(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सुप्रसिद्ध बॉलीवुड मधील संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील प्यारेलाल

    प्यारेलाल रामप्रसाद शर्मा उर्फ प्यारेलाल यांना हिंदी चित्रपटाचा संगीतकार व्हायचे नव्हते, तर येहुदी मेन्यूहीनसारखे व्हायोलिनवादक व्हायचे होते. त्यांचा जन्म ३ सप्टेंबर १९४० रोजी झाला. त्यासाठी सतराव्या वर्षी ते व्हिएन्नाला जायला निघाले होते, पण लक्ष्मीकांत कुडाळकर उर्फ लक्ष्मीकांत यांनी त्यांना थांबवले व दोघे ‘लक्ष्मीकांत प्यारेलाल’ या नावाने संगीत देऊ लागले; आणि हिंदी सिने-सृष्टीत सुप्रस्थापित झाले. प्यारेलाल यांच्या वडिलांना, म्हणजे पं. रामप्रसाद शर्माना (बाबाजी) सारे जण ट्रम्पेटवादक म्हणून ओळखत. त्यांच्या काळात पाश्चात्त्य पद्धतीची नोटेशन करू शकणारी अगदी मोजकी माणसे होती, त्यापैकी एक बाबाजी होते. त्यांनी त्यांच्याजवळची नोटेशनलेखनाची विद्या मुक्तहस्ताने सर्वाना दिली.

    प्यारेलाल यांना वयाच्या आठव्या वर्षी केव्हा तरी एके सकाळी आठ वाजता त्यांनी समोर बसवले आणि नोटेशन कसे करायचे ते अर्ध्या तासात शिकवले. त्यानंतर, पुढचे तीन दिवस बारा बारा तास प्यारेलाल यांनी नोटेशन लेखनाचा सराव केला, आणि ते तंत्र बऱ्या पैकी आत्मसात केले. त्यांनंतर वडिलांनी प्यारेलालच्या हातांत व्हायोलिन दिले. व्हायोलिनवादकाला भारतीय किंवा पाश्चात्त्य संगीतात मरण नाही, असे वडील सांगत. त्यांनी प्यारेलालांच्या हाती व्हायोलिन दिले, पण वाजवायला शिकवले ते सहा महिन्यांनी. पाश्चात्त्य पद्धतीने व्हायोलिन वाजवण्यासाठी बसायची एक पद्धत आहे. व्हायोलिन वादक डावा खांदा व डावा पाय काहीसा पुढे काढून ताठ व डौलदार बसतो. व्हायोलिन खांद्यावर जिथे ठेवायचा तो भाग कसा धरायचा, व्हायोलिन कसे पकडायचे, त्याचा बो उजव्या हाताच्या अंगठ्याने आणि तिसर्याी चौथ्या बोटाने कसा धरायचा या सार्यां चे एक शास्त्र आहे. ते शास्त्र येईपर्यंत त्यांनी प्यारेलालना व्हायोलिन वाजवायला शिकवले नाही.

    प्यारेलालजी मितभाषी. आपण बरे की आपले काम बरे असा या दोघांचाही खाक्या. त्यामुळे यशाचे एकाहून एक टप्पे पार करत असतानाही फिल्मी पार्ट्या, पेज थ्री कल्चर यात हे दोघेही रमले नाहीत. त्यांच्याकडे तेवढा वेळच नव्हता. आलेलं कुठलंही काम - मग भलेही तो चित्रपट बी किंवा सी ग्रेडचा असो, सामाजिक असो की मायथालॉजीकल - नाकारायचा नाही हे त्यांनी ठरवूनच टाकलं होतं. एका मुलाखतीत लक्ष्मीकांतजी म्हणाले होते की आम्ही दोघंही फारसे शिकलेलो नाही. संगीत देणं हे एवढं एकच काम आम्हाला जमतं. तेच फक्त आम्ही करतो. मग त्याबद्दल लोक काय म्हणतात याची पर्वा करायला आम्हाला वेळच नाही. आलेलं काम नाकारायचं नाही हे धोरण जरी असलं तरी या दोघांनी नेहमी अव्वल गायकांनाच वापरलं. त्यातही रफी, लता आणि किशोरवर त्यांचे जास्त प्रेम. चित्रपटसंगीताचा सुवर्णकाळ संपल्यानंतर रफी आणि लता यांनी सर्वाधिक लोकप्रिय गाणी एल्.पीं.च्याच संगीतात दिली. चित्रपटाचं बजेट कमी असणं हे तर त्यांनी त्यांच्या पहील्या चित्रपटापासूनच अनुभवलं होतं. १९६३ च्या पारसमणी च्या ८ वर्षे आधी त्यांनी एका चित्रपटाला संगीत दिलं होतं. पण तो चित्रपट डब्यात गेला.

    १९४८ च्या "जिद्दी" पासून १९६३ पर्यंत या दोघांनी त्याकाळातल्या फक्त ओ.पी. नय्यर आणि शंकर-जयकिशन वगळता सर्व संगीतकारांकडे कधी नुसते वादक तर कधी संयोजक म्हणून काम केले. पारसमणी नंतरही काही काळ त्यांनी कल्याणजी आनंदजी यांच्या कडे संयोजकाचे काम केले. पारसमणी हा तसा बी ग्रेड पोषाखी चित्रपट. त्या काळात त्याचे बजेट होते अवघे २५ लाखाचे. अशाही परिस्थीतीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी फुल ऑर्केस्ट्रा वापरून आणि लता, रफी, आशा आणि मुकेश या कलाकारांना वापरून त्याचे संगीत दिले. ‘पारसमणी’ चित्रपटात हसता हुआ यह नुरानी चेहरा, वो जब याद आये अशी हिट गाणी देत त्यांनी लक्ष वेधले. हे शक्य झाले केवळ लक्ष्मीकांत यांच्या माणसं जोडण्याच्या कलेमुळे. या दोघांनाही भव्य-दिव्यतेची आवड ही शंकर-जयकिशन यांच्या संगीतामुळे निर्माण झाली. ‘प्यारेलाल शर्मा आणि लक्ष्मीकांत कुदळकर हे दोघेही गाण्यांना चाली लावयचे आणि वाद्यसंगीताचे संयोजनही करायचे. प्यारेलालने चाल दिलेलं गाणे कोणते आणि लक्ष्मीकांतने चाल दिलेले गाणे कोणते, हे सांगता येणार नाही, इतके ते एकजीव व्हायचे त्या दोघांचे विचारच काय पण रक्तगटही एकच होते. एकदा आंघोळ करताना प्यारेलाल यांना एक चाल सुचली.

    लक्ष्मीकांतांनीही तीवर काम केले होतं. दोघांची चाल एकसारखी निघाली. संगीतकार सी. रामचंद्र यांनाही या होतकरू लक्ष्मीकांत-प्यारेलाल बद्दल विशेष आस्था होती. "दोस्ती" चित्रपटासाठी एल.पी. ना त्यांचे पहिले-वहीले फिल्मफेअर अवॉर्ड जाहीर झाले ही बातमी द्यायला स्वतः सी. रामचंद्र त्यांच्या घरी गेले होते. आपल्या ड्रेसींग सेन्स साठी प्रसिद्ध असलेल्या चितळकरांनी या समारंभाला हजर राहण्यासाठी त्यांच्या आवडत्या टेलरकडून या दोघांसाठी सुट शिववून घेतला होता. १९६३ ते १९९८ या कालावधीत तब्बल ६३५ हिंदी चित्रपटांना संगीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीने दिले. सर्वाधिक यशस्वी संगीतकार म्हणून याच जोडीचे नाव चित्रपटसंगीताच्या इतिहासात नोंदलं गेलं आहे. त्या काळात लोकप्रियतेचा आणि गुणवत्तेचा निकष मानली जाणारी ‘बिनाका गीतमाला’ लोकप्रिय होती. पारसमणी या पहिल्याच चित्रपटातले ‘हसता हुवा नूरानी चेहरा’ हे गाणे ‘बिनाका’ मध्ये वाजलेले पहिले गाणे ठरले. त्यानंतर सलग १६ गाणी या मालिकेत गाजली. बिनाकाच्या वार्षिक उत्सवात तर ५० पैकी ३२ गाणी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांची होती. एकूण १७४ गाणी बिनाकामध्ये आली, हा एक विक्रम आहे. ‘पारसमणी’ (१९६३) या चित्रपटापासूनच्या त्यांची सुरु झालेली ‘संगीत वाटचाल या यशस्वी जोडीतील लक्ष्मीकांत यांचे २१ जून १९९८ रोजी निधन झाल्यानंतर प्यारेलाल यांनी आपला ‘संगीत प्रवास’ कमी केला., परंतु या जोडीचा ‘संगीत प्रभाव’ मात्र कायम आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीत दिलेली गाणी
    https://www.youtube.com/watch?v=q667JQMNqME
    https://www.youtube.com/watch?v=ykiEKsr_kNc

      September 3, 2017


  • रामदास बंडू आठवले

    रामदास बंडू आठवले

    रामदास बंडू आठवले हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ह्या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. तसेच केंद्रीय मंत्रीमंडळात मंत्री आहेत.

      April 15, 2010


  • महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

    महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुखही आहेत. त्यांचा जन्म २७ जुलै १९६० रोजी मुंबई येथे झाला. गेल्या अनेक दशकांपासून मराठी माणूस, शेतकरी, कष्टकरी जनतेच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या ठाकरे यांना त्यांचे वडील शिवसेनेचे संस्थापक स्व.बाळासाहेब ठाकरे, आई स्व.मीनाताई आणि आजोबा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा समृद्ध वारसा लाभला आहे.

    शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पायाभरणी केलेल्या आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाची धुरा उध्दव यांनी मुख्य संपादक म्हणून सांभाळली.

    उद्धव ठाकरे जे.जे.स्कूल ऑफ आर्टचे स्नातक असून त्यांच्या छायाचित्रांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. एक सिद्धहस्त लेखक आणि व्यावसायिक छायाचित्रकार असलेल्या ठाकरे यांच्या कलाकृतींची दखल अनेक नामवंत मासिकांनी वेळोवेळी घेतली आहे. तसेच त्यांच्यातील जागतिक दर्जाच्या छायाचित्रकाराचे दर्शन विविध प्रदर्शनांच्या माध्यमातून रसिकांना घडले आहे.

    उद्धव ठाकरे यांच्या राजकीय जीवनाची सुरूवात विद्यार्थी दशेपासून झाली. शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय जीवनात सक्रीय असलेल्या ठाकरे यांच्याकडे २००२ च्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आली आणि महापालिकेवर शिवसेनेची सत्ता स्थापन करीत त्यांनी ती यशस्वीरीत्या पूर्ण केली. या निवडणुकीने त्यांच्यातील राजकीय नेतृत्वगुण संपूर्ण राज्याने अनुभवले.

    २००३ मध्ये पक्षाने त्यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आणि २००४ मध्ये त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले.
    उद्धव ठाकरे यांचा विवाह रश्मी पाटणकर यांच्याशी झाला असून त्यांना आदित्य आणि तेजस अशी दोन मुले आहेत.

    आदित्य ठाकरे आजोबा आणि वडिलांचा राजकारणाचा वसा पुढे चालवित आहेत. ते सध्या युवा सेनाप्रमुख असून २०१९ च्या निवडणुकीत ते वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.

    महाराष्ट्राच्या भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अशा अलौकिक सौंदर्याचे मूर्तीमंत आणि विहंगम छायाचित्रण त्यांच्या ‘महाराष्ट्र देशा’ या २०१० ला प्रकाशित झालेल्या पुस्तकातून दिसून येते. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिकतेचा मानबिंदू असलेल्या ‘पंढरपूर वारी’चे आणि ग्रामीण महाराष्ट्राचे यथार्थ छायाचित्रण त्यांच्या ‘पहावा विठ्ठल’ या २०११ मधील पुस्तकाच्या माध्यमातून देशालाच नव्हे तर जगाला भूरळ घातली. आपल्या छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून दुष्काळी भागातील शेतकरी आणि वन्यजीव संरक्षणासाठी निधी उभारून त्यांनी मदत केली.

    शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शिवसेनेला अधिक सर्वसमावेशक करतानाच आधुनिकतेशी त्यांनी शिवसेनेला जोडले. युवक, कामगार आणि शेतकरी यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी राज्यभर चालविलेल्या विविध आंदोलनांना यश आले. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या धोरणाने कार्य करणार्याा शिवसेनेच्या समाजकारणाची दखल गिनीज बुकने घेतली आहे.

    ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मुंबईमधील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने अनेक रूग्णालयांचे निर्माण केले. विविध रक्तदान महाशिबिरांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण समाजकार्याची पायाभरणी केली. महाराष्ट्रात पक्षविस्तार केल्याने लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला यश संपादन केले आहे. आता तर शिवसेनेचे सरकार स्थापन झाले आहे, तसेच शिवसेनेने राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाला भरघोस यश मिळविले आहे.

    उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कल्याणावर लक्ष केंद्रीत करीत आपल्या पक्षाचा विस्तार वाढविला आणि आता राज्यानेही त्यांचे नेतृत्व स्वीकारले. संवेदनशील लेखक आणि छायाचित्रकार असलेल्या उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या राजकारणामध्ये महत्त्वाचे बदल घडवून आणले आणि पक्षाला आजचे सुसंघटित रुप दिले.

    उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस च्या सहकार्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन नवीन अध्यायाला सुरुवात केली आहे. महाराष्ट्राला विविध आघाड्यांवर पुढे घेऊन जाणारे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्या रूपाने लाभले आहे.

    संजीव वेलणकर, पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      July 27, 2021


  • दादा जेपी वासवानी

    साधू वासवानी मिशनचे संस्थापक, सिंधी समाजाचे आध्यात्मिक गुरू हा लौकिक परिचय असलेले दादा जे. पी. वासवानी यांनी शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात अनमोल योगदान दिले. त्यांचा जन्म २ ऑगस्ट १९१८ रोजी पाकिस्तानमधील सिंध प्रातांतील हैदराबाद येथे झाला. जे. पी. ऊर्फ जशन पहलाजराय वासवानी असे त्यांचे मूळ नाव. आध्यात्मिक गुरू साधू वासवानी यांचे ते पुतणे होते.

    साधू वासवानी यांच्यासमवेत १२ नोव्हेंबर १९४८ रोजी दादा भारतामध्ये आले. ‘इंडियन डायजेस्ट’ आणि ‘ईस्ट अँड वेस्ट सिरीज’ या मासिकांचे संपादन करणाऱ्या दादांनी १९६२ ते १९७६ या कालावधीत सेंट मीरा कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम पाहिले. २५ नोव्हेंबर १९८६ या साधू वासवानी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ‘शाकाहार दिन’ ही चळवळ दादांनी सुरू केली. दादा जे. पी. वासवानी यांनी शाकाहारासाठी देश-विदेशात प्रचार केला. जे. पी. वासवानी हे अविवाहित होते. त्यांचे भौतिकशास्त्रात त्यांनी एमएस्सीपर्यंतचे शिक्षण झाले होते. त्यानंतर एल.एल.बी.चीही पदवी संपादन केली होती.

    दादा जे. पी. वासवानी यांच्या आयुष्याचा सारांश 'प्रेम' या शब्दात होते. लहानपणाासून त्यांच्यात सेवा आणि दयेचा अंकुर विकसित झाला होता. अत्यंत बुद्धिमान अशी त्यांची ख्याती होती. केवळ सतराव्या वर्षी त्यांनी एमएस्सीची पदवी प्रथम क्रमांकाने संपादित केली होती. भौतिकशास्त्रातील प्रबंधांची त्यावेळचे नोबेल विजेते सर व्ही. व्ही. रामन यांनी प्रशंसा केली होती. वासवानी यांचे इंग्रजी; तसेच सिंधी या भाषांवर प्रभुत्व होते. ते सतत वाचन व मननात मग्न असत. जगातील प्रख्यात लेखकांच्या पुस्तकांतील परिच्छेद ते आपल्या भाषणांतून नेहमी सांगत असत. दादांची राहणी साधी होती.

    अंगात पांढरा शर्ट, पायजमा, पांढरी शाल आणि पायात साधी चप्पल. हसरा चेहरा आणि चमकदार डोळे, मोठे कान ही दादांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती. दिलखुलास हास्य आणि अंगभूत समयसूचकतेने ते इतरांची मने जिंकून घेत. हसताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जणू ओसंडून वाहात असे.

    दादा जे. पी. वासवानी यांनी साधू वासवानी मिशनतर्फे अनेक सामाजिक कार्यांना प्रारंभ केला. त्यांनी स्त्री शिक्षणाला प्राधान्य दिले होते. सेंट मीरा स्कूल व कॉलेज सुरू केले. त्यांनी इंग्रजी, सिंधी भाषेत सुमारे १९० पुस्तके लिहिली. देशभरात १८ शाळा काढल्या, तर पुण्यात इनलॅक्स बुधरानी हे हॉस्पिटल; तसेच शांती क्लिनिकदेखील सुरू केले.

    विदेशी भाषेत त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद झाले आहेत. जगातील अनेक नामांकित नेत्यांसह धर्मगुरू त्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधत असत. त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. दादा जे. पी. वासवानी यांचे १२ जुलै २०१८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      August 2, 2021


  • सुलभा तेरणीकर यांचा सकाळ मधील अमीन सयानी

    आपल्या सरल, सुस्पष्ट, सुमधुर निवेदन शैलीतून, सलग 41 वर्षे चालणाऱ्या गीतमालेतून भारतातल्याच नव्हे, तर जगभरातील संगीतप्रेमी श्रोत्यांना एका सुरेल सूत्रात बांधून ठेवणारे सदाबहार आवाजाचे रेडिओसाथी अमीन सयानी 21 डिसेंबर या दिवशी वयाची ऐंशी वर्षे पूर्ण करीत आहेत. आजही कार्यमग्न असणाऱ्या अमीन सयानींच्या कार्याची, जीवनाची झलक, श्रोत्यांच्या शुभेच्छांसह...

    "भाईयों और बहनों‘ अशी अकृत्रिम स्वरात साद घालत, "अगले बुध की शाम फिर मिलेंगे‘ असा वादा करत "अगले पायदान‘पर असणारं गाणं कोणतं असा सवाल करत अमीन सयानी आपल्याला भेटत राहिले. आणि आपण चित्रपट संगीताच्या सोनेरी कालखंडात मुक्तपणे विहार करीत राहिलो. दूरदर्शन तर दूरच, पण त्याचा अभाव जाणवू न देणारं श्रवण आणि संवाद इतका उत्कट होता की ध्वनिलहरींनी मनाचं अवकाशही भरून राहिलं. संवादक, निवेदक, सूत्रधार अमीन सयानी आपल्या बालपणीचे जणू सवंगडी, दर बुधवारी भेटणारे मित्र आता ऐंशी वर्षांचे होत आहेत यावर विश्वा्स ठेवणं कठीण गेलं. आवडती "बिनाका गीतमाला‘ 3 डिसेंबर 1952 रोजी सुरू होऊन आज साठीची झाली हेही खरं वाटेना.

    गीतमालेची जन्मकथा सांगताना ते म्हणतात, ""साल 1952. एका तरुण ब्रॉडकास्टरला सांगण्यात आलं होतं की, एक प्रायोगिक तत्त्वावर गीतमालेचा कार्यक्रम लिहावा, सादर करावा, श्रोत्यांना उत्तरंही द्यावी, त्याचं मानधन रुपये पंचवीस प्रत्येक आठवड्याचे मिळतील.‘‘ तो तरुण ब्रॉडकास्टर मीच होतो... कार्यक्रम तयार केला. बुधवार 3 डिसेंबर 1952 रोजी रेडिओ सिलोनवरून रात्री 8 ते 8.30 या वेळात प्रसारित झाला आणि थेट श्रोत्यांच्या हृदयात पोचला. पहिल्याच आठवड्यात श्रोत्यांची 9000 पत्रं आली, नंतर 15000 आणि आकडा वाढतच गेला...‘ रेडिओ सिलोनचा ट्रान्समीटर अत्यंत प्रभावशाली असल्याने त्याचं प्रसारण दक्षिण-पूर्व आशिया, पूर्व आफ्रिका येथे सर्वदूर स्पष्ट ऐकू येई. कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी वाढली की, 3 डिसेंबर 1952 रोजी सुरू झालेल्या या कार्यक्रमाची सांगता एप्रिल 1994 रोजी झाली. 41 वर्ष गीतमाला चालली. हा एक विश्वाविक्रमच होता.

    रेडिओ सिलोनच्या प्रभावी ट्रान्समीटर इतकाच प्रभावी, आकर्षक निवेदन शैलीचा, विशीचा युवा निवेदक एक इतिहास घडवीत होता. चित्रपट संगीताचं सुवर्णयुग तर उगवलं होतंच. नवे चित्रपट, तारे, तारकाही अवतरत होते. अमीन सयानी एका प्रभावी, परिणामकारक संवादशैलीतून अवघ्या भारतातल्या तरुणाईला बोलावीत होते, त्यांच्याशी साध्या, सरल हिंदीतून बात करीत होते. कोणताही भारतीय एकात्मता साधण्याचा तो राष्ट्रीय सरकारी कार्यक्रम नव्हता की हिंदी भाषेची प्रसारसभा नव्हती. आपलं उत्पादन विकणाऱ्या कंपनीसाठी तो एक व्यावसायिक कार्यक्रम होता, पण त्यात अमीन सयानींनी असे प्राण ओतले की एक पिढी हिंदी बोलू लागली, नव्हे हिंदी फार सोपी भाषा आहे. हे त्यातून भारतात कुठेही संचार शक्यल आहे, हे समजलं. या सोप्या भाषेचं श्रेय ते आपले वडील बंधू-गुरू व निवेदक हमीद सयानींना आणि म. गांधींच्या अनुयायी असलेल्या आपल्या मातोश्री कुलसुम सयानी यांना देतात.

    आई-वडिलांची दोन्ही घराण्यांची पार्श्विभूमी डॉक्टधर, समाज सेवकांची. 21 डिसेंबर 1932 रोजी कच्छी खोजा मुस्लिम घरात जन्मलेल्या अमीन सयानींचे वडील डॉक्टभर, आईचे वडील डॉ. रजबअली पटेल, महात्मा गांधींचे निकटवर्ती, मौलाना अबुल कलाम आझादांचे मित्र. दोन्ही कुटुंबं पुरोगामी विचारांची, शिक्षणाला महत्त्व देणारी. महात्माजींच्या आदेशानुसार कुलसुम सयानींनी प्रौढ शिक्षणाचं कार्य हाती घेतलेलं. 40 वर्षांपासून त्या "रहबर‘ (पथदर्शक) हे पाक्षिक चालवीत. हिंदी, ऊर्दू आणि गुजराती भाषा व लिपीतून. वयाच्या तेराव्या वर्षांपासून आईला मदत करणाऱ्या अमीन सयानींना उर्दू, गुजराती, हिंदीचा चांगला परिचय घडला.

    भारतातल्या साध्या माणसासाठी संभाषणाची भाषा, कशी असावी ते नकळत उमगलं. न्यू एरा हायस्कूलमध्ये गुजराती माध्यमातून, तर ग्वाल्हेरच्या सिंदिया हायस्कूलमध्ये इंग्रजीतून शिक्षण झालं. सेन्ट झेव्हियर्समध्ये छोटी नाटकं, एकांकिका लिहून करण्याचा छंद जडला. घरातलं वातावरण स्वातंत्रसैनिक, विचारवंत यांचा राबता असल्याने अतिशय मोकळं, सेक्युदलर. संस्कृत, अरेबिकची खास शिकवणी होती. आजूबाजूला मराठी गोतावळा. विजया मेहता, दामू केंकरे यांची प्रायोगिक नाटकं पाहायला जायचा उत्साह असे.

    संभाषणाच्या ओघात अमीन सयानी बिनचूकपणे गणपतीची आरती, संस्कृत सुभाषितंही आठवतात. वयाच्या सातव्या वर्षीच रेडिओच्या इंग्रजी कार्यक्रमात भाग घेणाऱ्या छोट्या भावाला-अमीनला मोठ्या हमीदनं कानमंत्र दिला. "समोर असणाऱ्या व्यक्तीशी बोलशील तसा मायक्रोफोनमधून बोलत जा.‘

    सही म्हणजे बिनचूक, सत्य म्हणजे खरं, फसवाफसवी नको, स्पष्ट- संदिग्ध नको, सरल- समजेल असं, सभ्य- अश्लीजलता, उद्धटपणा, उथळपणा नको, सुंदर म्हणजे आकर्षक अशी सहासूत्रं अमीन सयानींनी पाळली आणि त्याला सहृदयतेची, प्रेमाची जोड दिली. निवेदन एका उंचीवर नेऊन ठेवलं.

    बालगोविंद श्रीवास्तव यांनी रेडिओ सिलोनच्या "फुलवारी‘ या नवोदितांच्या कार्यक्रमासाठी निवेदन करायला बोलावलं. तेव्हा कॉलेज झाल्यानंतर एलएलबी करून वकील होण्याचं घरच्यांचं स्वप्न तसंच राहिलं खरं, पण एक उमदा, हरहुन्नरी निवेदक रेडिओत दाखल झाला आणि त्यानं इतिहास घडवला.

    52 व्या वर्षीच्या 3 डिसेंबरपासून सुरू झालेल्या गीतमालेनं संगीतप्रेमी सिनेप्रेमी रसिकांच्या भावजीवनात एक रोमहर्षक पर्व सुरू केलं. त्यात खूप बदल झाले. 54 व्या वर्षापासून अर्ध्या तासाचा कार्यक्रम एक तासाचा करण्यात आला. खास लोकाग्रहास्तव! गीता दत्तनी "आसमान‘ या चित्रपटात गायलेल्या गाण्याची धून बिनाकाची सिग्नेचर ट्यून होती. ओ.पी. नय्यरच्या या संगीताची धून लोकांच्या हृदयात जाऊन बसलेली होती. ती 70 व्या वर्षांपर्यंत वाजत असे.

    प्रचंड लोकप्रियता लक्षात घेऊन गाण्याचा पसंतीक्रम अमीन सयानींनी लोकांवर, रसिकांवर सोपवला. देशभरात नियमित गाणी ऐकणारे श्रोतासंघ तयार झाले ते अमीन सयानींमुळे. श्रोते आणि चित्रपट निर्माते आणि रेकॉर्ड विक्रेते याच्या संयुक्त पसंतीनं निर्णय झाल्यामुळे संपूर्ण लोकशाही तत्त्वाचा आधार असलेला गीतमाला हा कार्यक्रम चांगलाच बहरला.

    गीतमालाचे अभ्यासक जयपूरचे अनिल भार्गव म्हणतात. ""41 वर्षांच्या प्रसारणात एकूण 2081 कार्यक्रमांत केवळ 80-85 कार्यक्रम काही कारणास्तव घडू शकले नाहीत. खुद्द अमीन सयानी काही अपरिहार्य कारणास्तव केवळ फक्त 30 वेळा हजर राहू शकले नाहीत.‘‘

    थोडं मागे वळून पाहिलं तर ज्या वेळी अमीन सयानींचा चिरपरिचित स्वर ऐकू आला नाही त्या वेळी श्रोत्यांच्या मनातही काही चुकल्यासारखे झाले होते, हे आठवते.
    अमीन सयानींचे अनेक रेडिओ प्रोग्रॅम्स गाजले.

    "सॅरिडॉन के साथी‘, "एस. कुमार्स का फिल्मी मुकद्दमा‘, "मराठा दरबार की महकती बातें "जोहर के जबाब‘ इत्यादी; पण खुद्द अमीन सयानी म्हणतात, ""मी कॉलेजात मुलींशी बोलत असे, मिसळत असे; पण तेवढंच. माझी खरी "स्वीटहार्ट म्हणजे गीतमाला. मी हा कार्यक्रम समरसून करीत असे. यावर माझं नितांत प्रेम आहे.‘‘

    अमीन सयानी त्यांना कामात मदत करणाऱ्या "इव्हज वीकली‘ची टॉप मॉडेल असलेल्या देखण्या काश्मियरी रमा मट्टूच्या खरोखरीच प्रेमात पडले. 58 व्या वर्षी विवाहबद्ध झालेल्या अमीन सयानींचं रमाबरोबरचं सहजीवन सुरेल, समाधानी ठरलं.

    2002 साली रमाच्या निधनानंतर एकाकी झालेल्या अमीन सयानींचे काम अखंडपणे सुरू आहेच. त्याचा मुलगा राजील त्यांना कामात मदत करतो.

    "फिल्म फेस्टिव्हल‘, "सौंदर्य स्पर्धा‘, "फॅशन शो‘ किंवा महत्त्वाचे प्रतिष्ठित कार्यक्रम अमीन सयानींनी शैलीदारपणे सादर केलेत. पसंतीच्या टॉप गाण्यात आपल्या गाण्यांचा समावेश नाही म्हणून नाराज झालेल्या काहींनी त्यांच्यावर आरोप केले; पण पारदर्शकता आणि निर्दोष कार्यप्रणालीमुळे अमीन सयानी आजही टिकून आहेत. "बिनाका‘ "सिबाका‘ अशी नावं बदलली, बुधवार बदलला, निवेदकही बदलले; पण गीतमाला आणि अमीन सयानी मात्र अजूनही लोकप्रियता टिकून आहेत.

    चित्रपटाचं आणि चित्रपट संगीताचं सुवर्णयुग ही त्यांची "मर्मबंधातली ठेव‘. अभिनेते, अभिनेत्री, गीतकार, संगीतकार यांच्या दिलखुलास मुलाखतींचं ध्वनिमुद्रण हा त्यांचा लाडका विषय. नर्मविनोदाची पखरण, स्पष्टता, खेळकरपणा यांचा सुंदर मिलाफ असलेल्या त्यांच्या मुलाखती केवळ श्रवणीय, बालकलाकार, रेडिओ, टीव्हीची सम्राज्ञी असलेल्या तबस्सूमची ओळख "मेरी छोटी और मोटी बहन‘ अशी कौतुकानं करून देतील. अशोककुमारना त्यांच्या पहिल्यावहिल्या "शॉट‘बदल विचारतील. लतीदीदींना त्यांच्या आशाताईंशी असलेल्या व्यावसायिक स्पर्धेबद्दल प्रश्नि विचारतील तर किशोरकुमारची फिरकी घेतील; पण संयमाचं सूत्र कधीच सुटत नाही.

    रेडिओ सिलोनचं "श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन‘ झालं. एकेकाळचा "पॉवरफुल‘ ट्रान्समीटर क्षीण, दुर्बल झाला. पण त्यांच्या सुस्पष्ट आवाजात ऐकू येणारा पत्ता "सेसिल कोर्ट, लॅन्सडाऊन रोड, मुंबई‘ मात्र तोच आहे. पहिल्यापासून असणारा रेकॉर्डिस्ट जॉन नियमित येतो. अमीन सयानी नेहमीप्रमाणे येतात. गीतमालेचा विषय निघाला की खुलतात.

    भाषा बिघडली, परस्परांतला भाईचारा, गोडवा हरवला म्हणून व्यथित होतात. रवींद्रनाथ टागोरांच्या कवितेची आठवण त्यांना होते-where the mind is without fear... त्यावर "मन जहॉं न डरे, सर जहॉं न झुके ऐसा हो देश हमारा‘ अशा ओळी सुचतात.

    त्यांचं आवडतं गीत ही आठवतं "मन रे, तू काहे ना धीर धरे‘ पलीकडेच गेटवे ऑफ इंडिया, ताजमहाल हॉटेलचा परिसर गजबजलेला असतो, समुद्राची गाज येते.

    अमीन सयानी मात्र कामात बुडून जातात. गीतमालाची सावली गडदही असते अन्‌ फार सुमधुरही.

    -- सुलभा तेरणीकर

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      December 21, 2017


  • अभिनेते कुलदीप पवार

    त्यावेळी त्यांची दाढी वाढल्यामुळे ते भारदस्त दिसत होते आणि अशातच त्यांची एक माणसाशी ओळख झाली ते गृहस्थ पवारांना ‘ नाट्यसंपदेच्या ‘ कार्यालयात घेऊन गेले. आणि तेथे ‘ नाट्यसंपदे ‘ ला ‘ इथे ओशाळला मृत्यू ‘ या नाटकासाठी हवा होता तसा संभाजी कुलदीप पवार यांच्या रूपाने सापडला.

      September 9, 2021


  • बॉलिवूड चित्रपट निर्माते प्रकाश झा

    बॉलिवूडमध्ये दिग्गज तारकांना घेऊन चित्रपट बनविणाऱ्या दिग्दर्शकांची कमी नाही. दिग्दर्शक प्रकाश झा यांनी शबाना आजमी आणि दीप्ती नवल पासून या काळातील काजोल, माधुरी दीक्षित, करिना कपूर, बिपाशा बसू, दीपिका पदुकोण, कॅटरिना कैफ आणि प्रियंका चोपडा अश सर्व स्टार नायिकांसोबत चित्रपट बनविले आहेत.

    दिग्दर्शक म्हणून प्रकाश झा यांचा पहिला चित्रपट ‘दामुल’ होता. यात दीप्ती नवलने मुख्य भूमिका साकारली होती. शबाना आजमी यांनी त्यांच्या ‘मृत्युदंड’ मध्ये काम केले होते. या चित्रपटात माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाला माधुरीच्या सर्वश्रेष्ठ चित्रपटाच्या यादीत ठेवले जाते.

    कमर्शियल चित्रपटाच्या दिग्गज नायिकांसोबत काम करणारे प्रकाश झा यांनी आपल्या चित्रपटांपासून आर्ट फिल्म मेकरची प्रतिमा तोडण्यात यश मिळविले. ‘दामुल’मुळे त्यांची तशी ओळख बनली होती. या प्रतिमेला तोडण्यात प्रकाश झा यांना अजय देवगण सोबतच्या ‘दिल क्या करे’ने मोठे योगदान दिले. चित्रपट बॉक्स ऑफीस वर जास्त चालला नव्हता, मात्र प्रकाश झा यांचे नाते या चित्रपटामुळे कमर्शियल चित्रपटासोबत जोडले गेले. अजय देवगण सोबत त्यांनी या चित्रपटानंतर ‘गंगाजल’ आणि ‘अपहरण’मध्येही काम केले. अपहरणमध्ये बिपाशा बसू होती. जिने बिहारी मुलीचा रोल केला होता. बिपाशा नंतर ‘राजनीति’ मध्ये प्रकाश झा ने कॅटरिना कैफ, ‘आरक्षण’ मध्ये दीपिका पदुकोण आणि ‘सत्याग्रह’मध्ये करिना कपूर सोबत काम केले.

    प्रकाश झा यांचे गेल्या काही वर्षांतले चित्रपट म्हणजे भारतीय समाजाचे जळजळीत, धगधगीत वास्तवाचे चित्रण करणारे चित्रपट आहेत. अनेक चित्रपटात एकसंध पटकथा, कथानकातील नाटय़ टिकवून प्रेक्षकाला खिळवून ठेवण्यात ते यशस्वी झाले आहेत.

    प्रकाश झा यांचे चित्रपट समकालीन प्रश्नांवर असतात. "दामुल', "गंगाजल', "अपहरण', "राजनीती' या चित्रपटांनी झा यांचे हिंदी चित्रपट क्षेत्रातील स्थान पक्के केलेले आहे. अमिताभ बच्चन यांच्यापासून अजय देवगण, अर्जुन रामपाल यांच्यासारख्या कलाकारांकडून आपल्याला हवा तो विषय काढून घेण्याची ताकद असलेल्या प्रकाश झा यांच्यासारख्या मुरब्बी दिग्दर्शकाला अभिनय करणे अवघड नाही. प्रकाश झा यांनी आपल्याच ‘आरक्षण’ या चित्रपटातही छोटीशी भूमिका केली होती.

    प्रकाश झा यांचा आणि अलंक्रिता श्रीवास्तव यांनी दिग्दर्शित केलेला "लिपस्टिक अंडर माय बुरखा' हा हिंदी चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे परवानगीसाठी पाठविण्यात आला होता. मात्र, चित्रपटात काही अश्लिल संवाद आणि दृश्ये असून तो समाजातील काही विशिष्ट घटकांसाठी संवेदनशील असल्याचे म्हणत कालच बोर्डाने चित्रपटाला परवानगी नाकारली आहे.

    प्रकाश झा यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९५२ रोजी झाला. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा...

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      February 27, 2017


  • प्रा. राजाराम भोसले

    देशातील पहिला रेडिओ टेलिस्कोपचा प्रयोग यशस्वी करणारे प्रा. राजाराम भोसले यांनी आता कोल्हापुरात वेधशाळा आणि तारांगण उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. सूर्यापासून येणार्‍या रेडिओलहरी, त्यांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, सूर्य व पृथ्वी यांच्यातील अंतराचे मोजमाप अशा विविध विषयांवर त्यांनी देशातच नव्हे तर अमेरिका, कॅनडा तसेच “नासा” च्या प्रकल्पांत संशोधन केले आहे.

    आकाशाशी जडले नाते

      July 24, 2015


  • माई मंगेशकर

    माई मंगेशकर या मूळच्या धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील थाळनेर गावच्या होत. लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची अपत्ये होय.

      June 16, 2022


  • सुमन कल्याणपूर

    मूळच्या बंगालच्या असणार्‍या सुमन कल्याणपूर यांचा जन्म, आजच्या बांगलादेशाची राजधानी ढाक्का येथे २८ जानेवारी १९३७ साली झाला. सुमन हेमाडी हे त्यांचे माहेरचे नाव. रामानंद कल्याणपूर यांच्याशी विवाहबध्द झाल्यावर त्या मुंबईत आल्या. दहा वर्ष वेगवेग़ळ्या गुरूंकडून संगीत शिकत असतांनाच अनेक कार्यक्रमांतून गायनाची संधीही सुमन कल्याणपुर यांना मिळत गेली.

      May 15, 2014