(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जेष्ठ हिंदी-मराठी अभिनेत्री लीला चिटणीस

    लीला चिटणीस यांचे वडील हे पुरोगामी विचारांचे, उच्चशिक्षित, प्रार्थना समाजाचे पुरस्कर्ते होते. त्यांचा जन्म ९ सप्टेंबर १९०९ रोजी झाला. त्यांचा प्रेम विवाह डॉ. चिटणीस ह्यांच्यांशी झाला होता. स्त्रियांनी चित्रपटात काम करणे हीन समजल्या जाणाऱ्या १९३०-१९४० च्या दशकांत उच्च विद्याविभूषित असलेल्या लीला चिटणीसांनी समाजाचा रोष पत्करून अभिनयाचा मार्ग निवडला होता.

    लीला चिटणीस यांची रुपेरी पडद्यावरची कारकीर्द जशी प्रदीर्घ , तशीच ती धाडसीही म्हणावी लागेल. नाटकांत किंवा चित्रपटांत कामे करणे म्हणजे अतिशय लाजिरवाणे व निषिद्ध मानले जायचे , त्या काळात लीला चिटणीस यांनी रोमॅन्टिक भूमिका केल्या. काहीशा बुजऱ्या व बावळट अशोककुमारचा आत्मविश्वास वाढविण्यात लीला चिटणीस यांचा फार मोठा हातभार आहे. आपण नायिकेच्या भूमिकेत यशस्वी होत असतानाच त्यांनी ' शहीद' मध्ये दिलीपकुमारच्या आईची भूमिका स्वीकारत आपल्या धाडसी वृत्तीची झलक दाखविली.

    दिलीप-राज-देव आनंद या रुपेरी पडद्यावर सर्वात यशस्वी त्रिकुटाची लीला चिटणीस पडद्यावरची यशस्वी आई ठरली. त्यांच्या डोळ्यांतील कारुण्य, चेहऱ्यावरील भावुकता, कृश शरीरयष्टीतील सहज दिसणारी लवचीकता व संवादफेकीतील स्पष्टता यामुळे लीला चिटणीस कोणत्याही शॉटमध्ये भाव खाऊन जात. त्या कधीच सुलोचना, कामिनी कौशल किंवा अचला सचदेवप्रमाणे रडक्या आई झाल्या नाहीत, किंवा ललिता पवारसारख्या खाष्ट आईही झाल्या नाहीत.

    वात्सल्यसिंधू आईचे एक उदात्त, पण प्रसन्न व्यक्तिमत्त्व म्हणून लीला चिटणीस या रुपेरी पडद्यावरील एक अजरामर कलाकार म्हणून कायमच स्मरणात राहतील. त्या काळात, लीला चिटणीस आपल्या चित्रपटातली गाणी स्वत:च गायच्या आणि त्या गाण्यावर त्या अशा काही धमाल नाचायच्या की लोक त्यांचा तो नाच पाहून वेडावून जायचे. ' झूला ' मधल्या ' हिंडोले कैसे झूलू..' व ' झूलो के संग..' या दोन गाण्यांवर त्या अगदी धमाल नाचल्या होत्या. त्यांच्या नृत्यावर अनेक जण अगदी जीव ओवाळून टाकायला तयार असायचे.

    लीला चिटणीस यांनी त्यांचे आत्मचरित्रही लिहिले आहे. मा.लीला चिटणीस यांचे १४ जुलै २००३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      September 9, 2018


  • ख्यातनाम नाटककार, लेखक अशोक पाटोळे

    आई रिटायर होतेय', 'हीच तर प्रेमाची गंमत आहे', 'जाऊ बाई जोरात', 'श्यामची मम्मी', 'एक चावट संध्याकाळ' ही गाजलेली नाटकं, 'हसरतें', 'श्रीमान श्रीमती' या सुपरहिट मालिका आणि 'चौकट राजा', 'झपाटलेला' यासारखे सिनेमे आपल्या सिद्धहस्त लेखणीतून साकारणारे अशोक पाटोळे यांचे शालेय शिक्षण गिरगावातील विल्सन हायस्कूल येथे झाले. अशोक पाटोळे यांना लहानपणापासूनच लेखनाची आवड होती. त्यांचा जन्म ५ जून, १९४८ रोजी झाला.

