(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • प्रसिध्द अभिनेत्री दिप्ती नवल

    दीप्ती नवल उत्कृष्ट अभिनेत्री तर आहेतच,परंतु त्या कुशल कवीयत्री,चित्रकार आणि छायाचित्रकारसुध्दा आहेत. त्यांचा जन्म २ फेब्रुवारी १९५१ रोजी झाला.या व्यतिरिक्त त्यांना संगीताची सुध्दा आवड आहे आणि त्या स्वत:काही वाद्य वाजवतात,हे विशेष.त्यांच्या प्रकाशित पुस्तकांमध्ये'लम्हा-लम्हा'हे पुस्तक प्रसिध्द आहे.

    ५० वर्षांचे फिल्मी करिअर पूर्ण कराणा-या दीप्ती नवल यांनी'एक बार फिर','हम पांच','चश्मे बहाद्दूर','अंगूर','मिर्च मसाला'आणि'लीला'सारख्या काही सिनेमांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवला आहे.तसे पाहता,दीप्ती नवल त्यांच्या'चश्मे बहाद्दूर'सिनेमामधून जास्त प्रसिध्द झाल्या होत्या.या सिनेमातील त्यांचा'चमको वाशिंग पाउडर'च्या'सेल्सगर्ल'चा अभिनय आजही लोकांच्या आठवणीत आहे.

    'जलियावाला बाग'सिनेमामधून सुरू झालेल्या दीप्ती नवल यांच्या फिल्मी करिअरचा प्रवास आजही सुरू आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या'यारियां'सिनेमात दीप्ती यांनी अभिनय केला आहे.जानेवारी २०१४ मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमात दीप्ती यांनी गर्ल्स होस्टेलच्या वॉर्डनची भूमिका साकारली होती.या सिनेमापूर्वी त्या २०१३ मध्ये'बीए पास'आणि'औरंगजेब'सिनेमातसुध्दा दिसल्या होत्या.या वर्षी रिलीज झालेल्या'महाभारत 3D'या अ‍ॅनिमेटेड सिनेमामधील'कुंती'पात्राला त्यांचा आवाज देण्यात आला आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      February 3, 2017


  • एफ. एम. रेडिओचे संशोधक ई एच आर्मस्ट्राँग

    आर्मस्ट्रॉंगनं डेव्हिड सारनॉफच्या साथीत अनेक संशोधनं केली. त्यांनी मिळून पहिला ‘पोर्टेबल’ रेडिओसुद्धा बनवला. त्यांच्या कंपनीतल्या एका सेक्रेटरीशीच आर्मस्ट्रॉंगनं लग्न केलं. यानंतर आर्मस्ट्रॉंगचा द फॉरेस्टशी पेटंटवरून लढा सुरू झाला. खरं म्हणजे द फॉरेस्टचा यात पराभव होईल असं वाटत होतं. कारण द फॉरेस्टनं सांगितलेल्या काही गोष्टी आणि कागदपत्रांमधल्या नोंदी तसंच साक्षीदारांची जबानी या सगळ्यांमध्ये खूप तफावत होती.

      January 31, 2022


  • अंबादास शंकर अग्निहोत्री

    कथाकार व आकाशवाणीचे श्रुतिकाकार अंबादास शंकर अग्निहोत्री यांनी “माणूस” या टोपण नावाने वृत्तपत्रीय लेखन केले.

    मुक्ता आणि इतर कथा, घुंगरू हे त्यांचे कथासंग्रह.

    १६ नोव्हेंबर १९७६ रोजी त्यांचे निधन झाले.

    Ambadas Shankar Agnihotri

      November 7, 2017


  • बॉलिवूडमधील प्रतिभावान दिग्दर्शक बिमल रॉय

    भारतीय चित्रपट इतिहासात जे देदीप्यमान तारे चमकून गेले त्यामध्ये निर्माते-दिग्दर्शक बिमल रॉय यांचे स्थान अढळ आहे. बिमल रॉय यांच्या चित्रपटांना आजमितीस अनेक वर्षे लोटली तरी त्यातील आशय, कलात्मकता आणि सर्जनशीलता सामान्य रसिकांच्या हृदयाचा ठाव अजूनही घेत असतात. १९११ ते १९६६ या काळातील ‘उदयरे पथे’, ‘दो बीघा जमीन’, ‘परिणीता’, ‘बिराज बहू’, ‘देवदास’, ‘मधुमती’, ‘सुजाता’, ‘बंदिनी’, ‘परख’ आणि ‘बापबेटी’ असे अनेक चित्रपट रॉय यांच्या श्रेष्ठत्वाची जाणीव करून देतात.

      July 12, 2017


  • ज्येष्ठ संगीत संयोजक मास्टर केरसी लॉर्ड

    हिंदी चित्रपटसृष्टीतील जवळजवळ ६० टक्के गाण्यात कावस, केरसी व बजी या लॉर्ड फॅमिलीचं योगदान आहे. एकट्या केरसीचीच पंधरा हजार गाणी आहेत.

      October 31, 2017


  • सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी

    महानुभाव पंथ प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी यांची ओळख करून देणे तसेच मानवी मूल्याणा नवसंजीवनी देण्यासाठी स्वामींची ओळख करून देने अत्यावश्यक आहे

      August 20, 2020


  • उर्दू शायर’, व स्वातंत्र्यसैनिक हसरत मोहानी

    उर्दू शायर', व स्वातंत्र्यसैनिक हसरत मोहानी यांचा जन्म १ जानेवारी १८७५ रोजी हसवा गावी (जि. फत्तेपूर) झाला.
    मौलाना ... हसरत मोहानी!

    संपूर्ण स्वातंत्र्य मागणारी भारत देशातील पहिली व्यक्ती! साहित्य निर्मीतीतून समाजाला योग्य दिशा दाखवून ब्रिटिशांवर कोरडे ओढण्यासाठी अनेकदा कारावास भोगणारे कदाचित एकमेव शायर!

    सर्वात आधी "संपूर्ण स्वराज्या"ची मागणी करणार्यांचपैकी एक. टिळकांच्या मतासारखी मागणी असलेला. लोकमान्य टिळकांचे खास समर्थक. मा.हसरत मोहानी यांचे बालपण आजोळी म्हणजे मोहाना (जि. उन्नाव) येथे गेल्याने त्यांनी कवितेत टोपणनाव घेताना मोहानी हे आडनाव लावले. ते १९0३ मध्ये बी.ए. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. हल्लीच्या भाषेत सांगायचे तर महाविद्यालयात ते टॉपर होते. त्यांना चालून आलेली सेशन जजची नोकरी केवळ इंग्रजांची आहे म्हणून त्यांनी ठोकरली. पुढच्याच वर्षी त्यांनी ‘उर्दू-ए-मोअल्ला’ हे मासिक सुरू केले. काँग्रेस पक्षाच्या एका अधिवेशनात ते सामील झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत रामप्रसाद बिस्मिलही होते. १९0८ मध्ये एकाचा लेख त्यांनी छापला आणि इंग्रजांची नाराजी ओढवून घेतली. लेखकाचे नाव न सांगितल्याने इंग्रजांनी तुरुंगात टाकले. ४५ किलोच्या बेडया त्यांना घातल्या जायच्या. कधी उलटे टांगले जायचे. रोज २0 किलो गहू दळायची शिक्षा होती.

    हसरत थकत तेव्हा बासरी वाजवत. इकडे ते दळत तर घरी खायला काही नसल्याने त्यांची पत्नी, निशात उन्नीसा, लोकांची दळणे दळून घर चालवीत होती. ते संपूर्ण स्वातंत्र्य (आझादी-ए-कामिल) मिळण्याच्या बाजूचे होते. सुभाषचंद्र बोस यांचे ते सर्मथक होते. मुस्लीम लीगच्या सभेत जीनांची त्यांची कायम जुंपायची. भरसभेत पंडित मदनमोहन मालवीय, सरदार पटेल, बॅ. जीना या सर्वांना एवढेच काय महात्मा गांधी यांनाही धारेवर धरण्यात त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. पहिल्या महायुद्धात इंग्रजांना मदत केल्याबद्दल गांधीजींवर त्यांनी जाहीर टीका केली. पण मोहानींचे भारतप्रेम इतके होते की त्यांच्यावर कोणीही रागावले नाही. भारतात कम्युनिस्ट पक्ष स्थापनेत त्यांचा खारीचा का होईना पण वाटा होता. हे आजच्या किती कम्युनिस्टांना माहिती आहे तेच जाणे. हसरत यांना अनेकदा तुरुंगाची हवा खावी लागली. त्यांच्या ७७१ पैकी ३८३ गझला तेथेच निर्माण झाल्या. त्यांनी पहिली गझल वयाच्या १२व्या वर्षी लिहिली.

    १८७५ साली उत्तर प्रदेशातील 'मोहान' या गावी जन्माला आलेल्या हसरत यांनी शिक्षणात विलक्षण प्रगती दाखवली. त्यानंतर अलीगढ विद्यापीठात पुढील शिक्षण घेतले. मात्र त्यांची खरी ओळख 'उर्दू शायर' म्हणण्यापेक्षाही स्वातंत्र्यसैनिक अशीच रास्त आहे. मौलानांना कारावासात अनेकदा टाकण्यात आले. दुसर्याद वेळेसच्या कारावासात तर अपरिमित हाल त्यांना सहन करावे लागले. खरे तर हालअपेष्टा प्रत्येकच कारावासात होत्या कारण सक्तमजूरी दरवेळेसच मिळायची. दिवसदिवसभर चक्की पिसावी लागायची. त्यांचे शरीर इतके भक्कम नव्हते की त्यांना ते सहन होईल. पण पर्याय नव्हता. मग मारहाण व्हायची. हंटरचे फटके पडायचे. त्यातच एखाद्या कैद्याने स्वतः केलेले काम वाढीव दाखवण्यासाठी यांचा आटा चोरला किंवा थोडासा जरी आटा जमीनीवर पडला तर वेगळी मारहाण व्हायची. त्यांच्या शरीरावर या मारहाणीच्या अनेक जखमा होत्या.

    मौलानांचा आणखीन जास्त अपमान करण्यासाठी त्यांना विशिष्ट प्रकारचे कपडे देण्यात आले जे अत्यंत टाकाऊ स्वरुपाचे व रफ होते. मात्र मौलानांनी तेही सहन केले. एकच स्टीलचे भांदे देण्यात आले ज्याचा वापर दिवसातील प्रत्येक गोष्टीसाठी करावा लागायचा. तेही त्यांनी सहन केले. त्यांना एक जाडेभरडे कांबळे फक्त देण्यात यायचे निजण्यासाठी!
    अतीव हालात काढलेल्या या प्रदीर्घ कालावधीत मौलानांच्या मनातून भौतिक इच्छा नष्ट होऊ लागल्या. त्यांच्यातील खमकेपणा व स्वातंत्र्याची आस तेजःपुंज होऊ लागल्या. त्याग झळाळू लागला. कोणत्याही भौतिक वासना राहिल्या नाहीत. आणि सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे कारावासात त्यांनी निर्माण केलेले साहित्यच सर्वाधिक व सर्वोत्कृष्ट ठरले. ब्रिटिश सरकारने एकदा त्यांना सक्तमजूरी व दंडही ठोठावला.

    अर्थातच, त्यांच्याकडे पैसेच नसल्यामुळे त्यांना दंड भरता आला नाही. मग सरकारने त्यांची शायरीची पुस्तके. जी मौलानांच्या मते त्यांच एकमेव पुंजी होती, ती अत्यंत अल्प किंमतीत विकून तो दंड वसूल करून त्यांचा आणखीन अपमान केला. मौलानांचे शायरीला सर्वात मोठे योगदान म्हणजे एकीकडे वझीर सारख्या शायरांची उथळ आणि काल्पनिक शायरी प्रसवत असताना आणि दुसरीकडे दागसारख्यांची जबान बयानची आणि काहीशी हझलीश शायरी प्रसवली जात असताना, मौलाना यांनी शायरीला पुन्हा एकदा नावलौकीक मिळवून दिला. मौलाना हसरत मोहानी हे कृष्णभक्त व टिळकभक्त पण होते.

    हसरत मोहानी एकदा मित्राच्या घरी गेले होते. जेवण वगैरे झाले. रात्री मित्राने झोपायला अंगणातली खाट दिली. थंडी मी म्हणत होती; पण मित्राचाही नाइलाज होता. घर लहान. उबदार ब्लँकेट दिले. सकाळी उठून मित्र पाहतो, तर काय हसरतसाहेब कुडकुडत, पोटात पाय घेऊन झोपलेले. मित्राने त्यांना उठविले आणि विचारले, ‘‘हे काय, मी छान ब्लँकेट दिले होते. तरीही तुम्ही....’’ हसरत म्हणाले, ‘‘मित्रा, ते विदेशी ब्लँकेट कसे घेऊ? मी टिळकांचा भक्त आहे ना!’’ हसरत यांची टिळकभक्ती अशी होती. त्यांनी लोकमान्य टिळकांवर लिहिलेला एक शेर वाचला तरी ही भक्ती कळते. ते म्हणतात -
    मग्मून न हो खातिरे-हसरत के तिलकतक
    पैगामे वफा बादे सहर लेके गयी है
    (हसरत तू नाराज होऊ नकोस. प्रभातकाळच्या वायूने तुझा संदेश टिळकांपर्यंत नेला आहे.)
    टिळकांवर एवढी भक्ती का? तर त्याचे उत्तर ते देत अस्तकी की, टिळकांइतका सडेतोड आणि निर्धाराचा मनुष्य माझ्या पाहण्यात आला नाही. लोकमान्यांचे जेव्हा निधन झाले तेव्हा हसरत म्हणाले होते -
    मातम न हो क्यों भारत में बपा दुनिया से
    सिधारे आज तिलक
    बलवंत तिलक, महाराज तिलक,
    आझादी के सरताज तिलक
    मौलाना हसरत मोहानी कट्टर धार्मिक होते., पण राजकारणात त्यांचे गुरू होते टिळक आणि तुरुंगात त्यांच्या सोबत होती कृष्णाची बासरी. कृष्णावर त्यांनी अनेक ठुर्मयांही लिहिल्या. जशी ही ठुमरी पाहा-
    मनमोहन श्याम से नैन लाग
    निसदिन सुलग रही तन आग
    मौलाना यांची शायरी ही दैनंदीन शब्दात, दैनंदिन जीवनातील संदर्भांसहीत मनातील भावभावनांना अत्यंत प्रभावीपणे व्यक्त करते. त्यांच्या शायरीची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे साधेपणा, प्रामाणिकपणा आणि सूक्ष्म भावना प्रकट करू शकण्याची हातोटी!
    चुपके चुपके रात दिन आसूं बहाना याद है
    हमको अबतक आशिकीका वो जमाना याद है

    खूब-रुयोंसे यारियाँ न गई
    या दोन्ही गुलाम अलींनी मशहूर करून टाकलेली गझल्स मा.हसरत मोहानी यांच्या आहेत. दिलकी बेइख्तियारियाँ न गई
    हसरत मोहानी यांची खूप मोठी साहित्यनिर्मीती उपलब्ध आहे. स्वतःचा काव्यसंग्रह, गालिबचा अनुवाद, काव्यातील महत्वाचे घटक, याशिवाय त्यांनी अनेक लेख लिहीले. पाकिस्तानात त्यांच्या नावाने एक लायब्ररी व उपक्रमही आहे. हसरत मोहानी यांचे निधन १३ मे १९५१ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट / प्रदीप निफाडकर

    खूब-रुयोंसे यारियाँ न गई.
    https://www.youtube.com/watch?v=RiH6UECmc3s&feature=youtu.be
    चुपके चुपके रात दिन आसूं बहाना याद है.
    https://www.youtube.com/watch?v=bCvtKpEsg1g

    हसरत मोहांनींचे काही इतर शेर:
    =========================================
    उनके खत की आरझू है उनके आमद का खयाल
    किस कदर फैला हुवा है कारोबारे इन्तझार
    =====================================
    कुछ समझमे नही आता कि ये क्या है 'हसरत'
    उनसे मिलकर भी न इजहारे तमन्ना करना
    =====================================
    जी मे आता है के उस शोखे-तगाफुल केशसे
    अब न मिलिये फिर कभी और बेवफा हो जाइये
    ======================================
    तेरी मैफिलसे उठाता गैर मुझको, क्या मजाल
    देखता था मै तुने भी इशारा कर दिया
    इश्कने उसको सीखा दी शायरी
    अब तो अच्छी-फिक्रे ‘हसरत’ हो गई

