(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मराठीतील प्रगल्भ अभिनेत्री भक्ती बर्वे

    भक्ती बर्वे केवळ अभिनेत्री नाही, तर उत्तम निवेदिकाही होत्या. त्यांचा जन्म १० सप्टेंबर १९४८ रोजी झाला. त्यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. गणेशोत्सवात छोट्या छोट्या नकलांपासून त्यांच्या अभिनयाला सुरवात झाली, असे म्हणावे लागेल.

    त्यांचे उत्तम पाठांतर असल्याने त्यांना पुढे आकाशवाणीवर काम करण्याची संधी मिळाली. त्या दूरदर्शनवर निवेदन करीत होत्या. त्या उपजत अभिनेत्री असल्यामुळे त्यांनी केलेली जवळजवळ सर्वच नाटके सुपर हिट ठरली. नाटक आणि भक्ती बर्वे हे समीकरणच तयार झाले. त्याकाळी नाटकांना वन्स मोअर मिळत असे. त्यामुळेच मराठी रंगभूमीतील भक्ती बर्वे या एकमेव स्त्री स्टार म्हणावे लागेल.‘‘ आकाशवाणीवर आणि दूरदर्शनवर भक्ती बर्वे निवेदिका होत्या. अशोक हांडे यांच्या 'माणिकमोती' या कार्यक्रमातही त्यांचे निवेदन असे.

    पु.ल.देशपांडे यांच्या ती फुलराणी हे नाटक म्हणजे भक्ती बर्वे यांच्या भूमिकेतील अतुच्य क्षण. ती फुलराणी चे ११११ हून अधिक प्रयोग झाले. आई रिटायर होतेय या नाटकात भक्ती बर्वे यांनी साकारलेली आईची भूमिकाही खूप गाजली. या नाटकाचे एकूण ९५० प्रयोग झाले. मराठी नाट्यक्षेत्रातल्या कामगिरीसाठी ह्यांना १९९० साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हिंदी चित्रपटांतील सहअभिनेते मा. शफी इनामदार यांच्याशी विवाह झाला होता. अशोक हांडे यांच्या माणिकमोती या कार्यक्रमातही त्यांचे निवेदन असे.

    रजनीश जोशी यांनी लिहिलेलं एक होती फुलराणी हे पुस्तक भक्ती बर्वे यांच्या बद्दलच्या खूप छान छान गोष्टींची आठवण करून देते.

    भक्ती बर्वे यांचे १२ फेब्रुवारी २००१ रोजी निधन झाले.

    भक्ती बर्वे यांनी काम केलेली नाटके.
    अखेरचा सवाल, अल्लाउद्दीन व जादूचा दिवा (बालनाट्य), अजब न्याय वर्तुळाचा, आई रिटायर होतेय (मराठी आणि गुजरातीत-बा रिटायर थाय छे), आधे अधुरे(हिंदी आणि मराठी), आले देवाजीच्या मना, कळलाव्या कांद्याची कहाणी (बालनाट्य), गांधी आणि आंबेडकर, घरकुल, चिनी बदाम (बालनाट्य), जादूची वेल (बालनाट्य), टिळक आणि आगरकर, ती फुलराणी, दंबद्वीपचा मुकाबला, पपा सांगा कुणाचे, पळा पळा कोण पुढे पळे तो, पुरुष, पुलं, फुलराणी आणि मी, बाई खुळाबाई, बूटपोलिश, माणसाला डंख मातीचा, मिठीतून मुठीत, रंग माझा वेगळा, रातराणी (मराठी, हिंदी आणि गुजराती), वयं मोठं खोटम् (बालनाट्य), शॉर्टकट, सखी प्रिय सखी, हँड्स अप.
    प्रमुख चित्रपट - जाने भी दो यारों (हिंदी) इ.स. १९८३,बहिणाबाई, ‘हजार चौरासी की माँ’ (हिंदी) इ.स. १९९८

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      September 10, 2017


  • प्रदीप भिडे

    प्रदीप भिडे यांना नाटकाचीही पार्श्वभूमी आहे. नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या संस्थेत त्यांनी काही काळ प्रायोगिक नाटकांतून काम केले. दिलीप प्रभावळकर, वसंत सोमण, रवी पटवर्धन हे त्यांचे सहकलाकार. नाटकातून काम केलेले असल्याने ‘स्टेज फीअर’ म्हणून जे काही असते त्याची भीती, दडपण त्यांच्यावर नव्हते.

      July 7, 2022


  • किशोर प्रधान

    ‘लगे रहो मुन्नाभाई’ मधील ‘खटय़ाळ म्हातारा’ प्रधानांनी रंगविला. भूमिका छोटीशीच असली तरी ते आपली छाप पाडून गेले. ‘जब वुई मेट’मधील त्यांच्या ‘स्टेशन मास्तर’ही प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. पण हिंदी चित्रपट आणि तेथील वातावरणात ते फारसे रमले नाहीत.

      June 24, 2022


  • अभिनेत्री  मधुराणी गोखले प्रभुलकर

    मधुराणी या माहेरच्या मधुराणी श्रीराम गोखले. अभिनय, लेखन, सूत्रसंचालन या क्षेत्रात वेगळ्या पद्धतीचं काम करणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे मधुराणी गोखले प्रभुलकर. मधुराणी गोखले प्रभुलकर यांचे शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झालं. एस.पी. महाविद्यालयात असताना त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळाला आणि ‘इंद्रधनुष्य’द्वारे त्यांना कला क्षेत्रात पदार्पण करण्याची संधी मिळाली.

      April 27, 2024


  • हिंदी व पंजाबी चित्रपटांतील खलनायक मदन पुरी

    मदनलाल पुरी यांनी १९४० ते १९८० पर्यंतच्या ४० वर्षांत ३०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये कामे केली. त्यांचा जन्म १९१५ रोजी लाहोर येथे झाला. अनेक प्रकारचे खलनायक रंगवले. वर्षाला जवळपास आठ चित्रपट पडद्यावर आले. मोठा भाऊ चमनलाल आणि धाकटा अमरीश पुरीही आपल्या भूमिकांनी चित्रपट क्षेत्रात स्थिर झाले होते. मदन पुरी यांचा पहिला चित्रपट ‘अहिंसा’. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही, हे वर्षाला आठ या समीकरणाने लक्षात येतेच; पण या यादीमध्ये स्मगलर, छोटा-मोठा दादा, काका, कपटी मामा, चर्चमधील फादर, कोणाचा तरी भाऊ, करप्ट पोलिस ऑफिसर, अशा विविध भूमिका असल्या तरी हे पात्र आतल्या गाठीचे किंवा संधीसाधू नक्कीच असणार, अशी प्रेक्षकांची खात्री असे. त्याच्या ४० वर्षांच्या कार्यकाळात, घवघवीत ३०० सिनेमांमधून विविध भूमिका यशस्वीपणे निभावल्या आहेत.

    'आई मिलन की बेला' , 'मिस्टर एक्स', हावडा ब्रिज ,कन्हैया ,चायना टाऊन ,जिद्दी , वक्त इ. आणी इतरही शंभरेक सिनेमांमधे लहानमोठ्या नकारात्मक भूमिकांमधून खलनायक म्हणून गाजला. मदन पुरी चं व्यक्तित्वच असं होतं कि तो सुटाबुटात आला तरी उच्चवर्गीय, गर्भश्रीमंत असल्या कॅटेगिरीत शोभायचा नाही ,मात्र 'गल्लीतील मवाली , रिवॉल्वर ऐवजी चाकू, सुरा हातात बाळगणारा मुहल्ल्याचा दादा , भुरटा चोर अश्या भूमिकांमधे छान शोभायचा!! मदन पुरी यांनी सुरुवातीला नायक म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले असले तरी जिवलग मित्र देव आनंद यांच्या सांगण्यावरून त्यांनी खलनायकी भूमिका करण्यास सुरुवात केली आणि तिथेच त्यांना नशिबाने साथ दिली. त्यानंतर अनेक खलनायकी भूमिका केल्याने त्यांना खच्चून प्रसिद्धी मिळाली. मधल्या काळात काही वेगळ्या भूमिकाही त्याने केल्या. पण ३०० हून जास्त चित्रपटांमधील ‘दीवार’, ‘दुल्हन वही जो पिया मन भाये’, ‘उपकार’, ‘चोर मचाये शोर’, ‘पूरब पश्चिम’, ‘राधा और सीता’, ‘झूठा’, ‘स्वयंवर’, ‘बेनाम’, ‘अमर प्रेम’, ‘आराधना’, ‘कटी पतंग’ या त्याच्या काही लक्षणीय म्हणता येतील अशा भूमिका.

    हिंदी चित्रपटसृष्टीतील अशा तीन खलनायकांच्या घरात जन्माला आलेल्या लेफ्टनंट कर्नल कमलेश पुरी यांनी ‘माय फादर-द व्हिलन’ हे पुस्तक लिहिले आहे. ‘एकदा मी माझ्या बाबांचा टीव्हीवर लागलेला चित्रपट पाहत बसलो होतो. नातवंडे बाजूला खेळत असल्याने त्यांना मी बोलावून चित्रपटातला तो माणूस कोण?, असे विचारले. मात्र त्यांनी माझ्या बाबांना ओळखलेच नाही. त्याक्षणी जाणीव झाली की मदन पुरींना त्यांची पतवंडेच ओळखत नसतील तर यापुढील पिढी काय ओळखणार? या एकाच जाणिवेने मी बाबांच्या आठवणी संग्रहित करण्यास सुरुवात केली आणि आज त्या पुस्तक रूपात तुमच्यासमोर मांडतो आहे, अशा शब्दांत मदन पुरींचे थोरले सुपुत्र कर्नल कमलेश पुरी यांनी या पुस्तक लिखाणामागची पाश्र्वभूमी सांगितली. बाबांची लोकप्रियता इतकी होती की एकदा मी त्यांचा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात गेलो होतो. त्यावेळी सहाजिकच बाबांची खलनायकाची भूमिका असल्याने त्यांचा प्रवेश झाल्यानंतर मागे बसलेल्या एका गृहस्थाने चांगल्याच शिव्या हासडल्या.

    त्यावर थोडं संतापूनच ‘जरा तमीज से बठो’ अशी प्रतिसूचना मी त्या गृहस्थाला केली. त्यावर त्या गृहस्थाने ‘क्या वो तुम्हारा बाप लगता है?’, असा प्रश्न विचारला. यावर मनातल्या मनात हसण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नव्हता. शेवटी ते वास्तव स्वीकारून शांतपणे चित्रपट पाहिल्याचे कमलेश पुरी यांनी सांगितले. मदन पुरी यांचे निधन १३ जानेवारी १९८५ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट/विनोद गोरे

      January 15, 2018


  • संगीतकार वसंत प्रभू

    मराठी संगीताच्या इतिहासात वसंत या नावाला काही आगळंवेगळं महत्त्व असावं, अन्यथा या एकाच नावाच्या तीन संगीतकारांनी इतकं सुरेल संगीत कसं काय दिलं असतं? वसंत देसाई, वसंत प्रभू आणि वसंत पवार हे तीन संगीतकार. त्यांचा जन्म १९ जानेवारी १९२४ रोजी झाला. या तिघांनी दिलेल्या संगीतावर मराठी गीत रसिकांच्या चार पिढ्या आजवर तृप्त झाल्या आहेत. त्यातील एक संगीतकार वसंत प्रभू.

