(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • एअर चीफ मार्शल हृषिकेश मुळगावकर

    मुळगांवकर यांनी आपल्या कारकिर्दीत ६३ प्रकारची वेगवेगळी विमाने चालविली. त्यांपैकी २२ विमाने जेट होती. हा एक जागतिक विक्रमच म्हणावा लागेल. वेगवेगळ्या प्रकारची विमाने चालविण्यासाठी प्रत्येक वेळी काही आठवड्यांचे कन्व्हर्जन ट्रेनिंग घ्यावे लागते, हे लक्षात घेतले तर त्यांचे अष्टपैलुत्व सहजपणे लक्षात येईल. मुळगांवकरांच्या नावे आणखी एक विक्रम जमा होतो. ‘मिग-२१’ हे स्वनातीत (ध्वनीच्या वेगापेक्षा जलद गतीचे) विमान चालविणारे ते पहिले भारतीय वैमानिक ठरले. वायुसेनाप्रमुख झाल्यानंतरही ते ‘मिग-२१’ चालवीत असत. वायुसेनेला स्वनातीत युगात नेणारे युगपुरुष असे त्यांचे सार्थ वर्णन केले जाते.

      April 9, 2022


  • माझे आदरणीय गुरुजी पं. दिनकर पणशीकर

    पणशीकर गुरुजी म्हणजे भारतीय अभिजात संगीतातील एक प्रयोगशील आणि एका वेगळ्या पद्धतीने हे अभिजात संगीत समृद्ध करणारे एक व्यक्तीमत्व आहे. व्याकरण, ज्योतिष, भाषा, कीर्तन इ. चा मोठा कौटुंबिक वारसा लाभलेल्या गुरुजींचा लहानपणापासूनच संगीताकडे ओढा होता. गुरुजींचे आजोबा व वडील हे संस्कृत पंडित तर एक ज्येष्ठ बंधू नटवर्य प्रभाकर पणशीकर आणि दुसरे दाजीशास्त्री हे पुराणकाल अभ्यासक असताना याच कुटुंबातील गुरुजींनी मात्र संगीताची वेगळी वाट शोधली.

      July 19, 2019


  • केशव जगन्नाथ पुरोहित

      December 15, 2010


  • कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती

    जयेंद्र सरस्वती हे कांचीपुरम पीठाचे ६९ वे शंकराचार्य होते. ते १९५४ मध्ये शंकराचार्य बनले होते. वेदांवर त्यांचं प्रभुत्व होतं. चंद्रशेखेरेन्द्रा सरस्वती यांनी त्यांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं होतं. २००३ मध्ये त्यांना शंकराचार्याची उपाधी घेऊन ५० वर्ष पूर्ण झाली होती.

      February 28, 2022


  • सौ सावित्रीबाई खानोलकर – परमवीर चक्राचे ‘स्वीस कनेक्शन’

    आपल्याला सगळ्यांना माहित आहे की, परमवीर चक्र हा भारतातला सर्वात मोठा सैनिकी शौर्यपुरस्कार आहे - अगदी ब्रिटनच्या 'व्हिक्टोरिया क्रॉस' अथवा अमेरिकेच्या 'मेडल ऑफ ऑनर' च्या बरोबरीचा - जो सैनिकांना युद्धातील अतुलनीय शौर्याबद्दल दिला जातो. १९४७ पासून २१ वीरांना परमवीर चक्र मिळालेले असून त्यापैकी १४ जणांना ते मरणोत्तर मिळाले आहे. परमवीर चक्र पदक ३.४९ सेंटीमीटर व्यासाचे ब्राँझचे पदक असून त्यावर भारतीय राजमुद्रा आणि चार बाजूंना इंद्राचे अस्त्र वज्र चार दिशांना आहे.

    पण आपल्यापैकी किती लोकांना माहित आहे की ह्या परमवीर चक्राच्या पदकाचे डिझाईन कोणी केले होते? ह्या पदकाचे डिझाईन केले होते सौ सावित्रीबाई खानोलकरांनी १९४७ मध्ये!

    सौ सावित्रीबाई खानोलकर?!? कधीच ऐकलेले नाहीये हे नाव - कोण होत्या त्या? आणि असल्या मराठमोळ्या 'खानोलकर' नावाच्या बाईचे कसले आलेय 'स्वीस कनेक्शन' ?

    paramveer-chakraह्या सौ सावित्रीबाई खानोलकर पूर्वाश्रमीच्या ईव्ही मॅदे दे मॅरॉस. जन्म २० जुलै १९१३ - स्वित्झर्लंडमधील न्यूशातेलमधला. त्यांचं बालपण जिनेव्हात गेलं. वयाच्या १६ व्या वर्षी - १९२९ मध्ये - त्यांची भेट विक्रम खानोलकारांशी झाली. हे विक्रम खानोलकर तेव्हा ब्रिटनमधील सॅन्डहर्स्ट येथे रॉयल मिलिटरी अकॅडेमी मध्ये सैनिकी शिक्षणासाठी आलेले होते आणि सुट्टीमध्ये स्वित्झर्लंडमध्ये फिरायला आले होते. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता ईव्ही विक्रम खानोलकरांना शोधत शोधत मुंबईत आल्या आणि हे जोडपे १९३२ मध्ये विवाहबद्ध झाले. हिंदू धर्माबद्दल त्यांना आकर्षण होतेच. लग्नानंतर त्यांनी धर्मांतर करून 'सावित्री' हे नाव घेतले आणि अश्या प्रकारे 'ईव्ही मॅदे दे मॅरॉस' च्या 'सौ सावित्रीबाई खानोलकर' बनल्या.

    सैन्यात त्यांचे पती वरिष्ठ पदावर होतेच. आपल्याला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तेव्हाचे मेजर जनरल हिरालाल अटल ह्यांनी सौ सावित्रीबाईंवर सैनिकांसाठी सर्वोच्च शौर्य पदक डिझाईन करायची जबाबदारी सोपवली आणि सौ सावित्रीबाईंनी ती अतिशय व्यवस्थितपणे पार पाडली. हे आहे आपल्या परमवीर चक्राचे 'स्वीस कनेक्शन'!

    योगायोगाने पहिले परमवीरचक्र सौ सावित्रीबाईंच्या मोठ्या मुलीच्या दिराला - मेजर सोमनाथ शर्मा यांना - काश्मीर युद्धातील शौर्याबद्दल नोव्हेंबर १९४७ मध्ये मरणोत्तर मिळाले.

    सौजन्य - संकेत कुलकर्णी (लंडन)

    फोटो: सौ सावित्रीबाई खानोलकर आणि मेजर जनरल विक्रम खानोलकर, परम वीर चक्र, पहिल्या परमवीरचक्राचे (मरणोत्तर) मानकरी मेजर सोमनाथ शर्मा

      August 8, 2016


  • अभिनेते अजय वढावकर

    आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने छोट्या पडद्याच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले अजय वढावकर यांनी मालीकाच्या बरोबर येस बॉस, फिर भी दिल है हिंदुस्थानी, इंग्लिश बाबू देसी मेम या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते. दूरदर्शनवरील ‘नुक्कड’ मालिकेतील त्यांनी साकारलेला ‘गणपत हवालदार' प्रेक्षकांच्या स्मरणात राहणारा ठरला.

    मुंबईतील दादर भागात लहानाचे मोठे झालेल्या वढावकर यांचा अंतकाळ हलाखीचा होता. मधुमेहामुळे पाच वर्षांपूर्वी त्यांना पाय गमावावा लागला. त्यानंतरही त्यांनी जिद्दीने "झी टीव्ही'वरील ‘पवित्र रिश्ता' मालिकेत काम सुरू केले. 'झी' टीव्हीवरील 'पवित्र रिश्ता' ही त्यांची शेवटची मालिका होती.

    अजय वढावकर यांचे २७ फेब्रुवारी २०१५ रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

      February 28, 2022


  • मराठी कवयित्री आणि कथालेखक इंदिरा संत

    पूर्वाश्रमीच्या इंदिरा दीक्षित असलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. त्यांचा जन्म ४ जानेवारी १९१४ रोजी झाला. शिक्षकीपेशात असलेल्या मा.इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५०च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे.

    प्रेम,जीवनातील व्यथा, संघर्षातून आलेले अनुभव, निसर्ग, भक्तीभाव, स्त्रीत्वाच्या वेदना,मानवी नाती असे नानाविध विषय त्यांच्या काव्यातून बहरत जातात कधी ओठावर हसू आणतात तर कधी डोळ्यात पाणी ! त्यांच्या आयुष्याच्या विविध वळणावर आलेली संकटे अन त्यावर त्यांनी केलेली मात याचे ठसे मा.इंदिरा संत यांच्या कवितात जागोजागी आढळतात. या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह 'सहवास' या नावाने १९४० ला प्रसिद्ध झाला. विशुद्ध रूपातील मा.इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली.

    आजमितीस इंदिरा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. रमेश तेंडुलकर यांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता 'मृण्मयी' नावाने १९८२ साली संपादित करून प्रसिद्ध केल्या आहेत. इंदिरा संत यांचे १३ जुलै २००० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    इंदिरा संत यांची कविता.

    कुणी निंदावे त्यालाही
    करावा मी नमस्कार
    कुणी धरावा दुरावा
    त्याचा करावा सत्कार

    काही वागावे कुणीही
    मीच वागावे जपून
    सांभाळण्यासाठी मने
    माझे गिळावे मीपण

    कित्येकांना दिला आहे
    माझ्या ताटातील घास,
    कितिकांच्या डोळ्यातील
    पाणी माझ्या पदरास!

    आज माझ्या आसवांना
    एक साक्षी ते आभाळ
    मनातील कढासाठी
    एक अंधार प्रेमळसंत

      January 4, 2018


  • क्रांतीचा महामेरू स्वातंत्र्यवीर सावरकर – लेख २

    …. या पत्रात स्वातंत्र्यवीर सावरकर वाहिनीला लिहितात कि ‘अशीच सर्व फुलें खुडावी’ आणि श्री रामाच्या चरणी (या देशासाठी ) अर्पण व्हावी. इतकी प्रचंड देशभक्ती असलेल्या सावरकरांना मात्र स्वराज्य मिळाल्यानंतर कोणता सन्मान प्राप्त झाला ? त्यांचे कोणते विचार आम्ही आमलात आणले.उलट सावरकरांना “जातीच्या ” भिंतीत चिणून आम्ही त्यांचा दररोज खून करीत आहोत ” आज स्वतःच्या पोळीवर तूप ओतून घेण्यासाठी धडपडणारे “नेते “पाहिल्यावर सावरकर स्वर्गातून म्हणत असतील… ” हेच फळ का मम तपाला “

      May 29, 2019


  • थोर देशभक्त, नामवंत नाटककार वामन गोपाळ तथा ’वीर वामनराव’ जोशी

    १९१२ साली ’वीर वामनराव’ जोशी यांनी केशवराव भोसलेंच्या ललितकलादर्शसाठी ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ हे नाटक लिहिले. त्यांचा जन्म १८ मार्च १८८१ रोजी झाला. त्या नाटकाने काही काळ मराठी रंगभूमी दणाणून सोडली. त्यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकावर ब्रिटिश भारतीय शासनाने बंदी घातली होती. ‘मी नवबाल जोगीण बनले’ हे त्यातील गाणे फार लोकप्रिय झाले होते. त्यानंतर १२ वर्षांनी १९२५ साली त्यांनी ‘रणदुंदुभी’ हे नाटक लिहिले. मास्टर दीनानाथांच्या बळवंत संगीत नाटक मंडळीने ते रंगभूमीवर आणले. हे नाटक खूपच गाजले. या नाटकातील ‘परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला’ हे गाणे तर १९३० च्या चळवळीने खेड्यापाड्यांपर्यंत पोचविले होते. वीररसप्रधानता हे वामनरावांच्या नाटकाचे वैशिष्ट्य आणि दुसरे वैशिष्ट्य म्हणजे प्रासादीक पदरचना. रणदुंदुभीनंतर ‘धर्मसिंहासन’, ‘शीलसंन्यास’ आणि ‘झोटिंग पातशाही’ अशी तीन नाटकेही त्यांनी लिहिली. वामनराव जोशी यांचे ३ जून १९५६ साली निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      June 3, 2017


  • उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर

    उस्ताद झिया फरिदुद्दीन हे धृपदगायकीसाठी प्रसिद्ध असलेल्या डागर घराण्याच्या १९ व्या पिढीचे गायक. त्यांचा जन्म १५ जून १९३२ रोजी उदयपूर येथे झाला. वडील उस्ताद झियाउद्दीन खान डागर आणि बंधू वीणावादक उस्ताद झिया मोहीनुद्दीन डागर यांच्याकडून त्यांना धृपद गायनाची तालीम मिळाली. त्यांच्या गायकीमध्ये स्वरभेद आणि गमक यांचे प्रभुत्व होते. देशात आणि परदेशामध्ये त्यांच्या गायनाच्या मैफली झाल्या आहेत.

    सांगीतिक मैफली आणि कार्यशाळांद्वारे त्यांनी ओळख निर्माण केली. ऐंशीच्या दशकात ऑस्ट्रिया आणि फ्रान्स येथेही त्यांनी ध्रुपद गायकीचे शिक्षण दिले. भोपाळ येथील ध्रुपद केंद्रामध्ये त्यांनी तब्बल २५ वर्षे संगीताचे मार्गदर्शन केले. उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन सन्मान, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार यासह पद्मश्री किताबाने गौरविण्यात आले आहे.

    नॉर्थ अमेरिकन धृपद असोसिएशनतर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला होता. भोपाळ येथील धृपद केंद्राचे पहिले संचालक असलेल्या डागर यांनी १९८१ पासून तेथे संगीत अध्यापनाचे कार्य केले. आयआयटी मुंबई येथील धृपद संसार येथेही त्यांनी संगीत शिक्षणाचे काम केले. पनवेल येथील गुरुकुलमध्ये गेली काही वर्षे त्यांचे वास्तव्य होते. प्रसिद्ध धृपदगायक उमाकांत-रमाकांत गुंदेचा बंधू आणि उदय भवाळकर हे त्यांचे शिष्य होत. उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर यांचे ८ मे २०१३ निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      May 8, 2018