पटवर्धन, (डॉ.) भूषण
तीन-चार महिन्यांपासून डॉ. भूषण पटवर्धन हे नाव राज्यातील उच्चशिक्षणविश्वामध्ये चर्चेत होते. ते म्हणजे पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या ‘शर्यती’मधील एक प्रमुख उमेदवार म्हणून! काही कारणांमुळे कुलगुरू निवडीचे फासे डॉ. पटवर्धन यांच्यासाठी अनुकूल पडले नाहीत. अर्थात, डॉ. पटवर्धन याला अपयश मानत नाहीत. यामुळे स्थितप्रज्ञ होणे तर त्यांना मुळीच मान्य नाही. बंगळूरू येथील ‘इन्स्टिटय़ूट ऑफ आयुर्वेद अॅण्ड इंटिग्रेटिव्ह मेडिसिन’ या संस्थेच्या संचालकपदी डॉ. पटवर्धन यांची झालेली निवड हे त्याचेच द्योतक आहे.
राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. सॅम पित्रोदा यांनी ही निवड जाहीर केली. आयुर्वेदासारख्या प्राचीन भारतीय ज्ञानशाखेचे महत्त्व वेळोवेळी सिद्ध होत असले तरी त्याचा व्यावहारिक वापर करण्यासाठी आरोग्य-उपचार ज्ञानपरंपरांचा समन्वय साधण्यात आपण कमी पडतो. त्याचप्रमाणे आयुर्वेदासारख्या ऐतिहासिक परंपरेच्या कसोटीवर उतरलेल्या ज्ञानसाधनेचे शास्त्र, अत्याधुनिक विज्ञानाच्या निकषांवर सिद्ध करण्याचे क्षमताविकसन आपण केलेले नाही. या पाश्र्वभूमीवर डॉ. पटवर्धन यांची आयुर्वेद इन्स्टिटय़ूटच्या संचालकपदी नियुक्ती सयुक्तिक ठरत आहे. पुण्यातील फग्र्युसन महाविद्यालयातून रसायनशास्त्र विषयातून पदवी प्राप्त केल्यानंतर अहमदनगरला प्रो. जॉन बार्नबास यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जैवरसायनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मुंबईच्या हाफकिन संस्थेतून पीएच.डी. संपादन केल्यानंतर औषधनिर्माणशास्त्र उद्योगामध्ये संशोधक व व्यवस्थापक या नात्याने भरीव कामगिरी केली. १९९४च्या सुमारास डॉ. पां. वा. सुखात्मे यांच्या प्रेरणेने पुणे विद्यापीठात ‘स्कूल ऑफ हेल्थ सायन्स’ असा स्वायत्त विभाग सुरू करण्यात आला आणि डॉ. पटवर्धन यांचा विद्यापीठीय अध्यापन-प्रशासनामध्ये प्रवेश झाला. आरोग्यशास्त्र व सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात कार्यरत आधुनिक-प्राचीन अशा सर्व ज्ञानपरंपरा, कौशल्ये, प्रणालींचा समन्वय साधून विभागामार्फत समाजाभिमुख संशोधन प्रकल्प हाती घेण्यात आले. अगदी जागतिक बँकेपर्यंतच्या प्रकल्पांना पुणे विद्यापीठाने संशोधनाचे पाठबळ दिले ते डॉ. पटवर्धन यांच्या या विभागामुळेच! जनतेचा महाविज्ञानसोहळा म्हणून गौरविण्यात आलेल्या २००० सालच्या अखिल भारतीय विज्ञान काँग्रेसच्या पुण्यातील अधिवेशनाच्या मुख्य संयोजन सचिवपदाची जबाबदारी डॉ. पटवर्धन यांनी यशस्वी केली. युरोप-अमेरिकेतील आघाडीच्या उद्योगांसमवेत सहकार्य करार करतानाच पुणे महापालिका, जिल्हा परिषदांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांशी सहकार्य प्रस्थापित करून तळागाळातील जनतेच्या आरोग्याचे प्रश्न त्यांनी चार भिंतींमध्ये बंदिस्त राहिलेल्या विद्यापीठीय संशोधनाच्या कक्षेत आणले. आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनाप्रमाणे आंतरआरोग्यशाखीय प्रकल्प उभारण्याचे कार्य डॉ. पटवर्धन यांनी केले आहे. बंगळूरू येथील या संस्थेमार्फत त्याला आंतरराष्ट्रीय व्याप्ती लाभणार आहे. भारतीय उच्चशिक्षणाची निर्यात करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने नेमलेल्या समितीचे सदस्य म्हणून व त्यानंतर मणिपाल विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण प्रकल्पाचे प्रमुख या नात्याने त्यांना देशोदेशीच्या उच्चशिक्षण व संशोधन व्यवस्थेचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. डॉ. पित्रोदा, डॉ. रघुनाथ माशेलकर आदींच्या प्रेरणेने केंद्रीय स्तरावर ‘न्यू मिलेनियम टेक्नॉलॉजी इनिशिएटिव्ह’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत वनौषधी विकासाकरिता कार्यरत असलेल्या राष्ट्रीय प्रकल्पाची जबाबदारी सांभाळणाऱ्या तीन आघाडीच्या संशोधकांमध्ये डॉ. पटवर्धन यांचा समावेश आहे. ‘प्राचीन शास्त्र-परंपरेचा त्याग केला तरच आयुर्वेदाचे आधुनिकीकरण करणे शक्य आहे, असा गैरसमज आपल्याकडे आहे. त्याऐवजी प्रगत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे या प्राचीन ज्ञानशाखेला अधिक बळकटी प्राप्त होत आहे. जनुकीय समस्या, जैवतंत्रज्ञान, जैवमाहितीशास्त्र, कर्करोगाबरोबरच एचआयव्ही-एड्ससारख्या व्याधी आदींवर प्राचीन परंपरांमधील शास्त्र आधुनिकीकरणाच्या माध्यमातून प्रयोगशाळांमधून ताडून पाहणे शक्य आहे. त्यासाठी आयुर्वेदावर आधारित आंतरराष्ट्रीय प्रकल्प व्यासपीठ उभारण्याची नितांत गरज आहे. त्या दृष्टीने बंगळुरू येथील ही नवीन जबाबदारी आश्वासक ठरते आहे,’ असे डॉ. पटवर्धन सांगतात.
August 5, 2017
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) १९९५-२००६ या काळातील महासंचालक. देशातील आघाडीचे वैज्ञानिक. रासायनिक अभियंते असलेल्या माशेलकरांनी नॉन न्यूटोनियम लिक्विड्स या विषयात मौलिक संशोधन केले आहे. पेटंट साक्षरतेची मोहीम रुजवून संशोधन करून ज्ञाननिर्मितीद्वारे पेटंट घेण्यासाठी शास्त्रज्ञांना प्रवृत्त करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.
हळदीची पूड औषधी उपयोगासाठी वापरण्यासंबंधी अमेरिकेला दिलेल्या पेटंटविरुद्ध यशस्वी लढा देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ते अनेक पुरस्कारांचे मानकरी असून त्यातील पद्मविभूषण आणि फेलो ऑफ रॉयल सोसायटी हे प्रमुख आहेत. सध्या ते राष्ट्रीय इनोव्हेशन प्रतिष्ठान आणि ग्लोबल रिसर्च अलायन्सचे अध्यक्ष आहेत.
(जन्म १९४३)
माहितीस्त्रोत - (म.वि.प.चा.) विज्ञानतंत्रज्ञान कोष
December 15, 2010
अभिनयने ‘ श्रीमंत दामोदर पंत ‘ ह्या चित्रपटापासून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पुढे त्याने अकल्पित – एक सत्य कल्पनेपलिकडचे , थापाड्या हे चित्रपट केले.
August 12, 2020
मोहन आगाशे हे मराठी रंगभूमी आणि चित्रपटात काम करणारे लोकप्रिय अभिनेते आहेत.
July 23, 2017
साहित्य अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, फेडरेशन ऑफ इंडिअन पब्लिशर्स यांच्या वतीने दिला जाणारा ‘एक्सलन्स इन बुक प्रॉडक्शन’ पुरस्कार असे अनेक पुरस्कार मेहता पब्लिकेशनच्या पुस्तकांना लाभले आहेत.
June 18, 2022
लोकशिक्षणाचा मार्ग पसंत असलेल्या रघुनाथरावांनी सतत सत्तावीस वषे एकाकी लढत दिली, लैंगिगकतेपवषयी मूलगामी विश्लेलेषण केले. एका अर्थी रघुनाथराव कर्वे हे ‘सुधारक’कार आगरकरांचे एकटेच वारस होते.
July 20, 2022
जानेवारी १६८१ मध्ये संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी उदार अंतःकरणाने अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना माफ केले आणि त्यांना अष्टप्रधान मंडळात पुन्हा स्थान दिले. मात्र काही काळानंतर अण्णाजी दत्तो आणि सोयराबाईंनी पुन्हा संभाजीराजांविरूध्द कट केला आणि त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा घाट घातला. तेव्हा संभाजीराजांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकार्यांना हत्तीच्या पायी देऊन मारले.
December 28, 2018
त्यांच्या प्रत्येक बॅनर मागे एक इतिहास होता, कहाणी होती. रामजोशी चित्रपटाच्या वेळी बाजारात मांजरपाट हे कापड मिळत नव्हते, तेव्हा शांतारामबापूनी मागचा पुढचा विचार न करता सर्व बॅनरसाठी रेशमी तागे मागवले. व रामजोशी चित्रपटाचे बॅनर रेशमी कापडावर रंगवले गेले. त्यावेळी कलायोगीनी रंगवलेला पेशव्यांचा दरबार अतीशय सुंदर रीत्या रेखाटला होता. पुढे मुंबईचे निर्माते पैसे घेऊन मागे लागले असताही कांबळे कोल्हापूरला गेले. तेथे त्यांनी सर्वस्वी पेंटींगला वाहून घेतले.
June 25, 2022
कोल्हापूरचे आयुर्वेदाचार्य डॉ. सुनील पाटील गेली ३० वर्षे आयुर्वेद, वनौषधी यांच्या प्रसारकार्यात व्यग्र आहेत. जगभर विविध देशांमध्ये आयुर्वेद प्रसाराच्या परिषदांचे त्यांनी यशस्वी आयोजन केले. तरुण वैद्यांना नाडीपरीक्षेची ज्ञानगुटी दिली. गगनबावड्यात “आयुर्वेद ग्राम” चा प्रकल्प ते साकारत आहेत.
आरोग्यम् धनसंपदा
July 24, 2015
निःस्पृह न्यायाधीश, उत्कृष्ट लेखक, चिकित्सक अभ्यासक, समाजसुधारक, उत्तम वक्ते, अर्थशास्त्रज्ञ, इतिहास विशारद असे ज्यांचे बहुआयामी व्यक्ति होते ते म्हणजे न्या. महादेव गोविंद रानडे. न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म निफाड तालुक्यात १८ जानेवारी १८४२ रोजी झाला.
July 7, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti