(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • डॉ श्रीकांत जिचकार…. वकिल, डॉक्टर ,आयपीएस, आयएएस +++

    एकच माणूस डॉक्टर होता, तो वकिलही होता, तो आयपीएस म्हणजे जिल्हा पोलिस प्रमुख दर्जाचा अधिकारी तसंच आयएएस म्हणजे कलेक्टर दर्जाचा अधिकारी होता. याशिवाय तो पत्रकारही होता. इतकंच नाही तो किर्तनकार, आमदार, खासदार आणि मंत्रीही होता. इतक्या पदव्या मिळवणारा ज्ञानयोगी म्हणजे श्रीकांत जिचकार होय.

      October 17, 2019


  • दीपक मुजुमदार

    दीपक मुजुमदार एक यशस्वी भरतनाट्यम नर्तक, गुरु आणि नृत्य दिग्दर्शक या तीनही वैशिष्ट्यांचे मानकरी ठरले आहेत. नृत्यातील आपल्या अभिनय कौशल्याने दीपकजींनी भारतीय शास्त्रीय नृत्याची जगभरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

      May 29, 2014


  • हार्मोनियम व ऑर्गन वादक पं.गोविंदराव पटवर्धन

    आज २१ सप्टेंबर
    शब्दास्वरांचे जादुगार महान हार्मोनियम व ऑर्गन वादक पं.गोविंदराव पटवर्धन यांचा जन्म २१ सप्टेंबर १९२३ रोजी झाला.

    गोविंदराव पटवर्धन बोटात विलक्षण जादू असलेला कलाकार! हार्मोनियमवर ज्या सफाईने त्यांची बोटं फिरत, त्यात ते स्वरालयीची जी कामगत करत ते केवळ दैवी म्हणावं लागेल.

    जन्मताच सूर,ताल व लय यांची निसर्गदत्त देणगी लाभलेले गोविंदराव यांनी आपल्या मुंजीत हार्मोनियम वाजवून आपल्या सुप्त गुणाची चुणूक दाखवली होती. आपल्या वयाच्या १४ व्या वर्षी संगीत वेणुनाद या नाटकाच्या प्रयोगाला ऑर्गन ची साथ केली होती.

    विशेष हार्मोनिअमच्या साडेतीन सप्तकांवर अधिराज्य गाजवणाऱ्या गोविंदराव यांनी वादनाचं कोणतंही तांत्रिक शिक्षण घेतलेलं नव्हतं, ते स्वतः उत्तम तबला वादकही होते. त्यामुळे लय, ताल यावर त्यांचे प्रभुत्व होते.

    १९४० साली मुंबईला आल्यावर पं गोविंदराव साहित्य संघाच्या संगीत नाटकांना ऑर्गनची साथ करू लागले. त्या वेळी देवधर स्कूल ऑफ म्युझिक व मनहर बर्वे यांच्या विद्यालयात पं. कुमार गंधर्व व पं.राम मराठे यांची ओळख झाली, तेव्हा पासून अखेर पर्यत पं गोविंदराव यांनी त्यांना साथ केली. कोणत्या स्वरासाठी कोणतं बोट वापरायचं, असं विचारलं तर ते म्हणायचे - मी फक्त वाजवतो. बाकीचं काही मला माहीत नाही. त्यातून मला आनंद मिळतो असं ते सांगायचे.

    पेटीवादन हे दोन प्रकारे केलं जातं. एक म्हणजे प्रत्येक स्वर सुटासुटा वाजवणं आणि दुसरा म्हणजे जोडून वाजवणं. गोविंदराव या दोन्ही पध्दतींनी वाजवायचे. हार्मोनियम व ऑर्गन वादनातला सफाईदारपणा हे त्यांच्या वादनाचं वैशिष्टय होतं. अतिशय जलद आणि सफाईदार पलटे ते वाजवत असत. त्यांची दुसरी खासियत म्हणजे ते पद वाजवताना त्यातले शब्द ऐकू आले पाहिजेत असा त्यांचा आग्रह असायचा. ते आपल्या शिष्यांना शिकवतानाही ते त्याच पध्दतीने शिकवायचे.

    गोविंदराव पटवर्धन यांना पेटीवर्धन पण म्हणत असत. त्यांना गोविंदराव असे म्हणलेले रुचत नसे, ते नम्रतेने म्हणत गोविंदराव म्हणायच्या योग्यतेचे एकच पं गोविंदराव टेंबे मला नुसतेच गोविंदा म्हणा, खरेतर आपल्या गुहाघरवासीयांनी गोंद्या म्हणून हाक मारलेले त्यांना आवडायचे. अनेक संगीत कार्यक्रमांमधून, संगीत नाटकांतून त्यांनी साथसंगत केली. आलापी, तान वाजवण्यातली सफाई होती. आयुष्यभर रामभाऊ मराठे, कुमार, वसंतराव, छोटा गंधर्व यांसारख्या दिग्गज कलाकारांना साथ करून करून वादनातलं हे गायकी अंग गोविंदरावांनी आत्मसात केलं होते, व स्वत:त अक्षरश: मुरवलं होते.

    गोविंदराव पटवर्धन यांच्या एकसष्ठी सत्कारात पु.ल नी त्यांच्या बरोबर हार्मोनियम वादन केले होते, तेव्हा पु.ल मार्मीकतेने म्हणाले होते, पोटात व पोटरीत गोळा येतो हे माहिती होते पण बोटातही गोळा येतो हे आज प्रथम समजले.

    पं. गोविंदराव पटवर्धन यांचे पट्टशिष्य म्हणून डॉ.विद्याधर ओक यांना ओळखले जाते. त्याच्या इतर शिष्यांमध्ये पं. विश्वनाथ कान्हेरे, मकरंद कुडले, विघ्नेश्र्वर जोशी, अशी नावे घेता येतील. आदित्य ओक तर लहानपणापासून गोविंदराव पटवर्धन यांचे हार्मोनियम वादन ऐकत आला आहे. तो पण त्यांचाच शिष्य.

    पं. गोविंदराव पटवर्धन यांचे ३० जानेवारी १९९६ रोजी निधन झाले.

    गोविंदराव पटवर्धन एक हार्मोनियम बरोबरच उत्कृष्ट ऑर्गनवादक होते. त्यांच्यासंबधी काही प्रसंग

    एकदा कोकणात काही वर्षापूर्वी एक नाटक होतं साथीला गोंविंदराव होते आणि वयाच्या पंच्याहत्तरीत असलेले छोटा गंधर्व गायला आले होते तेव्हा एका पदाच्या वेळी गोविंदराव आणि तबलजी गंधर्वाँधा कैक वेळ समेवर यायलाच देत नव्हते त्यावर छोटा गंधर्व गोविँदरावांना म्हणाले, "अरे गोविंदा माझं वय पंच्याहत्तर आहे आता मी दमलोय आता थांब" गंधर्वाँची ही वाक्य गोविंदरावानी ऑर्गनवर जशीच्या तशी उतरवली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.

    पूर्वी नाटकं उघड्यावर आणि बत्तीच्या उजेडात होत. असंच एका उत्सवाच्या प्रसंगी नाटकाचं आयोजन करण्यात आलं साथीला गोविंदराव होते साधारण दहाचं नाटक पण साडेनवाच्या सुमारास अचानक पाऊस सुरु झाला सहाजीकच नाटक रद्द झालं त्यावर कोणीतरी म्हणालं गोविंदराव "तुमचा ऑर्गनवादनाचा कार्यक्रम देवळात होऊ दे" ते गोविंदरावानी मान्य केलं आणि हा त्यांचा कार्यक्रम तब्बल पहाटे साडेतीन वाजेपर्यँत रंगला.

    पं. गोविंदराव पटवर्धन यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त पु.ल.देशपांडे यांनी केलेले भाषण.
    http://www.marathisrushti.com/mvideos/speeches-by-pu-la-deshpande-about-pt-govindrao-patwardhan/

    पं. गोविंदराव पटवर्धन यां चे व्हिडीओ
    www.youtube.com/watch?v=0JWkKjxNGNc
    www.youtube.com/watch?v=5qXM9L3bjBA
    www.youtube.com/watch?v=_c-JWigeh3I
    https://www.youtube.com/watch?v=JM1jtZJRLxE
    https://www.youtube.com/watch?v=eYjUcsXukMY
    https://www.youtube.com/watch?v=m8KcijSZvEY

    पं. गोविंदराव पटवर्धन यांचे मराठीसृष्टीवरील लेख.

    शब्दास्वरांचे जादुगार महान हार्मोनियम व ऑर्गन वादक पं.गोविंदराव पटवर्धन (31-Jan-2017)

    शब्दास्वरांचे जादुगार पं. गोविंदराव पटवर्धन (8-Oct-2017)

    #PtGovindraoPatwardhan #GovindraoPatwardhan

      May 5, 2022


  • प्रमिला दातार

    प्रमिला दातार यांनी ज्येष्ठ गायक तलत महमूद यांच्याबरोबर परदेशात वेस्ट इंडिज, जमेका आणि शेवटी लंडन अनेक यशस्वी दौरे केले. हे सर्व चालू असतानाच रफी साब… किशोर कुमार जी…मन्ना डे यांच्या सारख्या महान गायकांबरोबर त्यांनी भरपूर परदेश दौरे केले.

      July 8, 2022


  • प्रसिद्ध संतूर वादक शिवकुमार शर्मा

    संतूर या तंतुवाद्याची ओळख-
    शिवकुमार शर्मा यांनी संतूर हे वाद्य जगासमोर आणले. सिनेमा संगीतमध्ये एक काळ असा होता की, या वाद्याशिवाय पार्श्व संगीताला पूर्णत: येऊच शकत नसे. रम्य हिमपर्वत दाखवायचा, तर तिथे संतुर हवेच! लोकसंगीतात वापरल्या जाणार्याा संतुरमध्ये पं. शिवकुमार शर्मांनी आपल्या संगीताच्या गरजेनुसार काही सुधारणा केल्या आणि फार मोठ्या अपेक्षेने हे वाद्य शास्त्रीय संगीताच्या दरबारात आणले. श्रोत्यांनी त्यांना अपेक्षेबाहेर प्रोत्साहन दिले. त्यानंतर शिवकुमारांनी याच वाद्याच्या जोरावर अनेक चित्रपटांनाही संगीत दिले. त्यात ‘सिलसिला’ हा अप्रतिमच! संतुरला एका उंचीवर नेऊन ठेवणार्यार शिवकुमारांनंतर अनेक कलाकारांनी या वाद्याची कास धरून नंतर नाव कमावले आहे. त्यातल्या पं. उल्हास बापट यांचा उल्लेख खास म्हणून करावा लागेल. त्यांनी तर प्रत्येक रागानंतर स्वर जोडणी करायला लागू नये म्हणून हार्मोनियमप्रमाणे क्रोमॅटिक स्केलचे खास संतुर बनविले आहे. म्हणजे काय सांगायचे झाले, तर सा नंतर ओळीने कोमल तीव्र सर्व स्वर जोडून तीन सप्तकांची योजना केली आहे. ही तरी खूप छान सोय झाली.

    संतूर हे जम्मू काश्मिरमधले तिथल्या 'सुफीयाना मौसिकी' या लोकसंगीतात वापरले जाणारे एक साधेसुधे वाद्य. स्वरमंडलसारखी रचना असलेले आणि जेमतेम दीड सप्तकांचा आवाका असलेले हे तंतुवाद्य काश्मिरी लोकगीते गाताना साथीला घ्यायची खरे तर तिथली परंपरा होती, स्वर तारांच्या खेचीतून निर्माण होतो हा तंतुवाद्यातला सर्वसामान्य नियम आहे. या नियमाला धरून शेकडो वाद्ये जगभरात उत्पन्न झाली. खरेतर या वाद्यांची गणती करावी लागेल. जितक्या संस्कृती तितकी वाद्ये, असा हा भाग आहे. धनुर्वीणेचे असेच अनंत प्रकार आहेत. हार्प हे आजही वापरले जाणारे याच वर्गातले वाद्य आहे. याचप्रकारच्या वाद्यामध्ये वेगळेपणा दाखविणारे स्वरमंडल हे अत्यंत लोकप्रिय वाद्य आपल्याला नेहमी पहायला मिळते. हे वाद्य विशेष करून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गाणारे गायक/गायिका आपल्या हातात धरून गाताना वाजवीत असतात. शिवाय सिनेमाच्या, मालिकांच्या अथवा नाटकांच्या पार्श्वासंगीतासाठीही याचा उपयोग हमखास केला जातो. या वाद्यात वेगळेपणा आहे, असे म्हटले. याचे कारण हे वाद्य धनुराकृती नसून एका बंद पेटीप्रमाणे याचा आकार असतो.

    वरची बाजू मोकळी असते आणि दोनही बाजूंनी तारा खेचणारे खिळे ठोकलेले असतात. ही पेटी मंद्र स्वरांकडे रुंद असते, तर तार स्वरांकडील बाजू निमुळती असते. जास्त रुंदीचा भाग साधारण दीड फूट, तर कमी रुंदीचा भाग नऊ ते दहा इंच असतो. अशाचप्रकारचे कानून नावाचे एक वाद्य इराणी संगीतात वापरले जाते. काही अभ्यासकांच्या मते हे वाद्यच स्वरमंडलाचे प्रेरक वाद्य आहे. तान के कप्तान असा ज्यांचा हिंदुस्थानी संगीतात लौकिक आहे, असे तानरसखाँ यांनी याचा वापर प्रथम आपल्या गायनात केला, असे म्हटले जाते. पतियाळा घराण्याच्या सर्वच कलाकारांनी स्वरमंडल आपल्या गायनासोबतीला खास करून वापरले आहे. बडे गुलाम अलीखाँसाहेब, सलामत नझाकत, मुनव्वर अली यांनी हे वाद्य अधिक लोकप्रिय केले. कालांतराने स्वरमंडल घेऊन गायची एक स्टाईलच निर्माण झाली. अजय पोहनकर, पं. जसराज, निर्मला देवी, परवीन सुलताना आणि अलीकडे उस्ताद राशीद खाँ या सर्वांनी स्वरमंडलाचा जाणीवपूर्वक वापर केला आणि आपल्या स्वरांना एक साज चढविला. या वाद्यामध्ये रागाप्रमाणे स्वर नियुक्त करावे लागतात. शुद्ध स्वर अधिक असणार्या.

    रागानंतर कोमल स्वर अधिक असणारा राग गायचा असल्यास स्वरजोडणी करायला थोडा वेळही लागत असतो. तेव्हा श्रोत्यांना थोडी कळ काढावी लागत असते.

    संतुर दिसायला असेच पण तंत्रामध्ये सर्वस्वी भिन्न असे संतुर हे वाद्य खूपच लोकप्रिय असे आहे. पं. शिवकुमार शर्मा यांनी या वाद्याला काश्मीरच्या खोर्याेतून हिंदुस्थानी संगीताच्या व्यासपीठावर आणले. तसे पाहता हे वाद्य प्राचीन आहे. अनेक पिढ्यांपासून हे वाद्य काश्मीरमध्ये वाजविले जाते. वैदिक ग्रंथात वनवीणा नावाच्या एका वाद्याचा उल्लेख आहे. त्यात शंभर तारा असत. छोट्या काठ्यांनी तारांवर आघात करून ते वाजविले जात असे. संतुर या वाद्यालाही शततंत्री वीणा असे नाव आहे. एक प्रकारच्या खास काठ्यांनी तारांवर आघात करून यावर स्वरनिर्मिती केली जाते. काठ्यांच्या टोकावर एक बाक असतो, ज्यामुळे स्वराघात नाजूक होतात.

    चतुर्भुज आकाराची एक पेटी असणारा या वाद्याचा आकार असतो. वरील भागात दोन दोन मेरूंच्या पंधरा ओळी असतात. एका मेरूवर एकाच स्वरांच्या चार तारा जोडलेल्या असतात. याशिवाय काही संतुरांमध्ये सिंपथेटिक (सहायक ध्वनी) तारांचीही सोय केलेली असते. डलसिमर या इलेक्ट्रॉनिक वाद्याशी याचे साधर्म्य असते.

    नंदन हेर्लेकर /पुढारी
    संकलन.संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      January 15, 2018


  • सुधा वर्दे

    स्वातंत्र्याचा लढा, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि राष्ट्रीय सेवादलाशी जोडले गेलेले प्रमुख महिलांपैकी एक नाव आणि राष्ट्रीय सेवादलाच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणजे सुधा वर्दे. माहेरचं अनुताई कोतवाल हे नाव असलेल्या सुधाताईंचा जन्म १९३२ सालचा;लहानपणापासूनच सुधाताईंना विविध कलांची आवड होती.

      April 18, 2014


  • डॉ. राणी बंग

    गडचिरोली जिल्ह्यातील सर्च या सामाजिक संस्थेच्या संस्थापक व सहसंचालिका डॉ.राणी बंग यांची भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे २००८ मध्ये दिल्या जाणार्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली.

      November 9, 2010


  • ज्येष्ठ साहित्यिका प्रा. मृणालिनी जोगळेकर

    उत्कृष्ट वक्त्या व कथाकथनकार असणाऱ्या जोगळेकरांचा विद्यार्थ्यांमध्ये साहित्याविषयी रुची निर्माण करण्यात हातखंडा होता. संध्याकाळचा चेहरा व रंग अमेरिकेचे प्रवासिनी आदी त्यांची माहित्यकृती मराठी रसिकांच्या मनांत घर करून राहिली. ‘संध्याकाळचा चेहरा’ या कादंबरीला राज्य शासनाचे कथासंग्रहासाठीचे प्रथम पारितोषिक मिळाले. ‘लोकसत्ता’ मध्ये त्यांनी प्रवासवर्णनावर आधारीत ‘प्रवासिनी’ या लेखमालिकेचे लेखन केले होते. तुकारामांचे फ्रेंचमधील अभ्यासक फादर दलरी यांचे चरित्रही लिहीले.

      March 31, 2022


  • रामचंद्र गणेश कुंदगोळकर (सवाई गंधर्व)

    ज्यांच्या नावाने पुण्याचा संगीत महोत्सव अवघ्या भारतात नव्हे तर अवघ्या जगभरात गाजतो आहे व त्या महोत्सवात आपल्या गायनाची गुरूंची व घराण्याची गायकी गायला मिळावी म्हणून काही नवीन कलाकार कसोशीने प्रयत्न व प्रयास करत असतात. तसेच काही जेष्ठ व श्रेष्ठ गायक आणि वादक नेहमी हजेरी लावत असतात व त्यांच्या गायन वादनाने मंत्रमुग्ध होण्यासाठी सगळेच कानसेन त्या महोत्सवाची आतूरतेने वाट बघत असतात असा सवाई गंधर्व महोत्सव जो दर वर्षी पुण्यात न चुकता होतो व ज्याच्यां नावाने होतो ते सवाई गंधर्व उर्फ रामचंद्र गणेश कुंदगोळकर.

      August 12, 2011


  • गायिका धोंडूताई कुलकर्णी

    धोंडुताई यांनी सुरवातीला जयपूर घराण्याचे उस्ताद अल्लदिया ख़ाँ साहेब यांचे भाचे नथ्थन ख़ाँ यांच्याकडे तीन वर्ष शिकल्या. त्यानंतर याच घराण्याची तालीम त्यांनी आयुष्यभर घेतली.

      August 5, 2021