नवनाथ काशिनाथ वहाळ हे शिक्षक, समाजसेवक, विचारवंत व महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासामध्ये विशेष प्राविण्य मिळविलेले गाढे अभ्यासक अशा विविध भुमिकांमध्ये सारख्याच तन्मयतेने व तज्ञपणे वावरणारे, एक चार चौघांपेक्षा वेगळे वाटणारे व्यक्तिमत्व आहे. इतिहास हा अगदी लहानपणापासुन त्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय होता व या इतिहासाला गौरवशाली पराक्रमांची व अंगावर रोमांच उभे करणार्या लढायांची झालर प्राप्त करून देणार्या सुभेदार मल्हारराव, अहिल्याबाई व वीरभैरवी होळकर आदी सेनानिंशी त्यांच्या मनाच्या तारा केव्हाच जोडल्या गेल्या होत्या.
August 29, 2011
“टीकाविवेक”, “उमर खय्यामची कैफियत” आदी समीक्षापुस्तके, आधुनिक विवाहपद्धतील दोष टिपणारी राक्षस विवाह ही कादंबरी, तसेच “आधुनिक राष्ट्रवादी रवींद्रनाथ ठाकुर” सारखे चरित्रपुस्तक याचे लेखन त्यांनी केले.
August 2, 2017
साधना’ (१९३९), ‘सौभाग्य’ (१९४०), ‘भरतमिलाप’, ‘स्वामीनाथ’ (१९४२), ‘रामराज्य’ (१९४३), ‘उर्वशी’ (१९४६), ‘विधरांगणा’ (१९४७), ‘रामबाण’ (१९४८), ‘रामविवाह’ (१९४९), ‘रामायण’ (१९५४). राम-सीतेच्या भूमिकेतील ही जोडी भारतभर पसंतीस उतरली.
April 22, 2010
सामना,जैत रे जैत,एक होता विदुषक अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले.”पिक करपल” हे पुरस्कार विजेते गीत तसेच कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे,वाट चालतो सारे यासारखी त्यांची अनेक गीते लोकप्रिय आहेत.
July 25, 2022
दत्तात्रय केशव केळकर यांनी सामाजिक, वाङमयीन, शैक्षणिक असे विविधांगी लिखाण केले.
'काव्यालोचन', 'साहित्यविहार', 'विचारतरंग', 'उद्याची संस्कृती', 'वादळी वारे', 'संस्कृतिसंगम', 'संस्कृति आणि विज्ञान' या पुस्तकांतून त्यांनी दैववादाकडून विज्ञानवादी भारतीयत्वाकडे जाण्याचा शोध सुरु ठेवला होता.
दत्तात्रय केशव केळकर यांचे ८ ऑगस्ट १९६९ रोजी निधन झाले.
## Dattatray Keshav Kelkar
July 31, 2017
स्वा. सावरकर- नेताजी सुभाषचंद भेट, स्वा. सावरकर- डॉ. बाबासाहेब आंबेडकर भेट, स्वा. सावरकर- गाडगे महाराज भेट, रत्नागिरी येथील पतितपावन मंदिराची स्थापना, स्वातंत्र्यवीरांचे दलितोद्धाराचे कार्य तसेच गांधीहत्येनंतर घडलेल्या अनेक घटना यांचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या विश्वासरावांनी बर्याच प्रमाणात लिखाणही केले आहे. ते एका मोठ्या, प्रदिर्घ व ऐतिहासीक कालखंडाचे महत्वपुर्ण व एकमेव साक्षीदार होते.
‘आठवणी अंगाराच्या’ या त्यांच्या पुस्तकातून त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातील काही महत्त्वाचे क्षण टिपणारे त्यांचे हे पुस्तक चांगलेच गाजले होते.
July 26, 2011
नाडकर्णी, सुरेशचंद्र
प्राणिशास्त्र हा आयुष्यभराचा अभ्यासाचा विषय. फक्त डॉक्टरेट मिळविण्याएवढाच या विषयाचा अभ्यास न करता ४० वर्षे विद्यार्थीप्रिय शिक्षक होण्याचे भाग्य लाभलेले डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी यांचे लौकिक जीवन मात्र त्यांच्या अन्य अनेक कलागुणांमुळे सतत नजरेसमोर राहिले.
क्रीडा, संगीत, साहित्य आणि विज्ञान अशा क्षेत्रांत चौफेरपणे वावरणाऱ्या नाडकर्णी सरांचे निधन त्यामुळेच चटका लावणारे ठरले आहे. फारसी आणि उर्दूमिश्रित स्वरोच्चाराने समोरच्यावर सहजपणे छाप पाडणारे नाडकर्णी जेव्हा हिंदीतून बोलायला लागत, तेव्हा ते बहुधा पेशावरचे असावेत, असा समज व्हायचा. गजल हा जसा त्यांच्या जिव्हाळय़ाचा विषय, तसाच संगीत! बेगम अख्तर या त्यांच्या गुरू आणि त्यांची ठुमरी हा त्यांचा श्वास! अख्तरबाईंवर ते बोलायला लागले की, श्रोताच हरखून जायचा. त्या वेळी हे गृहस्थ ‘सर्प’ या विषयावर तपश्चर्या करीत होते, यावर कुणाचा कसा विश्वास बसणार? प्राणिशास्त्रावर डॉ. नाडकर्णी यांची १०-१२ पुस्तके प्रकाशित झाली आहेत आणि क्रीडा ज्ञानकोशकार म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन, खो खो, कुस्ती, मल्लखांब, हॉकी, ब्रीज या खेळात प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या नाडकर्णी सरांनी टेबल टेनिस या खेळात महाराष्ट्राचे नेतृत्वही केले होते. ज्ञानाची तहान भागली नाही म्हणजे जी तडफड होते, ती नाडकर्णी यांच्यामध्ये दिसत असे. वेगवेगळय़ा विषयांवर अक्षरश: प्रभुत्व असतानाही आणखी काही करण्याएवढी ऊर्जा त्यांच्याकडे कुठून यायची, हे सगळय़ांना पडलेले कोडे असे. आकाशवाणीवर किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक स्व. सुरेशबाबू माने यांच्यावर कार्यक्रम व्हावा, यासाठी त्यांनीच पुढाकार घेतला. मग अनेकांना भेटून त्यांचे ध्वनिमुद्रण मिळविले आणि एक सुरेख कार्यक्रम सादर केला.अशा कामांमध्ये त्यांना जो आनंद मिळत असे, तो त्यांच्यालेखी अवर्णनीय असे. बहुतेक सगळय़ा क्रीडाप्रकारांमध्ये पारंगत असल्याने आणि अनेक भाषांवरही प्रभुत्व असल्याने अशा सगळय़ा खेळांसाठी ते निवेदनआणि समीक्षा करीत असत. ‘उर्दू काव्यातील देशप्रेम’ अशा विषयावर संशोधन करून पीएच.डी. पदवी मिळवणाऱ्या नाडकर्णी सरांचे ‘गज़्ाल’ हे पुस्तक म्हणजे महत्त्वाचा संदर्भग्रंथ ठरला. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये उर्दू मुशायरे आयोजित करण्याची त्यांची धडपड असे. या सगळय़ा व्यासंगावर मात म्हणून नाडकर्णी यांनी फलज्योतिष आणि हस्तसामुद्रिक याही विषयात विशेष अभ्यास केला. मानवाच्या पृथ्वीवरील उत्पत्तीसंबंधी नवीन शास्त्रीय विवेचन करणारे ‘पृथ्वीवर माणूस उपराच’ हे त्यांचे पुस्तकही खूप गाजले. नॉस्ट्रेडेमस या भविष्यवेत्त्याची भविष्यवाणी सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा खटाटोपही नाडकर्णी यांनी केला. इतक्या सगळय़ा विषयांचा पसारा आपल्या आयुष्याला बांधणारा हा माणूस गप्पांच्या मैफलीत बादशहा न होता, तरच नवल! पण माणसांच्या गराडय़ात राहूनही स्वत:चा व्यासंग सतत वाढवीत नेणारा संशोधक आणि अभ्यासक म्हणून आपले स्थान त्यांनी कधीच ढळू दिले नाही. त्यांच्या निधनाने या सगळय़ाच विषयांमध्ये नव्याने प्रवेशणाऱ्यांचा एक फार मोठा आधार गेला आहे.
August 5, 2017
चित्रकार ज्योत्स्ना संभाजी कदम या ठाण्याच्या चित्रकला क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव. व्यावसायिक चित्रकार व लेखिका म्हणून प्रसिद्ध असणार्या ज्योत्स्ना कदम या गेली ३० वर्षे सातत्याने पेंटींग करत आहेत. एक दर्जेदार, सर्जनशील, मनस्वी चित्रकार म्हणून त्यांची कलाक्षेत्रात ख्याती आहे.
May 16, 2014
१९५७ ते १९६२ या काळात डॉ. डी. वाय. पाटील हे काँग्रेसकडून कोल्हापूरचे महापौर होते. १९६७ आणि १९७२ साली ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत आमदार म्हणूनही निवडून गेले होते.
June 9, 2022
संगीतकार, थोर पेटीवादक आणि संगीतसमीक्षक गोविंदराव टेंबे यांचा जन्म ५ जून १८८१ रोजी झाला.
“माझा संगीत व्यासंग” आणि “माझा जीवनविहार” ही त्यांची आत्मपर पुस्तके, तसेच त्यांच्या स्फुट लेखांचे संग्रहदेखील प्रकाशित झाले होते.
गोविंदराव टेंबे यांचे मराठीसृष्टीवरील लेख.
पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक गोविंदराव टेंबे (9-Oct-2016)
ख्यातनाम संगीतकार, पेटीवादक गोविंदराव टेंबे (5-Jun-2017)
ख्यातनाम संगीतकार, पेटीवादक गोविंदराव टेंबे (9-Oct-2017)
ख्यातनाम संगीतकार, पेटीवादक गोविंदराव टेंबे (7-Jun-2021)
# Pandit Govindrao Tembe
November 10, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti