(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम

    कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम

    १९६१ साली ते पुण्यात आले आणि एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स करुन, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून रूजू झाले. त्यावेळी पुणे विद्यापीठातून त्यांनी कायद्यात बॅचलर डिग्री मिळवली आणि पुढे पुणे विद्यापीठातून मास्टरचेही शिक्षण पूर्ण केले. १९६४ मध्ये अवघ्या २० वर्षाच्या वयात त्यांनी ‘भारती विद्यापीठ’ ही शैक्षणिक संस्था स्थापन केली.

      June 10, 2022


  • चित्रा देशपांडे

    भारतात असताना चित्रा देशपांडे यांचे क्षेत्र होते स्ट्रक्चरल इंजिनिअरींगचे. आपत्तीत हानी झालेल्या इमारतींचे तांत्रिक सर्वेक्षण करण्यात त्या तरबेज होत्या. आज कॅनडात असलेल्या डॉ. चित्रा यांनी आपले क्षेत्र रचनाशास्त्राकडून शिक्षणातील रचनात्मक कार्याकडे वळविले. मॅसबे कन्युनिटी कॉलेजच्या स्टेम विभागाच्या डीन या नात्याने त्या या ज्ञानयुगात व्यग्र आहेत...

    कॅनडातील ज्ञानयज्ञ

      July 24, 2015


  • चित्रपट सृष्टीतील एक अपूर्ण कहाणी

    आज स्मिता जीवंत असती तर आम्ही तिच्या ६३ व्या जन्मदिनाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या असत्या…. मेंदूत स्मृती नावाची गोष्ट शाबूत असे पर्यंत तरी स्मिता तुला नाही विसरू शकत आम्ही….कधीच नाही…….मन:पूर्वक अभिवादन

      October 18, 2018


  • पंडित श्रीकृष्ण नारायण रातंजनकर ऊर्फ अण्णासाहेब रातांजनकर

    १९११ मध्ये त्यांनी गायक व संगीतज्ञ पं. विष्णू नारायण भातखंडे यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यास सुरुवात केली व आजमितीला ते भातखंडेबुवांचे सर्वात ख्यातनाम शिष्य मानले जातात.

      July 5, 2022


  • पांडुरंग सातू नाईक

    जुन्या काळातील चित्रपट छायालेखक पांडुरंग सातू नाईक यांना आल्हाददायकता, कल्पकता व वास्तवता ही वैशिष्ट्ये असलेले चित्रपट छायालेखक म्हणून ओळखले जायचे.

      July 5, 2022


  • स्मिता पाटील

    स्मिता पाटील यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९५५ रोजी पुणे इथे झाला. रुपेरी पडद्यावर भारतीय स्त्रीची पर्यायी प्रतिमा साकारणारी सक्षम अभिनेत्री म्हणून स्मिता पाटील हिचं चित्रपटसृष्टीच्या इतिहासात वेगळं स्थान आहे. अल्पायुषी ठरलेल्या स्मिता पाटीलने विविध व्यक्तिरेखांच्या संवेदना व त्यांचं व्यक्तिमत्व इतक्या प्रभावीपणे आणि सूक्ष्म बारकाव्यांसह अभिव्यक्त केलं की त्यामुळे पडद्यावरील सौंदर्याच्या रुढ संकल्पना दुय्यम ठरल्या.

    स्मिता पाटील ह्यांचा झाला. राष्ट्रसेवादलाच्या सांस्कृतिक कार्यात सक्रिय असलेल्या स्मिताने दृकश्राव्य माध्यमाची सुरुवात दूरदर्शनवरील 'बातमीदार' या नात्याने केली. छोटया पडद्यावरुन या भूमिकेवरुन तिचे सुप्त गुण हेरुन श्याम बेनेगल या समर्थ दिग्दर्शकाने तिला 'निशांत' आणि 'चरणदास चोर' या चित्रपटात अभिनयाची संधी दिली. हिंदी चित्रपटसृष्टीतील पदार्पणानंतर बेनेगल यांनीच दिग्दर्शित केलेल्या मंथन' आणि 'भूमिका' या चित्रपटातील तिच्या भूमिका गाजल्या. यातील कसदार अभिनयामुळे स्मिताला कलात्मक चित्रपट सृष्टीत मान्यता मिळालीच आणि राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला.

    'मंथन मधून स्मिताने सहकारी चळवळीत सक्रिय झालेल्या हरिजन स्त्रीच्या व्यक्तिरेखेमधील सळसळते चैतन्य, आक्रमकता आणि सचोटी याचा सशक्त आविष्कार केला. त्याचप्रमाणे हंसा वाडकर या अभिनेत्रीच्या आत्मकथेवर आधारित 'भूमिका ' मधून तिने पुरुषप्रधान संस्कृतीत शोषित ठरणार्यात स्त्रीच्या संवेदना प्रभावीपणे अभिव्यक्त केल्या. वास्तविक हिंदी चित्रपटांमधुन प्रामुख्याने पारंपारिक स्त्री प्रतिमाच चितारल्या गेल्या. तरीही स्मिता पाटीलच्या उदयापूर्वी वहिदा रेहमान, नुतन , सुचित्रा सेन यांनी या चाकोरी पलीकडल्या काही प्रतिमा उभ्या केल्या.

    स्मिता पाटीलने ही धारा आपल्या अभिनय सामर्थ्याने दृढ केली आणि पुढेही नेली. दलित, शोषित स्त्रियांच्या, बंडखोर स्त्रियांच्या, आंतरिक बळ असलेल्या स्त्रियांच्या प्रतिमा परिणामकारकतेने साकार केल्या. याबाबतीत शबाना आझमी या तिच्या समकालीन अभिनेत्रीनेही योगदान केलं आहे. या अभिनेत्रींनी प्रेयसीच्या रुढ झालेल्या प्रतिमांना पर्यायी अशा प्रतिमा सक्षमतेने आविष्कृत केल्या. वेगळया मूल्यचौकटी व निष्ठा घेऊन जगणार्याय अशा व्यक्तिरेखांना या अभिनेत्रींनी एका अर्थाने मान्यताच मिळवून दिली. पण मृत्यूनंतरही मास्को, न्यूर्यॉक, फ्रान्समधील विविध महोत्सवांमध्ये तिच्या चित्रपटांचं 'सिंहावलोकन ' झालं.

    आंतरराष्ट्रीय स्तरावर रसिक व समीक्षकांकडून इतकी मान्यता मिळणारी ती पहिलीच भारतीय व मराठी अभिनेत्री ठरली. फ्रान्स मध्ये ला रॉशेला शहरातील हाऊस ऑफ कल्चरमध्ये त्यांच्या चक्र, बाजार, मंथन, भूमिका ह्या चित्रपटांचा महोत्सव (रिट्रॉस्पेक्टिव्ह) भरविण्यात आला होता. सत्यजित रायनंतर हा बहुमान स्मिता यांना मिळाला होता. मराठी रंगभूमीवर काम करणारे मा.नाना पाटेकर बॉलीवूडमध्ये आपल्या येण्याचे श्रेय दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील हिला देतात. मा.नाना पाटेकर म्हणतात हिंदी चित्रपटातील प्रवेश स्मिता पाटील हिच्यामुळेच झाला.

    मी मराठी रंगभूमीवर काम करत होतो. तेथे मी खूश होतो. पण स्मिताने मी हिंदीत प्रवेश करावा म्हणून प्रयत्न केले. मला हिंदीत काम करण्यासाठी प्रवृत्त केले. तिनेच माझे नाव रवी चोप्रा यांना सुचविले आणि मला ‘आज की आवाज’ हा चित्रपट मिळाल्याचे नाना पाटेकर यांनी नुकतेच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. स्मिताने केलेल्या ‘फोर्स’मुळे मी इंडस्ट्रीत आलो. ती माझी खूप चांगली मैत्रीण होती. तिच्याबरोबर मी ‘अवाम’ आणि ‘गीद्ध’ या चित्रपटात काम केले होते. स्मिता पाटील यांचे १३ डिसेंबर १९८६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    स्मिता पाटील यांचे काही चित्रपट
    https://www.youtube.com/watch?v=7_IAjinodPo
    https://www.youtube.com/watch?v=TxRk-jbUrrk
    https://www.youtube.com/watch?v=GC6XmwlNwhE
    https://www.youtube.com/watch?v=tuo6F5qUu00
    https://www.youtube.com/watch?v=8L4oq6VKA2U
    https://www.youtube.com/watch?v=gskP5p2Oknc

      October 31, 2019


  • ज्येष्ठ अभिनेत्री शांता मोडक

    सौंदर्य, अभिनय आणि गायन या माध्यमातून रंगभूमीसह चित्रपटसृष्टीचा पडदा गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शांता मोडक यांचा जन्म १ एप्रिल १९१९ रोजी पुणे येथे झाला.

    शांता मोडक यांनी पुण्यात शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांनी सर परशुरामभाऊ महाविद्यालयांमधून १९४२ मध्ये कला शाखेची पदवी मिळवली होती. ‘चूल आणि मूल’ चित्रपटाच्या माध्यमातून शांता मोडक यांनी रुपेरी दुनियेत पाऊल ठेवले. विश्राम बेडेकर यांनी १९४६ मध्ये हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. चित्रपटाच्या श्रेयनामावलीत नाव देताना ‘फेमस पिक्चर्स’चे बाबूराव पै यांना शातांबाईंचे नाव आठवले नाही. म्हणून त्यांनी ‘बिंबा मोडक’ असे नाव दिले. तेव्हापासून त्या ‘बिंबा मोडक’ नावाने ओळखू लागल्या.

    शांताबाईंनी दामूअण्णा मालवणकर यांच्या ‘प्रभाकर’ नाटक कंपनीच्या माध्यमातून १९४९ मध्ये ‘भावबंधन’ या नाटकाद्वारे मराठी रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले. या नाटकातील आनंदीबाईची त्यांची भूमिका खूप गाजली. नाटकात काम करण्याची संधी मिळाल्यावर शांताबाईंनी गाणे शिकण्यास सुरूवात केली. संगीत नाटकातील पदांचे शिक्षण त्यांनी गंधर्व नाटक मंडळीतील बालगंधर्व आणि मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांचे पट्टशिष्य व गायक-नट कै. हरिभाऊ देशपांडे यांच्याकडे घेतले. संगीत विद्याहरण ( देवयानी), संगीत स्वयंवर (रूख्मिणी), संगीत सौभद्र (सुभद्रा), संगीत द्रौपदी (द्रौपदी), संगीत एकच प्याला (सिंधू), संगीत भावबंधन, (लतिका), संगीत मृच्छकटिक (वसंतसेना) या संगीत नाटकातील त्यांच्या भूमिका अत्यंत लोकप्रिय झाल्या. त्यांनी भारत नाटक कंपनी, संध्या थिएटर, पंडितराव तरटे यांच्या नाटक कंपनीमधील नाटकांमध्ये कामे केली. यामध्ये छोटा गंधर्व, श्रीपादराव नेर्लेकर, कृष्णराव तोंडकर, जयराम शिलेदार अशा गायक-नटांबरोबर त्यांनी भूमिका केल्या. रंगभूमीबरोबरच चित्रपटांमध्येही त्यांच्या अभिनयाचे दर्शन रसिकांना घडले.

    ‘चूल मूल’, ‘ऊन-पाऊस,’ ‘इन मिन साडे तीन’ या चित्रपटांमध्येही त्यांनी अभिनयाची चुणूक दाखविली.

    राज्य सरकारतर्फे १९८० मध्ये त्यांना मराठी नाटक शताब्दी महोत्सवामध्ये तत्कालिन मुख्यमंत्री बॅ. अंतुले यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पुणे महापालिकेसह अनेक संस्थांनी त्यांचा गौरव केला होता.

    शांताबाई मोडक यांचे निधन २८ एप्रिल २०१५ रोजी झाले.

    चित्रपट : चूल आणि मूल, इन मीन साडेतीन, ऊन-पाऊस इ.

    नाटके : भावबंध, स्वयंवर, सौभद्र, मानापमान

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

      April 1, 2022


  • सिनेपत्रकार सतीश जकातदार

    सतीश जकातदार मनोहर मासिकांत सिनेमावर लेखन करीत असत. शिवाय माणूसमध्ये ते कलात्मक चित्रपटांवर लेखन करत असत.

      October 27, 2021


  • मराठी चित्रपट दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी

    दत्ता धर्माधिकारी यांचा जन्म २ डिसेंबर १९१३ रोजी कोल्हापूर येथे झाला. महाविद्यालयीन शिक्षण चालू असताना मा.दत्ता धर्माधिकारी कोल्हापूरचे प्रसिद्ध गायक वामनबुवा पाध्ये यांच्याकडे शास्त्रोक्त गाणे शिकायला जात. ‘प्रभात फिल्म कंपनी’त त्यांना नोकरी मिळाली. ‘प्रभात’मध्ये त्यांना ‘टाईमकीपर’ची ‘हजेरी मास्तर’ नोकरी मिळाली. ‘प्रभात’मध्ये त्यावेळी कुठल्याही कर्मचार्याचला चित्रपटात एखादी किरकोळ भूमिका करावयास सांगत. काही मंडळी अगदी हौसेनं ती भूमिका करीत. हजेरी मास्तर असलेल्या दत्ताजींना १९३७ सालच्या ‘कुंकू’मध्ये नायिका शांता आपटे हिला लग्नासाठी दाखवण्यात येणार्या् एका तरुण मुलाचे काम देण्यात आले. नायिका शांता आपटे हिचा त्यावेळी इतका प्रचंड दबदबा होता की तिच्यासमोर दत्ताजी जेव्हा उभे राहिले तेव्हा त्यांना दरदरून घाम फुटला व त्यांनी कॅमेर्याासमोरून एकदम पळ काढला. ते काम मग संकलन विभागात काम करणार्या् अनंत माने यांनी केलं. कॅमेर्याहसमोरून घाबरून पळणार्याे याच दत्ताजींनी पुढे ‘माणूस’मधील ‘कशाला उद्याची बात’ या गाण्यातल्या सारंगीयाचं व ‘संत ज्ञानेश्वार’ या चित्रपटातील सोपानदेवाचं काम अगदी निर्भयपणे केलं होतं. ‘संत ज्ञानेश्वरर’च्या वेळी सहाय्यक दिग्दर्शक राजा नेने यांच्याशी त्यांची घट्ट मैत्री झाली. ‘प्रभात’मध्ये असल्यापासून दत्ताजींनी राजा नेने यांची धरलेली संगत ‘प्रभात’ सोडल्यावरही सुटली नव्हती. राजा नेने यांनी ‘प्रभात’बाहेरच्या दिग्दर्शित केलेल्या सर्व चित्रपटांचे सहाय्यक म्हणून दत्ताजींनी काम केले होते. १९४७च्या ‘शादी से पहले’ या चित्रपटापर्यंत ते राजा नेने यांचे सहाय्यक होते. ‘मायाबाजार’ पासून दत्ता धर्माधिकांरींची दिग्दर्शक म्हणून ओळख झाली. त्यांनी स्वत:ची ‘आल्हाद चित्र’ नावाची चित्रपट काढणारी संस्था स्थापन केली. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. वि. बोकील यांच्या ‘गाठीभेठी’ या कथेवरून ‘आल्हाद’चा पहिला चित्रपट ‘बाळा जो जो रे’ निघाला. आशा भोसलेंच्या आवाजातलं ‘बाळा जो जो रे’ हे अंगाईगीत महाराष्ट्रातल्या घराघरात गेलं. ‘आल्हाद’चा पुढचा ‘स्त्री जन्माही तुझी कहाणी’ हाही चित्रपट खूप गाजला. त्याच्या यशामुळे हिंदीतील प्रसिद्ध निर्माते सरदार चंदूलाल शहा यांनी त्यांच्या ‘रणजित मूव्हीज’तर्फे औरत तेरी कहानी (भारतभूषण- निरूपा रॉय) हा चित्रपट काढला. आधीचे दोन्ही चित्रपट बाहेरच्या निर्मात्यांनी हिंदीत काढल्यामुळे यावेळचा म्हणजे पुढचा तिसरा चित्रपट ‘आल्हाद’ने मराठी व हिंदी दोन्ही भाषात काढायचं ठरवलं. चित्रपटाचे नाव होते - ‘चिमणी पाखरं’ (हिंदीत-नन्हे मुन्ने) याही चित्रपटाने रौप्यमहोत्सव केला. १९५२ सालचा हा काळ म्हणजे ‘आल्हाद चित्र’चा ऐश्वार्याचा काळ होता. सर्वांचं भलं चिंतणार्या् धर्माधिकारींची नियत अतिशय चांगली होती. चित्रपटसृष्टीत शोधून सापडणार नाही असा प्रामाणिकपणाचा दुर्मिळ गुण त्यांच्यात होता. वेगळ्या विषयावरचा म्हणजे बहिर्याड-मुक्या मुलीच्या भावस्पर्शी कथेवरचा ‘अबोली’ हा सुंदर चित्रपट अपयशी ठरला. खादीचा पांढराशुभ्र शर्ट, पायजमा व टोपी घालणारे पुढार्याटसारख्या पोषाखातले धर्माधिकारी चित्रपटसृष्टीतले वाटत नसत. चेहर्याावर कायम हास्य असणार्याे धर्माधिकारींचे सर्वांशी जिव्हाळ्याचे व प्रेमाचे संबंध असत. मा.दत्ता धर्माधिकारी यांचे ३० डिसेंबर १९८२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- मधू पोतदार

      December 30, 2016


  • वनमाला

    साने गुरुजींनी लिहिलेल्या “श्यामची आई”वर प्र.के. अत्र्यांनी श्यामची आई चित्रपट बनवला. त्यात श्यामच्या आईची मुख्य व्यक्तिरेखा वनमालाबाईंनी साकारली. हा चित्रपट आणि त्यातील त्यांनी रंगवलेली आईची व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय ठरली. या भूमिकेसाठी त्यांना १९५३ सालचा भारतातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रपती पुरस्कार लाभला.

      July 23, 2017