(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कोरगावकर भा. ल.

    काही काही माणसांकडे दुसर्‍यांना थकवणारी अफाट ऊर्जा असते. असेच वरदान भा ल कोरगावकर यांनाही लाभले आहे. म्हणूनच तर आता वयाची पंचाहत्तरी गाठत असतानाही त्यांच्या डोक्यातल्या कल्पना आणि पायाला लागलेल्या भिंगर्‍या अखंड गरगरत असतात.

      April 19, 2011


  • प्रभाकर जोग

    प्रभाकर जोग त्यांचा जन्म २५ डिसेंबर १९३२ रोजी झाला. प्रभाकर जोग यांचे वडील साखर कारखान्यांच्या तंत्रज्ञानातील जाणकार होते. आई-वडिलांपकी कोणी कलेच्या प्रांतात नव्हते, मात्र वडिलांना संगीत नाटकांची पहिल्यापासून आवड होती. पुण्याजवळच्या मांजरा फार्म येथे उमेदवारी करीत अस्ताना बालगंधर्वाचें नाटक पुण्यात आले की वडील सायकलवरून बारा किलोमीटरची रपेट करून पुण्यात येत असत, रात्रभर नाटक पाहून, परतीची सायकलवारी करून पुन्हा दुसऱ्या दिवशी कामावर हजर रहात. संगीतकलेची ही आवड प्रभाकर जोगांमध्ये उतरली. त्यांनी गजाननराव जोशी आणि नाराणराव मारुलीकर यांच्याकडून वयाच्या ५ व्या वर्षापासून गायन शिकायला सुरुवात केली. प्रभाकर जोगांची मोठ्या आकारमानाच्या व्हायोलिनशी चाललेली झटापट पाहून त्यांच्या आजीने त्याना अडीचशे रुपयांचे एक छोटे व्हायोलिन आणून दिले. प्रभाकर जोग या वाद्यावर हळूहळू प्रभुत्व मिळवत गेले. मा.प्रभाकर जोग यांचे भाऊ मा.वामनराव जोग हे आकाशवाणीवर व्हायोलिनवादक म्हणून नोकरी करत आणि घरी व्हायोलिनचे वर्ग घेत..प्रभाकर जोग आसपास रेंगाळून संगीताचा आस्वाद घेतच मोठे झाले. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी त्यांनी व्हायोलिनचे कार्यक्रम करायला सुरुवात केली. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात पुण्यातील वाड्यांमधून त्यांनी सव्वा रुपया आणि नारळ या बिदागीवर व्हायोलिन वादनाचे कार्यक्रम केले. एस.पी. कोलेजच्या मैदानात भरलेल्या स्नेहसंमेलनात व्हायोलिन वाजवत असताना मदानापलीकडे राहणार्याय सुधीर फडके यांनी ते ऐकले आणि प्रभाकर जोगांना भेटायला बोलावले. पुढे ते संगीत दिग्दर्शक सुधीर फडके यांचे सहाय्यक झाले. गीतरामायणाच्या सुमारे ५०० कार्यक्रमांना प्रभाकर जोग यांची साथ होती. स्नेहल भाटकर यांच्याकडे जोग यांनी ’गुरुदेवदत्त’ या १९५१ च्या चित्रपटात व्हायोलिन वादन केले. स्वरलिपी लेखनकलेत पारंगत असलेले प्रभाकर जोग त्यानंतर संगीतकार श्रीनिवास खळे, दशरथ पुजारी, हृदयनाथ मंगेशकर, यशवंत देव, वसंत पवार, वसंत प्रभू, राम कदम आणि यशवंत देव यांच्याबरोबर काम करू लागले. १९५२ साली प्रभाकर जोग हिंदी चित्रपसृष्टीत साँग व्हायोलिनिस्ट् म्हणून दाखल झाले. रोशन, मदनमोहन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, राहुलदेव बर्मन या संगीतदिग्दर्शकांकडून त्यांना बोलावणी येऊ लागली. प्रभाकर जोग यांनी मराठी चित्रपट, गामोफोन कंपन्या, आकाशवाणी आणि दूरदर्शन यांच्यासाठी संगीताच्या सुरावटी रचल्या आहेत. प्रभाकर जोगांच्या व्हायोलिन वादनातून जणू शब्द ऐकू येतात, त्यामुळे त्यांचे व्हायोलिन ’गाणारे व्हायोलिन’ म्हणून ओळखले जाते. प्रभाकर जोग यांनी गाण्याला भावप्रधान करताना व्हायोलिनचा सुंदर वापर केला. सुरुवातीच्या काळात त्यांनी व्हायोलिनवादनाचे लहान-मोठे कार्यक्रम केले. पुढे संगीतकार श्रीनिवास खळे, दशरथ पुजारी, पंडित हृदयनाथ मंगेशकर, यशवंत देव, वसंत पवार, राम कदम, वसंत प्रभू या दिग्गज संगीतकारांना साथ केली. ‘लपविलास तू हिरवा चाफा’ या गीतापासून जोग हे स्वतंत्र गीतकार म्हणून महाराष्ट्राला परिचित झाले. ‘जावई माझा भला’ हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट आहे. त्यांनी एकूण २२ चित्रपटांना संगीत दिले. गायक, संगीतकार सुधीर फडके यांच्या गीतरामायणाच्या ५०० पेक्षा अधिक कार्यक्रमांना व्हायोलिनचे सूर दिले. ‘गाणारे व्हायोलिन’ आणि ‘गाता रहे मेरा व्हायोलिन’ या त्यांच्या व्हायोलिन गीतांच्या व्हिसीडी रसिकांच्या पसंतीस उतरल्या. ‘स्वर आले दुरूनी’, ‘तेच स्वप्न लोचनात’, ‘बाजार फुलांचा भरला’, ‘हे चांदणे फुलांनी’, ‘सोनियाचा पाळणा’, ‘सत्यात नाही आले स्वप्नात येऊ का’, ‘आला वसंत ऋतू आला’ ही जोग यांनी संगीतबद्ध केलेली गाणी गाजली. हिंदी चित्रपटसृष्टीतील मदनमोहन, एस. डी. बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, शंकर जयकिशन, खय्याम, ओ.पी. नय्यर, उषा खन्ना, जयदेव, रवींद्र जैन या संगीतकारांसोबतही त्यांनी काम केले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

      January 7, 2017


  • मराठी सामाजिक बोलपटांचे आद्य प्रवर्तक मास्टर विनायक

    त्या काळी इंग्रजी चित्रपट सोडला, तर मराठी चित्रपटात पोहण्याचे दृश्य नसायचं. तसं दृश्य व तेही पोहण्याच्या पोशाखामध्ये चित्रित होण्याचा मराठी चित्रपटसृष्टीतला तो ऐतिहासिक प्रसंग.

      August 19, 2021


  • भारताचे अकरावे राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम

    ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची पहिली ओळख नामवंत शास्त्रज्ञ अशी असताना त्यांना राष्ट्रपती पदाची संधी मिळाली. केवळ देशातच नव्हे तर विदेशातही त्यांनी आपल्या अलौकिक कामगिरीने देशाची नवी ओळख निर्णाण करून दिली.

      November 12, 2023


  • मराठी हिंदुस्तानी संगीत परंपरेतले गायक, संगीतकार भास्करबुवा बखले

    बडोद्यातील कीर्तनकार पिंगळेबुवा यांच्याकडे भास्करबुवानी गायनकलेचा श्रीगणेशा केला. त्यांचा जन्म १७ ऑक्टोबर १८६९ रोजी झाला. पुढे ख्यातनाम बीनकार बंदे अलीखाँ यांनी बखलेंची शिकवणी घेतली. फैजमहंमदखाँ, नथ्थनखाँ आग्रेवाले यांच्याकडे भास्करबुवांचे पुढचे शिक्षण झाले. या सगळ्या अथक मेहनतीनंतर भास्करबुवा बखले यांनी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर या घराण्यांच्या गायकींवर प्रभुत्व मिळवले. नाट्यगीत, ठुमरी, भजन, टप्पा, पंजाबी लोकसंगीत, लावणी, गझल, ध्रुपद धमार, आणि ख्यालगायन या सगळ्यांवर भास्करबुवांची विलक्षण हुकमत होती. संगीतकलेवरील त्यांचे प्रभुत्व पाहून लोक त्यांना देवगंधर्व म्हणू लागले.

