(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ख्यातनाम लेखिका सरोजिनी शारंगपाणी

    “आहुती’, “गुन्हेगारी आणि शासन’, “गुन्हेगारांचे जग’, “पुरुषप्रधान संस्कृती’, “दुर्दैवाशी दोन हात’ अशा अनेक पुस्तकांच्या लेखिका सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी यांचे चिरंजीव श्रीनिवास शारंगपाणी यांनी जागवलेल्या त्यांच्या आठवणी…  

      March 16, 2019


  • बंगाली अभिनेत्री सुचित्रा सेन

    सुचित्रा सेन यांचे विवाहाआधीचे नाव रमा दासगुप्ता असे होते. त्यांचा जन्म ६ एप्रिल १९३१ रोजी झाला. किमान तीन दशके तरी आपल्या सौंदर्याबरोबरच, सशक्त अभिनयाने सुचित्रा सेन या बंगाली चित्रपटाच्या सुवर्णयुगातील एक महत्त्वाच्या साक्षीदार ठरल्या. अग्निपरीक्षा, देवदास, सात पाके बंधा हे त्यांचे बंगाली चित्रपट विशेष लक्षात राहिले. हरणासारखे नेत्रसौंदर्य (मृगनयनी) लाभलेल्या सुचित्रा सेन यांनी सत्तरच्या दशकात चित्रपटसृष्टी सोडली. नेहमी सार्वजनिक जीवनात मिसळणे टाळणाऱ्या सुचित्रा सेन या बंगालच्या ‘ग्रेटा गाब्रो’ म्हणून प्रसिद्ध होत्या. कन्नन देवी यांच्यानंतर बंगालमधील एकाही अभिनेत्रीला सुचित्रा सेन यांच्याइतके चाहते मिळाले नाहीत. त्यांची लोकप्रियता इतकी होती, की दुर्गापूजेच्या वेळी दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती यांच्या प्रतिमा सुचित्रा सेन यांच्या चेहऱ्यावर बेतल्या जात असत. ‘शेष कोठाई’ या चित्रपटापासून त्यांनी १९५२ मध्ये सुरुवात केली व नंतर बिमल रॉय यांच्या १९५५ मधील ‘देवदास’ या चित्रपटात त्यांना दिलीपकुमारच्या देवदासबरोबर साकारलेल्या पारोच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. बंगाली अभिनेते उत्तम कुमार यांच्याबरोबर त्यांची चांगली जोडी पडद्यावर जुळली. त्यांचे हारनो सूर (१९५७), अग्निपरीक्षा (१९५४), सप्तपदी (१९६१), ग्रिहदाह (१९६७), इंद्राणी (१९५८), सागरिका (१९५६), बिपाशा (१९६२), कमल लता (१९६९), अलो आमार अलो (१९७२), हर मन हर (१९७२) व प्रियो बंधाबी (१९७५) हे चित्रपट संस्मरणीय ठरले. त्यांनी ५२ बंगाली तर ७ हिंदी चित्रपट केले. भारतभूषणबरोबरचा चंपाकली, देव आनंदबरोबर सरहद, बंबई का बाबू यासह ममता हा एक चित्रपटही त्यांनी केला होता. १९७४मध्ये त्यांनी ‘देवदास’नंतर गुलजार यांच्या ‘आँधी’ चित्रपटाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. संजीव कुमार यांच्यासमवेत त्यांनी जी भूमिका केली होती, त्यात त्यांची भूमिका ही इंदिरा गांधी यांच्या जीवनाशी मिळतीजुळती होती त्यामुळे तेव्हा वाद निर्माण झाला होता. १९७८ मध्ये त्यांनी सौमित्र चटर्जी यांच्याबरोबर ‘प्रणोय पाश’ हा चित्रपट केला. तो पडला. त्यानंतर सुचित्रा सेन कधीच कुणाला दिसल्या नाहीत व २००५ मध्ये त्यांनी दादासाहेब फाळके पुरस्कार नाकारला होता. यशस्वी कारकिर्दीनंतर अचानक त्या एकाकी आयुष्य जगू लागल्या होत्या. आपल्या घरातच त्यांनी स्वतःला बंदिस्त करून घेतले होते. २००५ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यांना भारत सरकार कडून पद्‌मश्री आणि बंगाल सरकार कडून बंगबिभूषण हे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. मा.सुचित्रा सेन यांचे निधन १७ जानेवारी २०१४ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      April 6, 2017


  • मराठी अभिनेत्री क्षिती जोग

    क्षिती जोगचा जन्म १ जानेवारी १९८३ रोजी झाला. क्षितीची ‘दामिनी’ आणि ‘वादळवाट’ या मालिकेतील भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तसेच तिने ‘ये रिश्ता क्या कहलता है’, ‘साराभाई वर्सेस साराभाई’ अशा हिंदी मालिकेतूनदेखील आपल्या अभिनयाची छबी उमटविली आहे. त्याचबरोबर क्षितीने ‘संशय कल्लोळ’, ‘माई’ असे चित्रपटदेखील केले आहेत. तर ‘सूर्याची पिल्ले’ या नाटकातल्या तिच्या अभिनयाचेही अनेकांनी कौतूक केले. नाटक, मालिका, चित्रपट यांमुळे क्षितीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. जेष्ठ अभिनेते अनंत जोग हे क्षिती जोगचे वडिल.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 1, 2017


  • धनंजय कुलकर्णी

    धनंजय कुलकर्णी यांचा जन्म ६ एप्रिल १९६२ रोजी सोलापुर येथे झाला. त्यांचे शिक्षण सुरवातीला सोलापूर, महाबळेश्वर व पुणे येथे झाले. बी. एस्सी. झाल्यावर सुरवातीला काही काळ त्यांनी बॅंकेत नोकरी केली.

      June 4, 2010


  • इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष सुहार्तो

    १९६५ ते ६८ या काळात कम्युनिस्टांचे सरकार सुहार्तोंनी लष्कराच्या बळावर उलथवले, तेव्हा तब्बल आठ लाख कम्युनिस्ट कार्यकर्ते वा समर्थकांना त्यांनी ठार मारले. त्यानंतरही पूर्व तिमूर, पापुआ व असेह भाग आपल्याच टाचेखाली ठेवण्यासाठी सुहार्तो यांनी लष्कराकरवी किमान तीन लाख जणांचे शिरकाण केले.

      January 27, 2022


  • ज्येष्ठ गायक पं. अजित कडकडे

    कडकडे कुटुंबीय मूळचे गोव्याजवळील डिचोली गावचे. इंटरपर्यंतचे त्यांचे शिक्षण गोव्यातच झाले. कडकडे घराण्यात किंवा आजोळीही गाण्याचा वारसा नव्हता. केवळ घरच्यांनी सांगितले म्हणून ते गोव्यातील माडीये गुरुजींकडे गाणे शिकायला जाऊ लागले. अजित कडकडे यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे प्राथमिक धडे पं. गोविंदराव अग्नी व पं. गोविंदप्रसाद जयपूरवाला यांच्याकडे घेतले. नंतर पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे त्यांनी दहा वर्षे संगीताची तालीम घेतली.

    अजित कडकडे यांनी सुरुवातीच्या काळात 'संगीत शारदा', 'संगीत सौभद्र' या संगीत नाटकांतून गाणाऱ्या पात्रांच्या भूमिका केल्या होत्या. एका मुलाखतीत त्यांनी सांगीतले होते की ‘संगीताचा कोणताही वारसा आमच्या घरात नव्हता. माझ्या मनात गाण्याचा कसलाही विचार नव्हता. मला डॉक्टहर व्हायचे होते. परंतु पं. अभिषेकीबुवांमुळे मी या क्षेत्रात आहे. मा.आर.एन.पराडकर यांची परंपरा अजित कडकडे चालवताना दिसतात. मा.अजित कडकडे यांनी गेल्या तीस वर्षांत दत्तगुरूंवर सुमारे चाळीस-पन्नास अल्बम केले आहेत, यातल्या बहुतांश रचना कवी प्रवीण दवणे यांच्या आहेत तर संगीत नंदू होनप यांचे आहे. ‘निघालो घेऊन दत्ताची पालखी, अलौकिक दत्तात्रेय अवतार’ आदी त्यांची गाणी भक्तप्रिय ठरली आहेत.

    दत्तगुरूंवरील अन्य रचनांपैकी ‘त्रिगुणात्मक त्रमूर्ती दत्त हा जाणा’ ही पारंपरिक आरती तर घरोघरी म्हटली जाते. ‘मला हे दत्तगुरू दिसले’ हे आशा भोसले यांचं गीतही (आम्ही जातो आमच्या गावा) अजरामर आहे आणि रघुनाथ साळोखे यांनी गायलेलं ‘दत्त दर्शनाला जायाचं, जायाचं, आनंद पोटात माझ्या माईना’ हे गीतही आगळंवेगळं आहे. अजित कडकडे आणि संगीतकार मा.नंदू होनप यांच्या भक्तिसंगीताने रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. तब्बल ३५ वर्षे या जोडीने एकत्र काम केले. अजित कडकडे यांनी अनेक भावगीतेही गायली आहेत..

    हे हासणे गुलाबी..
    सजल नयन नीत धार..
    मैफलीचे गीत माझे..
    अशी सुमारे दहा..

    तुझ्या कृपेने दिन उगवे..
    भक्तिवाचुनि मुक्तीची मज..
    अशी कित्येक भक्तिगीते..
    तर चक्क "चल गो चंपा.." हे कोळीगीतही गायले आहे.

    "आर. एन. पराडकर" यांची भक्तीगीतांची व्हर्शन्स त्यांनी खास आग्रहाखातर केली हे विशेष.. मा.अजित कडकडे यांना "संगीतकार प्रभाकर पंडित स्मृती पुरस्कार‘ मिळाला आहे.

    अजित कडकडे यांचे मराठीसृष्टीवरील लेख.

    ज्येष्ठ गायक पं. अजित कडकडे (11-Jan-2018)

    ज्येष्ठ गायक पं. अजित कडकडे (12-Jan-2017)

    #AjitKadkade

      May 5, 2022


  • मराठी रंगभूमीवरचा विक्रमादित्य अभिनेता प्रशांत दामले

    प्रशांत दामले यांना मराठी रंगभूमीवरचा विक्रमादित्य अभिनेता म्हणले जाते. त्यांचा जन्म ५ एप्रिल १९६१ रोजी झाला. त्याच्या अभिनय कारककिर्दीला एकोणचाळीसहून अधिक वर्षे पूर्ण झाली. या काळात त्याने जवळपास आठ हजार नाटकांचे प्रयोग केले आहेत. मराठी चित्रपटातील आणि रंगभूमीवरील प्रशांत दामले यांची कारकीर्द १९७८ मध्ये सुरू झाली. 'टूरटूर' या मराठी नाटकापासून प्रशांत दामले दामले सर्वप्रथम विनोदी अभिनेता म्हणून प्रसिद्ध झाले. यात एका मद्रासी माणसाची त्यांनी भूमिका केली होती. त्यानंतर 'मोरूची मावशी' या नाटकापासून त्यांची व्यावसायिक रंगभूमीकडे वाटचाल सुरू झाली. दरम्यानच्या काळात त्याला चित्रपटाच्या ऑफर येऊ लागल्या, त्यांनी अनेक चित्रपटही केले. मात्र तेथे त्याचे मन रमले नाही. आपल्या कारकिर्दीत त्यांनी ३७ चित्रपटांत आणि २६ नाटकांत अभिनय केला आहे. यातील "चार दिवस प्रेमाचे", "जादू तेरी नजर", "गेला माधव कुणीकडे", "एका लग्नाची गोष्ट", "ओळख ना पाळख", "प्रियतमा", "मोरूची मावशी", "लग्नाची बेडी", "लेकुरे उदंड झाली", "शूss कुठं बोलायवं नाही", "नकळत दिसले सारे" आणि "कार्टी काळजात घुसली" प्रमुख आहेत. त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटांमध्ये “अक्का”, “आई पाहिजे”, “आत्मविश्वास”, “आनंदाचे झाड’, “आम्ही दोघे राजा राणी”, “इना मिना डिका”, “एक रात्र मंतरलेली”, “एकदा पहावं करुन”, “खुळ्यांचा बाजार”, “घरंदाज”, “चल गंमत करु”, “चार दिवस सासूचे”, “तू तिथं मी”, “पसंत आहे मुलगी”, “पुढचं पाऊल”, “फटफजिती”, “बंडलबाज”, “बाप रे बाप”, “मधुचंद्राची रात्र”, “माझा छकुला”, “रेशीमगाठी”, “वाजवा रे वाजवा”, “विधिलिखित”, “सगळीकडे बोंबाबोंब”, “सगळे सारखेच” आणि “सवत माझी लाडकी” हे प्रमुख आहेत. दूरचित्रवाणीवरही त्यांनी २४ मराठी मालिकांत काम केले आहे. यातील काय पाहिलंस माझ्यात, घरकुल, बे दुणे तीन या मालिका मालिका फार लोकप्रिय झाली. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये मा.प्रशांत दामले यांच्या नावावर तब्बल पाच रेकॉर्ड्‌स नोंदली गेली आहेत. त्यांमध्ये २४ डिसेंबर १९९५ रोजी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या नाटकांचे चार प्रयोग १९९५ साली ३६५ दिवसांत ४५२ प्रयोग १९९६ साली ३६५ दिवसात ४६९ प्रयोग, १८ जानेवारी २००१ ला मा.प्रशांत दामले यांनी एकाच दिवशी ५ प्रयोग करायचे ठरवलं अर्थात त्याचं नियोजनहि केलं होतं. सकाळी ७ वाजता पहिला प्रयोग सुरु झाला तो रात्री ११.५५ ला पाचव्या प्रयोगाचा पडदा पडला.हा प्रशांत दामले यांचे लिम्का बुक वर्ल्ड रेकॉर्ड झाले. यात गेला माधवचे २ प्रयोग, एका लग्नाची गोष्ट १ आणि चार दिवस प्रेमाचे २ प्रयोगांचा समावेश होता. प्रशांत दामले यांना सुंदर आवाजाची दैवी देणगी लाभली आहे. गायक-नट म्हणून ते सुप्रसिद्ध आहेत. 'मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं' सारखं सुंदर नाट्यगीत गाणाऱ्या मा.प्रशांत दामलेंनी झी मराठीवरील सारेगमप स्पर्धासुद्धा जिंकली होती. प्रशांत दामले हे उत्तम निवेदक आहेत. अनेक गाण्यांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्यांनी केले आहे, मुळातच खाण्याची आवड असलेले प्रशांत दामले गेली काही वर्ष झी मराठीवरील 'आम्ही सारे खवय्ये' कार्यक्रमाचे खमंग सूत्रसंचालन करतात.

    प्रशांत दामले यांची वेबसाइट
    www.prashantdamle.com
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    मला सांगा सुख म्हणजे
    https://www.youtube.com/watch?v=mvf0L3x0LzA
    प्रशांत दामले यांची नाटके
    https://www.youtube.com/watch?v=JZl_zwm_IPI
    https://www.youtube.com/watch?v=PD-mBpCvTAw

      April 5, 2017


  • ज्येष्ठ अभिनेत्री मीनाकुमारी

    परिणिता, दिल अपना और प्रीत पराई, दायरा, एक ही रास्ता, शारदा, दिल एक मंदिर, साहिब बिवी और गुलाम, काजल, फूल और पत्थर हे मीना कुमारी यांनी अभिनय केलेले काही उल्लेखनीय चित्रपट. ‘परिणिता’ या चित्रपटापासून तिला भारतीय नारीच्या भावुक भूमिकाच मिळत गेल्या. फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेली मा. मीना कुमारी ह्या पहिली अभिनेत्री. १९५३ साली फिल्मफेअर पुरस्काराला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या दोन्ही वर्षी ‘बैजू बावरा’ आणि ‘परिणिता’ या चित्रपटांतील भूमिकांसाठी ती सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली.

      March 31, 2022


  • नंदा ऊर्फ रेणुका विनायक कर्नाटकी

    नंदा या सुप्रसिध्द सिनेनिर्माते, दिग्दर्शक आणि नट मास्टर विनायकांची कन्या. लहानपणी बेबी नंदा या नावाने १९४६ रोजी प्रथम बालकलाकार म्हणून “मंदिर” या चित्रपटातनं एका मुलाची भूमिका साकारली व त्यानंतर १५ ते १६ चित्रपटांमधुन काम केले.

      May 7, 2014


  • जाहिरातकार व ललित लेखक सुरेश नावडकर

    स्मिता तळवलकर यांच्या ‘तू तिथं मी’ या चित्रपटासाठी स्थिरचित्रण व जाहिरात दोन्ही कामे सुरेश नावडकर यांनी केली. हा चित्रपट सुवर्णमहोत्सवी ठरला. या कामाबद्दल त्यांना दुसऱ्यांदा राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. 

      March 22, 2022