ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांना “सिंहासन” कादंबरीसाठी सुचलेली दिघू टिपणीसांची व्यक्तीरेखा ही रणदिवेंवरुनच सुचल्याचं अनेकजण अगदी ठामपणे सांगतात. दिनू रणदिवे यांच्या व्यक्तीमत्त्वानं प्रेरित होऊन अनेक ज्येष्ठ पत्रकार त्यांच्याविषयी आदरानं बोलतात व त्यांचे विचार व कार्य नवीन पिढीपर्यंत पोहोचवताना दिसतात.
June 18, 2013
विभाग प्रमुख, कॅन्सर रिसर्च सेंटर, मुंबई
December 15, 2010
मॅकेनिकल इंजिनिअरिंगची पार्श्वभूमी असताना गिरीश कुलकर्णी मराठी सिनेइंडस्ट्रीमध्ये आला. हा मुलगा पुस्तकातील मॅकॅनिक्स सिनेमामध्ये कसे वापरेल, सिनेमा काढण्यात तो यशस्वी होईल की नाही, अशा अनेक शंका सुरुवातीला होत्या. मात्र, गिरीश नि:संदेह होता. सगळ्या प्रकारच्या प्रेक्षकांना अपील होणारा सिनेमा आपल्याला काढायचाय आणि त्यात आपण नक्कीच यशस्वी होऊ, असा पक्का आत्मविश्वास त्याला होता. त्याच्या या विश्वासानं आणि केलेल्या प्रयत्नानं 'वळू', 'विहीर', 'गाभ्रीचा पाऊस', 'देऊळ' हे उत्कृष्ट सिनेमे मराठी चित्रपटसृष्टीला मिळाले.
मराठी सिनेमे पाहण्यासाठी प्रेक्षकांना थिएटरकडे वळवण्यात हे सिनेमे महत्त्वाचे ठरले. यावर्षीचा उत्कृष्ट अभिनेता आणि संवादाचा तसंच 'देऊळ'ला बेस्ट फिचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवल्यानंतर गिरीशचं सिनेमा मेकिंगचं टॅलेंट पुन्हा एकदा अधोरेखित झालं. 'तुझा सिनेमा शहरी आणि ग्रामीण भागातील प्रेक्षकांना अपील होतो, हा मेळ साधणं कसं शक्य होतं,' यावर गिरीशचं एकच उत्तर असतं. ते म्हणजे,' आधी मीच माझ्या सिनेमाचा प्रेक्षक असतो. मला आवडला, तरच तो सगळ्या प्रकारच्या प्रेक्षकांना आवडेल असा निष्कर्ष मी काढतो.' आवर्जून पाहावेत असे मराठी सिनेमा आता येत नाहीत, अशी ओरड मध्यंतरी होती. त्यावर 'इतर कुणी मराठी सिनेमा काढत नाही ना, मग आपणच काढू,' या ध्यासानं गिरीशनं कामाला सुरुवात केली. आज त्याचे 'रिझल्ट्स' 'वळू', 'देऊळ'च्या रूपात पाहायला मिळताहेत.
गिरीशला शाळेत असल्यापासूनच नाटकांची आवड. मॅकेनिकलचं शिक्षण घेत असताना नाटकांविषयीची आवड त्याला शांत बसू देत नव्हती. त्यामुळे अभ्यास सांभाळून प्रायोगिक नाटकंही तो करत होता. मध्यंतरी एका रेडिओ स्टेशनसाठी प्रोग्रामिंग हेड म्हणूनही त्यानं काम केलं. मग त्याला सिनेमाचे वेध लागले. या प्रवासात दहावीपासून मित्र असलेल्या उमेश कुलकर्णीची साथ त्याला मिळाली. उमेश एफटीआयआयमध्ये शिक्षण घेत होता. त्यामुळे गिरीशासाठी उमेश सिनेनिमिर्तीसाठी एक 'इन्स्टिट्यूट' झाला. सिनेमा मेकिंगमधल्या तांत्रिक गोष्टी कळण्यासाठी उमेश त्यासाठी माध्यम बनला. मग काय, या जोडगोळीनं मराठी सिनेइंडस्ट्रीला सोन्याचे दिवस देण्यासाठी एकदम भरारीच घेतली. आज ही भरारी यशस्वी ठरली आहे. यापुढेही मायबाप प्रेक्षकांना गिरीश-उमेशनं केलेले उत्कृष्ट सिनेमे पाहायला मिळतील, अशी अपेक्षा करणं नक्कीच फोल ठरणार नाही.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
गिरीश कुलकर्णी
गिरीश कुलकर्णी हा मराठीमधील नामांकित व सध्याचा आघाडीचा कथा व पटकथाकार आहे. वळू, विहीर, आणि देऊळ यांसारख्या दर्जेदार व यशस्वी चित्रपटांच्या कथा व पटकथा लिहून त्यांने सर्वसामान्य रसिकांच्या मनामध्ये मानाचे स्थान पटकाविले आहे. उमेश कुलकर्णी ने प्रथमच दिग्दर्शित केलेल्या गिरणी या डिप्लोमा फिल्मच्या कथेचे व पटकथेचे लेखन गिरीश कुलकर्णीच्या सक्षम व प्रभावी लेखणीकडून घडले. तो जस हाडाचा लेखक व कथाकार आहेच, तितक्याच नैसर्गिकरित्या तो अभिनयदेखील करू शकतो हे त्याने सिध्द केले आहे. गाभ्रीचा पाऊस या सतिश मनवर दिग्दर्शित चित्रपटातील दुष्काळाने पिडीत कर्जबाजारी शेतकर्याची भूमिका त्याला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्तम अभिनेत्याचे पारितोषिक मिळवून गेली. आज गिरीश त्याच्या बहुस्पर्शी कर्तुत्वामुळे लाखो मराठी तरूणांचा आदर्श ठरला आहे.
August 8, 2017
एप्रिल २०१८ मध्ये माधव भांडारी यांनी भारतीय जनता पक्षाने मानाचे स्थान दिले असून, मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
July 15, 2022
चित्रपटाच्या आर्थिक गणितांपासून अलिप्त राहून अभिव्यक्तीला प्राधान्य देणार्या गौरी पटवर्धन यांनी सातत्याने वेगळे काम केले आहे. 'मोदीखानाच्या दोन गोष्टी' या राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या माहितीपटातून त्यांनी वेगळा विचार मांडला आहे.
गौरी पटवर्धन यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला गोष्ट वेगळ्या दिग्दर्शिकेची हा लेख पुढील पानावर वाचा.
गौरी पटवर्धन यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला गोष्ट वेगळ्या दिग्दर्शिकेची हा लेख वाचा.
September 7, 2015
ठाणे शहरातील ख्यातनाम चित्रकारांपैकी एक नाव म्हणजे केशव निवृत्ती कासार. चित्रकलेतील आपल्या वेगळ्या शैलीनं समस्त कला वर्तुळात आपला वेगळा ठसा केशव कासार यांनी उमटवला. पॉटरी, सिरॅमिक, लॅंडस्केप, पेंटींग, टेराकोटा, शिल्पकला ही त्यांची वैशिष्ट्ये होत.<
May 16, 2014
सर्वोदयदर्शन, गांधीजी: एक दर्शन, क्रांतिनिष्ठा, आपल्या गणराज्याची घडण, पाकिस्थानी वृत्तीचा प्रतिकार अशी प्रेरक पुस्तके त्यांनी लिहिली होती.
November 8, 2017
डॉ. लक्ष्मण देशपांडे एक बहुरंगी मराठी लेखक, दिग्दर्शक व कलाकार आहेत. मराठवाड्यातीलडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख असणारे डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचे गिनीज बुक ऑफ वर्लड रेकॉर्डस मध्ये नाव आहे. हा बहुमान त्यांना वह्राड निघालय लंडनला ह्या एकपात्री नाटकासाठी मिळाला. ह्या नाटकाचा पहिला प्रयोग त्यांनी इ.स. 1979 मध्ये केला होता. तेव्हापासून आतापर्यंत याच नाटकाचे 1,960 पेक्षा अधिक प्रयोग सादर करण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे. ह्या तीन तासांच्या एकपात्री प्रयोगात ते 52 रुपे सादर करतात.
डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचे मराठीसृष्टीवरील लेख.
डॉ. लक्ष्मण देशपांडे (12-Dec-2016)
एक बहुरंगी मराठी लेखक, नाट्यदिग्दर्शक व अभिनेते डॉ. लक्ष्मण देशपांडे (5-Dec-2017)
डॉ.लक्ष्मण देशपांडे (8-Nov-2019)
March 11, 2015
डॉ. राजन रेळेकर यांनी १९९२ साली ठाण्यात स्वत:चा स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय सुरु केला. १९९७ साली डॉ. राजन यांनी “समर्थ नर्सिंग होम” हे स्वत:चे रुग्णालय सुरु केले. १९९२ पासून डॉ. राजन हे कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सेवा देत आहेत.
May 23, 2014
पत्रपंडित प्रभाकर पाध्ये यांची पत्नी असलेल्या कमल पाध्ये यांनी “बंध अनुबंध” या दर्जेदार आत्मचरित्राद्वारे कधीही पुसली न जाणारी ओळख व किर्ती प्राप्त केली. त्यांच्या विलोभनीय लेखनकौशल्यांद्वारे त्यांनी त्यांच्या जीवनात त्यांना आलेले अनुभव, व त्यांच्या पतीदेवांच्या गुणदोषांवर अचूक टिपणी यांची सुरेख गुंफण साधत, या कादंबरीला साहित्य विश्वात एका उंचीवर नेऊन ठेवले होते.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
January 3, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti