वैजयंती गुजर-घोलप

बहुमत गाठीशी नसतानाही कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरपदी आपलाच उमेदवार निवडून आणण्याचा विक्रम करून दाखविणारी शिवसेना येत्या काही दिवसांनी त्यांच्याच पसंतीचा उमेदवार स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवडून आणून दाखविण्याचा पराक्रम करेल, अशी दाट शक्यता पालिका वर्तुळात व्यक्त केली जात आहे. अर्थात हा चमत्कार काही केवळ पक्षनेतृत्वाच्या चलाखपणातून घडला असेल वा घडेल अशी शक्यता नाही,

ते घडण्याला खऱ्या अर्थाने कारणीभूत ठरले आहे ते महापौरपदावरील व्यक्तीचे, म्हणजे वैजयंती गुजर घोलप यांचे, अजातशत्रू आणि कार्यप्रवण व्यक्तिमत्व. वैजयंतीताई नगरसेवकपदी सर्वप्रथम निवडून आल्या त्यालाही आता पंधरा र्वषे होऊन गेली. २०१० च्या निवडणुकीत एकतर भलेभले तिकिटाविना राहिले, किंवा तिकिटे मिळालीच तर मनसेच्या लाटेत उद्ध्वस्त तरी झाले अशी बहुसंख्य उमेदवारांची स्थिती असताना एकाच वॉर्डातून सलग चौथ्यांदा निवडून जाणाऱ्या, आणि तिकिट नको असे म्हटल्यानंतरही तुम्हालाच तिकिट घ्यावे लागेल हा पक्ष नेतृत्वाचा आदेश मानणे भाग पडलेल्या, वैजयंतीताईंनी यंदा हा महापराक्रम केला आहे.

वैजयंतीताईंचा जन्म कल्याणचा, शिक्षण कल्याणचं, सामाजिक कार्य कल्याणातलं, नोकरी कल्याणातली आणि विवाहही कल्याणच्याच समविचारी कार्यकर्त्यांबरोबरचा. धनगर समाजात त्या जन्मल्या, घरचा व्यवसायच खाटकाचा. आईवडील मटणविक्रीच्या व्यवसायात. पण दोघंही सातवीपर्यंत शिकलेली असल्यानं त्यांनी वैजयंतीताईंना आनंदानं शाळेत घातलं. शाळकरी वयातच आईवडील दोघंही दुकानावर जात असल्यानं स्वयंपाकघर सांभाळण्यापासून सारी कामं वैजयंतीताईं करू लागल्या. गणित चांगलं, त्यामुळे दुकानाचे हिशेबठिशेब वैजयंतीताईंकडेच असत.

उत्तम गुण मिळवून त्या दहावी पास झाल्या खऱ्या, पण इंग्रजी फारसं चांगलं नसल्यानं त्यांनी कलाशाखेकडे प्रवेश घेतला. अकरावीचं पहिलं र्वष कसंबसं पार पडलं, पण बारावीच्या पहिल्या महिन्या-दोन महिन्यातच वैजयंतीताईंना आपली चूक कळून आली, त्यांनी थेट प्राचार्याच्या केबिनवरच धडक मारून कॉमर्सला प्रवेश मागितला. कॉमर्स विषयांची चाचणी द्यावी लागेल असं प्राचार्यानी बजावलं. गणित चांगलं होतंच, मनापासून अभ्यास करून ताईंनी दोन्ही विषयात पहिला वर्ग मिळवला, कॉमर्सला प्रवेश घेतला आणि त्या सरळ कॉमर्स पदवीधर झाल्या. पदवीधर झाल्यानंतर मटणविक्रीच्या दुकानावर बसणं काही शक्य नव्हतं, त्यामुळे नोकरी करणं ओघानं आलंच, अपंगांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेत कारकून म्हणून त्या नोकरीस लागल्या आणि पुढली सारी र्वष नगरसेवक म्हणून सार्वजनिक कार्य करीत असतानाही त्यांची नोकरी सुरूच राहिली.

तीस मुलांनिशी त्यांनी सुरू केलेली ती संस्था, आता दोनशे मुलांच्या निवासी शाळेत रूपांतरित झाली आहे आणि जैन समाजातली काही परिचित मंडळी आता ती चालवताहेत, पण वैजयंतीताईंचा संस्थेशी असणारा संबंध पूर्वीप्रमाणेच कायम आहे. महापौरपदी गेल्यामुळे आता दाराशी गाडी आहे, पण ती गाडीही अडल्यानडल्यासाठी ठेवून वैजयंतीताई आजही पायी फिरणंच पसंत करतात. निवडून गेल्यानंतर सगळे मतदार सारखेच, पक्षीय बंधनांमध्ये न अडकता प्रत्येकासाठी धावून जाणं, आनंदाच्या क्षणांबरोबरच मृत्युप्रसंगी तिरडी बांधण्यापर्यंत सहभागी होणं हे वैजयंतीताईंनी विनासंकोच केलं म्हणूनच मतदानप्रसंगी अवास्तव खर्च करण्याची वेळ त्यांचेवर कधी आली नाही.

नोकरी होती तेव्हा पगार मिळायचा, पण नगरसेवकपदाचं मानधन आणि नोकरीतला पगार खर्च व्हायचा तो सार्वजनिक कामासाठी, महिनाअखेरीला पर्समध्ये ठणठणाटच असायचा. महापौर झाल्याच्या निमित्तानं एका संस्थेनं वैजयंतीताईंच्या आईवडिलांचा सत्कार केला, सत्कारासाठी आलेल्या पाहुण्यांचं चहापान त्यांच्याच घरी झालं, ते स्वाभाविकही होतं. पण अस्वाभाविक होतं, ते त्यांचं स्वत:च पुढे होऊन चहाचे कप देण्यासाठी धावपळ करणं. वडिलांच्या आजारपणामुळे सत्कार घरगुतीच होता, आणि तोही घरासमोरच्याच मोकळ्या जागेत.

आयोजकही होते स्थानिकच. पण आईचा सत्कार करताना, तिला साडी देण्याची वेळ आली तेव्हा साडीवर रीतीप्रमाणे हळद-कुंकवाचं बोट लावायला पाहिजे असं कुणातरी म्हणालं आणि आपलं पद विसरून कुंकवाची कुयरी आणण्यासाठी मैदानातून थेट घराकडे धाव घेतली, ती वैजयंतीताईंनीच. कार्यकर्तेपण इतकं निखळ पारदर्शी असू शकतं याची ती खूणगाठच होती. वैजयंतीताई आता 'महापौर आपल्या दारी' हा कार्यक्रम घेऊन मतदारांना सामोऱ्या जाताहेत, असा कार्यक्रम घेणाऱ्या त्या काही पहिल्याच नव्हेत, पण त्यांच्याठायी असलेली कार्यप्रवणता आणि त्याला मिळणारी तेवढीच जनताभिमुख आयुक्ताची जोड याबरोबरच त्यांचा आजवरचा पारदर्शकतेचा व्यवहार पाहता मतदारांना खरोखरीच महापौर आपल्या दारी आल्याचे अनुभवण्यास मिळेल अशी आशा करावयास हरकत नाही.

बहुमत गाठीशी नसतानाही कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरपदी आपलाच उमेदवार निवडून आणण्याचा विक्रम करून दाखविणारी शिवसेना येत्या काही दिवसांनी त्यांच्याच पसंतीचा उमेदवार स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवडून आणून दाखविण्याचा पराक्रम करेल, अशी दाट शक्यता पालिका वर्तुळात व्यक्त केली जात आहे. अर्थात हा चमत्कार काही केवळ पक्षनेतृत्वाच्या चलाखपणातून घडला असेल वा घडेल अशी शक्यता नाही,

ते घडण्याला खऱ्या अर्थाने कारणीभूत ठरले आहे ते महापौरपदावरील व्यक्तीचे, म्हणजे वैजयंती गुजर घोलप यांचे, अजातशत्रू आणि कार्यप्रवण व्यक्तिमत्व. वैजयंतीताई नगरसेवकपदी सर्वप्रथम निवडून आल्या त्यालाही आता पंधरा र्वषे होऊन गेली. २०१० च्या निवडणुकीत एकतर भलेभले तिकिटाविना राहिले, किंवा तिकिटे मिळालीच तर मनसेच्या लाटेत उद्ध्वस्त तरी झाले अशी बहुसंख्य उमेदवारांची स्थिती असताना एकाच वॉर्डातून सलग चौथ्यांदा निवडून जाणाऱ्या, आणि तिकिट नको असे म्हटल्यानंतरही तुम्हालाच तिकिट घ्यावे लागेल हा पक्ष नेतृत्वाचा आदेश मानणे भाग पडलेल्या, वैजयंतीताईंनी यंदा हा महापराक्रम केला आहे.

वैजयंतीताईंचा जन्म कल्याणचा, शिक्षण कल्याणचं, सामाजिक कार्य कल्याणातलं, नोकरी कल्याणातली आणि विवाहही कल्याणच्याच समविचारी कार्यकर्त्यांबरोबरचा. धनगर समाजात त्या जन्मल्या, घरचा व्यवसायच खाटकाचा. आईवडील मटणविक्रीच्या व्यवसायात. पण दोघंही सातवीपर्यंत शिकलेली असल्यानं त्यांनी वैजयंतीताईंना आनंदानं शाळेत घातलं. शाळकरी वयातच आईवडील दोघंही दुकानावर जात असल्यानं स्वयंपाकघर सांभाळण्यापासून सारी कामं वैजयंतीताईं करू लागल्या. गणित चांगलं, त्यामुळे दुकानाचे हिशेबठिशेब वैजयंतीताईंकडेच असत.

उत्तम गुण मिळवून त्या दहावी पास झाल्या खऱ्या, पण इंग्रजी फारसं चांगलं नसल्यानं त्यांनी कलाशाखेकडे प्रवेश घेतला. अकरावीचं पहिलं र्वष कसंबसं पार पडलं, पण बारावीच्या पहिल्या महिन्या-दोन महिन्यातच वैजयंतीताईंना आपली चूक कळून आली, त्यांनी थेट प्राचार्याच्या केबिनवरच धडक मारून कॉमर्सला प्रवेश मागितला. कॉमर्स विषयांची चाचणी द्यावी लागेल असं प्राचार्यानी बजावलं. गणित चांगलं होतंच, मनापासून अभ्यास करून ताईंनी दोन्ही विषयात पहिला वर्ग मिळवला, कॉमर्सला प्रवेश घेतला आणि त्या सरळ कॉमर्स पदवीधर झाल्या. पदवीधर झाल्यानंतर मटणविक्रीच्या दुकानावर बसणं काही शक्य नव्हतं, त्यामुळे नोकरी करणं ओघानं आलंच, अपंगांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेत कारकून म्हणून त्या नोकरीस लागल्या आणि पुढली सारी र्वष नगरसेवक म्हणून सार्वजनिक कार्य करीत असतानाही त्यांची नोकरी सुरूच राहिली.

तीस मुलांनिशी त्यांनी सुरू केलेली ती संस्था, आता दोनशे मुलांच्या निवासी शाळेत रूपांतरित झाली आहे आणि जैन समाजातली काही परिचित मंडळी आता ती चालवताहेत, पण वैजयंतीताईंचा संस्थेशी असणारा संबंध पूर्वीप्रमाणेच कायम आहे. महापौरपदी गेल्यामुळे आता दाराशी गाडी आहे, पण ती गाडीही अडल्यानडल्यासाठी ठेवून वैजयंतीताई आजही पायी फिरणंच पसंत करतात. निवडून गेल्यानंतर सगळे मतदार सारखेच, पक्षीय बंधनांमध्ये न अडकता प्रत्येकासाठी धावून जाणं, आनंदाच्या क्षणांबरोबरच मृत्युप्रसंगी तिरडी बांधण्यापर्यंत सहभागी होणं हे वैजयंतीताईंनी विनासंकोच केलं म्हणूनच मतदानप्रसंगी अवास्तव खर्च करण्याची वेळ त्यांचेवर कधी आली नाही.

नोकरी होती तेव्हा पगार मिळायचा, पण नगरसेवकपदाचं मानधन आणि नोकरीतला पगार खर्च व्हायचा तो सार्वजनिक कामासाठी, महिनाअखेरीला पर्समध्ये ठणठणाटच असायचा. महापौर झाल्याच्या निमित्तानं एका संस्थेनं वैजयंतीताईंच्या आईवडिलांचा सत्कार केला, सत्कारासाठी आलेल्या पाहुण्यांचं चहापान त्यांच्याच घरी झालं, ते स्वाभाविकही होतं. पण अस्वाभाविक होतं, ते त्यांचं स्वत:च पुढे होऊन चहाचे कप देण्यासाठी धावपळ करणं. वडिलांच्या आजारपणामुळे सत्कार घरगुतीच होता, आणि तोही घरासमोरच्याच मोकळ्या जागेत.

आयोजकही होते स्थानिकच. पण आईचा सत्कार करताना, तिला साडी देण्याची वेळ आली तेव्हा साडीवर रीतीप्रमाणे हळद-कुंकवाचं बोट लावायला पाहिजे असं कुणातरी म्हणालं आणि आपलं पद विसरून कुंकवाची कुयरी आणण्यासाठी मैदानातून थेट घराकडे धाव घेतली, ती वैजयंतीताईंनीच. कार्यकर्तेपण इतकं निखळ पारदर्शी असू शकतं याची ती खूणगाठच होती. वैजयंतीताई आता ‘महापौर आपल्या दारी’ हा कार्यक्रम घेऊन मतदारांना सामोऱ्या जाताहेत, असा कार्यक्रम घेणाऱ्या त्या काही पहिल्याच नव्हेत, पण त्यांच्याठायी असलेली कार्यप्रवणता आणि त्याला मिळणारी तेवढीच जनताभिमुख आयुक्ताची जोड याबरोबरच त्यांचा आजवरचा पारदर्शकतेचा व्यवहार पाहता मतदारांना खरोखरीच महापौर आपल्या दारी आल्याचे अनुभवण्यास मिळेल अशी आशा करावयास हरकत नाही.

Author