    वसंत प्रभू यांनी सुरुवातीला हिंदी चित्रपटात‘बाल अभिनेता’ म्हणून काम केले.मा.वसंत प्रभू यांचे मूळ नाव व्यंकटेश प्रभू. पण हिंदी चित्रपटासाठी हे नाव चालणार नाही म्हणून त्यांचे ‘वसंत’ असे नामकरण करण्यात आले. मूळ गाव पाणे मंगरूळ, वडीलांचा हॉटेल व्यवसाय, बालवयापासूनच मेळ्यात गाणं-नृत्य-अभिनय करून ह्यांत रसिकमान्य झालेला “वसंत प्रभू‘ नावाचा तरुणही संगीतात काहीतरी करण्यासाठी धडपडत होता. त्याच वेळी “एचएमव्ही‘चे वसंतराव कामेरकर ह्यांनी प्रभू ह्यांची योग्यता ओळखून त्यांना एचएमव्हीत संगीतदिग्दर्शक म्हणून नोकरी दिली होती. दामूअण्णा माळी म्हणून प्रभू ह्यांचे एक मित्र होते. दामूअण्णा आणि पी. सावळाराम ह्यांचीही मैत्री होती. दामूअण्णांनी सावळाराम ह्यांची प्रभू ह्यांच्याशी ओळख करून दिली. ही “शब्द‘-“स्वरा‘ची भेट म्हणजे रसिकांसाठी “सुवर्णयोग‘च ठरला. कारण, भावगीत विश्वा्त सावळाराम-प्रभू ह्या द्वयीनं सोन्यासारखी एकाहून एक गाणी दिली. माणूस जसा नशीब घेऊन जन्माला येतो, तशीच गाणीसुद्धा नशीब घेऊनच जन्माला येतात! ह्या द्वयीची अशी अनेक गाणी नशीबवान ठरली. त्यातल्या एका गाण्याचं नशीब जास्तच जोरावर होतं. ते प्रचंड गाजलं. वर्षानुवर्षं वाजत राहिलं. अनेक वेळा ऐकूनही ताजंतवानंच राहिलं. प्रत्येक पिढीला आवडणारं ते गाणं आहे “गंगा-जमुना डोळ्यात उभ्या का?
    जा, मुली जा, दिल्याघरी तू सुखी रहा...

    आचार्य अत्रे ह्यांनी ह्या गीताचं कौतुक करताना म्हटलं होतं “गंगा-जमुना‘ हे गाणं एका पारड्यात व इतर सगळी गाणी दुसऱ्या पारड्यात घातली तरी “गंगा-जमुना‘चं पारडं जड होईल!‘‘
    ‘सखी शेजारीणी’ हे गाणे गाण्यासाठी वसंत प्रभू यांनी अरुण दातेच पाहिजेत अशी खास फर्माईश केली होती. तेव्हा अरुण दाते हे प्रसिद्धीस आले नव्हते. वसंत प्रभू यांनी एकूण २२ चित्रपटांना संगीत दिले. संगीतकार वसंत प्रभू, जनकवी पी. सावळाराम आणि लता मंगेशकर या त्रयीने मराठी भावसंगीताची मुहूर्तमेढ रोवली. या त्रयीची अजरामर गीते अजूनही आपल्या ओठी आहेत. वसंत प्रभू यांचे चरित्र मानसीचा चित्रकार तो या नावाने मधु पोतदार यांनी लिहिले आहे.
    वसंत प्रभू यांचे १३ ऑक्टोबर १९६८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट/ मधु पोतदार

    वसंत प्रभू संगीत दिलेली काही गाणी
    चाफा बोलेना
    चंद्र तोच अन्‌ तेच तारे
    चंपक-गोरा कर कोमल
    चांद मोहरे चांदणे
    जन पळभर म्हणतिल
    जन्मोजन्मीं तुम्हीच यावे
    जय देवी मंगळागौरी
    जिथे सागरा धरणी मिळते
    जीर्ण पाचोळा पडे तो
    तुझे डोळे पाण्याने भरले
    तूच कर्ता आणि करविता
    तें दूध तुझ्या त्या
    दिनरात तुला मी किती

      January 19, 2018


  • प्रा. राजाराम भोसले

    देशातील पहिला रेडिओ टेलिस्कोपचा प्रयोग यशस्वी करणारे प्रा. राजाराम भोसले यांनी आता कोल्हापुरात वेधशाळा आणि तारांगण उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. सूर्यापासून येणार्‍या रेडिओलहरी, त्यांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, सूर्य व पृथ्वी यांच्यातील अंतराचे मोजमाप अशा विविध विषयांवर त्यांनी देशातच नव्हे तर अमेरिका, कॅनडा तसेच “नासा” च्या प्रकल्पांत संशोधन केले आहे.

    आकाशाशी जडले नाते

      July 24, 2015


  • गानहिरा हिराबाई बडोदेकर

    हिराबाई बडोदेकर ख्याल, ठुमरी, मराठी नाट्य संगीत, भजन मध्ये तज्ज्ञ होत्या. त्यांचा जन्म १९ मे १९०५ रोजी झाला.

    त्यांना लोकांमध्ये हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत लोकप्रिय करण्याचे श्रेय जाते. त्यांच्या मैफिली अतिशय लोकप्रिय होत असत.त्यांचा गोड आणि नाजूक आवाज खूप लोकप्रिय होते.

    हिराबाई बडोदेकर यांनी किराणा घराण्याला अधिक लोकप्रिय करण्याचे काम केले. हिराबाई बडोदेकर यांनी सुवर्णा मंदिर, प्रतिभा, जनाबाई अशा अनेक चित्रपटात अभिनय केला. संगीत शिकवण्यासाठी संगीत विद्यालय, नूतन संगीत विद्यालय नावाने सुरू केले. हिराबाई ह्या फार लवकरच्या कारकिर्दीत रेकॉर्डिंग कलाकार झाल्या. ध्वनिमुद्रिकांच्या द्वारे आणि रेडिओवर नित्यनियमाने होणा-या कार्यक्रमांमुळे हिराबाई खूपच लोकप्रिय झाल्या. नाटयसंगीताच्या हिराबाईंच्या सुमारे ४८ ध्वनिमुद्रिका प्रसिध्द झाल्या, चित्रपटसंगीताच्या अवघ्या तीनच ध्वनिमुद्रिका निघाल्या. शास्त्रीय संगीताच्या सुमारे चाळीस ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या. तसेच 'राधेकृष्ण बोल', 'गिरीधर गोपाला',खमाज, 'पायोरे मैने' दुर्गा, 'चाकर राखोजी', यासारखी भजने आहेत. पाच ठुम-या आहेत तर, 'किस कदर है', 'या आकर हुआ मेहमान', या गझला आहेत.

    हिराबाईंचा भैरवी हा आवडता राग होता. १९७० पर्यंत हिराबाईंच्या सुमारे १७५ ध्वनिमुद्रिका प्रसिध्द झाल्या. हिराबाई रेडिओवर प्रथम गायल्या, त्या १९२९ मध्ये रेडिओ सुरू होऊन त्यावेळी अवघी दोन वर्षे झाली हो. ती त्यानंतर त्यांचे कार्यक्रम सातत्याने रेडिओवर होऊ लागले. १९२९ पासून ते १९७३ मध्ये हिराबाई गायनातून निवृत्त हाईपर्यंत, म्हणजे जवळ जवळ ४५ वर्षे त्या रेडिओवरून गायल्या.

    ध्वनीमुद्रिका आणि आकाशवाणी ही दोन प्रभावी माध्यमे उपलब्ध झाल्यामुळे हिराबाईंच्या सुरेल गीतांचा सुगंध दुरवर तर पसरलाच परंतू आजच्या पिढीत त्यांची गाणी रसिक आवर्जून ऐकतात.

    हिराबाई बडोदेकर यांचे २० नोव्हेंबर १९८९ रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- विकिपिडीया

      November 22, 2016


  • पंडित दत्तात्रेय विष्णू पलुसकर

    अल्पायुषी ठरलेला हा मधुरकंठी गायक आपल्या अद्भुत गानकलेचा वारसा मागे ठेवून गेला.

      October 25, 2016


  • गणेश विनायक अकोलकर

    शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षणविषयक ग्रंथाचे लेखक गणेश विनायक अकोलकर यांचे निधन २३ नोव्हेंबर १९८३ रोजी झाले. माध्यमिक शिक्षण, शैक्षणिक तत्वज्ञानाची रूपरेषा, शैक्षणिक समाजशास्त्राची रूपरेषा हे त्यांचे शिक्षणशास्त्राचे सैद्धांतिकस्वरूप स्पष्ट करणारे ग्रंथ, तसेच माध्यमिक शिक्षणाची पुनर्घटना, शैक्षणिक मूलतत्वे, शैक्षणिक मनोविज्ञान, व्यक्तिमत्व विकास या ग्रंथासह लोकशाही व शिक्षण आणि शिक्षणाची अधुनिक तत्वज्ञाने हे अनुवादित ग्रंथही त्यांच्या नावावर आहेत.

    ## Ganesh Vinayak Akolkar

      July 27, 2017