतानाच त्या वकील झाल्या. याच काळात त्यांचा विवाह झाला देवीसिंह शेखावत यांच्याशी. जळगावनंतर प्रतिभाताईंनी मतदारसंघ बदलला आणि त्या एदलाबाद (सध्याचा मुक्ताईनगर) मधून सलग पाचवेळा निवडणूक जिंकल्या.

    विधानसभेत प्रतिभाताईंनी अनेक पदांवर संधी मिळाली. त्यांचे त्यांनी सोने केले. १९६७ ते १९७७ या कालावधीत उपमंत्री, राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीपद सांभाळले. त्यानंतर १९७८ ते १९८० या कालावधीत शरद पवार पुलोदचे मुख्यमंत्री असताना त्यांनी विरोधी पक्षनेतेपद समर्थपणे सांभाळले.

    कॉंग्रेसवरील निष्ठा आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व लक्षात घेऊन १९८० मध्ये प्रतिभाताईंना मुख्यमंत्री बनविण्याचे कॉंग्रेसचे डावपेच होते. मात्र, ऐनवेळी अब्दुल रेहमान अंतुले यांनी बाजी मारली आणि पाटील यांचे मुख्यमंत्रीपद हुकले. मात्र, पक्षावर किंवा एखाद्या व्यक्तीवर नाराज होऊन कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा विचारही त्यांच्या मनात आला नाही. पण पक्षानेही त्यांच्या योग्यतेचा विचार करून राज्यसभेवर त्यांची नियुक्ती केली.

    तेथे त्यांची ज्येष्ठता आणि अनुभव लक्षात घेऊन उपसभापती म्हणून निवड झाली. १९८६ ते ८८ या कालावधीत त्यांनी उपसभापतीपद भूषविले. पुढे त्यांच्यावर कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत १९९१ साली त्या अमरावतीतून सहजपणे लोकसभेवर निवडून आल्या.

    प्रतिभाताई २००७ ते २०१२ या काळात राष्ट्रपती राहिल्या. राष्ट्रपतिपदाची कर्तव्ये पार पाडतानाच त्यांनी वायुसेनेच्या सुखोई, टी-10 या रणगाड्यावर स्वार होऊन, सुदर्शन शक्ती सैन्य अभ्यास दौ-यात सहभागी होऊन महिला शक्तीची प्रचिती आणून दिली होती. राष्ट्रपती असताना प्रतिभा पाटील यांनी राष्ट्रपती भवनातील ऊर्जा बचत आणि पर्यावरण संवर्धनाविषयी रोशनी प्रकल्पाची संकल्पना अमलात आणली होती.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      November 4, 2019


  • अजय देवगण

    “सिंघम’ मुळे अजय देवगणचे मार्केट वाढले. आता माझी सटकली हा अजयचा मराठी डायलॉग खूप हिट झाला.

      June 17, 2022


  • किराणा घराण्याचे गायक सुरेशबाबू माने

    पंडित सुरेशबाबू माने ऊर्फ अब्दुल रहमान यांचा जन्म किराणा घराण्याचे उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब व ताराबाई माने या दांपत्याच्या पोटी रोजी झाला. ताराबाई ह्या सरदार मारुतीराव माने यांच्या सुकन्या होत. मारुतीराव माने हे बडोदा संस्थानाच्या राजमातांचे बंधू होते. अब्दुल करीम खाँ हे त्या राजदरबारात गायक होते व ताराबाईंना गाणे शिकवत होते. दोघांचे प्रेम जुळले व त्यांनी विवाहाचा निर्णय घेतला. परंतु ताराबाईंच्या मातापित्यांचा ह्या विवाहास विरोध असल्यामुळे अब्दुल करीम खाँ व ताराबाईंना संस्थान सोडावे लागले. त्यांनी मुंबईत संसार थाटला व यथावकाश पाच अपत्यांना जन्म दिला. त्यांच्या दोन पुत्रांची नावे सुरेश उर्फ अब्दुल रहमान व कृष्ण ही होती; तर मुलींची नावे चंपाकली, गुलाब आणि सकीना उर्फ छोटूताई अशी होती. पुढे ही भावंडे अनुक्रमे सुरेशबाबू माने, कृष्णराव माने, हिराबाई बडोदेकर, कमलाबाई बडोदेकर आणि सरस्वतीबाई राणे या नावांनी प्रसिद्धीस पावली. सुरेशबाबूंना संगीताचे प्रारंभिक शिक्षण आपल्या वडिलांकडून मिळाले आणि नंतरचे शिक्षण त्यांनी वडिलांचे मेव्हणे व किराणा घराण्याचे ज्येष्ठ संगीतकर्मी उस्ताद अब्दुल वाहिद खान यांच्याकडून व सवाई गंधर्वांकडून प्राप्त केले. सुरेशबाबूंच्या गाण्यात उत्स्फूर्तता, माधुर्य व सौंदर्य होते. त्यांची लय व तालावरची पकडही उत्तम होती. ख्याल, ठुमरी, दादरा, मराठी नाट्य संगीत आणि भजन या गायन प्रकारांवर सुरेशबाबूंचे प्रभुत्व होते. त्यांनी अनेक मराठी नाटकांत व चित्रपटांत वेगवेगळ्या भूमिका केल्या. अमृतमंथन, रजपूत रमणी आणि चित्रसेना हे त्यांचे चित्रपट. त्यांनी संन्यास-कल्लोळ नाटकात अश्विनशेठची आणि सुभद्रा नाटकात अर्जुनाची भूमिका केली होती. सावित्री, सच है आणि देवयानी या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन सुरेशबाबूंचे होते. मूक चित्रपटांच्या कारकिर्दीत सुरेशबाबू पडद्यामागे बसून हार्मोनियम किंवा तबला वाजवीत. त्यांच्या शिष्य परिवारात प्रमुखतः हिराबाई बडोदेकर व प्रभा अत्रे ह्या प्रख्यात गायिकांचा समावेश होतो. तसेच वसंतराव देशपांडे, पं. भीमसेन जोशी, माणिक वर्मा यांनाही सुरेशबाबूंचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या शिष्या डॉ. प्रभा अत्रे यांनी मुंबईत, सुरेशबाबूंच्या नावाने 'सुरेशबाबू -हिराबाई स्मृति समारोह' या वार्षिक संगीत महोत्सवाच्या आयोजनाला १९९२ साली प्रारंभ केला. आता हा संगीत महोत्सव भारतातील नावाजल्या जाणाऱ्या प्रमुख संगीत महोत्सवांपैकी एक गणला जातो. याला मुंबईचा सवाई गंधर्व असे समजले जाते. “जोशेर का बच्चा है, वो शेर जैसाही बहादूर होगा,” असे उदगार उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब यांनी आपले चिरंजीव सुरेशबाबू माने यांच्या बद्दल काढले होते. सुरेश बाबू माने यांचे निधन १५ फेब्रुवारी १९५३ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      February 20, 2017


  • निर्णयसागर पंचागचे कृष्णाजी विठ्ठल सोमण

    १९७४ मध्ये जळगाव येथे भरलेल्या ज्योतिष संमेलनाचे क. वि. सोमणशास्त्री अध्यक्ष होते. त्यावेळी केलेल्या भाषणातही त्यांनी दृकप्रत्यय गणिताच्या पंचांगाचे महत्त्व वर्णन केले.

      April 7, 2022