(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भारतासाठी पहिले ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खाशाबा जाधव

    जगातील सर्वोत्तम ऑलिम्पिक क्रीडा कुंभमेळ्यात भारताकरिता पहिले ऐतिहासिक वैयक्तिक पदक जिंकण्याचा पराक्रम कराडच्या खाशाबा दादासाहेब जाधव यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये केला होता. त्यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ रोजी झाला.

    महत्त्वाचे म्हणजे खाशाबाच्या पदकानंतर तब्बल ४४ वर्षे आपली वैयक्तिक पदकांची पाटी कोरी होती. कुस्तीतही पाच दशकांनंतर दुसरे पदक आले. फिनलंड देशाच्या राजधानीतील १५ व्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत फ्रीस्टाईल बॅंटमवेट कुस्ती गटात कॅनडा, मेक्सिको, जर्मनीच्या मल्लांना चितपट करून कराडजवळील गोळेश्वर गावातील खाशाबांनी ऑलिम्पिक कांस्यपदक पटकावण्याची किमया २३ जुलै १९५२ रोजी घडवली. कुस्तीची पंढरी कोल्हापुरात राजाराम महाविद्यालयात बी.ए.चे शिक्षण घेत असतानाच खाशाबांनी १९४८ साली लंडन ऑलिम्पिकमध्ये सहावे स्थान पटकावले होते.

    या ऑलिम्पि-कसाठी त्यांनी बोटीतून कंटाळवाणा प्रवास केला होता. ऑलिम्पिक पदकाचा निर्धार त्यांनी तेथेच केला होता. सलग चार वर्षे घाम गाळल्यानंतर त्यांची सुरुवातीला कुस्तीतील राजकरणामुळे निवडही झाली नव्हती. पंजाबच्या मल्लांनी आपल्या अन्यायाला वाचा फोडली तेव्हा खाशाबांनाही न्याय मिळाला. एक एक रुपया गोळा करून खाशाबांनी दुसरी ऑलिम्पिक वारी केली होती. कोल्हापूरच्या मराठा बॅंकेने त्यावेळी ३००० रुपयांचे कर्ज दिले नसते तर खाशाबांचा हेलसिंकीला जाण्याचा मार्ग बंद झाला असता. ही अडथळ्यांची शर्यत जिंकत हेलसिंकीत पोहोचलेल्या खाशाबांना ज्या दिवशी पदकाची लढत होती त्याच दिवशी प्रशिक्षकांनी खाशाबांना विश्रांती घेण्यास सांगून ते हेलिसिंकी शहरात फिरायला गेले होते. योगायोगाने खाशाबा स्पर्धेसाठी पोहोचले आणि त्यांनी पदकाची बाजी मारली.

    पदकानंतर सहा वर्षे ते बेकार होते. अखेर महाराष्ट्र पोलीस दलात त्यांनी कशीबशी नोकरी मिळाली. तेथेही त्याच्या क्रीडाकौशल्याचा उपयोग कमीच करून घेण्यात आला. त्यांचे जन्मगाव गोळेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावर ऑलिम्पिकच्या वर्तुळांसोबत प्रेरक स्तंभ उभा केला आहे. खाशाबा जाधव यांचे निधन १४ ऑगस्ट १९८४ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट / प्रा. संजय दुधाणे

    खाशाबा जाधव यांच्यावर प्रा. संजय दुधाणे यांनी केलेली कविता
    पंचरंगी ही वर्तुळे, सांगती आलिम्पिक गाथा।
    मैत्री, मानवतेद्वारे क्रीडावीर रचति पदक कथा ।।1।।
    जिंकुनी पहिलं मानाचं पदक, वाहिलं भारतभू चरणी।
    खाशाबा आद्य ऑलिम्पिकवीर, जन्मती कराड भुवनी ।।2।।
    रोवूनिया झेंडा मराठी मल्लविद्येचा, हेलसिंकी रणांगणी।
    कॅनडा, जर्मनी मल्ल चित, ऐतिहासिक 23 जुलै 1952 दिनी ।।3।।
    पहिला भारतीय, एकमेव मराठी वीर, कीर्ती दिगंतर।
    ऑलिम्पिकवीरा नमन, प्रेरणेची मशाल उजळती अंबर ।।4।।

      August 14, 2021


  • बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेत्री कोंकणा सेन

    आज बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेत्री कोंकणा सेनचा वाढदिवस.
    कोंकणा सेनचा जन्म ३ डिसेंबर १९७९ रोजी झाला.
    कोंकणा सेन शर्मा ही दिग्दर्शिका अपर्णा सेन शर्मा यांची मुलगी आहे. 'इंदिरा' या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारत १९८३ साली कोंकणाने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर ती २००० साली 'एक जे अच्छे कन्या' या बंगाली चित्रपटात झळकली. चित्रपट जगतात कोंकणाला सर्वात पहिल्यांदा प्रसिध्दी 'मिस्टर एंड मिसेस अय्यर' या चित्रपटामुळे मिळाली. याचे दिग्दर्शन तिची आई अपर्ण सेन शर्मानेच केले होते. ती सायन्स रायटर आणि जर्नलिस्ट मुकुल शर्मा यांची मुलगी आहे. तिची आई अपर्णा सेन एक प्रसिध्द सिने अभिनेत्री आणि दिग्दर्शिका आहे. 'मिस्टर एंड मिसेस अय्यर'साठी कोंकणाला अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. यानंतर कोंकणा २००५ साली 'पेज थ्री' चित्रपटात चमकली. या चित्रपटामुळे तिची हिंदी चित्रपट वर्तुळात ओळख निर्माण झाली. यापूर्वी तिने अनेक भूमिका केल्या असल्या तरी ते चित्रपट कमर्शियली सक्सेस नव्हते. या दरम्यान तिने 'वेक अप सिड' चित्रपटात रणबीर कपूरसोबत रोमान्स केला. फिल्म फेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोंकणाने मिळवला आहे. २००६ साली 'ओंकारा 'आणि २००७ साली 'लाइफ इन ए मेट्रो' या चित्रपटांसाठी कोंकणाला सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला होता. सहाय्यक अभिनेत्रीचा कोंकणाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. कोंकणा सेन ही अतिशय सिलेक्टेड चित्रपटातून आपल्याला दिसली आहे. प्रसिध्दीसाठी किंवा पैशासाठी सरसकट चित्रपटातून काम करण्याचा मोह तिने टाळला. आशयघन चित्रपटातूनच ती दिसली आणि छोट्या भूमिकातूनही ती उठून दिसली.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      December 3, 2016


  • गंगूबाई हनगळ

    १९३६ पासून त्यांचे सवाई गंधर्व यांच्याकडे रीतसर शिक्षण सुरू झाले आणि त्यानंतर ख्यालगायिका हीच त्यांची ओळख बनली. १९३२ ते ३५ या काळात गंगूबाईनी “गांधारी हनगल’ या नावाने जवळ जवळ साठेक गाणी ध्वनि मुद्रीत केली. मिया मल्हार, खंबायती, जोगिया, मालकंस, अडाणा, शुद्धसारंग, मुलतानी, शंकरा, हिंडोल, बागेश्री, देस, मांड, दुर्गा, बहार, भूपाली, बिहाग, पूरिया, कामोद, भैरवी, अशा विविध रागातल्या तीन साडेतीन मिनिटाच्या ध्वनिमुद्रिका त्यांनी दिल्या.

      June 25, 2022


  • ज्येष्ठ अभिनेत्री भारती गोसावी

    भानुविलास चित्रपटगृह येथे १९५८ मध्ये ‘सौभद्र’ नाटकातील छोटय़ाशा भूमिकेने भारती गोसावी यांचे रंगभूमीवर पदार्पण झाले. या नाटकात पं. छोटा गंधर्व (कृष्ण), गानहिरा हिराबाई बडोदेकर (सुभद्रा) आणि भार्गवराम आचरेकर (अर्जुन) अशा दिग्गजांबरोबर त्यांना शिकता आले. त्या भूमिकेसाठी भारती गोसावी यांना चक्क पाच रुपये मानधन मिळाले होते.

      June 22, 2022


  • जॉन वुडकॉक

    एखाद्या क्रिकेट, टेनिस किंवा फुटबॉल सामन्याच्या अखेरीस बातमी पाठवण्यापूर्वी संबंधित क्रीडा पत्रकारांनी एकत्रित येऊन बारकावे निसटणार नाहीत ना, याची खातरजमा करून घेणे तसे नित्याचेच. या नियमाला एक खणखणीत अपवाद- जॉन वुडकॉक! ‘द टाइम्स’साठी त्यांनी १९५४ ते १९८७ असा प्रदीर्घ काळ प्रामुख्याने क्रिकेट सामन्यांचे वृत्तांकन केले.

    कसोटी वा कोणत्याही क्रिकेट सामन्यात वार्ताहर कक्षात किंवा काही वेळा छायाचित्रकारांसमवेत सीमारेषेच्या जरा बाहेर बसून वुडकॉक वार्तांकन करायचे. त्यांची निरीक्षणे बिनचूक, वार्तांकन पूर्णतया निर्दोष! बहुतेक पत्रकार दुसऱ्या दिवशी त्यांच्या छापून आलेल्या बातम्या किंवा वृत्तलेख वाचायचे. सर्वांपेक्षा सरासरी किमान दोन निरीक्षणे वुडकॉक यांच्या वार्तांकनात अतिरिक्त तरीही तथ्याधारित आढळायचीच. डॉन ब्रॅडमन ते सचिन तेंडुलकर असा क्रिकेटपटूंचा विस्तीर्ण पट त्यांनी डोळ्याखालून घातला. वार्तांकनाकडे ते वळले तसे अपघातानेच.

    भूगोलाची पदवी आणि शिक्षणशास्त्राची पदविका घेऊन ते शिक्षकच व्हायचे. पण ऑक्सफर्डमध्ये क्रिकेट खेळत असताना विख्यात क्रिकेट लेखक ई. डब्ल्यू. स्वाँटन यांच्या संपर्कात आले. सुरुवातीला बीबीसीसाठी स्कोरर, मग स्वाँटन यांच्यासह ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यांचे हरकामे अशा जबाबदाऱ्या पाडल्या. बीबीसीसाठी चित्रफितींची रिळे पाठवण्यापासून, ते स्वाँटन यांचे चालक, व्हिस्की सहायक असे उद्योग सांभाळत असताना त्यांनी काही लिखाणही केले. त्याने स्वाँटन यांच्यासह अनेक प्रभावित झाले. दरम्यानच्या काळात ‘मँचेस्टर गार्डियन’मध्ये भारतीय मालिकेचे वार्तांकन करण्याची जबाबदारी त्यांनी यथास्थित निभावली.

    १९५४ मध्ये ‘द टाइम्स’ने त्यांना क्रिकेट वार्ताहर म्हणून संधी दिली, तेथे ते निवृत्त होईपर्यंत काम करत राहिले. जॉन अरलॉट, नेव्हिल कार्डस, ई. डब्ल्यू. स्वाँटन अशा दर्जेदार क्रिकेट पत्रकारांच्या परंपरेतील ते एक. परंतु जॉन वुडकॉक स्वत:चा उल्लेख क्रिकेट लेखक असाच करत. ‘विस्डेन क्रिकेट’ मासिकाचे ते १९८०पासून सहा वर्षे मानद संपादक होते.

    ‘विस्डेन’च्या जुनाट वळणाच्या क्रिकेट लिखाणात त्यांनी टवटवीतपणा आणला. त्यांनी जितक्या कसोटी सामन्यांचे वार्तांकन केले, तितके आजवर कोणीही केलेले नाही. त्यामुळेच त्यांचा उल्लेख ‘क्रिकेट पत्रकारांचे भीष्म पितामह’, ‘क्रिकेटचा विश्वकोश’ असा केला जाई. निवृत्त झाल्यानंतरही अगदी अलीकडेपर्यंत ते लिखाण करत. त्यांच्या लिखाणाला ‘द टाइम्स’मध्ये सन्मानाने स्थानही दिले जात होते.

    जॉन वुडकॉक यांचे १८ जुलै २०२१ रोजी निधन झाले.

    संकलन संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

      August 7, 2021


  • अभिनेते टॉम ऑल्टर

    टॉम ऑल्टर यांना भारत सरकारने पदमश्री देऊन त्यांचा सन्मान केला होता. त्याचबरोबर त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले.

      August 7, 2021


  • लेखक विश्वास पाटील

    इतिहासाशी पूर्ण प्रामाणिक राहून व त्याचे नवे पैलू शोधून मांडणारा लेखक अशी त्यांची प्रतिमा आहे. सुभाषबाबूंच्या चरित्राचा एवढा व्यापकपणे शोध घेणारी कादंबरी खुद्द बंगालीतही नाही.

      November 28, 2021


  • गणेश त्र्यंबक देशपांडे

    मराठी त्याचप्रमाणे संस्कृत भाषांच्या प्राचीन व आर्वाचीन साहित्य प्रवाहांना एकत्रित करण्याबरोबरच, संस्कृत काव्यशास्त्राचा संपन्न इतिहास विस्ताराने गणेश देशपांडे यांनी मराठी रसिकांसमोर कलात्मकते सोबतच रेखीवपणे मांडला आहे. एक अत्यंत विद्वान मराठी साहित्यिक व संस्कृत ज्ञान झर्‍यांचा सदैव खळखळणारा चालता बोलता शब्दकोष अशी गणेश देशपाडेंची समाजात ख्याती होती.

    गणेश देशपाडेंची ऐकुण १२ पुस्तके प्रसिध्द झाली असून, त्यांच्या “भारतीय साहित्यशास्त्र” या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. नागपूर विद्यापीठाने १९६० साली त्यांना डी. लिट्. ही पदवी, तर त्याच वर्षी त्यांना राज्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.

    दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित

      January 3, 2015


  • गंगाराम देवजी सपकाळ

    गंगाराम देवजी सपकाळ

    क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. क्रिकेटचे भारतामधील करोडो चाहते वेगवेगळ्या मार्गांनी आपलं क्रिकेटप्रेम व्यक्त करीत असतात. काही जण खेळाडुंची व या खेळातील ऐतिहासिक क्षणांची कातरणे आपल्या संग्रही जतन करून ठेवतात तर काही जण अगदी सुरूवातीपासून होत असलेल्या मॅचेसची इत्यंभुत माहिती साठवून ठेवतात.

      August 29, 2011


  • थोर मराठी कवी व लेखक बा.सी.मर्ढेकर

    बाळ सीताराम मर्ढेकर उर्फ बा.सी.मर्ढेकर यांना मराठी नवकाव्याचे प्रवर्तक मानले जाते. त्यांचा जन्म १ डिसेंबर १९०९ रोजी झाला.मर्ढेकरांच्या कवितेतून निराशा व वैफल्य प्रगट होते बा.सी. मर्ढेकर हे भाषा प्रभू होते. त्यांच्या काव्यात आशय आणि अभिव्यक्ती यांचा सुसंवाद आढळतो. परंपरागत सांकेतिक उपमान व प्रतिमा न वापरता त्यांनी नव्या प्रतिमांचा उपयोग केला त्याचबरोबर ते आपल्या अनुभूतींशी प्रामाणिक राहीले. मर्ढेकरांचे काव्य वेदनेचे काव्य आहे. मा.बा.सी.मर्ढेकर हे मराठीतील नवकवितेचे आद्य प्रवर्तक म्हणून ओळ्खले जातात. केशवसुतांनंतरचे मराठीतील एक युगप्रवर्तक कवी म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो. मा.मर्ढेकरांनी काही काळ ‘टाइम्स ऑफ़ इंडिया’ या इंग्रजी वृत्तपत्रात सहसंपादक म्हणून काम केले होते. १९३८ मध्ये आकाशवाणी केंद्राचे आधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. ते समीक्षक म्हणूनही प्रसिद्ध होते. मराठीत नवटीकेचा प्रांरभ मा.बा.सी.मर्ढेकर यांनीच केला. त्यांचे समीक्षा ग्रंथ अतिशय महत्वाचे समजले जातात.*बा.सी.मर्ढेकर* यांचे २० मार्च १९५६ साली निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    बा.सी.मर्ढेकर यांची ग्रंथसंपदा:
    रात्रीचा दिवस, पाणी, तांबडी माती या कादंबर्यास आणि ‘सौंदर्य आणि साहित्य’ ‘वाड्मरयीन महात्मता ’हे समीक्षा ग्रंथ, तसेच काही संगीतिका त्यांनी लिहिल्या आहेत.
    मा.बा.सी. मर्ढेकर
    दवांत आलीस भल्या पहाटी
    शुक्राच्या तोऱ्यात एकदा,
    जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
    तरल पावलांमधली शोभा

    अडलिस आणिक पुढे जराशी
    पुढे जराशी हसलिस; - मागे
    वळुनि पाहणे विसरलीस का?
    विसरलीस का हिरवे धागे?

    लक्ष्य कुठे अन कुठे पिपासा,
    सुंदरतेचा कसा इशारा;
    डोळ्यांमधल्या डाळिंबांचा
    सांग धरावा कैसा पारा!

    अनोळख्याने ओळख कैशी
    गतजन्मीची द्यावी सांग;
    कोमल ओल्या आठवणींची
    एथल्याच जर बुजली रांग!

    तळहाताच्या नाजुक रेषा
    कुणि वाचाव्या, कुणी पुसाव्या;
    तांबुस निर्मल नखांवरी अन
    शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या!

    दवांत आलिस भल्या पहाटी
    अभ्राच्या शोभेत एकदा;
    जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
    मंद पावलांमधल्या गंधा.

      March 21, 2017