    कथाकार, नाटककार म्हणून १९७१ मध्ये त्यांनी ‘आयजीच्या जिवावर बायजी उदार’ ही पहिली एकांकिका लिहिली. त्यांनी लिहिलेली पहिली कथा 'नवाकाळ' या दैनिकात प्रकाशित झाली होती. पुढे 'श्री दीपलक्ष्मी', साप्ताहिक मार्मिक' आदी नियतकालिकांमधून त्यांनी लिहिलेल्या विनोदी कथा प्रकाशित झाल्या होत्या. पाटोळे ह्यांनी दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांचेही लेखन केले होते. लहानपणापासूनच लिखाणाची आवड असलेले पाटोळे यांनी पहिल्यांदा १९७१ मध्ये 'आयजीच्या जीवावर बायजी उदार' या एकांकिकेचे लेखन केले होते. यानंतर त्यांनी विनोदी व ह्रदयस्पर्शी अशा दोन्ही प्रकारच्या नाटकांचे लेखन करत नाट्यक्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

    पाटोळे यांनी लिहिलेली २० नाटके व्यावसायिक रंगभूमीवर गाजली. 'झोपा आता गुपचूप' हे त्यांचे पहिले नाटक. 'मुंबई पोर्ट ट्र्स्ट'च्या 'एकटा जीव सदाशिव' या नाटकात त्यांनी विनोदी नायकाची भूमिका केली होती. चित्रकला, वक्तृत्व, गीतगायन व अभिनय यांचीही पाटोळ्यांना आवड होती. अनुपम खेर यांच्या ’कुछ भी हो सकता है’ या आत्मकथनात्मक नाटकाचे लेखन अशोक पाटोळे यांनी केले होते. अशोक पाटोळे यांची अनेक नाटके हिंदी-गुजरातीतही यशस्वी ठरली आहेत. सातव्या मुलीची सातवी सातवी मुलगी हा कथासंग्रह व पाचोळ्या हा त्यांचा कविता संग्रहदेखील प्रसिद्ध झाला होता. अधांतर, हद्दपार, अध्यात न मध्यात, हसरतें यांसारख्या यशस्वी दूरदर्शन मालिकांचे लेखनही त्यांनी केले होते. अशोक पाटोळे यांचे १२ मे २०१५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      June 5, 2017


  • कमलाकर तोरणे

    भालजी पेंढारकर हे त्यांचे गुरू. ‘महारथी कर्ण’ या चित्रपटात त्यांनी अभिनयही केला होता. ‘हिरवा चुडा’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट.

      June 22, 2022


  • प्र. के. घाणेकर

    घाणेकर, प्र. के.

    ध्यास आणि वेड या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. एखाद्या गोष्टीच्या ध्यासापायी सारे आयुष्य वेचणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात काही कमी नाही. त्यामध्ये प्र. के. घाणेकर यांचे नाव आता अग्रेसर ठरते आहे. स्नेहल प्रकाशनच्या वतीने या वर्षीचा ‘स्नेहांजली’ पुरस्कार त्यांना देण्यात आला, तेव्हा त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना, मित्रांना आणि विद्यार्थ्यांनाही कमालीचा आनंद झाला.

