(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अभिनेता भारत भूषण

    भारत भूषण यांना लहानपणापासूनच चित्रपटांमध्ये काम करायची आवड होती. त्यांचा जन्म १४ जुन १९२० रोजी उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्ह्यात झाला.पण त्यांच्या वडिलांना ते पसंत नव्हते म्हणून मग त्यांना घर सोडावे लागले. चित्रपटांमध्ये काम करायच्या उद्देशाने भारत भूषण कलकत्याला निघून गेले. त्यावेळेला तेथे मोठमोठे चित्रपट बनत होते. तेथे त्यांना संघर्ष करावा लागला. एक दिवस त्यांच्या कष्टाचं चीज झाले व त्यांना चित्रपटांमध्ये काम मिळायला लागले. भारत भूषण चित्रलेखा या चित्रपटातून सहाय्यक अभिनेता म्हणून पडद्यावर आले. त्यांना सर्वात मोठा ब्रेक दिला तो म्हणजे केदारनाथ शर्मा यांनी सुहाग रात या चित्रपटामध्ये. या चित्रपटात भारत भूषण यांनी गीताबाली यांच्याबरोबर काम केले. हा चित्रपट हिट झाला. त्यांनतर १९५२ साली आलेला बैजूबावरा या चित्रपटाने त्यांना स्टार बनवलं. हा तो काळ होता जेव्हा भारत भूषण हे सगळ्या मोठ्या अभिनेत्री सोबत काम करत होते जसे मीनाकुमारी, वैजंतीमाला, गीताबाली सारख्यांबरोबर काम करत होते. आता ते चित्रपटांमध्ये अभिनयासोबत निर्माता म्हणूनही काम करू लागले.

    भारत भूषण यांचे मुंबई व्यतिरिक्त इतर शहरांमध्येही अनेक बंगले होते. महागड्या आणि परदेशी गाड्या पण होत्या. ते निर्मिती क्षेत्रात उतरले परंतु त्यांना यश आले नाही. काही चुकीच्या निर्णयांमुळे भारत भूषण राजा पासून भिकारी बनत गेले. गाडी बंगला सगळं काही विकायची वेळ आली. भारत भूषण यांना खूप आर्थिक संकटांना सामोरे जावं लागलं. एक वेळ अशी पण आली कि त्यांना भाड्याच्या घरात राहावं लागलं. काही लोक म्हणत असत की हे सर्व त्यांच्या आणि मीनाकुमारीच्या प्रेमप्रकरणाचा परिणाम मानत होते. चित्रपटात मुख्य कलाकाराची भूमिका तर लांबच राहिली त्यांना छोटे मोठे रोल सुद्धा मिळेनासे झाले होते. त्यांची रोजची खायची सोया मोठ्या मुश्किलीने होत होती. असं म्हणतात कि ज्या स्टुडिओमध्ये गेल्यावर लोक न चुकता सलाम करायचे त्या स्टुडिओमध्ये भारत भूषण यांनी चौकीदाराची नोकरी देखील केली. याच गरिबीच्या परिस्थितीत भारत भूषण यांचे निधन २७ जानेवारी १९९२ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    भारत भूषण यांचे चित्रपट. भक्त कबीर (1942), भाईचारा (1943), सुहागरात (1948), उधार (1949), रंगीला राजस्थान (1949), एक थी लड़की (1949), राम दर्शन (1950), किसी की याद (1950), भाई-बहन (1950), आंखें (1950), सागर (1951), हमारी शान (1951), आनंदमठ और मां (1952) श्री चैतन्य महाप्रभु (1954), मिर्जा गालिब (1954), रानी रूपमती (1957), सोहनी महीवाल (1958), सम्राट्चंद्रगुप्त (1958), कवि कालिदास (1959), संगीत सम्राट तानसेन (1962), नवाब सिराजुद्दौला (1967)

      June 23, 2018


  • प्रसिध्द प्राच्य विद्यापंडीत मॅक्सम्युल्लर

    ’एन्शन्ट संस्कृत लिटरेचर’, ’लेक्चर्स ऑन दी सायन्स ऑफ लॅग्वेज’, ’इंन्ट्रोडक्शन टू सायन्स ऑफ रिलिजन’, ’बायोग्राफिज ऑफ वर्डस’, ’सिक्स सिस्टिम्स ऑफ इंडियन फिलॉसॉफी’ हे त्यांनी लिहिलेले काही प्रमुख ग्रंथ होत.

      October 28, 2021


  • रवि शंकर

    रवि शंकर यांचा जन्म ७ एप्रिल १९२० रोजी झाला. रवि शंकर यांचे वडील श्याम शंकर विद्वान व कायदेतज्ज्ञ होते. त्यांचे पूर्ण बालपण वडिलांच्या गैरहजेरीतच गेले. त्यांची आई हेमाङ्गिनी यांनी त्यांचे पालन केले. थोरले भाऊ उदय शंकर हे विख्यात भारतीय नर्तक होते. ते पॅरिस येथे राहत. १९३० साली रवि शंकर आईसोबत पॅरिस येथे गेले. त्यांचे आठ वर्षांचे शालेय शिक्षण तेथेच झाले. १९३८ साली, वयाच्या अठराव्या वर्षी रविशंकर यांनी उस्ताद अलाउद्दीन खान यांच्याकडे शिक्षण सुरू केले. शिक्षणकाळात ते उस्ताद साहेबांचे वडील व आजचे प्रसिद्ध सरोदवादक अली अकबर खान यांच्याशी परिचीत झाले. त्यांनतर त्या दोघांनी अनेक ठिकाणी एकत्र जुगलबंदी केली. उस्ताद अलाउद्दीन खान यांच्याकडिल शिक्षण १९४४ पर्यंत चालले. १९३९ साली अमदावाद शहरात प्रथम खुली मैफल केली. १९४५ सालापासूनच रविशंकराच्या साङ्गीतिक सृजनशीलतेचे भ्रमण इतर शाखांमध्येही सुरू झाले. त्यांनी बॅलेसाठी संगीत रचना व चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन सुरू केले. त्याकाळातील गाजलेले चित्रपट धरत्री के लाल व नीचा नगर या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले. इक्बाल यांच्या सारे जहासे अच्छा या गीतास त्यांनी दिलेले संगीत अतिशय लोकप्रिय ठरले. इ.स. १९४९ साली रवि शंकर दिल्लीच्या ऑल इन्डिया रेडिओत संगीत दिग्दर्शक म्हणून रूजू झाले. याच काळात त्यांनी वाद्य वृन्द चेम्बर ऑर्केस्ट्रा स्थापन केला. १९५० ते १९५५ सालात रवि शंकर यांनी सत्यजित राय यांच्या अपु त्रयी - (पथेर पांचाली, अपराजित व अपुर संसार) या चित्रपटांना संगीत दिले. यानंतर त्यांनी चापाकोय़ा , चार्ली व सुप्रसिद्ध गांधी चित्रपटांस संगीत दिले. १९६२ साली पन्डित रवि शंकर यांनी किन्नर स्कुल ऑफ म्युझिक, मुंबई व १९६७ साली किन्नर स्कुल ऑफ म्युझिक, लॉस ऍन्जलेस स्थापन केली. रवि शंकर यांचे संगीत व्यक्तित्व दुमुखी होते. सतारवादक व संगीतकार अशी ती दोन रूपे होती. सतारवादक म्हणून ते परंपरावादी व शुद्धतावादी; पण संगीतकार म्हणून उन्मुक्तपणा अशा रूपात वावरत. १९६६ साली त्यांनी प्रसिद्ध पाश्चात्य संगीतकार जॉर्ज हॅरिसन यांच्या सोबत जॅझ, अभिजात पाश्चात्य संगीत व लोकसङ्गीत अशा विविध प्रवाहांवर काम केले. १९५४ साली सोव्हिएत युनियनमधील मैफिल ही त्यांची पहिली आंतरराष्ट्रीय मैफिल. त्यानंतर १९५६ साली त्यांनी युरोप अमेरिकेत नेक कार्यक्रम केले. यात एडिनबर्ग फेस्टिव्हल, रॉयल फेस्टिव्हल हॉल अशा प्रतिष्ठेच्या मंचांचा समावेश आहे. १९६५ साली बीटलसच्या जॉर्ज हॅरिसन यांनी सतार शिकण्यास सुरूवात केली. या काळात त्यांचे हॅरिसन यांच्याशी प्रस्थाप्त झालेले मैत्रीपूर्ण संबंध त्यांना आंतरराष्ट्रीय मंचांची पायरी चढवण्यास मदतभूत ठरले. जॉर्ज हॅरिसन हे रवी शंकरांचे पॉप जगतातील "मेन्टर" (पालक) मानले जातात. मा.रवि शंकर यांचे ११ डिसेंबर २०१२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 4, 2017


  • मराठीतील प्रसिद्ध लेखक, समाजसेवक, चित्रकार आणि पत्रकार डॉ.अनिल अवचट

    डॉ.अनिल अवचट यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे झाला. त्यांचा जन्म २६ ऑगस्ट १९४४ रोजी झाला. त्यांनी आपली एम.बी.बी.एस ची पदवी पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून घेतली. आपल्या महाविद्यालयीन जीवनातही त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला. १९६९ मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक पूर्णिया हे प्रसिद्ध केले. तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले आहे. आतापर्यंत त्यांची २२ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. महाराष्ट्र राज्य व देशपातळीवर त्यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे. डॉ. अनिल अवचटांच्या लिखाणाप्रमाणेच त्यांचे सामाजिक कार्यही बहुआयामी आहे.

    अनिल अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र याचे संचालक आहेत. त्यांनी आपल्या पत्नीा डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची शोधलेली अनोखी पद्धती ही जगभरातील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते. डॉ. अनिल अवचट हे स्वत: पत्रकार असले तरी त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला नेहमीच नकार दिला आहे. त्यांनी आपली पत्रकारिता नेहमीच गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली आहे.

    डॉ. अनिल अवचट यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी विपुल लिखाण केले आहे. विविध प्रश्नांवर लढा देताना आपले संपूर्ण आयुष्य एखाद्या प्रश्नासाठी खर्च करणार्याा कार्यकर्त्यांविषयीही त्यांनी लिखाण केले आहे. डॉ. अवचट यांचे लेखन हे प्रेरणादायी आहे. सर्व सामाजिक लढ्यांमागच्या चांगल्या गोष्टी त्यांनी नेहमीच अधोरेखित केल्या आहेत. नवीन पिढीलाही त्यांचे लेखन प्रेरणादायी वाटते यात शंका नाही. डॉ. अनिल अवचट हे केवळ लेखक व सामाजिक कार्यकर्तेच नसून ते एक कलाकारही आहेत.

    त्यांची चित्रे, लाकडातील शिल्पे, छायाचित्रे,ओरिगामी, बासरी वादन यांतून त्यांच्या अंगभूत गुणांची ओळख पटते. मुक्तांगण परिवारातर्फे दरवर्षी डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार दिला जातो. आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळविणार्या व्यक्ती : पारोमिता गोस्वामी, गिरीश लाड, आबा महाजन, पुण्याचे पार्किन्सन मित्रमंडळ, चित्रपट दिग्दर्शक श्री. नागराज मंजुळे, प्रमोद उदार, वगैरे.
    डॉ. अनिल अवचट यांची पुस्तके सलग तीन वर्षे महाराष्ट्र शासनाने "सर्वोत्कृष्ट पुस्तके" म्हणून जाहीर केली आहेत. अमेरिकेतील आयोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लेखकांच्या संमेलनात त्यांच्या साहित्याचा गौरव करण्यात आला आहे.

    सातारा येथील न्या. रामशास्त्री प्रभुणे प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा सामाजिक न्याय पुरस्कार (२००७). साहित्य अकादमी तर्फे प्रथम बाल-साहित्य पुरस्कार १४ नोव्हेंबर २०१०. महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार २०११. डॉ. अनिल अवचट यांच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राला १२ व्या पुलोत्सव सोहळ्यात पुल कृतज्ञता सन्मान (२०१५) प्रदान करण्यात आला.

    श्री.संजीव, वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      August 26, 2017


  • शंकर जयकिशन या संगीतकार जोडीतील जयकिशन

    आज १२ सप्टेंबर....शंकर जयकिशन या संगीतकार जोडीतील जयकिशन यांची पुण्यतिथी

    जयकिशन यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९२९ रोजी झाला. जयकिशन यांचे पूर्ण नाव जयकिशन दयाभाई पांचाल होते.

    जयकिशन यांचे हार्मोनियम वरती उत्तम प्रभुत्व होते. त्यांच्या या छंदाला नवीन आकार देण्याच्या वेडापोटी ते मुंबई सारख्या मायानगरी मध्ये आले. शंकर (पूर्ण नाव शंकरसिंह रघुवंशी) यांनी जयकिशन यांनाही पृथ्वी थिएटरमध्ये बोलावून हार्मोनिअम वाजवायचे काम मिळवून दिले. त्यांच्या सोबतच पृथ्वी थिएटरमध्ये एक गोरा देखणा तरूण आपल्या निळ्या डोळ्यांत नव्या चित्रपटाची स्वप्ने घेवून फिरत होता. त्याने आग नावाने पहिला चित्रपट काढला. त्या चित्रपटाला संगीत देणार्याखला राम गांगुली यांना सहाय्यक म्हणून शंकर काम करत होते.

    दुसर्‍या चित्रपटाच्यावेळी त्या तरूणाच्या लक्षात आल्या की जुन्या लोकांशी आपले जमणार नाही. समवयस्क शंकरसोबत त्याच्या काळजाच्या तारा जुळल्या.शंकरने जयकिशनला सोबत घेण्याचा आग्रह धरला. त्याचे नाव राज कपुर. पृथ्वी थिएटर ची निर्मिती "बरसात" या चित्रपटासाठी राज कपूर हे संगीतकार म्हणून नवीन जोडीच्या शोधात होते त्यांनी शंकर आणि जयकिशन यांच्यावर ती जबाबदारी सोपवली. आणि १९४८ साली प्रदर्शित झालेल्या "बरसात" ची गाणी सुपरहिट झाली आणि इथून पुढे शैलेंद्र, हसरत जयपुरी, लता मंगेशकर, मुकेश आणि शंकर - जयकिशन यांनी भारतीय संगीत क्षेत्रात एक इतिहास घडवला. हे दोघेही काही काळ त्याकाळचे प्रसिद्ध संगीतकार हुस्नलाल- भगतराम यांच्या हाताखाली सहायक म्हणून काम करत होते.

    शंकर - जयकिशन या जोडीने जवळजवळ १७० हून जास्त चित्रपटांना संगीतसाज चढवला. ज्यामध्ये विशेष संगीतामुळे गाजलेले बादल, सीमा, बसंत बहार, चोरी - चोरी, कठपुतली, यहुदी, अनाडी, छोटी बहन, दिल अपना और प्रीत पराई, जिस देश मे गंगा बहती है, जंगली, प्रोफेसर, दिल अपना और प्रीत पराई, हमराही, राजकुमार, आम्रपाली, सुरज, तिसरी कसम, मेरा नाम जोकर, असली नकली इत्यादी चित्रपटाचा समावेश होतो. त्यांना चोरी - चोरी , अनाडी, दिल अपना और प्रीत पराई, प्रोफेसर, सुरज, ब्रम्हचारी, मेरा नाम जोकर, पहचान, आणि बेईमान या चित्रपटासाठी एकूण नऊ वेळा सर्वश्रेष्ठ संगीतकार म्हणून फिल्मफ़ेअर पुरस्कार मिळाला आहे. शंकर जयकिशनचे नाव काढले की पहिल्यांदा राज कपुरच डोळ्यांसमोर येतो व मुकेशचा आवाज आपल्या कानात घुमायला लागतो.

    'शंकर-जयकिशन' यांनी गोपनीयता म्हणून कुठल्याही गीताची चाल वैयक्तिक कुणी बांधली ते कुणालाही सांगायचे नाही असा एक अलिखित नियम पाळला होता. मात्र संगम चित्रपटातील एक गीत "ये मेरा प्रेमपत्र पढकर तुम नाराज न होना!" हे बिनाका गीतमाला या नभोवाणीवरील एका कार्यक्रमामध्ये खूप दिवस प्रथम क्रमांकावर वाजू लागले आणि जयकिशन यांनी हे गीत मी रचले असे सांगून तो नियम मोडला. मो. रफी आणि राज कपूर यांनी त्यांच्यातील मतभेद मिटवून त्यांच्यामध्ये समन्वय निर्माण केला.

    'शंकर-जयकिशन' या संगीतकार जोडीतील संगीतकार ... संगीत दोघांच्याही रक्तात वहात होते. पुढे ही मैत्री इतकी घट्ट झाली की जयकिशन यांच्या अकाली जाण्यानंतरही १६ वर्षे एकट्या शंकर यांनी चित्रपटांना संगीत दिले पण नाव मात्र ‘शंकर जयकिशन’ असेच ठेवले होते. तसा त्या दोघांत करारच झाला होता असं म्हणतात. गुजरात मध्ये त्यांच्या जन्मगावी त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.

    कल खेल मे हम हो ना हो
    गर्दीश मे तारे रहेंगे सदा
    भूलोंगे तूम भूलेंगे वो
    पर हम तूम्हारे रहेंगे सदा
    रहेंगे यहा अपने निशा
    इसके सिवा जाना कहा
    जयकिशन यांच्याही ओठांवर मृत्यूसमयी हीच ओळ असेल.

    जयकिशन १२ सप्टेंबर १९७१ रोजी निधन झाले.

    शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली काही गीते.

    बहारो फुल बरसाओ मेरा मेहबूब आया है (सूरज)
    आजा सनम मधुर चांदनी ( चोरी चोरी)
    जाऊ कहा बताए दिल ( छोटी बहन)
    तेरी प्यारी प्यारी सुरत को किसी कि नजर न लगे ( ससुराल)
    दिलके झरोखे मे तुझको बिठाकर (ब्रह्मचारी)
    जिंदगी एक सफर है सुहाना ( अंदाज)
    जाने कहा गये वो दिन (मेरा नाम जोकर)
    तेरा जाना दिल के अरमानोंका लुट जाना (अनाडी)
    किसी कि मुस्कुराहटो पे हो निसार (अनाडी)
    हम तेरे प्यार मे सारा आलम (दिल एक मंदिर)
    जिना यहां मरना यहां इसके सिवा जाना कहां (मेरा नाम जोकर)

    संजीव वेलणकर, पुणे.
    ९४२२३०१७३३

    संदर्भ:- इंटरनेट

      September 12, 2016


  • क्रिकेटपटू चंदू बोर्डे

    बोर्डे सर म्हटले की डोळ्यासमोर एक नाव येते ते म्हणजे विजय हजारे यांचे कारण विजय हजारे यांच्या शैलीमध्ये ते खेळायचे .

      August 3, 2021


  • संगीतकार श्रीकांत ठाकरे

    श्रीकांत ठाकरे, एक असं नाव ज्यामुळे मराठी संगीत सृष्टीला नव्या ढंगाची ताज्या दमाची आणि उ़डत्या चालीचा आविष्कार प्राप्त झाला; श्रीकांत ठाकरे यांची ओळख महाराष्ट्राला संगीतकार म्हणून तर होतेच; पण ते स्वत: उत्तम व्यंगचित्रकार, लेखक, समीक्षक, पत्रकार आणि आयुर्वेदाचे अभ्यासक देखील होते.

      December 10, 2017


  • दिनकर दत्तात्रय भोसले (चारूता सागर)

    मराठी कथाविश्वाला जळजळीत वास्तवदर्शी संकल्पनांचा स्पर्श देवून वाचकांना त्यांनी कधी स्वप्नातही ज्याची कल्पना केली नसेल, अशा भयाण परंतु भारतात अनेक ठिकाणी अस्तित्वात असलेल्या विश्वाची सैर, प्रत्यक्ष अनुभवायला कोणी लावली असेल तर ती चारूता सागर ह्यांनीच. गरीब लोकांचे जीवन, त्यांच्या व्यथा, वेदना, अपेक्षा, व माणुस म्हणून इतरांकडून त्यांना किमान मानाची वागणूक मिळावी, अशी त्यांची रास्त आशा जेव्हा पुर्ण झाली नाही तेव्हा, चारूता सागरांची कथा जन्माला आली.

      August 18, 2011


  • शिल्पकार नानासाहेब करमरकर (विनायक पांडुरंग करमरकर)

    आठ टन वजनाच्या आणि साडेतेरा फूट उंच छत्रपतींचा अश्र्वारूढ एकसंध 'पुतळा' बनवणारे शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर ऊर्फ नानासाहेब करमरकर यांचा जन्म २ ऑक्टोबर १८९१ रोजी रायगड जिल्ह्यातील सासवणे येथे झाला.

    त्यांच्या वडिलांचा गणपतीच्या मूर्ती बनवण्याचा व्यवसाय होता. त्यामुळे चित्र काढण्याचा नाद असलेल्या करमरकरांना मूर्ती घडवण्याचेही शिक्षण घरीच मिळाले. गावातील देवळाच्या भिंतीवर त्यांनी काढलेले शिवाजी महाराजांचे चित्र पाहून ऑटो रॉथफिल्ड या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्याने पुढाकार घेऊन त्यांना मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये दाखल केले.

    मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्यांनी कलकत्ता इथे स्टुडिओ थाटून व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली. त्या काळात त्यांनी रवींद्रनाथ टागोर, चित्तरंजनदास, महात्मा गांधी, पी.सी. रे प्रभृतींची व्यक्तिशिल्पे घडवली. त्यानंतर 'लंडन रॉयल अॅतकेडमी'मध्ये पुढील शिक्षणासाठी गेल्यावर त्यांना इटली, फ्रान्स, स्वित्झरलंड या देशांमधील कलाकृतींचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. तसेच ब्राँझ कटिंग, 'स्टोन क्रशिंग' ही तंत्रेही आत्मसात करून १९२३ साली ते परतले. शिल्पकलेतील योगदानाबद्दल भारतीय सरकारने १९६२ साली त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले. नानासाहेब करमरकर यांचे निधन १३ जून १९६७ रोजी झाले.

    करमरकर यांची कलाकृती बघायच्या असतील तर अलिबागजवळच्या सासवणे गावातील 'करमरकर शिल्पालया'ला नक्की भेट द्या. सत्तरहून अधिक वर्ष जुन्या घरातच शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचं हे शिल्प संग्रहालय आहे. विविध व्यक्तींचे पुतळे, शेतकरी, कोळीण, कुत्रा, म्हैस असे खूप पुतळे हे त्यांच्या अंगणात प्रवेश करताच दिसू लागतात. आतमध्ये जवळ जवळ २०० हून अधिक लहान-मोठी शिल्पं पाहायला मिळतात. सगळी शिल्पं पाहून त्यांच्या कलेला दाद द्यावीशी वाटते.

    अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

    #NanasahebKarmarkar #VinayakPandurangKarmarkar

      May 5, 2022


  • मजरुह सुलतानपुरी

    भारतीय चित्रपटसृष्टीतील जुन्या काळातील आघाडीचे प्रमुख गीतकार मजरुह सुलतानपुरी यांचा जन्म १ आक्टोबर १९१९ रोजी झाला.
    आझमगड गावात एक तरुण हकिमीचा व्यवसाय करायचा. याला शायरीची मनापासून आवड. अडल्यानडल्या रुग्णांची सेवा करताना याची शायरी सुरूच असायची. याच्या शायरीच्या जादूने रुग्णाचा निम्मा आजार कमी व्हायचा. या शायरीच्या वेडातूनच हसरालूल हसन पुढे मजरुह सुलतानपुरी झाला. मजरुह म्हणजे जखमी किंवा घायाळ करणारा. मजरुहच्या गीतांनी रसिकांना प्रेमळ जखमा दिल्या. त्याच्या गीताच्या जादूने कर्णसेनांना घायाळ केले. प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक ए. आर. कारदार यांनी एका मुशायर्यात हसन यांची शायरी ऐकली. त्या वेळी ते ‘शहाजहान’ चित्रपटाच्या निर्मितीत होते. त्यांनी हसन ऊर्फ मजरुह सुलतानपुरीला गीतलेखन करण्याची ऑफर दिली. मजरुह यांनी नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. मजरुहने लेखणी उचलली आणि कागदावर शब्द उमटवले... ‘गम दिये मुस्तकिल, कितना नाजूक है दिल... ये न जाना... हाये हाये ये जालिम जमाना.’ ‘शहाजहान’चे संगीतकार नौशाद यांनी वाहवा केली. नौशाद यांनी त्या खुशीतच चाल बांधली. पुढे कुंदनलाल सैगल यांच्या दर्दभर्यान आवाजाने मजरुह यांच्या शब्दाला आगळे गहिरेपण दिले. मजरुह यांच्या या पहिल्या गीतरूपी रेशमी बाणाने रसिकांना घायाळ केले. हे कमी की काय, म्हणून मजरुहने पुढील गाण्यांची सुरुवात केली, ‘जब दिल ही टूट गया, हम जी कर क्या करे...’ तिच्या एका नकाराने, सर्वस्व हरपल्याची भावना मजरुह यांनी अशी व्यक्त केली. सैगलच्या आवाजातला या शब्दांतला दर्द काळीज पिळवटणारा ठरला. मजरुह यांच्या घायाळ करणार्या कारकीर्दीचा प्रारंभच असा धडाक्यात झाला. साध्या, सोप्या परंतु काळजाला भिडणार्याळ शब्दांची सुरेख गुंफण ही मजरुह यांच्या लेखणीची वैशिष्ट्ये. पर्शियन शब्दांचा समर्पक वापर त्यांनी चपखलपणे केला. याच वैशिष्ट्यांमुळे चार पिढ्या त्यांच्या गीतांच्या चाहत्या बनल्या. मजरुह यांच्या ‘शायराना’ स्वभावामुळे जवळपास सर्वच संगीतकारांबरोबर त्यांचे सुरेल नाते जमले. ‘शहाजहान’मध्ये काळीज चिरणारे वर्णन करणारी त्यांची लेखणी ‘आरपार’च्या वेळी मात्र प्रेमळ आणि हळवी झाली. तो आणि ती यांच्या नजरेच्या भाषेला, ‘कभी आर कभी पार लागा तीर ए नजर...’ असा रेशमी बाणाचा उपमात्मक आविष्कार झाल्यानंतर ‘बाबूजी धीरे चलना...’मधून प्रेमात कशी जपून पावले टाकायची, याची एवढी मधाळ जाणीव मजरुहच देऊ जाणे. मग ओपींचे ठेकेदार संगीत आणि मजरुह यांचे शब्द यांची कानसेनांना भुरळ पाडणारी जुगलबंदी सुरू झाली. ‘सीआयडी’मध्ये याचा प्रत्यय आला. ‘लेके पहला पहला प्यार...’ अशी प्रेमाची ग्वाही असो, ‘कहीं पे निगाहे कहीं पे निशाना...’मधली सूचकता असो, ‘आँखों ही आँखों में इशारा हो गया...’मधला जीवन जगण्याचा मार्ग असो; मजरुह यांच्या गीतांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यानंतर लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या ‘दोस्ती’ला मजरुह यांच्या गीतांनी जो अर्थ प्राप्त झाला, त्याला तोडच नव्हती. ‘चाहूंगा मैं तुझे साँज सबेरे’, ‘मेरी दोस्ती मेरा प्यार...’, ‘राही मनवा दुख की चिंता...’ या गाण्यांनी इतिहास रचला. त्यानंतर मजरुहची जोडी जमली ती चतुरस्र आरडी बर्मनबरोबर. ‘ओ मेरे सोना...’, ‘आजा आजा मैं हूँ प्यार तेरा...’(तीसरी मंजिल), ‘पिया तू अब तो आजा...’, ‘चढती जवानी...’, ‘कितना प्यारा वादा...’, ‘दिलबर दिल से प्यारे...’, ‘गोरिया कहां तेरा देस रे...’(कांरवा), ‘चुरा लिया है...’, ‘लेकर हम दीवाना दिल...’, ‘आपके कमरे मे...’, ‘मेरीसोनी...’(यादों की बारात), ‘क्या हुआ तेरा वादा...’, ‘बचना ए हसीनों...’, ‘चांद मेरा दिल...’, ‘ए लडका हाय अल्ला...’ (हम किसीसे कम नहीं), ‘निसुल्ताना रे...’, ‘तुम बिन जाऊं कहां...’(प्यार का मौसम), ‘होगा तुम से प्यारा कौन...’, ‘पूछो ना यार क्या हुआ...’(जमाने को दिखाना है) ही या कॉम्बिनेशनची कामगिरी. आनंद-मिलिंद, जतीन-ललित यांच्या संगीताने नटलेली मजरुह यांची अनेक गाणी गाजली. अष्टपैलुत्व हे त्यांच्या लेखणीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य. चित्रपटातील सिच्युएशननुसार गीतलेखन करण्यात मजरुह यांचा हातखंडा. ‘तेरे मेरे मिलन की रैना...’(अभिमान)मधला भाव वेगळा, तर ‘जाइए आप कहां जायेंगे...’(मेरे सनम)मधला लडिवाळ गोडवा पुन:पुन्हा ऐकावासा वाटणारा. ‘रात अकेली है...’(ज्वेल थीफ)मधले आव्हान कानाला सुखावणारे, तर ‘रहे ना रहे हम...’(ममता)मधले औदासीन्य विचार करायला लावणारे. कारकीर्दीच्या प्रारंभीच्या काळात कम्युनिस्ट चळवळीत भाग घेणाऱ्या मजरुह यांनी एकदा पंडित नेहरूंबद्दल अनुदारात्मक काव्य केले. त्याबद्दल त्यांना तुरुंगवासही झाला. कोणताही भाव असो, कोणताही रस असो; तो भाव, रस आपल्या लेखणीने समृद्ध करण्याचे कसब मजरुह सुलतानपुरी यांच्या कडे होते. मा.मजरुह सुलतानपुरी हे दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारा पहिला गीतकार! मा.मजरुह सुलतानपुरी यांचे २४ मे २००० रोजी निधन झाले. आपल्या समुहातर्फे मा.मजरुह सुलतानपुरी यांना आदरांजली.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      October 1, 2017