जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
पठ्ठे बापूरावांचे खर नांव श्रीधर कृष्ण कुलकर्णी. त्यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८८६ रोजी झाला. ग्रामीण भागात गायल्या जाणार्याय जात्यावरच्या ओव्यां ऐकून ऐकून पठ्ठे बापूराव यांनी त्यात ही नवे बदल केले. त्यांनाही `श्रीधरची गाणी` या नावाने लोकप्रियता मिळाली. त्याचा परिणाम औंधच्या राजांनी दखल घेऊन पठ्ठे बापूराव यांना आपल्याकडे बोलवून घेतले. पठ्ठे बापूराव यांचे पुढील शिक्षण औंध येथे झाले. गावी घरासमोर असलेल्या वाड्यातच तमाशाचा फड चालायचा.
ब्राह्मण आणि कुलकर्णीपद त्यामुळे रात्री पटकन उठून तमाशाला जाऊन बसायचे धाडस त्यांना होईना. मनातली तळमळही त्यांना गप्प बसू देईना. बापू चोरुन तमाशाला जाऊ लागले. तमासगीरांना त्यांनी अनेक लावण्या लिहून दिल्या. तमाशात बापूरावाच्या लावण्या आणि कवने गायली जाऊ लागली. `श्रेष्ठवर्ण मी ब्राह्मण असूनी ! सोवळे ठेवले घालूनी घडी !! मशाल धरली हाती तमाशाची लाज लावली देशोधडी !! ` ह्या जिद्दीने `कुबेराला लाजवील असे वैभव तमाशाच्या जोरावर पायाशी लोळवीन `हा संकल्प करुनच बापूराव घराबाहेर पडले. गावोगावी तमाशाचा फड उभे राहू लागे. त्यातून श्रीधरची वाहवा मिळता मिळता `पठ्ठेबापूराव` म्हणून ते प्रसिद्धीला आले.
`पठ्ठेबापूराव`, मुंबईत आले, बटाट्याच्या चाळीत राहू लागले. तिथेही तमाशाच्या फडात जाऊन त्यांना लावण्या रचून देण्याचे काम त्यांनी काही दिवस केले. याच काळात त्यांना नामा धुळवडकरांच्या फडातील पवळा, नामचंद पवळा भेटली. तिला काहीजण `मस्तानी ` ची उपमा द्यायचे. बापूरावांची काव्य प्रतिभा पवळाच्या सान्निध्यात बहरली. बापूरावांचे काव्य अन पवळा बाईच्या गोड गळ्याने व ठसकेबाज नृत्याने ती रसिकांच्यासमोर सादर केली बापूराव आणि पवळा यांची कीर्ती महाराष्ट्राच्या कानाकोपर्याीत पसरली.
१९०८-०९ साली छ. शाहू महाराजांसमोर त्यांनी `मिठाराणी' चा वग पठ्ठे बापूरावनी सादर केला. पुढे त्या दोघांवर सर्वांनी बहिष्कार टाकला. तमाशाचा फड बंद पडला. आर्थिक कोंडी झाली. त्यामुळे बापूराव व पवळा या जोडीने स्वत:ला ९०० रुपयांचा करार करून स्वत:चा लिलाव केला. मुंबईच्या अबू शेठनी लिलाव घेतला. मुंबईच्या एल्फिस्टन थिएटरवर पवळा पठ्ठे बापूराव यांना पाहण्यासाठी तिकीट लावले. पण पुढे पवळा बेबनावामुळे पठ्ठे बापूरावांचा फड सोडून निघून गेली. पठ्ठे बापूरावांनी दुसर्या स्त्रीला घेऊन त्यांनी तमाशाचा फड चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आले नाही. मा.पी.पठ्ठे बापूराव यांचे २२ डिसेंबर १९४५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
December 22, 2018
भारतीय वायुदलाचे प्रमुख (सेवानिवृत्त) एअर चीफ मार्शल अनिल यशवंत टिपणीस.
April 21, 2010
मराठीला मोजक्या पण खानदानी काव्यसंग्रहांची लेणी चढविणारे नरेंद्र बोडके हे विलक्षण व्यक्तिमत्त्व होते.
July 10, 2012
अर्धवट शिक्षण सोडून ते इंग्लंडला गेले. त्यानी रॉयल अॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्स या लंडनमधील प्रसिद्ध संस्थेतून नाट्यविषयक पदवी मिळवली.
August 12, 2021
कथा,कदंबरी,प्रवासवर्णन,ललित असे विविध साहित्य प्रकार हाता़ळणारे,विविधांगी लेखन करुन आपल्या प्रतिभेचा साक्षात्कार करुन देणारे प्रख्यात शैलीदार ललित लेखक रवींद्र पिंगे यांनी ‘प्राजक्ताची फांदी’,’मोकळ आकाश’,’मुंबईचं फुलपाखरु’,’आनंदपर्व’, ‘आनंदाच्या दाही दिशा’ देवाघरचा पाऊस’ असे ३२ पुस्तकांचे लेखन त्यांनी केले होते.
July 25, 2022
पं. वामनराव सडोलीकर यांच्याबद्दल आजच्या पिढीला काही माहित नाही, पण मागच्या दोन पिढ्या मात्र जरूर त्यांची आठवण काढतात. त्यांचा जन्म १६ सप्टेंबर १९०७ रोजी कोल्हापूरपासून जवळच कोथळी गावी झाला. पं. वामनराव सडोलीकर यांना घरात भाऊ म्हणत. फार लहान वयात घर सोडून मुंबई आणि नाशिकला पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या 'गांधर्व महाविद्यालया'त मा.पं. वामनराव सडोलीकर दाखल झाले. अल्पकाळ घरी कोल्हापूरला राहून पुन्हा, अल्लादिया खाँसाहेब शंकरराव सरनाईक यांना तालीम देताना त्यांचं गाणं ऐकता येईल; या मोहाने १९२५ ला 'यशवंत नाटकमंडळी'त भाऊ नायक झाले. तो काळ त्यांना संगीतातली दृष्टी, ऐकलेली तालीम प्रत्यक्षात आणण्याचं धाडस आणि परिणामी प्रसिद्धी देणारा ठरला. पं. वामनराव सडोलीकर यांनी संगीत सम्राट अल्लादिया खाँसाहेबांच्या जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायकीचा फार लहान वयात ध्यास घेतला. त्यांना मनोमनी आराध्यदैवत मानलं. काही कारणांमुळे खाँसाहेबांनी ब्राह्मणाला शिकवणार नाही अशी शपथ घेतली होती. त्यामुळे भाऊंनी त्यांचे सुपुत्र उस्ताद भूजीर्खाँ यांचा गंडा बांधला. कालांतरानं भूजीर्खाँ प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबई सोडून कोल्हापूरला गेले. जाताना थोरल्या खाँसाहेबांकडे पं. वामनराव सडोलीकर यांना सुपूर्द करून म्हणाले, 'अब्बाजी, वामनराव आपले आहेत. आता आपण त्यांना तालीम द्या.' अल्लादियाखाँना भाऊंचा परिचय नव्यानं करून द्यायची जरुरी नव्हती.
कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळात भूजीर्खाँ सेवा करीत, तर भवानी मंडपात छत्रपतींच्या कुलस्वामिनीची अल्लादिया खाँ संगीत सेवा करीत. भाऊंचे वडील (दादा) दत्तोपंत माधव कुलकणीर् (सडोलीकर) स्वत: उत्तम सतार वाजवीत. ते रागदारीचे जाणकार होते. लहानग्या वामनला घेऊन ते संगीतसेवेच्या वेळी दोन्ही देवळात हजर असत. एवढंच नव्हे, तर छत्रपतींच्या कुटुंबातील व्यक्तींच्या छत्र्या (स्मारकं) असत तिथे त्यांच्या जयंती-पुण्यतिथीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात भूजीर्खाँ गात असत. याही ठिकाणी दादा भाऊंना घेऊन ऐकायला हजर असत. काळासावळा तरतरीत लहान मुलगा आणि त्याचे गोरेपान उंच वडील खाँसाहेबांना परिचित झाले होते. नाटककंपनीत असताना शंकरराव सरनाईकांची तालीम ऐकून तिचे पडसाद वामनच्या नाट्यपदातून उमटताना, त्याच्या तानांच्या लडीवर लडी ऐकून बेभान झालेल्या प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर केलेला पाहून खाँसाहेबांना आपली तालीम ऐकून ऐकून हुबेहूब उचलणारा एकलव्य दिसला होता. काही वेळा खाँसाहेब भाऊंना रियाजाच्या आणि तानांच्या बाबतीत सूचना देत. केलेल्या रियाजावर टिप्पणी करत. पण त्या काळात गंडाबंधनाबद्दल विचार करणं भाऊंना शक्यच नव्हतं. कारण गंडाबंधनाची दक्षिणा होती रुपये दहा हजार! कलदार सुरती रुपये! आपल्या वडिलांवर असा भार टाकणं भाऊंच्या कल्पनेबाहेरचं होतं. आधीच गाणं शिकण्यासाठी घरापासून दूर राहिल्यामुळे आणि शिरस्त्याप्रमाणे शाळा न शिकल्याबद्दल आजूबाजूच्या लोकांनी आईवडिलांना टोमणे मारलेले होते. त्यामुळे खाँसाहेबांचं कंपनीतलं वास्तव्य ही भाऊंच्या दृष्टीनं मोठी पर्वणी होती.
खाँसाहेब कधीकधी फिरायला जाताना भाऊंना घेऊन जात. फिरता फिरता त्यांचे काही अनुभव, कधी उपदेश, कधी त्या दिवशी भाऊंचा ऐकलेला रियाज यावर टिप्पणी करून खाँसाहेब सूचना करीत. ते दिवस भाऊंनी हृदयात जपून ठेवले होते. खाँसाहेब आणि त्यांचं कुटुंब हे भाऊंनी जन्मभर पुण्य मानलं. पं. पलुस्कर यांच्या सहवासात मिळालेलं 'रामनाम-धन', 'शिस्तीचे पाठ', 'रामायणावर भक्ती' आणि 'स्वरसाधनेचा मूलमंत्र' हे देखील मा.पं. वामनराव सडोलीकर यांच्या आयुष्याला स्थिरता देणारं ठरलं. सुदैवानं दोन्ही गुरू एकाच मार्गाचे प्रवासी होते. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही प्रवाहांचं त्यांच्या आयुष्यात अचल अधिष्ठान होतं. त्यामुळे कुठेही वैचारिक द्वंद्वात सापडून दिशा भ्रष्ट होण्याचा धोका भाऊंच्या आयुष्यात आला नाही. गुरू सच्चरित्र, स्थितप्रज्ञ आणि सर्वार्थानं मोठा असणं हे फार मोठं भाग्य असतं. भाऊंना हे सद््भाग्य लाभलं आणि त्यांच्यामुळे आम्हालाही तो आशीर्वाद लाभला. मा.पं. वामनराव सडोलीकर यांनी नाट्यकलेची सेवा नायक, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक या रूपात केली. अनेक होतकरूंना ही कला शिकवली. आपल्या स्थानावरून न उठता केवळ भूमीसंवाद आणि त्यामागचा विचार समजावून देऊन ते कलाकारांकडून उत्कृष्ट काम करून घेत.
मैफलीत गायला बसले आणि आवाज लागला नाही अशी त्यांनी कधीच तक्रार केली नाही. खाँसाहेबांनी भूजीर्खाँ, मंजीखाँ आणि बडेजींना जे आपल्या गायकीचं मर्म समजावून दिलं ते भाऊंनाही दिलं. तालाचा विचार अगदी वेगळ्या दृष्टिकोनातून करून सर्वसामान्य रागही कसे अभिनव रीतीनं सोडवायचे आणि मांडायचे, अवघड राग कसे उलगडायचे याची मर्मभेदक दृष्टी भाऊंना मिळाली आणि श्रोत्यांच्या अनुनयासाठी कोणताही समझौता न करता शुद्ध गायकीच भाऊंनी मैफलीतून सतत मांडली. त्या काळी साधं पांढरं धोतर, स्वच्छ, कडक इस्त्रीचा पांढरा झब्बा किंवा शर्ट-कोट, माथ्यावर टोपी (बुलबुले आणि कं. कोल्हापूर यांच्याकडून खास बनवलेली) हा त्यांचा वेष त्यांची ओळख बनला होता. आज जरासं नाव झालं की कलाकार 'पंडित किंवा उस्ताद' होतात. आता अधिक शिकायची आपल्याला गरज नाही, असं त्यांना वाटतं. पण भाऊंनी आपलं उत्तरायुष्यही शिकण्यात-शिकवण्यात व्यतीत केलं. त्यांच्या वैयक्तिक गरजा इतक्या माफक होत्या की त्या गरजांसाठी आपल्या मूल्यांशी तडजोड करण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही. त्यांचा स्वभाव येणाऱ्या प्रसंगातून किंवा अनुभवातून सकारात्मक विचार जोडणारा होता. दु:खानं पिचून जाणं किंवा निराशेनं दैवाला दोष देणं त्यांनी कधी केलं नाही.
रागीट होते, पण त्यांचा राग समोरच्याचा मनोभंग करणारा, त्याच्या व्यक्तित्त्वाला जाळून टाकणारा नव्हता. पं. वामनराव सडोलीकर आपले गुरू उस्ताद अल्लादिया खान यांनी स्थापन केलेल्या जयपूर-अत्रौली घराण्याच्या शैलीने गायन करत असत. किशोरवयात त्यांनी ग्वाल्हेर घराण्याचे पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांच्याकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. पुढच्या काळात त्यांनी हिंदुस्तानी संगीताचे शिक्षण जयपूर-अत्रौली घराण्याच्या उस्ताद भुर्जी खान व उस्ताद अल्लादिया खान यांचेकडे घेतले. त्यांच्या शिष्यांत बंधू मधुकर सडोलीकर, कन्या श्रुती सडोलीकर-काटकर आणि मंजिरी आलेगांवकर यांचा प्रामुख्याने समावेश होतो. ‘पं. वामनराव सडोलीकर फौंडेशन’ तर्फे वामनराव सडोलीकर यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वरांजली अर्पित केली जाते. गानसम्राज्ञी श्रृती सडोलीकर आपले वडिल मा. वामनराव सडोलीकर यांच्या स्मरणार्थ दर वर्षी कार्यक्रम करुन त्यांना श्रध्दांजली वाहतात. पं. वामनराव सडोलीकर राहात असलेल्या दादरच्या हिंदु कॉलनीतील चौथ्या रस्त्याला मुंबई महानगर पालिकेने पं. वामनराव सडोलीकर यांचे नाव दिले आहे. वामनराव सडोलीकर यांचे २५ मार्च १९९१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ श्रृती सडोलीकर
September 16, 2017
तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्याकडे गुरुशिष्य परंपरेमध्ये त्यांनी शिक्षण घेतले होते. भिलारे यांनी भारतभरात वेगवेगळ्या सुप्रसिद्ध संगीत महोत्सवांमध्ये पखवाज सोलो वादन केले होते, तसेच त्यांनी पंडित जसराज, राहुल शर्मा, उल्हास पं. कशाळकर अशा दिग्गजांना साथ दिली होती.
June 8, 2022
कादंबरीकार होण्याच्या आधी गुलशन नंदा दिल्लीतील बल्लीमारान भागात एका चश्माच्या दुकानात काम करत होते. गुलशन नंदा यांना एकदा बसने प्रवास करत असताना एकाने लिखाण करण्यास सांगितले व ते यशव्वी कादंबरीकार आणि हिंदी पटकथा झाले. साठच्या दशकात गुलशन नंदा हे लेखक पॉकेट बुक्सच्या पहिल्या पिढीतले तळपणारे तारे होते.
गुलशन नंदा यांच्या कादंबर्यांकनी विक्रीची नवनवीन विक्रम प्रस्थापित करतांनाच बॉलीवुडला कटी पतंग, दाग, अजनबी, नया जमाना, झील के उस पार, शर्मिली, खिलौना, आदींसारखे जवळपास २५ सुपरहिट चित्रपटही दिलेत.
गुलशन नंदा यांच्या हिंदी कादंबर्यावर जितके हिंदी चित्रपट निघाले तितके हिंदी चित्रपट इतर कोणत्याही हिंदी लेखकाच्या कादंबऱ्यांवर निघाले नसतील.
गुलशन नंदा यांचे निधन १६ नोव्हेंबर १९८५ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
November 16, 2018
वंदनीय माई मंगेशकर ह्यांच्या लेखाचे शब्दांकन करण्याची सुवर्णसंधी मला लाभली होती. "स्वरमंगेश" ह्या गौरवग्रंथामध्ये "मालक" ह्या शीर्षकाने, २४ एप्रिल १९९५ रोजी प्रसिद्ध झालेला हा लेख ! लतादीदी, मीनाताई, आशाताई, उषाताई, पं हृदयनाथजी ह्या पंचामृताने माझं कौतुक केलं ! आज चोवीस एप्रिल २०१७ रोजी वंदनीय मास्टर दीनानाथांची पंचाहत्तरावी पुण्यतिथी आहे,
|| मालक ||
"माझ्या घरांत मी तुला काही काम पडू देणार नाही", असं मालकांनी मला लग्नाच्यावेळीच सांगितलं होतं ! अगदी तांब्यासुद्धा उचलू दिला नाही कधी. एकदा मालक आंघोळीला निघाले म्हणून मी धोतराच्या नि-या करून ठेवल्या, तर किती रागावले माझ्यावर, "तू काय हमालाची बायको आहेस का ?"
आज माझ्या वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी मी मालकांच्या आठवणी आठवू पहाते, तर अगदी काल परवा घडल्या असाव्यात, अशा सा-या स्मृती माझ्या डोळ्यांसमोर येऊ लागतात !
माझ्या माहेरी जेवणानंतर, मला पान खायची सवय होती ! लग्नानंतर दोन दिवसांनी मालकांना काय वाटले, कोणास ठाऊक ? "यापुढे पान बंद", असं मालक म्हणाले. पानाचे सगळे साहित्य मालकांनी फेकून दिले. नंतर काय झाले, मालक गड्याला म्हणाले, "जेवण झालं की एक विडा करून हिच्या उशापाशी ठेवत जा" !
एक दिवस मालक, खालूनच "माई, माई", अश्या मोठ्याने हाका मारीत आले. "अहो काय झालं?" मी विचारलं, पाहते तर काय, एका खिशात पानाचं सगळ साहित्य, नि दुस-या खिशात पिकलेली पानं, म्हणाले, "तुला लागतात ना, म्हणून पिकलेली पानं घेऊन आलोय"! मालकांचा असा भोळा अन् प्रेमळ स्वभाव !
माझी सासू फार कडक होती. मी खानदेशातली म्हणून सासू मला "घाटी" म्हणायची, पण मालक इतके शांत की, आईला कधीही काहीही बोलायचे नाहीत. मी थोडी रागावले की, मालक म्हणायचे, "अगं माई, कां रागावलीस ? प्रेमाच्या राज्यांत तलवारीचं आणि भाल्याचं काय काम ?"
इतका शांत स्वभाव होता ह्यांचा ! हं दिवसभर शब्दांच्या कोट्या करायचे आणि दुस-याला हसवायचे !
मालाकांचं जेवण अगदी कमी असायचं, पण षोक मात्र खूप जेवण करून ठेवायचा. ह्यांना ओल्या हरभ-याची भाजी फार आवडायची. मटण, मासे,कोंबडी सगळं एकदमच करून ठेवायचं. दर पंगतीला ह्यांना कुणीतरी लागायचं. कधीही एकटे जेवले नाहीत, कुणीच नसलं, तर गॅलरीत उभे राहायचे आणि लोकांना हाका मारायचे, " काय रे बाबा, कुठे चाललास ? जेवलास कां नाही ? नाही तर ये आणि जेवून जा."
काही वेळा मालक अगदी बेफिकीर असायचे. एकदा गोव्याला रस्त्यानं आम्ही दोघे चाललो होतो. ते पुढे आणि मी मागे. ह्यांनी शर्टामध्ये गळ्याशी नोटा खोचून ठेवल्या होत्या. जोराचा वारा आला आणि शर्टामधल्या काही नोटा उडून खाली पडल्या. मी त्या नोटा उचलायला खाली वाकले, तर माझ्यावर ओरडलेच, "खाली पडलेल्या नोटा भिका-यासारख्या उचलू नकोस, गेले पैसे तर गेले, त्याच्या मागे कधी जाऊ नये."
प्रसंगी मालक अगदी लहान मुलासारखे हळवेही व्ह्यायचे. एकदा पुण्याला भाजीमंडईमध्ये, मी भाजी आणायला गेले होते, मुलं माझ्या बरोबर होती. घरी यायला आम्हाला जरा उशीर झाला तर इकडे जीव कासावीस होऊन, बायको-मुलं हरवली, अशी मालकांनी पोलिसात तक्रारही केली !
मालाकांचा माझ्यावर प्रचंड विश्वास होता. मी ही त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाही. बैठकीचं गाणं ठरवायला कुणी आलं, तर म्हणायचे."माईला विचारा, तिने सांगितलं तर एका रुमालावरही गाईन."
मालक अगदी सनातनी होते. मुलींच्या लहानपणी, त्यांची सक्त ताकीद होती की, मुलींनी स्टेजवर यायचं नाही. मुलींनी पावडर लावायची नाही.
मालक उदार वृत्तीचे होते. एकदा मुंबईला रेडिओवर गायला गेले होते तर हातातल्या अंगठ्या कुणाला तरी देऊन, रिकाम्या बोटांनी घरी आले. मैत्री कशी करावी, हे तर मी मालकांच्या स्वभावातूनच पाहिलं. आयुष्यात फार मोठा दानधर्म मालकांनी केलेला मी स्वतः जवळून पाहिला आहे. पण शेवटी मालकांच्या अंगावर काय आलं तर भगवं धोतर !
मला चार मुली झाल्या, पण लोकांसारखे मालकांनी कधी, "मुलीच कां झाल्या ?" असं नाही म्हटलं. त्यांना मुलींचीच भारी हौस होती. मुलीना रागे भरलेले त्यांना आवडायचे नाही. मुलींना ते जराही दृष्टीआड होऊ द्यायचे नाहीत.
श्रीमंगेशावर मालकांची अगाध श्रद्धा होती ! लताच्या, बाळच्या आजारपणांत अगदी हळवे व्ह्यायचे. लताच्या आजारपणांत मालक कुंडली उघडून बसायचे. तंबोरा वाजवीत तोंडाने सारखी रामरक्षा म्हणायचे. लता देवीच्या आजारातून उठल्यावर तर मालकांनी बँड लावला होता. जेवढ्या बायका, लताला पहायला आल्या होत्या, तेवढ्या सगळ्यांची मी खणा-नारळांनी ओटी भरली होती ! उषाच्या पाठीवर मला मुलगा झाला, म्हणून उषाच्या वाढदिवसाला मालक उषाच्या पाठीची पूजा करायचे. उषा उगवली की प्रकाश येतो, म्हणून बाळला हे प्रकाश म्हणायचे. लताला हे "तताबाबा" म्हणायचे. आशा अगदी भोळसट म्हणून तिला हब्बू म्हणायचे. तर नाकाचं टोक जरा वरती म्हणून उषाला बुंडरी म्हणून हाकारायचे.
आम्ही सांगलीला होतो, तेव्हाची एक आठवण ! मालक नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने नेहमी मुंबईला जायचे. एकदा रुसून मी ह्यांना म्हणाले, "इतके नेहेमी मुंबईला जाता, तर माझ्यासाठी दोन चांगली लुगडी आणा". मालकांनी येतांना खरंच माझ्यासाठी दोन चांगली लुगडी आणली, त्यातल्या एका लुगड्याची मी घडी मोडली, तेवढ्यात दाराशी एक भिकारीण गात गात आली. तिच्या बरोबर तिची बारा-तेरा वर्षांची पोरगी होती, ती नाचत होती. ते पाहून मालकांना रडू आलं, मला म्हणाले, "पोटासाठी ती पोर नाचवीत आहे, ते मला बघवत नाही. तुझ्या अंगावरचे हे लुगडं, तिला देऊन टाकशील कां ?" काय करणार ? अंगावरचे लुगडं सोडून, मी त्या भिकारणीला देऊन टाकले. दिलदार असे की, एकदा त्यांनी नव्या आणलेल्या चादरी, दुस-याला देऊन टाकल्या.
मालक म्हणजे देवमाणूस होते ! लग्न झाल्यावर मी कधी माहेरी गेलेच नाही. कंपनीच्या किल्ल्या माझ्यापाशीच असायच्या.
मालकांना जाऊन आज त्रेपन्न वर्षे झाली, पण त्यांच्या संगीताचा जराही विसर पडला नाही.त्यांच्या गायकीपुढे आजचे तरुण गायक नम्रतेने मान झुकवतात. मालकांचा विलक्षण पल्लेदार आवाज, त्यांच्या नाट्यसंगीताला असलेला शास्त्रीय संगीताचा जबरदस्त आधार, रागदारी आणि लय यावरची त्यांची हुकमत, पंजाबी आणि राजस्थानी संगीताचा त्यांच्या गायकीत झालेला गोड मिलाफ, यामुळे त्यांच्या गाण्याने मनाला घातलेली मोहिनी सुटत नाही. मालक दिवसभर गाणं म्हणायचे. पहाटे चार वाजता उठून तंबोरा घेऊन बसायचे. आपला आवाज ताब्यात ठेवायचे. मालक गातांना कधी वेडे-वाकडे तोंड करायचे नाहीत. लता, मीना, आशा, ह्यांच्याजवळ गाणं शिकायच्या. केव्हां केव्हां गणूलाही (गणपत मोहिते) मालक शिकवायचे. नाटकाच्या पदांच्या तालमी तेवढे मालक घ्यायचे.
नाटक नसलं की, रिकाम्यावेळी मालक गाण्याच्या बैठकी करत. व-हाडामध्ये मालकांच्या गाण्याचे खूप कार्यक्रम झाले. पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, धारवाड, इंदूर, ग्वाल्हेर, सिमला अश्या कितीतरी ठिकाणी ह्यांच्या गाण्यांच्या मैफली रंगल्या ! मालकांची सर्व नाटकं मी आवर्जून बघितली. प्रत्येक पटाला वन्समोअर घेणारे, टाळ्यांच्या गजराने, डोक्यावर घेतलेले थिएटर मी पाहिलेय !
मालकांना ज्योतिषाचा भारी नाद होता. ज्योतिष विषयावर त्यांचा गाढा अभ्यास होता. मालकांनी मला पत्रिका बघायला शिकविलं. "हे तारे बघ, त्या कुंडल्या काढ," असं सारखे मला म्हणायचे. आपली पाची मुलं पुढे नामवंत होतील, हे भाकीत फार पूर्वीच त्यांनी वर्तविले होते !
मालकांनी पुण्याला घर घेतलं, तेव्हां गृह्शांतीला ब्राह्मण नाही बोलावले. आपल्या मुलांकडून, त्यांनी संस्कृत मंत्र म्हणवून घेउन, घराची शांती केली. मालकांची स्मरणशक्ती तल्लख होती. संस्कृत भाषेचं त्यांना खूप वेड होतं ! ते सामवेद म्हणायचे. मोठमोठी पुस्तकं वाचली होती त्यांनी. मालकांनी मला खूप हिंडवले, फिरवले !
मालकांना शिकारीची आवड होती. कधी कधी ते शिकारीला जातांना मलाही बरोबर न्यायचे. एकदा तर तान्ह्या आशाला बरोबर नेले होते. कधी सांगलीच्या रानात, तर कधी थेट बेळगावपर्यंत जायचे. शनिवार, रविवार, बुधवार कंपनीची नाटकं असायची, तर बाकी दिवस शिकारीचे. मी रान उठवायची. ते, तितर, सश्यांची शिकार करायचे. मालकांनी वाघ मात्र कधी मारला नाही, कारण, "ते आमचे कुलदैवत आहे," असे ते म्हणायचे !
मालकांनी "बलवंत सिनेटोन" ही चित्रपट कंपनी काढून, "कृष्णार्जुन युद्ध" हा चित्रपट निर्माण केला. दुर्दैवाने ह्यांना चित्रपट निर्मितीमध्ये यश लाभलं नाही आणि त्यातूनच त्यांच्यावर भरलेले खटले आणि झालेला तीव्र मनस्ताप फार कठीण काळ होता तो. त्या परिस्थितीमध्ये मालकांची तब्येत ढासळली, ती कायमचीच !
सोळा डिसेंबर एक्केचाळीसचा तो दिवस, लताचं रेडिओवरून पहिल्यांदा गाणं झालं, तेव्हां मालकांनी आपल्या लताचं गाणं, घरी बसून ऐकलं मात्र, मला म्हणाले, "माई, आज मी माझं गाणं ऐकलंय, आता मला जायला हरकत नाही". मालकांनी लताला शेवटची चीज शिकविली ती, "म्हारा मुजरा". मालकांनी लताला स्वतःची चिजांची वही आणि तंबोरा दिला. पुढचं भाकीत मालकांना उमजलं होतं !
मालकांनी लताचं गाणं ऐकलं पण वैभव पाहायला दैव नाही लाभलं. मालकांचं राज्यच वेगळं होतं, आता हे राज्यही मोठंच आहे, पण ते सत्तेच होतं......
शब्दांकन : उपेंद्र चिंचोरे
संदर्भ.इंटरनेट
April 25, 2017
जागतिक किर्तीचे व जगातील आघाडीचे वास्तुविशारद व वास्तुशास्त्रसंशोधक शशिकिरण वझे यांच्या कार्यास अमाप प्रसिध्दी मिळाली आहे.
August 29, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti