शैलेश भागवत यांचे आकाशवाणी वरून अनेक वेळा सनई वादनाचे कार्यक्रम झाले आहे. त्यांनी भारताबरोबरच दुबई,अमेरिका, युरोप आणि श्रीलंका येथे ही अनेक कार्यकम केले आहेत. शैलेश भागवत यांनी अनेक मोठ्या कलाकारांच्या बरोबर सनईच्या जुगलबंदीचे कार्यक्रम केले आहेत.तसेच परीक्षक म्हणून शैलेश भागवत यांनी अनेक स्पर्धेसाठी काम केले आहे.
July 2, 2022
जिच्या पदस्पर्शाने गुजरातमधील गणदेवी हे छोटेसे गाव पवित्र तिर्थक्षेत्र बनले ती श्री जानकी आई अर्थात बायजी.
March 24, 2010
आशालता वाबगावकर या सुप्रसिद्ध मराठी चित्रपट कलाकार आहेत.
April 13, 2010
स्वातंत्र्याचा लढा, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि राष्ट्रीय सेवादलाशी जोडले गेलेले प्रमुख महिलांपैकी एक नाव आणि राष्ट्रीय सेवादलाच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणजे सुधा वर्दे. माहेरचं अनुताई कोतवाल हे नाव असलेल्या सुधाताईंचा जन्म १९३२ सालचा;लहानपणापासूनच सुधाताईंना विविध कलांची आवड होती.
April 18, 2014
त्यागराज यांची आई श्रीमती मंजुश्री खाडीलकर या ख्यातनाम किर्तनकार, त्यांनी ’किर्तन मंदाकिनी’ ही पदवी मिळविली. त्यांचा जन्म ११ जून १९६७ रोजी झाला. त्यांची आजी श्रीमती इंदिराबाई खाडिलकर ह्या गंधर्व गायकीसाठी प्रसिद्ध. स्वातंत्र सैनिक, पत्रकार, नाटककार श्री. मा.कृष्णाजी प्रभाकर उर्फ काकासाहेब खाडिलकर हे त्यांचे पणजोबा.
बालपणी त्यांनी विख्यात गायक, नट कै. डॉ वसंतराव देशपांडे यांच्याबरोबर ’कट्यार काळजात घुसली’ या संगीत नाटकामध्ये काम केले. त्याचबरोबर मा. शरद तळवलकर यांच्याबरोबर बालकलाकार म्हणुन ’सखी शेजारणी’ या विनोदी नाटकामध्ये काम केले. तसेच अष्टपैलु व्यक्तिमहत्त्व असलेल्या मा. पु. ल. देशपांडे यांच्या ’वार्यावरची वरात’ या चंद्रलेखाचे मोहन वाघ द्वारा निर्मीत नाटकातही काम केले. त्याचबरोबर त्यांनी ’निवडुन’ या दैनंदिन मालिकेतही अभिनय केला.
त्यांनी सगीताचे आणि नाट्य गीताचे शिक्षण आपल्या आजी श्रीमती इंदिराबाई खाडिलकर आणि किराणा घराण्याचे गायक पंडित गंगाधरबुआ पिंपळखरे यांच्या कडून घेतले.त्यांना ’गानहिरा’ हा सन्मान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेद्वारा आयोजित अंतर महाविद्यालयीन शास्त्रीय गायनाच्या स्पर्धेमध्ये मिळाला.
’बिच्छू बाइट’(विंचु चावला) हा युनिवर्सल द्वारा निर्मित त्यांनी आवाज दिलेला अल्बम खूप गाजला.
त्यांनी दत्ता डावजेकर, अनिल मोहिले, श्रीधर फडके, राम-लक्षम, अशोक पत्की,अवधुत गुप्ते या सारख्या सर्व विख्यात संगीतकारांबरोबर काम केले आहे. त्यांनी जवळ-जवळ ३५ मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे. त्यांनी सुपरस्टार भरत जाधव यांना ’चालु नवरा भोळी बायको’ व मकरंद अनासपुरे यांना ’काय द्याच बोला’ या चित्रपटांसाठी आवाज दिला. त्यांनी संगीतकार आनंद मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली ’दिशा’ व संगीतकार बप्पी लहरी यांच्या मार्गदर्शनाखाली सदाबहार हिरो देव आनंद दिग्दर्शित ’मि. प्राय मिनिस्टर’ या हिन्दी चित्रपटांसाठीही पाश्वगायन केले.त्यांनी ६० पेक्षा ही जास्त मालिकांची शिर्षक गीते गायिली आहेत.
#TyagrajKhadilkar
May 4, 2022
डॉ. विष्णू गोपाळ आपटे यांनी अनेक वैद्यकीय पुस्तकांचे लेखन केले.
डॉक्टर असणार्या आपट्यांनी “ग्रामवैद्य अथवा खेड्यांतील प्रजा निरोगी राहण्याचे उपाय”, “न्यायवैद्यक” तसेच “प्रसुतिचिकित्सा” ही पुस्तके लिहिली.
२० जुलै १८९८ रोजी त्यांचे निधन झाले.
Dr Vishnu Gopal Apte
November 7, 2017
December 15, 2010
प्राचीन काळात उत्तर कोकणाची राजधानी असणार्या श्रीस्थानक अर्थात आत्ताच्या ठाणे जिल्ह्याच्या इतिहासाचे संकलन व त्याची माहिती सामान्य माणसाला कळावी, यासाठी हरिभाऊ शेजवळ यांनी मोठा वाटा उचलला आहे..
June 20, 2013
(सु.१५२४-२० मे १५७१)
तुकाराम महाराजांच्या गुरूपरंपरेतील एक मराठी संत. त्यांचे मुळ नाव विश्वनाथ. जन्म पुनवाडी किंवा पुणेवाडी (पुणे) येथे. पित्याचे नाव नृसिंह, आईचे आनंदी. उपनाम राजर्षी किंवा राजऋषी. गिरिजानामक स्त्रीशी त्याचा विवाह झाला होता. त्याशिवाय त्याच्यावर मोहित झालेल्या झबुन्निसा आणि रोशन हया यवन स्त्रियांचाही त्याने भार्या म्हणून स्वीकार केला होता. पुढे आलेल्या एका आपत्तीत झाबुन्निसा आणि रोशन हयांना मरण आले व गिरिजेसह तो ओतुरास (जि. पुणे) आला. तेथे राघव चैतन्य हया सत्पुरूषाची गाठ पडून विश्वनाथाने त्यांचे शिष्यत्व पत्करले आणि संन्यास घेतला. केशव चैतन्य हे त्याचे संन्यास धर्मातील नाव होय. त्याची समाधी ओतूर येथेच आहे. कृष्णदास बैरागीकृत चैतन्यलीला हया अप्रकाशित ग्रंथात केशव चैतन्याने पुढील पाच ग्रंथ लिहिल्याचे म्हटले आहे भक्तिप्रकाश, वैकुंठपद, वासनामय देह, गीताभागवतसार आणि परमार्थविचार तथापि ते सर्व अनुपलब्ध आहेत.
March 11, 2015
नरेंद्र पावसकर यांचे शालेय शिक्षण ठाण्यातील न्यू इंग्लिश स्कुलमधून झाले आणि उच्च कला शिक्षण हे जे.जे. स्कुल ऑफ आर्ट, मुंबई मधून झाले.
May 16, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti