(डॉ.) राजाराम देशमुख

कृषिप्रधान असलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशात कृषी विद्यापीठांची स्थापना केली. तेव्हा कृषीक्षेत्रात नव्या संशोधनाची आवश्यकता होती, तशीच हे संशोधन सामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहचण्याचीही गरज होती. नेहरूंच्या मनातले हे स्वप्न साकार करण्यासाठी ज्या ज्या कृषी तज्ज्ञांनी अथक प्रयत्न केले, त्यामध्ये राहुरी कृषी विद्यापीठाचे मावळते कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख यांनी जे कष्ट केले आहेत, त्याला तोड नाही.

उद्योगाच्या क्षेत्रात संशोधन आणि त्याचा प्रत्यक्ष वापर ही साखळी इतकी कमी कालावधीची आहे की, जगात कोणतेही नवे संशोधन होताच, त्याचा दैनंदिन जीवनात तातडीने वापर कसा करता येईल, याचा विचार उद्योगक्षेत्रातील सगळेचजण करत असतात. मात्र भारतातील कृषी विद्यापीठे आणि सामान्य शेतकरी यांच्यातील दुरावा बराच काळ तसाच राहिला. त्यामुळे कोणत्याही पिकाचे नवे वाण तयार करण्यात यश मिळाले, तरी त्याचा प्रत्यक्ष वापर होण्यासाठी बराच कालावधी जावा लागत असे. डॉ. देशमुख यांनी कृषी विद्यापीठे ही शेतकऱ्यांची तीर्थस्थाने कशी होतील, याकडे लक्ष दिले. राहुरी कृषी विद्यापीठ शेतकऱ्यांची पंढरी झाली, याचे कारण शेतकरी आणि संशोधक यांच्यात समन्वय निर्माण करण्यासाठी त्यांनी घेतलेले अपार कष्ट. त्यासाठी शेतकरी शास्त्रज्ञ मंच, कृषी तंत्रज्ञान सप्ताह, इंटरनेटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घरबसल्या सल्ला असे अनेक उपक्रम डॉ. देशमुख यांनी यशस्वीरीत्या राबवले. त्यांना भारतातल्या शेतकऱ्यांची मानसिकता चांगलीच ठाऊक आहे. हे संशोधन शेतकऱ्यांच्या फायद्याचे ठरत नाही, तोवर त्याला प्रतिसाद मिळणे कठीण आहे, याची जाणीव त्यांना होती. हरभऱ्याचे पीक घेताना येणारे उत्पादन वाढण्यासाठी त्यांनी केलेले संशोधन अक्षरश: वरदान ठरले आहे.

फुले जी-५, फुले जी-१२, विजय, विशाल, विराट, विहार, दिग्विजय या हरभऱ्याच्या जाती त्यांनी विकसित केल्या. पूर्वी हरभऱ्याचे उत्पादन फार कमी येत असे. या नव्या वाणानंतर त्यात तिपटीने वाढ झाली. कडधान्यांच्या उत्पादनाची कमतरता भरून काढण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची देशपातळीवर प्रशंसा झाली. सध्याच्या शेतीची चौकट बदलण्यासाठी शेतकऱ्याची मानसिकता बदलणेही आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन, त्यांनी जगात येऊ घातलेल्या जैवतंत्रज्ञानाच्या विकासाला हातभार लावण्यासाठी एका स्वतंत्र प्रयोगशाळेची उभारणी केली. खासगी कंपन्यांच्या सहकार्याने विद्यापीठाच्या क्षेत्रावर जीएम बियाणे विकसित करण्याचे त्यांचे प्रयोग पर्यावरणवाद्यांच्या दृष्टीने वादग्रस्त ठरले आणि कोल्हापूरच्या केंद्रावर हल्लाही झाला. त्यावेळी शास्त्रज्ञांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहत ते केंद्र सुरू राहील याची दक्षता त्यांनी घेतली. सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्राला असलेल्या मर्यादा लक्षात घेऊन त्यांनी खासगी उद्योगांच्या मदतीने प्रयोग सुरू केले.

महिको, मोसॅन्टो, जैन, पारस, महिंद्रा, कोरसपाइप यांच्यासह अनेक कंपन्यांच्या मदतीने कृषी क्षेत्रातील संशोधनास चालना देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी सुरू केला आणि त्याला उत्तम प्रतिसादही मिळाला. जगाला भेडसावणाऱ्या तापमानवाढीचा कृषी क्षेत्रावर सर्वात मोठा परिणाम होऊ शकेल, हे लक्षात घेऊन डॉ. देशमुख यांनी नवी पीकपद्धती (क्रॉप पॅटर्न) विकसित करण्याची योजना आखली आहे. सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेतीबाबत टोकाचा आग्रह न धरता मध्यममार्ग अनुसरून शेतकऱ्याचे हित पाहणारे ते आघाडीचे शास्त्रज्ञ आहेत. स्वत:च्या गुणवत्तेवर पीएच.डी.पर्यंत मजल मारणारे डॉ. देशमुखांचा, शालेय शिक्षणात कृषी हा विषय समाविष्ट व्हायला हवा, असा आग्रह आहे. राष्ट्रीय कृषी संशोधन परिषदेने राहुरी कृषी विद्यापीठाला सवरेत्कृष्टतेचे प्रमाणपत्र देऊन त्यांच्याच कार्याचा गौरव केला आहे. जगातील अनेक मान्यवर पुरस्कारांचे धनी असलेले डॉ. राजाराम देशमुख निवृत्त झाले ते केवळ नियमानुसार. या नंतरही त्यांचे कार्य असेच जोमदार असेल, अशी कामना देशातील सगळेच शेतकरी करतील, यात शंका नाही.

Author