    गेल्या चाळीस वर्षांच्या काळात जे कुणी घाणेकर सरांच्या सान्निध्यात आले, ते त्यांच्या परिवाराचे सदस्य बनले. किल्ले हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक व्यवच्छेदक भाग आहे. छत्रपती शिवाजीमहाराजांनी या नव्या संस्कृतीचा उगम घडवताना ज्या अनेक गोष्टी विचारात घेतल्या होत्या, त्यांपैकी पर्यावरण आणि वनस्पती याही महत्त्वाच्या बाबी होत्या, याची जाणीव घाणेकर यांना अगदी महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच झाली. कारण त्यांच्या अभ्यासाचा विषय होता, वनस्पतिशास्त्र. प्रा. हेमा साने या त्यांच्या अध्यापक. त्यांच्या मते वनस्पतिशास्त्र वर्गात शिकता येत नाही, त्यासाठी निसर्गातच जायला हवे. म्हणून किल्ले, दुर्ग अशा ठिकाणी अभ्यास सहली जाऊ लागल्या. घाणेकरांच्या मनात वनस्पतींबरोबरच त्या किल्ल्यांच्या इतिहासाबद्दलही कुतूहल जागृत झाले आणि मग त्यांनी त्या इतिहासाकडे आपला मोर्चा वळवला. ३८ वर्षे वनस्पतिशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र या विषयाचे विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून काम करताना त्यांनी इतक्या व्यापक परिसरात भ्रमण केले, की एका माणसाला एका आयुष्यात एवढे सगळे कसे करता येईल, अशी आपल्याला चिंता वाटावी. ज्या काळात पर्यावरण हा विषय चर्चेतही नव्हता, तेव्हा म्हणजे १९८२ मध्ये प्रा. घाणेकर यांनी त्यावर पहिले पुस्तक लिहिले. ‘इतिहास घडवणाऱ्या वनस्पती’ या त्यांच्या पुस्तकात वनस्पतींमुळे घडलेल्या इतिहासाची रोचक कहाणी आहे. म्हणजे भारतात मसाल्याच्या वनस्पती पिकत असल्यानेच भारतावर आक्रमण झाले आणि पारतंत्र्य आले, असे त्यांचे म्हणणे. इतिहास समजून घेण्यासाठी किल्ले पाहायचे, तर त्यात भटकंतीचाही आनंद मिळवता आला पाहिजे. त्यामुळे त्यांनी भटकंती या विषयावरही अर्धा डझन पुस्तके लिहिली. ५६ पुस्तकांचे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेतच, परंतु हिमालय, वृक्ष, निसर्ग, किल्ले या विषयांवर त्यांनी सादर केलेल्या ‘स्लाईड शो’चे किमान पाचशे कार्यक्रम झाले आहेत. देशभरात हजारांहून अधिक ठिकाणी त्यांनी या अनेक विषयांवर व्याख्याने दिली आहेत आणि हा वाचायज्ञ अजूनही तेवढय़ाच दमदार रीतीने सुरू आहे. त्यांच्याकडे सातवाहन कालापासूनच्या नाण्यांचा अमूल्य संग्रह आहे. अनेक प्रकारच्या जीवाश्मांचे, शंख-शिंपल्यांचे एक उत्तम संग्रहालयच त्यांच्या घरी आहे. त्याशिवाय त्यांच्या आवडीच्या विषयांवरील किमान पंधरा हजार कात्रणांचा संग्रहही त्यांनी तयार केला आहे. एवढे सगळे घडताना आपल्याला आयुष्यात नेहमी उत्तम गुरू मिळाले, याचे समाधान ते नेहमीच व्यक्त करतात. त्यांना मिळालेला हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाला सलामच आहे.

      August 5, 2017


  • संतोष नेवपूरकर

    पिंपळी रसायनात पीएचडी मिळवलेले औरंगाबादचे वैद्य संतोष नेवपूरकर हे आयुर्वेद व्यासपीठ या संस्थेच्या माध्मातून देशभरात आयुर्वेदातील संशोधनाचे प्रसारकार्य करीत आहेत. विद्यार्थ्यांचा बुध्यांक, बोन मॅरोवरील उपचार याविषयी त्यांनी विविधांगी संशोधन केले आहे. शिरोधारा उपचारासाठी तयार केलेल्या भांड्यासाठी पेटन्ट मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत.

    संतोष नेवपूरकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला संशोधनाची बहुगुणी मात्रा हा लेख पुढील पानावर वाचा.

    संतोष नेवपूरकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला संशोधनाची बहुगुणी मात्रा हा लेख वाचा.

    nevpurkar-santosh-modified

      September 8, 2015


  • ‘वॉटर मॅन ऑफ इंडिया’ डॉ. राजेंद्रसिंह

    ‘वॉटर मॅन ऑफ इंडिया’ म्हणून प्रेमादराने गौरवले जाणारे भारतातल्या जलसंवर्धन चळवळीतले अग्रणी डॉ. राजेंद्रसिंह यांचा जन्म ६ ऑगस्ट १९५९ रोजी बागपतमध्ये (उत्तर प्रदेश) येथे झाला.

    डॉ. राजेंद्रसिंह हे ‘वॉटर मॅन ऑफ इंडिया’ म्हणून प्रेमादराने गौरवले जाणारे भारतातल्या जलसंवर्धन चळवळीतले अग्रणी आहेत. १९७५मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या ‘तरुण भारत संघ’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जलसंवर्धनाचं खूप मोठं कार्य उभारलं आहे. राजस्थानात थर वाळवंटानजीकच्या गावांमध्ये पाणी साठवण्यासाठीच्या ‘जोहड’या पारंपरिक रचनांसोबतच छोटे बंधारे वगैरेंच्या माध्यमातून जलसंवर्धनासाठी त्यांनी लोकांना मार्गदर्शन आणि साह्य केलं. या संदर्भातल्या कामाची सुरुवात १९८५ मध्ये एका गावापासून झाली.

    आजवर ८६००हून अधिक जोहड उभारली गेली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे गावकरी जलस्वयंपूर्णतेसाठी एकत्र येऊ लागले. आज सुमारे एक हजार गावांमध्ये पाणी परत आणण्यात ते यशस्वी झाले आहेत. तसंच, राजस्थानातल्या पाच नद्यांचं पुनरुज्जीवनही शक्य झालं आहे. राजस्थानातल्या अल्वर जिल्ह्यात त्यांचं काम मोठं आहे.

    या क्षेत्रातल्या त्यांच्या अतुलनीय कार्याची दाखल घेऊन २०१५ साली डॉ.राजेंद्रसिंह यांना ‘नोबेल’च्या दर्जाचं मानलं जाणारं दीड लाख डॉलर्सचं ‘स्टॉकहोम वॉटर प्राइझ’ मिळालं आहे. तसंच रेमन मॅगसेसे पुरस्कार, जमनालाल बजाज पुरस्कार आणि अहिंसा पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.

    डॉ.राजेंद्रसिंह यांची वेबसाईट. http://tarunbharatsangh.in/
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      August 6, 2021


  • केशव बाबूराव लेले

    शिल्पकार र.कृ. फडके यांनी सुरू केलेल्या व केशव लेले यांच्या अशा प्रदर्शनांनी महाराष्ट्रातील जनसामान्यांची यथार्थदर्शी वास्तववादी कलेप्रती असलेली अभिरुची वाढवली. त्यातूनच कलेच्या विविध शैलींतील प्रगल्भतेऐवजी आजही महाराष्ट्रात याच प्रकारच्या यथार्थदर्शी कलेचा प्रभाव आढळून येतो.

      June 25, 2022


  • बालसाहित्यकार सुमती हरिश्चंद्र पायगावकर

    पतंग, चेंडू नि शिपला, फेनाली, अरेबियन नाइट्स, चंद्रफुले, एका पांघरुणाची गोष्ट, हॅन्स ॲ‍न्डरसनच्या परीकथा, जिमी, लालझंडी छोटी नीरा, छोटा लाल बूट, किलबिल, गंमतीदार किटली, अलिबाबाची गुहा, पोपटदादाचे लग्न, असं त्याचं लेखन प्रसिद्ध आहे.

      June 7, 2022


  • ख्यातनाम शास्त्रीय गायक उस्ताद अब्दुल राशिद खान

    ज्या ग्वाल्हेर घराण्याची परंपरा ख्यातनाम शास्त्रीय गायक उस्ताद अब्दुल राशीद खाँ यांनी चालवली, ते घराणे म्हणजे गायन सादर करण्याची शैली ही भारतीय अभिजात संगीतातील नोंद असलेली पहिली शैली. अनेक प्रतिभावंतांनी त्या शैलीमध्ये मोलाची भर घातली, ती प्रवाही ठेवली आणि तिचे अस्तित्व कायम ठेवण्यास मदत केली.

      February 18, 2018


  • सतिश मोडखळकर

    प्रत्येक कलावंत हा तोंडाने नाही तर त्याच्या कलेतून बोलत असतो. त्याच्या तत्वांना, भावनांना, व आयुष्यभर जोपासलेल्या स्वप्नांना तो कलेच्या सौंदर्यामध्ये घोळवत असतो, मुर्तरूप देत असतो, त्यांना एका अर्थाने जीवंतच करत असतो. खळबळलेला समुद्र जसं आपल्या मनातलं वादळ व्यक्त करण्यासाठी लाटांचा आधार घेतो, त्याप्रमाणे कलावंत आपल्या कलेतून ही तळमळ रसिकांसमोर मांडत असतो. पायामधील पैंजण ज्याप्रमाणे हळुवार वाजुन पावलं कुठे चालली आहेत याची जाणीव करून देतात, त्याप्रमाणे कलाकाराच्या मनाचा थांगपत्ता हा त्याच्या कलेच्या अविष्कारामधून केवळ दर्दी रसिकांनाच लागु शकतो.

      July 19, 2011