    शास्त्रीय संगीतावर आधारित चिजांच्या चाली मराठी आणून भास्करबुवांनी मराठी नाट्यगीते संगीतबद्ध केली. किर्लोस्कर व गंधर्व नाटक कंपन्यांत त्यांनी संगीत विषयाचे प्रमुख गुरू म्हणून काम केले. बालगंधर्व, मास्टर कृष्णराव, गोविंदराव टेंबे आदींनी भास्करबुवा बखले यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. जालंधर, सियालकोट, कराची, म्हैसूर येथील मैफिली भास्करबुवांनी गाजवल्या.
    त्यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीतर्फे 'रामराज्यवियोग' या नाटकात मंथरेची, संगीत सौभद्र या नाटकात नारदाची आणि संगीत शाकुंतलात शकुंतलेची भूमिकाही साकारल्या होत्या. त्यांनी व गोविंदराव टेंबे यांनी संगीत मानापमान व संगीत स्वयंवर नाटकांच्या पदांच्या चाली बांधल्या होत्या. याशिवाय भास्करबुवा बखले यांनी संगीत द्रौपदी व संगीत विद्याहरण या नाटकांचे संगीत दिग्दर्शनही केले होते. दुर्दैवाने भास्करबुवांच्या आवाजातली एकही कलाकृति ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध नाही.

    १९११ साली भास्करबुवांनी भारत गायन समाज ही संस्था हिंदुस्तानी संगीत पद्धतीच्या प्रसारार्थ स्थापली. गायनाचार्य पं. भास्करबुवा बखले यांनी स्थापन केलेल्या पुणे भारत गायन समाज संस्थेच्या भास्कर संगीत विद्यालयातर्फे शास्त्रीय संगीताचे शिक्षण दिले जाते. संस्थेच्या संगीत अभ्यासक्रमाला १९६२ मध्ये राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक संगीत विद्यालये ही भास्कर संगीत विद्यालयाशी संलग्न आहेत. त्यांनी ग्वाल्हेर घराण्याच्या संगीताबद्दल लिहिलेले अर्धेमुर्धे पुस्तक भास्कबुवांच्या शैला दातार या नातसुनेने पूर्ण करून प्रकाशित केले आहे. पुण्याचा भारत गायन समाज दरवर्षी भास्करबुवांच्या स्मृतिदिनी संगीत समारोह आयोजित करतो.

    भास्करबुवांच्या स्मरणार्थ १९२६ मध्ये स्थापन झालेला मुंबईतील कल्याण गायन समाज, वर्षभर विविध संगीत सभा तर घेतोच, शिवाय त्यांच्या वर्षदिनी देवगंधर्व संगीत महोत्सव भरवतो. चंदीगडमधील प्राचीन कला केंद्र दरवर्षी अखिल भारतीय भास्करराव नृत्य व संगीत संमेलन आयोजित करते. पुणे विद्यापीठ पंडित बी.ए.ला संगीतात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला भास्करबुवा बखले पुरस्कार देते. भास्करबुवा बखले यांचे ८ एप्रिल १९२२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ- इंटरनेट

      November 3, 2017


  • सुधा वर्दे

    स्वातंत्र्याचा लढा, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि राष्ट्रीय सेवादलाशी जोडले गेलेले प्रमुख महिलांपैकी एक नाव आणि राष्ट्रीय सेवादलाच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणजे सुधा वर्दे. माहेरचं अनुताई कोतवाल हे नाव असलेल्या सुधाताईंचा जन्म १९३२ सालचा;लहानपणापासूनच सुधाताईंना विविध कलांची आवड होती.

      April 18, 2014


  • डॉ. दीपक टेपे

    दिल्लीच्या मौलाना आझाद मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता व्हायला आवडेल, की जि.बी. पंत हॉस्पिटलचे संचालक? अशी विचारणा जागतिक कीर्तीचे कार्डियाक अॅनेस्थेटिस्ट डॉ. दीपक टेपे यांना केंद्र सरकरकडून अनौपचारिकपणे करण्यात आली.तेव्हा त्यांनी “मौलाना आझाद” च्या अधिष्ठाता पदाची निवड केली. कारण देशातील पहिल्या पाच अव्वल मेडिकल कॉलेजांत समावेश असलेल्या “मौलाना आझाद” चे अधिष्ठातापद सांभाळण्याचे आव्हान मोठे होते.पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांशी येणारा संपर्क आणि शिक्षण क्षेत्रात योगदानाची संधी त्यात दडली होती. या कॉलेजचे अधिष्ठाता होणारे डॉ.टेपे पहिले मराठीच नव्हे तर पहिले भूलतज्ज्ञही ठरले.

    महाराष्ट्र टाईम्सच्या मराठी मुद्रा या सदरात आलेला डॉ. दीपक टेपे यांच्यावरील लेख पुढील पानावर वाचा...

    दिल्लीला महाराष्ट्राची भूल!

    tepe-dr-deepak-modified

      July 24, 2015


  • ई. एस. मोडक

    ब्रिटिशकाळ असो वा स्वातंत्र्यानंतर आलेली लोकशाही, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या कामातील निष्ठा कधीच ढळू न दिलेल्या मोजक्या पोलिस अधिकाऱ्यांमध्ये ई. एस. मोडक यांचा समावेश होता. ब्रिटिशांची चोख सेवा करतानाही एतद्देशीयांविषयी त्यांना वाटणाऱ्या प्रेमाचा तसेच त्यांनी दिलेल्या चांगल्या वागणुकीचा दाखला यशवंतराव चव्हाण, वसंतरावदादा पाटील यांच्यासारख्या लोकनेत्यांनी दिला आहे. मोडक यांचा जन्म साताऱ्यात २५ मार्च १९२० रोजी झाला. वडील जिल्हाधिकारी होते. शिकायला ते पुण्याच्या शाळेत आले. नंतर मुंबईतील महाविद्यालयामधून अर्थशास्त्राची पदव्युत्तर पदवी त्यांनी मिळविली.

    त्याच काळात ब्रिटिशांची इंडियन पोलिस परीक्षा ते उत्तीर्ण झाले आणि १९४२ मध्ये साताऱ्याला सहायक पोलिस अधीक्षक पदावर रुजू झाले. ४२ च्या आंदोलनाचा तो काळ होता आणि त्या परिसरात स्वातंत्र्यसैनिकांनी पत्री सरकार स्थापन केले होते. सरकारी कामे ठप्प करण्यासाठी सशस्त्र आंदोलन करण्यात येई. त्या काळातील परिस्थिती मोडक यांनी कौशल्याने हाताळली. प्रसंगी वसंतरावदादा पाटील यांना अटक करावी लागली. तरीही त्यांचे सर्वाशी संबंध सौहार्दाचेच राहिले. याच धामधुमीत १९४३ मध्ये किरण सेनगुप्ता या बंगाली युवतीबरोबर त्यांनी विवाहाचे नाजूक बंधही गुंफले. साताऱ्यानंतर विजापूर, अहमदाबादजवळील खेडा, कोल्हापूर, सोलापूर आणि नंतर मुंबई येथे पोलिस उपायुक्तपदी त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर लाचलुचपत विभागाच्या उपमहासंचालकपदी बढती मिळाली. पुणे शहरात पोलिस आयुक्तालयाची स्थापना झाल्यावर पहिले पोलिस आयुक्त होण्याचा मानही १९६५ मध्ये त्यांना मिळाला. १९६६ मध्ये जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती हाताळण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यांचे नाव सुचविले आणि त्यांनी ते सार्थही ठरविले. पोलिस महासंचालकपदी त्यांची नेमणूक १९७६ मध्ये झाली आणि ते १९७८ मध्ये निवृत्त झाले. प्रामाणिक, हुशार आणि कडक शिस्तीचे भोक्ते म्हणून ते प्रसिद्ध होते. कामाबाबत जितके कडक तितकेच ते वैयक्तिक संबंधांमध्ये मृदूही होते. त्यांचे जीवन अनेक नाटय़मय घटनांनी भरलेले होते. याचे रोमहर्षक वर्णन ‘सेंटिनेल ऑफ सह्य़ाद्री’ या पुस्तकात त्यांनी केले आहे. पुण्यात गणेशोत्सवातील हल्याची दंगल हाताळताना तत्कालीन गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांनी गोळीबार न करण्याचा आदेश मोडक यांना दिला, पण मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी तो रद्द केला. त्यानंतर आपण असा आदेश दिलाच नव्हता असे सांगून गृहमंत्र्यांनी कानावर हात ठेवले. त्याबाबतचे प्रसंग मोडक यांनी नाटय़मयरीत्या मांडले आहेत. बेळगावचा समावेश महाराष्ट्रात झाल्याशिवाय केंद्रीय मंत्र्यांना मुंबईत प्रवेश करू दिला जाणार नाही, या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर मंत्री मोरारजी देसाई मुंबईत आले. त्यावेळचा तणाव शमविण्यासाठी त्यांनी मोरारजींची गाडी अचानक रस्ता बदलून सुरक्षितपणे पोहोचवली. ठाकरे यांना अटक करण्याची कारवाई असो वा दंगलीस सामोरे जाण्याचा प्रसंग, त्यातून मोडक यांच्यातील कणखर प्रशासकच दिसला. दंगल कशी हाताळायची, पोलिस दल कसे वापरायचे याबाबत मार्गदर्शक पुस्तिका त्यांनी तयार केली होती. जातीय दंगली होऊ नयेत, यासाठी काय केले पाहिजे, याबाबतचे आपले स्पष्ट मत ते मांडत. पोलिस दलातील राजकीय चबढब त्यांना सहन होत नसे. पोलिस दलातील नेतृत्व कसे असावे याबाबत ते लिहितात, ‘नेतृत्वाचा आपल्या संघावर विश्वास असावा. स्वयंनियंत्रण, आत्मविश्वास, देशाभिमान, निष्ठा हे गुण नेत्यात असलेच पाहिजेत.’ धावपळीच्या कामामधून वेळ काढून ते अफाट वाचन करीत. सम्राट अशोकाच्या जीवनावर तब्बल १४१ पुस्तके वाचून त्यांनी कादंबरी लिहिली. त्यांच्या अखेरच्या दिवसांत ती प्रकाशित होण्यासाठी त्यांच्या संजय आणि रवि या दोन्ही मुलांनी खूप प्रयत्न केले. मात्र काही महिन्यांपूर्वीच पत्नी इहलोक सोडून गेल्याने हताश झालेल्या मोडक यांची प्रकृती ढासळली. गेल्या आठवडय़ात मोडक काळाच्या पडद्याआड गेले आणि दुसऱ्याच दिवशी ही कादंबरी प्रकाशित झाली. सर्वच क्षेत्रांत राजकीय हस्तक्षेप असण्याच्या या काळात मोडक यांच्यासारख्या स्पष्टवक्त्या, कर्तव्यकठोर अधिकाऱ्याची गरज अधिकच भासणार आहे.

      August 5, 2017


  • संगीतकार आदेश श्रीवास्तव

    आदेश श्रीवास्तव हे अभिनेता बनण्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीत आले होते. त्यांचा जन्म ४ सप्टेंबर १९६४ रोजी झाला."अंगारे‘ या चित्रपटात त्यांनी भूमिकाही केली. नंतर तब्बल दशकभर त्यांनी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासोबत काम केले. सन १९९३ मध्ये 'कन्यादान' या चित्रपटातून संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांनी पदार्पण केले. त्यानंतर १०० हून अधिक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. यात 'चलते चलते', 'बाबुल', 'बागबान', 'कभी खुशी कभी गम', 'राजनिती' या चित्रपटांना त्यांनी दिलेले संगीत लक्षवेधी ठरले. त्यांनी 'सना' या लघुपटाचे दिग्दर्शनही केले.

    आदेश यांना २०११ मध्ये कॅन्सर झाला होता. मात्र, त्यावर त्यांनी मात केली. आजारपणानंतर पुन्हा संगीतक्षेत्रात कार्यरत होत त्यांनी 'वेलकम बॅक' या सिनेमाला संगीत दिले. हा त्यांचा संगीत दिग्दर्शक म्हणून अखेरचा सिनेमा ठरला. आदेश श्रीवास्तव यांचे निधन ५ सप्टेंबर २०१५ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      September 4, 2017


  • ज्येष्ठ गीतकार वसंत निनावे

    वसंत निनावे यांनी आकाशवाणी साठी अनेक श्रुतिका लिहिल्या. त्या श्रुतिका नीलम प्रभू, बाळ कुरतडकर यांच्या सारख्या दिग्गज रेडिओ कलाकारांनी सादर केल्या होत्या. पुढे याच श्रुतिका ‘आकाशप्रिया’ या नावाने त्या पुस्तक रूपात प्रसिद्ध झाल्या, आणि या पुस्तकाला राज्य शासनाचा विशेष पुरस्कार प्राप्त झाला होता.

      June 10, 2022