शंकाराचार्यांनी संध्येतील २४ नावे म्हणून दाखव, असे म्हटल्यावर फंदींनी डफावर थाप मारून शीघ्र रचना केली अशी आख्यायिका सांगतात.
June 17, 2022
१९११ मध्ये त्यांनी गायक व संगीतज्ञ पं. विष्णू नारायण भातखंडे यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यास सुरुवात केली व आजमितीला ते भातखंडेबुवांचे सर्वात ख्यातनाम शिष्य मानले जातात.
July 5, 2022
जन्माने मराठी नसूनही महाराष्ट्राच्या मातीत मिसळून गेलेल्या काही उद्योजकांपैकी एक नाव, श्री विजय राजेंद्रप्रसाद गुप्ता.
October 8, 2010
अत्यंत कष्टातून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर हिंदुस्थान एरोनॉटिक्ससारख्या कंपनीत मिळालेली नोकरी त्यागणे, हे खरेतर चैत्राम पवार यांच्यासाठी कठीणच होते. पण जेथे मोठे झालो, त्या बारीपाड्याचा विकास करण्याच्या ध्येयाने त्यांनी नोकरीची वाट सोडली आणि शेती, पाण्याचे स्त्रोत, रानभाज्या, आदिवासींना स्वत:ची ओळख असे अनेक उपक्रम राबवत त्यांनी बारीपाड्याचा चेहरामोहराच पालटून टाकला आहे.
बारीपाड्याचा परिवर्तनमंत्र
July 24, 2015
‘‘माणसाचा शोध, त्याच्या नात्यांच्या जाळ्याचा शोध, हे माझे आकर्षण आहे. इथली माती, इथली परंपरा, जीवनपद्धती, बुद्धिवाद्यांना वाटते तितकी सोपी नाही. इथे विसंगतीत सुसंगत एकात्मता आहे. ही रहस्यांची दालने आहेत. हाडामांसाचा माणूस स्त्री आणि पुरुष, त्यांचे परस्परांशी असलेले गूढ संबंध, त्यांची संदर्भसुसंगत जीवनपद्धती या सर्वाचे माझ्या लेखनाला मोठे आकर्षण आहे.
त्यातूनच प्रेरणा मिळते. माणूस शोधणे ही माझ्यातल्या लेखकाची प्रतिज्ञा आहे. ते जमेल असे वाटते, बघू या.’’ दोनेकच पुस्तके प्रकाशित असताना ललित मासिकाच्या १९८८ सालातील विशेषांकामध्ये कथेविषयीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पाचारण करण्यात आलेल्या या लेखकाची भविष्यातील लेखनघोडदौड ठरलेली होती. कारण माणूस अंतर्बाह्य़ शोधण्याची प्रतिज्ञा दीर्घ कथांद्वारे जमवून दाखविण्याची किमया भारत सासणे यांनी आजही कायम ठेवलेली आहे.
शतकभरापासून कायम पिछाडीवर पडलेल्या आणि साहित्यमरतडांकडून अवहेलना वाटेला आलेल्या कथा या साहित्यप्रकाराला मर्यादा निश्चित असली, तरी मराठी ललित साहित्य जगतात नवकथेच्या कालखंडापासून ते आजच्या टेक्नोसॅव्ही जगापर्यंत वाचनव्यवहार म्हणून जो काही भाग अस्तित्वात आहे, त्यात कथांचे स्थान अढळ आहे. एके काळी गाडगीळ, गोखले, भावे, माडगुळकर, मोकाशी लेखक पंचकांनी कथांची मोहिनी विस्तारली. जी.ए.कुलकर्णी यांनी त्याच वेळी आपल्या कथेची वेगळी यक्षनगरी उभारली. त्यानंतरही अनेक दिग्गजांनी आपल्या लेखन कारकीर्दीचा काही काळ कथांना विभागून दिला. या दिग्गजांमध्ये सातत्याने दीर्घकथा या फॉर्मशी खेळत आणि त्यातील सर्व शक्यता सूक्ष्म पातळीवर आजमावणारी कथा घेऊन येणारे लेखक म्हणजे भारत सासणे.
