(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • लेखक अच्युत गोडबोले

    अर्थशात्र, संगीत, साहित्य, राजकारण, समाजशास्त्र आणि कम्प्युटरसारख्या क्षेत्रात सहजपणे मुशाफिरी करणारे अच्युत गोडबोले यांचा जन्म १५ ऑगस्ट १९५० रोजी अंमळनेर येथे झाला.

    अच्युत गोडबोले यांनी विज्ञान, संगणक तंत्रज्ञान आणि व्यवसाय या विषयांवर त्यांनी प्रामुख्याने लेखन केले आहे. अच्युत गोडबोले यांचे बालपण प्रमुख्याने सोलापूर शहरात गेले. शाळेत असताच त्यांनी विज्ञान आणि गणितात मोठे प्राविण्य मिळवले. दहावीच्या परीक्षेत ते बोर्डात सोळावे आले. त्यांच्यावर लहानपणापासून त्यांच्या श्रीराम पुजारी सरांचा विलक्षण प्रभाव होता.

    गंमत म्हणजे ते शाळा-कॉलेजमधले शिक्षक नव्हते; पण आयुष्यात जगावं कसं आणि समृद्ध कसं व्हावं हे गोडबोले त्यांच्याकडून शिकले. मराठी आणि विशेषतः इंग्लिश पुस्तकं, शास्त्रीय गायन, विविध खेळ, कविता, गाणी या साऱ्यांची ओळख पुजारी सरांमुळे झाली आणि गोडबोले यांचं आयुष्यच बदलून गेलं आणि तिथपासून ते चौफेर वाचू, ऐकू लागले. त्याचाच फायदा त्यांना पुढे प्रचंड लेखन करताना झाला.

    पुढे भारतीय तंत्रज्ञान संस्थेतून (आयआयटी) त्यांनी रसायन अभियांत्रिकीची पदवी मिळविली. चमकदार शैक्षणिक पार्श्वभूमीनंतर गोडबोले यांनी समाजसेवेत आपला काळ व्यतित केला. आदिवासींना हक्क मिळवून देण्याच्या लढ्यात त्यांनी मुख्य भूमिका बजावली. अच्युत गोडबोले यांनी मराठीतून वृत्तपत्रे नियतकालिकांसाठी विपुल प्रमाणात लेखन व स्तंभलेखन केले आहे.

    अच्युत गोडबोले यांच्याकडे आयटी उद्योगाचा ३५ हून अधिक वर्षाचा अनुभव आहे आणि ते पटनी कॉम्प्युटर सिस्टिम्स, सिंटेल, एलएन्डटी इन्फोटेक, अपार आणि दिशा या कंपन्यांचे व्यवस्थापक राहिलेले आहेत. गोडबोले मराठी व इंग्रजी भाषेतील लेखनासाठी प्रसिद्ध आहेत. ते सर्व शैलीतील विपुल लेखनकार आहेत आणि त्यांनी अनेक भाषांतील संकल्पनांचे मराठीत रुपांतर केले आहे.

    अच्युत गोडबोले यांचे संगणकावरील ‘संगणकयुग’, संगीतावरील ‘नादवेध’, व्यवस्थापनावरील ‘बोर्डरूम’, विज्ञानावरील ‘किमयागार’, अर्थशास्त्रावरील ‘अर्थात’, गुलामगिरीवरील ‘गुलाम’, नॅनोटेक्नॉलॉजीवरील ‘नॅनोदय’, स्टीव्ह जॉब्ज या तंत्रज्ञाचे आत्मचरित्र ‘स्टीव्ह जॉब्ज’, मानसशास्त्रावरील ‘मनात’, चंगळवादावरील ‘चंगळवादाचे थैमान’, गणितावरील ‘गणिती’ आणि त्यांचे आत्मचरित्र ‘मुसाफिर’ अशी अनेक पुस्तकं गाजली आहेत. अच्युत गोडबोले यांच्या कारकिर्दीचा वेध त्यांनी या पुस्तकात घेतला आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
    https://www.youtube.com/watch?v=ebFe4p-i4WE
    https://www.youtube.com/watch?v=ADxWkMyaN-Y
    https://www.youtube.com/watch?v=ASIHzaE5o3Y

      August 15, 2021


  • अंगद काशिनाथ म्हसकर

    अनेक दर्जेदार नाटकं, मालिका व चित्रपटातून आपल्या लक्षवेधी अभिनयाची छाप पाडणारा होतकरू अभिनेता अंगद काशिनाथ म्हसकर हा देखील ठाण्याला लाभलेल्या रत्नांपैकी एक आहे.

      May 23, 2014


  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

    जो बायडन यांना भारताचे हितचिंतक म्हणूनही पाहिले जाते. भारताच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय-अमेरिकन जनसमुदायाशी संबोधित करताना राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यास भारतासमोरील आव्हाने दूर करण्यासाठी भारताला साथ देणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

      November 20, 2021


  • भरत सासणे

    ‘‘माणसाचा शोध, त्याच्या नात्यांच्या जाळ्याचा शोध, हे माझे आकर्षण आहे. इथली माती, इथली परंपरा, जीवनपद्धती, बुद्धिवाद्यांना वाटते तितकी सोपी नाही. इथे विसंगतीत सुसंगत एकात्मता आहे. ही रहस्यांची दालने आहेत. हाडामांसाचा माणूस स्त्री आणि पुरुष, त्यांचे परस्परांशी असलेले गूढ संबंध, त्यांची संदर्भसुसंगत जीवनपद्धती या सर्वाचे माझ्या लेखनाला मोठे आकर्षण आहे.

    त्यातूनच प्रेरणा मिळते. माणूस शोधणे ही माझ्यातल्या लेखकाची प्रतिज्ञा आहे. ते जमेल असे वाटते, बघू या.’’ दोनेकच पुस्तके प्रकाशित असताना ललित मासिकाच्या १९८८ सालातील विशेषांकामध्ये कथेविषयीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पाचारण करण्यात आलेल्या या लेखकाची भविष्यातील लेखनघोडदौड ठरलेली होती. कारण माणूस अंतर्बाह्य़ शोधण्याची प्रतिज्ञा दीर्घ कथांद्वारे जमवून दाखविण्याची किमया भारत सासणे यांनी आजही कायम ठेवलेली आहे.

    शतकभरापासून कायम पिछाडीवर पडलेल्या आणि साहित्यमरतडांकडून अवहेलना वाटेला आलेल्या कथा या साहित्यप्रकाराला मर्यादा निश्चित असली, तरी मराठी ललित साहित्य जगतात नवकथेच्या कालखंडापासून ते आजच्या टेक्नोसॅव्ही जगापर्यंत वाचनव्यवहार म्हणून जो काही भाग अस्तित्वात आहे, त्यात कथांचे स्थान अढळ आहे. एके काळी गाडगीळ, गोखले, भावे, माडगुळकर, मोकाशी लेखक पंचकांनी कथांची मोहिनी विस्तारली. जी.ए.कुलकर्णी यांनी त्याच वेळी आपल्या कथेची वेगळी यक्षनगरी उभारली. त्यानंतरही अनेक दिग्गजांनी आपल्या लेखन कारकीर्दीचा काही काळ कथांना विभागून दिला. या दिग्गजांमध्ये सातत्याने दीर्घकथा या फॉर्मशी खेळत आणि त्यातील सर्व शक्यता सूक्ष्म पातळीवर आजमावणारी कथा घेऊन येणारे लेखक म्हणजे भारत सासणे.

    बीड जिल्ह्य़ाचे माजी जिल्हाधिकारी म्हणूनही नावाजलेल्या सासणे यांनी गेली तीन दशके कविता, एकांकिका, नाटके, कादंबरी, बालसाहित्य अशा विविध साहित्यक्षेत्रांत सारख्याच ताकदीने आपली जादुई लेखणी चालविली. मात्र साहित्य जगतात त्यांची कथाकार म्हणून जी ओळख आहे, ती आभाळाएवढी नक्कीच आहे. धुळे शहरामध्ये बालपण घालविलेल्या सासणे यांनी आपल्या लहानपणीच्या भोवतालाचे ठसे लेखनात उमलून आल्याचे नुकतेच कुठेतरी शब्दबद्ध केले आहे.

    जॉन आणि अंजिरी पक्षीपासून त्यांच्या प्रत्येक संग्रहात उत्तरोत्तर माणसाचा शोध गहिरा होत गेला आहे. डफ, उंट, कॅम्प, दुश्चिन्ह आणि चाफ्याचं झाड, रात्र, क्षितिजावरची रात्र, उपसंहार, ठकाजी रामाच्या स्मरणातील रात्र, दु:ख, लग्न, दूर तेथे, दूर तेव्हा, रंगराजाचा अजगर आणि कितीही वाढवत न्यावीत आणि न संपावीत, अशी सासण्यांच्या कथारत्नांची नावे त्यांच्या लेखनाच्या चाहत्यांकडून सांगितली जातील. सूक्ष्म तपशील, खोलवरची चिंतनशीलता, वाचकाला बोट धरून आपल्या विलक्षण सुख-दु:खांच्या जगात नेऊन सोडण्याची हातोटी, तरल काव्यात्मकता आणि तत्त्वज्ञानात्मक आशय ही त्यांच्या कथेची बलस्थाने आहेत. त्यांच्या जमलेल्या कथामफिलीतून दरवर्षी मोजक्याच कथारत्नांद्वारे परिघाबाहेरच्या आणि कल्पनातीत आयुष्यांचे पट सादर होत असतात.

    चिरतरुण दु:खांचे बुरूजदर्शन घडविणाऱ्या या यक्षनगरीच्या सम्राटाला साहित्यातील असाधारण कामगिरीबद्दल जाहीर झालेला लाभसेटवार पुरस्कार त्यांच्या कथांना मिळालेला यथोचित सन्मान म्हणावा लागेल.

      August 5, 2017


  • रोजगार हमी योजनेचे जनक वि. स. पागे

    ग्रामीण भागातील ‘रोजगार निर्मिती’ या क्षेत्रात देशातील इतर राज्यांना आदर्शकृत ठरलेल्या महाराष्ट्राच्या रोजगार हमी योजनेचे जनक आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापतिपद अठरा वर्षे सांभाळणारे ज्येष्ठ गांधीवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वचिंतक विठ्ठल सखाराम तथा वि. स. पागे यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते.

      July 27, 2024


  • समीर धर्माधिकारी

    उत्तम शरीरयष्टी, देखण्या व रुबाबदार अदा यामुळे समीर धर्माधिकारी यांचं व्यक्तिमत्व नायक, खलनायक यासह सर्वच भूमिकांना शोभेल असंच आहे. निर्मला मच्छिंद्र कांबळे, दिल क्या करे, सत्ता, रेनकोट, मनोरंजन-द एंटरटेन्मेंट, अग्नीपंख, मुंबई मेरी जान, गेम, रंग रसिया, सिटी ऑफ गोल्ड अश्या हिंदी तर; रेसटॉरंट, लालबाग परळ, मॅटर, बाबुरावला पकडा, समांतर, मात अश्या मराठी चित्रपटातून समीर धर्माधीकारींनी मध्यवर्ती भूमिका साकारल्या आहेत.

      March 13, 2014


  • प्रा. डॉ. मधुकर केशव ढवळीकर

    पुरातत्त्व शास्त्राची मुहूर्तमेढ रोवणारे आणि या क्षेत्रातील अभ्यासकांसाठी पितामह असलेले प्रा. डॉ. मधुकर केशव
    ढवळीकर यांना यावर्षी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला.

    प्रा. ढवळीकर यांचा जन्म १९३०चा. त्या काळात पुरातत्त्वशास्त्र अगदीच दुर्लक्षित होते. अर्थात आजही त्याबाबत सरकारी पातळीवर उदासीनता आहेच. त्यामुळे पदवी-शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतीय पुरातत्त्व विभागामध्ये १९५३ पासून टेक्निकल असिस्टंट म्हणून कामाला सुरुवात करून ढवळीकर यांना वेगळी दिशा पकडली. प्रा. ढवळीकर यांची अभ्यास, चिकाटी आणि विषयाचा चारी बाजूंनी विचार करण्याची वृत्ती यामुळे त्यांनी या शास्त्राच्या संशोधनात मूलभूत स्वरूपाचे कार्य केले.

      July 26, 2011


  • मराठी चित्रपट संगीत आणि भावगीत गायीका मालती पांडे बर्वे

    मालती पांडे यांच्या घरात संगीताचे वातावरण होते. त्यांचा जन्म १९ एप्रिल १९३० रोजी झाला.

    लहानपणापासूनच गाण्याच्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या मालतीबाईनी त्रिवेदी सर व नाशिकचे भास्करराव घोडके यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. किशोरवयातच त्या गाण्याच्या बैठकी करू लागल्या.महाविद्यालयात असताना ''घराबाहेर ''या नाटकातील त्यांच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. त्यामुळे प्रभातच्या ''आगे बढो''साठी सुधीर फडके यांनी मालती बाईना बोलावले.

    ''वेद मंत्राहून आम्हा वंद्य वन्दे मातरम'',''पुढचे पाउल पुढेच टाका'',''त्या तिथे पलीकडे'',हि त्यांची चित्रपटातील गीते खूप गाजली. मालती पांडे यांनी आपल्या आत्मकथनात लिहिले आहे कि ''त्या तिथे पलीकडे ''हे गीत लतादीदींना इतके आवडले कि एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी ते गायिले होते.

    कोलंबिया कंपनीने त्यांची पहिली ध्वनिमुद्रिका काढली. राजा बढे व संजीवनी मराठे यांचे काव्य तर संगीत होते ''गजाननराव वाटवे यांचे. ''ये पिकवू अपुले शेत मंजुळे'',''आला स्वप्नांचा मधुमास'' अशी ती दोन गीते होती. ''कुणीही पाय नका वाजवू'',''वळणावरून वळली गाडी''ही वाटवे यांनी स्वरबद्ध केलेली तर ''खेड्यामधले घर कौलारू'',''या कातर वेळी ''हि अनिल भारती यांनी लिहिलेली आणि मधुकर पाठक यांनी स्वरबद्ध केलेली मालतीबाईंची गाणी खूप गाजली. आजही त्यांचे ''या कातर वेळी'' हे गीत मनाला वेड लावते. लपविलास तू हिरवा चाफा हे गाणे मा.प्रभाकर जोग यांनी १९६० मा. मालती पांडे यांच्या कडून गाऊन घेतले. गदिमा यांच्या या गाण्याने सगळ्यांना त्या वेळी वेड लावले होते. त्या गाण्यातील फुलुनी राहणे,चोरा तुझिया मनी चांदणे, चोर ही जाणे चंद्र ही जाणे, केली चोरी खपेल काय, ही कडवी मनाचा ठाव घेतात. ''लपविलेल्या हिरव्या चाफ्याचा गंध ''आजही मनामनात दरवळतो आहे. घरात संगीताचं वातावरण असलं की आपसूकच सुरांचे संस्कार मनावर होत असतात.

    संगीत वारसा घरातल्या किमान एकाकडे तरी येत असतो तसेच मालती पांडे यांच्या बाबतीत. गायीका प्रियांका बर्वे ही मालती पांडे-बर्वे यांची नात. तिने सागरिका म्युझिक ‘प्रेमाला’ या अल्बमसाठी, ‘मला सासू हवी’ या मालिकेचं शीर्षकगीतंही गायले आहे. ‘रमा माधव’, ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’, ‘मुक्काम पोस्ट धान्होरी’, ‘गोंदण’ या सिनेमांमध्ये ती गायली आहे. ‘डबलसीट’, ‘बाइकर्स अड्डा’ या सिनेमांसह तिचे काही अल्बमही लवकरच येणार आहेत. गझल, नाटय़गीत, पाश्र्वगायन, लावणी असे सगळेच संगीताचे प्रकार तिच्या आवडीचे आहेत. सिनेमा, मालिकांसोबतच प्रियांका बर्वे ने संगीत नाटकांमध्येही काम करते. राहुल देशपांडे यांच्यासोबत ती ‘मानापमान’, ‘संशयकल्लोळ’ या संगीत नाटकांसाठी ती काम करते.

    मालती पांडे यांचे २७ डिसेंबर १९९७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    लपविलास तूं हिरवा चाफा
    सुगंध त्याचा छपेल का?
    प्रीत लपवूनी लपेल का? ॥धृ.॥
    जवळ मनें पण दूर शरीरें
    नयन लाजरे चेहरे हंसरे
    लपविलेंस तूं जाणुन सारें
    रंग गालिंचा छपेल का? ॥१॥
    क्षणांत हंसणे, क्षणांत रुसणें
    उन्हांत पाऊस, पुढें चांदणें
    हें प्रणयाचें देणें घेणें
    घडल्यावांचुन चुकेल का? ॥२॥
    पुरे बहाणे गंभिर होणें
    चोरा, तुझिया मनीं चांदणें
    चोरहि जाणे, चंद्रहि जाणे
    केली चोरी छपेल का? ॥३॥

    गायिका : मालती पांडे
    गीतकार : ग. दि. माडगुळकर
    संगीत : प्रभाकर जोग

      January 10, 2017


  • भारतीय बुद्धिबळ ग्रॅंडमास्टर अभिजीत कुंटे

    बुद्धिबळ खेळाचा विचार करता अभिजित यांनी गेली अनेक वर्षे महाराष्ट्राचा झेंडा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर सतत उच्चस्थानावर फडकवत ठेवला आहे. गेली अनेक वर्षे अभिजित जागतिक स्तरावर पहिल्या १५० बुद्धिबळपटूंत स्थान टिकवून आहेत.

      March 3, 2025


  • शंकर पुरूषोत्तम आघारकर

    वनस्पतींवर अपार प्रेम करणारा बंडखोर वैज्ञानिक हे वाक्य आले तर पुढील नाव हे आघारकरांचे आले पाहिजे इतकी या जंगलवेड्या निसर्गमित्राला, आजुबाजूच्या झाडा झुडूपांची, पाना फुलांची, पाखरा प्राण्यांची व वनस्पती वेलींची विलक्षण आवड होती.

      July 29, 2011