(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • डॉ. रखमाबाई जनार्दन सावे

    Licentiate of the Royal College of Physicians and Surgeons’ ही पदवी मिळाल्यानंतर त्यांचं नांव इंग्लंडच्या ‘मेडिकल रजिस्टर’मध्ये सनदशीर दाखल झालं.रखमाबाईंना शिक्षणात आर्थिक मदत करणाऱ्या ‘डफरिन फंडा’तर्फे एकूण सात रुग्णालये उघडण्यात आली. पहिलं दिल्लीत निघालं. त्यानंतर मुंबईत ‘कामा हॉस्पिटल’, नंतर मग सुरत, बडोदा, मद्रास अशी पुढची रुग्णालयं चालू झाली. रखमाबाईंनी डॉक्टरी व्यवसायाची सुरुवात कामा हॉस्पिटलमध्ये केली. तिथे त्यांची नेमणूक ‘हाऊस सर्जन’ म्हणून झाली.

      June 29, 2022


  • मराठमोळी मॉडेल सुपर उज्वला राऊत

    रेम्प वॉक करणारी ती पहिली भारतीय मॉडेल होती. उज्वला राऊतने मिलिंद सोमण बरोबर किंगफिशर कैलेंडर हंट स्पर्धेत जज म्हणून काम केले होते. उज्ज्वला राऊतने Elle, Time and Official अशा मासिकाच्या साठी कव्हर गर्ल काम म्हणून काम केले आहे. उज्ज्वला राऊत पहिली भारतीय मॉडेल आहे के जिने फेमस लॉन्जरी व अमेरिकन डिझायनर विक्टोरिया सीक्रेटच्या साठी रॅम्प वॉक केले आहे.

      June 14, 2022


  • बॉलिवूड खलनायक अभिनेते अजीत

    अजीत या सिनेमातील मुख्य खलनायक होते. ‘जंजीर’नंतर अजीत यांना खलनायकाच्या रुपात वेगळी ओळख मिळाली.

      October 22, 2021


  • ज्येष्ठ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक मा.बी. आर. इशारा

    हिंदी चित्रपटात काम करण्यासाठी मा.बी. आर.इशारा १९६० च्या दशकात मुंबईत आले. त्यांचा जन्म ७ सप्टेंबर १९३४ रोजी झाला. हिंदी चित्रपटांत नवीन ज्वलंत विषयांची लाट आणण्याचे काम बी. आर. इशारा यांनी १९७० च्या दशकात केले.

    "इन्साफ" या चित्रपटाच्या लेखनापासून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी १९६९ ते १९९६ या काळात ३४ चित्रपट बनवले. मा.बी. आर.इशारा यांनी चित्रपटसृष्टीत "बोल्ड‘ विषय आणले. कोणीही हाताळले नाहीत, अशा विषयांवर त्यांनी चित्रपट तयार केले. "चेतना‘मध्ये त्यांनी वेश्यां च्या पुनर्वसनासारखा विषय घेतला. हा चित्रपट २५ दिवसांत पूर्ण झाला होता.

    बंगल्यात चित्रीकरण करण्याचा पायंडा त्यांनी पाडला. त्यांनी "प्रेम शस्त्र‘, "औरत और इंतकाम‘, "वो फिर आयेगी‘, "हम दो हमारे दो‘, "जरूरत‘, "मिलाप‘ आदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांनी अनेक नवोदित कलाकारांना हिंदी चित्रपटसृष्टीचे दार उघडून दिले. त्यामध्ये परवीन बाबीचा समावेश होता.

    अमिताभ बच्चन, जया भादुरी, शत्रुघ्न सिन्हा, डॅनी, रेहाना सुलतान, विजय अरोरा, रीना रॉय, रझा मुराद आदी अभिनेत्यांसह क्रिकेटपटू सलीम दुराणी यांच्यासह इशारा यांनी काम केले. चित्रपटांचे लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन अशा तिन्ही जबाबदाऱ्या त्यांनी कौशल्याने पार पाडल्या.

    ज्येष्ठ कलाकार रेहाना सुलतान ह्या बी. आर. इशारा यांच्या पत्नी होत. बी.आर.इशारा यांचे २५ जुलै २०१२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      July 29, 2017


  • भारताचे आठवे राष्ट्रपती आर. वेंकटरामन

    गोवा-मुक्तीनंतर पोर्तुगलला भेट देणारे तसेच चीनला अधिकृत भेट देणारे वेंकटरामन हे पहिलेच भारतीय राष्ट्रपती । कामराज यांच्या रशिया भेटीवर आधारित प्रवासवर्णनासाठी त्यांना सोव्हिएट लँड-नेहरू पारितोषिक देण्यात आले.

      November 2, 2023


  • सुशिक्षित सभ्य सज्जन अभिनेता – देवेन वर्मा

    ह्या माणसाने आपल्या “अभिनेता” असल्याच्या स्टेटस चा बाऊ केला नाही. त्याने मला सुरवातीला फोन केला तेव्हा मी फिल्म अभिनेता “देवेन वर्मा” असे सांगितले नाही. माझ्यासाठी दोन दिवस थांबला.त्याच्या घरी गेल्यावर आक्रस्ताळेपणा नाही, आपण गाडीचे काम करून द्या ही आपली अपेक्षा मोकळेपणाने सांगितली. त्याशिवाय व्यवस्थित पाहुणचार आणि गप्पा. निरोप घेताना, निघताना ” फिर वापस कभी भी आना भाई” म्हणून निरोप दिला.

      October 23, 2018


  • उषा मंगेशकर

    उषा मंगेशकर यांचा जन्म १४ डिसेंबर १९३५ रोजी झाला.

    ‘छबीदार छबी मी तोऱ्यात उभी’, ‘एक लाजरा न्‌ साजरा’, ‘काय बाई सांगू’, ‘गोड गोजिरी लाज लाजरी’, ‘खेळ कुणाला दैवाचा कळला’, ‘शालू हिरवा’, ‘मुंगळा’, ‘मै तो आरती उतारू रे’ यासारखी असंख्य गीते आपल्या मधुर आवाजाने अजरामर करणाऱ्या ज्येष्ठ गायिका मा.उषा मंगेशकर यांचा संगीत प्रवास अलौकिक असाच आहे. मराठी, हिंदीसह गुजराती व नेपाळी भाषेतही गायन केलेल्या उषाताईंनी भक्तीगीत, भावगीत, लोकसंगीतापासून ते चित्रपट संगीतापर्यंतच्या सर्व प्रकारांत आपली सुरेल मोहोर उमटवली. लतादीदी आणि आशा भोसले यांची असंख्य गाणी रसिकांच्या ओठांवर रुळली आहेत. परंतु त्यांच्या भगिनी व गायिका उषा मंगेशकर यांची मोजकीच गाणी रसिकांना माहीत आहेत.

    उषाताई मंगेशकर यांना खरी प्रसिद्धी मिळाली ते जय संतोषी माँ या चित्रपटातील काही गाण्यांनंतर मे तो आरती उतारु रे या गाण्यांसाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट स्त्री गायिका पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले. नंतर त्यांचे मुंगळा हे गाणे व पिंजरा या चित्रपटातील गाणी तर लोकांच्या मनात अजून ही घर करून आहेत.

    उषाताईंना पेंटीगची सुध्दा खूप आवड आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ विकिपीडीया

      January 5, 2017


  • ब्रूसली

    ब्रूसलीच्या वडिलांनी ब्रूसलीच्या वयाच्या १८ वर्षी हाँगकाँग सोडण्याचा निर्णय घेतला. नाइलाजाने घेतलेला हा निर्णय मात्र ब्रूस लीचं आयुष्यच बदलवणारा ठरला. युनिव्हसिर्टी ऑफ वॉशिंग्टनमध्ये ड्रामा विषयात डिग्रीचं शिक्षण घ्यायला सुरूवात केली. शिक्षणाची गाडी सुरू असतानाच त्याच्यातलं मार्शल आर्ट्स मात्र त्याला स्वस्थ बसू देईना. अमेरिकेतच त्याने मार्शल आर्ट्स शिकवायला सुरूवात केली, तेव्हा त्याचं वय होतं १८.

      July 20, 2021


  • रोशन – कलात्मक संगीतकार

    आम म्हटल्या जाणाऱ्या हिंदुस्थानी रागांत रचना करणे, रोशन यांचे मनपसंद काम होते. “कव्वाली” हा गीतप्रकार रोशन यांनी प्रतिष्ठित केला. रोशन यांचे, एक संगीतकार म्हणून वैशिष्ट्य मांडायचे झाल्यास, गाण्यात सांगीतिक विस्तार शक्यता असताना देखील, त्यांनी स्वरांना “बांध” घालून, गाण्याची लय कायम ठेऊन, गायन आणि वाद्यांची पट्टी ही नेहमीच मंद्र किंवा शुद्ध सप्तकात ठेवली आहे.

      August 10, 2018


  • केएफसी’चे साम्राज्य उभारणारे कर्नल सँडर्स

    १९६४ पर्यंत सँडर्स यांच्या ‘फ्राइड चिकन’ विक्रेत्यांच्या 600 फ्रँचायझीज होत्या. त्या वेळी त्यांनी आपली कंपनी ही 2 मिलियन डॉलर्सना विकली. जरी त्यांनी आपली कंपनी विकली तरी ते त्या कंपनीचे नेहमीच चेहरा राहिले.

      December 16, 2021