      January 1, 2019


  • ईमेलचे जनक रे टॉमिल्सन

    अमेरिकेतील प्रोग्रामर रे टॉमिल्सन बोस्टनमधील एका रिसर्च कंपनीत काम करत असताना, रे टॉमिल्सन यांनी १९७१ मध्ये पहिला ईमेल पाठवला आणि ईमेलद्वारे संभाषणाला सुरुवात झाली. त्यांचा जन्म २३ एप्रिल १९४१ रोजी झाला. रे टॉमिल्सन यांनी ही कामगिरी केली, तेव्हा इंटरनेटची सुरुवादेखील झाली नव्हती. मात्र जगात ही क्रांती घडायला पुढची २० वर्षं जावी लागली. टॉमिल्सन यांनी @ या साईनचा वापर केला होता जो आजपर्यंत वापरला जातो. टॉमिल्सन यांनी १९६० सालीच SNDMSG या प्रोग्रामद्वारे एकाच कॉम्प्युटरमध्ये एकीकडून दुसरीकडे पत्र पाठवण्याचं तंत्र विकसित केलं होतं. यात मेल कम्पोज करून, त्यावर पत्ता लिहून ते दुसऱ्या युजरला पाठवण्याची व्यवस्था होती.

    थोर प्रतिभावंत व ‘कल्ट फिगर’ असूनही निगर्वी आणि मनमिळावू स्वभावामुळे रेमण्ड माहिती तंत्रज्ञानाच्या विश्वात प्रिय व आदरणीय होते. अनेक पुरस्कार आणि सन्मानांनी टॉमलिन्सन यांना गौरविण्यात आले होते. सन २०१२ मध्ये ‘इंटरनेट हॉल ऑफ फेम’मध्ये त्यांना सन्मानपूर्वक स्थान देण्यात आले. प्रत्येकाचा ई-मेल अॅड्रेस लिहिण्याची ठराविक पद्धत जगन्मान्य झाली आहे. त्यात सुरुवातीस युजरनेम व नंतर त्याचा पत्ता अशी रचना असते. या दोन्हींच्या मध्ये @ हे चिन्ह सर्वप्रथम वापरण्याचे श्रेयही टॉमलिन्सन यांच्याकडेच जाते. रे टॉमिल्सन यांचं ५ मार्च २०१६ रोजी निधन झालं.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      March 5, 2019


  • चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक गजानन हरी तथा राजा नेने

    राजा नेने यांनी आपल्या कामाची सुरवात प्रभात फिल्म कंपनी पासून केली. त्यांचा जन्म १८ सप्टेंबर १९१२ रोजी झाला. व्ही शांताराम यांनी १९४२ साली प्रभात फिल्म कंपनी सोडल्यावर दामले-फत्तेलाल यांचे सहकारी दिग्दर्शक राजा नेने यांनी रामशास्त्री चित्रपट हा हिंदी-मराठी दिग्दर्शित केला. रामशास्त्री अर्धा तयार झाल्यावर राजा नेने यांनी १९४३ नोव्हेंबरमध्ये प्रभात कंपनी सोडली. नंतर राजा नेने यांनी पहिली तारीख या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. राजा नेने यांचे निधन २१ फेब्रुवारी १९७५ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      February 21, 2018


  • अभिनेता मनोज बाजपेयी

    मनोज बाजपेयी यांनी आपल्या करिअर ची सुरवात दूरदर्शन वर प्रसारित होणाऱ्या ‘स्वाभिमान’ या मालिकेपासून केली. ह्या मालिकेत मनोज बाजपेयी यांच्या बरोबर आशुतोष राणा आणि रोहित रॉय यांच्यामुळे त्यांचीही मालिका सुपरहिट ठरली. बैंडिट क्वीन या चित्रपटापासून त्यांनी बॉलीवुड मध्ये प्रवेश केला. १९९८ मधील राम गोपाल वर्मा यांच्या ‘सत्या’ चित्रपटात त्यांना प्रमुख भूमिका मिळाली आणि तेंव्हापासून ते प्रसिद्धीच्या झोतात आले.

      April 23, 2022