बीड जिल्ह्य़ाचे माजी जिल्हाधिकारी म्हणूनही नावाजलेल्या सासणे यांनी गेली तीन दशके कविता, एकांकिका, नाटके, कादंबरी, बालसाहित्य अशा विविध साहित्यक्षेत्रांत सारख्याच ताकदीने आपली जादुई लेखणी चालविली. मात्र साहित्य जगतात त्यांची कथाकार म्हणून जी ओळख आहे, ती आभाळाएवढी नक्कीच आहे. धुळे शहरामध्ये बालपण घालविलेल्या सासणे यांनी आपल्या लहानपणीच्या भोवतालाचे ठसे लेखनात उमलून आल्याचे नुकतेच कुठेतरी शब्दबद्ध केले आहे.
जॉन आणि अंजिरी पक्षीपासून त्यांच्या प्रत्येक संग्रहात उत्तरोत्तर माणसाचा शोध गहिरा होत गेला आहे. डफ, उंट, कॅम्प, दुश्चिन्ह आणि चाफ्याचं झाड, रात्र, क्षितिजावरची रात्र, उपसंहार, ठकाजी रामाच्या स्मरणातील रात्र, दु:ख, लग्न, दूर तेथे, दूर तेव्हा, रंगराजाचा अजगर आणि कितीही वाढवत न्यावीत आणि न संपावीत, अशी सासण्यांच्या कथारत्नांची नावे त्यांच्या लेखनाच्या चाहत्यांकडून सांगितली जातील. सूक्ष्म तपशील, खोलवरची चिंतनशीलता, वाचकाला बोट धरून आपल्या विलक्षण सुख-दु:खांच्या जगात नेऊन सोडण्याची हातोटी, तरल काव्यात्मकता आणि तत्त्वज्ञानात्मक आशय ही त्यांच्या कथेची बलस्थाने आहेत. त्यांच्या जमलेल्या कथामफिलीतून दरवर्षी मोजक्याच कथारत्नांद्वारे परिघाबाहेरच्या आणि कल्पनातीत आयुष्यांचे पट सादर होत असतात.
चिरतरुण दु:खांचे बुरूजदर्शन घडविणाऱ्या या यक्षनगरीच्या सम्राटाला साहित्यातील असाधारण कामगिरीबद्दल जाहीर झालेला लाभसेटवार पुरस्कार त्यांच्या कथांना मिळालेला यथोचित सन्मान म्हणावा लागेल.
August 5, 2017
दूरदर्शनवरील ‘नुक्कड’ मालिकेतील त्यांनी साकारलेला ‘गणपत हवालदार’ प्रेक्षकांच्या स्मरणात राहणारा ठरला.
June 17, 2022
गजानन सरपोतदार हे राजकारणीही होते. गं.नी. जोगळेकर यांच्याविरुद्ध ते निवडणुकीला उभे होते, पण थोड्या मतांनी हरले.
June 25, 2022
ठाणे महापालिकेचे माजी महापौर अशोक वैती यांच्या दमदार व खमक्या राजकीय नेतृत्वामुळे त्यांच्या कार्यकाळात ठाण्याचा झपाट्याने विकास झाला.
महापौरपदी विराजमान झाल्यानंतर, या शहराचा आधुनिक व अद्ययावत पायाभुत सुविधांनी चौफेर विकास करण्याचा विडा उचललेल्या वैती यांनी एकामागोमाग एक अशा कल्पक व कलात्मक योजना आखून व सर्वसामान्य चाकरदार जनतेला अग्रस्थानी ठेवून या शहराचा चेहरामोहराच बदलवून टाकला. चांगले रस्ते व पदपथ, सायकल ट्रॅकची आदर्श रचना, आरोग्य सेवेच्या प्रगत सुविधा, उच्चस्तरीय शिक्षण व मुबलक पाणी पुरवठा या मुलभूत घटकांना पुरेसा न्याय देणारा शास्त्रशुध्द विकास आराखडा त्यांच्या अधिपत्याखाली साकारला गेल्याने, हे शहर वेगाने आता एका सस्टेनेबल विकासाचे उत्कृष्ठ असे द्योतक ठरत चालले आहे.
हरित विकास प्रकल्प, हरित जनपथ प्रकल्प अशा पर्यावरणीय समतोलाशी आपलं नातं सांगणार्या प्रकल्पांच्या सामावेशामुळे, हा आराखडा पर्यावरणाशी सौहार्दपुर्ण संबंध प्रस्थापित करेल याची वैती यांनी पुरेशी दक्षता घेतली. त्यामुळे पर्यावरणमित्रांकडून देखील या उपक्रमाला हिरवा कंदिल मिळालेला.
घनकचर्याचे शास्त्रोक्त पध्दतींनी विघटन करण्याकरिता बायोमिटोनायझेशन प्रकल्प, घरोघरी कचरा संकलन, तसेच सामाजिक पायाभुत सुविधांअंतर्गत प्रभाग कार्यालये बांधणे, भाजी मंडया उभारणे, मिनी स्टेडियमच्या रचना साकारणे, क्रिडा संकुलांची उभारणी करणे अशा अनेक सार्वजनिक बांधकाम योजनांमुळे ठाणेकरांना दिलासा मिळाला. या सर्व योजनांची आखणी व त्यांच्या समर्थ अंमलबजावणीचे श्रेय अर्थात अशोक वैती यांना जाते. त्यांनी ठाणे शहरातील रस्ते वाहतुकीच्या विकासासाठी दिलेले योगदानदेखील केवळ अतुलनीय असेच म्हणावे लागेल. रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण, पुलांचे रूंदीकरण, नव्या उड्डाणपुलांची रचना व या शहरातील अतिशय निकडीच्या बनत चाललेल्या अशा पार्किंग सुविधेच्या प्रश्नाचा निकाल लावण्याकरिता त्यांनी केलेली, विविध महापालिका वाहन तळांची निर्मिती, त्यांच्या दुरदृष्टीची व सामाजिक तळमळीची साक्ष देते. महापालिकेतर्फे मोक्यांच्या जागांवर ट्रक टर्मिनसची बांधणी, ही योजना देखील त्यांनीच लढवलेल्या एका कल्पक शक्कलीची परिणीती आहे.
केंद्र शासनाच्या उर्जा मंत्रालयाच्या अकराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत ठाणे शहराची निवड सौर शहरांच्या यादीमध्ये झाल्यामुळे येथे सौर उर्जेवर चालणार्या अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांची नांदी झाली. अशा प्रकल्पांना आर्थिक पाठबळ देण्यामध्ये मोलाची भुमिका त्यांनी बजावली आहे. तसेच ठाण्यामधील ऐतिहासिक अशा मासुंदा तलावावर लेझर शोची अभिनव रचना साकारण्यामागेदेखील त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
क्रीडा क्षेत्रातील हिरे पारखून त्यांना विनामुल्य प्रशिक्षण शिबीरे, व तज्ज्ञ प्रशिक्षकांचा सहवास लाभण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान अगदी वाखाणण्याजोगे आहे.
January 12, 2015
मुळगंद यांच्या कलासाधनेची दखल समाजानेही घेतलेली आहे. कलाछाया पुरस्कार, कलागौरव पुरस्कार, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुरस्कार, कलारत्न पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा रंगकर्मी पुरस्कार, कै. राजा मंत्री पुरस्कार, कै. मधू आपटे पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले.
June 24, 2022
आंतरराष्ट्रीय धावपटू सावरपाड़ा एक्सप्रेस कविता राऊतचा वारसा चालविणारी नाशिकची 'लिटिल गर्ल' मोनिका आयरे हिने १३ च्या वर्षीच उदयोन्मुख धावपटू म्हणून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आतापर्यंत १६ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये २० सुवर्ण, १२ रौप्य आणि १० कांस्य पदके पटकावून तिने केलेली कामगिरी लक्षवेधी ठरली आहे.
मोनिका आयरे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला विक्रमी दौड हा लेख पुढील पानावर वाचा.
मोनिका आयरे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला विक्रमी दौड हा लेख वाचा.
September 11, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti