श्रेष्ठ क्रिकेटपटू पॉली उम्रीगर

पहिले द्विशतक ठोकणारा भारतीय फलंदाज होण्याचा मानही त्यांनाच मिळाला. न्यूझीलंडविरोधात त्यांनी द्वीशतक ठोकले होते.



पॉली उम्रीगर यांचा जन्म २८ मार्च १९२६ रोजी सोलापूर येथे झाला.

पॉली उम्रीगर यांचे मूळ नाव पहलान रतनजी उम्रीगर. त्यांच्या वडीलांची कापडाची कंपनी होती. नंतर त्यांचे वडील मुंबईत स्थायिक झाले. पॉली उम्रीगर यांचे शिक्षण मुंबईत झाले. १९४४ मध्ये झालेल्या बॉम्बे पेंटॅग्युलर स्पर्धेत ते पारसी संघातर्फे खेळले. हा त्यांचा प्रथम श्रेणीतील पहिला सामना. त्यावेळी ते अठरा वर्षांचे होते. १९४८ मध्ये भारतीय कसोटी संघात त्यांची निवड झाली. वेस्ट इंडिजविरोधात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसर्याल कसोटीसाठी त्यांची भारतीय संघात निवड झाली. १९५५ ते १९५८ याकाळात ते भारतीय संघाचे कर्णधार होते. पॉली उम्रीगर मध्यम फळीतील फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज होते. १९६२ साली ते कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाले त्यावेळी त्यांनी इतर कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूपेक्षा अधिक कसोटी म्हणजे ५९ खेळल्या होत्या. त्यांची धावसंख्याही त्यावेळच्या भारतीय फलंदजांपेक्षा अधिक होती. त्यांनी एकूण ३६३१ धावा काढल्या. त्यात बारा शतकांचा समावेश होता. त्यावेळी भारतात सर्वाधिक शतकांचा विक्रमही त्यांच्या नावे होता. सुनील गावस्कर यांच्यापूर्वी सर्वाधिक कसोटी सामने, सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतके उम्रीगर यांच्या नावावर होती.

पहिले द्विशतक ठोकणारा भारतीय फलंदाज होण्याचा मानही त्यांनाच मिळाला. न्यूझीलंडविरोधात त्यांनी द्वीशतक ठोकले होते.

पॉली उम्रीगर यांचे ७ नोव्हेंबर २००६ रोजी निधन झाले.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →