(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बी.के.एस. अय्यंगार

    जागतिक कीर्तीचे योगाचार्य आणि या विषयावरील लेखक बी.के.एस. अय्यंगार यांचा जन्म १४ डिसेंबर १९१८ रोजी झाला. आरोग्य योग, योग सर्वांसाठी, योग-एक कल्पतरू इ. पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.

    ## B. K. S. Ayengar

      July 27, 2017


  • क्रिकेटपटू महाराज रणजितसिंहजी

    त्यांनी 15 कसोटी सामन्यात 44.95 च्या सरासरीने 989 धावा केल्या त्यामध्ये त्यांनी 2 शतके आणि 6 अर्धशतके केली. त्यांची कसोटी सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या होती 175 धावा तसेच त्यांनी 13 झेलही घेतले. त्यांनी 307 फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यात 24,692 धावा केल्या त्या 56.37 च्या सरासरीने त्यामध्ये त्यांनी 72 शतके आणि 109 अर्धशतके केली. त्यांची फर्स्ट क्लास क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या होती नाबाद 285 धावा तसेच त्यांनी 133 विकेट्सही घेतल्या. त्यांनी एका इनिंगमध्ये 53 धावा देऊन 6 विकेट्स घेतल्या. तसेच 233 झेलही पकडले. त्यांच्या नावावर एक वेगळा रेकॉर्ड आहे. तो म्हणजे फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पहिल्यांदा त्यांनी एक सीझनमध्ये 3000 च्या वर धावा केल्या , त्यांनी 63.18 च्या सरासरीने 3,159 धावा केल्या त्यामध्ये त्यांनी आठ शतके केली.

      April 2, 2021


  • विचक्षण कलावंत – मुकुल शिवपुत्र

    मुकुंद संगोराम यांनी मुकुल शिवपुत्र यांच्या वर लिहिलेला लेख

      March 27, 2017


  • भारतीय व्यावसायिक टेनिसपटू लिअँडर एड्रीयन पेस

    आजवर पुरुष दुहेरीमध्ये ८ तर मिश्र दुहेरीमध्ये १० ग्रँड स्लॅम स्पर्धांची अजिंक्यपदे मिळवणारा लिअँडर पेस हा जगातील सर्वोत्तम दुहेरी टेनिस खेळाडूंपैकी एक मानला जातो. त्यांचा जन्म १७ जून १९७३ रोजी झाला. सर्वाधिक वयामध्ये ग्रँड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याचा मान त्याच्याकडेच जातो. भारतामधील आजतागायतचा सर्वात यशस्वी टेनिसपटू असलेल्या पेसला १९९६-९७ मध्ये राजीव गांधी खेल रत्न, १९९० मध्ये अर्जुन पुरस्कार तर २००१ साली पद्मश्री हे भारतामधील अनेक उच्च पुरस्कार मिळाले आहेत.

    १५ ग्रँड स्लॅम विजेतेपदे मिळवण्यासोबतच पेस त्याने १९९६ अटलांटा ऑलिंपिक स्पर्धेमधील पुरुष एकेरीमध्ये कांस्यपदक मिळवले आहे. १९९२ ते २०१२ दरम्यान सलग सहा ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला पेस हा एकमेव भारतीय खेळाडू तर जगातील एकमेव टेनिसपटू आहे. इतर स्पर्धांमध्ये त्याने भारतासाठी अनेक पदके जिंकली आहेत. डेव्हिस करंडकासाठीच्या भारतीय संघाचा तो अनेक वर्षे कर्णधार होता. २०१० सालच्या विंबल्डन स्पर्धेमध्ये विजय मिळवून पेस रॉड लेव्हरखालोखाल तीन वेगवेगळ्या दशकांमध्ये विंबल्डन विजेतेपदे मिळवणारा दुसराच टेनिसपटू ठरला. २०१० साली पेसने ऑलिंपिक गोल्ड क्वेस्ट ह्या गीत सेठी व प्रकाश पडुकोण ह्यांनी स्थापन केलेल्या संस्थेमध्ये प्रवेश केला. भारतीय खेळाडूंना ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदके मिळवण्यासाठी प्रोत्साहन व प्रशिक्षण देणे व अधिकाधिक जागतिक दर्जाचे खेळाडू घडवणे हे ह्या संस्थेचे ध्येय आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      June 17, 2019


  • बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती

    मिथुन चक्रवर्ती यांनी बी.एस.सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून अभिनयाचे अधिकृत शिक्षण घेतले. त्यांचा जन्म १६ जून १९५० रोजी झाला. करिअरच्या सुरूवातीला ऍक्शन आणि डान्ससाठी मिथुन चक्रवर्ती यांची खास ओळख निर्माण झाली होती. १९८२ साली प्रदर्शित झालेल्या ‘डिस्को डान्सर’ चित्रपटाने मिथुन चक्रवर्ती यांनी खऱ्या अर्थाने डान्सिंग स्टार बनवले. तर मृगया या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होतो. मिथुन चक्रवर्ती यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दोन फिल्म फेयर पुरस्कार, दोन स्टारडस्ट पुरस्कार आणि एक स्टार स्क्रीन अवॉर्ड मिळाला आहे. ८० च्या दशकात डिस्को डान्स हा नृत्य प्रकार त्यांनीच लोकप्रिय केला. आपल्या आगळ्या-वेगळ्या डान्स शैलीमुळे ते आजही लोकप्रिय आहेत.

    सुरक्षा, तराना, हम पांच, शौकीन, वारदात, डिस्को डान्सर, प्यार झुकता नही, डान्स-डान्स यांसारख्या चित्रपटात त्यांनी प्रमुख नायकाची भूमिका साकारली आहे. १९९० मध्ये आलेल्या ‘अग्नि पथ’ चित्रपटातील दक्षिणात्य व्यक्तीची त्यांची भूमिका आजही कौतुकास्पद वाटते. मिथुन चक्रवर्ती यांचा १९९५ मध्ये आलेला ‘जल्लाद’ चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेने त्यांनी लोकांच्या मनात आपले वेगळे स्थान बनवले. तर २००७ मध्ये रिलीज झालेल्या ‘गुरू’ चित्रपटातील एडिटरची भूमिकाही देखील उल्लेखनिय होती.

    मिथुन चक्रवर्ती यांनी वीर, गोलमाल ३, हाऊसफुल २, ओह माय गॉड, खिलाडी ७८६, कांची, किक आणि हवाईजादा यांसारख्या चित्रपट केले आहेत. मोठय़ा पडद्याप्रमाणेच छोटय़ा पडद्यावरील डान्स शो डान्स इंडिया डान्समध्ये ते ग्रँडमास्टर रूपाने लोकांपुढे आले. मिथुन चक्रवर्ती यांनी हिंदीसह बंगाली, उडिया आणि भोजपूरी चित्रपटात काम केले.
    केवळ चित्रपट अभिनेता म्हणून नव्हे तर सामाजिक कार्यकर्ता, उद्योजक आणि राज्यसभा सदस्य अशी मिथुन चक्रवर्ती यांची ओळख आहे. १९८२ साली त्यांनी अभिनेत्री योगिता बाली यांच्याशी लग्न केले होते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      June 16, 2019


  • वामन रामराव कांत ( कविवर्य वा. रा. कांत )

    बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात, त्या तरुतळी विसरले गीत, सखी शेजारिणी.. अशी एकाहून एक सर्वांच्या ओठी असलेली गाणी लिहिणारे ’वा. रा.’ कांत तथा वामन रामराव कांत.

    वामन रामराव कांत यांचा जन्म नांदेड येथे ६ ऑक्टोबर १९१३ रोजी झाला. वा.रा. कांत हे या नावाने लेखन करत. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नांदेड येथे झाले. इंटरपर्यंतचे शिक्षण १९३१ साली हैदराबाद येथे झाले. त्यानंतर शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यांचा विवाह सौ. लक्ष्मीबाई - पूर्वाश्रमीच्या गंगूबाई कुर्डूकर यांच्याशी १९३० मध्ये झाला.

    'विहंगमाला' या नियतकालिकाचे संपादक (१९२८) तसेच विहंग प्रेसचे व्यवस्थापन.
    निजाम सरकारच्या शेतकी खात्यात लिपिक म्हणून नोकरी (१९३३-१९४५)
    निजाम सरकारच्याच आकाशवाणी हैदराबाद व औरंगाबाद केंद्रांत मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहिले (१९४५- १९६०)
    भारतीय आकाशवाणीच्या विविध केंद्रांवर मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहिले (१९६०-१९७०)
    आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सेवानिवृत्त (१९७०)

    त्यांनी एकूण १० काव्यसंग्रह लिहिले.

    'दोनुली'
    ’पहाटतारा’
    ’बगळ्यांची माळ’
    'मरणगंध' (नाट्यकाव्य)'
    मावळते शब्द'
    'रुद्रवीणा'
    'वाजली विजेची टाळी'
    'वेलांटी'’शततारका’ (१९५०)
    ’सहज लिहिता लिहिता’

    वा.रा. कांत यांचे एक छोटेखानी चरित्र - कविवर्य वा.रा.कांत - हे श्री कृ.मु. उजळंबकर यांनी लिहिले असून कालिंदी प्रकाशनाने ते प्रसिद्ध केले आहे.

    वा रा कांत यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान...

    १९६२-६३ वेलांटी या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
    १९७७-७८ मरणगंध या नाट्यकाव्यास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
    १९७९-८० दोनुली या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा 'केशवसुत ' पुरस्कार
    १९८९-९० मावळते शब्द या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा 'केशवसुत' पुरस्कार

    १९८८ महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यातर्फे उत्कृष्ट वाङ्मयसेवेसाठी सन्मान
    १९८९ महाराष्ट्र साहित्य परिषद, हैदराबाद यांच्यातर्फे उत्कृष्ट वाङ्मयसेवेसाठी सन्मान
    १९८९ महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रदीर्घ वाङ्मयसेवेसाठी गौरववृत्ती देऊन सन्मान

    या व्यक्तिचित्राच्या निमित्ताने इंटरनेटवर वा रा कांत यांचे छायाचित्र शोधण्याचा प्रयत्न केला. केवळ एकच छायाचित्र मिळाले..

    `वा रा कांत' यांच्या गाण्यांनी अनेकांना पैसा आणि प्रसिद्धी मिळवून दिली असेल.. पण हा कवी महाराष्ट्राच्या साहित्यपटावर प्रसि‌द्धीपरांगमुखच राहिला.

    # Kant, Waman Ramrao
    # कांत, वामन रामराव
    # Kavivarya Va Ra Kant

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

      September 9, 2016


  • बॉलिवूडचे अभिनेते-दिग्दर्शक-निर्माते राकेश रोशन

    राकेश रोशन यांनी अभिनेता म्हणून १९७० मध्ये 'घर घर की कहानी' या सिनेमाद्वारे आपल्या करिअरचा श्रीगणेशा केला. त्यांचा जन्म ६ सप्टेबर १९४९ रोजी झाला. खून भरी मांग, खेल खेल में, खट्टा मीठा, खुबसूरत यांसह जवळपास ४० सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केला. त्यानंतर दिग्दर्शक म्हणून त्यांनी 'खुदगर्ज' या सिनेमाद्वारे आपली सेकंड इनिंग सुरु केली.

    'काला बाजार', 'किशन कन्हैया', 'करण अर्जुन', 'कहो ना प्यार है', 'कोई मिल गया', 'क्रिश' या सिनेमांचे यशस्वी दिग्दर्शन केले. हृतिकला त्यांनी 'कहो ना प्यार है' या सिनेमाद्वारे फिल्म इंडस्ट्रीत लाँच केले. या सिनेमाने हृतिकला एका रात्रीत सुपरस्टार बनवले. रोशन यांच्या तीन पिढ्या फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      September 6, 2017


  • सुप्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाडे

    भालचंद्र नेमाडे म्हटले की त्यांची सर्वप्रथम कोसला ही कादंबरी समोर येते आणि त्यांनतर येते ते त्यांनी केलेले वाद-विवाद , त्यांची ‘ अनाकलनीय ‘ परंतु परखड मते. ‘ अनाकलनीय ‘ हा शब्द अशासाठी वापरला कारण अनेकांना त्याची मते पटत नाहीत , रुचत नाहीत म्ह्णून अनाकलनीय .

      May 30, 2021


  • सिम्बायोसिसचे डॉ. शांताराम बळवंत मुजूमदार

    पुण्यात भारतीय आणि विदेशी विद्यार्थ्यांना एकत्र आणून शिक्षणाच्या माध्यमातून सांकृतिक मिलाफ घडवून आणण्याचे काम केले ते डॉ. शांताराम बळवंत मुजूमदार यांनी. सिम्बायोसिस संस्थेच्या माध्यमातून त्यांनी देशातच नव्हे तर जगभरात त्यांचे शैक्षणिक कार्य पोहोचले.

      August 2, 2017


  • Hot & Glamorous – नेहा पेंडसे

    Hot & Glamorous – नेहा पेंडसे

    ग्लॅमर आणि फॅशनची उत्तम समज फार थोडय़ा कलाकारांना असते. नेहा पेंडसेचे नाव यामध्ये सर्वात वर घ्यावे लागेल.
    मराठी इंडस्ट्रीत ग्लॅमर कॅरी करता येईल अशा मोजक्या अभिनेत्री आहेत. कॉस्च्यूमचा योग्य सेन्स असणं आणि ते तितक्याच सहजपणे कॅरी करणं हे इंडस्ट्रीतल्या फार मोजक्या कलाकारांना जमलं आहे. या कलाकारांच्या यादीतलं नेहा पेंडसे हे वरच्या यादीतलं नाव. ग्लॅमरस नेहा पेंडसेचं नाव मराठीसोबतच हिंदी, तामीळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा विभिन्न भाषांतून दमदार अभिनय सादर करणारी खमकी अभिनेत्री म्हणून घेतलं जातं. अभिनय क्षेत्रात यशाचा आलेख कायम चढता ठेवलेल्या नेहाने सिनेमा निर्मितीतही पदार्पण करत इंडस्ट्रीला दर्जेदार कलाकृती दिली आहे.
    ‘मुंबई फॅशन शो’ या व्यावसायिक इव्हेंटसाठी मला काही मॉडेल्सचे फोटोशूट करायचे होते. याच वेळी नेहाचं फोटोशूट करायची संधी मला चालून आली. व्यावसायिक आणि एडिटोरियल अशी दोन्ही कामे एकाच दिवशी करायची असल्याने स्टुडिओमध्ये साधारणपणे 18 ते 20 जणांची टीम माझ्यासोबत होती. सकाळी लवकर नेहाचं शूट तिच्याशी बोलून आम्ही प्लॅन केलं तर त्यानंतर व्यावसायिक शूट. नेहाशी फोटोशूटसंबंधित बोलणं झाल्यावर तिने सगळ्यात आधी विचारलेला प्रश्न म्हणजे ‘‘थीम काय असेल?’’ या प्रश्नातच नेहाची अभ्यासू वृत्ती दिसून आली.

    यात ती कामाच्या बाबतीत किती पर्टिक्युलर आहे हे समजतं. 99 टक्के कलाकार एडिटोरियल फोटोशूटची थीम काय असेल वा त्यांना नेमकं काय करायचं आहे हे विचारत नाहीत. अनेकदा शूट हे ते सध्या करत असलेल्या शूटच्या लोकेशनवर अन्यथा त्यांच्या घरी करण्याचा आग्रह धरतात. त्यामुळे फोटोग्राफरला हवी असलेली थीम वा मेकओव्हर करता येतोच असं नाही. त्यातही अनेकदा शूटिंगच्या कपडय़ात आणि तिथल्याच लोकेशनला शूट केल्याने फोटोशूट हे फार कृत्रिम वा कोरडे होतात. त्यात फोटोग्राफरला हवा असलेला जीव त्याला टाकता येत नाही. त्यात अनेकदा शूटसाठी म्हणजेच व्हिडीओसाठी केलेला मेकअप हा त्रासाचा ठरतो आणि मग फोटो मिळूनही त्यातला गोडवा निघून जातो. नेहाच्या बाबतीत हे सारं काही घडणार नाही हे तिच्याशी बोलताना अगदी पहिल्याच वाक्याला मला समजल्याने मी थोडा आनंदात होतो. नेहाला थीम सांगितली. नेहाचं कॉस्च्यूम काय असेल, त्यासंबंधित मेकअप काय असेल आणि हेअरस्टाईल कशी असेल या सगळ्याची माहिती माझ्या टीमने दिली होती. नेहाला कॉस्च्यूम आणि इतर माहिती दिली होती. मात्र त्यातही तिने तपशीलवार ती समजून घेऊन त्यातले बारकावे जाणून घेतले होते.

    ‘हॉट ऍण्ड ग्लॅमरस’ या शब्दांना साजेसं ठरेल असं नेहाचं फोटोशूट करायचं ठरलं. हे शूट प्रत्यक्षात आणण्यासाठी माझी टीम अहोरात्र झटत होती. त्यानुसार कॉस्च्यूम डिझायनर, स्टायलिस्ट, मेकअप आणि हेअर डिझायनर आणि असिस्टंट अशी तगडी ब्रिगेडच या शूटच्या कामास लागली होती. पांढऱया रंगाचा शर्ट आणि एक हॉट पॅण्ट यात तिचे एक्स्प्रेशन टिपणारं एक फोटोशूट आम्ही आधी केलं. हाय की (प्रखर प्रकाशातली) या प्रकारातलं हे शूट होत. यात नेहाचा पूर्ण फोटो (फुल फिगर फ्रेम) मला कॅमेराबद्ध करायचा होता, तर त्यानंतर लगेच लाईटिंगमध्ये बदल करत लो की (मंद प्रकाशातली) फोटोग्राफी करण्याचं ठरलं. याच कॉस्च्यूमला थोडं आणखी ग्लॅमर लूक देत तिचं बॅकलेस फोटोशूट आम्ही केलं. अर्थातच या सगळ्यात नेहाची कम्फर्ट लेव्हल लक्षात घेऊन हे शूट प्रत्यक्षात आणण्यात मला आणि माझ्या टीमला यश मिळालं.

    शूट करताना आमच्यात – नेहा, मी, माझी स्टायलिस्ट दिव्या तांदळे – सतत संवाद होत होते. प्रत्येक लाईटिंगला, तिच्या बदललेल्या पोजेसला, प्रोफाईलला आणि या सगळ्याच गणित मांडत मी टिपलेल्या फोटोवर आमच्यातले संवाद व्हायचे. शूट सुरू केल्यानंतर मध्ये फार कमी वेळ आम्ही ब्रेक घेतला होता. प्रचंड इच्छाशक्ती आणि ऊर्जा असलेल्या मॉडेलसोबत काम करताना नेहमीच फोटोग्राफरला एक वेगळा आनंद होत असतो. त्यात सगळ्यात जास्त आनंद असतो तो मिळालेल्या वेळेचा अधिकाधिक उपयोग करत जास्तीत जास्त व्हेरिएशन्सवर काम करता आलं याचा.

    नेहानं अभिनयाच्या क्षेत्रात आपलं पहिलं पाऊल टाकलं ते बालवयातच. ठाण्याच्या रामनाथ थळवळ यांच्या उन्हाळी शिबिरात वयाच्या सातव्या वर्षी पिटुकली नेहा दाखल झाली आणि इथेच तिच्यावर अभिनयाचे संस्कार झाले. गुरू रामनाथ यांच्याकडे शिकत असतानाच एकता कपूरच्या बालाजी प्रॉडक्शनसाठी नेहा बालकलाकार म्हणून निवडण्यात आली आणि तिचा अभिनय क्षेत्रात श्रीगणेशा झाला. बालाजी प्रॉडक्शनच्या ‘कॅप्टन हाऊस’ या मालिकेतून नेहा छोटय़ा पडद्यावरून झळकली आणि त्यानंतर तिने मागे वळून बघितलेच नाही. अनेक मालिकांतून बालकलाकाराची भूमिका साकारत असलेल्या नेहाला शिक्षण आणि अभिनय या दोन्हीपैकी नेमकं एक काय निवडायचं याचा निर्णय तिने वयाच्या तेराव्या वर्षीच घ्यावा लागला आणि अभिनय क्षेत्रातच पूर्णवेळ राहण्याचा निर्णय तिने घेतला. अर्थातच हा धाडसी निर्णय घेण्यामागे तिच्या कुटुंबीयांचा वाटा अधिक होता हे ती नमूद करते.

    अनेक हिंदी मालिकांतून काम करत असलेल्या नेहाला ‘हसरते’ या मालिकेने चेहरा दिला आणि तिचं एक वेगळं अस्तित्व या क्षेत्रात निर्माण झालं. गुरू रामनाथ थळवळ यांच्यामुळेच नेहाने मराठी इंडस्ट्रीत पाऊल टाकल्याचं ती आदराने सांगते. अभिनयाचा प्रवास एका वेगळ्याच वेगाने करणाऱया नेहाचं सिनेमा निर्मितीचं स्वप्न पूर्ण झालं ते बायोस्कोप या मराठी सिनेमामुळे. या सिनेमासोबतच तिचे आणखी काही नवे प्रोजेक्टस् या वर्षी लवकरच प्रदर्शित होणार असल्याचं ती आनंदाने सांगते.

    धनेश पाटील
    dhanauimages@gmail.com

      February 4, 2019