(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अनंत हरि गद्रे

    अनंत हरी गद्रे यांच्याकडे विविध मराठी वाक्प्रचारांचे विलक्षण भांडार होते. ते त्यांनी आपल्या जाहिरात कौशल्यासाठी वापरले. गद्र्‍यांच्या ’कुमारी’ या नाटिकेचे एकामागून एक असे १०१ प्रयोग झाले होते.

      June 18, 2022


  • अनिता सुनिल गौरी

      November 14, 2011


  • डॉ. भगवान नागापुरकर

    डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे.

      July 16, 2017


  • उपेन्द्र लिमये

    उपेन्द्र लिमये हे मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते, दिग्दर्शक आहेत. २००९ साली प्रदर्शित झालेल्या “जोगवा” मधील “तायप्पा”च्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोकृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.

      November 22, 2021


  • वरुण भालेराव

    खगोल आॉलम्पियाडमध्ये भारताला सलग दोन वर्षे सुवर्णपदक त्याने मिळवून दिली. ज्या आयुकात त्याला प्रश्नमंजुषा स्पर्धेत ग्रहतार्‍यांनी खुणावले. त्याच आयुका संस्थेत आज तो संशोधक आहे. अमेरिकेतील कॅलटेक विद्यापीठात पीएचडी करुन भारतात परतलेला वरुण भालेराव अॅस्ट्रोसॅट उपग्रहनिर्मितीवर काम करत आहे.

    वरुण भालेराव यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला 'आयुका' तला लखलखता तारा हा लेख पुढील पानावर वाचा.

    वरुण भालेराव यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला 'आयुका' तला लखलखता तारा हा लेख वाचा.

    bhalerao-varun-modified

      September 9, 2015


  • निशिगंधा वाड

    निशिगंधा वाड ही मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री आहे. लहानपणी दुर्गा झाली गौरी या मराठी नाटकातील तिचे काम लोकांच्या विशेष लक्षात राहिले. निशिगंधाने १०० हून जास्त मराठी व हिंदी चित्रपटांतून काम केले आहे.

      November 18, 2015


  • वामन रामराव कांत ( कविवर्य वा. रा. कांत )

    बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात, त्या तरुतळी विसरले गीत, सखी शेजारिणी.. अशी एकाहून एक सर्वांच्या ओठी असलेली गाणी लिहिणारे ’वा. रा.’ कांत तथा वामन रामराव कांत.

    वामन रामराव कांत यांचा जन्म नांदेड येथे ६ ऑक्टोबर १९१३ रोजी झाला. वा.रा. कांत हे या नावाने लेखन करत. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नांदेड येथे झाले. इंटरपर्यंतचे शिक्षण १९३१ साली हैदराबाद येथे झाले. त्यानंतर शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यांचा विवाह सौ. लक्ष्मीबाई - पूर्वाश्रमीच्या गंगूबाई कुर्डूकर यांच्याशी १९३० मध्ये झाला.

    'विहंगमाला' या नियतकालिकाचे संपादक (१९२८) तसेच विहंग प्रेसचे व्यवस्थापन.
    निजाम सरकारच्या शेतकी खात्यात लिपिक म्हणून नोकरी (१९३३-१९४५)
    निजाम सरकारच्याच आकाशवाणी हैदराबाद व औरंगाबाद केंद्रांत मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहिले (१९४५- १९६०)
    भारतीय आकाशवाणीच्या विविध केंद्रांवर मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहिले (१९६०-१९७०)
    आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सेवानिवृत्त (१९७०)

    त्यांनी एकूण १० काव्यसंग्रह लिहिले.

    'दोनुली'
    ’पहाटतारा’
    ’बगळ्यांची माळ’
    'मरणगंध' (नाट्यकाव्य)'
    मावळते शब्द'
    'रुद्रवीणा'
    'वाजली विजेची टाळी'
    'वेलांटी'’शततारका’ (१९५०)
    ’सहज लिहिता लिहिता’

    वा.रा. कांत यांचे एक छोटेखानी चरित्र - कविवर्य वा.रा.कांत - हे श्री कृ.मु. उजळंबकर यांनी लिहिले असून कालिंदी प्रकाशनाने ते प्रसिद्ध केले आहे.

    वा रा कांत यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान...

    १९६२-६३ वेलांटी या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
    १९७७-७८ मरणगंध या नाट्यकाव्यास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
    १९७९-८० दोनुली या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा 'केशवसुत ' पुरस्कार
    १९८९-९० मावळते शब्द या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा 'केशवसुत' पुरस्कार

    १९८८ महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यातर्फे उत्कृष्ट वाङ्मयसेवेसाठी सन्मान
    १९८९ महाराष्ट्र साहित्य परिषद, हैदराबाद यांच्यातर्फे उत्कृष्ट वाङ्मयसेवेसाठी सन्मान
    १९८९ महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रदीर्घ वाङ्मयसेवेसाठी गौरववृत्ती देऊन सन्मान

    या व्यक्तिचित्राच्या निमित्ताने इंटरनेटवर वा रा कांत यांचे छायाचित्र शोधण्याचा प्रयत्न केला. केवळ एकच छायाचित्र मिळाले..

    `वा रा कांत' यांच्या गाण्यांनी अनेकांना पैसा आणि प्रसिद्धी मिळवून दिली असेल.. पण हा कवी महाराष्ट्राच्या साहित्यपटावर प्रसि‌द्धीपरांगमुखच राहिला.

    # Kant, Waman Ramrao
    # कांत, वामन रामराव
    # Kavivarya Va Ra Kant

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

      September 9, 2016


  • हंबीरराव मोहिते

    छत्रपती शिवाजी महाराज यांचे एक सेनापती. शिवाजीराजांचा राज्याभिषेक झाला असता, हंबीरराव मोहित्यांना हिंदवी स्वराज्याचा सेनापती घोषित करण्यात आले. महाराजांच्या द्वितीय पत्नी सोयराबाई या हंबीरराव मोहित्यांच्या भगिनी होत्या.

      March 12, 2015


  • गणेश (ग प्र प्रधान) प्रभाकर प्रधान

    गणेश प्रभाकर प्रधान (ग प्र प्रधान) हे समाजवादी विचारवंत, राजकारणी व मराठी भाषेमधील लेखक होते.

      December 15, 2010


  • योगेश्वरी मिस्तरी

    धुळ्यात योगासनाची फारशी क्रेझ नाही. हौसेन योगाभ्यास करावा. असेहि काही नाही. मात्र इथलीच योगेश्वरी मिस्तरी नावाची एक चुणचुणीत मुलगी फ्रान्समधील जागतिक योगस्पर्धेत तीन सुवर्णपदकांसह तब्बल ७ पदके जिंकून आली. खर्‍या अर्थाने योगाची योगेश्वरी झालेल्या या मुलीचा थक्क करणारा हा प्रवास...

    योगेश्वरी मिस्तरी यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला योगेश्वरी ... योगाची हा लेख पुढील पानावर वाचा.

    योगेश्वरी मिस्तरी यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला योगेश्वरी ... योगाची हा लेख वाचा.

    mistery-yogeshwari-modified

      September 8, 2015